विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.45.0-wmf.8 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा पान:आपण सारे भाऊ.pdf/७४ 104 107133 222579 219106 2025-07-07T05:30:33Z JayashreeVI 4058 222579 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /> {{left|७४}}{{right|'''आपण सारे भाऊ'''}}</noinclude>{{left|{{larger|{{larger|'''१०'''}}}}}} {{gap}}"खरेंच बाबा, शारदाश्रमाचे चालक फार थोर! ते कर्मयोगी आहेत. संस्थेशीं, सेवेशीं त्यांनी लग्न लाविलें आहे.. कधीं सुटी नाहीं, रजा नाहीं. समुद्राला का कधी सुटी असते? सूर्यनारायण रविवारी का घरी बसतो? असें ते म्हणायचे. त्यांची बहीण फार आजारी होती. तीन तारा आल्या. शेवटीं गेले. बहिणीविषयों का त्यांना प्रेम नव्हतें? परंतु शंभर मुलांचा संसार त्यांनी मांडलेला. तें महान् कर्तव्य सोडून त्यांना जाववेना. ज्यांची आई नाहीं अशा मुलांना त्यांचे वडील येथें आणून ठेवतात व म्हणतात, 'शारदाश्रम म्हणजेच मुलांची आई!' एकदां एक लक्षाधीश आपला छोटा मुलगा घेऊन तेथें आला नि म्हणाला, 'माझा मुलगा आणला आहे. तुमची संस्था नि घर यांत फरक नाहीं. घरच्यापेक्षाहि येथें अधिक आस्था आहे!' बाबा, अशा संस्था म्हणजे देशाची भूषणे आहेत, नाहीं?" {{gap}}"आणि कृष्णनाथ, तुझ्या त्या कृष्णाची सांग बाबांना गंमत." विमल म्हणाली.
{{gap}}"बाबा, तेथें कृष्णा म्हणून एक सेवक आहे.. तो शारदाश्रमाच्या भोजनालयांत असतो. संस्थेच्या आरंभापासून तो आहे. आज वीस वर्षे तो तेथें आहे, परंतु अद्याप पोळी त्याला नीट करतां येत नाहीं! चटण्या-कोशींबीरी करतो. सर्व सामान तो काढून देतो आणि रात्रीं तो सारी झांकाझांक करतो त्या वेळेस त्याची खरी मजा असते. झांकझांक पाहतांना तो आपल्याशींच मोठ्याने बोलतो, 'उद्यांचे तांदूळ निवडलेले आहेत. खोबऱ्याच्या वाट्या २३ कशा? बरोबर. मागून दोन काढून दिल्या होत्या. डाळीच्या डब्यांना झांकणें लावली. केळ्यांची उद्यां कोशिंबीर करून टाकायला हवी.' असें बोलत त्याचें काम चालायचें. एकदां एक पाहुणे वरती झोपले होते. त्यांना वाटलें की बोलतो कोण? ते उठून खाली आले तो कृष्णा कोठीघरांत बोलत आहे. जेवतांना मुलें 'कृष्णा पोळी',--<noinclude></noinclude> gjtugqx47xey5w6fslckow5tv0nh520 222580 222579 2025-07-07T05:31:13Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 222580 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /> {{left|७४}}{{right|'''आपण सारे भाऊ'''}}</noinclude>{{left|{{larger|{{larger|'''१०'''}}}}}}
{{gap}}"खरेंच बाबा, शारदाश्रमाचे चालक फार थोर! ते कर्मयोगी आहेत. संस्थेशीं, सेवेशीं त्यांनी लग्न लाविलें आहे.. कधीं सुटी नाहीं, रजा नाहीं. समुद्राला का कधी सुटी असते? सूर्यनारायण रविवारी का घरी बसतो? असें ते म्हणायचे. त्यांची बहीण फार आजारी होती. तीन तारा आल्या. शेवटीं गेले. बहिणीविषयों का त्यांना प्रेम नव्हतें? परंतु शंभर मुलांचा संसार त्यांनी मांडलेला. तें महान् कर्तव्य सोडून त्यांना जाववेना. ज्यांची आई नाहीं अशा मुलांना त्यांचे वडील येथें आणून ठेवतात व म्हणतात, 'शारदाश्रम म्हणजेच मुलांची आई!' एकदां एक लक्षाधीश आपला छोटा मुलगा घेऊन तेथें आला नि म्हणाला, 'माझा मुलगा आणला आहे. तुमची संस्था नि घर यांत फरक नाहीं. घरच्यापेक्षाहि येथें अधिक आस्था आहे!' बाबा, अशा संस्था म्हणजे देशाची भूषणे आहेत, नाहीं?" {{gap}}"आणि कृष्णनाथ, तुझ्या त्या कृष्णाची सांग बाबांना गंमत." विमल म्हणाली.
{{gap}}"बाबा, तेथें कृष्णा म्हणून एक सेवक आहे.. तो शारदाश्रमाच्या भोजनालयांत असतो. संस्थेच्या आरंभापासून तो आहे. आज वीस वर्षे तो तेथें आहे, परंतु अद्याप पोळी त्याला नीट करतां येत नाहीं! चटण्या-कोशींबीरी करतो. सर्व सामान तो काढून देतो आणि रात्रीं तो सारी झांकाझांक करतो त्या वेळेस त्याची खरी मजा असते. झांकझांक पाहतांना तो आपल्याशींच मोठ्याने बोलतो, 'उद्यांचे तांदूळ निवडलेले आहेत. खोबऱ्याच्या वाट्या २३ कशा? बरोबर. मागून दोन काढून दिल्या होत्या. डाळीच्या डब्यांना झांकणें लावली. केळ्यांची उद्यां कोशिंबीर करून टाकायला हवी.' असें बोलत त्याचें काम चालायचें. एकदां एक पाहुणे वरती झोपले होते. त्यांना वाटलें की बोलतो कोण? ते उठून खाली आले तो कृष्णा कोठीघरांत बोलत आहे. जेवतांना मुलें 'कृष्णा पोळी',--<noinclude></noinclude> 3q6756s48gi3xp3yc4ay8hculfwa0ri 222581 222580 2025-07-07T05:32:16Z JayashreeVI 4058 222581 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /> {{left|७४}}{{right|'''आपण सारे भाऊ'''}}</noinclude>{{left|{{larger|{{larger|'''१०'''}}}}}}
{{gap}}"खरेंच बाबा, शारदाश्रमाचे चालक फार थोर! ते कर्मयोगी आहेत. संस्थेशीं, सेवेशीं त्यांनी लग्न लाविलें आहे.. कधीं सुटी नाहीं, रजा नाहीं. समुद्राला का कधी सुटी असते? सूर्यनारायण रविवारी का घरी बसतो? असें ते म्हणायचे. त्यांची बहीण फार आजारी होती. तीन तारा आल्या. शेवटीं गेले. बहिणीविषयों का त्यांना प्रेम नव्हतें? परंतु शंभर मुलांचा संसार त्यांनी मांडलेला. तें महान् कर्तव्य सोडून त्यांना जाववेना. ज्यांची आई नाहीं अशा मुलांना त्यांचे वडील येथें आणून ठेवतात व म्हणतात, 'शारदाश्रम म्हणजेच मुलांची आई!' एकदां एक लक्षाधीश आपला छोटा मुलगा घेऊन तेथें आला नि म्हणाला, 'माझा मुलगा आणला आहे. तुमची संस्था नि घर यांत फरक नाहीं. घरच्यापेक्षाहि येथें अधिक आस्था आहे!' बाबा, अशा संस्था म्हणजे देशाची भूषणे आहेत, नाहीं?"
{{gap}}"आणि कृष्णनाथ, तुझ्या त्या कृष्णाची सांग बाबांना गंमत." विमल म्हणाली.
{{gap}}"बाबा, तेथें कृष्णा म्हणून एक सेवक आहे.. तो शारदाश्रमाच्या भोजनालयांत असतो. संस्थेच्या आरंभापासून तो आहे. आज वीस वर्षे तो तेथें आहे, परंतु अद्याप पोळी त्याला नीट करतां येत नाहीं! चटण्या-कोशींबीरी करतो. सर्व सामान तो काढून देतो आणि रात्रीं तो सारी झांकाझांक करतो त्या वेळेस त्याची खरी मजा असते. झांकझांक पाहतांना तो आपल्याशींच मोठ्याने बोलतो, 'उद्यांचे तांदूळ निवडलेले आहेत. खोबऱ्याच्या वाट्या २३ कशा? बरोबर. मागून दोन काढून दिल्या होत्या. डाळीच्या डब्यांना झांकणें लावली. केळ्यांची उद्यां कोशिंबीर करून टाकायला हवी.' असें बोलत त्याचें काम चालायचें. एकदां एक पाहुणे वरती झोपले होते. त्यांना वाटलें की बोलतो कोण? ते उठून खाली आले तो कृष्णा कोठीघरांत बोलत आहे. जेवतांना मुलें 'कृष्णा पोळी',--<noinclude></noinclude> nzcxhzdi7mzr1usfgkh6300appi6wzf पान:आपण सारे भाऊ.pdf/७५ 104 107134 222582 219107 2025-07-07T05:41:48Z JayashreeVI 4058 222582 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /> {{left|'''आपण सारे भाऊ'''}}{{right|७५}}</noinclude>{{gap}}'कृष्णा, भाजी, चटणी' असा तगादा लावतात. कृष्णा चटणी वाढायला आणतो. 'मी आधी पोळी मागितली, मी भाजी मागितली,' मुलें म्हणतात. कृष्णा शांतपणें म्हणतो, ‘शेवटच्या मुलाचे मागणे माझ्या लक्षांत राहतें. बाकीच्या पहिल्या मागण्या मी विसरतो.' मुले हसतात.
{{gap}}"परंतु बाबा, कृष्णाचें संस्थेवर फार प्रेम. पाहुणे आले तर त्यांना अधिक तूप- ते पुरे म्हणेपर्यंत वाढील. त्यामुळे त्याच्या हातांत तूप देत नाहींत. एखादी भाजी संपत आली म्हणजे तो पातेले खडखडवीत येतो. मुलें म्हणतात, कृष्णा समजलें. भाजीचें दिवाळें ना तुझ्या?' ताक करणें त्याचें काम. परंतु घट्ट ताक त्याला करता येत नाहीं; कृष्णाचें ताक म्हणजे पाणीदार असायचे. तोहि विनोदाने म्हणतो, पाणीदार आहे; परंतु चवदार आहे!' कृष्णा प्रतिभावानहि आहे. एकदां तो चहा करीत होता. पाण्याला आधण आलें होतें. परंतु तिकडे दूध उतूं जाणार होतें. आधीं पूड टाकायची की आधीं दूध उतरायचें, हा कृष्णाला प्रश्न पडला. आणि म्हणाला, 'स्टेशनांत एकदम दोन गाड्या आल्या; परंतु स्टेशनमास्तर एक. कोणती गाडी आधी सोडायची?' असे कधीं कधीं विनोदी बोलतो. त्याला पाण्याचा फार नाद. सारखे पहिले पाणी ओतील, नवीन भरील आणि हातांत छडी घेऊन कुत्र्याला शिस्त लावील,' तेथेंबस. मग तुला भाकरी मिळेल' असे म्हणेल. असा हा कृष्णा. आमचे चालक म्हणायचे, ' कृष्णा, तूं नि मी एकदमच सेवानिवृत्त होऊं. माझ्या पाठीमागें तुला कोण सांभाळील? मुलांचें प्रेम कृष्णावर. माजी विद्यार्थी आले तर आधीं कृष्णाची चौकशी करतील! प्रेमाचा टांगा नि हा कृष्णा, मुलें कधीं विसरणार नाहींत. आपल्या संस्थेची सर्वत्र कीर्ति जावी असे कृष्णाला वाटतें. संस्थेशीं तो एकरूप झालेला आहे. तो भाडोत्री नाहीं.”
{{gap}}"कृष्णनाथ, तुला त्या शारदाश्रमात राहायला मिळाले. फार चांगले झालें. तुझ्यावर सुंदर संस्कार झाले. आतां पुढें तूं काय करणार?"
{{gap}}"मला विज्ञानाचा अभ्यास करण्याची इच्छा आहे. उद्यांच्या हिंदु--<noinclude></noinclude> m005xcnjb3pne5hnyw1nyqs85bngr4m 222583 222582 2025-07-07T05:42:22Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 222583 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /> {{left|'''आपण सारे भाऊ'''}}{{right|७५}}</noinclude>{{gap}}'कृष्णा, भाजी, चटणी' असा तगादा लावतात. कृष्णा चटणी वाढायला आणतो. 'मी आधी पोळी मागितली, मी भाजी मागितली,' मुलें म्हणतात. कृष्णा शांतपणें म्हणतो, ‘शेवटच्या मुलाचे मागणे माझ्या लक्षांत राहतें. बाकीच्या पहिल्या मागण्या मी विसरतो.' मुले हसतात.
{{gap}}"परंतु बाबा, कृष्णाचें संस्थेवर फार प्रेम. पाहुणे आले तर त्यांना अधिक तूप- ते पुरे म्हणेपर्यंत वाढील. त्यामुळे त्याच्या हातांत तूप देत नाहींत. एखादी भाजी संपत आली म्हणजे तो पातेले खडखडवीत येतो. मुलें म्हणतात, कृष्णा समजलें. भाजीचें दिवाळें ना तुझ्या?' ताक करणें त्याचें काम. परंतु घट्ट ताक त्याला करता येत नाहीं; कृष्णाचें ताक म्हणजे पाणीदार असायचे. तोहि विनोदाने म्हणतो, पाणीदार आहे; परंतु चवदार आहे!' कृष्णा प्रतिभावानहि आहे. एकदां तो चहा करीत होता. पाण्याला आधण आलें होतें. परंतु तिकडे दूध उतूं जाणार होतें. आधीं पूड टाकायची की आधीं दूध उतरायचें, हा कृष्णाला प्रश्न पडला. आणि म्हणाला, 'स्टेशनांत एकदम दोन गाड्या आल्या; परंतु स्टेशनमास्तर एक. कोणती गाडी आधी सोडायची?' असे कधीं कधीं विनोदी बोलतो. त्याला पाण्याचा फार नाद. सारखे पहिले पाणी ओतील, नवीन भरील आणि हातांत छडी घेऊन कुत्र्याला शिस्त लावील,' तेथेंबस. मग तुला भाकरी मिळेल' असे म्हणेल. असा हा कृष्णा. आमचे चालक म्हणायचे, ' कृष्णा, तूं नि मी एकदमच सेवानिवृत्त होऊं. माझ्या पाठीमागें तुला कोण सांभाळील? मुलांचें प्रेम कृष्णावर. माजी विद्यार्थी आले तर आधीं कृष्णाची चौकशी करतील! प्रेमाचा टांगा नि हा कृष्णा, मुलें कधीं विसरणार नाहींत. आपल्या संस्थेची सर्वत्र कीर्ति जावी असे कृष्णाला वाटतें. संस्थेशीं तो एकरूप झालेला आहे. तो भाडोत्री नाहीं.”
{{gap}}"कृष्णनाथ, तुला त्या शारदाश्रमात राहायला मिळाले. फार चांगले झालें. तुझ्यावर सुंदर संस्कार झाले. आतां पुढें तूं काय करणार?"
{{gap}}"मला विज्ञानाचा अभ्यास करण्याची इच्छा आहे. उद्यांच्या हिंदु--<noinclude></noinclude> t4wlaqqqnbu9oetfxa39p22gpvyatmz पान:यक्षगान आणि मराठी नाट्य-परंपरा.pdf/५९ 104 108093 222584 222546 2025-07-07T11:42:36Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 222584 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|कर्नाटकातील यक्षगान आणि मराठी नाटक||५५}}</noinclude>यक्षगान ह्या शब्दातही गान > गीत > गाणे या कृतीचे महत्त्व जाणवते. प्रसंग म्हणजेच कथावस्तू. गीतातून कथा सांगण्याची एक विशिष्ट शैली, असे यक्षगायनाचे प्रारंभिक रूप असल्याचा पुरावा शार्ङ्गधराच्या 'संगीत रत्नकारा'त मिळतो. शिवाय कित्येक प्रसंग असे उपलब्ध झाले आहेत की, ते यक्षगान म्हणून लिहिले गेले आहेत, पण प्रत्यक्ष रंगमंचावर त्यांचे प्रयोग झालेले दिसत नाहीत. त्यांच्या स्वरूपावरून तसा उद्देशही नसावा. यक्षगायनाचे आजचे अभ्यासक व उपासक शिवराम कारन्त यांनी असे प्रतिपादन केले आहे.
{{gap}}अकराव्या शतकापासून कर्नाटकात यक्षगानाच्या विविध शैली प्रचारात आलेल्या दिसतात आणि त्यानंतर आजपर्यंत हा प्रवाह सातत्याने विकसित होत असलेला दिसतो. यांपैकी अनेक शैली या आजही प्राथमिक अवस्थेत दिसतात. बेळगावच्या आसपासची दोडाट्ट ही शैली ह्या प्राथमिक अवस्थेचे उदाहरण होय. (हे दोडाट्टा खेळ आणि उ. कोकणातील खेळे यांचे स्वरूप मिळतेजुळते आहे).
{{gap}}यक्षगान संगीत शैली एके काळी स्वतंत्रपणे अस्तित्वात असल्याचे काही पुरावे आजही मिळू शकतात. मलनाडच्या आसपासचे खेडूत वाजंत्रीवाले लग्नकार्यात ह्या शैलीचा उपयोग करीत. शिवराम कारन्त यांच्या मते अलीकडे हे वाद्यकार कर्नाटकी संगीत शैलीच्या मोहात पडल्याने त्या शैलीचा उपयोग करतात.
{{gap}}इ. स. १४४६ ते १४९० च्या सुमारास विजयनगरच्या साळुव नरसिंहाच्या काळात आंध्रमध्ये पोल्लुगोंटा चन्नशारी नामक व्यक्तीने 'सौभरिचरितमु' नामक यक्षगान प्रसंग लिहिला होता. तामिळ प्रदेशातही यक्षगानशैली प्रचारात होती असे म्हणण्याइतका पुरावा तेथेही उपलब्ध आहे. इ. स. १६२५ मध्ये तंजावरच्या रामभद्रांवाने 'रघुनाथाभ्युदय' नामक ग्रंथाची रचना केली. त्यातील उल्लेखावरून राजघराण्यातील स्त्रिया रावणहत्या नामक वीणावादनासह यक्षगान शैलीत द्विपदींचे गायन करीत असत. रघुनाथराव तंजावरचा राजा असून स्वतः मोठा संगीतज्ञ होता.
{{gap}}'संगीत रत्नाकरात' शार्ङ्गदेवाने (इ. स. १२१०-१२४७) यक्षगान शैलीचा उल्लेख "चालिर्जक्कैति कथितः" नावाने केला आहे. 'जक्क' हे 'यक्ष' चे तद्भवरूप आहे. काहींच्या मते मुळातील 'जक्क' या देशी शब्दापासून संस्कृत 'यक्ष' शब्द झाला. मात्र यक्ष शब्द वेदांइतका जुना आहे. 'संगीत रत्नाकरात' यक्षगान संगीत शैली ही स्वतंत्र संगीत शैली असल्याचा केवळ उल्लेख आहे. तिची लक्षणे दिलेली नाहीत.
{{gap}}इ. स. १६२० मधील "यक्ष्वौध गीतमपि" नावाने संगीत शास्त्रकार गोविंद दीक्षिताने उल्लेख केला आहे. इ. स. ११८९ च्या सुमारास कन्नड 'चंद्रप्रभा पुराणा'त 'यक्कलगाण' असा शब्द सापडतो. त्या शैलीतील व शैलीचे वर्णन करणारे एक पदही आहे. त्याचा सारांश असा :
{{gap}}"जो तालमें नहीं बँधता, पंचम श्रुतिका साथ नहीं देता, वीणा के साथ तनिक भी मेल नहीं रखता ऐसे एक्कलगाण (यक्षगान) के मधुर गवैयेको राजा प्रेमसे सुन<noinclude></noinclude> oq0i2wug2rbvolx7lxomuljwvv9fh95 पान:यक्षगान आणि मराठी नाट्य-परंपरा.pdf/६० 104 108094 222585 222547 2025-07-07T11:53:14Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 222585 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|५६||यक्षगान आणि मराठी नाट्यपरंपरा}}</noinclude>रहा था" (यक्षगान, शि. का., पृ. ६५). नागचंद्राच्या मल्लीनाथ पुराणात (इ. स. ११०५) ही एक उल्लेख आहे. "कमल में लक्ष्मी के मन को पानेवाले यक्षगान की तरह" (अ. ६. ९८) (यक्षगान, शि. का., पृ. ६५) १६ व्या शतकातील कवी रत्नाकर वर्णीनेही 'यक्कलगाण' 'यक्कडिगर' या शब्दांचा प्रयोग केला आहे. या काळापर्यंत 'यक्षगान आटा" (नाट्यरूप) लोकप्रिय होत होता.
{{gap}}'यक्कल', 'यक्कडिंग', 'जक्क' या शब्दांबद्दल विद्वानांत बरेच मतभेद आहेत. संस्कृत 'यक्ष' वरून तो झाला असावा असे एक मत आहे. गीतवाद्यांच्या आधारे जो एकटा (यक्कल) गातो ते 'यक्कलगान' ! तेलगु शब्द 'जक्कुलु' हे संस्कृत 'यक्ष' चे रूप आहे त्यांच्या मते जक्कु = यति शब्दच पुढे संस्कृतात यक्ष झाला. काही का असेना यक्षगंधर्वादी कलावंत मानवी पातळीहून उन्नत, देवकोटिसदृश अतिमानवी पातळीवरचे आहेत, हेच सुचविण्याचा सर्वांचा हेतू आहे.
{{gap}}ताडपत्रावरील एका प्रसंगलेखनात एके ठिकाणी 'यक्षगाना' साठी 'गंधर्वगान' असा पर्यायी शब्द आढळतो. 'गंधर्व' शब्दाची व्युत्पत्ती आजच्या अफगाणिस्तान- प्राचीन 'कंदाहार'वरून सिद्ध केली जाते. गांधारग्राम हा संगीतातील तिसरा ग्राम सुमारे हजार वर्षांपूर्वी प्रचलित होता. यक्षगान शैलीही गांधारग्रामातून सिद्ध झाली असावी असा शिवराम कारन्त यांचा एक अंदाज आहे.
{{gap}}यक्षगान संगीत गुरुमुखातून शिकण्याची परंपरा नाहीशी होऊन बरीच वर्षे झाली. राजाश्रय सुटल्याने ही परंपरा विस्कळित झाली. कर्नाटकी संगीताने 'यक्षगाना'ची जागा घेतली. यक्षगानाची शास्त्रीय बैठक विस्मृतीत गेली. मात्र 'यक्षगान प्रसंग' लेखनाद्वारे काही अवशेष टिकून राहिलेले आहेत. त्यावरून काही अंदाज फक्त करता येतात.
{{gap}}'यक्षगान' ही एक संगीतशैली असल्याचा उल्लेख 'संगीत रत्नाकरा'त शार्ङ्गदेवाने केला आहेच; पण कारन्त म्हणतात तो 'संगीत' या शब्दाचा अर्थ येथे नाही. सामान्यपणे स्वरांच्या साह्याने निर्माण झालेल्या गीतालाच संगीत म्हणण्याचा रिवाज असल्याने असा घोटाळा होतो. आज आपण ज्याला Vocal Music म्हणतो तेवढाच अर्थ श्री. कारन्त यांना अभिप्रेत आहे. त्याला 'गीत' असे म्हटले आहे. 'संगीत रत्नाकर'वाल्या शार्ङ्गधराला तेवढाच अर्थ अभिप्रेत नाही. संगीताची व्याख्या तो अशी करतो-
{{gap}}"गीतं वाद्यं तथा नृत्यं त्र्यं संगीतमुच्चते ।" (अ.१.२१)
{{gap}}वाद्य व नृत्य यांच्या 'सह' (सम्) असलेले गीत ते संगीत म्हणून 'गीत' पूर्वी 'सम्' या उपसर्गाची योजना तो करतो.
{{gap}}नृत्य आणि वाद्यशैली या त्या त्या प्रदेशातील लोकांच्या आवडीनुसार रंजविणाऱ्या असतात. नृत्त हे वाद्याला अनुसरणारे व वाद्य हे गीताला अनुसरणारे म्हणून गीत हे आद्य व प्रमुख आहे. ते ब्रह्मदेवाने सामवेदापासून संग्रहित केले असल्याचेही शार्ङ्गधर सांगतो. (अ.१.२५) म्हणून संगीत शब्दामध्ये गीत, वाद्य व नृत्त<noinclude></noinclude> i631oc8ak77e9nr1zmakz26pjskqmzk