विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.46.0-wmf.21
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/94
104
27638
228665
116934
2026-03-26T09:43:45Z
कल्पनाशक्ती
3813
228665
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Punekar Yashashree" /></noinclude>{{x-larger|'''महात्मा गांधींना अनावृत्त पत्र'''}}

{{gap}}श्रद्धेय बापू,
{{gap}}सादर प्रणाम

{{gap}}तुम्हास हे पत्र मी पोस्टानेच पाठविणार होतो, पण ते वेळेत तुम्हास मिळेल याची खात्री नाही. स्वातंत्र्याच्या गेल्या साठ वर्षांत पोस्टाने येथील सामान्य माणसास सेवा अनुभवाने जिंकले नाही, जिंकता आले नाही. तुमच्यावर त्यांनी किती तिकिटे, कार्ड, पाकिटे काढली तरी! कुरियरनी पाठवायचे म्हटले तर ती सेवा इतकी महागडी आहे की सामान्य भारतीयाला ती परवडत नाही. म्हणून हे अनावृत्त पत्र! सुदैवाने वृत्तपत्र रोज नि वेळेवर प्रकाशित होत आहेत, नि स्पर्धेमुळे स्वस्तही आहेत.

{{gap}}आज हे अनावृत्त पत्र लिहिण्याचे कारण खरंतर अस्वस्थता हेच आहे. तुमचे विचार, आचार हा माणसाचा रोजचा व्यवहार झाला तरच तुम्हाला अपेक्षित खरा भारत आकारास येईल. तसे घडताना मात्र दिसत नाही. एका चित्रपटाचं प्रदर्शन झालं की नवी फॅशन येते, तसं तुमचं येणं (नि जाणंही) ही काही परिवर्तनाची नांदी नव्हे! शिवाय या परिवर्तनाची नांदी ठरणारे ‘हिरो’, त्यांचा इतिहास, त्यांचे चरित्र, त्यांच्या दोन ऑक्टोबरच्या दिवशी प्रसिद्धीमाध्यमातून प्रक्षेपित झालेल्या मुलाखती सारा एक राजकीय उथळ बनाव होता.

{{gap}}गांधी जयंती ही या देशात 'ड्राय डे' म्हणून भारतीयांच्या मुळावर उठत असेल तर असली दारूबंदी न केलेलीच बरी. एका गालावर थप्पड़ दिल्यास दुसरा पुढे करण्याचा तुमचा संयम, हृदयपरिवर्तनाचा मार्ग जर कोणी तिसऱ्या थपडेनं पराभूत करत असेल तर इथे अहिंसा कशी नांदणार?<noinclude>{{center |जाणिवांची आरास/९३ }}</noinclude>
7szpjfp2lwlrxuim3f6jksb1cc04d2y
228666
228665
2026-03-26T09:44:14Z
कल्पनाशक्ती
3813
228666
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Punekar Yashashree" /></noinclude>{{x-larger|'''महात्मा गांधींना अनावृत्त पत्र'''}}

{{gap}}श्रद्धेय बापू,
{{gap}}सादर प्रणाम

{{gap}}तुम्हास हे पत्र मी पोस्टानेच पाठविणार होतो, पण ते वेळेत तुम्हास मिळेल याची खात्री नाही. स्वातंत्र्याच्या गेल्या साठ वर्षांत पोस्टाने येथील सामान्य माणसास सेवा अनुभवाने जिंकले नाही, जिंकता आले नाही. तुमच्यावर त्यांनी किती तिकिटे, कार्ड, पाकिटे काढली तरी! कुरियरनी पाठवायचे म्हटले तर ती सेवा इतकी महागडी आहे की सामान्य भारतीयाला ती परवडत नाही. म्हणून हे अनावृत्त पत्र! सुदैवाने वृत्तपत्र रोज नि वेळेवर प्रकाशित होत आहेत, नि स्पर्धेमुळे स्वस्तही आहेत.
{{gap}}आज हे अनावृत्त पत्र लिहिण्याचे कारण खरंतर अस्वस्थता हेच आहे. तुमचे विचार, आचार हा माणसाचा रोजचा व्यवहार झाला तरच तुम्हाला अपेक्षित खरा भारत आकारास येईल. तसे घडताना मात्र दिसत नाही. एका चित्रपटाचं प्रदर्शन झालं की नवी फॅशन येते, तसं तुमचं येणं (नि जाणंही) ही काही परिवर्तनाची नांदी नव्हे! शिवाय या परिवर्तनाची नांदी ठरणारे ‘हिरो’, त्यांचा इतिहास, त्यांचे चरित्र, त्यांच्या दोन ऑक्टोबरच्या दिवशी प्रसिद्धीमाध्यमातून प्रक्षेपित झालेल्या मुलाखती सारा एक राजकीय उथळ बनाव होता.
{{gap}}गांधी जयंती ही या देशात 'ड्राय डे' म्हणून भारतीयांच्या मुळावर उठत असेल तर असली दारूबंदी न केलेलीच बरी. एका गालावर थप्पड़ दिल्यास दुसरा पुढे करण्याचा तुमचा संयम, हृदयपरिवर्तनाचा मार्ग जर कोणी तिसऱ्या थपडेनं पराभूत करत असेल तर इथे अहिंसा कशी नांदणार?<noinclude>{{center|जाणिवांची आरास/९३ }}</noinclude>
q9k63l5ztkh7m5nrrzrvy8pjbejy8sb
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/95
104
27639
228664
116935
2026-03-26T09:42:36Z
कल्पनाशक्ती
3813
228664
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Punekar Yashashree" /></noinclude>लपविलेली एके ४७ अजून सच्चे भारतीय विसरलेले नाहीत. बापूजी तुमच्या नि तुमच्या मुलातला फरक सुनील दत्तनंतरही तसाच चालू आहे, याचा खेद वाटतो. निवडणूक जिंकणं वेगळं नि भारतीयांची मनं जिंकणं वेगळं असतं हे अजून इथं उमगलेलं नाही.
{{gap}}बापूजी, तुम्हाला आमच्यातून निघून जाण्याला सहा दशके लोटली. आम्ही इथे तुमचे पुतळे, वस्तुसंग्रहालये उभारली, ती नव्या पिढीस तुमचं चरित्र, विचार कळावेत म्हणून. त्यांची दुरवस्था पाहिली की तुमच्या त्यागावर राज्य करणाऱ्या राज्यकर्त्यांनी काय म्हणावं ते सुचत नाही. बऱ्याचदा वाटत राहतं की तुम्ही अन्य देशांत जन्मता तर ते देश किती बदलले असते. तुमचं प्रासंगिक स्मरण, तेही कर्मकांड म्हणून माझ्यासारख्याला सतत सलत राहतं.
{{gap}}हे खरं आहे बापूजी, माझी पिढी तुमचा साधेपणा पचवू शकली नाही, पण अजून किती तरी दिवे सच्चेपणाचे काजवे बनून लुकलुकत आहे. त्यांनी पावलापुरता प्रकाश मानून व्यक्तिगत जीवनात त्याग, मूल्यवत्ता, सचोटी पाळली आहे. अजून या देशात अण्णा हजारे, मेधा पाटकर, न्यायालयीन, सामाजिक लढाया हरले तरी लढत आहेत. माझ्यासारखे अनेक शिक्षक पाट्याच टाकतात, पण भरून टाकतात ते बापू तुम्हासच स्मरून! अजूनही पोलीस खात्यात लाच न घेणारा शिपाई दिसतो नि लक्षात येतं अजून कवडसा जिवंत आहे. उद्या नक्कीच पूर्ण सूर्य येईल. मी माझं काम चोख बजावत, जेवढे मला दुसऱ्यासाठी, प्रसंगी पदरमोड करून जे करता येईल ते करत राहतो. अशी शेकडो माणसे बापूजी, या देशात आहेत. मला वाटतं त्यांच्या जीवनावर क्षणिक चित्रपटापेक्षा तुमच्या अमर चारित्र्याचा ठसठशीत प्रभाव आहे म्हणून शेकडो मानव भाई लगे राहतात. 'लगे रहो मुन्नाभाई'चा हेतू साध्य झाला आहे. जगात हेतू शुद्ध असून चालत नाही. शुद्धता नि शुचितेचं सातत्य हे मला कळून आलेलं तुमचं चरित्र! ते इतरांना कळायला काय करावं लागेल?
{{center |पत्रोत्तर नक्की द्या. नव्या पिढीस त्याची खरी गरज आहे.}}{{right|
तुमचा,
एक अनुयायी.}}
{{right|{{xx-larger|'''***'''}}}}{{nop}}<noinclude>{{center|जाणिवांची आरास/९४}}</noinclude>
7m3fn6vr9cp7v9nesdoeis56estkjk0
228667
228664
2026-03-26T09:45:47Z
कल्पनाशक्ती
3813
228667
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Punekar Yashashree" /></noinclude>लपविलेली एके ४७ अजून सच्चे भारतीय विसरलेले नाहीत. बापूजी तुमच्या नि तुमच्या मुलातला फरक सुनील दत्तनंतरही तसाच चालू आहे, याचा खेद वाटतो. निवडणूक जिंकणं वेगळं नि भारतीयांची मनं जिंकणं वेगळं असतं हे अजून इथं उमगलेलं नाही.
{{gap}}बापूजी, तुम्हाला आमच्यातून निघून जाण्याला सहा दशके लोटली. आम्ही इथे तुमचे पुतळे, वस्तुसंग्रहालये उभारली, ती नव्या पिढीस तुमचं चरित्र, विचार कळावेत म्हणून. त्यांची दुरवस्था पाहिली की तुमच्या त्यागावर राज्य करणाऱ्या राज्यकर्त्यांनी काय म्हणावं ते सुचत नाही. बऱ्याचदा वाटत राहतं की तुम्ही अन्य देशांत जन्मता तर ते देश किती बदलले असते. तुमचं प्रासंगिक स्मरण, तेही कर्मकांड म्हणून माझ्यासारख्याला सतत सलत राहतं.
{{gap}}हे खरं आहे बापूजी, माझी पिढी तुमचा साधेपणा पचवू शकली नाही, पण अजून किती तरी दिवे सच्चेपणाचे काजवे बनून लुकलुकत आहे. त्यांनी पावलापुरता प्रकाश मानून व्यक्तिगत जीवनात त्याग, मूल्यवत्ता, सचोटी पाळली आहे. अजून या देशात अण्णा हजारे, मेधा पाटकर, न्यायालयीन, सामाजिक लढाया हरले तरी लढत आहेत. माझ्यासारखे अनेक शिक्षक पाट्याच टाकतात, पण भरून टाकतात ते बापू तुम्हासच स्मरून! अजूनही पोलीस खात्यात लाच न घेणारा शिपाई दिसतो नि लक्षात येतं अजून कवडसा जिवंत आहे. उद्या नक्कीच पूर्ण सूर्य येईल. मी माझं काम चोख बजावत, जेवढे मला दुसऱ्यासाठी, प्रसंगी पदरमोड करून जे करता येईल ते करत राहतो. अशी शेकडो माणसे बापूजी, या देशात आहेत. मला वाटतं त्यांच्या जीवनावर क्षणिक चित्रपटापेक्षा तुमच्या अमर चारित्र्याचा ठसठशीत प्रभाव आहे म्हणून शेकडो मानव भाई लगे राहतात. 'लगे रहो मुन्नाभाई'चा हेतू साध्य झाला आहे. जगात हेतू शुद्ध असून चालत नाही. शुद्धता नि शुचितेचं सातत्य हे मला कळून आलेलं तुमचं चरित्र! ते इतरांना कळायला काय करावं लागेल?
{{gap}}पत्रोत्तर नक्की द्या. नव्या पिढीस त्याची खरी गरज आहे.
{{right|तुमचा,
एक अनुयायी.}}
{{right|{{xx-larger|'''■ ■'''}}}}{{nop}}<noinclude>{{center|जाणिवांची आरास/९४}}</noinclude>
1g1te60tytpshq7n4jppee88c25sh1h
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/96
104
27640
228668
117079
2026-03-26T09:46:48Z
कल्पनाशक्ती
3813
228668
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Punekar Yashashree" /></noinclude>
'''माय टीचर गुटखा'''

{{gap}}माझ्या हातात निळ्या, पिवळ्या चकचकीत कागदाची पाऊच (पुडी) आहे. तिच्यावर लिहिलंय ‘माय टीचर गुटखा.' माझ्या एका तरुण सहकारी प्राध्यापकांनी मोठ्या भांबावलेल्या अवस्थेत ती पुडी माझ्या हाती सोपविली नि म्हणाले, 'मला काही सुचत नाही हे सारं बघून!' (असे अस्वस्थ, भांबावलेले, भाबडे तरुण या व्यवसायात येत आहेत हा किती मोठा आशेचा किरण आहे म्हणून सांगू.)
{{gap}} चौकशी करता कळलं की बाजारात एक नवीन गुटखा लाँच झालाय. ‘माय टीचर गुटखा' हे त्याचं नाव. अशी अक्षरं छापलेले टी-शर्ट घालून काही तरुण विक्रेते शाळा, कॉलेज, विद्यापीठाच्या अवती-भवती फिरून प्रचार प्रसार करत आहेत. नावावरून लक्षात येतं की त्यांचं टार्गेट ग्रुप मास्तर, शिक्षक, प्राध्यापक आहेत. एकदा का मंडळींना पटवलं (खरंतर गटवलं!) की मग विद्यार्थ्यांना गटवणं सोपं! गुरूसारखी दुसरी दीक्षा नाही! इसे कहते है मार्केट स्टॅटेजी!!
{{gap}}गुटका, गुटी हे शब्द मुळातले आयुर्वेदातले. पूर्वी बाळ गुटी, पाचक गुटका असायचा. पुढे अर्क आले. (बहुधा अर्कशाळा आल्यावर) 'कुमारी आसव' अशी औषधं आली. नंतर इंग्रजी औषधांबरोबर ‘डॉक्टर्स ब्रॅंडी' आल्याचं आठवतं. ती क्षयरोग्यांना डॉक्टर लिहून द्यायचे. पुढे डॉक्टर्सच ती घेऊ लागले. तसंच गुटख्याचंही झालं. ऑक्सफर्ड पॉकेट डिक्शनरी बाजारात आली ती कोटाच्या खिशात मावणारा संदर्भ ग्रंथ असावा म्हणून गोरखपूर प्रेसनी त्याच धर्तीवर ‘रामचरितमानस गुटका', ज्ञानेश्वरी गुटका' काढला, तो वाचकांच्या खिशात हे ग्रंथ नेहमी राहावे म्हणून. पूर्वीच्या शिक्षकांच्या<noinclude>{{center| जाणिवांची आरास/९५}}</noinclude>
s2xbnqou1w9oc5e4js5ore3nb2at12c
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/98
104
27642
228669
117082
2026-03-26T09:48:21Z
कल्पनाशक्ती
3813
228669
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Punekar Yashashree" /></noinclude>
'''‘अक्षरधारा' घरोघरी'''

{{gap}}मराठी समाज मानसात अक्षरांचं प्रेम नवं नाही. संत तुकाराम, ज्ञानेश्वर, रामदास, बहिणाबाई सर्वांनी शब्दांचं महात्म्य प्रत्येक मराठी मनात कोरलं आहे. 'आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करू।।' म्हणत तुकारामांनी जागवलेला शब्ददीप नंदादीपासारखा आजही तेवत राहतो त्याचा आनंद काय वर्णावा? मराठी घरा-घरांत पुस्तक नेण्याचं ऐतिहासिक कार्य ढवळे ग्रंथयात्रेनं केलं. आज तेच कार्य ‘अक्षरधारा ग्रंथयात्रा करत आहे. ‘अक्षरधारा' ग्रंथयात्रेच्या प्रवासास बारा वर्षे परवा १३ ऑक्टोबर २००६ ला पूर्ण झाली. त्यानिमित्त ही ‘अक्षरधारा' तपपूर्तीचा आनंद ‘माय मराठी शब्दोत्सव' योजून साजरा करत आहे. त्या शब्दोत्सवाचा आज समारोप होत असताना ‘अक्षरधारा'स लक्ष लक्ष शुभेच्छा द्यायला हव्यात.
{{gap}}कोल्हापुरात या ग्रंथयात्रेचे सुवर्णमहोत्सवी प्रदर्शन झाले. सांगलीत अमृतमहोत्सवी. आज पुण्यात ही ग्रंथयात्रा द्विशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (२५० वे) प्रदर्शन भरवत आहे. हे यश मराठी माणसाच्या दिवसेंदिवस साक्षर, शिक्षित नि सुशिक्षित होत जाण्याची चढती भाजणी सिद्ध करते. आज मराठी घरात शोकेसमध्ये मराठी क्लासिक्स् दिवाणखान्यांची शोभा वाढवत आहेत. घरोघरी वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर यांचं एक तरी पुस्तक असतं. याचा अभिमान वाटतो तसा वाढतोही आहे.
{{gap}}अरे छापीसनी आलं, मानसाले समजलं। छापीसनी जे राह्यलं, देयालेच उमगलं ॥{{nop}}<noinclude>{{center| जाणिवांची आरास/९७}}</noinclude>
2swdsht4adikcxx6l8a2s3ts04086jz
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/99
104
27643
228670
117083
2026-03-26T09:49:05Z
कल्पनाशक्ती
3813
228670
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Punekar Yashashree" /></noinclude>{{gap}}म्हणणारी जीवनवादी बहिणाबाई अत्याधुनिक खरी! ती अमेरिकेपुढे होती. आज अमेरिकन संस्कृतीचं ब्रीद आहे. 'Perish or Publish' (जगायचं असेल तर स्वतःस प्रकाशित करत रहा.) जे छापलं जातं ते माणसांपर्यंत पोहोचतं. अन्यथा ते तुमच्यापर्यंत राहतं. जे छापलं जातं ते वाचलं जातं. जे वाचलं जातं त्याचा संस्कार होतो. संस्कारातूनच संस्कृती घडते. त्याचं भान आल्यामुळे मराठी माणूस आपले व्यवहार वेगाने बदलत असल्याचं मी पाहतो. तो लग्नात पाच भांडी देण्यापेक्षा पाच पुस्तकं भेट देण्याइतका प्रगल्भ झाला आहे. दिवाळी भेटीच्या रूढ कल्पनाही बदलत आहेत. मराठी भाऊ आपल्या बहिणीला वि. स. खांडेकरांचा कथासंग्रह ‘भाऊबीज' भेट म्हणून चकचकीत कागदाच्या लखलखीत वेष्ठनात देतो तेव्हा भाऊराया सुजाण झाल्याचं तेज मराठी बहिण्याच्या डोळ्यांत चमकत नीती धन्य होते. नव श्रीमंत मित्र-मैत्रिणी एकमेकाला गुळगुळीत शुभेच्छाकार्डे मागे सारून 'मृत्युंजय', 'स्वामी', 'ययाती', 'पु. ल. एक साठवण', 'विशाखा', संभाजी', 'तणकट' भेट देतात तेव्हा येथली श्रीमंती नुसती सेंटेड राहिली नाही. ती संस्कार सुगंधाच्या उटण्यानी अंग अंग गंधगर्भ करू इच्छिते हे लक्षात येतं. मराठी उद्योगपती मिठाईचे पुडे न वाटता ‘फिटे अंधाराचे जाळे', 'चाकाची खुर्ची', ‘खाली जमीन, वर आकाश' सारखी आत्मकथनं दिवाळी भेट म्हणून पाठवतो तेव्हाही लक्षात येतं की इथं जपानसारखाच श्रीमंतीस शालीन करण्याचा परिपाठ रुजतो आहे. हे सारं केवळ आर्थिक समृद्धीनं घडलं नाही. इथली मराठी आई सुशिक्षित झाली. तिनं आपल्या बाळाच्या वाढदिवसादिवशी गोळ्या, चॉकलेट वाटण्याऐवजी पेन्सिल, पेन, वह्या, पुस्तके भेट देण्याचा संस्कार घरोघरी रूजवला आहे.

{{right|{{xx-larger|'''***'''}}}}<noinclude>
{{center |जाणिवांची आरास/९८}}</noinclude>
erw9nbyntchauuevo172dcdh212plwu
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/106
104
27650
228671
117091
2026-03-26T09:50:39Z
कल्पनाशक्ती
3813
228671
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Punekar Yashashree" /></noinclude>'''मारीच आणि माणूस'''

{{gap}} कोल्हापूरचा देवल क्लब हा इथल्या संगीत, नृत्य, नाट्य, गायन, वादनादी कलांचे केंद्र, नाटककार गोविंद बल्लाळ देवलांनी आपल्या 'शारदा' या सामाजिक नाटकाची मराठी प्रेक्षकांना मोहिनी घातली. त्यामुळे कन्या-जरठ विवाह इथून हद्दपार झाला. त्यांच्या नाटकांनी प्रभावित होऊन तत्कालीन नाट्यरसिकांनी संगीत आणि नाटकांच्या वाढी-विकासासाठी सांगली, कोल्हापूर, इथे देवल क्लबची स्थापना केली. आज हा क्लब प्रभाकर वर्तक यांच्यासारख्या समर्पित संगीतप्रेमींच्या धडपडीमुळे या भौतिक शतकातही नाटक, संगीत जिवंत राहावं म्हणून सतत प्रयत्नशील आहे. प्रभाकर वर्तकांची सूत्रधार म्हणून असलेली भूमिका परवा देवल क्लबने सादर केलेल्या ‘मारीच' नाटकाने ठळकपणे अधोरेखित केली. त्यांचं नि क्लबचे अभिनंदन अशासाठी की त्यांनी आज मारीच होऊ पाहणाऱ्या माणसास जागं केलं.
{{gap}}वाल्मिकी रामायणातील एक राक्षसी, मायावी पात्र म्हणून मारीच प्रसिद्ध आहे. याच मारीचानं सीताहरणासाठी रावणास मदत केली. तो मायावी होता. त्याला तपसिद्धीमुळे अलौकिक शक्ती प्राप्त झाली होती. त्यानं कांचनमृगाचं रूप धारण केलं नि कपटी रावणास साहाय्य केलं. त्या मारीचास माणूस होण्याचं विलक्षण आकर्षण होतं, पण त्याची मतिभ्रष्टता त्याला नडली व तो रामाच्या हातून मारला गेला. सर्व उपनिषदे, पुराण, वेद, रामायण, महाभारत आदी प्राचीन ग्रंथ म्हणजे बोधकथा, मिथकांचा खजिनाच! या सर्व कथा नि पात्रं कालजयी, अमर झाली ती त्यांच्यातील सार्वकालिक सत्यामुळे. प्राचीन साहित्यातील कोणतीही कथा, पात्र आजच्या<noinclude>{{center|जाणिवांची आरास/१०५}}</noinclude>
fcz4xn7fpl0gpq1ez75fxmekaqxm2np
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/107
104
27651
228672
117092
2026-03-26T09:51:12Z
कल्पनाशक्ती
3813
228672
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Punekar Yashashree" /></noinclude>घडीला ‘प्रसंग सार्थक' वाटतात, ती त्यांच्यातील जीवनवेधी हेतुमुळे! ‘मारीच' नाटक लक्ष्यवेधी ठरतं ते आजच्या काळाची प्रतिमा हबेहूब उभा करतं म्हणून. नाटक हा मुळात एक खेळ आहे. नाटक करणं, बसवणं, हे कृत्रिम असतं. बंगालीत ‘नाटक खेलबो' म्हणतात. पूर्वी नाटकांचे 'खेळ' व्हायचे. आज ‘शो' होतात. नाटकातील कलाकारांचं भूमिका वठवणं वेगळं नि ‘जगणं' वेगळे. डॉ. श्रीराम लागूंनी केलेली नटसम्राटाची भूमिका, निळू फुले यांनी ‘सूर्यास्त'मधील वठविलेली मुख्यमंत्र्यांच्या स्वातंत्र्यसैनिक असलेल्या वडिलांची भूमिका, ‘फुलराणी'मधील भक्ती बर्वेची भूमिका ही सारी भूमिका जगण्याची उदाहरणं होत. परवाच्या ‘मारीच' मध्येही प्रभाकर वर्तकांची ‘जादुगार', दिलीप बापटांची 'रावण', सिनेटरची केलेली भूमिका ही ‘जगणं' या मालिकेचा विस्तार होय. नाटकाचा संबंध प्रत्यक्ष जगण्याशी तेव्हा येऊन भिडतो, जेव्हा ते ज्वलंत, समकालीन समस्यांचे भाष्य नि माणसांचं भविष्य होतं. आज जीवनाच्या सर्वच क्षेत्रात वेगवेगळ्या महासत्ता प्रस्थापित होत आहेत. त्यात सामान्य माणूस उद्ध्वस्त होतो आहे. व्यवहार विवेकास पराभूत करतो आहे. अर्थसत्ता हे यशाचं प्रबळ साधन होऊ पाहणाऱ्या आजच्या काळात माणसाचं ‘मारीचीकरण' सुरू झालंय. अमेरिका राजकीय सत्ता झाली. डॉलर हा पर्यायी पैसा झाला. कट-कारस्थान, युद्ध, गनिमीकावा, कांगावाखोरांची चलती, बुरखाधाऱ्यांची चंगळ, असा एक मायावी बाजार थाटला जातोय. ‘माया म्हणजेच जग आणि जगणं' असं समीकरण रूढ होऊ पाहात असताना अल्पभूधारकांसाठी मोहन धारिया, धरणग्रस्तांसाठी मेधा पाटकर, कुष्ठरोग्यांसाठी बाबा आमटे जेव्हा जिवाचं रान करतात तेव्हाच जगाच्या मारीचीकरणास वेसण घातली जाते. या जगात विवेक जागा राहतो तो काळापुढे पाहणारी काही माणसं, संस्था, चळवळी असतात म्हणून! पैसा परमेश्वर नव्हे. अन्यायाच्या राज्याचाही अंत असतो. तुम्हास सर्वकाळ सर्वांना फसवता येत नाही. सारखं जीवन वास्तव साहित्य, कला, संगीत लक्षात आणून देतं. म्हणून माणसाचा मारीच होऊ द्यायचा नसेल तर यंत्रांची घरघर चालू ठेवत सतारीचा झंकार ऐकण्याची व नृत्यनाटकं पाहण्याची उसंत माणसांनी जपली पाहिजे.
{{right|{{xx-larger|'''***'''}}}}{{nop}}<noinclude>{{center|जाणिवांची आरास/१०६ }}</noinclude>
o5s47sn1xfsaeqyjx0yi0h5ynxj343m
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/120
104
27664
228673
91249
2026-03-26T09:53:45Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
228673
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

{{center|{{x-larger|'''अनुभव'''}}}}

{{nop}}<noinclude>{{center|जाणिवांची आरास/११९}}</noinclude>
sy5o2a5pu1j5bjo6vdhfgmlndyp2hr6
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/121
104
27665
228674
91248
2026-03-26T09:54:32Z
कल्पनाशक्ती
3813
/* मजकुराविना */
228674
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="0" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><noinclude>{{center|जाणिवांची आरास/१२०}}</noinclude>
gr3efj5az5xlv6c319kn6g3n603hvws
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/123
104
27667
228675
77255
2026-03-26T09:55:50Z
कल्पनाशक्ती
3813
228675
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कबचौउमवि अंकुश जाधव" /></noinclude>भांडवलशाहीतून येणारा गतिमान विकास व समाजवादातून येणारं समाजस्वास्थ्य यांचा मेळ घालणारं नवं तत्त्वज्ञान एकविसावं शतक मागत
आहे. असं नवं वारं जो विचार व व्यवहार देऊ शकेल, अशा नव्या विचारधारेची जनता वाट पाहते आहे.

{{gap}}अंधेरीतील दंडाधिकारी न्यायालयाने आपल्या नव्या निकालानेही हेच अधोरेखित केले आहे. सन १९७५ नंतर जगभर स्त्री न्यायविषय समाजमन तयार झाले. त्यातून अनेक कुटुंब, बाल, महिला कायदे, आयोग योजना आल्या. आपणास झुकते माप मिळते म्हणून कोणी महिला पुरुषांविरुद्ध कुभांड रचत असेल तर तर्कसंगत जसे नाही तसे न्यायसंगतही नाही. न्याय आंधळा, पण न्यायाधीश डोळस असतात. कायद्याचा वापर विवेकाने करणे आवश्यक असते. सरसकट एकाच प्रकारची निकालपत्रे द्यायला न्यायाधीश कशाला हवेत? एटीएमसारखी यंत्रे व यंत्रमानव ती कामे करतील. निवाडा हा मुळात एक सजीव, संवेदी प्रक्रिया आहे. साक्षेपी न्यायाधीशच ती पाळू शकतात. त्यामुळेच न्यायाच्या राज्यावरचा लोकविश्वास वाढत राहील.

{{gap}}समाजस्वास्थ्य व सामाजिक न्याय या एकविसाव्या शतकातील दोन अशा मानवी गरजा आहेत की, त्याबाबतचा विचार विवेकी व विकास याचा तोल सांभाळत केला गेला पाहिजे. क्षणिक व गतिमान विकास आणि चिरस्थायी विकास यातील अंतर समजावून घेऊन मनुष्य समाजाच्या अंतिम कल्याणाचा विचार हा सर्वतोपरी हे विसरून चालणार नाही. नवे वारे नवं पर्यावरण घेऊन येतात, तशी नवी संस्कृतीही. स्थलांतरित पक्षी जसे सतत निरामय निसर्गाच्या शोधात असतात, तसं माणसानं निरामय समाज जीवनाचं निरंतर ध्यास घेऊन शोधक, चिकित्सक राहायला हवं. गतानुगतिक राहणं जसं धोक्याचं असतं तसं मृगजळामागे गतिमान धावणेही! कोणतेही नवे बदल, विचार हे क्षणिक सुख, सोयीसाठी स्वीकारू नये.
{{right|■ ■}}{{nop}}<noinclude>{{center |जाणिवांची आरास/१२२}}</noinclude>
nks40ceewpp5c5b5pyfwffveqnw54kj
228677
228675
2026-03-26T09:57:23Z
कल्पनाशक्ती
3813
228677
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कबचौउमवि अंकुश जाधव" /></noinclude>भांडवलशाहीतून येणारा गतिमान विकास व समाजवादातून येणारं समाजस्वास्थ्य यांचा मेळ घालणारं नवं तत्त्वज्ञान एकविसावं शतक मागत
आहे. असं नवं वारं जो विचार व व्यवहार देऊ शकेल, अशा नव्या विचारधारेची जनता वाट पाहते आहे.

{{gap}}अंधेरीतील दंडाधिकारी न्यायालयाने आपल्या नव्या निकालानेही हेच अधोरेखित केले आहे. सन १९७५ नंतर जगभर स्त्री न्यायविषय समाजमन तयार झाले. त्यातून अनेक कुटुंब, बाल, महिला कायदे, आयोग योजना आल्या. आपणास झुकते माप मिळते म्हणून कोणी महिला पुरुषांविरुद्ध कुभांड रचत असेल तर तर्कसंगत जसे नाही तसे न्यायसंगतही नाही. न्याय आंधळा, पण न्यायाधीश डोळस असतात. कायद्याचा वापर विवेकाने करणे आवश्यक असते. सरसकट एकाच प्रकारची निकालपत्रे द्यायला न्यायाधीश कशाला हवेत? एटीएमसारखी यंत्रे व यंत्रमानव ती कामे करतील. निवाडा हा मुळात एक सजीव, संवेदी प्रक्रिया आहे. साक्षेपी न्यायाधीशच ती पाळू शकतात. त्यामुळेच न्यायाच्या राज्यावरचा लोकविश्वास वाढत राहील.

{{gap}}समाजस्वास्थ्य व सामाजिक न्याय या एकविसाव्या शतकातील दोन अशा मानवी गरजा आहेत की, त्याबाबतचा विचार विवेकी व विकास याचा तोल सांभाळत केला गेला पाहिजे. क्षणिक व गतिमान विकास आणि चिरस्थायी विकास यातील अंतर समजावून घेऊन मनुष्य समाजाच्या अंतिम कल्याणाचा विचार हा सर्वतोपरी हे विसरून चालणार नाही. नवे वारे नवं पर्यावरण घेऊन येतात, तशी नवी संस्कृतीही. स्थलांतरित पक्षी जसे सतत निरामय निसर्गाच्या शोधात असतात, तसं माणसानं निरामय समाज जीवनाचं निरंतर ध्यास घेऊन शोधक, चिकित्सक राहायला हवं. गतानुगतिक राहणं जसं धोक्याचं असतं तसं मृगजळामागे गतिमान धावणेही! कोणतेही नवे बदल, विचार हे क्षणिक सुख, सोयीसाठी स्वीकारू नये.

{{right|■ ■}}{{nop}}<noinclude>{{center |जाणिवांची आरास/१२२}}</noinclude>
3y5pgpchzlup7m0bqro0kxn1zf6qavi
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/124
104
27668
228676
77248
2026-03-26T09:56:36Z
कल्पनाशक्ती
3813
228676
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कबचौउमवि अंकुश जाधव" /></noinclude>
'''नॅनोचं वादळ'''

{{gap}}टाटाची 'नॅनो' मोटार गाडी बाजारात आली. तिनं मोटारीच्या बाजारात जसं एक नवं वादळ आणलं तसं सामान्यांच्या मनातही तिनं नवं स्वप्नवादळ निर्माण केलं आहे. 'नॅनो'मुळे बाजारात अशाच लहान मोटारींचा सुळसुळाट होणार हे उघड आहे. 'मारूती'मुळे भारतात छोट्या गाड्यांचं युग सुरू झालं. त्यामुळे मोटार ही मोठ्यांची मिरासदारी न राहता सामान्य मध्यमवर्गीयांच्या ती आवाक्यात आली. तरी ती किमतीच्या अंगाने उच्चवर्गीयांचीच राहिली. नॅनोमुळे शिक्षक, लेखनिक, पोलीस, कनिष्ठ अभियंते, प्रोग्रामर असे निम्नमध्यवर्गीय मोटारमालक होतील हे उघड आहे. दोनचाकीची जागा चारचाकी घेणार हे नवे सामाजिक प्रश्न निर्माण होणार हे सांगायला कुणा भविष्यवेत्त्याची गरज नाही.
{{gap}}तिच्यामुळे रस्ते, पार्किंग, प्रदूषण, मोटारींच्या किमतीचे युद्ध, पेट्रोलचा प्रश्न अशा समस्या निर्माण होतील. सध्याचे आपल्या शहरातील गावातील रस्ते इतके अरुंद आहेत की गावच्या लोकसंख्येनुसार गावातील रस्त्यांची रुंदी, लांबी, वळणे, कुंपणांची उंची, दुभाजक, पादचारी मार्ग याबाबत राष्ट्रीय धोरण व नियोजनाचा प्रश्न वादळाचे रूप धारण करील. मी या मोटारींचा विरोधक नाही. पण मोटारींची संभाव्य वाढती संख्या लक्षात घेता रस्त्यांचे नियोजन हा कळीचा मुद्दा बनेल.
{{gap}}दुसरा प्रश्न वाहतुकीची कोंडी आणि त्यातून होणारी दिरंगाई हा असेल. जुन्या रस्त्यांच्या रुंदीकरणाबरोबर उपनगरातील व नव्या वसाहतीतील रस्त्यांची रुंदी आत्ताच वाढवली पाहिजे. रस्त्यांवर दुभाजक, नियंत्रक, सिग्नल,<noinclude>{{center |जाणिवांची आरास/१२३ }}</noinclude>
nn50zppow2cf1qp1r7sup0wu4rily9u
228678
228676
2026-03-26T09:57:48Z
कल्पनाशक्ती
3813
228678
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कबचौउमवि अंकुश जाधव" /></noinclude>

'''नॅनोचं वादळ'''

{{gap}}टाटाची 'नॅनो' मोटार गाडी बाजारात आली. तिनं मोटारीच्या बाजारात जसं एक नवं वादळ आणलं तसं सामान्यांच्या मनातही तिनं नवं स्वप्नवादळ निर्माण केलं आहे. 'नॅनो'मुळे बाजारात अशाच लहान मोटारींचा सुळसुळाट होणार हे उघड आहे. 'मारूती'मुळे भारतात छोट्या गाड्यांचं युग सुरू झालं. त्यामुळे मोटार ही मोठ्यांची मिरासदारी न राहता सामान्य मध्यमवर्गीयांच्या ती आवाक्यात आली. तरी ती किमतीच्या अंगाने उच्चवर्गीयांचीच राहिली. नॅनोमुळे शिक्षक, लेखनिक, पोलीस, कनिष्ठ अभियंते, प्रोग्रामर असे निम्नमध्यवर्गीय मोटारमालक होतील हे उघड आहे. दोनचाकीची जागा चारचाकी घेणार हे नवे सामाजिक प्रश्न निर्माण होणार हे सांगायला कुणा भविष्यवेत्त्याची गरज नाही.
{{gap}}तिच्यामुळे रस्ते, पार्किंग, प्रदूषण, मोटारींच्या किमतीचे युद्ध, पेट्रोलचा प्रश्न अशा समस्या निर्माण होतील. सध्याचे आपल्या शहरातील गावातील रस्ते इतके अरुंद आहेत की गावच्या लोकसंख्येनुसार गावातील रस्त्यांची रुंदी, लांबी, वळणे, कुंपणांची उंची, दुभाजक, पादचारी मार्ग याबाबत राष्ट्रीय धोरण व नियोजनाचा प्रश्न वादळाचे रूप धारण करील. मी या मोटारींचा विरोधक नाही. पण मोटारींची संभाव्य वाढती संख्या लक्षात घेता रस्त्यांचे नियोजन हा कळीचा मुद्दा बनेल.
{{gap}}दुसरा प्रश्न वाहतुकीची कोंडी आणि त्यातून होणारी दिरंगाई हा असेल. जुन्या रस्त्यांच्या रुंदीकरणाबरोबर उपनगरातील व नव्या वसाहतीतील रस्त्यांची रुंदी आत्ताच वाढवली पाहिजे. रस्त्यांवर दुभाजक, नियंत्रक, सिग्नल,<noinclude>{{center |जाणिवांची आरास/१२३ }}</noinclude>
svfioqrbq5y815m46n49g058u8679hd
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/126
104
27670
228679
74912
2026-03-26T09:59:38Z
कल्पनाशक्ती
3813
228679
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कबचौउमवि भूषण कुलकर्णी" /></noinclude>वा लक्षवेधी नाही यासंदर्भात युरोपचा आदर्श घ्यायला हवा. आपली व्यवस्थापनाइतकेच ते आपत्तीपूर्व नियोजनावर कार्य, संशोधन करतात.
{{gap}}मोटार हे प्रतिष्ठेचे प्रतीक न राहता उपयोगी साधन गतिमान दळणवळणाचे सुखद उपकरण म्हणून ते विकसित होणार आहे, हे लक्षात घेऊन योजना हवी पार्किंगचा प्रश्न बिकट होणार आहे. त्यामुळे त्यासंदर्भात नवे धोरण त्वरितं अगिकारावे लागेल.
{{gap}}रस्ता चालणाऱ्याचा की चालवणाच्याचा असे एक नवे वैचारिक, सामाजिक, आर्थिक प्रश्न उभा करणारे वादळ घेऊन येणारी 'नॅनो' ही नव्या सामाजिक, आर्थिक वादळाचीही नांदी ठरणार हे उघड आहे. म्हणून आपण आता सिंगापूर, जपान, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशातील कायद्यांच्या निर्मितीची प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे. तिथे कायद्यातच सुविधा व सेवाचा अंतर्भाव असतो, आपल्याकडे पण तसे व्हायला हवे.
{{right|■ ■}}{{nop}}<noinclude>{{center|जाणिवांची आरास/१२५}}</noinclude>
gj8sl3xoyq545cp8jbievybhlh7edz5
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/127
104
27671
228680
72597
2026-03-26T10:01:47Z
कल्पनाशक्ती
3813
228680
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कबचौउमवि भूषण कुलकर्णी" /></noinclude>'''राजकारणमुक्त गाव'''

{{gap}}गेल्या आठवड्यात महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रम शिबिराच्या निमित्ताने सांगवडे गावी पुन्हा जाण्याचा योग आला. या गावात याच निमित्ताने आठ-दहा वर्षापूर्वी गेलो होतो. त्यावेळी गावचे जे दृश्य मी पाहिले होते ते पाहून गाव हागणदारीमुक्त व्हायला पाहिजे असं मी आग्रहाने सांगितले होते. त्यावेळी लोक हसले होते. कुणी ते फारसं मनावर घेतलं नव्हतं. आता निर्मलग्राम योजनेचा शासनाचा रेटा आहे. अनुदान बंद होणार, वीज तोडली जाणार, पाणीपुरवठा बंद होणार या भीतीने ग्रामपंचायत व ग्रामस्थ जागे झालेत. थोड्या दिवसात हे गाव
निर्मलग्राम बनेल असा माझा विश्वास आहे.
{{gap}}भारतातील खेड्यांचा विचार करत असताना मला नेहमी महात्मा गांधींचं एक वाक्य आठवतं. ते म्हणाले होते, ‘तुम्हाला खरा भारत पहायचाआहे ना? मग एखादं खेडे पहा.' आज खेडी बदलत आहेत. ती निर्मलग्राम होत आहेत. तंटामुक्त गाव होण्याच्या दिशेने त्यांची धडपड आहे. पंतप्रधान सडक सुधार योजनेतून रस्ते होत आहेत. त्यांना ‘जलस्वराज्य' लाभत आहे. ती ‘बिमा ग्राम' होत आहेत. महिला बचत गटांनी स्त्रियांच्या हातात अर्थसत्ता नेण्यास सुरुवात केली आहे. दुधाचा महापूर वाहतो आहे (दर मिळत नसला तरी!) सर्व शिक्षण अभियानातून साक्षरता वाढते आहे. इंदिराआवास योजनेतून भूमिहिनांना घरकुले लाभत आहेत. हे सारं एकीकडे होत असताना दुसरीकडे राजकारणाने गावाला पोखरून टाकलं आहे.
{{gap}}‘गाव सारं टग्यांचं, बघ्यांचं' असं एका लावणीतील वर्णन सार्थ करणारा खेड्यांचा चेहरा हा आजचा खरा चिंता आणि चिंतनाचा प्रश्न<noinclude>{{center|जाणिवांची आरास/१२६}}</noinclude>
dko4nr5fd8xqnys0dpd8w0a4yrr3hxo
228681
228680
2026-03-26T10:02:16Z
कल्पनाशक्ती
3813
228681
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कबचौउमवि भूषण कुलकर्णी" /></noinclude>'''राजकारणमुक्त गाव'''

{{gap}}गेल्या आठवड्यात महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रम शिबिराच्या निमित्ताने सांगवडे गावी पुन्हा जाण्याचा योग आला. या गावात याच निमित्ताने आठ-दहा वर्षापूर्वी गेलो होतो. त्यावेळी गावचे जे दृश्य मी पाहिले होते ते पाहून गाव हागणदारीमुक्त व्हायला पाहिजे असं मी आग्रहाने सांगितले होते. त्यावेळी लोक हसले होते. कुणी ते फारसं मनावर घेतलं नव्हतं. आता निर्मलग्राम योजनेचा शासनाचा रेटा आहे. अनुदान बंद होणार, वीज तोडली जाणार, पाणीपुरवठा बंद होणार या भीतीने ग्रामपंचायत व ग्रामस्थ जागे झालेत. थोड्या दिवसात हे गाव निर्मलग्राम बनेल असा माझा विश्वास आहे.
{{gap}}भारतातील खेड्यांचा विचार करत असताना मला नेहमी महात्मा गांधींचं एक वाक्य आठवतं. ते म्हणाले होते, ‘तुम्हाला खरा भारत पहायचाआहे ना? मग एखादं खेडे पहा.' आज खेडी बदलत आहेत. ती निर्मलग्राम होत आहेत. तंटामुक्त गाव होण्याच्या दिशेने त्यांची धडपड आहे. पंतप्रधान सडक सुधार योजनेतून रस्ते होत आहेत. त्यांना ‘जलस्वराज्य' लाभत आहे. ती ‘बिमा ग्राम' होत आहेत. महिला बचत गटांनी स्त्रियांच्या हातात अर्थसत्ता नेण्यास सुरुवात केली आहे. दुधाचा महापूर वाहतो आहे (दर मिळत नसला तरी!) सर्व शिक्षण अभियानातून साक्षरता वाढते आहे. इंदिराआवास योजनेतून भूमिहिनांना घरकुले लाभत आहेत. हे सारं एकीकडे होत असताना दुसरीकडे राजकारणाने गावाला पोखरून टाकलं आहे.
{{gap}}‘गाव सारं टग्यांचं, बघ्यांचं' असं एका लावणीतील वर्णन सार्थ करणारा खेड्यांचा चेहरा हा आजचा खरा चिंता आणि चिंतनाचा प्रश्न<noinclude>{{center|जाणिवांची आरास/१२६}}</noinclude>
8autiz03bxoijanm2811rv0wsutm1ha
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/128
104
27672
228682
72377
2026-03-26T10:03:31Z
कल्पनाशक्ती
3813
228682
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कबचौउमवि भूषण कुलकर्णी" /></noinclude>बनला आहे. वाढत्या माध्यम प्रभाव व प्रसारामुळे वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्यांनी गाव ग्रासलेली आहेत. पूर्वी गाव एक पक्षीय होतं. बहुपक्षीय लोकशाही समृद्ध खरी. पण गावात वाढणाच्या पुढा-यांच्या संख्या व प्रभावामुळे तरुणाई राजकारणाच्या नादी लागल्याचं चित्र आहे. शहरात वा गावात पुढा-यांच्या मागे धावणाच्या तरुणांचे तांडे माझ्यासारख्या शिक्षक, कार्यकर्त्यास अस्वस्थ करतात. पूर्वीही राजकारण्यांच्या मागे तरुणांचे तांडे, जत्थे होते. महात्मा गांधींच्या मागेपण होते. पण त्यामागे ध्येय होतं. ध्यास होता. विचार होता आज तसे चित्र नाही. तरूण पदवीधर बेरोजगार आहेत. शेतीशी त्यांची असलेली नाळ व नातं तुटत आहे. व्यवसायापेक्षा नोकरी बरी असा जनमताचा कौल झुकतो आहे. डेअरी, सोसायटी, शाळा, कॉलेज, साखर कारखाने, पतसंस्था या सर्व गावच्या प्रभावी राजकीय कार्यकत्र्यांच्या हाती आहेत. तरुणांचे तांडे त्यांच्या मागे फिरण्यामागे नोकरीचं मृगजळ आहे. निराशेनं वैफल्यग्रस्त होणारे तरूण व्यसनाधीन होत आहे. छानछोकी राहणी, ढाब्यांवरची भोजनावळ, टारसायकलवरच्या त्रिकुटांच्या सफरी, सटर फटर कारणासाठी गेल्या आठवड्यात महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा विशेष श्रम शिबिराच्या निमित्ताने सांगवडे गावी पुन्हा जाण्याचा योग आला या गावात याच निमित्ताने आठ-दहा वर्षांपूर्वी गेलो होतो. त्या वेळी गावचे जे दृष्य मी पाहिले होते ते पाहून गाव हागणदारीमुक्त व्हायला पाहिजे असे मी आग्रहाने सांगितले होते. त्या वेळी लोक हसले होते. कुणी ते फारस मनावर घेतलं नव्हतं आता निर्मलग्राम योजनेचा शासनाचा रेटा आहे. अनुदान बंद होणार, वीज तोडली जाणार, पाणीपुरवठा बंद होणार या भीतीने ग्रामपंचायत व ग्रामस्थ जागे झालेत. थोड्या दिवसात हे गाव निर्मलग्राम बनेल असा मला विश्वास आहे.
{{gap}}भारतातील खेड्यांचा विचार करत असताना मला नेहमी महात्मा गांधीचं एक वाक्य आठवतं ते म्हणाले होते, ‘तुम्हाला खरा भारत पाहायचा आहे ना? मग एखादं खेड पाहा' आज खेडी बदलत आहेत. ती निर्मलग्राम होत आहेत. तंटामुक्त गाव होण्याच्या दिशने त्याची धडपड आहे. पंतप्रधान सडक सुधार योजनेतून रस्ते होत आहेत. त्यांना ‘जलस्वराज्य' लाभत आहे. ती ‘बिमा ग्राम' होत आहेत. महिला बचत गटांनी स्त्रियांच्या हातात अर्थसता नेण्यास सुरुवात केली आहे. दुधाचा महापूर वाहतो आहे. (दर मिळत नसला तरी) सर्व शिक्षण अभियानातून साक्षरता वाढते आहे. इंदिरा आवास योजनेतून भूमिहिनांना घरकुले लाभत आहे. हे सारं एकीकडे होत असताना दुसरीकडे राजकारणाने गावाला पोखरून टाकलं आहे.{{nop}}<noinclude>{{center|जाणिवांची आरास/१२७}}</noinclude>
g0rp0lxpql7ajfc1q0d6xclbb1jr99g
228683
228682
2026-03-26T10:04:40Z
कल्पनाशक्ती
3813
228683
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कबचौउमवि भूषण कुलकर्णी" /></noinclude>बनला आहे. वाढत्या माध्यम प्रभाव व प्रसारामुळे वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्यांनी गाव ग्रासलेली आहेत. पूर्वी गाव एक पक्षीय होतं. बहुपक्षीय लोकशाही समृद्ध खरी. पण गावात वाढणाच्या पुढाऱ्यांच्या संख्या व प्रभावामुळे तरुणाई राजकारणाच्या नादी लागल्याचं चित्र आहे. शहरात वा गावात पुढाऱ्यांच्या मागे धावणाच्या तरुणांचे तांडे माझ्यासारख्या शिक्षक, कार्यकर्त्यास अस्वस्थ करतात. पूर्वीही राजकारण्यांच्या मागे तरुणांचे तांडे, जत्थे होते. महात्मा गांधींच्या मागेपण होते. पण त्यामागे ध्येय होतं. ध्यास होता. विचार होता आज तसे चित्र नाही. तरूण पदवीधर बेरोजगार आहेत. शेतीशी त्यांची असलेली नाळ व नातं तुटत आहे. व्यवसायापेक्षा नोकरी बरी असा जनमताचा कौल झुकतो आहे. डेअरी, सोसायटी, शाळा, कॉलेज, साखर कारखाने, पतसंस्था या सर्व गावच्या प्रभावी राजकीय कार्यकत्र्यांच्या हाती आहेत. तरुणांचे तांडे त्यांच्या मागे फिरण्यामागे नोकरीचं मृगजळ आहे. निराशेनं वैफल्यग्रस्त होणारे तरूण व्यसनाधीन होत आहे. छानछोकी राहणी, ढाब्यांवरची भोजनावळ, टारसायकलवरच्या त्रिकुटांच्या सफरी, सटर फटर कारणासाठी गेल्या आठवड्यात महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा विशेष श्रम शिबिराच्या निमित्ताने सांगवडे गावी पुन्हा जाण्याचा योग आला या गावात याच निमित्ताने आठ-दहा वर्षांपूर्वी गेलो होतो. त्या वेळी गावचे जे दृष्य मी पाहिले होते ते पाहून गाव हागणदारीमुक्त व्हायला पाहिजे असे मी आग्रहाने सांगितले होते. त्या वेळी लोक हसले होते. कुणी ते फारस मनावर घेतलं नव्हतं आता निर्मलग्राम योजनेचा शासनाचा रेटा आहे. अनुदान बंद होणार, वीज तोडली जाणार, पाणीपुरवठा बंद होणार या भीतीने ग्रामपंचायत व ग्रामस्थ जागे झालेत. थोड्या दिवसात हे गाव निर्मलग्राम बनेल असा मला विश्वास आहे.
{{gap}}भारतातील खेड्यांचा विचार करत असताना मला नेहमी महात्मा गांधीचं एक वाक्य आठवतं ते म्हणाले होते, ‘तुम्हाला खरा भारत पाहायचा आहे ना? मग एखादं खेड पाहा' आज खेडी बदलत आहेत. ती निर्मलग्राम होत आहेत. तंटामुक्त गाव होण्याच्या दिशने त्याची धडपड आहे. पंतप्रधान सडक सुधार योजनेतून रस्ते होत आहेत. त्यांना ‘जलस्वराज्य' लाभत आहे. ती ‘बिमा ग्राम' होत आहेत. महिला बचत गटांनी स्त्रियांच्या हातात अर्थसता नेण्यास सुरुवात केली आहे. दुधाचा महापूर वाहतो आहे. (दर मिळत नसला तरी) सर्व शिक्षण अभियानातून साक्षरता वाढते आहे. इंदिरा आवास योजनेतून भूमिहिनांना घरकुले लाभत आहे. हे सारं एकीकडे होत असताना दुसरीकडे राजकारणाने गावाला पोखरून टाकलं आहे.{{nop}}<noinclude>{{center|जाणिवांची आरास/१२७}}</noinclude>
7peuyiuaiy6s22rlxfwqnqb1ea3kzt8
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/129
104
27673
228684
72400
2026-03-26T10:11:30Z
कल्पनाशक्ती
3813
228684
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कबचौउमवि भूषण कुलकर्णी" /></noinclude>{{gap}}‘गाव सारं टग्यांचं' बघ्यांचं असं एका लावणीतील वर्णन सार्थ करणारा खेड्यांचा चेहरा हा आजचा खरा चिंता आणि चिंतनाचा प्रश्न बनला आहे. वाढत्या माध्यम प्रभाव व प्रसारामुळे वृत्तपत्रे वृावाहिन्यांनी गाव ग्रासलेली आहेत. पूर्वी गाव एक पक्षीय होतं. बहुपक्षीय लोकशाही समृद्ध खरी. पण गावात वाढणाच्या पुढाऱ्यांच्या संख्या व प्रभावामुळे तरुणाई राजकारणाच्या नादी लागल्याचे चित्र आहे. शहरात व गावात पुढाऱ्यांच्या मागे धावणाच्या तरुणाचे तांडे माझ्या सारख्या शिक्षक, कार्यकर्त्यास अस्वस्थ करतात. पूर्वीही राजकारण्यामागे तरुणांचे तांडे, जत्थे होते. महात्मा गांधीच्या मागेपण होते. पण त्यामागे ध्येय होतं. ध्यास होता. विचार होता. आज तसे चित्र नाही. तरुण पदवीधर बेरोजगार आहेत शेतीशी त्यांची असलेली नाळ व नातं तुटत आहे, व्यवसायापेक्षा नोकरी बरी असा जनमताचा कौल झुकतो आहे. डेअरी, सोसायटी, शाळा, कॉलेज, साखर कारखाने, पतसंस्था या सर्व गावच्या प्रभावी राजकीय कार्यकर्त्यांच्या हाती आहेत तरुणांचे ताडे त्यांच्या मागे फिरण्यामागे नोकरीचं मृगजळ आहे. निराशेनं वैफल्याग्रस्त होणारे तरुण व्यसनाधीन होत आहे. छानछोकी रहाणी, ढाब्यांवरची भोजनावळ, मोटरसायकरवरील त्रिकुटांच्या सफरी, सटरफटर कारणासाठी शहराकडे जाण्याची हौस यात ही सारी मंडळी मशगूल आहेत. शेती विकून नोकरीसाठी लाखो रुपये मोजायला एका पायावर तयार असलेल्या तरुणांना हे पैसे घेऊन तू एखादा व्यवसाय घर, नोकरीसाठी शेती विकण्यापेक्षा शेती कर, शेती किफायतशीर होण्यासाठी म्हणून काही प्रयोग कर म्हणणारे पुढारी, कार्यकर्ते खेड्यात औषधाला सापडत नाहीत. खेड्यातील शिक्षक प्राध्यापकांनी आपली नैतिकता व्यावसायिक बांधिलकी व्यासंग सोडल्यामुळे मार्गदर्शक म्हणून पूर्वीचा त्यांचा 'आब' इतिहासजमा झालाय.
{{gap}}अशावेळी गावातील ज्येष्ठ समाजधुरिणांनी राजकारणी गावाची मांडणी समाजकारणावर आधारित कारणे काळाची गरज आहे. पक्ष, गट, तट विसरून गावाच्या हिताच्या प्रश्नांवर एकवाक्यता, एकी, दिलजमाई गावचे केंद्र बदलून शाळा, ग्रंथालय, व्याख्यानमाला हे तरुणाई बदलाचं साधन म्हणून त्यांची राष्ट्रीय वृत्तीचे (राष्ट्रवादी नव्हे) समाजकेंद्री तरुण होण्यास वेळ लागणार नाही. या भूमिकाबदलचा स्वीकार अर्थातच आज राजकीय सत्ता हाती असलेल्या नेत्या, पुढाऱ्यांनीच केला पाहिजे. राव करतील तेच गाव करेल अशी आज स्थिती आहे.
{{right|■ ■}}{{nop}}<noinclude>{{center|जाणिवांची आरास/१२८}}</noinclude>
kxmy07cqwnva0wref4bk9l3zymxkta1
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/130
104
27674
228686
72594
2026-03-26T10:15:42Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
228686
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

'''मर्दानगी और कंडोम'''

{{gap}}जाहिरात प्रचार, प्रसार, प्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे खरे पण कधी कधी त्यातले तारतम्य हरवलेले दिसते. त्यामुळे अर्थाचा अनर्थ होतो. चुकीचा संदेश जातो. परवा मी स्कुटरवरून आयटी पार्कच्या जीवघेण्या रस्त्याने जात होतो. तेवढ्यात महापालिकेचा भरधाव मैलावाहू टँकर मागून पुढे गेला. मुळातच त्या रस्त्यावरून जाताना जीव मुठीत घेऊनच जावे लागते. अशात त्या टँकरचं असं अकारण भरधाव धावणं, त्यामुळे माझं धाबं दणाणलं. मनात मी काहीबाही पुटपुटत होतो. तेवढ्यात माझं लक्ष त्या टँकरमागं लिहिलेल्या कुटुंब नियोजनासंबंधी वाक्याकडं गेलं. 'मर्दानगी का इतना शौक है तो कंडोम का इस्तेमाल करो' असं काहीसं वाक्य होतं.
{{gap}}निरोध या गर्भनिरोधक साधनं, औषधे यांची जाहिरात लोकसंख्या कमी करण्याकडे कल वाढवणारी हवी. ती पुरुषार्थाचे उदात्तीकरण व स्त्रीचे खच्चीकरण करणारी असते. इतकेच नव्हे तर परस्त्री संबंध असणारच ही अटळ गोष्ट आहे असं या जाहिराती सूचित करतात, ही सामाजिकदृष्ट्या अत्यंत घातक गोष्ट आहे.
{{gap}}स्त्री-पुरुष संबंध ही एक नैसर्गिक क्रिया आहे. ती सामाजिक नीतिनियमांवर आधारलेली असली पाहिजे. हे संबंध समाजमान्य चौकटीत असले पाहिजेत. पण या जाहिराती विवाहपूर्व व विवाहबाह्य संबंधांचे गौरवीकरण करणाच्या तसेच नकळत समर्थन करणाच्या, प्रोत्साहन देणाऱ्या असतात. आजवर आपण त्यांच्याकडे फारशा गांभीर्याने पाहिले नसल्याने शरीरसंबंधातील आक्रमकता, हिंसा, अत्याचार वाढत आहेत.{{nop}}<noinclude>{{center|जाणिवांची आरास/१२९}}</noinclude>
tlgt9lna18rtqy99v8qi4kp8mq06fsn
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/131
104
27675
228687
72593
2026-03-26T10:19:31Z
कल्पनाशक्ती
3813
228687
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कबचौउमवि भूषण कुलकर्णी" /></noinclude>{{gap}}स्त्री-पुरुष संबंध एक सहज उद्गार आहे. तो काही केवळ पुरुषी आविष्कार नव्हे. खरं तर स्त्री-पुरुषांतील ताणतणाव कमी करण्याचं ते एक निमित्त आहे. तो काही ‘मर्दानगी का शौक (पुरुषार्थी छंद) नव्हे. त्यासाठी डब्ल्यू. डब्ल्यू. एफ कुस्ती आहे.
{{gap}}विवाहमान्य संबंधात संतती टाळण्याचं साधन, मूल होऊ न देण्याचा उपाय, मुलांतील अंतर वाढवायचा उपचार, गर्भधारणा रोखणारं साधन, लोकसंख्या नियंत्रित करण्याचा रामबाण उपाय ही तत्त्व गृहीत धरून या जाहिराती हव्यात. एका सरकारी जाहिरातीत मागं केव्हा तरी एस. टी. मागं लिहिलेलं असायचं की, 'जवानी की दिवानगी का उपाय.' खरं तर बचने का उपाय हवा. सामाजिक गांभीर्यानं लिहायचं तर 'जवानी मे दिवानगी बेवकूफी है।' (तारुण्यातील बेजबाबदारपणा मूर्खता आहे.) 'यौन संबंध जब जब, कंडोम तब तब' असं लिहून आपण यौन संबंध वाढवण्यास प्रोत्साहन देतो, हे आपल्या लक्षातच येत नाही, लिहायला असं हवं की, शक्यतो यौन संबंध टाळा, अटळ वाटल्यास निरोध वापरा. विवाहपूर्व व विवाहबाह्य संबंध अनैतिक आहेत. तो सामाजिक अपराध आहे त्यातून होणाच्या गर्भधारणेतून सामाजिक प्रश्न निर्माण होतात. त्यातून निर्माण होणारी गर्भधारणा, अपत्य सामाजिक अपराध ठरतो. गाफील क्षणांवर नियंत्रणाचा उपाय म्हणून संतती निरोधक साधने होत, अशा अंगाने प्रबोधनाचा उपाय म्हणून जाहिरातीकडे पाहायला हवं. आरोग्य खाते, कुटुंब नियोजन विभाग, संतती नियमनाची साधने खाते, कुटुंब नियोजन विभाग, संतती नियमनाची साधने निर्माण करणाऱ्या कंपन्या (कामसूत्र, माला डी, निरोध,आयपिल्स, ड्युरेक्स, मूडस्) यांनी आता 'मी तुला चंद्र दाखवतो म्हणालो होतो' असं सांगण्याऐवजी 'मी तुला म्हणालो होतो ना, आपले पाय कायम जमिनीवर हवेत!' म्हणायला शिकलं पाहिजे. लैंगिक संबंधातील भावसाक्षरता, स्त्री-पुरुष समानता, विवाहपूर्व व विवाहबाह्य संबंध : सामाजिक अपराध या अंगांनीच जाहिराती व्हायला हव्यात. आजवर आपण केवळ शारीरिक एड्सचाच विचार करत राहिल्याने आपला सामाजिक एड्स कोणत्या टोकाला जाऊन भिडला आहे, हे लक्षातच आले नाही. घरोघरी राम, सीता हवेत की। दुष्यन्त-शकुंतला? सती सावित्री हवी की विश्वामित्र? कर्ण-कुंती हवी की यशोधरा-राहुल?
{{right|■ ■}}{{nop}}<noinclude>{{center|जाणिवांची आरास/१३०}}</noinclude>
dovsn9facxmkgfq65ai0u0rr6bhmnhr
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/132
104
27676
228688
72592
2026-03-26T10:24:07Z
कल्पनाशक्ती
3813
228688
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कबचौउमवि भूषण कुलकर्णी" /></noinclude>

'''सुमारांची सद्दी'''

{{gap}}बदल हा सृष्टी नि समाजाचा अटळ घटक आहे. बदलाचा प्रारंभ कल्याणकारी भावनेतून विकासापर्यंत होतो. विकासानंतर विस्तार होतो. कारण त्यात बदलाची उर्मी नसते. विस्तार विकासाच्या गतीचा परिणाम सहज घडून येणारी एक प्रतिक्षिप्त क्रिया. मानवी समाजात या काळात सुमारांची सद्दी होते, दिसते. देशात सध्या ते दिसू लागलंय असा माझा अनुभव आहे.
{{gap}}‘मला शिकावंसं वाटत नाही' या लेखातून आजच्या शिक्षणविषयीचे वास्तव मी मांडलं होतं. वर्तमान समाजात सर्वत्र सुमारांच्या सद्दीचा सुकाळ हा आपल्या चिंता व चिंतनाचा विषय ठरावा असे मला वाटते. प्राथमिकपासून उच्च शिक्षणापर्यंत मनापासून येणाऱ्या व शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटते आहे. वर्गातील संख्येपेक्षा वर्गाबाहेरील विद्यार्थी संख्या काळजी करण्याइतकी मोठी आहे. शिकण्या व शिकवण्यातील आनंद, आकर्षण, ओढ, जिज्ञासा, उर्मी हरवल्याच्या नुसत्या 'पाऊलखुणा' नाहीत तर 'घसघशीत ठसे' दिसून येतात. जे शिक्षणाचं तेच चित्र समाजातील अन्य वर्ग व व्यवसायाचे दिसून येतं. पोलीस होण्यामागे कायद्याचे राज्य निर्माण करण्याची प्रेरणा नाही. 'काय द्यायचं' यावर लक्ष अधिक असं चित्र! इंजिनिअर, आर्किटेक्ट इमारती बांधतात. चार आडव्या-उभ्या रेषा मारणे म्हणजे आराखडे व रेखांकन झाले आहे. उपभोक्त्याची गरज, सोय, सुविधा या बाबत विचार करायला त्यांना वेळ नाही. मॅकॅनिककडे दुरुस्तीसाठी गाडी घेऊन जा. तो दुरुस्त करून देतो नि दुसऱ्याच दिवशी परत तक्रार निघते. डॉक्टरांचं औषध लागू पडेलच याची शाश्वती नाही. पूर्वविचार, निदान,<noinclude>{{center|जाणिवांची आरास/१३१}}</noinclude>
sjbiyijfilpzldcg0yng2elbv282mco
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/133
104
27677
228689
75093
2026-03-26T10:26:18Z
कल्पनाशक्ती
3813
228689
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कबचौउमवि भूषण कुलकर्णी" /></noinclude>संशोधन, वाचन यासाठी त्याला वेळ उरलाय कुठे? त्याला बँक, हप्ते, गुंतवणूक, गाडी, मुलांचं महागडं शिक्षण यातून उसंत आहे कुठे? प्रश्न आहे तो उपाय शोधण्याचा.
{gap}सुमारांच्या सद्दीचा सुकाळ हा विकासाचं विस्तारित (Enlarged) चित्र असतं. विकासात गुणवत्ता असते. विस्तारात नुसती संख्या वाढ असते. ती क्षणात शतपट होणारी असते. वारुळातून क्षणात येणाऱ्या मुंग्यांमुळे क्षणापूर्वी रिकामी असलेली जमीन या भिंत मुंग्यांनी भरून जाण्यातला अचंबा, आश्चर्य (खरं तर चमत्कार!) असतो. विश्वास न वाटणारा! यासाठी उपाय आहेत. गती कमी करणं... थबकणं... थोडं थांबून-मागे वळून पाहून... सावकाशीनं चालत राहणं!
{gap}एकविसावं शतक हे गतीचा शाप घेऊन जन्माला आलंय अशी सर्वत्र स्थिती आहे. इथं पळणारे रस्ते... जिने, लिफ्ट आहेत... माणसं त्यावरही जीवाच्या आकांताने पळताहेत... रस्ते रुंद कितीही करा... दुसऱ्याच दिवशी ते अरुंद वाटू लागावेत असा विकासाचा वेग आहे. नव्या काळाची गाणीही नवी हवी. सावध ऐका पुढच्या हाका, पळाला तो संपला' असं येणारं अरिष्ट आपण समजून घेतलं पाहिजे. थांबत चालावं. पहिलं पचलं की मग दुसरं खावं. शिकलेलं समजलं की नवं शिकावं. शिकलेल्यात गती, कौशल्य हाती आलं की नव्याला हात घालावा. पैसा साठू द्यावा. त्याला लगेच हापसा किंवा हप्ता लागणार नाही याची दक्षता घ्यावी. क्रांतीपेक्षा बदलाचा ध्यास हवा. क्रांती क्षणात येते नि जाते. बदल टिकतात. लोणच्याप्रमाणे. मुरल्याशिवाय उरत नाही, हे लक्षात असू द्या. हा माझा अनुभव. तुमचा?
{{right|■ ■}}
{{nop}}<noinclude>{{center|जाणिवांची आरास/१३२}}</noinclude>
m6j0cbw8hcykb1x02yfp4bz873tg07j
228690
228689
2026-03-26T10:26:53Z
कल्पनाशक्ती
3813
228690
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कबचौउमवि भूषण कुलकर्णी" /></noinclude>संशोधन, वाचन यासाठी त्याला वेळ उरलाय कुठे? त्याला बँक, हप्ते, गुंतवणूक, गाडी, मुलांचं महागडं शिक्षण यातून उसंत आहे कुठे? प्रश्न आहे तो उपाय शोधण्याचा.
{{gap}}सुमारांच्या सद्दीचा सुकाळ हा विकासाचं विस्तारित (Enlarged) चित्र असतं. विकासात गुणवत्ता असते. विस्तारात नुसती संख्या वाढ असते. ती क्षणात शतपट होणारी असते. वारुळातून क्षणात येणाऱ्या मुंग्यांमुळे क्षणापूर्वी रिकामी असलेली जमीन या भिंत मुंग्यांनी भरून जाण्यातला अचंबा, आश्चर्य (खरं तर चमत्कार!) असतो. विश्वास न वाटणारा! यासाठी उपाय आहेत. गती कमी करणं... थबकणं... थोडं थांबून-मागे वळून पाहून... सावकाशीनं चालत राहणं!
{{gap}}एकविसावं शतक हे गतीचा शाप घेऊन जन्माला आलंय अशी सर्वत्र स्थिती आहे. इथं पळणारे रस्ते... जिने, लिफ्ट आहेत... माणसं त्यावरही जीवाच्या आकांताने पळताहेत... रस्ते रुंद कितीही करा... दुसऱ्याच दिवशी ते अरुंद वाटू लागावेत असा विकासाचा वेग आहे. नव्या काळाची गाणीही नवी हवी. सावध ऐका पुढच्या हाका, पळाला तो संपला' असं येणारं अरिष्ट आपण समजून घेतलं पाहिजे. थांबत चालावं. पहिलं पचलं की मग दुसरं खावं. शिकलेलं समजलं की नवं शिकावं. शिकलेल्यात गती, कौशल्य हाती आलं की नव्याला हात घालावा. पैसा साठू द्यावा. त्याला लगेच हापसा किंवा हप्ता लागणार नाही याची दक्षता घ्यावी. क्रांतीपेक्षा बदलाचा ध्यास हवा. क्रांती क्षणात येते नि जाते. बदल टिकतात. लोणच्याप्रमाणे. मुरल्याशिवाय उरत नाही, हे लक्षात असू द्या. हा माझा अनुभव. तुमचा?
{{right|■ ■}}
{{nop}}<noinclude>{{center|जाणिवांची आरास/१३२}}</noinclude>
fkzfx7fa5llpvq3klf242vi3pdx3ru5
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/134
104
27678
228691
72613
2026-03-26T10:29:12Z
कल्पनाशक्ती
3813
228691
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कबचौउमवि भूषण कुलकर्णी" /></noinclude>

'''दैन्य हटविणारा अगस्ती'''

{{gap}}माणसं दोन प्रकारे जगत असतात, असा माझा अनुभव आहे. एक स्वतःसाठी जगणं आणि दुसच्यासाठी. दुसन्यासाठी जगणं यामागे दिव्य प्रेरणा, परहित भाव, ध्यास असतो. त्यासाठी तुम्हाला प्रलोभनांचा त्याग करावा लागतो. मोहाची अनेक वळणं ठिकाणं सोडावी लागतात. 'मी'च्या पलीकडे सतत विचार करावा लागतो. ही सोपी गोष्ट नसते. हे सारं आठवायचं कारण बाबा आमटे. ते नुकतेच आपल्यातून निघून गेले. त्यांनी केलेलं अनाथ, निराधार, अंध, कुष्ठपीडितांचं पुनर्वसन कार्य केवळ अभिनंदनीय नव्हतं तर अनुकरणीय होतं.
{{gap}}ऐन तारुण्यातील काही काळ मी त्यांच्या सहवासात घालवला आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून वीस वर्ष अनाथांचे पुनर्वसन व संगोपन कार्य मी केलं आहे. त्यांच्या कार्याची माहिती मला त्यांच्या पुनर्वसवन पद्धतीत आढळते. माणसाचं भीक मागणं ही काही स्वेच्छेची गोष्ट नसते. परिस्थिती माणसास लाचार बनवते. लाचारी ही त्याचा जीवन व जगण्याचा जाहीर पराभव असतो. असं जिवंत मरण जगणाच्या शेकडो माणसांना बाबा आमटे यांनी जगण्याचं बळ दिलं. हाताला काम दिलं. कामातून पैसे मिळाले. त्या पैशातून त्यांना त्यांच्या जगण्याचा पैस, आधार मिळाला.
{{gap}}महात्मा गांधी, विनोबा, मार्क्स, सानेगुरूजी, प्रॉमिथिअस हे त्यांचे आदर्श होते. परहितार्थ स्वतः झोकून देण्याची फकिरी जे करू शकतात, तेच जग बदलतात. बाबा आमटे दैन्य हटविणारे अगस्ती होते. म्हणून ते अनाथांसाठी 'गोकुळ', अंधांसाठी ‘आनंद निकेतन', कुष्ठांसाठी ‘आनंदवन', वृद्धांसाठी ‘उत्तरायण' देऊ शकले. आपल्या जगण्याच्या हिशोबाची एक<noinclude>{{center|जाणिवांची आरास/१३३}}</noinclude>
scuakj7pe1vytthi7vvojd2iwoltaa8
पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/135
104
27679
228692
75158
2026-03-26T10:30:16Z
कल्पनाशक्ती
3813
228692
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कबचौउमवि भूषण कुलकर्णी" /></noinclude>साधी कसोटी असली पाहिजे की मी स्वतःच्या पलीकडे पालात असलेल्या माणसासाठी काही करतो का?

{{gap}}बाबा आमटे म्हणत की ‘क्रांती ही सीतेच्या पावलासारखी असते. ती हळू यायला हवी. हळूहळू घडणारी क्रांती कायमचे बदल घडवते. दुसच्याबद्दलचं जगणं, तसा विचार करणं, क्षणिक भावनिक आवेग असता कामा नये. ती एक विचारपूर्ण कृती असायला हवी. तुमच्या प्रयत्नातून बदललेल्या जगाचं हास्य दुस-याच्या चेह-यावर पाहण्याचा छंद जे लावून घेतात त्यांनाच सामाजिक कायाकल्प करता येतो.

{{gap}}वेदनेचा शर नसलेले शरीर उन्मत्त होते.

{{gap}}व्यथेच्या पावसात चिंब भिजून ते विशुद्ध होते.

{{gap}}असं बाबा आमटेंनी एका कवितेत लिहिलं आहे. आपण नम्र, ऋजू का असत नाही तर आपणास परपीडेची फिकीर असत नाही. बाबा आमटेंचा हात तेथील अंध मुलं आपसूक ओळखायचे. ते ओळखणं त्यांच्या कामाचं तापमापक (थर्मामीटर) होतं. आपल्या आयुष्याचं तापमान मोजणारं तापमापक संवेदनासूचकांक सांगणारं होकायंत्र असून ते कुणी शोधून काढलेलं नाही. त्याचा शोध लागला तर आपल्या लक्षात येईल की दैन्य, दुःख जाणणारा, तो हटवणारा अगस्ती शतकात एखादाच जन्मतो. बाकी सारे श्वासोच्छ्वास करणारे जीवजंतू असतात, असा माझा अनुभव आहे. तुमचा?

{{right|■ ■}}{{nop}}<noinclude>{{center|जाणिवांची आरास/१३४}}</noinclude>
sq0w2kwhd13axxq4sjpmv2fsh9n3ymi
पान:स्त्री - जीवन.pdf/१५८
104
109950
228656
2026-03-25T16:48:39Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
228656
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१४६ ]|स्त्रीजीवन|[ प्रकरण}}

|-</noinclude>{{nopt}}

| सासरचे बोल {{gap}}{{gap}} कडू विषाचे ग प्याले
तुझ्यासाठी गोड केले {{gap}}{{gap}} मायबाई ||
{{gap}}९

| सासरचे बोल {{gap}}{{gap}} जसे निगडुंगाचे घोंस
जातीवंताच्या मुली सोस {{gap}}{{gap}} उषाताई ||
{{gap}}१०

| सासरचे बोल {{gap}}{{gap}} जसे मिरियांचे घोंस
शीलवंताच्या ग लेकी {{gap}}{{gap}} तूं सारें सुखे सोस ||
{{gap}}११

| सासरचे बोल {{gap}}{{gap}} भाऊ ऐकतो चोरोनी
नेत्र आले ग भरोनी {{gap}}{{gap}} भाईरायाचे ||
{{gap}}१२

| दीर बोलती दीरपणी {{gap}}{{gap}} नणंदा बोलती टाकूनी
वाग पायरी राखूनी {{gap}}{{gap}} उषाताई ||
{{gap}}१३

| सासूचा सासुरवास {{gap}}{{gap}} नणंदाबाईंची जाचणी
कशी कोमेजून गेली {{gap}}{{gap}} माझी शुक्राची चांदणी ||
{{gap}}१४

| सासूचा सासुरवास {{gap}}{{gap}} रडवी पदोपदी
लेक थोराची बोलेना {{gap}}{{gap}} कोणाशी परी कधीं ||
{{gap}}१५

| बापे दिल्या लेकी {{gap}}{{gap}} कामाच्या खळाळ्याला
हिरवी लवंग मसाल्याला {{gap}}{{gap}} चला कुटु ||
{{gap}}१६

| बापे दिल्या लेकी {{gap}}{{gap}} वाटेवरल्या गोसाव्याला
पालखीत बैसायाला {{gap}}{{gap}} दैव तिचें ||
{{gap}}१७

| बापे दिल्या लेकी {{gap}}{{gap}} नाहीं पाहिलें घरदार
पाहणार परमेश्वर {{gap}}{{gap}} दुसरें कोण ||
{{gap}}१८

| बापे दिल्या लेकी {{gap}}{{gap}} नाहीं पाहिलें धनबीन
एक पाहिलें निधान {{gap}}{{gap}} कुंकवाला ||
{{gap}}१९

| बापे दिल्या लेकी {{gap}}{{gap}} आपण बसले सुखे ओटी
मायेला चिंता मोठी {{gap}}{{gap}} वागण्याची ||
{{gap}}२०

| माझे ग मायबाई {{gap}}{{gap}} नको करूं माझा घोर
रत्न दिलेंस तूं थोर {{gap}}{{gap}} लेकीहाती ||
{{gap}}२१<noinclude>{{nopt}}
|}</noinclude>
fvzxsziwpxd9tw8l7fijw6r9yeuvkdz
पान:स्त्री - जीवन.pdf/१५९
104
109951
228657
2026-03-25T16:56:06Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
228657
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|चवथे ]|सुखदुःखाचे अनुभव|[ १४७}}

|-</noinclude>{{nopt}}

| बाप्पाजी हो बाप्पा {{gap}}{{gap}} मी तुमच्या पोटीची
मला कोणत्या गोष्टींची {{gap}}{{gap}} चिंता नाहीं ||
{{gap}}२२

| बाप्पाजी हो बाप्पा {{gap}}{{gap}} आम्ही तुमच्या कीं पोटा
लेकासारखाच वांटा {{gap}}{{gap}} आम्हां द्यावा ||
{{gap}}२३

| चंदनासारखी {{gap}}{{gap}} देह मी झीजवीन
लेक तुमची म्हणवीन {{gap}}{{gap}} बाप्पाराया ||
{{gap}}२४

| चंदनासारखी {{gap}}{{gap}} देह घालीन करवतीं
तुमच्या नांवासाठीं {{gap}}{{gap}} बाप्पाजी हो ||
{{gap}}२५

| इवलाहि बोल {{gap}}{{gap}} मला लागू न देईन
लेक तुमची म्हणवीन {{gap}}{{gap}} बाप्पाराया ||
{{gap}}२६

| माझे ग मायबाई {{gap}}{{gap}} नको करूं माझी चिंता
दिलीस भाग्यवंता {{gap}}{{gap}} लेक तुझी ||
{{gap}}२७

| सासुरवाशिणीचें {{gap}}{{gap}} तोंड कां कोमेजलें
कोण कडू हो बोलले {{gap}}{{gap}} उषाताईला ||
{{gap}}२८

| भूक लागे माझ्या पोटा {{gap}}{{gap}} परवंटा देत्यें गांठी
तुमच्या नांवासाठीं {{gap}}{{gap}} बाप्पाजी हो ||
{{gap}}२९

| लेकीचा हा जन्म {{gap}}{{gap}} देव घालून चूकला
बैल घाण्याला जुंपला {{gap}}{{gap}} जन्मवेरी ||
{{gap}}३०

| स्त्रियांचा हा जन्म {{gap}}{{gap}} नको घालूं सख्या हरी
परक्याची ताबेदारी {{gap}}{{gap}} जन्मवेरी ||
{{gap}}३१

| स्त्रियांचा हा जन्म {{gap}}{{gap}} नको घालूं सख्या हरी
रात्र ना दिवस {{gap}}{{gap}} परक्याची ताबेदारी ||
{{gap}}३२

| सासुरवाशिणी {{gap}}{{gap}} तूं ग वाड्यांतला बैल
कधी रिकामी होशील {{gap}}{{gap}} उषाताई ||
{{gap}}३३

| नाचण्यांचा कोंडा {{gap}}{{gap}} नाहीं कशाच्या काजाकामा
मुलगीचा जन्म रामा {{gap}}{{gap}} देऊं नये ||
{{gap}}३४<noinclude>{{nopt}}
|}</noinclude>
07n5wxacq4y77hy549m4xtbflj80we0
पान:स्त्री - जीवन.pdf/१६०
104
109952
228658
2026-03-25T17:04:14Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
228658
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१४८ ]|स्त्रीजीवन|[ प्रकरण}}

|-</noinclude>{{nopt}}

| सकाळी उठून {{gap}}{{gap}} काय म्यां काम केले
वृंदावन सारवीलें {{gap}}{{gap}} तुळशीचें ||
{{gap}}३५

| सकाळी उठून {{gap}}{{gap}} काम सडा सारवण
दाराशी राहती उभे {{gap}}{{gap}} देव सूर्य नारायण ||
{{gap}}३६

| सकाळी उठून {{gap}}{{gap}} गायीच्या गोठ्या जावें
पवित्र नांव घ्यावें {{gap}}{{gap}} गोविंदाचें ||
{{gap}}३७

| सकाळी उठून {{gap}}{{gap}} लागल्ये कामाला
माझा निरोप रामाला {{gap}}{{gap}} नमस्कार ||
{{gap}}३८

| सकाळी उठून {{gap}}{{gap}} मुख पाहावें गायीचें
दारी तुळशीमाईचें {{gap}}{{gap}} वृंदावन ||
{{gap}}३९

| सकाळी उठून {{gap}}{{gap}} देवापुढें सारवीलें
रांगोळीने काढीयेलें {{gap}}{{gap}} रामनाम ||
{{gap}}४०

| सकाळी उठून {{gap}}{{gap}} सडा घालूं गोमूत्राचा
माझ्या ग कंथाचा {{gap}}{{gap}} वाडा आहे पवित्राचा ||
{{gap}}४१

| सकाळी उठून {{gap}}{{gap}} काम करत्यें घाईघाई
माझ्या ग दारावरन {{gap}}{{gap}} मंदिराची वाट जाई ||
{{gap}}४२

| सकाळी उठून {{gap}}{{gap}} सूर्याला हात जोडी
कपाळी रेघा ओढी {{gap}}{{gap}} कुंकवाची ||
{{gap}}४३

| सकाळी उठून {{gap}}{{gap}} कामधंद्याला लागल्यें
सूर्याला विसरल्यें {{gap}}{{gap}} नमस्कार ||
{{gap}}४४

| सकाळी उठून {{gap}}{{gap}} सूर्याला नमस्कार
मग करीत संसार {{gap}}{{gap}} उषाताई ||
{{gap}}४५

| मला शिकवीलें {{gap}}{{gap}} बयाबाई माउलीनें
असे उभे राहूं नये {{gap}}{{gap}} परक्याच्या साउलीनें ||
{{gap}}४६

| मी ग शिकलेली {{gap}}{{gap}} बयाबाईच्या शाळेला
काम आपुलें करावें {{gap}}{{gap}} सदा वेळच्या वेळेला ||
{{gap}}४७<noinclude>{{nopt}}
|}</noinclude>
fndokoutccnot2lckasgm9w3mquj9xs
पान:स्त्री - जीवन.pdf/१६१
104
109953
228659
2026-03-25T17:13:01Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
228659
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|चवथे ]|सुखदुःखाचे अनुभव|[ १४९}}

|-</noinclude>{{nopt}}

| माळ्याने मळ्यांत {{gap}}{{gap}} पेरीलें उगवलें
माय ग माउलीनें {{gap}}{{gap}} शिकवीलें कामा आलें ||
{{gap}}४८

| मला शिकवीले {{gap}}{{gap}} बाप्पाजी ज्ञानवंता
भरल्या पाणवठा {{gap}}{{gap}} जाऊं नये ||
{{gap}}४९

| मला शिकवीलें {{gap}}{{gap}} माय त्या माउलीनें
परक्याच्या साउलीनें {{gap}}{{gap}} जाऊं नये ||
{{gap}}५०

| दळण सडण {{gap}}{{gap}} नित्य माझें ग खेळणं
माझ्या मायेने वळण {{gap}}{{gap}} लावीयेलें ||
{{gap}}५१

| दळण मी दळीं {{gap}}{{gap}} माझ्या बाह्या लोखंडाच्या
माय ग माउलीनें {{gap}}{{gap}} मुळ्या चारिल्या वेखंडाच्या ||
{{gap}}५२

| दळण सडण {{gap}}{{gap}} नित्य माझें ग खेळणं
दूर पाणीयाला जाणं {{gap}}{{gap}} अवघड ||
{{gap}}५३

| दळण दळतांना {{gap}}{{gap}} अंगाच्या झाल्या गंगा
माय ग माउलीनें {{gap}}{{gap}} मला चारिल्या लवंगा ||
{{gap}}५४

| दळण दळावें {{gap}}{{gap}} जसा चंदन खिसावा
माउलीला ग पुसावें {{gap}}{{gap}} कसा परदेश कंठावा ||
{{gap}}५५

| नाकींच्या नथीला {{gap}}{{gap}} नको लावू टीकफुली
आपण गृहस्थाच्या मुली {{gap}}{{gap}} उषाताई ||
{{gap}}५६

| परके पुरुषाचा {{gap}}{{gap}} नये घेऊ कातचुना
आपण गृहस्थाच्या सुना {{gap}}{{gap}} वैनीबाई ||
{{gap}}५७

| परके पुरुषाशीं {{gap}}{{gap}} नये बोलूं एकाएकी
आपण गृहस्थाच्या लेकी {{gap}}{{gap}} उषाताई ||
{{gap}}५८

| किती मी सांगू तुला {{gap}}{{gap}} एवढा पदर घे अंगावर
परक्या ग पुरुषाची {{gap}}{{gap}} नजर असते दूरवर ||
{{gap}}५९

| किती तूं नटशील {{gap}}{{gap}} एवढे नटून काय होतें
रूप सुंदर कोठे जातें {{gap}}{{gap}} उषाताई ||
{{gap}}६०<noinclude>{{nopt}}
|}</noinclude>
bvoam63dohhjafw2poaerhp1le3msqx
पान:स्त्री - जीवन.pdf/१६२
104
109954
228660
2026-03-26T08:34:14Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
228660
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१५० ]|स्त्रीजीवन|[ प्रकरण}}

|-</noinclude>{{nopt}}

| सोनाराच्या शाळे {{gap}}{{gap}} खुट्टू खुट्टू वाजे
नवा बिंदी पट्टा साजे {{gap}}{{gap}} वैनीबाईला ||
{{gap}}६१

| पायांत तोरड्या {{gap}}{{gap}} नवी नवरी कोणाची
सखा शाळे जातो त्याची {{gap}}{{gap}} गोविंदबाळाची ||
{{gap}}६२

| हातींच्या पाटल्या {{gap}}{{gap}} मागें पुढें सारी
गोटांना जागा करी {{gap}}{{gap}} उषाताई ||
{{gap}}६३

| हातीं गोट पाटल्या {{gap}}{{gap}} हातरीच्या वांकी
आपण गृहस्थाच्या लेकी {{gap}}{{gap}} उषाताई ||
{{gap}}६४

| आले हो वैराळ {{gap}}{{gap}} बसू घालावा कांबळा
चुडा भरावा जांभळा {{gap}}{{gap}} उषाताईला ||
{{gap}}६५

| आले हो वैराळ {{gap}}{{gap}} बसू घालावी घोंगडी
चुडा भर नागमोडी {{gap}}{{gap}} सूनबाई ||
{{gap}}६६

| आले आले पटवेकरी {{gap}}{{gap}} पटवाया कांहीं नाहीं
पटव सूनबाई {{gap}}{{gap}} तुझ्या पेट्या ||
{{gap}}६७

| आले आले पटवेकरी {{gap}}{{gap}} पटवाया काय देऊ
बाजूबंदा गोंडे लावू {{gap}}{{gap}} सूनबाईच्या ||
{{gap}}६८

| आले आले पटवेकरी {{gap}}{{gap}} नको घेऊं मुली छंद
पटव बाजूबंद {{gap}}{{gap}} सूनबाई ||
{{gap}}६९

| आले आले पटवेकरी {{gap}}{{gap}} नको घेऊं मुली चाळा
पटव तुझ्या माळा {{gap}}{{gap}} उषाताई ||
{{gap}}७०

| माझ्या अंगणांत {{gap}}{{gap}} सासुबाईंचा ठेवारेवा
सीते सारख्या आम्ही जावा {{gap}}{{gap}} चौघीजणी ||
{{gap}}७१

| गोटपाटल्यांच्या {{gap}}{{gap}} या मुली ग कोणाच्या
माझ्या ग मायबाईच्या {{gap}}{{gap}} लेकीसूना ||
{{gap}}७२

| घराची घरस्थिति {{gap}}{{gap}} काय पाहशी परक्या
लेकीसुना त्या सारख्या {{gap}}{{gap}} माझ्या घरी ||
{{gap}}७३<noinclude>{{nopt}}
|}</noinclude>
9a8zxj50irrogy1278mhd0eno58m1hj
पान:स्त्री - जीवन.pdf/१६३
104
109955
228661
2026-03-26T08:48:55Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
228661
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|चवथे ]|सुखदुःखाचे अनुभव|[ १५१ }}

|-</noinclude>{{nopt}}

| लेकी सूना घेऊन {{gap}}{{gap}} नको बसूं तूं अंगणी
दृष्ट लागेल म्हणूनी {{gap}}{{gap}} अक्काबाई ||
{{gap}}७४

| माझ्या दारावरन {{gap}}{{gap}} हत्ती गेले एकदोन
पालखीत लेकसून {{gap}}{{gap}} मायबाईची ||
{{gap}}७५

| माझ्या अक्काबाईची {{gap}}{{gap}} वडील सून कोण
कारल्याची खूण {{gap}}{{gap}} शांताबाई ||
{{gap}}७६

| सासूबाई तुम्ही {{gap}}{{gap}} एक हो बरें केलें
कपाळीचें कुंकू {{gap}}{{gap}} रत्न माझ्या हातीं दिलें ||
{{gap}}७७

| सासूचा सासुरवास {{gap}}{{gap}} सारा मनांत गिळीते
कंथाशीं हांसते {{gap}}{{gap}} उषाताई ||
{{gap}}७८

| माझें सारें दुःख {{gap}}{{gap}} मी ग मनांत ठेवीन
कंथाला पाहून {{gap}}{{gap}} गोड गोड मी हांसेन ||
{{gap}}७९

| होवो माझें कांहीं {{gap}}{{gap}} मला नाहीं त्याची पर्वा
माझा कंथ ग रहावा {{gap}}{{gap}} आनंदांत ||
{{gap}}८०

| होवो माझें कांहीं {{gap}}{{gap}} मला नाहीं त्याची चिंता
मिळू दे ग माझ्या कंथा {{gap}}{{gap}} समाधान ||
{{gap}}८१

| होवो माझे कांहीं {{gap}}{{gap}} मला नाहीं त्याचें दुःख
माझ्या कुंकवाला {{gap}}{{gap}} मिळू दे ग परी सुख ||
{{gap}}८२

| आंतून जळते {{gap}}{{gap}} मनांत रडते
परी वरून हांसते {{gap}}{{gap}} उषाताई ||
{{gap}}८३

| पावसावांचून {{gap}}{{gap}} पीक नाहीं जमिनीला
कंथा ग वांचून {{gap}}{{gap}} सुख नाहीं कमिनीला ||
{{gap}}८४

| पावसावांचून {{gap}}{{gap}} कसा भरारेल मळा
कंथा ग वांचून {{gap}}{{gap}} कामिनीला नाहीं कळा ||
{{gap}}८५

| सूनेला सासुरवास {{gap}}{{gap}} नको करूं माझे आई
आपल्या घरी चाफा {{gap}}{{gap}} परक्याची आली जाई ||
{{gap}}८६<noinclude>{{nopt}}
|}</noinclude>
cyel7zm96wdvkpinziyv4n7v0togpta
पान:स्त्री - जीवन.pdf/१६४
104
109956
228662
2026-03-26T09:32:04Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
228662
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१५२ ]|स्त्रीजीवन|[ प्रकरण}}

|-</noinclude>{{nopt}}

| सुनेला सासूरवास {{gap}}{{gap}} नको करूं माझें गंगा
आपल्या घरी चाफा {{gap}}{{gap}} परक्याची आली रंभा ||
{{gap}}८७

| जांवयाची जात {{gap}}{{gap}} जसा पेटाऱ्याचा नाग
त्याच्या मर्जीनें तूं वाग {{gap}}{{gap}} उषाताई ||
{{gap}}८८

| जांवयाची जात {{gap}}{{gap}} जात खायाची जायाची
पुत्राची ग बोली {{gap}}{{gap}} अस्थि गंगेला न्यायाची ||
{{gap}}८९

| जांवई देइल मान {{gap}}{{gap}} जाऊन बैसेल लोकांत
आपला ग पुत्र {{gap}}{{gap}} पाणी घालील तोंडांत ||
{{gap}}९०

| जांवयाची जात {{gap}}{{gap}} माजोरी मस्तवाल
आतां मी उषाताई {{gap}}{{gap}} तुझ्यासाठीं आल्यें काल ||
{{gap}}९१

| जांवयाची जात {{gap}}{{gap}} रागीट तामसी
त्याच्या मर्जीनें वागसी {{gap}}{{gap}} उषाताई ||
{{gap}}९२

| भ्रताराचा राग {{gap}}{{gap}} जसा विस्तव इंगळ
त्याची मर्जी तूं सांभाळ {{gap}}{{gap}} उषाताई ||
{{gap}}९३

| देवाच्या देऊळीं {{gap}}{{gap}} नंदीला घाली माळ
मागते तान्हेबाळ {{gap}}{{gap}} उषाताई ||
{{gap}}९४

| शिवाची केली पूजा {{gap}}{{gap}} नंदीला कोरा शेला
पुत्रासाठी नवस केला {{gap}}{{gap}} उषाताईनें ||
{{gap}}९५

| देवाच्या देवळीं {{gap}}{{gap}} पुत्राची फळ-वाटी
शालूची कर ओटी {{gap}}{{gap}} उषाताई ||
{{gap}}९६

| वडाच्या झाडाला {{gap}}{{gap}} सदा प्रदक्ष्णा घालते
तान्हेबाळाला मागते {{gap}}{{gap}} उषाताई ||
{{gap}}९७

| तिन्ही ग त्रिकाळ {{gap}}{{gap}} पूजा करिते गायीची
आस तान्ह्या ग बाळाची {{gap}}{{gap}} उषाताईला ||
{{gap}}९८

| देवाच्या देऊळीं {{gap}}{{gap}} सहज गेल्ये होत्यें काल
प्रसाद दिला मला {{gap}}{{gap}} दोन मोती एक लाल ||
{{gap}}९९<noinclude>{{nopt}}
|}</noinclude>
cxj5vtscdmiwfxf42zfoqk03q0mpoeh
पान:स्त्री - जीवन.pdf/१६५
104
109957
228663
2026-03-26T09:39:28Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
228663
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|चवथे ]|सुखदुःखाचे अनुभव|[ १५३ }}

|-</noinclude>{{nopt}}

| देवाच्या देऊळीं {{gap}}{{gap}} सहज गेल्ये गाभाऱ्यात
प्रसाद दिला मला {{gap}}{{gap}} दोन मोती अंगाऱ्यांत ||
{{gap}}१००

| देवाच्या देऊळीं {{gap}}{{gap}} उभी मी केव्हांची
वाट बघतें ब्राह्मणाची {{gap}}{{gap}} पूजेसाठीं ||
{{gap}}१०१

| अश्वत्थाचा पार {{gap}}{{gap}} कुणी झीजवीला
पुत्रासाठी नवस केला {{gap}}{{gap}} उषाताईने ||
{{gap}}१०२

| पिंपळा प्रदक्ष्णा {{gap}}{{gap}} कोण घालीते एकली
आहे पुत्राची भुकेली {{gap}}{{gap}} उषाताई ||
{{gap}}१०३

| नवस मी केला {{gap}}{{gap}} अंबाबाईला पाळणा
पुत्र होऊं दे खेळणा {{gap}}{{gap}} उषाताईला ||
{{gap}}१०४

| देवाच्या देऊळीं {{gap}}{{gap}} पुत्रांचे पर्वत
एक द्यावा हो त्वरित {{gap}}{{gap}} उषाताईला ||
{{gap}}१०५

| नारायण देवाजीचा {{gap}}{{gap}} झाडीत होत्यें जामदारखाना
सांपडला मोतीदाणा {{gap}}{{gap}} गोपूबाळ ||
{{gap}}१०६

| नारायण देवाजीचा {{gap}}{{gap}} झाडीत होत्यें पलंगपोस
सांपडला मोतीघोंस {{gap}}{{gap}} गोपूबाळ ||
{{gap}}१०७

| लाखावरी सावकार {{gap}}{{gap}} तुझ्या माडीला आरसे
पोटीं नाहीं पुत्रफळ {{gap}}{{gap}} झाले द्रव्याचे कोळसे ||
{{gap}}१०८

| लाखावरी सावकार {{gap}}{{gap}} तुझ्या ओसरी दिवा जळे
पोटीं नाहीं पुत्रफळ {{gap}}{{gap}} तुझ्या ओटीवर कोण खेळे ||
{{gap}}१०९

| वाजंत्री वाजती {{gap}}{{gap}} कोणत्या आळीला
ताईबाई सावळीला {{gap}}{{gap}} न्हाण आले ||
{{gap}}११०

| देवाच्या देऊळीं {{gap}}{{gap}} मोकळ्या केसांची
न्हालेल्या दिवसांची {{gap}}{{gap}} उषाताई ||
{{gap}}१११

| पहिल्याने न्हाण {{gap}}{{gap}} न्हाण आलें तें आजोळीं
मखराला जाळी {{gap}}{{gap}} मोतीयांची ||
{{gap}}११२<noinclude>{{nopt}}
|}</noinclude>
kc67ge2qvjitvc8mexsvu471f8xoj8i
पान:उदारांचे राजे पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर.pdf/१३
104
109958
228685
2026-03-26T10:14:33Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* मुद्रितशोधन */
228685
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>प्रस्तावना.
सत्यनिष्ठ होते; एका विनोदी बंगाली माणसाने एकदां सहन
उद्गार काढले ' परमेश्वर पुष्कळ बंगाली निर्माण करीत होता;
इतक्यांत मध्येच त्यानें ईश्वरचंद्र हा पुरुष चुकून निर्माण केला'-
याचा अर्थ म्हणजे भित्र्या, भ्याड, बंगाली बाबूंत पुरुषपदवीस
पात्र ईश्वरचंद्र होते. ते पुरुष होते; हेंच त्यांचे यथार्थ वर्णन.
त्यांच्यांत पौरुष होतें. पौरुष | शिवाय पुरुष कसचा ? ते पुरुष
होते; ते मर्द होते हैं पौरुष, हा मर्दानीपणा, हा स्वाभिमान
वाचकांनी विद्यासागराच्या चरित्रापासून घ्यावा एतदर्थ हें खालील
छोटे चरित्र आम्ही लिहिण्याचें योजिलें आहे.<noinclude></noinclude>
2bj33vjl7ftb24d6thy32ct0zv88kvp