विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.45.0-wmf.7
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
अनुक्रमणिका:मनातले जनात (स्त्री विषयक लेखसंग्रह ).pdf
106
105772
222230
222184
2025-06-29T11:11:56Z
कल्पनाशक्ती
3813
222230
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=[[मनातले जनात (स्त्री विषयक लेखसंग्रह )]]
|Language=mr
|Volume=
|Author=[[Author:तारा भवाळकर|तारा भवाळकर]]
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=अक्षता प्रकाशन 'श्रीपाल प्लाझा', बी १९ , ३३५ शनिवार पेठ, पुणे ३०
|Address=
|Year=2010
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist 7="मनोगत" 9="अनुक्रम" 11="तुझे आहे तुजपाशी..." 21 ="एका शापाची कहाणी" 26="सुंदर मी होणार" 34= "खरंच आमचा कळवळा आहे?" 38="रॅगिंग" 44="एक कहाणी! तशी पुराणी (च)!" 48="घर असावे घरासारखे" 52="चाहूल बाळजन्माची" 56="अडगुलं SS मडगुलं SSS" 63="स्वातंत्र्याची षष्ट्यब्दी" 69="रडू...हसव रे जरा...!" 74 ="लेकुरे उदंड झाली" 80="उपरकी टीमटाम" 83 ="सासू-सून आणि सासरा-जावई" 93 ="श्यामची आई.. आजही आदर्श?" 98="आपली वाट आपणच शोधू" 103="माती आणि पाणी" 108 ="जात्यातल्या आणि सुपातल्या" 112 ="धर्म आणि संस्कृती" 116="रिकामा वेळ" 120="वाटणी कामांची" 126="मातृत्वाच्या बलिवेदीवर पातिव्रत्य?" 130 ="एका लोककथेचे तात्पर्य!" 134="चौथा कमरा"/>
|Volumes=
|Remarks={{scrollpane|border=1px dashed silver|height=600px|width=400px|
{{पान:मनातले जनात (स्त्री विषयक लेखसंग्रह ).pdf/९}}
{{पान:मनातले जनात (स्त्री विषयक लेखसंग्रह ).pdf/१०}}

|Width=
|Css=
|Header=
|Footer=

2wmw27ghil0pzqouzdu6r2j313jmp2j
पान:मनातले जनात (स्त्री विषयक लेखसंग्रह ).pdf/१२६
104
107959
222222
222185
2025-06-29T10:52:39Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
222222
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

{{gap}}{{x-larger|'''मातृत्वाच्या बलिवेदीवर पातिव्रत्य?'''}}
{{rule|height=5px}}
{{gap}}घरात पतीचे कलेवर आहे. पत्नीने सती जाण्याचे ठरविले आहे. तिला कोणी आडकाठी करणे शक्यच नाही. उलट तिच्या या धीरोदात्त सतीधर्माची सादर चर्चा चालू आहे. त्यासाठी सर्व पातळ्यांवर तयारी चालू आहे.
{{gap}}परसदारी तीन दगडांची चूल 'सती' ने पेटवली आहे. एका बधीर अवस्थेतच चुलीवर भाताचे आधण तिने चढवले आहे. आजूबाजूला चार पाच वर्षांचा तिचा मुलगा व्याकूळ गोंधळलेला घोटाळतो आहे. काहीतरी गंभीर घडले आहे, घडणार आहे याची चाहूल त्या बालकाच्या अंतर्मनाला लागली असावी. तरी अजून आपली आई आपल्याजवळ आहे, हा दिलासा त्याला आहे.
{{gap}}शिजलेला गरम भात तिने ताटलीत वाढून घेतला आहे. त्यावर तूप मीठ घालून कालवला आहे आणि आपल्या बाळाला अखेरचा घास ती भरवीत आहे. तोंडाने म्हणते आहे, "आता सगळं उरकायला मध्यरात्र उलटून जाईल. तुला भूक लागेल. कोण लक्ष देणार तुझ्याकडे या गडबडीत! म्हणून तुझ्यासाठी हा भात शिजवला आहे. खाऊन घे. माझ्या हातचा, शेवटचा!" भुकेल्या बाळाला सगळेच कळते आहे असे नाही. तरी काहीतरी खोल तुटलेपणाची जाणीव होते आणि भुकेपोटी भातही पोटात जातो आहे. दमून गेलेला बाळ गरम भात पोटात गेल्यावर तिथेच झोपी गेला. आईने अखेरचा हात त्याच्या चेहऱ्यावरून फिरवला. कुणी आयाबायांनी हळहळत बाळाला उचलून घरात नेले. आईने निग्रहाने त्याच्याकडे पाठ फिरवली. सतीच्या न्हाणाच्या सोहळ्याची तयारी<noinclude>
१२४ । मनातले जनात</noinclude>
h3g6eglniib44781j4vig2bberuxmvb
पान:मयूरभारतसार भाग पहिला.pdf/११
104
107963
222221
2025-06-29T07:44:01Z
2404:BA00:1:D73A:25F7:B8A:5AA2:D19E
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान " त्या मंत्रचमत्कारें प्रमुदित होउनि, कुमार ते प्रणती । करूनि प्रेमें, 'सांगा निज नाम ग्राम कुळ' असें ह्मणती १७ द्रोण म्हणे, 'सांगा हे भीष्माला ज्ञानभर्गेन दीपाला । जाणेल तोचि लोकीं..."
222221
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="2404:BA00:1:D73A:25F7:B8A:5AA2:D19E" /></noinclude>
त्या मंत्रचमत्कारें प्रमुदित होउनि, कुमार ते प्रणती ।
करूनि प्रेमें, 'सांगा निज नाम ग्राम कुळ' असें ह्मणती १७
द्रोण म्हणे, 'सांगा हे भीष्माला ज्ञानभर्गेन दीपाला ।
जाणेल तोचि लोकीं; विदित नसे काय गगनदीपाला?" १८
बाळमुखं तें कळतां, भीष्म ह्मणे, परशुराम की द्रोण ।
आला असेल भाग्यें, लोकीं तिसरा असा कृती कोण ? '१९
श्रीगुरुसम गुरुबंधु प्रेम भेटोनि निवविला भीष्में ।
जैसा मयूर मे जो तापविला सुदुःसहें ग्रीप्मे ॥ २० ॥
आणूनि राजसदनीं, पूजुनि ह े ऊनि सानुराग मनीं ।
भीष्में तयासि पुसिल कीं, 'सांगा कोण हेतु आगमैनी' २१
द्रोण ह्मणे, 'परिसा त्वां सांगावें तुलाचि सभ्यास ।
पदास मजहि करवी चापीं गुरु अग्निवेश अभ्यास |२२|
गुरुबंधु सखे आह्मी होतों गुर्वाश्रमांत, वीरमणे ! ।
तेव्हां मजला ऐसे पांचाळ द्रुपद गौरवूनि ह्मणे ॥ २३ ॥
'जे हां काय मज सख्या! द्रोणा! देईल राज्यपद तोते, |
तेव्हां तद्भोक्ता तूं, आण तुझी, कुळेंज सत्य वदतात' ॥२४॥
बेला पढोनि, झाला नृप तो, झालों गृहस्थ मी, राया ! ।
फैली सुतरत्नफळें त्यावरि माझी कृपी सती जायाँ २५
१ आनंदित. २ नमन. ३ गांव. ४ ज्ञानरूपी भाग्याच्या सागराला.
५ सूर्याला. ६ कुशल. ७ परशुरामाप्रमाणे ८ द्रोण ९ सोसण्यास
फार कठीण त्याने १० उन्हाळ्यानें. ११ प्रीतियुक्त. १२ ये-
ण्यांत १३ बाप. १४ शपथ. १५ चांगल्या कुळांत जन्मलेले.
१६ प्रसवली. १७ बायको.<noinclude></noinclude>
5f7g006oejwcyffv98315d6v94iixdc
पान:मनातले जनात (स्त्री विषयक लेखसंग्रह ).pdf/१२७
104
107964
222223
2025-06-29T10:55:06Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
222223
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>बायकांनी केली होती, त्याला दृढ संकल्पाने ती सामोरी गेली.
{{gap}}पुढे काय झाले असेल? सकाळी बाळ उठला तेव्हा त्याला आई कुठे?' या प्रश्नाचे काय उत्तर मिळाले असेल? सरणावर पतीचे मस्तक मांडीवर घेताना तिच्यातली 'आई' कुठे गेली असेल? की, तिच्यातली केवळ पतिव्रताच त्याक्षणी शिल्लक राहिली असेल? आई आणि पत्नी यांच्यात थोडाही संघर्ष झाला नसेल? ओढाताण झाली नसेल?
{{gap}}नक्कीच झाली असणार. एरव्ही सतीची तयारी एकीकडे चालू असताना तिने त्याही अवस्थेत भात शिजवून बाळाला भरवला नसता की त्याही वेळी केवळ गृहिणीची भूतदयाच फक्त जागी होती?
{{gap}}आज सतीप्रथा संपली असली तरी त्यामागची मानसिकता संपली आहे का?
{{gap}}सर्जकता, प्रतिपालकत्व हा स्त्रीचा प्रकृतिधर्म म्हणून एकीकडे संस्कृतीने, परंपरेने तो आदरणीय मानला आहे. या प्रकृतीधर्मातून येणारे मातृत्व हे स्त्रीत्वाचे गौरीशंकर म्हणून पिढ्यान्पिढ्यांना आदरणीय झाले आहे. फार काय सर्व स्त्री देवतांची निर्मितीही माणसाने 'नातृरुपात' अनुभवली आणि मूर्त केली. मातृत्वाचा अव्हेर करणारी स्त्री परंपरेने निंदनीय ठरवली आहे.
{{gap}}अपत्यनिर्मितीची ओढ ही प्राकृतिक मानली जाते. त्या सर्जनशक्तीचा गौरव म्हणजे स्त्रीत्वाचा गौरव! त्या सर्जनशक्तीच्या अनुषंगानेच येणारे पोषण आणि रक्षण हे स्त्रीत्वाचे मूलभूत, वंदनीय, पूजनीय गुण म्हणून परंपरा तिचा गौरव करते. सर्व स्त्रीदेवतांमध्ये सर्जन, पोषण आणि रक्षणसामर्थ्य आहे म्हणून त्यांचा गौरव होतो. परंपरा स्त्रियांसमोर सतत अशा मातृत्वाचा आदर्श ठेवते. अगदी इंटरनेट युगातले भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन मालिकाही क्षणोक्षणी अपत्यप्राप्तीसाठी तळमळणाऱ्या स्त्रिया दाखवीत आहेत.
{{gap}}आणि दुसरीकडे आपणच जन्माला घातलेल्या अपत्याच्या पोषणाची, प्रतिपाळाची चिंता न करता सती जाणाऱ्या स्त्रीचा गौरवही करतात. तिच्या पतिव्रताच्या गदारोळात मातृत्वाचा गळा घोटतात.
{{gap}}या सगळ्यात काही विसंगती आहे असे नाही वाटत? संपूर्ण पातिव्रत्य संकल्पना ही मातृत्वाच्या बलिवेदीवर उभी करणारी ही व्यवस्था गौरवास्पद मानावी? मातृत्व नैसर्गिक आहे. विवाहसंस्था आणि अनुषंगिक पातिव्रत्य कल्पना मानवनिर्मित, म्हणूनच कृत्रिम आहे. एखाद्या व्यवस्थेला सोयीस्कर व्हावे म्हणून प्रकृतींचा गळा मुरगळून संस्कृतीच्या नावावर ही विकृती निर्माण केली आहे, असे नाही वाटत?<noinclude>{{right|मनातले जनात । १२५}}</noinclude>
66fbty05wc2dswmqez8emh7r0t12qju
पान:मनातले जनात (स्त्री विषयक लेखसंग्रह ).pdf/१२८
104
107965
222224
2025-06-29T10:57:59Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
222224
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>इतकेच नव्हे तर त्या विकृतीलाच सुप्रतिष्ठीतपणाचे, मांगल्याचे, गौरवाचे तोरण बांधून पिढ्यान्पिढ्या त्याचे गुणगान केले जात आहे. यात मातृत्वाची पायमल्ली होत नाही का? की परंपरा म्हणजे विसंगती हेच सत्य आहे?
{{gap}}प्रारंभी दिलेली हकीकत एका स्नेह्यांनी काही दिवसांपूर्वी मोठ्या अभिमानाने सांगितली होती. ही घटना त्यांच्याच कुळात काही पिढ्यांपूर्वी घडलेली आहे. ती ऐकल्यापासून कितीक वादळे माझ्या मनात उठली. स्त्रीजवळ असलेली निष्ठा, निश्चय, जिवावर उदार होऊन समर्पण करण्याची वृत्ती असे कितीतरी लोकोत्तर गुण केवळ विशिष्ट क्षेत्रातच वापरले गेल्याने या परंपरेचे खऱ्या अर्थाने स्त्रिया आणि पुरुष दोघांचीही मानसिकता अधिक संकुचित, कुंठित बंदिस्त करून टाकली आहे, असे नाही वाटत? आमच्या नाटक (एकच प्याला- सिंधू) चित्रपटांनीही पुनःपुन्हा हे आदर्श उगाळण्यामागे एक खंडित मानसिकता तर नाही?
{{gap}}सिंधूचे वाक्यच असे आहे, 'पतीव्रतेला नाती नसतात. ती बापाची मुलगी नसते, भावाची बहीण नसते, मुलाची आई नसते' म्हणजे ज्या वंशसातत्याची निरामय व्यवस्था व्हावी म्हणून विवाहसंस्था अस्तित्वात आली असे सांगितले जाते, त्या विवाहसंस्थेच्या आदि आणि आद्य हेतूलाच सिंधूच्या या वाक्यातून व्यक्त होणारे मूल्य सुरूंग लावते आहे.
{{gap}}हे टिपण वाचताना वाचकांचा कदाचित आक्षेप येईल की, 'आता कोठे इतकी पराकोटीची पातिव्रत्य परीक्षा घेणारी सतीप्रथा चालू आहे?' पण याला उत्तर म्हणून की काय मागच्याच महिन्यात एका स्त्रीच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिला उकळत्या तेलातील नाणे काढण्याची कसोटीची परीक्षा (सत्यक्रिया) घेतल्याची बातमी आठवडाभर वृत्तपत्रातून गाजत होती. म्हणजे सीतेची अग्निपरीक्षा रामायणापुरतीच राहत नाही. (म्हणे) रामराज्य येऊ घातले आहे. त्यातले कल्याणकारी काही संकेतसुद्धा दिसत नाहीत. पण सीतेची अग्निपरीक्षा आणि वनवास मात्र अखंड चालू असल्याची साक्ष पटते.
{{gap}}आणखी एक योगायोग! हे लेखन चालू असतानाच 'सकाळ'च्या ६ आणि ७ ऑगस्टच्या अंकात मध्यप्रदेशातल्या एका 'सती'ची सविस्तर वार्ता आली आहे. म्हणजे देवराळाचे सतीप्रकरण अजून स्मृतीमधून पुरते पुसले जाण्यापूर्वीच नव्या 'सती' वार्तेने जिवंत परंपरेची साक्ष पटविली आहे.{{nop}}<noinclude>
१२६ । मनातले जनात</noinclude>
l1ce9wdjf1fbfbz7vpxwvywjoyuxbo0
पान:मनातले जनात (स्त्री विषयक लेखसंग्रह ).pdf/१२९
104
107966
222225
2025-06-29T11:01:04Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
222225
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{gap}}या ताज्या प्रकरणात तर वृद्ध मातेला सतीत्त्वाच्या मखरात बसवण्यासाठी (आणि बहुधा नंतरचे भौतिक लाभ पदरात पाडून घेण्यासाठी) मुलांनीच पुत्रांनीच पुढाकार घेऊन मृत बापाच्या चितेवर आईला बसवून अग्नी दिला आहे. खरे तर हा सदोष मनुष्यवध आहे. पण 'तपासात' (?) काय निष्पन्न होईल कोण जाणे!
{{gap}}वृद्धमातेलाच 'सती'च्या चितेवर चढविणाऱ्या या पुत्रांनी पुन्हा परशुरामाची परंपराच पुढे चालवलेली दिसते. किंबहुना त्याच्याही पुढचे पाऊल टाकलेले दिसते. परशुरामाच्या पित्याला जमदग्नीला आपल्या पत्नीच्या रेणुकेच्या स्खलनाचा संशय तरी आला होता. येथे तसेही काही नाही. अर्थात स्त्रीला स्खलनाचा अधिकार या व्यवस्थेत नाहीच. मग ती माता असली, माता म्हणून पूजनीय असली तरी आधी केवळ मादी म्हणूनच पुत्रही तिच्याकडे पाहणार आणि पातिव्रत्य रक्षणासाठी पित्याला सामील होऊन तिचा शिरच्छेद करणार! एका वेगळ्या अर्थाने तिच्या शिरापेक्षा (बुद्धीपेक्षा) धडच (केवळ स्त्रीत्वाची इंद्रिये ) या व्यवस्थेला महत्त्वाचे वाटत असल्याचे सिद्ध करणार!
{{gap}}एकूण काय तर पती असो की पुत्र असो स्त्रीकडे माणूस म्हणून कोणी पाहणार नाही. सुरवातीला सांगितलेल्या घटनेतील स्त्रीची मानसिकता पारंपरिक गौरव कल्पनेतून घडलेली होती, हे खरे आहे. पण तिच्या मातेच्या कर्तव्यापासून ती दूर गेली की नाही? 'सती' म्हणून तिचा जसा पिढ्यान्पिढ्या गौरव झाला तसा तिने सती जाणे नाकारून मुलाचा प्रतिपाळ केला असता तर गौरव झाला असता का?
{{gap}}फार तर मुलाच्या मनातली कृतज्ञता त्याच्याबरोबरच संपली असती. त्या वंशातल्या पुढच्या पिढ्यांना ती काही सती इतकी स्पृहणीय गौरवगाथा वाटली नसती. कायद्याने एखादी प्रथा संपली तरी स्त्रीविषयक धाणांच्या भूतकालीन संकल्पनांची भुते पूर्णपणे नष्ट होत नाहीत, हेच खरे!

| {{rule|4em|height= 7px}}
|}{{nop}}<noinclude>{{right|मनातले जनात । १२७}}</noinclude>
2e47gawa6jzbufinnn52gdbp2v3v06l
पान:मनातले जनात (स्त्री विषयक लेखसंग्रह ).pdf/१३०
104
107967
222226
2025-06-29T11:04:00Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
222226
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

{{gap}}{{x-larger|'''एका लोककथेचे तात्पर्य!'''}}
{{rule|height=5px}}
{{gap}}जन्माच्या आधीपासून स्त्रियांचे आणि पुरुषांचे जगणे निरनिराळ्या नात्यांनी एकत्रच असते. त्यामुळे त्यांच्या समस्यांचा खरे तर एकत्रच विचार व्हायला हवा. पण तसे होताना दिसत नाही.
{{gap}}स्त्री पुरुषांच्या स्वतःविषयीच्या आणि एकमेकांविषयीच्या परंपरेने घडलेल्या धारणा हा मोठाच अडसर आहे. समाजातील धर्म, परंपरा, सांस्कृतिक धारणा या भावात्मक बाजूंबरोबरच समाजातील उत्पादन व्यवस्था, अर्थव्यवस्था, शिक्षण यासारख्या भौतिक संस्थातील व्यवस्थाही अडसर होऊन राहतात. या सर्वांविषयी मोकळेपणाने विचार होणे आवश्यक आहे. तसे प्रयत्न होतही असतात.
{{gap}}स्त्रीच्या परावलंबनाच्या अनेक कारणांपैकी काही कारणे हे परंपरानिर्मित भ्रम आहेत. पण ते भ्रमच वास्तवाची जागा होऊन बसले आहेत.
{{gap}}स्त्री निसर्गतः दुबळी आहे, हा असाच एक भ्रम आहे. अलीकडच्या वैज्ञानिक अभ्यासातून त्या भ्रमाला उत्तरे दिली आहेत. शारीरिक बळाच्या दृष्टीनेही पुरुषाचे सबलत्त्व निर्विवाद नाही. श्रमकरी वर्गातील पुरुषाच्या तुलनेत मध्यमवर्गीय पुरुषाच्या आहारातील घटक अधिक उष्माकांचे असूनही तो दुबळा ठरतो. एखादे धान्याचे पोते श्रमकरी पुरुष जितक्या सहजपणे वाहून आणतो, तसे मध्यमवर्गीय पुरुषही करू शकत नाही. बौद्धिकदृष्ट्या तर पुरुषाच्या समजल्या जाणाऱ्या क्षेत्रात संधी मिळताच स्त्रियाही बरोबरीची पात्रता सिद्ध करीत असल्याचा अनुभव येतो.{{nop}}<noinclude>
१२८ । मनातले जनात</noinclude>
b2onidhvr9t5ir7j5rizbchtfsqt4eq
पान:मनातले जनात (स्त्री विषयक लेखसंग्रह ).pdf/१३१
104
107968
222227
2025-06-29T11:06:43Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
222227
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{gap}}शारीरिक बळाबाबत स्त्री पुरुषांच्या आहारातील फरक हे महत्त्वाचे कारण आहे. स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेने कमी उष्मांकांची गरज असते हे ही आजवरच्या पुरुषप्राधान्याच्या समजुतीखाली असलेल्या आहार शास्त्रज्ञांची 'मिथक' (भ्रम) आहे, असे अलीकडेच जागतिक ख्यातीचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांनी सांगितले आहे. स्त्री ही शरीराने पुरुषापेक्षा लहान (चणीची) पर्यायाने दुबळी असावी या धारणेतून पिढ्यान् पिढ्या स्त्रिया अपुऱ्या अन्नावर, कुपोषित रहात आल्या आहेत. आशियाई (भारतासह) राष्ट्रात याचा प्रत्यय येतोच. उलट गेल्या दशकात जपानी मंडळींच्या आहारात बदल झाल्याने तेथील स्त्री पुरुष अधिक उंच आणि सुदृढ झाले आहेत. पाश्चिमात्य युरोपीय देशातील मुली आणि स्त्रिया वजन उंचीसह भारतीय पुरुषापेक्षाही काकणभर सरस आहेत.
{{gap}}श्रमकरी वर्गातील स्त्रिया असोत की नोकरीपेशा वर्गातील स्त्रिया असोत, त्या त्या वर्गातील पुरुष घटकांपेक्षा कितीतरी विविध स्तरावर त्या कामे करतात. उंबऱ्याबाहेर राना, शेतात किंवा रस्त्यावर खडी फोडण्यासारख्या कामात श्रमकरी स्त्री पुरुषांच्या बरोबरीने कष्ट उपसते, तशी नोकरीपेशा स्त्रीही आपआपल्या व्यवसायातील पुरुषांच्या बरोबरीने कामे करते. शिवाय या दोन्ही स्तरातील स्त्रिया सर्व प्रकारची घरकामे नित्य नियमाने वर्षानुवर्षेकरीत असतात. सर्व पुरुष घटकांपेक्षा सर्व स्त्री घटक अधिक काळ आणि अधिक प्रकारची कामे करीत असूनही तिच्यावरचा दुबळेपणाचा शिक्का कायम असतो.
{{gap}}याखेरीज अपत्यजन्म, त्याचे संगोपन, घरातील पाहुणे, आजारी, वृद्ध या सर्वांसाठी स्त्री पुरुषापेक्षा जास्त श्रमत असते. तरी तिला दुबळी ठरवणे पुरुषसत्तावादी मानसिकतेला सोयीचे असते. स्त्रीविषयी गौणत्त्वाची, कमीपणाची भावना पुरुषांच्याच काय पण स्त्रियांच्याही मनातून जात नाही. त्यामुळे स्त्रिया पुरुषावलंबी असतात, हेही एक गृहित असते. या समजुतीचा प्रतिवाद करणारी भूमिका ही आधुनिक पुरोगाम्यांची 'फॅशन' किंवा 'फॅड' समजले जाते. पण हे तरी कितपत खरे आहे?
{{gap}}भारतभरच्या शेकडो बोलींमध्ये हजारो लोक कथा पिढ्यान् पिढ्या प्रचलित आहेत. त्यापैकी बंगालमधील 'संताळ' जमातीच्या संताळी बोलीतली एक पारंपारिक लोककथा या संदर्भात लक्षणीय आहे.
{{gap}}एक जोडपे होते. नवरा मोठा तापट आणि संतापी होता. बायको बिचारी घरात<noinclude>{{right|मनातले जनात । १२९}}</noinclude>
i3odb7gmvbnedkwdidweokipqh44jho
पान:मनातले जनात (स्त्री विषयक लेखसंग्रह ).pdf/१३२
104
107969
222228
2025-06-29T11:10:11Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
222228
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>रात्रंदिवस निरनिराळ्या कामात व्यग्र असायची. पण हा घरात आला रे आला की तिला तडातडा बोलायचा. घालून पाडून बोलायचा. तिचा पाणउतारा करायचा. जणू ती आळशी आणि बिनकामाची ऐदी बायको आहे, असे त्याला वाटायचे. तीही एकदा त्रासली. म्हणाली, "सारखे सारखे असे बोलत जाऊ नका. मी किती तरी प्रकारची कामे अखंड करीत असते. मीही माणूस आहे. मीही दमते.'
{{gap}}बायको आपल्याला उलटून बोलली, म्हणून तो जास्तच संतापला, "बरं, बरं! उद्या मी घरी येईन तेव्हा तुझ्या कामांचा हिशेब ठेव. मीही माझ्या कामांचा हिशेब ठेवीन. एक काम झाले की, एक काडी बाजूला ठेवायची. पाहू कोणाच्या काड्या जास्त होतात?”
{{gap}}दुसऱ्या दिवशी हिशेबाची वेळ आली. नवऱ्याने आपल्या काड्या मोजून कामे सांगायला सुरवात केली. "मी रेडे मळणीसाठी नेले, त्याची ही एक काडी, भात खळ्यात पसरून मळणी केली त्याची ही काडी, भाताचे तूस बाजूला केले, त्याची ही काडी, भाताची रास करून घरी आलो, त्याची ही काडी....”
{{gap}}"अहो, हे तर सारं एका भाताचंच काम झालं की, आता माझी कामं बघा..." म्हणून एकेक काम उच्चारीत ती एकेक काडी बाजूला ठेवू लागली. "पहाटे उठून भात कांडून पाखडलं, अंगण झाडून सडा घातला, पाणवठ्यावर जाऊन पाणी आणलं, भांडी घासली, धुणी धुतली, गुराख्याचं खाणं केलं, चुलीला सारवण घातलं, विस्तव पेटवला, भात शिजवला. रानातून भाजी आणली, ती निवडून शिजवली, मुलांची अंथरूणं, घाण काढली, त्यांना पेज शिजवून दिली..." तिची यादी वाढतच चालली आणि काड्यांची संख्याही कितीतरी जास्त झाली. अखेर ती म्हणाली, "पहा बरं, माझं एक काम तरी दुसऱ्या सारखं आहे का? प्रत्येकाची पद्धत, वेळ, काळ वेगळी. तुमची कामं एकाच कामाची अंगं असतात. आम्हाला नांगरायची, बाहेरच्या कामांची पूर्वजांनी बंदी केली म्हणून. नाहीतर तीही कामं आम्ही केली असती. तरी तुम्ही आमचा सारखा पाणउतारा करता..."
{{gap}}नवरा मनातून उमगला.
{{gap}}ही लोककथा जुनी. एका आदिवासी समाजातली, तरी त्यातून ध्वनित होणारा आशय कोणत्याही स्थळ काळातील स्त्री पुरुषांच्या कामाचे स्वरूप स्पष्ट करणारा आहेच. तपशीलात थोडा फार फरक असेल.{{nop}}<noinclude>
१३०। मनातले जनात</noinclude>
lkbvz33pnl7wh164pbqzzgu22673i59
पान:मनातले जनात (स्त्री विषयक लेखसंग्रह ).pdf/१३३
104
107970
222229
2025-06-29T11:11:23Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
222229
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{gap}}स्त्रिया एकाच वेळी विविध स्तरावर शरीराने आणि मनाने कामे करीत असतात. कमीत कमी वेळात अधिकाधिक कामांचे नियोजन करीत असतात. ही सगळी मॅनेजमेंट त्या पिढ्यान् पिढ्या करीत असतात. परंतु एखाद्या कंपनीच्या किंवा फर्मच्या मॅनेजमेंटवर स्त्रिया अजूनही नगण्यच असतात. कारण ते उच्च अर्थाजनाचे क्षेत्र झाले की अधिक प्रतिष्ठेचे होते आणि स्वाभाविकच त्याचे स्वामित्व बहुधा पुरुष घटकाकडे जाते.
{{gap}} स्त्री पुरुष धारणांबाबत आदिम अवस्थेतून आपण खरेच प्रगतीकडे सरकलो आहोत का?

| {{rule|4em|height= 7px}}
|}{{nop}}<noinclude>{{right|मनातले जनात । १३१}}</noinclude>
a23rgp6xyed3dkk3dxe2wj8xaoviucp
पान:मनातले जनात (स्त्री विषयक लेखसंग्रह ).pdf/१३४
104
107971
222231
2025-06-29T11:12:06Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ चौथा कमरा इतिहासातील थोर व्यक्तींची चरित्रे सगळीकडेच सांगितली जातात. त्यांचे वंशवृक्ष साक्षेपाने शोधून त्यांची आवर्जून नोंद केली जाते, हे सगळे अगदी स्वाभाविक आहे. मात्..."
222231
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________
चौथा कमरा
इतिहासातील थोर व्यक्तींची चरित्रे सगळीकडेच सांगितली जातात. त्यांचे वंशवृक्ष साक्षेपाने शोधून त्यांची आवर्जून नोंद केली जाते, हे सगळे अगदी स्वाभाविक आहे. मात्र सर्व वंशवृक्षात केवळ पुरुष पूर्वजांची आणि पुरुष वंशजांचीच नोंद असते. जणु काही हे सर्व पुरुष केवळ पित्याचीच संतती असते. त्यांना केवळ जन्मदाताच असतो. जन्मदात्रीची आवर्जून नोंद असलेले वंशवृक्ष करण्याची कुठेच प्रथा नाही. जणु काही स्त्रीला भूतकाळ नाहीच. केवळ पितृसत्ताकताच येथे दिसते.
एकूण जीवनातील (कौटुंबिक आणि कुटुंबांबाहेरील) स्त्रीचे स्थान लक्षात घेतले तर स्त्रीचा हा अनुल्लेख स्वाभाविकच आहे. तिने ज्या कुळात जन्म घेतलेला असतो त्या कुळाला तिची फारशी अपूर्वाई नसते आणि विवाहानंतर ज्या कुळात ती जाते त्या कुळाला ती परकीचं (आऊट सायडर) असते. केवळ 'पुत्र' जन्माला घालून पतीचा वंश वाढविण्याचे 'साधन' एवढेच तिचे काम आणि स्थान असते. याखेरीज त्या कुळाला तिची ऐतिहासिक दखल घ्यावीशी वाटत नाही. पिता कितीही सामान्य वकुबाचा असला तरी तो ऐतिहासिक दस्तऐवजात नोंदवला जातो. आई मात्र जिजाऊसारखी असामान्य कर्तृत्वाची असेल तरच इतिहास तिची नोंद घेतो, तीही 'वंशवृक्ष' काढताना नाहीच. एकूण जिच्यामुळे वंशाचे मूळ रुजते तिला कुठेच रुजू दिले जात नाही. तिची 'नोंद'च
१३२। मनातले जनात<noinclude></noinclude>
iihu1vocuvbaaaj3e10alc02f7gnfc5