विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.45.0-wmf.5
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
अनुक्रमणिका:लोकसाहित्याच्या अभ्यासदिशा.pdf
106
105770
221821
221783
2025-06-16T07:51:15Z
कल्पनाशक्ती
3813
221821
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=[[लोकसाहित्याच्या अभ्यासदिशा]]
|Language=mr
|Volume=
|Author=[[Author:तारा भवाळकर|तारा भवाळकर]]
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=स्नेहवर्धन प्रकाशन ८६३, सदाशिव पेठ, महात्मा फुले सभागृहामागे , पुणे - ४११ ०३०
|Address=पुणे
|Year=2009
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist 7="अनुक्रमणिका" 8="मनोगत" 12="लोकसाहित्याच्या अभ्यासदिशा" 20 ="लोकसाहित्याचे स्वरूप व व्याप्ती" 27="लोकसाहित्य आणि अन्य ज्ञानशाखा (मानसशास्त्र)" 34 ="लोकसाहित्य आणि अन्य ज्ञानशाखा (मानववंशशास्त्र, समाजशास्त्र व भाषाविज्ञान)" 40="लोकसाहित्य आणि अन्य ज्ञानशाखा (इतिहास, पुरातत्त्वशास्त्र, भूगोल)" 50="लोकसाहित्य : सामाजिक-सांस्कृतिक जीवनाशी संबंध" 56="लोकसाहित्याच्या अभ्यासपद्धतींची तोंडओळख" 62="लोकसाहित्याची योग्य अभ्यासपद्धत" 67="लोकसाहित्यांतर्गत लोकाविष्कार" 75="लोकाविष्कारांची प्रमुख रूपे" 85="लोकसाहित्याच्या शाब्दरूपांचा अभ्यास" 93="नाट्यात्मक लोकाविष्कारांचे काही प्रकार" 101="वारकरी, नारदीय आणि रामदासी कीर्तनपद्धती व विवाह विधी" 116="लोकसंस्कृतीची वैशिष्ट्ये व त्यातील सातत्य" 121 ="अभिजात साहित्य आणि कला व लोकतत्त्व यांचा संबंध"/>
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=

7rl4dmnc6wz9mo3vgd8zbkpx6m5lmyp
पान:लोकसाहित्याच्या अभ्यासदिशा.pdf/११३
104
107756
221809
2025-06-16T07:23:23Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
221809
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>प्रकर्षाने दिसते असे पद म्हणण्याचा प्रघातही आहे.
{{center|<poem>कल्याण करी देवराया । जनहित विवरी । कल्याण....
तळमळ तळमळ होताचि आहे । हे जन हाती धरी ॥ १ ॥
अपराधी जन चुकतचि गेले । तुझा तूचि सावरी ॥ २ ॥
कठिण त्यावर कठीण आले ॥ आता न दिसे उरी ॥ ३ ॥
कोठे जावे काय करावे । आरंभिली बोहरी ॥४॥
दास म्हणे आम्ही केले पावलो । दयेसी नाही सरी ॥५॥</poem>}}
{{gap}}तात्पर्य काय तर जनकल्याणाची तळमळ हा सर्वच संतांच्या जीवनाचा इत्यर्थ रामदासी कीर्तनातूनही अनुभवाला येतो...

'''विवाह विधी : एक नाट्यात्मक विधी -'''
{{gap}}जगभराच्या लोकधारणांमध्ये स्त्री व भूमी परस्पररूपांत प्रतीके म्हणून मानल्या आहेत. भारतात तर स्त्री भूमीरूपच मानली जाते. भूमी ज्याप्रमाणे निर्मितीचे व पोषणाचे कार्य करते, तसेच स्त्रीही अपत्य जन्माला घालणे व पोषण करणे ही कामे करते.
{{gap}}भूमीला सुफलित करण्याचे कार्य आकाशातील पर्जन्य व सूर्य करतो. स्त्रीला पुरुषसहवासातून गर्भधारणा होते. हे साम्य पुरुषाला आकाशतत्त्व मानून लोकमनाने व्यक्त केले आहे.
{{gap}}भूमी हीच पुढे लक्ष्मीरूप देवता व आकाशातत्त्व हे नारायण रूपात परिणत झाले. त्यामुळे स्त्री-पुरुष विवाह सोहळा हा भूमी व आकाशतत्त्व यांच्या मीलनाचे प्रतीकात्मक नाट्य म्हणूनच साजरे केले जाते. म्हणजे हा एक नाट्यात्म विधी (Dramatic ritual) होते.
{{gap}}नवरा आणि नवरी ही विष्णू आणि लक्ष्मी यांची किंवा शिव आणि पार्वती यांची रूपे आहेत. किंवा नवरा, नवरदेव हे विश्वातल्या पुरुषत्वाचे ('द्यौ' आकाशतत्त्वाचे) प्रतीक, तर नवरी (देवी) ही विश्वात्मक स्त्रीत्वाचे (पृथ्वीचे) प्रतीक म्हणून मानली जाते. त्यांच्या मिलनाचा सोहळा हा एक नाट्यात्मक विधी (Dramatic Ritual) आहे. आकाश आणि पृथ्वी या विश्वात्मक आद्य पुरुष-स्त्रीतत्त्वाची प्रतीके म्हणजे मानवी स्त्री-पुरुषांचा विवाहसोहळा होय.
{{gap}}अगदी वैदिक विवाहविधीपासून ते आदिवासी विवाहपद्धतीपर्यंत सर्व स्तरांमध्ये आकाश - पृथ्वीच्या मिलनाचे प्रतीक पुनः पुन्हा वापरले आहे, ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. विवाहाच्या आठ प्रकारांपैकी ब्राह्मविवाहाचा धर्मनिर्णय मंडळाने जो अत्यावश्यक विवाहविधी निश्चित केला आहे आणि त्याच्याशी संबंधित असे जे श्रौत मंत्र दिले आहेत, त्यातला महत्त्वाचा मंत्र असा-{{nop}}<noinclude>
लोकसाहित्याच्या अभ्यासदिशा ● ११०</noinclude>
6wavxja4t91po68vvwbiqlz7xzq2tqc
पान:लोकसाहित्याच्या अभ्यासदिशा.pdf/११४
104
107757
221810
2025-06-16T07:28:31Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
221810
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>वर वधूला म्हणतो,

{{center|"द्यौरहं पृथिवी त्वं ।" (मी आकाश, तू पृथ्वी आहेस)}}

या मंत्राचे होमाच्या वेळी तीन वेळा आवर्तन होते. महाराष्ट्रातल्या आदिवासींपैकी वारली जमातीत किंवा ठाणे जिल्ह्यातल्या आगरी पॅस नावाच्या जमातीत लग्नाच्या वेळी पौरोहित्य करणारी 'धवलेरी' नावाची स्त्री जी गीते गाते, त्यांचे काही नमुने महादेव कडू व गोविंद गारे यांनी 'आदिवासींची गोड गाणी' मध्ये दिले आहेत.
{{center|<poem>"आगाशी मंडप ।
धरतरे बहोला ॥
सुलगीन लागेला ।
कोणे रे देवाचा ॥"</poem>}}
असा प्रश्न करून मग निसर्गतत्त्वांच्याच परस्पर जोड्या पुढच्या गीतात ती सांगते. चंद्र-सूर्याने किरणात बाळीबरोबर विवाह केला, तर चंद्राने रोहिणीशी लग्न लावले. ब्रह्याने रेघापत बाळ वरली, ढगोदेवाने मेघापत बाळ स्वीकारली, गाजदेवाने बिजलापत बाळीचा स्वीकार केला, नारन (नारायण) देवाने लखमापतीला (लक्ष्मीवती) वधू म्हणून निवडली, तर -

{{center|"पावस्यानं परणली धारापत बाल ।"}}

(पावसाने धरणीवर कोसळणारी धारापतबाळ पर्णून आकाश-धरणीचे नाते पक्के केले.) सीता ही भूमी, तर सावळा मेघश्याम राम आकाशातत्त्व ! "रामानं परणली जानकी ग सीता ।" या लग्नाने आकाशाशी धरणीमातेचे नाते दृढ झाले.
{{gap}}याचा अर्थ इतकाच की, निसर्गाचाच एक अंश होऊन राहिलेली आदिवासी 'धवलेरी' स्त्री असो, की निसर्गचमत्काराने दिपलेला वैदिक ऋषी असो, दोघांनीही आकाश-धरतीच्या शाश्वत मिलनाचे अंशरूप मानवी स्त्री-पुरुष- मिलनात अनुभवले हेच खरे!
{{gap}}निसर्गात घडणाऱ्या मिलन सोहळ्याची नक्कल जणू विवाहविधीत मानवी स्त्री-पुरुष साजरी करीत असतात. म्हणूनच नवरा-नवरीमध्ये चढणारे 'दैवी तेज' हळद (सूर्यतेजाशी साम्य असलेले सु-वर्णद्रव्य) लावल्याने आणि कळसवणीचे पाणी पडल्याने वाढत जाते आणि हळद उतरवण्याच्या विधीबरोबर हे तेज उतरले जाते, अशी श्रद्धा असते.
{{gap}}पारंपरिक रीतीने हळद उतरवण्याचा विधीही क्रमाक्रमाने होतो. हळद एकदम उतरवत नाहीत. ती लग्नानंतर चौथ्या, आठव्या, दहाव्या, सोळाव्या आणि तिसाव्या दिवशी उतरवत जातात. त्या त्या वेळी विधिपूर्वक स्नान घालतात. प्रत्येक स्नानाला आठन्हाण, दसन्हाण, सोळन्हाण, मासन्हाण अशी नावे आहेत.{{nop}}<noinclude>{{right|नाट्यात्मक लोकाविष्कार ● १११}}</noinclude>
exy18z235snn19w1t5zcv8phw1836mf
221811
221810
2025-06-16T07:28:56Z
कल्पनाशक्ती
3813
221811
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>वर वधूला म्हणतो,

{{center|"द्यौरहं पृथिवी त्वं ।" (मी आकाश, तू पृथ्वी आहेस)}}
या मंत्राचे होमाच्या वेळी तीन वेळा आवर्तन होते. महाराष्ट्रातल्या आदिवासींपैकी वारली जमातीत किंवा ठाणे जिल्ह्यातल्या आगरी पॅस नावाच्या जमातीत लग्नाच्या वेळी पौरोहित्य करणारी 'धवलेरी' नावाची स्त्री जी गीते गाते, त्यांचे काही नमुने महादेव कडू व गोविंद गारे यांनी 'आदिवासींची गोड गाणी' मध्ये दिले आहेत.
{{center|<poem>"आगाशी मंडप ।
धरतरे बहोला ॥
सुलगीन लागेला ।
कोणे रे देवाचा ॥"</poem>}}
असा प्रश्न करून मग निसर्गतत्त्वांच्याच परस्पर जोड्या पुढच्या गीतात ती सांगते. चंद्र-सूर्याने किरणात बाळीबरोबर विवाह केला, तर चंद्राने रोहिणीशी लग्न लावले. ब्रह्याने रेघापत बाळ वरली, ढगोदेवाने मेघापत बाळ स्वीकारली, गाजदेवाने बिजलापत बाळीचा स्वीकार केला, नारन (नारायण) देवाने लखमापतीला (लक्ष्मीवती) वधू म्हणून निवडली, तर -

{{center|"पावस्यानं परणली धारापत बाल ।"}}
(पावसाने धरणीवर कोसळणारी धारापतबाळ पर्णून आकाश-धरणीचे नाते पक्के केले.) सीता ही भूमी, तर सावळा मेघश्याम राम आकाशातत्त्व ! "रामानं परणली जानकी ग सीता ।" या लग्नाने आकाशाशी धरणीमातेचे नाते दृढ झाले.
{{gap}}याचा अर्थ इतकाच की, निसर्गाचाच एक अंश होऊन राहिलेली आदिवासी 'धवलेरी' स्त्री असो, की निसर्गचमत्काराने दिपलेला वैदिक ऋषी असो, दोघांनीही आकाश-धरतीच्या शाश्वत मिलनाचे अंशरूप मानवी स्त्री-पुरुष- मिलनात अनुभवले हेच खरे!
{{gap}}निसर्गात घडणाऱ्या मिलन सोहळ्याची नक्कल जणू विवाहविधीत मानवी स्त्री-पुरुष साजरी करीत असतात. म्हणूनच नवरा-नवरीमध्ये चढणारे 'दैवी तेज' हळद (सूर्यतेजाशी साम्य असलेले सु-वर्णद्रव्य) लावल्याने आणि कळसवणीचे पाणी पडल्याने वाढत जाते आणि हळद उतरवण्याच्या विधीबरोबर हे तेज उतरले जाते, अशी श्रद्धा असते.
{{gap}}पारंपरिक रीतीने हळद उतरवण्याचा विधीही क्रमाक्रमाने होतो. हळद एकदम उतरवत नाहीत. ती लग्नानंतर चौथ्या, आठव्या, दहाव्या, सोळाव्या आणि तिसाव्या दिवशी उतरवत जातात. त्या त्या वेळी विधिपूर्वक स्नान घालतात. प्रत्येक स्नानाला आठन्हाण, दसन्हाण, सोळन्हाण, मासन्हाण अशी नावे आहेत.{{nop}}<noinclude>{{right|नाट्यात्मक लोकाविष्कार ● १११}}</noinclude>
c6tibjh8xcx2bjfjl0qiv7t8q96tg3h
पान:लोकसाहित्याच्या अभ्यासदिशा.pdf/११५
104
107758
221812
2025-06-16T07:30:28Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
221812
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{gap}}आजच्या धावपळीच्या जीवनात इतका वेळ नसल्याने दोन-चार दिवसांतच घरातल्या घरात जागा बदलून पाच वेळा हळद उतरवण्याचा विधी उरकला जातो. हळद पूर्ण उतरली, स्नान झाले, की वधू-वरांचे 'दैवी रूप' जाऊन ती सामान्य प्रापंचिक माणसे होतात, अशी भावना यामागे असते.
{{gap}}सर्व आदिम जमातींत आणि आज प्रगत समजल्या जाणाऱ्या, पण आदिम श्रद्धा असलेल्या समूहांतही 'देव चढताना' आणि 'उतरताना' काही विधी करण्याची पद्धत आहे आणि त्याबरहुकूम दैवी शक्ती 'चढत' - 'उतरत' असल्याचे समज विद्यमान आहेत.
{{gap}}मानवी स्त्री-पुरुषांना निसर्गतत्त्वांच्या प्रतीकांचा दैवी साज विवाह विधीत चढवला जातो. जणू निसर्गातील आकाश-धरतीच्या मिलनाच्या सोहळ्याचे प्रतीकात्मक नाट्य विवाहविधीच्या निमित्ताने पुनः पुन्हा होत असते.

{{right|● ●}}{{nop}}<noinclude>
लोकसाहित्याच्या अभ्यासदिशा ● ११२</noinclude>
oubcjp6dfhwgmcl0n8p2eawdcuywl3y
पान:लोकसाहित्याच्या अभ्यासदिशा.pdf/११६
104
107759
221813
2025-06-16T07:33:28Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
221813
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

{{center|{{x-larger|'''लोकसंस्कृतीची वैशिष्ट्ये व त्यातील सातत्य'''}}}}

{{gap}}पारंपरिक भारतीय ग्रामजीवनात व अंशतः नागर जीवनातही लोकसंस्कृतीचा आविष्कार सण-वार, चालीरीती, प्रतीकपूजा, निसर्गपूजा, जत्रा-यात्रा इत्यादींमधून कसकसा होत असतो, ते आपण विस्ताराने पाहिले आहे.
{{gap}}लोकजीवनातून व्यक्त होणाऱ्या या सर्व तपशिलामागे लोकांचे समूहमन असते. समूहमन हे अबोधपणे म्हणजे नकळत या सर्व चालीरीती, रूढी इत्यादींमधून आपला आविष्कार करते हे आपण पाहत आहोत. भारतातील जुनी ग्रामव्यवस्था यंत्रयुगात अत्यंत झपाट्याने बदलते आहे. असे असले, तरी लोकसंस्कृती टिकून राहतेच. कारण ही संस्कृती घडविणारे लोकांचे समूहमन टिकून असते. त्यामुळे चालीरीतींचा बाह्य तोंडावळा आणि तपशील जरी थोडाफार बदलला, तरी लोकाविष्कार होतच असतात. अगदी नवीन शहरी जीवनातही लोकाविष्काराची व लोकसंस्कृतीची विविध रूपे दृष्टीस पडतात; ती कशी आणि कोणती ते आता आपण थोड्या विस्ताराने पाहू.
{{gap}}पूर्वी गावोगावच्या जत्रा-यात्रा होत असत. भारतात आजही या प्रथा चालू आहेत. त्यांचे पारंपरिक रूपंही जसेच्या जसे टिकून आहे. त्याचबरोबर शहरी जीवनातही नवीन प्रकारचे उत्सव सुरू झाले आहेत. वरवर दिसायला जरी हे उत्सव धार्मिक असले, तरी त्यांचे स्वरूप लोकोत्सवांचेच आहे.
{{gap}}सुमारे शंभर वर्षांपूर्वी लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव हे लोकमानसातील उत्सवप्रियता लक्षात घेऊनच सुरू केले होते. राष्ट्रीय भावनेची जागृती हे आणखी एक नवीन उद्दिष्ट त्यांनी या उत्सवात आणण्याचा प्रयत्न केला.
{{gap}}डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्वाणानंतर त्यांच्या स्मृतीसाठी केले जाणारे कार्यक्रम किंवा त्यांच्या पहिल्या सामूहिक धर्मांतरानंतर दर वर्षी दसऱ्याच्या दिवशी नागपूरच्या दीक्षाभूमीवर होणारा धम्मचक्रप्रवर्तनाचा कार्यक्रम आणि त्यासाठी आंतरिक ओढीमुळे येणारी लक्षावधी लोकांची गर्दी पाहिली, की समूहमनाच्या प्रेरणेमुळेच ही आधुनिक काळातील यात्रा होत असल्याचे जाणवते.
{{gap}}गेल्या काही वर्षांत नवरात्र काळात मुंबईसारख्या शहरातही रास आणि गरबा नृत्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर होताना दिसतात. त्यासाठी अनेक मंडळे<noinclude>{{right|लोकसंस्कृतीची वैशिष्ट्ये व त्यातील सातत्य ● ११३}}</noinclude>
9nhcu3f85s9yshzpbw9fb7brd3qpg43
पान:लोकसाहित्याच्या अभ्यासदिशा.pdf/११७
104
107760
221814
2025-06-16T07:35:33Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
221814
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>स्थापन होतात. इतरही मोठ्या शहरांतून अशा गरबानृत्य मंडळांचा प्रसार वाढतो. आहे. मुळात रास व गरबा हे गुजराथमधील लोकनृत्य प्रकार आहेत. परंतु आधुनिक काळात या प्रांतोप्रांतीच्या सीमारेषा ओलांडून हे लोकनृत्यप्रकार सर्वांचेच होत आहेत. तसेच मुळात बंगालपुरता सीमित असलेला नवरात्रातील सामाजिक दुर्गापूजेचा उत्सव अलीकडच्या काळात इतर प्रांतांतूनही होताना दिसतो आहे. आधुनिक काळात दळणवळणाची साधने वाढली आहेत. उद्योग-व्यवसायांच्या निमित्ताने आणि नोकऱ्यांच्या निमित्ताने एका प्रांतातील लोक दुसऱ्या प्रांतात मोठ्या प्रमाणात जात आहेत. अशा वेळी ते आपले सण-उत्सव, खाद्यपदार्थ, पोषाख अशा सर्वांसह जात आहेत. त्यातून प्रांतोप्रांतीच्या लोकांमध्ये संस्कृतीच्या या घटकांचीही देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात होते आहे. जसे महाराष्ट्राबाहेरचे लोक येथे आल्यामुळे त्यांचे नवीन उत्सव येथे सुरू झाले आहेत, तसेच महाराष्ट्रातले लोक जेथे जेथे गेले आहेत तेथे तेथे ते आपले गणेशोत्सवासारखे सण-वार, उत्सव व चालीरीती घेऊन गेले आहेत. महाराष्ट्रीय माणसे जेथे जेथे गेली, तेथे तेथे त्यांनी गणेशोत्सवाची प्रथा सुरू केली आहे. भारतातल्या इतर प्रदेशात तर त्यांनी गणेशोत्सव, शारदोत्सव सुरू केले आहेतच; पण अगदी इंग्लंड, अमेरिकेतही मराठी मंडळींनी हे उत्सव सुरू केले आहेत. हे सर्वच उत्सव परंपरेने, आपोआप चालत आलेले लोकोत्सव आहेत, हे आपल्या लक्षात येईल. या उत्सवात विशिष्ट धार्मिकतेपेक्षा लोकांच्या मनातील आनंद आणि उत्साह यांचा आविष्कारच मुख्य असतो. महाराष्ट्रातील इतर जाती-जमातींचे लोकही आपापले पारंपरिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करीत असतात. गोव्यामध्ये ख्रिसमस किंवा नाताळच्या उत्सवाचे महत्त्व मोठे आहे. आपणही एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्री जुन्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करून नाताळच्या उत्सवाची सांगता करीत असतो.
{{gap}}'ईद-ए-मिलाद' ला आपल्या इस्लाम बांधवांच्या आनंदात व उत्साहात सर्वजण सहभागी होतात. हे सर्व उत्सव प्राचीन काळापासून परंपरेने त्या त्या समाजात चालत आलेले असतात. हल्ली आपण अनेक प्रसंगी भेटकार्डे पाठवून शुभचिंतन व्यक्त करतो. पारंपरिक प्रथांमध्ये अशा नवीन प्रथांची भरही आपोआप पडत असते.
{{gap}}या सर्व विवेचनातून आपल्या लक्षात येईल, की लोकसाहित्य व लोकसंस्कृतीचा प्रवाह हा असा अखंड चालू असतो. तो केवळ ग्रामजीवनापुरताच नसतो. या पारंपरिक सण-उत्सवांप्रमाणेच बदलत्या काळानुसार काही नवीन सण-उत्सवांची व चालीरीतींची भरही संस्कृतीमध्ये सतत पडत असते. विशेष<noinclude>
लोकसाहित्याच्या अभ्यासदिशा ● ११४</noinclude>
l1dymrhm8hfuwkugjv49m2b4ko9mv5g
पान:लोकसाहित्याच्या अभ्यासदिशा.pdf/११८
104
107761
221815
2025-06-16T07:38:28Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
221815
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>म्हणजे या नवीन प्रथांचा संबंध कोणत्याही एका विशिष्ट जातीपुरता किंवा धर्मापुरता मर्यादित नसतो. अशा नवीन प्रथांचा आता थोडा परिचय करून घेऊ.
'''नवयुगातील लोकोत्सव-'''
{{gap}}आपल्या देशाचा स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, महात्मा गांधी किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा राष्ट्रपुरुषांचे स्मृतिदिन आपण नवीन युगात साजरे करतो. हे नवीन युगातील लोकोत्सव आहेत. त्यानिमित्त ध्वजवंदन, राष्ट्रगीतगायन, व्याख्याने, चर्चा हे नवीन युगातील लोकांचे आचारही आता आपोआप ठरून गेले आहेत. त्यांचीही एक परंपरा निर्माण झाली आहे.
{{gap}}याखेरीज डॉक्टर, वकील, नर्स असे व्यवसाय करणारी मंडळी जेव्हा आपले शिक्षण संपवून व्यवसायात पदार्पण करतात, तेव्हाही त्यांची परंपरेने ठरलेली व्यावसायिक शपथ त्यांना घ्यावी लागते. त्यांच्या पद्धतीही ठरलेल्या असतात. या शपथा लोककल्याणासाठी घ्यावयाच्या असतात आणि एखाद्या धार्मिक विधीइतकेच पावित्र्य व गांभीर्य त्या वेळी असावे, अशी अपेक्षा असते. एका अर्थाने ते त्यांचे 'दीक्षाविधी' असतात.
{{gap}}अशाच प्रकारची शपथ सैनिकांनाही घ्यावी लागते. क्रीडांगणावरील खेळाडूंना घ्यावी लागते. कॉलेजमध्ये 'राष्ट्रीय सेवा योजना' किंवा एन.सी.सी. मध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनाही घ्यावी लागते. एका अर्थाने सर्व मानवांना एकत्र आणणाऱ्या मानवतावादी धर्माचे हे आचारविधी (rituals) असतात. त्यांना परंपरा असते. विशिष्ट धर्मभावनेपलीकडचे हे आचारधर्म आहेत आणि आपल्या आधुनिक विशाल सामूहिक जीवनाची ती अविभाज्य अशी सांस्कृतिक अंगे आहेत, असे म्हटले तर त्यात आतिशयोक्ती होऊ नये.
{{gap}}पारंपरिक पद्धतीमध्ये लोकांच्या भावना व्यक्त करण्यासाठी जसा प्रतीक वस्तूंचा उपयोग केला जातो, तसाच वरील आधुनिक आचारांमधूनही विविध प्रतीकांचा उपयोग केलेला दिसतो.
{{gap}}लोकसेवेचे प्रतीक म्हणून वैद्यकीय क्षेत्रातील रेडक्रॉस (लाल फुली + अशा आकाराची) किंवा सर्वांना समान न्यायाचे प्रतीक म्हणून न्याय देवतेच्या डोळ्यांवर बांधलेली पट्टी व हातातील समतोल तराजू असलेली मूर्ती, निरनिराळ्या पक्षांचे, संघटनांचे ध्वज, त्यांचे विशिष्ट आकार व रंग ही त्याच्याशी संबंधित अशा लोकमनातील भावनांची प्रतीकेच असतात.
{{gap}}पारंपरिक जीवनात लोकभावनांचा आविष्कार विविध गीतांतून आणि कथांमधून होतो. आधुनिक जीवनातही नवीन गीतांची आणि कथांची रचना होत असते. त्यांचा प्रसारही सगळीकडे आपोआप होत असतो. कित्येकदा त्या<noinclude>{{right|लोकसंस्कृतीची वैशिष्ट्ये व त्यातील सातत्य ● ११५}}</noinclude>
ck6t34a80a3od48i1xcn2hwfoxgu3wn
पान:लोकसाहित्याच्या अभ्यासदिशा.pdf/११९
104
107762
221816
2025-06-16T07:40:42Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
221816
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>गीताचा कवी किंवा रचनाकार कोण आहे, हेही सर्वांना माहीत नसते. उदाहरणार्थ, आपले राष्ट्रगीत आता असे सर्वांचे गीत झाले आहे. अलीकडची अनेक चित्रपट गीते लोकगीतांची (खरे तर लौकिक गीत) जागा घेत आहेत. विशेषतः त्या गीतांची लय, ताल, ठेका ही समूहमनाला आकर्षित करणारी असतात. अनेकदा तर या गीतांच्या चाली पारंपरिक लोकगीतांच्याच असतात.
{{gap}}फार काय चित्रपटच आता लोककलांची जागा घेत आहेत. लोककलेतील अनेक घटक थोड्या सफाईदार स्वरूपात चित्रपटातून आविष्कृत होतात. सामूहिक लोकमनाला भुरळ घालणाऱ्या घटकात अनेक बाबी पारंपरिक लोककलात ओबडधोबड स्वरूपात दिसतात. चित्रपट कथेतील प्रेमाचे त्रिकोण, एका नायिकेसाठी नायक व खलनायक यांच्यातील संघर्ष, नायक हा सर्वगुणसंपन्न, तर खलनायक हा अनेक दुष्ट प्रवृत्तींचे आगर, आई ही नेहमी उदात्त व क्षमाशील इत्यादी अनेक बाबींचा साचा ठरलेला असतो व पारंपरिक अनेक प्रेमकथांच्या साच्यापेक्षा मूलतः हा साचा वेगळा नसतो. संघर्षांनंतर सज्जनांचा विजय होणे आणि दुष्टांचा नायनाट होणे हा शेवटही ठरलेला असतो. हा साचा प्राचीन काळापासून चालत आलेल्या देव व राक्षस यांच्यातील संघर्षकथेसारखाच आहे, असे लक्षात येईल. बाह्य तपशिलातील बदल आधुनिक असले, तरी मूळ प्रवृत्ती पारंपरिक लोककथांचीच आहे. यातून अतृप्त अशा समूहमनांची स्वप्नपूर्ती झाल्याचे समाधान प्रेक्षकाला मिळते. लोककथा या समूहमनाच्या स्वप्नरंजनासारख्या असंतात याचा प्रत्यय चित्रपटकथांतूनही येतो. लोककथांची माहिती पाहताना आपण या बाबीचा अधिक विचार करू. परंतु आधुनिक जीवनातही लोकजीवन व लोकसंस्कृती यांची पाळेमुळे किती घट्ट रुजलेली आहेत, हे कळावे म्हणून हे स्पष्टीकरण केले आहे. बहुतेक लोकप्रिय चित्रपटकथा या सज्जनपूजक व वीरपूजक असतात. कोणातरी सुंदर युवतीची अनेक संकटांतून सुटका करणाऱ्या राजकुमारासारखाच हा वीरनायक असतो. हे कथाचे साचे (tale type) लोककथांचेच आहेत, हे लक्षात आणून देणे हा या विवेचनाचा उद्देश आहे.
{{gap}}लोकसाहित्य हा केवळ परीक्षेच्या अभ्यासाचा विषय नसून, तो आपणा सर्वांच्या दैनंदिन जगण्याचा भाग आहे हे आता लक्षात येईल. शिवाय लोकसाहित्य म्हणजे केवळ ग्रामीण लोकांची जुन्या काळातील कथा-गीते नव्हेत, हेही लक्षात येईल. लोकसाहित्य म्हणजे परंपरेने आपोआप चालत आलेले जीवनच आहे. समूहमनाच्या अबोध प्रेरणेतून आलेल्या रूढी, चालीरीती, धर्मकल्पना, सण, यात्रा, उत्सव, त्यांच्याशी संबंधित विविध कला, गाणी, गोष्टी या सर्वांचा एक<noinclude>
लोकसाहित्याच्या अभ्यासदिशा ● ११६</noinclude>
cvyft2f0080tdpj6nuza2qhdxl4styz
पान:लोकसाहित्याच्या अभ्यासदिशा.pdf/१२०
104
107763
221817
2025-06-16T07:41:23Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
221817
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>मेळ आहे. यातील सर्व घटक हे आंतरिक नात्याने एकमेकांशी बांधलेले आहेत याची कल्पना येईल. जोपर्यंत मानवी जीवन आहे आणि माणसा-माणसांतील नातेसंबंधांत भावनांचे महत्त्व मोठे आहे तोपर्यंत लोकसाहित्याचा प्रवाह अखंड चालत राहणार आहे.
{{gap}}लोकसाहित्याच्या पद्धतशीर अभ्यासामुळे लोकजीवनात प्रचलित असलेल्या अनेक बाबींचा उलगडा होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे आपल्या मनात असलेले संस्कृतीविषयक अनेक गैरसमज दूर होण्यास मदत होईल. त्यासाठी आपण लोकसाहित्याचा अधिक तपशिलाने अभ्यास करायला हवा.

{{right|● ●}}{{nop}}<noinclude>{{right|लोकसंस्कृतीची वैशिष्ट्ये व त्यातील सातत्य ● ११७}}</noinclude>
rtyzd9htm3aamck2l9cjdqhorkv6q06
पान:लोकसाहित्याच्या अभ्यासदिशा.pdf/१२१
104
107764
221818
2025-06-16T07:44:09Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
221818
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

{{center|{{x-larger|'''अभिजात साहित्य व कला आणि
लोकतत्त्व यांचा संबंध'''}}}}

{{gap}}लोकसाहित्याची निर्मिती समूहमनाच्या प्रेरणेतून लोकप्रतिभेतून आपोआप घडते व त्यावर समूहाचे स्वामित्व असते; तर अभिजात साहित्यनिर्मिती विशिष्ट व्यक्तीच्या प्रतिभेतून होते व त्याच व्यक्तीच्या नावाचे स्वामित्व त्या कलाकृतीवर असते. तरीही परंपरेने घडलेली भाषा, चालीरीती, रूढी, समजुती, श्रद्धा या सर्वांचा उपयोग अभिजात कलावंताला करावाच लागतो. तसेच अभिजात साहित्यातूनही लोकसाहित्य काही बाबी स्वीकारीत असते. यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात आली आहे, की लोकसाहित्य व ललित साहित्य यांच्यात सतत देवाण-घेवाण चाललेली असते. लोकसाहित्याच्या विकासातून ललितसाहित्य निर्माण होते हे खरे असले, तरी अनेकदा लोकप्रिय ललित साहित्याचे अनुकरण लोकवाङ्मय ही करीत असते. लोककलाही अभिजात कलांचे कधी कधी अनुकरण करतात.
{{gap}}लोकगीत प्रथमतः व्यक्तिनिर्मित असले, तरी सर्व लोक जेव्हा त्याचा स्वीकार करतात, तेव्हा व्यक्तीचे नाव, व्यक्तीची मालकी मागे पडते. संत साहित्याच्या बाबतीत हे तंतोतंत लागू पडते. संतांच्या रचना ही व्यक्तीची निर्मिती असली, तरी समाजाने त्याचा इतका आत्मीयतेने स्वीकार केलेला असतो, की एकनाथांची भारूडे असोत, की ज्ञानेश्वर-तुकारामांचा अभंग असो, ते सर्व समाजाचे होते- इतकेच नव्हे तर या साहित्याच्या निर्मितीचा सगळा ढंग हा लोकप्रचलित साहित्याचा ढंग असतो.
{{gap}}तीच गोष्ट लोकप्रिय पोवाडे व लावणीच्या रचनांची असते. या रचना एका व्यक्तीची निर्मिती असूनही व्यक्तीचे नाव पुसट होत होत फक्त रचना शिल्लक उरतात. त्या सर्व समाजाने स्वीकारल्यामुळेच !
{{gap}}समाजाने स्वीकारलेल्या अशा गीतांमध्ये मग लोकपरंपरेनुसार लोक बदलही करीत असतात. बदलते लोकमानस त्यातून व्यक्त होते. त्यामुळे 'व्यक्तिनिर्मित' साहित्यालाच पुढे लोकसाहित्याचे रूप प्राप्त होते, असे अभ्यासकांचे एक मत आहे. त्याउलट ललित साहित्यात समाविष्ट होणाऱ्या गीतांचे मूळ लोकगीतातच असते, असे म्हणणाराही दुसरा एक अभ्यासकांचा वर्ग आहे.{{nop}}<noinclude>
लोकसाहित्याच्या अभ्यासदिशा ● ११८</noinclude>
t7dp4grj2p7kpsid5of0nizd7e8tvf5
पान:लोकसाहित्याच्या अभ्यासदिशा.pdf/१२२
104
107765
221819
2025-06-16T07:47:49Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
221819
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{gap}}अर्थात यापैकी कोणताही एक आग्रह चुकीचा आहे. वास्तव जीवनात दोन्ही साहित्यप्रकार एकमेकांकडून प्रसंगपरत्वे काही घेत असतात. देवाणघेवाणीतून दोन्ही साहित्यप्रकार समृद्ध होत असतात.

'''लोककला व अभिजात कला-'''
{{gap}}विशेषतः लोककलाप्रकार आणि अभिजात कलाप्रकार यांच्यातील देवाणघेवाण अगदी स्पष्टपणे जाणवते. अगदी प्रारंभीच्या अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या 'सौभद्र' या संगीत नाटकाचे कथानक, गाण्यांच्या चाली या सर्वांचे मूळ कीर्तनकारांचे आख्यान, लोकप्रचलित लावणीच्या व भजनांच्या चाली यामध्ये आहे. म्हणजे 'सौभद्र' हे ललित नाट्य लोककला प्रकारांतून सिद्ध झाले. त्याउलट आजच्या तमाशातल्या 'वग' नाट्यात हिंदी चित्रपटातील गाणी, नृत्ये यांचे अनुकरण मोठ्या प्रमाणावर होताना दिसते आहे.
{{gap}}गेल्या काही वर्षांत मराठी शहरी अभिजात नाटकात पुन्हा एकदा लोकनाट्य आणि लोककला प्रकारांची उसनवारी होत असल्याचे दिसते आहे. 'घाशीराम कोतवाल', 'महानिर्वाण', 'हयवदन' अशा अगदी आधुनिक नाटकांत भारूड, लावणी, कीर्तन, भजन या लोककलाप्रकारांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला आहे. यामुळे या नाटकांत नावीन्य आले आहे. मराठी नाटकांत हा नवीन प्रयोग आहे, असे मानले जात आहे. मात्र या नाटकातील आशय पारंपरिक नाही. उलट पारंपरिक जीवनरीती व जीवनसमजुतीपेक्षा नेमका उलटा, जुन्या समजुतींना आणि मूल्यांना उद्ध्वस्त करणारा आशय या नाटकांत आहे. केवळ बाह्य सादरीकरण पद्धती परंपरेतून घेतल्या आहेत. त्यातून नाटकाची एक नवीनच पद्धती निर्माण झाली आहे.

'''ललित साहित्यातील लोकतत्त्व-'''
{{gap}}कोणताही साहित्यिक आपल्या लेखनातून मानवी जीवनाचे दर्शन घडवीत असतो. एकूणच मानवाच्या जडणघडणीत लोकसंस्कृतीचा सहभाग खूप मोठा असतो. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे लोकसंस्कृतीचा आविष्कार मानवी जीवनात होत असतो. ललित लेखक जेव्हा जीवनचित्रण करतो, त्या वेळी लोकसंस्कृतीमधील अनेक घटकांचाही आविष्कार त्याच्या लेखनातून होत असतो. लेखनाचा विषय लोकसंस्कृतीला जितका अधिक जवळचा असतो, तितका अधिक प्रमाणात लोकतत्त्वांचा उपयोग त्याच्या लेखनात होत असतो. लोकपरंपरेतील ही लोकतत्त्वे (Folk elements) ललित साहित्यात लेखकाच्याही नकळत, सहजपणे येतात. दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, प्रादेशिक साहित्य यातून लोकतत्त्वे मोठ्या प्रमाणात आविष्कृत होतात. त्यांचे स्वरूप स्थूलमानाने पुढीलप्रमाणे असते.{{nop}}<noinclude>{{right|अभिजात साहित्य आणि कला व लोकतत्त्व यांचा संबंध ● ११९}}</noinclude>
1m51kkyj8poerhtj0cpw0cn1uvphapy
पान:लोकसाहित्याच्या अभ्यासदिशा.pdf/१२३
104
107766
221820
2025-06-16T07:50:56Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
221820
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{gap}}लोकसाहित्यातील अनेक कल्पना, श्रद्धा, समजुती, लोकभ्रम, लोकसंकेत यांचा उपयोग ललित साहित्यातही अनेकदा होतो. लोककथेतील यक्ष-गंधर्व- नाग, किन्नर अशी अतिमानुषी सृष्टी किंवा भुते-खेते, भूतबाधा अशा प्रकारच्या श्रद्धा त्यामुळे व्यक्तींच्या जीवनावर होणारा परिणाम यांचे चित्रण ललित साहित्यात असते. लोकजीवनातील विधी, आचार-विचार, शुभाशुभकल्पना, शकुन- अपशकुनाच्या कल्पना, जन्म-विवाह-मृत्यू या वेळच्या चालीरीती व समजुती ही सर्व लोकसंस्कृतीमधील लोकतत्त्वीय भाग आहे. त्यांचा आढळही ललित साहित्यात होतो. मुख्य म्हणजे या लोकतत्त्वांमुळे व्यक्ती जीवनावर आणि व्यक्तिमत्त्वावर होणारे परिणाम ललित साहित्यात चित्रित केलेले असतात. त्यामुळे ललित साहित्यही नीट समजून घ्यायचे असेल आणि त्याचे मूल्यमापन करायचे असेल, तर या लोकतत्त्वीय दृष्टीची जाण असणे आवश्यक असते. त्यासाठी काही उदाहरणे अगदी थोडक्यात पाहू.
{{Block center|<poem>“पैल तो गे काऊ कोकताहे ।
शकुन गे माये सांगताहे ॥"</poem>}}
{{gap}}हा संत ज्ञानदेवांचा अभंग प्रसिद्ध आहे - “परमेश्वर माझ्या घरी येणार आहे. तसे शुभशकुन मला होत आहेत” असा त्या अभंगाचा आशय आहे. 'कावळा दारात येऊन ओरडला तर पाहुणे येतात' असा लोकसमज आहे. आपल्याला नको असलेले पाहुणे येणार असतील तर त्या कावळ्याला 'उडून जा' असे म्हणावे व हवे असलेले पाहुणे येणार असतील तर कावळा थांबावा म्हणून त्याला भाकरीचा तुकडा द्यावा. अशा प्रकारचे लोकाचरण असते. लोकजीवनातील या बाबी माहीत असतील तर ज्ञानदेवांचा हा अभंग अधिक चांगल्या प्रकारे समजेल. देवाच्या भेटीसाठी ते किती आतुर झाले आहेत, तेही समजेल.
{{gap}}दुसरे एक उदाहरण अगदी आधुनिक कथालेखक शंकर पाटील यांच्या 'भुजंग' या कथेचे आहे. या कथेत एक गरीब शेतकरी स्त्रीच्या शेतात एक नाग वारंवार तिला दिसतो. त्यामुळे तिच्याकडे तिची मुलेही शेतात काम करीत नाहीत, मुलेही घाबरतात. अशावेळी ती धीटपणे त्या फडा काढलेल्या नागासमोर जाऊन त्याच्याशी बोलते. आपले आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्याची विनंती करते आणि तो नाग मुकाट्याने निघून जातो. कथेचा थोडक्यात हा सारांश आहे.
{{gap}}आता लोकपरंपरेत सर्पांच्या व नागाच्यासंबंधी जे समज प्रचलित आहेत, ते माहीत असले, तर ही कथा अधिक चांगल्या प्रकारे समजेल. कथा नायिकेच्या व्यक्तिमत्त्वावरही अधिक प्रकाश पडेल. नाग हा धनरक्षक असतो. पूर्वी कोणी<noinclude>
लोकसाहित्याच्या अभ्यासदिशा ● १२०</noinclude>
h705zuc3t91owst7xv5v78g1yx1d7im