विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.46.0-wmf.23
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/41
104
63311
228994
145731
2026-04-08T11:33:33Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
228994
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|११ }}
{{rule}}</noinclude>सदैव इतकें प्रेम करणे, की त्याहून या जन्मी अथवा जन्मांतरी अन्य कांहींच प्रिय नाही अशी उत्कट भावना ठेवणे हाच या स्वरूपाच्या पूजनाचा मार्ग आहे. हा मार्ग भगवान् श्रीकृष्णांनी पूर्णत्वाने व्यक्त करून दाखविला आहे. श्रीकृष्ण हे प्रत्यक्ष परमेश्वरच मानवस्वरूपाने पृथ्वीवर आले, असा आमचा समज आहे. ज्याप्रमाणे कमळाचे पान पाण्यांत असते त्याप्रमाणे मनुष्याने जगांत राहावें असें भगवानांनी सांगितले आहे. कमळाचें पान पाण्यांत असतांहि जसें ओले होत नाही तसे जगांत सर्व कर्में करित असतांहि त्यांपासून उद्भवणाऱ्या सुखदुःखांतून निराळे राहावें. हाताने कर्म घडत असतां मनानें परमेशचिंतन करावे असा भगवान् श्रीकृष्णांचा उपदेश आहे.

{{gap}}या जगांत आपलें बरें व्हावें अशा इच्छेनें परमेश्वराचे भजन पूजन करणे वावगे नाही; परंतु अत्यंत निरिच्छ मनाने केवळ त्याच्याच प्राप्तीसाठी त्याच्यावर निर्व्याज प्रेम करावें हें अधिक चांगले नाही काय?
{{Block center|<poem>“न मिळो खावया न वाढो संतान । परि हा नारायण कृपा करो ॥
हेचि माझी वाणी मज उपदेशी । आणिकां लोकांसी हेंचि सांगे ॥
विटंबो शरीर होत कां विपत्ति । परि राहो चित्तीं पांडुरंग ॥"</poem>}}
हीच प्रार्थना आपण सदोदित करित असले पाहिजे.

{{gap}}भगवान् श्रीकृष्णाचा युधिष्ठिर नांवाचा भक्त होता. तो समस्त आर्यावर्ताचा राजा होता. त्याच्या भाऊबंदांनी त्याचे सर्वस्व हरण करून त्यास वनवासास धाडिलें. तो हिमालयाच्या आसमंतात् असलेल्या एका वनप्रदेशांत राहिला असतां एकदां त्याच्या राणीने त्यास विचारले, "महाराज, आपण परमेश्वराचे अनन्य भक्त असतां आपणावर मोठमोठी संकट कोसळतात हे कसे ?” युधिष्ठिराने उत्तर दिले, “देवि, मी या हिमालयाची उत्तुंग आणि रमणीय शिखरे पाहून त्यांवर प्रेम करितो. असे करण्यांत त्या पर्वतराजापासून काही प्राप्त करून घेण्याची माझी अपेक्षा आहे काय? सुंदर आणि उदात्त स्वरूपाची वस्तू नजरेस पडल्यावर तिजवर प्रेम करावे असा माझा स्वभावच आहे. तसेंच जो सर्व सौंदर्याचा निधि आणि उदात्ततेचा परमावधि त्यावर प्रेम केल्याशिवाय माझ्याने कसें राहवेल बरें! जगांत प्रेमास योग्य असें तें एकच स्थान आहे. या माझ्या प्रेमाच्या मोबदल्यांत मी कशाचीहि अपेक्षा करित नाही. त्याची मर्जी असेल तसे त्याने मला ठेवावें. माझें त्याजवरील प्रेम अगदी निर्व्याज आहे. प्रेम ही गूळखोबऱ्यासारखी क्रयविक्रयाची वस्तु आहे काय?"{{nop}}<noinclude></noinclude>
l2iit5twm1laft21vcc9xj87odjo3mn
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/42
104
63312
228995
145732
2026-04-08T11:37:04Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
228995
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१२|{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>{{gap}}आत्मा हा पूर्ण ईश्वररूप असून जड शरीराने बद्ध असल्यासारखा दिसतो. हा पाश तुटला ह्मणजे आत्मा मुक्त होतो. मुक्त होतो याचा अर्थ जन्ममरण, दुःखपरंपरा आणि अपूर्णता यांतून तो सुटतो, असें वेदांचे सांगणे आहे. परमेश्वराच्या कृपेवांचून मुक्तीची साधने उपलब्ध होणे शक्य नाही. आणि आपण अत्यंत पवित्र झाल्यावांचून परमेश्वराची कृपा होणे शक्य नाही. त्याच्या या कृपेचे स्वरूप ह्मणजे शुद्ध अंतःकरणांत परमेश्वर स्वतः उदय पावतो. जे शरीर पूर्वी आपणास केवळ जड, त्याज्य- मृत्पिंड- वाटत होते त्याच शरीरांत परमेश्वराचा उदय होतो. अंतःकरणांतील सर्व बरे वाईट विकार लय पावतात. कसल्याहि प्रकारच्या शंका उदय पावत नाहीत. ज्याच्या हृदयांत परमेश्वर उदय पावतो तो जन्ममरणाच्या कारणपरंपरेतून कायमचा बाहेर पडतो. हिंदुधर्माचें सार या एका कल्पनेत सांठविले आहे असें म्हटल्यास फारसें वावगे होणार नाही. केवळ कल्पनेची चित्रे पाहून आणि शब्द ऐकून हिंदूंचे कधीहि समाधान होणार नाही. आमच्या दशविध इंद्रियांच्या आटोक्या बाहेर असाणारा कोणी प्राणि असला तर तो प्रत्यक्ष नजरेस पडला पाहिजे असा हिंदूंचा हट्ट आहे. जर जड सृष्टीच्या बाहेर असणारा केवळ चैतन्यात्मक असा कोणी असेल तर कोणाच्याहि मध्यस्थीवांचून त्याची भेट घेण्यासाठी हिंदु धडपड करितील. जर एखादा खरा हिंदु साधू आपणास भेटला आणि आपण त्यास विचारिलें की "बावाजी, परमेश्वर आहे हे खरें कशावरून?" तर त्यावर तो उत्तर देईल की “माझ्या मुला, मी त्याला प्रत्यक्ष पाहिले आहे. त्याची आणि माझी भेट झाली आहे." असे स्पष्टपणे सांगणारा मनुष्यच पूर्णत्वास पोहोचला असे समजावयाचें. अमुक एक मत खरें मानावें, अथवा अमूक एक सिद्धांत खरा समजावा असें हिंदुधर्म कधीहि सांगत नाही. 'आह्मी जें कांहीं ह्मणतो, त्याचा तूं स्वतः अनुभव घे, किंबहुना तेंच तूं स्वतः हो' असें आमच्या ऋषींचे सांगणे आहे. याप्रमाणे धर्ममार्गात जे जे प्रयत्न ऋषींनी केले त्यांचा अंतिम हेतु मनुष्याने स्वतःच्या एकांतिक परिश्रमानें पूर्णत्व पावावें, अत्यंत पवित्र व्हावें- परमेश्वर व्हावें- असा आहे. ख्रिस्तीधर्मातील आकाशस्थ पित्याची जी कल्पना आहे ती कल्पना स्वतःचे ठिकाणीच खरी करणे हे हिंदुधर्माचें अंतिम साध्य आहे. पूर्णत्व पावलेल्या योग्याची स्थिति कशी असते ह्मणाल तर तो पूर्णानंदाच्या स्थितीत सर्वकाल असतो. सर्व सुखाचें माहेरघर जो परमेश्वर त्याच्या सान्निध्यांत दुःखाचा स्पर्शहि होणे शक्य नाही. येथपर्यंत हिंदुतत्वज्ञानांतील निरनिराळ्या पंथांच्या आचार्याची एकवाक्यता<noinclude></noinclude>
hbpxfl3n8pmp47tnyt28wtn6v34zzai
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/43
104
63313
228996
146349
2026-04-08T11:40:24Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
228996
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|१३ }}
{{rule}}</noinclude>आहे. निरनिराळ्या पंथांस सामान्यत्वेकरून संमत झालेली अशी तत्वे येथवर सांगितली; परंतु 'पूर्णत्व' हे भिन्न भिन्न रूपाचे असणे शक्य नाही. तें दोन अथवा तीन रूपांनी अस्तित्वात येणे शक्य नाही. पूर्णत्व हे नेहमी एकच असूं शकेल. तसेच त्याला काही विशिष्ट गुणधर्म असणेहि संभवत नाही. याकरितां जीवात्मा पूर्णत्व पावला ह्मणजे पूर्णरूप जें ब्रह्म त्या ब्रह्माशी त्याचे ऐक्य होते. येथे आपण स्वतः पूर्णरूप आहों- सच्चिदानंदरूप आहों- असा जीवात्म्यास अनुभव येतो. आपलें व्यक्तित्व नाहीसे होणे ह्मणजे काष्ठलोष्टवत् होण्यासारखें आहे असे कित्येकांस वाटते. परंतु तरवारीचा घाव सोसला नाही अशा क्लीबाने धारातीर्थी स्नान करणाऱ्या वीरपुरुषाच्या अंगावरील जखमांची थट्टा करावी यांत नवल नाही. आपणास मी त्रिवार बजावून सांगतों की, ब्रह्मरूप होणे ह्मणजे काष्ठलोष्टवत् होणे नव्हे. आपल्या या एकाच देहांत अनुभवास येण्याऱ्या चैतन्याचा सुखास्वाद किती आहे हे आपण प्रत्यही अनुभवितो. जर दोनतीन देहांतील चैतन्यरस एकाच देहांत आपणास अनुभवितां येईल तर नेहमीपेक्षा दुप्पट तिप्पट आनंदाचा अनुभव आपणांस होईल. मग या साऱ्या दृश्य विश्वांतील चैतन्यरसांत बुडून जाणे किंबहुना तो चैतन्यरसच आपण होऊन जाणे ह्मणजे कशी स्थिति असेल याची कल्पना करणे आपणावरच सोंपवितों.

{{gap}}जर आपण स्वतः विश्वरूप व्हावे असे वाटत असेल तर आपल्या या क्षुद्र देहांतील 'स्वत्व' आपणांस विसरण्यावांचून गत्यंतर नाही हे उघड आहे. मला मृत्यूच्या जडत्वापलीकडे जावयाचे असेल तर स्वतः केवळ चैतन्यरूप झाले पाहिजे. दुःखाचे वारें लागू नये अशी माझी इच्छा असेल तर मला स्वतःच सुखरूप झाले पाहिजे. कोणतेंहि अज्ञान माझ्या ठिकाणी संभवू नये अशी माझी इच्छा असेल तर मला स्वतःला ज्ञानरूप झाले पाहिजे. ही जी विचारपरंपरा मी सांगितली ती तर्कशास्त्रासही पूर्णपणे संमत अशीच आहे. सांप्रत जें शरीर मी धारण करितों तें कायम स्वरूपाचे नसून प्रत्येक क्षणी बदलत आहे नवें होत आहे- असें आज भौतिक शास्त्रे मला सांगतात. हे शरीरहि कायमचें माझें एकट्याचे नसून त्यांत होणाऱ्या फेरबदलावर माझी सत्ता नाही; त्याला स्वतंत्र असें अस्तित्व नसून विश्वांतील अनंत दृश्य आकारांतील तो एक घटक आहे आणि ह्मणून त्याचे कांहीं काल अनुभवास येणारे स्वतंत्र अस्तित्व स्वप्नरूप आहे असें अर्वाचीन शास्त्रे मला मोकळ्या मनाने सांगत आहेत. माझें शरीर जर स्वतंत्रपणे माझें नव्हे हे सिद्ध झाले आहे तर माझें चैतन्य- माझा<noinclude></noinclude>
455tthcyccdpxtpua5hm6v9ii514th0
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/44
104
63314
228997
146358
2026-04-08T11:43:20Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
228997
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१४ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>आत्मा-स्वतंत्र आहे, विश्वचैतन्याहून निराळा आहे असे मी कसें ह्मणावें? आणि हाच अद्वैत सिद्धांत वेदांतमताने प्रतिपादिला आहे.

{{gap}}प्रत्येक शास्त्राचे अंतिम साध्य पाहिले तर एक मूलतत्व शोधून काढण्याचे आहे. हे मूळचे तत्व सांपडले की त्या शास्त्राची पुढली गति बंद झालीच पाहिजे; कारण मग तें शास्त्र पूर्णत्वास पोहोचले. पृथ्वीवर अनेकविध दिसणारे पदार्थ एकाच पदार्थापासून निर्माण करता येऊ लागले तर रसायनशास्त्राची प्रगति खुंटणार नाही काय? तसेंच विश्वांत अनेकविध रीतींनी प्रत्ययास येणाऱ्या शक्ती एका मूलशक्तीचीच अनंत रूपं आहेत असे सिद्ध झाले तर पदार्थविज्ञानशास्त्राची (Physics) प्रगति बंद झालीच पाहिजे. तसेंच मृत्यूचे साम्राज्य सर्वत्र अनुभवास येत असतां सदोदित राहणारे चैतन्य सांपडलें की धर्माची वाढहि संपलीच पाहिजे. प्रत्येक क्षणीं बदलत जाणाऱ्या विश्वाचें मूळ स्वरूप शोधून काढणे, अनंत रूपांनी दिसणारे जीवात्मे एकाच विश्वात्म्याची भ्रामक अशी अनंत रूपं आहेत हे सिद्ध करणे, सृष्टीच्या अनंत दृश्य रूपांत वास्तविक एकरूप पाहणे हे धर्माचें अंतिम साध्य आहे. हे साधलें ह्मणजे धर्मशास्त्राचा शेवटच झाला. त्यापुढे धर्मशास्त्र जाऊंच शकणार नाही. केव्हांना केव्हां तरी सर्व शास्त्रांस हा सिद्धांत मान्य करावाच लागेल.

{{gap}}कशाचाहि नाश होत नाही आणि अगदी नवें असें कांहीं निर्माणहि होत नाही, असा अलीकडील शास्त्रांचा शोध आहे. हीच गोष्ट आर्यांच्या भाषेत सांगावयाची ह्मणजे 'धाता यथा पूर्वमकल्पयत्' या शब्दांनी सांगतां येईल. आपण कित्येक शतकें-सहस्रकें- जी गोष्ट आपली ह्मणून उराशी बाळगिली तिची सत्यता अधिक स्पष्टपणाने आणि दृश्य अनुभवाच्या शास्त्रांनी सिद्ध होत आहे, हे पाहून आह्मां हिंदूंस आनंदाचे आणि अभिमानाचे भरतें आलें तर त्यांत नवल नाही.

{{gap}}येथवर तुह्मांस हिंदूधर्माच्या अत्यंत उज्वल अशा स्वरूपाची माहिती दिली. आतां हिंदूंतील अज्ञजनसमूहाच्या धर्मकल्पनांकडे वळू. हिंदुस्थानांत अनेक देवांची कल्पना अस्तित्वात नाही हे आरंभीच आपणांस सांगणे इष्ट आहे. जर आपण थोडा वेळ एखाद्या देवळांत उभे राहिलों आणि तेथील पूजेचा विधि लक्ष्यपूर्वक पाहिला तर तेथील इष्टदेवतेची स्तुति करतांना सर्वसाक्षित्वादि जे गुण परमात्म्यास लाविले आहेत त्याच गुणांची योजना तेथील भक्त आपल्या इष्ट देवतेवर करित असल्याचे आपणास आढळून येईल. जर अशी स्थिति आहे तर हिंदुस्थानांत अनेक देव मानण्यांत येतात, या ह्मणण्यांत काय तात्पर्य आहे?<noinclude></noinclude>
dsfg2wxwynh9ypjilht9tyju2u3gjjh
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/45
104
63315
228998
146359
2026-04-08T11:47:10Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
228998
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|१५ }}
{{rule}}</noinclude>गुलाबाला निरनिराळी अनेक नांवें दिल्याने त्याच्या सुवासांत कांही उणीव येते काय? नुसती निराळी नांवे देणे याचा अर्थ निराळे मत प्रतिपादन करणे असा होत नाही.

{{gap}}माझ्या लहानपणी एक ख्रिस्ति उपदेशक एका लहानशा जमावापुढें व्याख्यान देत असतां तेथील मंडळीस उद्देशून ह्मणाला, “अहो, जर मी तुमच्या मूर्तीवर माझी काठी मारून ती मूर्ती फोडून टाकिली तर ती माझं काय वांकडे करणार आहे?” यावर मंडळींतील एकाने त्या पाद्र्यास उलट प्रश्न विचारिला, “पाद्रीबुवा, तुमच्या आकाशांतील बापाला जर मी शिव्या दिल्या तर तो तरी माझें काय करील?” पाद्री ह्मणाला, “तूं मेल्यावर तो तुला शासन करील." हिंदूनें यावर ह्मटलें “तूं मेलास ह्मणजे माझी मूर्ति तुला शासन करील."

{{gap}}ज्यांना तुह्मी ख्रिस्तिलोक मूर्तिपूजक असें ह्मणतां आणि मूर्तिपूजा ह्मणजे पापाचा मार्ग समजतां त्याच मूर्तिपूजकांत अत्यंत पवित्र असे महात्मे मी पाहिले आहेत. इतकी पवित्रता माझ्या अवलोकनांत दुसऱ्या कोठेहि आली नाही. असे असतां मूर्तिपूजा ह्मणजे पापाचा मार्ग हे शब्द उच्चारतांना बराच विचार करावा लागेल. पापांतून अत्यंत पावित्र्याची उत्पत्ति शक्य आहे काय, याचा तुह्मींच विचार करा.

{{gap}}धर्मभोळेपणा हा मनुष्याच्या उन्नतीच्या आड येणारा शत्रु आहे, ही गोष्ट मी कबूल करितो; परंतु धर्मवेड हा त्याहूनहि भयंकर शत्रु नाही काय? ख्रिस्ती मनुष्याला प्रार्थनेसाठी देऊळच कशास पाहिजे? क्रुसाच्या खुणेत पवित्रता कशी आली? प्रार्थना करितांना आकाशाकडे डोळे लावण्याची काय गरज आहे? जुन्या क्याथोलिकपंथाच्या ख्रिस्त्यांस अनेक मूर्तीची आवश्यकता कां वाटली? परमेश्वराचें गुणवर्णन करितांना प्रॉटेस्टंट ख्रिस्ति अनेक मूर्तीची कल्पना मनांत आणितात ती कां? माझ्या प्रिय बंधूंनो, श्वासोछ्वास केल्यावांचून जगणे जसे अशक्य तसे कोणत्याना कोणत्या तरी रूपाने गुणांची मानसिक मूर्ति उत्पन्न केल्याशिवाय त्या गुणांचे चिंतन करणे अशक्य आहे. आपले चित्त केवळ निराकारांत लीन होत असल्याचा आपणास केव्हांहि अनुभव येत नाही. आपणास चोहोंकडे जडविषय आणि गुण यांची संलग्न अवस्था पाहण्याची संवय लागलेली आहे. यामुळे जडविषय मनांत आणल्यावांचून गुण अथवा गुणावांचून जडविषय यांचे चिंतन करणे आपणांस शक्य नाही. याच तत्वावर हिंदूंनी मूर्तिरूपानें गुणांना दृश्यस्वरूप दिले आहे. मूर्ति या गुणांचे स्मरण करून देणाऱ्या खुणा आहेत. सद्गुणैकमूर्ती- परमेश्वरा-कडे चित्त लागावें आणि ते इकडे तिकडे<noinclude></noinclude>
kzfe0ploulijx7h6oq8sja9n4jz2j8f
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/46
104
63316
228999
146634
2026-04-08T11:50:35Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
228999
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१६ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>भटकू नये ह्मणून मूर्तीची योजना आहे. केवळ मूर्ति ह्मणजे परमेश्वर नव्हे, ही गोष्ट आपल्या इतकीच प्रत्येक हिंदूस पक्की ठाऊक आहे. आपण प्रार्थना करितांना 'परमेश्वरा, तूं सर्वव्यापी आहेस' असे म्हणतां याचा वास्तविक अर्थ काय? आपण अनुभवाने हे म्हणत असतां काय? आकाशाचा अनंत विस्तार अथवा समुद्राचा प्रचंड विस्तार आपल्या मनांत त्या वेळी येत नाही काय? ह्मणजे सर्वव्यापी या शब्दाचे हे मूर्तरूपच झाले नाही काय?

{{gap}}वास्तविक विचार केला तर यांत मनुष्यस्वभावास विसदृश असें कांहीं नाहीं, हे आपल्या ध्यानात येईल. आमच्या मनोभूमिकेची रचनाच अशी आहे की कोणत्या तरी दृश्य पदार्थाशी जोडल्याशिवाय केवळ गुणांचे चिंतन आम्हास करितांच येत नाही. मग तो दृश्य पदार्थ समुद्र असो, आकाश असो, अग्नि असो, ख्रिस्ति देउळ असो, क्रूसचिन्ह असो, अगर मशीद असो. ईश्वरविषयक सर्व उच्च कल्पना हिंदूंनी आपल्या विशेष प्रकारच्या मूर्तीशी जोडल्या आहेत इतकेंच. आपण निराकाराची स्तुति करतों ह्मणून मोठ्या आढ्यतेने इतरांस तुच्छ समजणारे लोक अद्यापि देवळाच्या चारी भिंतींच्या आंतच कोंडले असल्यासारखे दिसतात. त्यांची अत्यंत मोठी कल्पना पटली तर आपल्या शेजाऱ्यापाजाऱ्यांस मदत करावी इतकीच दिसते. मनुष्याला प्रत्यक्ष परमेश्वर होणे शक्य आहे या कल्पनेचा नुसता स्पर्शहि त्यांस झाल्याचे दिसत नाही. मूर्तिपूजकांची मुख्य कल्पना ह्मटली तर स्वयमेव परमेश्वर होण्याची आहे. एखादें देऊळ, एखादी मूर्ति अथवा एखादें पुस्तक ही केवळ साधनरूप आहेत. यांच्या सहाय्याने एकेका कल्पनेचा ग्रास करून शेवटी परमात्म्याची भेट घ्यावयाची आहे ही गोष्ट हिंदुमात्रास ठाऊक आहे. अमुक मतें संमत आहेत असें म्हटले ह्मणजे धार्मिक जीवनाचा परमावधि झाला असें कोणाहि हिंदूस वाटत नाही. परमेश्वराची भेट होईपर्यंत मध्ये कोठे थांबण्यास जागाच नाहीं असें त्यास वाटते. बाह्योपचारांनी मूर्तिपूजा करणे ही अगदी शेवटची पायरी आहे. प्रार्थना ही दुसरी पायरी आहे, आणि स्वतः परमेश्वर होणे हे मुक्कामास पोहोचणे आहे असें श्रुतींनीहि सांगितले आहे. एखादा मूर्तिपूजक आपल्या मूर्तीपुढे बसला असतां ह्मणतो “सूर्याचा प्रकाश, चंद्राचा प्रकाश, ताऱ्याचा प्रकाश अथवा अग्नीचा प्रकाश यांपैकी एकहि तुला दाखवू शकत नाही. हे सर्व तुझ्या प्रकाशाने प्रकाशतात." ते स्वतः मूर्तिपूजक असले तरी दुसऱ्या कोणी दुसऱ्या पद्धतीने पूजा केली असता त्यांस पापी समजत नाहीत, अगर त्यांचा पूजनमार्ग खोटा<noinclude></noinclude>
nqtgl2wbys7iv7n5tcvdbfe5nrhqi66
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/47
104
63317
229000
147076
2026-04-08T11:54:27Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229000
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|१७ }}
{{rule}}</noinclude>असेंहि ह्मणत नाहीत. मूर्तिपूजा ही खालची पायरी झाली ह्मणून ती करणारास अधिक श्रेष्ठ असलेल्यांनी हंसावें हे योग्य आहे काय? एखाद्या तरुणाने लहान मुलास तें लहान ह्मणून हंसावें अथवा वृद्धाने तरुणास तरुण ह्मणून हंसावें अशाच बालिशतेचा हा प्रकार आहे. मूर्तिदर्शनाबरोबर जर सात्विकभाव कोणाच्या अंतःकरणांत उत्पन्न होत असतील तर मूर्तिदर्शन करणे पाप आहे की काय, याचा आपणच विचार करा. अशा मनुष्याला पुढे मूर्तिपूजेची जरूर वाटेनाशी झाली तरी तो मूर्तिपूजकास खचित नांवे ठेवणार नाही. आपण पूर्वी काही चूक करित होतों- कांहीं वाईट गोष्ट करित होतों-ती सुधारावयाची आहे अशी हिंदूंची कल्पनाच नाही. धर्ममार्ग ह्मणजे सत्याच्या अंधुक कल्पनेतून निघून अत्यंत उज्वल- प्रकाशमय- अशा सत्यांत प्रवेश करावयाचा अशी हिंदूंची कल्पना आहे. आपण मूळचे पापी आहों असें हिंदुलोक समजत नाहीत; तर आपण अत्यंत पुण्यमय व पूर्णस्वरूपाची अनंतरूपें आहोत असे ते समजतात. यामुळे अगदी रानटी मनुष्याच्या धर्ममार्गापासून तो थेट वेदांताच्या अद्वैत सिद्धांतापर्यंत सर्व मार्ग निरनिराळे दिसणारे परंतु एकाच केंद्राकडे पोहोचणारे रस्ते आहेत असें हिंदु मनुष्य समजतो. भिन्न परिस्थिति आणि भिन्न देशकालवर्तमान यांस अनुसरून हे निरनिराळ्या प्रकारचे मानवी प्रयत्न एकाच सत्याच्या शोधांत गुंतले आहेत. हे निरनिराळे लहानमोठे गरूडपक्षी एकाच सूर्यबिंबाकडे धाव घेत आहेत. त्यांतील लहान पक्षी विश्रांतीसाठी एखाद्या मुक्कामावर क्षणभर थांबतात व कांहीं कालाने पुन्हा उडू लागतात; व शेवटी बिंबावर सर्व एकत्र जमतात असा हिंदूंचा सिद्धांत आहे.

{{gap}}दृश्यविश्व अनेकतेने भासले तरी शेवटी त्यांत एकतानता आहे असें हिंदूंनी जाणले आहे. आपली विशिष्ट मतें ह्मणून ती साऱ्या समाजास एकसहा स्वीकारावयास लावावयाची असा इतर धर्माचा कटाक्ष आहे; जणूं काय एकाच आकाराचा अंगरखा सर्वांनी घातला पाहिजे असा त्यांचा हट्ट आहे. मग तो अंगास बरोबर बसो अगर न बसो. ज्याच्या अंगास बरोबर बसत नसेल, त्याने उघडे भटकावें. प्रतिमा अथवा पुस्तकें ही केवळ मूलरूप व्यक्त करण्याची साधने आहेत एवढेच हिंदूंचे ह्मणणे आहे. या साधनांचा प्रत्येकाने अवश्य उपयोग केलाच पाहिजे असा त्यांचा कटाक्ष नाही. याचा उपयोग न करणारा मूर्ख असेंहि त्यांचे ह्मणणे नाही. तसेंच या साधनांचा उपयोग केला ह्मणजे पाप घडतें असेंहि त्यांस वाटत नाही.

{{gap}}आणखीहि एका गोष्टीचा उल्लेख करणे अवश्य आहे. मूर्तिपूजेत कांहीं भयंकर विधि आहे असा कोणी आपला समज करून दिला असल्यास तो सर्वथैव<noinclude>
{{gap}}{{gap}}स्वा. वि.२</noinclude>
2n1mi5ijlsv41zwr3velcr5zwaptp8n
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/48
104
63318
229001
147077
2026-04-08T11:57:45Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229001
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१८ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>चुकीचा आहे. हिंदूंतहि इतर लोकांप्रमाणेच अनेक दोष आहेत. परंतु आपण एवढें पकें लक्ष्यात ठेवा की, त्यांच्या सदोष कल्पनांचे पर्यवसान इतरांस त्रास देण्यांत झाले नाही. सती जाणे पुण्यकारक ह्मणून एखादी स्त्री पतीच्या शवाबरोबर आपणा स्वतःस जिवंत जाळून घेईल; परंतु काही शतकांपूर्वी धर्माच्या नांवाखाली मनुष्यांस जिवंत जाळण्याचे जे अत्याचार यूरोपांत घडले, तसली गोष्ट हिंदुस्थानांत स्वप्नांतहि घडून येणे शक्य नाही. कित्येक ख्रिस्ती लोकांनी पूर्वकाली डांकिणी डांकिणी ह्मणून कित्येक स्त्रियांस जिवंत भस्मसात् केलें हें आपणास इतिहासावरून कळून येते. हे पातक ख्रिस्तीधर्माच्या माथी मारणे जसे बरोबर नाही तसेंच कांहीं हिंदूंनी धर्माच्या खोट्या कल्पनांनी अत्त्याचार केले तर त्यांचा दोष हिंदुधर्मावर लादणे बरोबर होणार नाही.

{{gap}}जगांतील यच्चावत् धर्मपंथ परमेश्वराकडे जाण्याचे निरनिराळे रस्ते आहेत असें हिंदूंचे मत आहे. त्यांत अनेक प्रकारचे मतभेद दिसले तर परिस्थितीप्रमाणे एकच सत्य अनेक रूपें धारण करितें असें हिंदु ह्मणतात. एकाच सूर्याचे किरण निरनिराळ्या रंगांच्या काचेतून आल्यामुळे जसे भिन्नवर्णी आहेत असें वाटते तसेंच धर्मपंथांचेंहि आहे. इतके भिन्न आणि परस्परांस विसदृश असे पंथ असणे अनिष्ट नसून उलट इष्टच आहे. त्यामुळे आपणास काय पाहिजे याची बरोबर निवड करण्यास प्रत्येकास अवसर सांपडतो. बाह्यरूपें निराळी दिसली तरी अंतःस्वरूप व अंतिम हेतु ही एकच आहेत. '''“मत्तः परतरं नान्यत्किंचिदस्ति धनंजय । मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव ॥"''' तसेंच '''“यद्यविभूतिमत्सत्वं श्रीमदूर्जितमेव वा । तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंशसंभवम् ॥”''' असें जें भगवान् श्रीकृष्णांनी सांगितले आहे याचाहि अर्थ हाच आहे. अनेक युगांच्या परंपरेनें निर्माण झालेल्या या हिंदुधर्माचा मानवजातीवर केवढा उपकार झाला आहे! परमतासहिष्णुता हिंदूंस आजपर्यंत केव्हांहि शिवली नाही. 'फक्त हिंदूंसच मुक्ति मिळेल' अशा आशयाचे एक तरी वाक्य साऱ्या हिंदू ग्रंथांतून काढून दाखवा असें साऱ्या जगास मी आव्हान करतो. उलट महर्षि व्यास ह्मणत आहेत की 'आमच्या जातीच्या आणि धर्माच्या बाहेरचे असे अनेक पूर्णत्वास पावलेले लोक मी पाहिले आहेत.'

{{gap}}प्रिय भगिनिबंधूंनो, याप्रमाणे हिंदुधर्माचें सामान्यस्वरूप काय आहे याची माहिती मी आपणांस दिली आहे. हिंदूंनी आजपर्यंत केलेले बेत फलद्रूप झाले नसतील. त्यांच्या हातून अनेक चुकाहि झाल्या असतील. परंतु सर्व जगाचा कधीं<noinclude></noinclude>
0ebpp25gq8mawpngs4lrz00jzmirpme