विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.46.0-wmf.23
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
अनुक्रमणिका:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf
106
57614
229036
228966
2026-04-09T10:41:58Z
कल्पनाशक्ती
3813
229036
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड)
|Language=mr
|Volume=खंड क्र.१
|Author=[[:mr:स्वामी विवेकानन्द|स्वामी विवेकानन्द]] [[:en:|Swami Vivekananda]]
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=जी. एन. कुलकर्णी
|Address=मुंबई
|Year=1912
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist 8 ="प्रकाशकाची प्रस्तावना" 12="भगिनी निवेदिता यांचा उपोद्धात" 26="अनुक्रमणिका" 31="सर्व धर्मांच्या परिषदेपुढे दिलेली व्याख्याने" 54="आत्मा, परमेश्वर आणि धर्म" 67="हिंदुधर्म" 73="कर्मयोग"/>
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=

5j21s66zvxbzk0sb9fczyi0p00bf0j6
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/49
104
63319
229002
147078
2026-04-08T12:00:24Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229002
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|१९ }}
{{rule}}</noinclude>काळी जर एकधर्म होणे शक्य असेल तर तो कालस्थलाबाधित अशा रूपाचाच असला पाहिजे. त्यांतील तत्वें विशिष्ट स्थली अथवा विशिष्ट कालींच खरी ठरतील अशी नसावी. जाति अथवा वर्ण यांचा यत्किंचितहि भेद मनांत न आणितां सर्वास सारखाच ज्ञानमार्ग दाखविणारा असा तो धर्म असला पाहिजे. तसेच अत्यंत पुण्यवान् अथवा अत्यंत पापी यांस सारखीच दया दाखविणारा तो धर्म असला पाहिजे. ब्राह्मणांचा धर्म, बुद्धाचा धर्म, येशुख्रिस्ताचा धर्म आणि महंमदाचा धर्म या सर्वांचे स्वरूप जेथें आत्यंतिक ऐक्याने नजरेस येईल असा तो धर्म असला पाहिजे. पशूपेक्षां फारसे अधिक श्रेष्ठ नाहीत अशा रानटी लोकांपासून तो परमेश्वरस्वरूपाच्या जवळ जवळ पोहोंचलेल्या मनुष्यापर्यंत सर्वास सारख्याच ममतेने त्याने पोटाशी धरिलें पाहिजे. प्रत्येक मनुष्यांत गुप्तपणे ईश्वरत्व वास करित आहे, हे त्याचे खरे स्वरूप त्याच्या अनुभवास आणणे हेच त्या धर्माचें काम असले पाहिजे. आपण असा धर्म जगास दिलात तर सारे जग आपलें अनुयायी होईल. अशोकाने अशा एकीकरणाचा प्रयत्न केला. परंतु तो एकट्या बौद्ध धर्मासच चिकटून राहिला. बादशहा अकबर याने या गोष्टीचा उपक्रम केला होता; परंतु त्याचे प्रमाण अगदीच अल्प होते. हे काम अमेरिकेनेच शेवटास न्यावे असा संकेत दिसतो.

{{gap}}हिंदूचें ब्रह्म, जरदुष्ट्राचा अहुर-मझद, बौद्धांचा बुद्ध, यहुद्यांचा यशाया आणि ख्रिस्ती लोकांचा आकाशस्थ पिता आपल्या या प्रयत्नास आशीर्वाद देवोत. धर्मकल्पनेचा तारा पूर्वेस उदय पावला व पश्चिमदिशेकडे संक्रमण करूं लागला. केव्हां त्याचा प्रकाश अंधुक तर केव्हां दैदीप्यमान दिसत होता. अशा रीतीने आपला प्रवास संपवून तो पुन्हां पूर्वदिशेकडे येत येत सँपो नदीच्या काठी आला आहे. येथे त्याच्या तेजाची परमावधि झाल्याचे दिसत आहे.

{{gap}}स्वतंत्रतेची जन्मभूमि जी कोलंबिया तिचा जयजयकार असो! ज्या कोलंबियाने आपले हात आपल्या शेजाऱ्याच्या रक्तांत कधीहि माखले नाहीत, ज्या कोलंबियाने शेजाऱ्यांना लुटून आपले खिसे कधीहि भरले नाहीत त्या कोलंबियाला मानवी कुलाच्या अत्युच्च संस्कृतीत साहेब नौबतीचा मान मिळावा हे योग्यच आहे. शांतताचिन्हांकित जरिपटका घेऊन कोलंबिया आज सर्वे राष्ट्रांच्या आघाडीस चालत आहे! कोलंबिया, तुझा त्रिवार जयजयकार असो?

{{rule|6em}}{{nop}}<noinclude></noinclude>
a3kmqkil3ey4nj7w5smopoje9yln36r
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/50
104
63320
229004
147097
2026-04-08T12:14:19Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229004
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२० |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>{{center|'''४. हिंदुलोकांस धर्मज्ञानाची उणीव नाही.'''}}
{{right|२० सप्टेंबर १८९३.}}
{{gap}}आपल्या वर्तनावर कांही टीका झाली तर ती सहन करण्यास प्रत्येक खऱ्या ख्रिस्तानुयायाने नेहमी तयार असले पाहिजे. मी आज अशा प्रकारची टीका करणार आहे आणि तीबद्दल आपणास कांहीं विषाद वाटणार नाही असे मला वाटते. ख्रिस्ती धर्माचे जे अनुयायी नव्हत अशा लोकांच्या आत्मोद्धारासाठी आपण जगभर उपदेशक पाठवितां त्याऐवजी आपण प्रथम त्यांचे मृत्यूपासून रक्षण करण्याची तजवीज केली तर अधिक बरे होणार नाही काय? हिंदुस्थानांत लहानसा दुष्काळ पडल्याबरोबर हजारों लोक मृत्युमुखीं जातात; आपण ख्रिस्ती ह्मणविणारांनी त्यांस वाचविण्याचा काही प्रयत्न केला आहे काय? साऱ्या हिंदुस्थानभर ख्रिस्ती देवळे उभारण्याबद्दल आपण फार दक्ष आहां; परंतु हिंदुस्थानाला आज धर्मज्ञानाची गरज आहे असे नाही. क्षुधेनें त्यांचे पोट आणि त्यांची पाठ यांची एकी झाल्यामुळे भाकरीचा एखादा तुकडा मिळेल या आशेने ते टाहो फोडित आहेत. ते भाकरी मागत असतां त्यांच्या पदरांत धोंडा बांधण्यासारखे आपण करित आहां. भुकेने प्राण व्याकूळ होत असतां कोरड्या धर्मज्ञानाने त्यांची भूक भागवू पाहणे ह्मणजे खरोखर त्यांचा अपमान करण्यासारखे आहे. हिंदुस्थानांत केवळ पैशासाठी धर्मज्ञानदानाचा जर कोणी उद्योग केला तर लोक खरोखर त्यांस शेणमार करतील. माझ्या बुभुक्षित बांधवांकरितां मी येथे याचना केली, परंतु ख्रिस्ती देशांत ख्रिस्ती लोकांकडून इतर जातीच्या लोकांकरितां मदत मिळविणे किती कठीण आहे याचा मला चांगलाच अनुभव आला.

{{rule|6em}}

{{center|'''५. बौद्धधर्म हा हिंदुधर्माची पुरवणी आहे.'''}}
{{right|२६ सप्टेंबर १८९३.}}
{{gap}}मी बौद्धधर्मी नाही हे आपणास विदितच आहे. तथापि मी बुद्धाचा खरा अनुयायी आहे हे मात्र खरे आहे. चिनी, जपानी अथवा सिलोनी लोक बुद्धानुयायी ह्मणवितात, परंतु हिंदु लोक त्याला प्रत्यक्ष परमेश्वराचा अवतार मानून त्याची पूजा करितात. बौद्धधर्मासंबंधी कांही टीकात्मक भाषण मी आज करणार आहे, परंतु त्यांत बुद्धावर टीका करण्याचा माझा उद्देश नाही. ज्याला परमेश्वरस्वरूप समजून मी भजतो त्याजवर टीका करण्यास मी धजेन तरी<noinclude></noinclude>
rxzy49lw0ro6kvd9cqhu9i1717i74ed
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/51
104
63321
229007
147447
2026-04-08T12:18:44Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229007
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|२१ }}
{{rule}}</noinclude>कसा? त्यावेळी जे बुद्धानुयायी झाले त्यांस बुद्धाचें खरें ज्ञान लाभले नाही, इतकेंच आमचें ह्मणणे आहे. यहुदी धर्म आणि ख्रिस्ती धर्म यांत जें परस्पर नातें आहे तशाच प्रकारचे नातें वैदिक हिंदुधर्म आणि बौद्धधर्म यांमध्ये आहे. येशु ख्रिस्त यहुदी होता. तसाच शाक्यमुनी हिंदु होता. यहुदी लोकांनी येशु ख्रिस्ताचा अत्यंत छळ केला इतकेच नव्हे तर त्यांनी त्यास क्रुसावर खिळून ठार मारिलें; परंतु हिंदूंनी शाक्यमुनी हा अवतार आहे असे मानून त्याचे पूजन केले. शाक्यमुनीने अगदी नवें असें कांही सांगितले नाही; तर वैदिकधर्मतत्वेंच त्याने अधिक स्पष्ट रीतीने प्रगट केली इतकेंच आम्हा हिंदु लोकांचे ह्मणणे आहे. यहुदी धर्म नष्ट करण्याकरितां नव्हे तर तो प्रत्यक्ष आचरून दाखवून त्यांत दिसणाऱ्या उणिवा भरून काढण्याकरितां ज्याप्रमाणे येशू ख्रिस्ताचा अवतार झाला, त्याच प्रकारच्या कार्यासाठी शाक्यमुनी अवतरला. येशू ख्रिस्ताची खरी ओळख तत्कालीन इतर लोकांस जशी पटली नाही, तशीच बुद्धाची खरी ओळख खुद्द त्याच्या अनुयायांस बरोबर पटली नाही. पूर्वीचा धर्म मोडून टाकून अगदी नव्या धर्माची स्थापना करावी हा बुद्धाच्या अवताराचा हेतु नसून वैदिकधर्माचा प्रत्यक्ष आचार कसा असतो आणि त्याच्या तत्वांना दृश्यस्वरूप कसे द्यावें हे दोखविण्याकरितां बुद्ध अवतरला.

{{gap}}हिंदुधर्माचे प्रमुख असे दोन भाग आहेत- कर्मकांड आणि ज्ञानकांड. होमहवनादि क्रियांचा विचार कर्मकांडांत प्रधान असून ज्ञानकांडांत तत्वविचार सांगितला आहे. संन्यस्तवृत्तीने राहणारे लोक केवळ ज्ञानकांडाचा विचार करितात.

{{gap}}या धर्मविचारांत जातिभेदास फांटा दिलेला आहे. अत्यंत उच्च जातीचा अथवा अगदीं नीच जातीचा असा कोणीहि मनुष्य असला तरी त्यागी होण्यास त्यास हिंदुस्थानांत आडकाठी नाही. दोघेहि खरे त्यागी झाले तर त्यांच्यांत कांहींच भेद मानण्यांत येत नाही. धर्ममार्गात जातीचा अथवा वर्णाचा भेद नाही. जात ही केवळ व्यावहारिक आचाराची बाब आहे. शाक्यमुनी स्वतः त्यागी होता. कालांतराने वेदांतील धर्मज्ञान गुप्त झाले होतें तें त्याने पुन्हां उज्वल स्वरूपाने लोकांस दाखविले. अत्यंत कनिष्ट दर्जाच्या मनुष्यापर्यंत हे ज्ञान पसरावे अशा उदार बुद्धीचा तो होता. धर्मप्रचारक तयार करून त्यांच्याकडून धर्मज्ञानाचा लोकांस उपदेश करण्याचा मार्ग बुद्धानेच प्रथम प्रचारांत आणिला.

{{gap}}प्रत्येक मनुष्याबद्दल, आणि विशेषेकरून प्रत्येक गरीब आणि अज्ञान मनुष्याबद्दल त्याच्या मनांत अनुपमेय प्रेम वसत होते. हाच त्याच्या एकंदर<noinclude></noinclude>
r8weh7v3bw9111eriqb61ukfd1021kt
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/52
104
63322
229010
147448
2026-04-08T12:21:11Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229010
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२२ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>चरित्रांतील अत्यंत उज्वल आणि रमणीय असा विशेष होय. कित्येक ब्राह्मण त्याचे शिष्य झाले होते. बुद्धाचा जन्म झाला त्यावेळी संस्कृत भाषा प्रचारांतून गेली होती. ती फक्त पुस्तकरूपाने जिवंत राहिली होती. त्याने सांगितलेलें धर्मज्ञान संस्कृतांत ग्रथित करावे अशी त्याच्या ब्राह्मण शिष्यांस इच्छा होऊन तसे करण्यास त्यांनी आपल्या गुरूची परवानगी मागितली. त्यावर बुद्ध ह्मणाला, "माझा जन्म माझ्या गरीब आणि अज्ञान बांधवांसाठी झाला आहे. याकरितां त्यांच्याच भाषेने त्यांस धर्मज्ञान सांगणे मला इष्ट वाटते." यामुळे बौद्धधर्माची बहुतेक पुस्तकें त्या वेळच्या प्रचलित भाषेत लिहिलेली आढळतात.

{{gap}}तत्ववेत्त्यांनी कोणत्याहि मताचे प्रतिपादन केले अथवा मानसशास्त्रवेत्त्यांनी कोणतेहि सिद्धांत सिद्ध केले, तरी जोपर्यंत मृत्यूचे साम्राज्य या भूतलावर कायम आहे, जोपर्यंत मानवी अंतःकरणांतून भीतीचे समूळ उच्चाटन झाले नाही, आणि जोपर्यंत दुर्बलतेमुळे आपणांस कोणाची तरी मदत असावी ही इच्छा मानवी हृदयांत शिल्लक आहे, तोपर्यंत परमेश्वरावरील भरंवसा जगांतून नष्ट होणारच नाही.

{{gap}}बुद्धानुयायांनी आपल्या धर्मप्रचाराच्या कार्यात दोन मोठ्या चुका केल्या. वेदांवर हल्ले करून जुन्या इमारतीचा पाया ढासळविण्याचा त्यांनी यत्न केला. परंतु वेदांवर हल्ला करून यश मिळवू पाहणे आणि खडक डोक्याने फोडण्याचा प्रयत्न करणे ही सारख्याच शहाणपणाची कामें आहेत. हीच त्यांची पहिली मोठी चूक झाली. तसेंच सामान्य कर्मसंगी जनतेचा परमेश्वरावरील भरंवस नाहीसा करण्याचा त्यांनी यत्न केला, ही दुसरी मोठी चूक त्यांजकडून घडली. याचा साहजिक परिणाम बौद्धधर्माचा हिंदुस्थानांतून नायनाट झाला हा होय. ज्या देशांत बौद्धधर्माचा जन्म झाला त्याच आर्यावर्तात आपणास बौद्ध ह्मणवून घेणारा एकहि इसम आज सांपडणार नाही!

{{gap}}परंतु यामुळे ब्राह्मणी धर्माचें मात्र थोडेंसें नुकसान झाले ही गोष्ट खरी. बौद्धधर्मामुळे खालच्या वर्गात झपाट्याने सुधारणा झाली. लोकांत परस्पर साहानुभूति आणि औदार्य यांची वाढ झाली. त्या वेळच्या एका ग्रीक प्रवाशाने हिंदूंत खोटे बोलणारा कोणी आढळत नाही व परद्वार करणारी अशी एकहि हिंदु स्त्री आढळत नाही, असें वर्णन लिहून ठेविलें आहे. यावरून त्यावेळचा हिंदुसमाज बुद्धाच्या अवतारामुळे किती उच्च पदवीस पोहोंचला होता, याची कल्पना येते. हेच कार्य पूर्वी ब्राह्मणधर्म करित होता; परंतु त्याचे कार्य बुद्धावताराने उचलल्यामुळे तो धर्म कांहीं काल मागे पडला ही गोष्ट खरी.{{nop}}<noinclude></noinclude>
lk4vcxkl2cd6hx2c8f4d4zzg0witwrc
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/53
104
63323
229011
147450
2026-04-08T12:24:02Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229011
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|२३ }}
{{rule}}</noinclude>{{gap}}तात्विकदृष्टया हिंदुधर्म आणि बौद्धधर्म यांचा इतका एकजीव झाला आहे की एकावांचून दुसऱ्यास जिवंत राहणे शक्य नाही. ब्राह्मणांनी पूर्णतेस आणिलेल्या तत्वविचारांचे साहाय्य असल्याशिवाय बौद्धधर्म मृतप्राय होणारच. तसेंच प्राणिमात्रावर दया करणे हा जो बौद्धधर्माचा विशेष त्याचें ब्राह्मणांनी ग्रहण केल्याशिवाय त्यांच्या कोरड्या ब्रह्मज्ञानाचें तेज कसे पडणार? या दोन धर्मानी निर्माण करून दिलेल्या दोन तत्वांचे एकीकरण कायम होते, तोंवर हिंदुसमाज संस्कृतीच्या अत्युच्च शिखरावर आरूढ झालेला दिसत होता; परंतु दुर्दैवाने ही दोन तत्वे भिन्न झाली आणि हिंदुसमाजाची भव्य इमारत कडाडून पडली. तीस कोटी भिकाऱ्यांनी आज हिंदुस्थान व्यापला आहे याचे कारण ही विभक्तताच. आज हजारों वर्षे वाटेल त्या जेत्याची आर्यभूमि दासी बनून राहिली आहे याचेहि कारण हेच. प्रिय बंधूंनो, इतका वेळ मी सांगितलेली गोष्ट ध्यानांत धरून आपण ब्राह्मणांची तेजस्वी बुद्धिमत्ता आणि बुद्धाचें दया आणि उदार अंतःकरण यांचे पुन्हां मिश्रण करूं या.

{{rule|6em}}

{{center|'''६. धर्मपरिषदेतील शेवटचे व्याख्यान.'''}}
{{gap}}कल्पनासृष्टीच्या उदरांतून सुरक्षितपणे बाहेर पडून सर्व-धर्मपरिषद् प्रत्यक्ष सृष्टीत अवतरली. ही परिषद् यशस्वी व्हावी ह्मणून ज्यांनी ज्यांनी अहेतुक चित्ताने अत्यंत परिश्रम केले त्यांच्या श्रमांचे दयाळु परमेश्वराने चीज केले. ज्यांच्या उदार अंतःकरणांत या परिषदेची प्रथम कल्पना उद्भवली व ज्यांनी तिला प्रत्यक्ष रूप दिले त्यांचे आभार मानणे उचित आहे. ज्यांनी भाषणे करून आपलें मनौदार्य व्यक्त केले त्यांचेहि आभार मानिले पाहिजेत. माझ्या भाषणाचे कौतुक करून ज्यांनी मला प्रोत्साहन दिले त्या माझ्या प्रिय श्रोतृगणाचेहि मी आभार मानितों. त्याच प्रमाणे प्रसंगास अनुचित अशी भाषणे कोणी केली असलींच तर त्यांचेहि आभार मानणें अवश्य आहे; कारण त्यामुळे तुलनात्मक दृष्टीने उचित भाषणांचें तेज अधिक उज्वलतेने पडण्यास मदतच झाली असें म्हटले पाहिजे.

{{gap}}सर्व धर्माचे एकीकरण कोणत्या तत्वांवर करता येईल याचा बराच ऊहापोह झाला. मी सध्या काही नवीन उपाय सुचविणार आहे असें नाहीं; परंतु एकाच धर्माचा पूर्ण विजय होऊन बाकीचे धर्म नष्ट व्हावे अशी जर कोणाची इच्छा असेल तर त्यास मला एवढेच सांगावयाचे आहे “बाबारे, तुझी इच्छा तृप्त<noinclude></noinclude>
7ftg2qfwlu22od9cj9t8skxdvkcbr0a
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/54
104
63324
229013
147451
2026-04-08T12:26:56Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229013
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२४ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>होणे अशक्य आहे. ख्रिस्त्यांनी हिंदुधर्म स्वीकारावा अशी इच्छा मी कां करावी, तसेंच हिंदूने अथवा बौद्धानें ख्रिस्ती व्हावें असें तरी मला कां वाटावें? ईश्वर करो आणि तसे न होवो!".

{{gap}}जमिनीत बीजारोपण केलें ह्मणजे त्या बीजाभोंवतीं पृथ्वी, पाणी आणि हवा यांचा पक्का गराडा असतो; ह्मणून पृथ्वी, पाणी आणि हवा यांपैकी कोणत्याहि एका पदार्थाचें रूप त्या बीजास प्राप्त होते काय? नाही. त्या बीजाचा वृक्षच निर्माण होतो. याचा अर्थ हाच की पूर्वसंकेताने ठरविलेल्या दिशेनेंच त्याची वाढ होते. पृथ्वी, पाणी आणि हवा यांतील पोषक द्रव्ये घेऊन त्यांचे रूपांतर करून, पाने आणि फुलें, तें बीज निर्माण करितं. तसेंच धर्माचेंहि आहे. हिंदूंचे ख्रिस्ती झाले अथवा ख्रिस्त्यांचे हिंदू झाले तर त्यांत कांही फायदा होण्याचा संभव नाही; परंतु एकमेकांच्या सहानुभूतीनें परस्परांत जे चांगले ह्मणून आढळेल तें परस्परांनी घेऊन आपल्या मूळ संस्कारांशी त्याचा एकजीव करून टाकिला पाहिजे. कोणीहि आपले स्वत्व विसरणे फायद्याचे नाही. अंतःकरणाचे पावित्र्य आणि मनौदार्य ही निर्माण करण्याचे सामर्थ्य कोणत्याहि एकाच विशिष्ट धर्मास आंदण दिलेले नाही, ही गोष्ट विशेषेकरून या परिषदेंत निःसंशय सिद्ध होऊन जगाच्या प्रत्ययास आली. अत्युच्च दर्जाची स्त्रीपुरुष सर्व धर्मात निर्माण झालेली आहेत, असा प्रत्यक्ष पुरावा दिसत असूनहि जर आपलाच धर्म तेवढा खरा व जगण्यास योग्य आणि बाकीचे धर्म नष्ट होण्यास योग्य असे कोणास वाटत असेल तर असल्या व्यक्ति केवळ अनुकंपनीय मात्र होत. त्यांस माझें एवढेच सांगणे आहे की “मित्रांनो, इतर धर्म बुडविण्यासाठी तुह्मीं भगिरथ प्रयत्न केला तरी इतःपर 'शांतता, परस्पर मदत, आणि मित्रभाववृद्धि' या त्रिपुटीने अंकित केलेली निशाणे घेऊन सर्व धर्म सारख्याच जोमाने पुढे सरसावणार आहेत."

{{rule|6em}}

{{center|'''आत्मा, परमेश्वर आणि धर्म.'''}}
{{gap}}कित्येक शतकांपूर्वी विश्वांत उमटलेला ध्वनि काळाच्या पोटांतून प्रवास करित करित आपणापर्यंत येऊन पोहोचला आहे. निर्जन अरण्यांत आणि हिमाचलाच्या गुहांत वास करणाऱ्या ऋषिवर्यानी पाठविलेला निरोप आपणापयेत येऊन पोहोचला आहे. जो ध्वनि भगवान् बुद्धाच्या मुखांतून बाहेर पडला, जो ध्वनि अनेक वेळां अनेक रूपांनी अनेकांच्या मुखांतून प्रगट झाला, जगा-<noinclude></noinclude>
nwg38za8kw6lrwqfd3p4wxpbeilvk0g
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/55
104
63325
229016
147453
2026-04-08T12:30:15Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229016
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|२५ }}
{{rule}}</noinclude>च्या आरंभापासून जो ध्वनि मनुष्याबरोबर सहचर आहे, तोच ध्वनि चालू क्षणी आमच्याजवळ उमटत आहे. उच्च पर्वतांत उगम पावणाऱ्या झऱ्यासारखा तो ध्वनि आहे. ज्याप्रमाणे तो झरा कित्येक ठिकाणी गुप्त होऊन पुन्हां प्रगट होतो, व मध्यंतरी त्याचे पाणी कोठे कमी झालेले तर कोठे इतर प्रवाह मिळून अधिक झालेले असते, त्याचप्रमाणे हा ध्वनि केव्हां सूक्ष्म तर केव्हां प्रचंड, कधी अगदी गुप्त तर केव्हां पूर्णपणे प्रगट झाला. पर्वताच्या शिखरावर जन्म पावलेला लहानसा झरा ज्याप्रमाणे दुसऱ्या लहान लहान ओढ्यांस आपल्याशी संयुक्त करून घेत घेत शेवटी प्रचंड नदाचे स्वरूप पावतो, त्याचप्रमाणे काळाच्या अनंतत्वांत प्रगट झालेला हा सूक्ष्म ध्वनि सर्व राष्ट्रांतील स्त्रीपुरुषांच्या मुखांतून निघणाऱ्या लहान लहान ध्वनींस आपल्याशी मिळवून घेऊन आतां पूर्णत्वाने प्रगट होऊ पहात आहे. या ध्वनीने जो प्रथम निरोप आणिला तो असा:- 'सर्वत्र मित्रभाव, सर्व धर्माचा विजय.' सर्व धर्मातील शत्रुभाव नष्ट होऊन सर्वांचे शेवटी एकीकरण होणार असें या ध्वनीने सूचित केले आहे. या निरोपाचा अर्थ काय हे समजण्याचा आपण प्रयत्न करूं.

{{gap}}एकोणिसाव्या शतकाच्या आरंभी भौतिकशास्त्रांची जी प्रचंड लाट उसळली तिच्या सपाट्यांत सांपडून सर्व धर्म रसातळास जातात की काय अशी भीति वाढू लागली होती. नव्या शास्त्रांनी सुरू केलेल्या घणाच्या तडाक्याखाली जुन्या धर्मकल्पना कांचेच्या भांड्याप्रमाणे कडाकड फुटू लागल्या. धर्म ह्मणजे अर्थशुन्य बडबडीचे पोतडें आहे की काय असें ज्यांस वाढू लागले त्यांची स्थिति अत्यंत अंधकारमय आणि निराशाजनक दिसू लागली. एखाद्या बुळबुळीत पदार्थास अधिक दाबून धरूं लागले असतां तो जसा अधिक सपाट्याने लांब निसटून जातो त्याप्रमाणे एक एक धर्मकल्पना सपाट्याने लांब लांब जाऊं लागली. अज्ञेयवाद आणि चार्वाकमत यांचे प्राबल्य होऊन त्यांच्या हल्ल्याने जुन्या धर्माची इमारत इतकी खिळखिळीत झाली की, ती लवकर जमिनदोस्त होणार अशी चिन्हें उघड दिसू लागली. जे कोणी जुन्या मताचे होते त्यांस आपली मतें बोलून दाखविण्याचेंहि धैर्य होईनासे झाले. आतां जुना धर्म जगणे शक्य नाही अशी बहुतेकांची खात्री झाली होती. परंतु ही स्थिति बदलत जाणार, असे वाटू लागले आहे. हा फरक होण्यास काय कारणे झाली याचा आपण विचार करूं. निरनिराळ्या प्रचलित धर्माचा तुलनात्मक अभ्यास करण्याची प्रवृत्ति वाढू लागली हे पहिले मोठे कारण आहे. मी लहान वयाचा<noinclude></noinclude>
9j5xy4r0olo53f3abqzjz75omc4d1ms
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/56
104
63326
229021
147454
2026-04-08T12:34:31Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229021
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२६ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>असतां या निराशामय स्थितीने मलाहि पछाडलें होतें. धर्मात काही तात्पर्य नाही असे मलाहि वाटू लागले होते; परंतु माझें सुदैव ह्मणून बायबल, कुराण आणि बौद्धधर्माची पुस्तके यांचा मी अभ्यास केला. त्या वेळी माझ्या हिंदुधर्मात सांगितलेली प्रमुख मूलतत्वेंच इतर धर्मातहि आहेत असे मला आढळून आले. त्या वेळी अनेक प्रकारची विचारपरंपरा माझ्या चित्तांत उभी राहिली. मी विचार करूं लागलों की, जगांत 'सत्य' तरी काय आहे? प्रथम हे दृश्य जग सत्य आहे काय? होय. हे सत्य असलेच पाहिजे. कारण, याचा मला प्रत्येक क्षणीं ज्याअर्थी अनुभव येत आहे त्याअर्थी तें खोटें कसें ह्मणावें? आतांच आपण जें संगीत ऐकिलें तें खरें काय? होय. ते अगदी खरें. कारण तें आपण आपल्या कानांनी स्वतः ऐकले. प्रत्येक मनुष्याला शरीर, डोळे आणि कान इत्यादि बाह्येद्रिये आहेत. या बाह्येद्रियांनी त्यास बाह्य जगाचा अनुभव घेऊन खऱ्याखोट्याची निवड करता येते. ज्याप्रमाणे मनुष्यमात्रास बाह्येद्रियें आहेत त्याचप्रमाणे त्यास अतींद्रियत्वहि आहे. त्याच्या चैतन्याचे स्वरूप काय आहे हे आपणांस आपल्या चर्मचक्षूनी दिसत नाही. या आपल्या चैतन्यास चालन देऊन मनुष्य विचार करूं लागला असतां त्यास एक गोष्ट निःसंशय आढळून येईल. कोणताहि धर्म, मग तो अरण्यांत ऋषींनी सांगितलेला असो, अथवा ख्रिस्ती देशांत सर्व मनुष्यांपुढे सांगितलेला असो, एकाच प्रकारच्या मूलभूत तत्वांवर रचिला आहे अशी त्याची निःसंशय खात्री होईल. यावरून असें सिद्ध होतें की धर्मविचार हा कोणत्याहि काली व कोणत्याहि स्थली असलेल्या मनुष्यमात्राच्या मनाचा नेहमी आढळणारा एक घटक आहे. एका धर्माच्या सत्यतेकरितां अनेक धर्माची सत्यता सिद्ध व्हावी लागते. अनेक ठिकाणी एकच गोष्ट एकाच प्रकारची आहे असे आढळून आले ह्मणजे आपण त्या गोष्टीचे निश्चित स्वरूप अमूक असें ठरवितो. समजा, की मला सहा बोटें असली आणि आपण निरीक्षणार्थ हाती घेतलेल्या माझ्या जातीच्या पंचवीस प्राण्यांस पांचच बोटें आढळली तर मी तेवढ्यापुरता सृष्टिबाह्य प्राणी आहे असें ह्मणणे चुकीचे होणार नाही. तसेंच एकच धर्म खरा आणि बाकीचे खोटे हे ह्मणणेहि खोटेंच आहे. एकच धर्म असणे हे सहा बोटांच्या प्राण्यासारखेच सृष्टिबाह्य आहे असामान्य आहे. याच न्यायाने जगांतील कोणताहि एक धर्म खरा म्हटला तर बाकीचे खरे असलेच पाहिजेत. कांहीं किरकोळ बाबतीत त्यांत फरक आढळेल परंतु प्रमुख तत्वे सर्वांत सारखींच सांगितली आहेत. जर मला पांच बोटे असणे<noinclude></noinclude>
kt1l9vbp6hgafdo6guduqnni1cbzehl
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/57
104
63327
229022
147456
2026-04-08T12:38:04Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229022
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|२७ }}
{{rule}}</noinclude>हे सृष्टीस अनुरूप असेल तर आपणा सर्वांस पांच बोटें असणे हेहि अनुरूपच मटले पाहिजे.

{{gap}}मनुष्यप्राणी कोणत्याहि काली आणि कोणत्याहि स्थली असो, त्याची आस्तिक्यबुद्धि जागृत झालीच पाहिजे. त्याचे चैतन्य जागृत झालेच पाहिजे. एका व्यक्तीच्या देहांत गडबड करतांना आढळतो तो कोण आणि साऱ्या विश्वांत प्रत्यक्ष दृश्यमान होणाऱ्या चैतन्याचे स्वरूप काय अशा प्रकारच्या प्रश्नांनी त्याच्या चित्तांत केव्हांना केव्हां तरी गोंधळ उडवून दिलाच पाहिजे. अशा प्रश्नपरंपरेस तो उत्तरे शोधू लागला ह्मणजे निरनिराळ्या तीन पायऱ्यांवरून त्यास या उत्तराकरितां चढावे लागते. नेहमी बदलत जाऊन शेवटीं नष्ट होणाऱ्या या शरीराशिवाय न बदलणारा असा आणखी एक निराळाच अंश प्रत्येक प्राण्यांत आहे ही गोष्ट सर्व धर्मानी कबूल केली आहे. हा अंश अविभाज्य, नित्य आणि केव्हांहि न बदलणारा असा आहे. ही एक पायरी झाली. हा अंश केव्हांहि मरत नाही ही गोष्ट खरी, परंतु तो पूर्वी केव्हां तरी एके काळी जन्मास आला असला पाहिजे असा सिद्धांत कित्येक धर्मानी प्रतिपादिला आहे. ही दुसरी पायरी झाली. परंतु जे जन्मास आले- नवीन उत्पन्न झाले त्याचा शेवट केव्हां ना केव्हां तरी होणारच हे उघड आहे. जन्म म्हटला की मृत्यु आणि आरंभ म्हटला की शेवट, या कल्पना आपोआपच मनांत उभ्या राहतात. हे कल्पनायुग्म अविभाज्य आहे. याकरितां आपणांतील जो चैतन्यांश आहे त्याला आरंभ असा कधी झालाच नाही, आणि ह्मणूनच तो कधी मरणार नाही ही गोष्ट खरी. तसेंच दृश्यतेस आलेल्या या चैतन्याशिवाय आणखी एक न मरणारे असें महत् चैतन्य आहे, त्यास परमेश्वर अथवा परमात्मा अशी संज्ञा आहे. ही तिसरी पायरी झाली. मनुष्ययोनीचा आरंभ- सृष्टीचा आरंभ- असे शब्द जेव्हां आपण ऐकतों, तेव्हां 'आरंभ' या शब्दाने एका युगकालाच्या आरंभाचा बोध होतो असें समजावें. सृष्टीची व्यक्तदशा संपून कांहीं काल ती अव्यक्त स्थितीत राहते व नंतर पुन्हा ती व्यक्त होते. या दुसऱ्या व्यक्त होण्याच्या कालीं नव्या युगाला आरंभ होतो. 'आरंभ' या शब्दाने सर्व विश्वरचनेचा आरंभ असा अर्थ ध्वनित होतो असे समजू नये. 'ज्याला आरंभ आहे त्याला शेवट निश्चित आहे.' हा सिद्धांत आपण नीट ध्यानांत धरा. '''“न त्वेवाहं जातुनासं न त्वं नेमे जनाधिपाः । न चैव न भविष्यामः सर्वे वयमतःपरम् ॥"''' या शब्दांनी भगवान् श्रीकृष्णांनी गीतेंत हाच सिद्धांत सांगितला आहे. तुमच्या देहाचा अंत केव्हांना केव्हां तरी होणारच; परंतु आत्म्याचा अंत मात्र कधीहि होणार नाही.{{nop}}<noinclude></noinclude>
jayjmdwr0zli7dhmap34ly5o06g64n5
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/58
104
63328
229023
147458
2026-04-08T12:41:36Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229023
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२८ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>{{gap}}जीवात्म्यासंबंधी जशा या कल्पना प्रचलित झाल्या तशाच दुसऱ्या प्रकारच्या कांही कल्पना त्याच्या पूर्णत्वासंबंधी प्रचलित झाल्या. आत्मा हा स्वतः पूर्ण आहे. हे त्याचे पूर्णत्व नव्या करारासही मान्य आहे. मनुष्य हा आरंभी पूर्ण होता, आणि आपल्या वाईट कृत्यांनी पापी झाला; परंतु पुण्यकृत्यांनी, पुन्हां त्याची मूळची पदवी त्यास प्राप्त होईल असें नवा करार सांगतो. इतर कित्येक धर्मातून हीच गोष्ट, केव्हां गोष्टींच्या, केव्हां रूपकांच्या आणि केव्हां विशिष्ट खुणांच्या रूपानें सूचित केली आहे. या सर्व गोष्टींचे आणि रूपकांचे आपण पृथक्करण केले तर आपणास असे आढळून येईल की, जीवात्मा हा स्वभावतः पूर्ण असून त्यास त्याचे पूर्वीचे पावित्र्य पुन्हां मिळविता येईल, ही गोष्ट सर्वांस संमत आहे. ही गेलेली पूर्णता पुन्हां कशी मिळविता येईल अशा प्रश्नास “परमेश्वरास जाणल्याने.” हे उत्तर सर्व धर्मानी दिले आहे. पुत्राची (येशूची) भेट घेतल्याशिवाय परमेश्वराची भेट होणार नाही, असें बायबलांत ह्मटले आहे. यावरून परमेश्वराची भेट करून देणे हेच प्रत्येक धर्माचे साध्य- ध्येय-आहे असें ह्मणतां येईल. परमेश्वराच्या भेटीचे मार्ग त्यांनी निरनिराळे सांगितले असतील ही गोष्ट स्वतंत्र आहे. वर बायबलांतील वचन दिले त्याचा वास्तविक अर्थ असा आहे की पुत्रास शोभण्यासारखी कृति करावी तेव्हां पित्याची भेट होते. आपल्याच कृतीने मनुष्य अवनत झाला आहे हे ह्मणणे विशेषतः प्रत्येकानें ध्यानात ठेविलें पाहिजे. ज्या ज्या वेळी आपणावर दुःखदायक प्रसंग येतात, त्या त्या वेळी आपल्याच कर्माचा हा परिपाक आहे ही गोष्ट ध्यानांत आणून परमेश्वरास दोष देऊ नये. याच कल्पनांशी अत्यंत संयुक्त अशी पुनर्जन्माची कल्पना प्रसार पावली होती. परंतु युरोपियन लोकांनी तिची पुढे मोडतोड केली.

{{gap}}तुमच्यांपैकी कित्येकांच्या कर्णपथावरून ही कल्पना गेली असेल आणि कित्येक वेळां तुह्मी तिची उपेक्षा केली असेल. आत्म्याच्या अमरत्वाच्या कल्पनेच्या अत्यंत साहचर्याने असणारी अशी ही पुनर्जन्माची कल्पना आहे. जिचा एके वेळी पूर्ण नाश होतो, अशा वस्तूला केव्हांना केव्हां तरी आरंभ झाला असलाच पाहिजे; तसेंच एखाद्या वस्तूचा आरंभकाल निश्चित करतां येत असला तर केव्हांना केव्हां तरी तिचा अंत झालाच पाहिजे. जर जीवात्मा कधीं मरत नाही हें खरें मानले, तर तो केव्हां तरी जन्म पावतो त्याला आरंभ होतो- हें मानणे अत्यंत धार्ष्ट्याचे आहे. जीवात्मा हा पूर्ण स्वतंत्र आहे ही गोष्ट पुनर्जन्माच्या कल्पनेनेच सिद्ध होते. कोणत्या तरी एका काली जीवात्मा नवीन उत्पन्न<noinclude></noinclude>
1mretxc3sd7znjcsqvoy3gifhqaufy3
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/59
104
63329
229024
147459
2026-04-08T12:54:56Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229024
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|२९ }}
{{rule}}</noinclude>झाला- त्याला आरंभ झाला- असें मानिले तर मनुष्यांत दृष्टोत्पत्तीस येणाऱ्या पापवृत्तीचा सर्व बोजा परमात्म्याच्या- ईश्वराच्या- डोक्यावर बसतो! अत्यंत पवित्र परमेश्वराने पापी मनुष्यांस जन्म दिला असें ह्मणणे भाग पडतें ! जर जगांत दिसणाऱ्या पापाचा मूळ कर्ता परमेश्वर असता तर जगांतील सर्व व्यक्ति एकसारख्या दुःखी असावयास पाहिजे होत्या. अत्यंत न्यायी अशा परमेश्वराच्या राज्यांत त्यानेच उत्पन्न केलेल्या जीवांस कमी अधिक शिक्षा व्हावी हे योग्य आहे काय? लक्षावधि लोक प्रत्यहीं पायाखाली केरासारखे तुडविले जावे, हजारों निरपराधी लोक क्षुधेला बळी पडावे, या गोष्टी किती चमत्कारिक आहेत! मनुष्यप्राणी आपल्या कर्मानुरूप दुःख भोगित नाही, असें ह्मटलें तर या सर्व दुःखाचे जनकत्व परमेश्वराकडे येते! तर, जगांतील दिसणाऱ्या दुःखास ज्याचा तो कारण आहे हेच ह्मणणे युक्तीस धरून आहे. कर्म करणारा जर मी तर त्यापासून उत्पन्न होणाऱ्या फलाची जबाबदारी माझ्याच माथीं मारावयास नको काय? दुःखोत्पत्ति होणारी कर्मे जशी मला करतां येतात तशीच सुखोत्पादक कर्मे करण्याचीहि मला पूर्ण मुभा आहे. कोणतेंहि कर्म करण्यास अथवा न करण्यास मी पूर्ण स्वतंत्र आहे. मला कर्म करण्यास लावणारा असा कोणीहि नाही ही गोष्ट आपण नित्य लक्षांत बाळगिली पाहिजे. या करितांच नशीब अथवा दैव असे जे शब्द वारंवार आपण ऐकतों ते अगदी अर्थशून्य आहेत हे आपल्या लक्षात आलेच असेल. कोणतेंहि बरें अथवा वाईट फळ मिळत असले तर ते आपल्याच कृतींतून आपल्याच इच्छेनें निर्माण झाले आहे, हा निश्चित सिद्धांत समजावा. याकरितां दु:ख भोगणे अथवा त्यांतून मुक्त होणे हे सर्वथा माझ्याच इच्छेवर अवलंबून आहे. '''“ सुखस्य दुःखस्य न कोऽपि दाता । परो ददातीति कुबुद्धिरेषा ॥"''' हा सिद्धांत मनुष्यमात्राने सदैव थ्यानांत बाळगिला पाहिजे.

{{gap}}पुनर्जन्माच्या मताविषयी जे काही मी आतां सांगणार आहे त्याकडे विशेष लक्ष्य पुरविण्याची मी आपणास विनंति करितो. आपणास कोणत्याहि पदार्थाचें जें ज्ञान होतें तें अनुभवजन्य असते; आणि ज्याला आपण अनुभव ह्मणतों त्या स्थितीचे वास्तविक स्वरूप ह्मणजे स्मरण होणे हे होय. अनुभव आणि स्मरण हे वस्तुतः समानार्थक शब्द आहेत. उदाहरणार्थ, एखादा मनुष्य सतार वाजवित असतो त्यावेळी कोणत्या पडद्यावर बोट ठेविलें ह्मणजे कोणत्या स्वराची उत्पत्ति होते याचे स्मरण त्यास असते. त्यासच आपण ज्ञान ह्मणतों. हे ज्ञान पूर्वी<noinclude></noinclude>
hoagaadwij3b61svanb1msu62oefrl4
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/60
104
63330
229025
147460
2026-04-09T09:56:18Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229025
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|३० |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>कानांनी जें स्वर ऐकिले त्यांच्या अनुभवाची पुनरावृत्ति होय. कोणीहि मनुष्य नवीनच सतार वाजविण्यास शिकत असतो तेव्हां प्रत्येक पडदा दृष्टीने पाहून आणि पूर्वीच्या अनुभवाचे स्मरण करून त्यास त्या अनुभवाप्रमाणे बोटे ठेवावी लागतात. बऱ्याच कालाच्या प्रयत्नाने शेवटी त्याच्या बोटांस इतकी संवय लागते की, ती योग्य पडद्यांवरून आपोआप फिरूं लागतात. ही क्रिया इतक्या साहजिक रीतीने आणि झपाट्याने होते की, आपण पूर्वीच्या अनुभवाच्या-ज्ञानाच्या स्मरणाने वाजवित आहों ही गोष्ट खुद्द वाजविणाराच्याहि लक्ष्यांत येईनाशी होते. त्याचप्रमाणे आपणा मनुष्यांमध्ये जे कित्येक संस्कार अथवा मनोवृत्ति जन्मतःच आढळतात, त्या पूर्वीच्या संवयींमुळे उत्पन्न झालेल्या असतात. एखाद्या तान्ह्या मुलांतहि विशिष्ट मनोवृत्ति असल्याचे आपल्या नेहमी अनुभवास येते; या मनोवृत्ति कोठून उत्पन्न होतात? या जन्मींचा अनुभव ह्मणावा तर ते बिचारें आपल्या खोलीतूनहि पुरते बाहेर गेलेले नसते. यावरून मूल जन्मास येते तेव्हां अगदी कोऱ्या मनाने येते असे वाटत नाही. पूर्वानुभवजन्य अशा विशिष्ट मनोवृत्ति ते बरोबर घेऊन येतें असें ह्मणावे लागते.

{{gap}}प्रत्येक मुलास विशेष मनोवृत्ती जन्मतःच असतात, ही गोष्ट जुन्या ग्रीक
आणि इजिप्शियन तत्त्ववेत्त्यांना मान्य होती. पूर्वजन्मी त्याने जी कृत्ये केली त्यांचाच परिपाक मनोवृत्तींत होऊन नव्या जन्माबरोबर त्या पुन्हां व्यक्त होऊ लागतात. पुनर्जन्म आहे असें मानिल्यावांचून या प्रश्नाचा समाधानकारक निकाल लागणे शक्य दिसत नाही. अत्यंत हट्टी अशा चार्वाकमतवाद्यालाहि पुनर्जन्म कबूल करणे भाग पडेल. पूर्वकाली होऊन गेलेल्या अनेक महात्म्यांस आणि तत्त्ववेत्त्यांस पुनर्जन्माची कल्पना मान्य होती. खुद्द येशु ख्रिस्ताला ही कल्पना मान्य होती. ख्रिस्त ह्मणतो “पूर्वीचा जो आब्राहाम तोच मी.” ( Before Abraharn was, I am.)

{{gap}}हल्ली निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या स्वरूपाने ज्या अनेक धर्माची वाढ झाली आहे त्यांचे जन्मस्थान आशियाखंड आहे आणि त्या धर्मातील भावार्थ आशियांतील लोकांस जितका चांगला समजतो तितका तो इतरांस कळत नाही. हे धर्म आशियांतून बाहेर इतरत्र संचार करूं लागल्यानंतर त्यांत चुकीच्या मतांची भेसळ झाली. ख्रिस्ती धर्मातील अत्यंत उदार आणि उच्च तत्त्वे युरोपियन लोकांस कधीच नीटशी समजली नाहीत. बायबल प्रथम ज्यांनी लिहिले त्यांनी ज्या कल्पना प्रचलित करण्याचा यत्न केला व कित्येक वेळां त्यांकरितां<noinclude></noinclude>
luhyjvwn661cosajqksb5nj4c2cdb7v
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/61
104
63331
229026
148986
2026-04-09T09:59:20Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229026
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|३१ }}
{{rule}}</noinclude>ज्या चिन्हांची योजना केली, त्या कल्पना आणि ती चिन्हें युरोपियन लोकांस अगदी अपरिचित होती. ख्रिस्ताची आई मेरी हिची युरोपियन लोकांनी काढिलेली चित्रेच आपण उदाहरणार्थ घेऊ. प्रत्येक चिताऱ्याने स्वतःच्या कल्पनेस अनुसरून हे चित्र तयार केल्यामुळे निरनिराळ्या चित्रांवर अनेकविध मनोवृत्तींची छाया दिसून येते. येशू ख्रिस्ताच्या शेवटच्या भोजनप्रसंगाचे चित्र पुष्कळांनी काढिलेले मी पाहिले आहे. या चित्रांत ख्रिस्त टेबलाशी बसल्याचे दाखविले आहे. वास्तविक ख्रिस्ताने टेबलाचा उपयोग जेवण्याकरितां केव्हांहि केला नव्हता. कोणत्याहि राष्ट्रांतील लोकांना परकीयांच्या चालीरीतींचें यथार्थ ज्ञान होणे बहुधा अशक्य आहे. ग्रीक, रोमन आणि इतर राष्ट्रांच्या अनुषंगाने ज्यांत अनेक प्रकारची भेसळ झाली आहे अशा जुन्या यहुदी लोकांच्या चाली युरोपियनांस नीटशा समजल्या नाहीत ही आश्चर्याची गोष्ट नाही. अनेक दंतकथा आणि काल्पनिक गोष्टी यांनी वेष्टून गेलेल्या येशूच्या तत्त्वज्ञानाची नीटशी ओळख युरोपियन लोकांस न झाल्यामुळे त्यांनी सध्याचा आपल्या वणिग्वृत्तीस साजेसा ख्रिस्तिधर्म निर्माण केला यांत आश्चर्य नाही. असो. आतां हे विषयांतर बाजूस ठेवून आपण आपल्या पहिल्या मुद्दयाकडे वळू.

{{gap}}आत्मा अमर आहे व आपल्याच कृतीनें तो मलिन झाल्यासारखा दिसतो ही गोष्ट सर्व धर्मास कबूल असल्याचे प्रथम सांगितलेच आहे. आतां ईश्वर अथवा परमात्मा ह्मणजे काय, याबद्दल निरनिराळ्या धर्माच्या काय कल्पना आहेत, त्या पाहूं. अगदी जुन्या काळची परमेश्वराबद्दलची कल्पना अत्यंत अस्पष्ट अशी आहे. जुन्या काळच्या राष्ट्रांत सूर्य, पृथ्वी, अग्नि इत्यादि अनेक प्रकारच्या देवता मानिल्या जात असत. अशाच प्रकारच्या अनेक देवता आपआपसांत मोठमोठी युद्धेहि करित असत, असे जुन्या यहुदी दंतकथांवरून दिसून येते. यानंतर बाबिलोनियन आणि यहुदी लोकांचा इलोहिम देव आढळतो. यानंतर अनेक देवतांची कल्पना कमी होत जाऊन त्या जागी एखाद्या देवास अग्रपूजेचा मान मिळू लागला. परंतु हा मुख्य देव प्रत्येक जातीचा निराळा असे. आपलाच देव सर्वात मोठा असें प्रत्येक जातीने ह्मणावें आणि हा मोठेपणा सिद्ध करण्याकरितां कित्येक वेळां या निरनिराळ्या जातींत लढायाहि होत असत. लढाईत ज्या जातीचा जय होई तिचा देव मोठा असे समजण्यांत येई. या सर्व जाती बहुधा रानटी होत्या. परंतु या निरनिराळ्या कल्पनांचा क्षय होत होत त्यांऐवजी अधिक उदार आणि अधिक उच्च अशा कल्पनांचा प्रादुर्भाव होऊ<noinclude></noinclude>
gh2lub1k18mgansiw84e4fbnyr3ey38
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/62
104
63332
229027
148987
2026-04-09T10:02:22Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229027
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|३२ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>लागला आहे. या जुन्या कल्पना नष्ट होत होत आतां पूर्णपणे नाहीशा होणार अशी चिन्हें दिसू लागली आहेत. पृथ्वीवर सध्या जे मुख्य धर्म दिसत आहेत ते शेंकडों वर्षे वाढत असलेल्या वृक्षाची फळे आहेत. त्यांतला एकहि धर्म आकाशांतून पडून पृथ्वीवर सांवरला असें नाही. त्यांपैकी प्रत्येकाची अनेक पुण्यपुरुषांनी थोडी थोडी जोपासना करून त्यास सांप्रतच्या दर्शनीय स्वरूपास आणिलें आहे.

{{gap}}यानंतर सर्वशक्तिमान् व सर्वज्ञ अशा परमेश्वराची कल्पना उदयास आली. या सर्व विश्वाचा चालक एकच परमेश्वर आहे. या कल्पनेचा उदय झाला. हा परमेश्वर विश्वाच्या बाहेर कोठे तरी अंतराळांत राहतो अशी समजूत झाली. ही कल्पना ज्यांनी प्रथम प्रचारांत आणिली, त्यांनी स्वतःच्या लहरीप्रमाणे त्या परमेश्वराचे स्वरूप अनेक प्रकारचे कल्पिलें आहे. त्याला उजवें आणि डावें अंग आहे असे कोणी सांगतात, इतकेच नव्हे तर त्याच्या हातांत एक पक्षी आहे अशीहि कोणाची कल्पना धांवते; तथापि एवढी गोष्ट खरी की, निरनिराळ्या जातींचे निराळे देव नाहीसे होऊन त्यांऐवजी एका विश्वबाह्य देवाची योजना केली गेली तरी येथपर्यंत देवाचे अस्तित्व विश्वबाह्य होते. पुढे ही कल्पनाहि बदलत जाऊन अंतर्यामी आणि सर्वव्यापी परमेश्वराची कल्पना तिच्या जागी आली.

{{gap}}'आमचा पिता, जो आकाशांत राहतो' असें एक वाक्य नव्या करारांत आहे, याचा अर्थ, परमेश्वर मनुष्यांहून निराळा असून अंतराळांत कोठे तरी राहतो, असा होतो; परंतु यापुढे ही कल्पना थोडी बदलून तिच्याऐवजी परमेश्वर अंतराळांत आणि पृथ्वीवर राहतो अशी कल्पना आढळते. हिंदुतत्वज्ञानांत परमेश्वराचे अस्तित्व मनुष्यांत असल्याचे सांगितले आहे; इतकेच नव्हे तर हिंदूंचा अद्वैतवाद याच्याहि पुढे जाऊन पूजक मनुष्य आणि पूजनीय परमेश्वर हे एकच आहेत असे सांगतो. पूजक मनुष्य ह्मणजे परमेश्वरानेच घेतलेले एक सोंग आहे. जें जें सत्य ह्मणून माझ्या ठिकाणी आहे तें तें परमेश्वराचे स्वरूप आहे, आणि परमेश्वर स्वरूपांत में सत्य तेंच माझ्या ठिकाणी व्यक्त झाले आहे असें पूजक शेवटी ह्मणूं लागतो. परमेश्वर आणि मनुष्य यांतील जमीन अस्मानाचें अंतर याप्रमाणे कमी होत जाऊन शेवटी मनुष्य आणि परमेश्वर एक झाल्याचे आढळून येतें. परमेश्वरास जाणले असतां आकाशांतील परमेश्वर आपल्याच अंतर्यामी आहे असा अनुभव येतो.{{nop}}<noinclude></noinclude>
ekp29ouh0drlpqfxz2gfbg2l1zpqaky
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/63
104
63333
229028
148988
2026-04-09T10:05:28Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229028
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|३३ }}
{{rule}}</noinclude>{{gap}}मी निराळा आणि परमेश्वर निराळा असें द्वैत जेव्हां आरंभी मानवी हृदयांत असते तेव्हां मी ह्मणजे अमुक एक गोमाजी आहे व अनंतकालपर्यंत मी गोमाजीच राहणार असें त्यास वाटत असते. देहावरील त्याची ममता इतकी पक्की असते की, आंतील आत्म्याच्या स्वरूपाकडे त्याचे लक्ष्यच जात नाही व यामुळे 'मी' ह्मणणाराचे खरे स्वरूप देहाहून कांहीं निराळंच असेल की काय, अशी नुसती शंकाहि त्यास येत नाही. यामुळे देहाध्यासाने एखाद्या खुनी मनुष्याचीहि अनंतकालपर्यंत खुनीच राहीन असें ह्मणण्यापर्यंत मजल जाण्याचा संभव आहे. परंतु या देहाध्यासाचे परिणाम दुःखप्रद आहेत असें हळू हळू त्याच्या लक्ष्यांत येऊन त्यापासन पराङ्मुख होऊन तो कालेकरून आपल्या आरंभींच्या अॅडमच्या पवित्र स्थितीस परत जातो.

{{gap}}'ज्यांचें अंतःकरण शुद्ध आहे ते परमेश्वरास पाहतील.' परमेश्वरास आपण पाहूं ही गोष्ट शक्य आहे काय? नाही. खास नाही. तसेंच परमेश्वरास आपणास जाणतां येईल ह्मणावें तर तेंहि शक्य दिसत नाही. जर अमुक हा परमेश्वर असें दाखवितां आले तर त्याच क्षणी त्याचे परमेश्वरत्व ह्मणजे सर्वव्यापित्व नष्ट होते याची वाट काय? परंतु 'मी आणि माझा पिता एकच आहों' असे जे बायबलांत म्हटले आहे ते मात्र खरें; कारण परमेश्वरस्वरूप पाहतां आलें नाही अथवा जाणतां आलें नाहीं तरी त्याचा अनुभव अंतर्यामी होणे हे युक्तीस सोडून नाही. पाहणे अथवा जाणणे असें ह्मटले ह्मणजे तें दृश्य अथवा ज्ञेय विशिष्ट मर्यादेने व्याप्त आहे असे होते; आणि परमेश्वरस्वरूप मर्यादित असणे शक्य नाही. कित्येक धर्मात ही कल्पना स्पष्ट शब्दांनी सांगितली आहे व दुसऱ्या कित्येकांत केवळ प्रसंगानें सूचित केली आहे; व आणखी कित्येकांत तर तिचा मागमूसहि लागत नाही. आपल्या या देशांत (अमेरिकेंत) ख्रिस्ताने सांगितलेला संदेश क्वचितच कोणा एखाद्यास समजला असेल. आपणास राग येऊ देऊ नका; परंतु आजपर्यंत ख्रिस्ताचा संदेश ख्रिस्ती ह्मणविणाऱ्यांपैकी कोणास केव्हांच नीटसा समजला नाही.

{{gap}}आतां या शेवटच्या पायरीपर्यंत पोहोचण्यापूर्वी तळापासून आरंभ करून क्रमाक्रमाने एक एक पायरी आक्रमिली पाहिजे, हे खरें. धर्मपुस्तकांनी जे निरनिराळे अनेक मार्ग दाखविले आहेत त्या सर्वांचा आदिपाया हेच तत्व आहे. निरनिराळ्या अधिकाराच्या मनुष्यांस निरनिराळे मार्ग सांगणे इष्ट आहे. इतकेच नव्हे तर ते अत्यंत जरुरीचेंहि आहे. यामुळे पुष्कळ वेळां बाह्यतः वि-<noinclude>
{{gap}}स्वा. वि. ३</noinclude>
c80hp8ogr6z3laifd3ajjz3s2bxzkrm
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/64
104
63334
229029
155760
2026-04-09T10:09:41Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229029
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|३४ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>रोधी अशी वचनें एकाच ग्रंथांत आढळतात. 'स्वर्ग तुमच्या हृदयांतच आहे' असें ख्रिस्ताने एके ठिकाणी सांगितले आहे, तर दुसरे ठिकाणी 'आपला पिता जो अकाशांत आहे,' असें तो ह्मणतो! ही वचनें परस्पर अगदी विरोधी दिसतात. यांची एकवाक्यता होणे शक्य आहे काय? ही वाक्ये तो कोणत्या निरनिराळ्या प्रसंगी बोलला याचा विचार केला पाहिजे. ज्यांना धर्मज्ञान मुळीच नाहीं, धर्माची सामान्य मूलभूत तत्वे ज्यांच्या कधी कानांवरूनहि गेली नाहीत, अशा मनुष्यांस 'परमेश्वर अंतराळांत आहे' असेंच सांगणे इष्ट आहे. आपणापुढे असलेल्या श्रोत्यांचा अधिकार बरोबर ओळखून त्यांस समजेल अशा भाषेनें उपदेश करणे हे सद्गुरूचे कामच आहे. सामान्य मनुष्याला प्रत्यक्ष पदार्थांच्या साहाय्यानेच उपदेश केला पाहिजे. अतींद्रिय ज्ञान त्याच्या डोक्यांत शिरणेच शक्य नाही. एखादा मनुष्य लौकिकदृष्टीने मोठा पंडित असेल, पण त्याचे धर्मज्ञान पाहिले तर एखाद्या लहान मुलास शोभण्यासारखे असण्याचा संभव आहे. इंद्रियजन्य सुखाचा अभिलाष सुटतां सुटतां जो मनुष्य इंद्रियांच्या पलीकडे पोहोचला आहे, त्याला 'आकाशाचें राज्य स्वतःच्या अंतःकरणांतच आहे' ही गोष्ट बरोबर पटेल. स्वतःचे अत्यंत पवित्र अंतःकरण ह्मणजे 'आकाशाचें राज्य' ही गोष्ट तो अनुभवाने समजण्याच्या स्थितीत असतो. याकरितां एकाच धर्मपुस्तकांत परस्परविरोधि वचनें आढळली तर ती निरनिराळ्या अधिकाराच्या व्यक्तीकरतां असतात, असे समजावे. तसेच प्रत्येक मनुष्य आपापल्या धर्माप्रमाणे वागतो ह्मणून त्यास दोष देणेहि वाजवी नाही. अधिकारपरत्वे कित्येकांस मूर्ति अथवा दुसरी कांहीं चिन्हें यांचा उपयोग करावा लागेल. मनुष्याच्या अंतरंगाशी बोलण्याची ती एकप्रकारची भाषाच आहे.

{{gap}}आतां दुसरी एक गोष्ट विशेषेकरून तुमच्या चित्तावर ठसली पाहिजे ती ही की, अमुक मते आपण स्वीकारली किंवा एखाद्या धर्मपुस्तकांत सांगितलेल्या कवाइती आपण बरोबर केल्या तर तेवढ्यानेच आपण धार्मिक झालों असें होत नाही. तुह्मीं कोणती धर्मपुस्तकें वाचितां अथवा कोणत्या मतांवर विश्वास ठेवतां ही बाब यत्किचिहि महत्वाची नसून तुह्मी वाचतां त्यांतले स्वत:च्या ठिकाणी तुम्ही काय अनुभविले आहे, हे पाहणे महत्वाचे आहे. 'ज्यांचे अंतःकरण पवित्र आहे ते धन्य होत; कारण ते परमेश्वरास पाहतील.' असें जें बायबलांत ह्मटलें तें सर्वथैव खरे आहे. होय, याच जन्मांत त्यांस परमेश्वर खचित भेटेल. यालाच मुक्तस्थिति असें ह्मणतात. काही विशिष्ट मंत्र म्हटले अथवा<noinclude></noinclude>
l9lw7dk2e4ekjef408nx1oom736vhkq
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/65
104
63335
229030
155761
2026-04-09T10:11:41Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229030
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|३५ }}
{{rule}}</noinclude>तोंडाने नुसती काही विशेष प्रकारची बडबड केली ह्मणजे मुक्ति मिळेल असें कोणी ह्मणतात; परंतु नुसत्या बाह्य कृतीने परमश्वेर मिळेल असे कोणत्याहि महात्म्याने आजपर्यंत केव्हांहि सांगितले नाही. मुक्ति मिळण्यासाठी बाहेरून कोणतीहि साधने आणावी लागत नाहीत. ती आपल्याच अंतरंगांत आपणास शोधिली पाहिजेत. अंतर्बाह्य परमेश्वरच भरून राहिला आहे, ही गोष्ट आपणास अनुभवानें पटावी लागते. बाह्य आचार अगदीच निरुपयोगी आहेत असें माझें ह्मणणे नाही; परंतु त्यांचा उपयोग केवळ आरंभी असून पुढे लवकरच ते निरुपयोगी होतात. धर्म हे पुस्तकांमुळे अस्तित्वात आलेले नसून धर्मानंतर पुस्तकें झाली आहेत, हे आपण विसरता कामा नये. कोणत्याहि पुस्तकानें परमेश्वरास उत्पन्न केलें नसून सर्व मोठे ग्रंथ परमेश्वराच्या प्रेरणेने झाले आहेत. तसेंच आमच्या जीवात्म्याचे अस्तित्वहि पुस्तकांवर अवलंबून नाही, ही गोष्ट प्रत्येक मुमुक्षुने नेहमी लक्षात ठेविली पाहिजे. जीवात्मा आणि परमात्मा यांचे ऐक्य स्वतः अनुभविणे हे सर्व धर्माचे ध्येय आहे. हाच विश्वधर्म होय. कल्पना आणि मार्ग निरनिराळे झाले तरी शेवटी त्या सर्वांची भेट होण्याचे ठिकाण एकच आहे. सर्व धर्माचा एकच पाया कोणता ह्मणून कोणी विचारिलें तर 'परमेश्वराशी ऐक्य' या शब्दांनी त्या प्रश्नाचें मी उत्तर देईन. एखाद्या वर्तुळाच्या परिघापासून मध्यबिंदूपर्यंत काढिलेल्या रेषा जशा मध्यबिंदूंत एकत्र व एकजीव होतात तसेंच सर्व धर्मानी सांगितलेले निरनिराळे मार्ग परमेश्वरस्वरूपांत एकत्र व एकरूप होतात. इंद्रियांनी अनुभवास येणाऱ्या व खऱ्या दृष्टीने केवळ छायेसारख्या असणाऱ्या या जगापलीकडे असलेल्या परमात्म्याचा अनुभव आला ह्मणजे आपण कोणत्या उपायांनी हे साध्य केले हा प्रश्न महत्वाचा नाही. तुम्ही कोणतीहि विशिष्ट मते मान्य करा अथवा करूं नका; एखाद्या पुस्तकानें आंखून दिलेल्या मर्यादेत राहा, अथवा राहूं नका; एखाद्या विशिष्टपंथाचे ह्मणवा अथवा ह्मणवू नका, परंतु कोणत्याहि मार्गाने परमेश्वराचे अस्तित्व स्वतःच्या ठिकाणी तुह्मी अनुभविलें ह्मणजे तुमचे काम झाले. एखादा मनुष्य, जगांत अस्तित्वांत असणाऱ्या सर्व धर्मावर मी विश्वास ठेवितों असें ह्मणेल, जगांतील सर्व धर्मग्रंथ त्यास मुखोद्गत असतील, जगांतील सर्व तीर्थात त्याने स्नान केले असेल, आणि इतके करून परमेश्वराबद्दल अगदी पुसट कल्पनाहि त्यास न होणे संभवनीय आहे. तसंच साऱ्या जन्मांत एखादें देऊळ नजरेनेंहि न पाहतां किंवा धर्मपुस्तकांत सांगितलेला एखादाहि विधि न करतां परमेश्वराचा अंतरंगांत अनुभव होणे<noinclude></noinclude>
8c2lpl6ektf6rw2s82j8fpe647zqw5a
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/66
104
63336
229033
155766
2026-04-09T10:29:39Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229033
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|३८ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>छाती पिटण्यांत कांही फायदा नाही. मुकाट्याने एक काडी ओढली म्हणजे अंधार कोठे शोधूनहि सांपडत नाही. आपल्या चैतन्यास चालन द्या, अंतःकरण पवित्र करा म्हणजे पाप कोठेच नव्हतें असें तुम्ही म्हणूं लागाल. पापी, पापी, म्हणून कंठशोष न करतां आपण ज्या मूळस्वरूपाचे आहों त्या स्वरूपाचें चिंतन करा.

{{separator|8|3em|char=*{{gap}}}}
{{center|[व्याख्यान संपल्यानंतर पुढील प्रश्नोत्तरे झाली.]}}

{{gap}}'''एक श्रोताः-''' स्वामी, नरकयातनांचे वर्णन करून मनुष्याच्या चित्तांत भय उत्पन्न झाल्याशिवाय तो सन्मार्गवर्ति राहणार नाही. उपदेशकाचा आपल्या श्रोत्यांवर दाब राहिला पाहिजे.

{{gap}}'''स्वामीः'''- अशा रीतीने खोटी भीति दाखवून धर्मप्रेम उत्पन्न करण्यापेक्षा परमेश्वरस्वरूपाची ओळख श्रोत्यास करून देणे आधिक चांगलें. कारण, केवळ भीतीमुळे जो मनुष्य सदाचरणी बनलेला असतो तो केवळ ढोंगी असतो. भीतीचें कारण संपल्याबरोबर तो अधिक उच्छृखल होण्याचा संभव असतो.

{{gap}}'''श्रोता:'''- 'आकाशाचे राज्य या लोकी नाही' असें भगवान् ख्रिस्त ह्मणाला त्याचा अर्थ काय ?

{{gap}}'''स्वामीः-''' स्वर्गाचे राज्य आपल्याच अंतरंगांत आहे असें भगवानाने सांगितले. या पृथ्वीवर आपणांस स्वर्गातले भोग प्राप्त होतील अशी यहुदी लोकांची कल्पना होती ती खोटी असें भगवानाने सुचविले आहे.

{{gap}}'''श्रोता:-''' उत्क्रांतीने आपण चतुष्पादांचे मनुष्यप्राणी झालों असें ह्मणतात. आपला या मतावर विश्वास आहे काय ?

{{gap}}'''स्वामीः-''' उत्क्रांतीनें चतुष्पादांतून मनुष्यस्थितीपर्यंत येतां येईल, असे माझे मत आहे.

{{gap}}'''श्रोताः'''- ज्याला स्वतःचे पूर्वजन्म समजतात असा कोणी सत्पुरुष आपण पाहिला आहे काय ?

{{gap}}'''स्वामीः-''' होय. इतक्या प्रतीची इच्छाशक्तीची वाढ झालेले लोक माझ्या अवलोकनांत आले आहेत.

{{gap}}'''श्रोता:-''' क्रुसावर खिळून यहुद्यांनी ख्रिस्ताचा जीव घेतला, यावर आपला विश्वास आहे काय?{{nop}}<noinclude></noinclude>
4xdgoogjmk4moyzwhxunxlq94zot3wx
229034
229033
2026-04-09T10:30:40Z
कल्पनाशक्ती
3813
229034
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|३८ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>छाती पिटण्यांत कांही फायदा नाही. मुकाट्याने एक काडी ओढली म्हणजे अंधार कोठे शोधूनहि सांपडत नाही. आपल्या चैतन्यास चालन द्या, अंतःकरण पवित्र करा म्हणजे पाप कोठेच नव्हतें असें तुम्ही म्हणूं लागाल. पापी, पापी, म्हणून कंठशोष न करतां आपण ज्या मूळस्वरूपाचे आहों त्या स्वरूपाचें चिंतन करा.

{{separator|8|3em|char=*{{gap}}}}
{{center|[व्याख्यान संपल्यानंतर पुढील प्रश्नोत्तरे झाली.]}}
{{gap}}'''एक श्रोताः-''' स्वामी, नरकयातनांचे वर्णन करून मनुष्याच्या चित्तांत भय उत्पन्न झाल्याशिवाय तो सन्मार्गवर्ति राहणार नाही. उपदेशकाचा आपल्या श्रोत्यांवर दाब राहिला पाहिजे.

{{gap}}'''स्वामीः'''- अशा रीतीने खोटी भीति दाखवून धर्मप्रेम उत्पन्न करण्यापेक्षा परमेश्वरस्वरूपाची ओळख श्रोत्यास करून देणे आधिक चांगलें. कारण, केवळ भीतीमुळे जो मनुष्य सदाचरणी बनलेला असतो तो केवळ ढोंगी असतो. भीतीचें कारण संपल्याबरोबर तो अधिक उच्छृखल होण्याचा संभव असतो.

{{gap}}'''श्रोता:'''- 'आकाशाचे राज्य या लोकी नाही' असें भगवान् ख्रिस्त ह्मणाला त्याचा अर्थ काय ?

{{gap}}'''स्वामीः-''' स्वर्गाचे राज्य आपल्याच अंतरंगांत आहे असें भगवानाने सांगितले. या पृथ्वीवर आपणांस स्वर्गातले भोग प्राप्त होतील अशी यहुदी लोकांची कल्पना होती ती खोटी असें भगवानाने सुचविले आहे.

{{gap}}'''श्रोता:-''' उत्क्रांतीने आपण चतुष्पादांचे मनुष्यप्राणी झालों असें ह्मणतात. आपला या मतावर विश्वास आहे काय ?

{{gap}}'''स्वामीः-''' उत्क्रांतीनें चतुष्पादांतून मनुष्यस्थितीपर्यंत येतां येईल, असे माझे मत आहे.

{{gap}}'''श्रोताः'''- ज्याला स्वतःचे पूर्वजन्म समजतात असा कोणी सत्पुरुष आपण पाहिला आहे काय ?

{{gap}}'''स्वामीः-''' होय. इतक्या प्रतीची इच्छाशक्तीची वाढ झालेले लोक माझ्या अवलोकनांत आले आहेत.

{{gap}}'''श्रोता:-''' क्रुसावर खिळून यहुद्यांनी ख्रिस्ताचा जीव घेतला, यावर आपला विश्वास आहे काय?{{nop}}<noinclude></noinclude>
1bpde71z9hqxea08eyxa43lblrfnnru
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/67
104
63337
229035
155770
2026-04-09T10:37:45Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229035
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|३९ }}
{{rule}}</noinclude>{{gap}}'''स्वामीः-''' भगवान् येशुख्रिस्त परमेश्वराचा प्रत्यक्ष अवतारच होता. त्यास मारणे शक्य नव्हते. आपण ख्रिस्ताला क्रुसावर खिळून मारले असा यहुदीलोकांस दृष्टिभ्रम झाला.

{{gap}}'''श्रोता:-''' असे दोन तीन येशुख्रिस्त प्रभूनें निर्माण करून दाखविले असते तर तो मोठाच चमत्कार झाला असता. नाही? .

{{gap}}'''स्वामीः'''- सत्याच्या मार्गात चमत्कार मोठाच अडथळा आणितात. भगवान् बुद्धाला त्याच्या शिष्यांनी एकदां एक मनुष्य चमत्कार करतो ह्मणून सांगितले. शिष्य ह्मणाले, 'लोट्याला हात लावल्याशिवाय अमक्या मनुष्याने तो बराच उंच उचलिला.' त्यावर भगवानांनी सांगितले की चमत्कारांच्या मागे न लागतां सत्यशोधनाच्या मागे लागा. आपली बुद्धि तीव्र करून तिच्या प्रकाशाने चालण्याची संवय करा. चमत्कारांच्या मागे गेल्यास केव्हां खड्डयांत पडाल याचा भरंवसा नाही.

{{gap}}'''श्रोता:-''' येशुख्रिस्ताने पर्वतावर आपल्या शिष्यांस उपदेश केला यावर आपला विश्वास आहे काय ?

{{gap}}'''स्वामीः-''' होय. पुस्तकांत असे लिहिले आहे त्या अर्थी इतरांप्रमाणेच मलाहि त्यावर विश्वास ठेवणे भाग आहे. परंतु खऱ्याखोट्याचा हा प्रश्न बाजूस ठेविला तरी त्यांतील विचार आपणा सर्वांस सारखेच ग्राह्य होण्याजोगे आहेत. भगवान् बुद्धाने ख्रिस्तापूर्वी पांचशे वर्षे धर्मज्ञान सांगितले. त्यांतील सारांश आपण पाहावा. खऱ्याखोटयाचा निवाडा करण्यांत फायदा नाही. ख्रिस्त काय, जरदुष्ट्र काय अथवा कन्फ्यूशस काय? या सर्वांची वचनें नेहमी कल्याणप्रदच असतात.

{{rule|6em}}

{{center|{{x-larger|'''हिंदु धर्म.'''}}
'''[ब्रुक्लिन स्टँडर्ड पत्रावरून.]'''}}
{{gap}}ता. ३० डिसेंबर १८९४ रोजी परमहंस स्वामी विवेकानंद यांनी ब्रुक्लिन एथिकल सोसायटीच्या विनंतीस मान देऊन वरील विषयावर एक व्याख्यान दिले. व्याख्यानास हजारों स्त्रीपुरुषांची गर्दी झाली होती. स्वामीजींचे व्याख्यान चालू असतां सर्व श्रोतृगण चित्राप्रमाणे तटस्थ झाला होता. हिंदुस्थानांतील पुरातन ऋषिमंडळ जणूं काय स्वामीजींच्या मुखाने बोलत होते असे वाटले.

{{gap}}अत्यंत पुरातन धर्मतत्वांचे प्रतिनिधि या नात्याने स्वामींची कीर्ति अगोदरच सर्वतोमुखी झाली असल्यामुळे व्याख्यानश्रवणास सर्व प्रकारच्या धंद्यांच्या<noinclude></noinclude>
h9sf7ue1fvm6y7fa269cvm5ybda4bes
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/68
104
63338
229037
155883
2026-04-09T10:50:29Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229037
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|४० |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>हजारों स्त्रीपुरुषांची गर्दी उडून राहिली होती. हिंदुस्थानांतील कृष्ण व बुद्ध यांची पूजा करणाऱ्या स्वामींचें शिकागो येथे भरलेल्या सर्व-धर्माच्या परिषदेंत वेदांतावर व्याख्यान झाले होते व त्यावेळी एकंदर व्याख्यानांमध्ये यांचे व्याख्यान सर्वांस फार आवडले होते. केवळ धर्मासाठी यांनी आपल्या सर्व उच्चतम आशा बाजूस ठेविल्या आणि कित्येक वर्षे निरलसपणे त्यांनी पुरातन तत्वज्ञानाचा अभ्यास केला. पाश्चात्य शास्त्रांचाहि त्यांनी चांगला अभ्यास केला आहे. पाश्चात्य शास्त्रे आणि जुनी वेदांततत्वे यांचे अपूर्वसंमेलन त्यांच्या ठिकाणी झालें आहे. त्यांची संस्कृति, विद्वत्ता, वक्तृत्व, शुद्धाचरण आणि पावित्र्य यांची कीर्ति अगोदरच पसरली असल्यामुळे आपणास आज कांहीं तरी अलभ्य लाभ होणार आहे असे वाटून सर्व श्रोते भाषणश्रवणासाठी अगदी उत्कंठित होऊन राहिले होते. त्यांची उत्कंठा विफल झाली नाही.

{{gap}}स्वामींची कीर्ति आपण ऐकिली ती प्रत्यक्षापुढे कांहींच नाही असेंच सर्वांचें मत झाले. काषायवस्त्र परिधान केलेले हे स्वामी श्रोत्यांपुढे उभे राहिले तेव्हां त्यांच्या अंतर्गत तत्वविचारांचे अपूर्व तेज त्यांच्या मुखमंडळावर झळकत होतें. प्रेम, सहानुभूति आणि सहिष्णुता ही मूर्तिमंत त्यांच्या मुखावर व्यक्त होत होती. इंग्रजी भाषेवरील त्यांचे प्रभुत्वहि वाखाणण्यासारखे आहे. बुद्धाचें तत्वज्ञान आणि ख्रिस्ताची नीतितत्वे यांचा अपूर्व संयोग ज्यांत झाला आहे असा नवा धर्म शिकविण्याकरितां स्वामी महाराज येथे आले आहेत. हिमालयांतील साधु कसे असतात याची कल्पना स्वामींच्या दर्शनाने आम्हांस झाली.

{{gap}}स्वामींच्या व्याख्यानासंबंधी कोणी कांही म्हटले तरी एकंदरीने त्यांचे व्याख्यान अत्यंत चित्ताकर्षक होतें यांत तिलमात्र संशय नाही. डाक्टर लुई जेम्स यांनी स्वामींची श्रोत्यांस ओळख करून दिल्यानंतर स्वामी श्रोत्यांचे मनःपूर्वक आभार मानून ह्मणाले :{{bar|1}}

{{gap}}"जगांत उपलब्ध असलेल्या सर्व धर्माचा अभ्यास करणे हाच माझा धर्म होय. ख्रिस्ती धर्मपुस्तकांचा मी चांगला अभ्यास केला तेव्हां मला माझ्या मातृधर्माचें चांगले ज्ञान झाले. मला जी काही तत्वें पूर्वी गूढ वाटत होती त्यांची नीट संगति लागली. सत्य हे सर्वत्र एकच आहे. ज्याप्रमाणे एखादा सहा बोटांचा मनुष्य हा सामान्य मानवी देहाचा नमुना नसून त्यास सृष्टिबाह्य असे आपण ह्मणतों तशीच धर्माचीहि गोष्ट आहे. कोणताहि एक धर्म खरा म्हटला की, बाकीचे सर्व खरे असलेच पाहिजेत. जगांतील सर्वच धर्म खरे असल्यामुळे<noinclude></noinclude>
4lm8diwy9zybhfh6b6hnqhetfeazba6
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/69
104
63339
229038
155884
2026-04-09T10:53:53Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229038
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|४१ }}
{{rule}}</noinclude>माझा धर्म अमुक आणि तुमचा धर्म अमुक असा भेद करणेहि योग्य नाही. हिंदुधर्मावर जितका माझा तितकाच तुमचाहि हक्क आहे. हिंदुस्थानच्या वस्तीत वीस लक्ष ख्रिस्ती, सहा कोटी मुसलमान आणि बाकी सर्व हिंदु आहेत.

{{gap}}हिंदूंचा धर्म वेदप्रणित आहे. जगांतील सर्व धर्माचे सार, आमच्या मतांप्रमाणे वेदांतर्गत आहे. तथापि सर्व सत्य केवळ वेदांतच आहे असे आमचे ह्मणणे नाही. 'आत्मा अमर आहे' असें वेदांनी आमांस सांगितले आहे. कोणत्याही काली आणि कोणत्याही स्थली मनुष्यमात्राची सर्व खटपट कोठे तरी स्थिर जागा शोधण्यासाठीच चाललेली असते. केव्हांहि नष्ट न होणारी अशी सुखभूमि सांपडावी हाच त्याच्या धडपडीचा हेतु असतो. एकंदर सृष्टीचे अवलोकन केले तर दृश्य सृष्टीत अशी जागा सांपडेल असा भरंवसा आपणांस वाटत नाही. प्रत्येक क्षणीं बदलत असणाऱ्या या दृश्य जगांत स्थिर जागा सांपडणार कशी?

{{gap}}परंतु यावरून अशी जागा कोठेच नाही असे कोणी ह्मणेल तर तो मात्र त्याचा भ्रम आहे. अशा भ्रमाचे पर्यवसान नेहमी चार्वाकवादांत होतें. 'भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः' असें ह्मणून 'ऋणं कृत्वा घृतं पिबेत्' असा चार्वाकाने आपल्या अनुयायांस उपदेश केला आहे. त्याच्या मताप्रमाणे आत्मा, धर्म, मन इत्यादिकांचे अस्तित्व वंध्यापुत्राच्या कथेसारखें आहे. पंचज्ञानेंद्रियांनी आत्मा वस्तुतः बद्ध नाही असें वेदांताचे मत आहे. या इंद्रियांच्या द्वारें वर्तमान अथवा चालू कालाचे ज्ञान होते, ही गोष्ट आपल्या नित्य अनुभवाची आहे. तसेच त्यांच्या द्वारें भूत व भविष्यकालाचे ज्ञान होत नाही, ही गोष्टहि अनुभवसिद्ध आहे. कालाच्या एकतानतेंत हा भेद वास्तविक नसून तो केवळ इंद्रियजन्य आहे. जर भूत, वर्तमान आणि भविष्य हे काल वास्तविक अलग असते— यांतील भेद खरा असता- आणि भूतकालाचे ज्ञान वर्तमानांत आणण्याचे कोणतेच साधन उपलब्ध नसते तर आपणास वर्तमानाचें ज्ञानहि झाले नसते. यावरून या त्रिकालास जोडणारे इंद्रियातीत असें कांहीं तरी स्वतंत्र साधन असले पाहिजे, हे उघड होते.

{{gap}}परंतु स्वतंत्र साधन ह्मणजे काय याचा विचार येथे करणे अवश्य आहे. आपले शरीर पाहिले तर भोवतालच्या परिस्थितीची गुलामगिरी त्याने पूर्णपणे पत्करलेली दिसते. मन स्वतंत्र ह्मणावें तर तें विचारांचे बांधलेले आणि विचारांची उत्पत्ति बाह्यसृष्टीवर अवलंबून असणार! तेव्हां असें स्वतंत्र साधन<noinclude></noinclude>
3ughhnd7d7p08q4tlh79iebdiafy21r
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/70
104
63340
229039
155885
2026-04-09T10:54:55Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229039
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|४२ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>शरीर आणि मन यांहूनहि निराळे असले पाहिजे असे उघड दिसतें. तें साधन आत्मा हे होय. स्वातंत्र्य आणि अत्यंत पारतंत्र्य यांच्या मिश्रणाने हे जग बनले असून अत्यंत स्वतंत्र, पूर्ण आणि पवित्र असा परमात्मा सर्व विश्वाच्या द्वारें व्यक्त झाला आहे असें वेदांनी सांगितले आहे. त्याला मृत्यु नाही, कारण मृत्यु ह्मणजे नष्ट होणे नसून एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाणे होय. तो अत्यंत पूर्ण असल्यामुळे स्वतंत्र आहे. अपूर्णता असणे ही एक विशिष्ट परिस्थिति आहे; आणि आत्मा परिस्थितीने मर्यादित नसतो. हाच पूर्ण आणि स्वतंत्र परमात्मा थेट ईश्वरापासून तों अगदी हलक्या भिकाऱ्यापर्यंत सर्वांत एकसारखाच आहे, यांत जो फरक दिसतो त्याचे कारण तो परमात्मा व्यक्त होण्याच्या साधनांत असणारा फरक हे होय.

{{gap}}परंतु आत्म्याने शरीर का धारण करावे, असा प्रश्न निघतो. त्याचे कारण असें, की माझें मुख पाहावयास जसा मी आरसा घेतों, तद्वत् स्वतःचे प्रतिबिंब परमात्म्यास शरीरधारी जीवात्म्यांत दिसते. जीवात्मा हा परमात्म्याचे प्रतिबिंब आहे आणि केव्हांना केव्हां तरी जीवात्मा आपल्या मूळच्या स्वरूपास प्राप्त होईलच होईल. मी एखाद्या अंधाऱ्या जागेत जाऊन कितीहि कोरडी ओरडाओरड केली तरी प्रकाशाची प्राप्ति मला होणार नाही. त्यासाठी एक काडी पेटविली की अंधार आपोआप नाहीसा होतो. तसेंच 'मी पापी, मी पापी' ह्मणून आपण कितीहि रडलों तरी त्याचा उपयोग काय? त्यामुळे आपण आपल्या अपूर्णस्थितीतून निघून पूर्णत्वास जाऊं असा यत्किंचितहि संभव नाही. याकरितां आपलें मूळस्वरूप काय हे ओळखून त्याचे तेज फांकेल असा यत्न करा असें वेद अनादिकालापासून सांगत आहेत. आतां यापुढे 'मी पापी' अशी प्रार्थना करण्यास मुलांस शिकवू नका. धर्म ही कांहीं तरी मूर्खपणाची कवाईत नाही. परमेश्वरप्राप्तीचा तो निश्चित मार्ग आहे, ही गोष्ट त्यांच्या मनावर ठसवा. एखादें दुःख प्राप्त झाले ह्मणजे 'अरे परमेश्वरा' ह्मणणे, हा धर्म नव्हे. आपले संपूर्ण तेज फांकेल अशा रीतीने प्रत्येक कार्यात आपली वर्तणूक ठेवणे, हा धर्म आहे.

{{gap}}प्रत्येक मनुष्याचा वर्तमान आणि भविष्य आयुःक्रम पूर्वक्रियेवर अवलंबून असन चालू जीवित हे पूर्व क्रियेचें फळ आहे; याबद्दल सर्व धर्माचे एकमत आहे. एक मूल चांगल्या आईबापांच्या पोटी जन्मास येऊन चांगले शिक्षण मिळविते आणि श्रीमान् होते. दुसरे मूल भिकाऱ्याच्या पोटी येऊन जन्मभर भिकारी राहते. न्यायी परमेश्वरावर या विसदृशतेचे खापर फोडणें अनुचित<noinclude></noinclude>
pr8ko277yafmmx7nedhv2drdvy2iwws
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/71
104
63341
229040
155913
2026-04-09T10:57:53Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229040
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|४३ }}
{{rule}}</noinclude>आहे. तर मग हे भेद आले कोठून? तसेंच सध्याचा माझा जन्म पहिलाच आहे, असें मानिले तर माझें मूळचे स्वातंत्र्य नष्ट होऊन मी परिस्थितीने बांधला जातों; असें कां व्हावें? माझें स्वातंत्र्य का हरण झालें? जर माझ्या चालू आयुःक्रमांत पूर्वक्रियेचे अनुभव उपयोगी पडत नाहीत असें मानिलें तर सर्व आयुष्य मला लोकांच्या तोंडाकडे पाहून कंठावें लागेल याची वाट काय? पूर्वानुभवशून्य असा मी स्वतंत्रपणे कांहीं करूं शकेन असा संभव तरी आहे काय? आणि मला स्वतःच्या स्वतंत्र क्रियेने वागतां आलें नाहीं तर मी अत्यंत परतंत्र असा प्राणी झालों नाही काय? या सर्व प्रश्नांचे उत्तर वेद असें देतात, "तूं पूर्वकर्मानुरूप चालू कालांत जन्मास आला आहेस. पूर्वकर्मानुभवाचा फायदा घेऊन युक्त कर्मे करून दुःखमुक्त होण्याची तुला पूर्ण मुभा आहे." हीच आमची पुनर्जन्ममीमांसा आहे. प्रत्येक जन्मीं सत्कर्मानुरत राहून अधिक चांगले होत होत आपणास शेवटी मुक्त होतां येतें.

{{gap}}परमात्मा विश्वव्यापी, अमर्याद, आणि सर्वशक्तिमान् असून जीवात्माहि शेवटी त्याच पदास पोहोचतो असे आमचें हिंदुमत आहे. परमेश्वर हा विश्वबाह्य आणि आह्मी त्याच्या कृपेंत राहणारे जीव अशी कल्पना उत्पन्न होणे, ही प्रथम पायरी; नंतर आमच्या अंतर्यामी त्याचा वास आहे असा अनुभव येणे, ही दुसरी, आणि आम्ही आणि तो एकच ही तिसरी व शेवटची पायरी आहे. सर्व धर्म ईश्वरस्वरूपाकडेच जाण्याचे निरनिराळे मार्ग असल्यामुळे खरे आहेत. या करितां क्रुसापुढे गुडघे टेंकणारा ख्रिस्ती, मशिदीत प्रार्थना करणारा मुसलमान आणि अग्निपूजक पारशी हे सर्व सारखेच धार्मिक आहेत असे आह्मां हिंदूंस वाटते. हे सर्व प्रयत्न एकाच्याच प्राप्तीकरितां असून निरनिराळ्या परिस्थित्यनुरूप एकाच धर्माची अनेक रूपे आहेत. ही कल्पना पूर्णपणे पटली ह्मणजे धर्मद्वेषास जागाच उरत नाही. तरी सर्व धर्मानी दिलेल्या या सुंदर फुलांस एकत्र करून प्रेमसूत्राने बांधून तो झेला आपण परमेश्वरास अर्पण करू या.

{{gap}}जर मी खरोखर परमेश्वरस्वरूप आहे तर माझा जीवात्मा हा परमात्म्याचे देऊळ आहे हे मी निरंतर लक्ष्यात ठेवून परमात्म्याच्या ठिकाणी निर्व्याज प्रेम करणें-कर्तव्यदृष्टीने सर्व कर्मे करणे हे माझें कर्तव्य आहे. यांत बक्षिसाची आशा अथवा शिक्षेची भीति बाळगून वागणे हे अयुक्त आहे. धर्म ह्मणजे केवळ निरर्थक बडबड आणि कवाईत नसून स्वतः परमात्मरूप होण्याचा तो मार्ग आहे असें माझा धर्म मला सांगतो."{{nop}}<noinclude></noinclude>
e2n4maq7to4y235gpny7lq0pao6h0oh
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/72
104
63342
229041
155914
2026-04-09T10:58:43Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229041
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|४४ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>भाषण सुरू असतां टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटाने श्रोतृगण आपली पसंती मधून मधून व्यक्त करित होता. भाषणसमाप्तीनंतर सुमारे पंधरा मिनिटें काही प्रश्नोत्तरे होऊन सभेचे काम संपलें.{{nop}}<noinclude></noinclude>
9yqr0e9votbjws4em0xk58zll0z48ok
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/73
104
63343
229042
155915
2026-04-09T10:59:36Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229042
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

{{center|{{xxx-larger|कर्मयोग.}}}}

{{nop}}<noinclude></noinclude>
3pu87rxfbsbl28yvfjxsy242v8fstta
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/74
104
63344
229031
155916
2026-04-09T10:12:49Z
कल्पनाशक्ती
3813
/* मजकुराविना */
229031
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="0" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><noinclude></noinclude>
6pewiyyebyc8m42d8lu6xlv59f2mxdm
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/75
104
63345
229043
155917
2026-04-09T11:03:54Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229043
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|{{xx-larger|कर्मयोग.}}}}
{{center|{{x-larger|प्रकरण १ लें.}}}}
{{center|'''कर्माचा दानतीवर परिणाम.'''}}
{{gap}}कर्म हा शब्द मूळ संस्कृत धातु कृ ह्मणजे करणे यापासून उत्पन्न झाला आहे. आपण जें जें कांहीं करतों तें सर्व कर्म होय. आपल्या हातून घडणाऱ्या कृतीचा परिपाक, असाहि कर्म या शब्दाचा दुसरा अर्थ आहे. पूर्वजन्मार्जित क्रियांचे वर्तमान फल अशा अर्थानेंहि कर्म या शब्दाचा उपयोग करितात; परंतु पुढील विवेचनांत कर्म हा शब्द चालू क्रिया या अर्थाचाच दर्शक आहे असें समजावें. पूर्णज्ञानी होणे हा मानवी संस्कृतीचा अंतिम हेतु आहे. यावांचून दुसरें साध्य कांहीं नाहीं असें प्राचीन पौर्वात्य तत्ववेत्त्यांचे मत आहे. इंद्रियजन्य सुखासाठी अनेक साधनें निर्माण करणे हे मनुष्याचे साध्य नसून, पूर्णज्ञानी होऊन स्वतः सुखरूप होणे हे साध्य आहे. जगांत दुःख आढळून येते त्याचे कारण, मनुष्य भ्रमाने सुखसाधनें मिळविण्याच्या मागे लागतो हे होय. सुख हे साधनांतर्गत आहे असे वाटणे हा भ्रम होय. सुखाची साधनें हस्तगत करण्याचा उद्योग करित असतां मनुष्य सुख आणि दुःख यांच्या द्वंद्वांत सांपडतो व केव्हां सुखांतून दुःखांत तर केव्हां दुःखांतून सुखांत हेलकावे खात असतांच त्याची चूक त्याच्या लक्ष्यांत येते. साधनांतर्गत सुखदुःखांचा आस्वाद घेतल्यानंतर सुख हे वस्तुतः साधनांत नाही हे त्याच्या लक्ष्यांत येऊ लागते. हे ज्ञान होण्याकरितां सुख आणि दुःख या दोहींचीहि सारखीच अपेक्षा आहे. सुख आणि दुःख ही दोन्ही साधनांतर्गत असल्यामुळे चिरस्थायी नसून कांहीं कालाने ती नष्ट होतात असा त्यास अनुभव येतो. तथापि सुख अथवा दुःख नष्ट झाले तरी त्यांचा कांहीं परिणाम जीवात्म्यावर कायमचा राहतो. सुख अथवा दुःख आले कसे आणि नष्ट झाले कसें याचे ज्ञान कायम स्वरूपाचे असून ते ज्ञानरूपाने जीवात्म्याच्या ठिकाणी कायम राहून त्याच्या वागणुकीत दिसू लागते. मनुष्याच्या सामान्य व्यवहारांत प्रतिबिंबित झालेल्या या ज्ञानास दानत असें ह्मणतात. सुखदुःखांचा अनुभव घेत असतां मनुष्याच्या मनोवृत्ती निरनिराळे वळण घेत असतात व या निरनिराळ्या मनोवृत्ती एकत्र मिळून त्यांची दानत बनत असते. ही दानत बनविण्यांत सुखाचा व दुःखाचा सारखाच उपयोग आहे; किंबहुना कित्येक वेळां तर सुखापेक्षां दुःखामुळे होणारी ज्ञानप्राप्तीच अधिक दर्जाची असते. जगांत विशिष्ट<noinclude></noinclude>
qkk9enbojf6y3v15bx4sppunbc0x3ys
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/76
104
63346
229044
155956
2026-04-09T11:07:04Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229044
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|४८ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>दानतीमुळे प्रसिद्धीस आलेल्या अशा व्यक्तींचा इतिहास पाहिला तर त्यांत सुखापेक्षा दुःखप्रसंगच त्यांस अधिक भोगावे लागल्याचे दिसून येते. लक्ष्मीपेक्षां तिच्या वडील बहिणीच्या राज्यांत ज्ञानी लोक अधिक आढळतात. स्तुतीपेक्षां निंदेच्या तडाक्यानेच लोक अधिक ज्ञानी निर्माण झाल्याचा दाखला आहे. याचसाठी 'निंदकाचे घर असावें शेजारी' अशी मागणी सत्पुरुष परमेश्वराजवळ मागतात.

{{gap}}ज्ञान प्रत्येक मनुष्यांत जन्मतःच वास करित असतें. ज्ञान ही कोठून बाहेरून येणारी चीज नव्हे. तिचा वास प्रत्येकाच्या अंतर्यामी सदोदित असतो. 'अमुक मनुष्याने अमुक जाणले' असे आपण सामान्य भाषेत ह्मणतों. हेच वाक्य तात्विक भाषेत बोलावयाचे झाले तर 'अमुक मनुष्याने अमुक व्यक्त केले, गूढांतून निदर्शनास आणिलें,' असें ह्मणावयास पाहिजे. जीवात्मा हा स्वभावतः ज्ञानपूर्ण व अज्ञानानें केवळ आच्छादिलेला असा आहे. हा अज्ञानाचा पडदा ज्या मानाने दूर होतो, त्या मानाने ज्ञान दृग्गोचर होऊ लागते. 'अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यति जंतवः' ज्ञान हे अज्ञानाने आवृत्त झाल्यामुळे मनुष्यप्राणी मूर्ख असल्यासारिखा दिसतो. हा सिद्धांत नित्य लक्ष्यांत बाळगिला पाहिजे. न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा नियम शोधून काढिला असे आपण ह्मणतों. हा नियम जगाच्या कोणत्या तरी कोपऱ्यांत लपून बसला होता काय? तो न्यूटनच्या अंतर्गत ज्ञानभांडारांतच होता. त्याची बाहेर येण्याची वेळ झाल्याबरोवर एका क्षुल्लक कारणाने त्या भांडाराचे दार उघडून तो नियम बाहेर पडला. जगांत आज दृश्यमान होणारे सर्व ज्ञान मानवी हृदयांतच एके काळी वास करित होते व आतां तें व्यक्त झाले आहे. या सर्व विश्वांत मावणार नाही एवढा मोठा ग्रंथसंग्रह तुमच्या एवढ्याशा हृदयांत सांठविलेला आहे. दृश्य जग हे केवळ मनुष्याच्या अंतरंगाला जागृत करण्याचे एक साधन मात्र आहे. त्यांतून ज्ञानाची निष्पत्ति होत नसून त्यामुळे चैतन्य जागृत होऊन अज्ञानाचा पडदा फाटण्यास सुरवात होते व ज्ञान अव्यक्तांतून व्यक्तांत येते. ह्मणून ज्ञानार्जनासाठी जगाचा अभ्यास करावयाचा नसून जगरूप साधनाने मनाचा अभ्यास करणे हा ज्ञानार्जनाचा मार्ग आहे. झाडावरून एक फळ पडलेलें न्यूटनने पाहिले आणि डोळे मिटून विचार करतां करतां अनेक विचारपरंपरा त्याच्या चित्तांत त्याला दिसून आल्या. या विचारपरंपरेच्या सांखळींतील एका दुव्यास आपण गुरुत्वाकर्षणाचा नियम या नांवानें सांप्रत ओळखितो. या नियमाचे ज्ञान त्या फळांत<noinclude></noinclude>
jua1zeu2g0968g1wfmlkirlrl755ew4
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/77
104
63347
229045
155957
2026-04-09T11:09:06Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229045
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|४९ }}
{{rule}}</noinclude>नव्हते आणि पृथ्वीच्या पोटांतील मध्यबिंदूंतहि नव्हते. सर्व ज्ञानाचे भांडार मनुष्याचें मन हेच आहे; मग तें अध्यात्मज्ञान असो अथवा लौकिकज्ञान असो. आपणांत हे ज्ञान गुप्त असते व त्यावरील पडदा हळूहळू दूर करण्याच्या उद्योगास लागलों ह्मणजे आपण शिकू लागलों असें ह्मणतो; आणि जसजसा हा पडदा अधिक दूर होऊ लागतो तसतसे आपण अधिक ज्ञानी होऊ लागतो. ज्या मनुष्याच्या ज्ञानावरील हा पडदा अधिक दूर झाला आहे तो अधिक ज्ञानी ह्मणवितो; ज्यावर तो पडदा अगदी घट्ट बसला आहे तो मनुष्य अज्ञानी आणि ज्याच्या हृदयावरील हा पडदा निखालस गळून पडला तो परमज्ञानी ह्मणजे सर्वज्ञ ह्मणवितो. आजपर्यंत असे सर्वज्ञ अनेक वेळां येऊन गेले आहेत आणि पुढेहि येतील. पुढेहि युगानुयुगी त्यांचे अवतार होणार आहेत. गारगोटीच्या पोटी अग्नि जसा गुप्तरूपाने राहत असतो तसेच सर्व ज्ञान मानवी हृदयांत वसत असतें. घर्षणानें गारेंतून जशी ठिणगी व्यक्त होते तसेच साधनांच्या घर्षणाने ज्ञान दृश्यस्वरूपास येते. हे दृश्य स्वरूप अनेकप्रकारच्या रूपांनी व्यक्त होते. आपल्या चित्तांत उद्भूत होणाऱ्या सर्व भावना, आपली सर्व -रडणे, हंसणे इत्यादि क्रिया, आनंददुःखादि मनोव्यापार, आपला क्रोध, आपलें प्रेम, स्तुति आणि निंदा इत्यादि प्रत्यही घडणाऱ्या गोष्टींचे सूक्ष्म अवलोकन केले तर कोणत्याना कोणत्या तरी साधनाच्या घर्षणाने हे नानारूप स्फुलिंग आपल्याच चित्तांत जन्म पावल्याचे आपणास आढळून येईल. या सर्वांचा समवायी परिणाम झणजे आमची दानत. या सर्वप्रकारच्या घर्षणास कर्म अथवा क्रिया असें नांव आहे. ज्या क्रियासाधनाने जीवात्म्यास घर्षण मिळून त्याचे सामर्थ्य आणि ज्ञान दृक्प्रत्ययास येतें तें सर्व क्रियासाधन कर्म या एका शब्दाने ओळखिलें जाते. या दृष्टीने विचार केला, ह्मणजे कर्म केल्यावांचून आपल्या आयुष्यातील एक क्षणहि जात नाही असे दिसून येईल. 'नहि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् । कार्यतेह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः ॥' असा सिद्धांत भगवान् श्रीकृष्णांनी गीतेत सांगितला आहे. मी बोलतों तें कर्म, आपण ऐकतां तें कर्म, आपण श्वासोच्छास करितों तें कर्म; सारांश आपण मनाने अथवा शरीराने ज्या ज्या क्रिया करितों तें सर्व कर्म असून त्यांतील प्रत्येक क्रियेचा परिणाम- संस्कार-जीवात्म्यावर घडल्यावांचून रहात नाही.

{{gap}}अत्यंत सूक्ष्म अशा अनेक कर्मपरंपरा एकजीव होऊन एका मोठ्या रूपाने ज्यांत दृश्यमान होतात अशा प्रकारची काही कर्मे असतात. आपण समुद्र-<noinclude>
{{gap}}स्वा. वि. ४</noinclude>
rm4tcfqtj6hbf8cj5md7rjflk0cfzkt
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१४
104
109994
229015
228862
2026-04-08T12:30:09Z
JayashreeVI
4058
229015
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />'''तीन तत्वज्ञानी.'''</noinclude>व नेहमीच्याच पोशाखांत बर्फावरून चालत जाई व जोडे असून चालणान्या शिपायापेक्षा जास्त जोरानें चाले."

{{gap}}दुसरी लढाई डेलियमची होय. यांतहि सॉक्रेटीस फार शौर्यानें लढला व जरी अथीनीयन लोकांचा पराजय झाल्यामुळे त्याला रणांगण सोडून मागें यावें लागले, तरी तो इतक्या धिमेपणानें व अभयमुद्रेनें परतत होता की, या त्याच्या वर्तनाबद्दल असे उद्गार काढण्यांत आले कीं, दुसरे शिपाई जर अशा धीराचे लोक असते तर अथीनीयन लोकांचा या लढाईत पराजयच झाला नसता.

{{gap}}सॉक्रेटिस ज्यात हजर होता अशी तिसरी लढाई अॅम्फिपॉलिस या ठिकाणची होय. याच लढाईत ब्रासिडस नांवाचा अथीनीयन लोकांमधला मोठा वीर पुरुष पडला व क्लीऑन नांवाचा लोकांचा पुढारी वक्ताहि पडला. या लढाईतहि सॉक्रेटिसाने आपला धीर शेवटपर्यंत सोडला नाहीं व अखेरपर्यंत तो लढत होता.

{{gap}}हे झाले लढाईतील धैर्यांचे प्रसंग. अथेन्ससारख्या प्रजासत्ताक राज्यामध्ये सॉक्रेटिसासारख्या माणसास लोकक्षोभाच्या विरुद्ध जाऊन सत्याकरितां नीतिधैर्य दाखविण्याचे प्रसंग यावे, हें स्वाभाविक आहे. बाकी सॉक्रेटीस राजकीय उलाढालीत फारसा पडत नसे. कारण, त्याची मनोदेवता अशा कामापासून याला नेहमीं परावृत्त करीत असे. तरी पण अथेन्समधले राज्य पूर्ण लोकसत्तात्मक असल्यामुळे व विशेषतः तेथली न्यायपद्धति सर्वस्वी लोकसत्तात्मक असल्यामुळे व राज्यांतील कांहीं कांहीं अधिकार तर चिठ्या टाकून ठरविण्याची पद्धति असल्यामुळे सॉक्रेटिसास केव्हां केव्हां तरी लोकसभेत जावे लागे व ज्युरर म्हणूनहि न्यायसभेंत काम करावें लागत असे. अशा एका प्रसंगी सॉक्रेटिसाचें नीतिधैर्य कसोटीस लागलें. तो प्रसंग असा.:-

{{gap}}ख्रिस्ती शकापूर्वी ४०६ या वर्षी अथीनीयन लोकांनी आजीनौशी येथे एक मोठा आरमारी जय मिळविला. परंतु या विजयाला एक गालबोट लागलं. विजयी सेनापतीनीं नासधूस झालेल्या कांहीं गलबतां-<noinclude>{{center|८}}</noinclude>
7bqimkkp3vf0d12zepcgc3l4va8x4f6
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१५
104
109995
229014
228845
2026-04-08T12:27:20Z
JayashreeVI
4058
229014
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{right|'''साक्रेटिस.'''}}</noinclude>वरील खलाशांचा तपास करण्याकडे व विशेषतः मेलेल्यांची प्रेतें उत्तर कार्याकरितां घरी आणण्याच्या कामांकडे काणाडोळा केला. अथीनीयन लोक प्रेताचे उत्तर कार्य करणें हें फार पवित्र कर्तव्यकर्म समजत असत. विजयी सेनापतीच्या हयगयीमुळे व कर्तव्यपराङ्मुतेमुळे आपले पुषकळ नातलग गमावले व विशेषतः मृतांचा धार्मिक प्रेतसंस्कार करणे अशक्य झालें हें पाहून अथीनीयन जनता खवळली व कांही लोकांनी लोकसमेत सेनापतीवर कर्तव्यकसूरीबद्दल आरोप आणला. फार मोठं वादळ झालें होतें म्हणून त्या वेळीं माणसें पाठविणें म्हणजे त्यांचेच जीव धोक्यांत घालण्यासारखे होतें, असें एकदां त्यांच्या बाजूनें सांगण्यांत आलें, तर दुस-यांदा ही कामगिरी दोन कामगारांकडे सोपविली होती परंतु त्यांनी कामचुकारपणा केला म्हणून त्यावर उलट आरोप सेनापतीच्या तर्फे करण्यांत आला. तरी अथीनीयन लोक शांतपणे ऐकून घेत होते व त्यांच्यावरील आरोपाचा विचार न्यायसभेत करण्याचे ठरले होते; परंतु इतक्यांत एक अथेन्समधील सांवत्सरिक कौटुंबिक समारंभ झाला व त्या वेळी किती तरी कुटुंबांतील किती तरी कर्ते पुरुष नाहींसे झालेले आहेत असे दिसून आले. लोकांचा क्षोभ व्हावा म्हणून काहीजण सुतकाचा पोषख करून या समारंभांत आले होते. या सर्व देखाव्यानें लोकांच्या मनाचा क्षोभ झाला व पहिले पारडे फिरले व न्यायासनासमोर न नेता सर्व सेनापतींच्या वरील आरोपाचा एकदम व एका लोकसभेतील बहुमतानें निकाल करावा, अशी सूचना सभेपुढे आली. आळीपाळीने एकएका गोत्रांतील अध्यक्ष करण्याच्या रीतीप्रमाणे सॉक्रेटिसाची अध्यक्षाची पाळी त्या दिवशी आली होती. ही सूचना उघड उघड गैरकायदा होती. अशी गैरकायदा सूचना मी साफ सभेपुढे ठेवणार नाहीं, असें सॉक्रेटिसाने निक्षून सांगितले: त्याला लांच देऊं केला, मरणाचें भय घातले, नाना प्रकारांनी विनवण्या केल्या. लोक अगदी खवळलेले होते. तरीसुद्धां सॉक्रेटीस डगमगला नाहीं किंवा सत्यापासून पराङ्मुख झाला नाहीं. सॉक्रेटिसाच्या या नीतिधैर्यांचा<noinclude>{{center|९}}</noinclude>
edtcqymi0j57jh36cbquj5symj3bmai
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१६
104
110000
229012
228841
2026-04-08T12:24:44Z
JayashreeVI
4058
229012
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />'''तीन तत्वज्ञानी.'''</noinclude>उपयोग झाला नाहीं, ही गोष्ट निराळी. कारण अथीनीयन कायद्याप्रमाणे लोकसभेचा अध्यक्ष रोज बदलावयाचा असे. तेव्हां दुसऱ्या दिवसपर्यंत हें काम तहकूब करून सेनापतीविरुद्ध असलेल्या लोकांनीं आपली सूचना दुस-या दिवशींच्या अध्यक्षामार्फत पुढे ठेवून मग पास करून घेतली.

{{gap}}आतां अशा त-हेचा एकच प्रसंग सांगावयाचा राहिला. तो तिसांच्या अनियंत्रित कारभाराच्या कारकीर्दीतील होय. या तीस जुलमी अधिकाऱ्यांच्या कारकीर्दीत त्यांनी पांच नागरिकांना सॅलॅमीसमध्ये जाऊन लिऑन या नांवाच्या निरपराधी मनुष्यास पकडून आणण्यास सांगितलें. या जुलमी अधिका-याचा उद्देश आपल्याबरोबर बऱ्याच लोकांना जुलमी व अन्यायाच्या कृत्यांत सामील करून घ्यावयाचा होता; परंतु या पांचां मध्ये सॉक्रेटीस होता. असे अन्यायाचे काम मी कदापि करावयाचा नाहीं, असें सांगून सॉक्रेटीस संथपणे घरी गेला. या त्याच्या उद्दामपणाबद्दल त्या जुलमी अधिकाऱ्यांनी सॉक्रेटिसावर कड्याळ आणले असतें, परंतु असें करण्यास त्यांना संधि सांपडण्यापूर्वी त्यांची अथेन्समधून उचलबांगडी झाली.{{nop}}
{{center|******}}<noinclude>{{center|१० }}</noinclude>
64flgssmycp3at66gmeucszk3c4clbw
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१८
104
110002
229009
228849
2026-04-08T12:21:09Z
JayashreeVI
4058
229009
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />'''तीन तत्वज्ञानी.'''</noinclude>कळत नाहीं व यामुळे जनता साधुपुरुषाविषय भलताच ग्रह करून घेते. 'सत्यान्नास्ति परो धर्मः' हें साधुपुरुषाचें वर्तनतत्त्व असते, तर 'बाबावाक्यं प्रमाणम्' हें जनतेचे वर्तनतत्व असते; सदसद्विवेकबुद्धि व सुविचार यांच्या पायावर उभारलेल्या शास्त्रावर ख-या साधूची भिस्त असते, तर दुराग्रह, श्रद्धा व 'पिच्छसे आई' रूढी यांवर जनतेची भिस्त असते; ख-या साधुपुरुषाची आत्मनिरीक्षण करून स्वतःचे दोष पाहून ते नाहीसे करण्याची प्रवृत्ति असते, तर जनतेला आपले दोष पाहण्याची व ते सुधारण्याची मुळीच संवय नसते; ख-या साधुपुरुषाची आपले गुण झांकून दुस-याचे अणुइतकेही गुण मोठे करून दाखविण्याची प्रवृत्ति असते, तर जनतेला आपले गुण फारच मोठे भासतात, दुसऱ्याचे गुण लहान वाटतात व आपल्या डोळ्यांतील मुसळ दिसत नाहीं परंतु दुस-याच्या डोळ्यांतील कुसळसुद्धां दिसतें! शेवटीं ख-या साधुपुरुषाला थोतांड व दांभिकपणा मुळींच खपत नाहीं, त्याला दुस-याचे दोष निस्पृहपणे दाखविल्याखेरीज राहवत नाहीं व त्याला खोटीं स्तुति करतां येत नाहीं; तर जनतेची धर्मथोतांडवंड करणारावर व आपल्या छंदाप्रमाणें वागणारावर बहाल मर्जी असते, आणि ती स्तुतिप्रिय असते. विशेषतः ख-या साधुपुरुषाच्या या शेवटच्या विशेषामुळे लोकांमध्ये त्याला फार शत्रु बनतात व मग ते त्या साधुपुरुषाला त्रास देतात, त्याचा छल करतात व हातांत अधिकार असल्यास त्याचाहि उपयोग करून त्या साधुपुरुषाला शिक्षासुद्धां करण्यास मागें पुढे पहात नाहींत.

{{gap}}साक्रेटिसाला याच कारणामुळे शिक्षा झाली. त्याची शिक्षण पद्धति वादविवादात्मक होती हे पूर्वी सांगितलेच आहे. तो व्याख्यानरूपानें उपदेश करीत नसे, तर भेटेल त्याला त्याच्या विषयाविषयीं उलट सुलट प्रश्न विचारून त्याला कुंठित करी व त्याचें अज्ञान त्याला दाखवून देई व मग त्याला आणखी प्रश्न विचारून त्याच्या जवळून सत्यरूप उत्तरें काढून त्याला उपदेश करी. हा सर्व--<noinclude>{{center|१२}}</noinclude>
bwq1pcg84suyyo13nugwl5hqgxdxtoz
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१९
104
110003
229008
228880
2026-04-08T12:19:43Z
JayashreeVI
4058
229008
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{right|'''साक्रेटिस.'''}}</noinclude>वादविवाद लोकांच्या देखत चालत असे व कोणत्याहि माणसाला सर्वदेखत आपली फजिती झालेली खपत नसे.त्यामुळे सर्व धंद्याच्या लोकांचं साक्रेटिसानें वैर संपादन केले होते. शिवाय, साक्रेटिस हा मोठा सुधारणावादी होता, व प्रत्येक चालीचे, प्रत्येक संस्थेचें, प्रत्येक मताचे व प्रचलित कल्पनेच युक्तिवादाने समर्थन करतां आलें तर तो खरी असे तो म्हणत असे. यामुळे पुराणमताभिमानी लोकांचेहि त्याने वैर संपादन केलें होतें. याप्रमाणे त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्याविरुद्ध वैराचा अग्नि सारखा धुमसत होता व त्याचा भडका अथेन्समध्ये जुलमी तीस अधिका-यांची सत्ता जाऊन पुनः प्रजासत्ताक राज्याची स्थापना झाल्याबरोबर झाला. या जुलमी अधिका-यांच्यामध्ये कांहीं साक्रेटिसाचे शिष्य होते. यामुळे तर लोकक्षोभांत जास्तच भर पडण्यास कारण झाले. अथेन्सला भोगाव्या लागलेल्या सर्व आपत्तींचे आदिकारण सॉक्रेटिस चें शिक्षण, अशी लोकांची समजूत झाली. तेव्हां हें मूळच नाहीसे करून टाकले पाहिजे असे कित्येकांस वाटून त्यांनीं साक्रेटिसावर फौजदारी खटला करून त्याचा अंत करण्याचा निश्चय केला व तो अथेन्समधल्या न्यायपद्धतीमुळे त्यांना सहज पार पाडता आला.

{{gap}}अथेन्समधील न्यायपद्धतीची हल्लीच्या काळच्या लोकांना मुळींच कल्पना यावयाची नाही. अथेन्सच्या राजकीय सत्तेप्रमाणेच अथेन्सची न्यायपद्धतीही पूर्ण लोकसत्तात्मक होती. तेथे आधी लिहिलेले असे कायदे नसत, निष्णात न्यायाधीशही नसत, सामान्य लोकांची ज्यूरी असे. परंतु ही ज्यूरी इंग्रजी पद्धतीप्रमाणे न्यायाधीशास सल्ला देण्यापुरतीच नसे, तर सर्व न्यायाचे अधिकार ज्यूररच्या मताधिक्यावर अवलंबून असत व ज्यूररची संख्याही फारच मोठी असे. म्हणून अथेन्समधील न्यायसभा ही लोकसभेप्रमाणे सर्व नागरिकांची सभाच असे. वादीप्रतिवादींनी आपापले खटले स्वतःच चालविले पाहिजेत असाही दुसरा एक नियम असे. न्यायसभेच्या अशा घटनेमुळे खटले वादीप्रतिवादींनी स्वतःच चालविण्याच्या नियमाने व कारभाराच्या पूर्ण लोकतत्वामुळे ग्रीस देशांत वक्तृत्व--<noinclude>{{center|१३}}</noinclude>
mtnmmqympntzl52a50847ztd9e58bz4
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/२०
104
110007
229005
228869
2026-04-08T12:17:00Z
JayashreeVI
4058
229005
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="सुबोध कुलकर्णी" />{{'''तीन तत्वज्ञानी.'''}}}}</noinclude>शिखरास पोहोंचलें होतें. वक्तृत्वकलेची इतकी प्रगति दुसन्या कोठेंच झाली नाहीं. आपले संरक्षण करण्यास वक्तृत्वशक्तींची जरूरी असल्यामुळे प्रत्येक नागरिकाला वक्तृत्व आवश्यक होतें व वक्तृत्वकला हें तेथल्या शिक्षणाचे एक प्रमुख अंग झाले होतें. असो.

{{gap}}ख्रिस्ती शकापूर्वी ३९९ या वर्षी सॉक्रेटिसावर खटला झाला. खटल्याची नोटिस मेलीटस या कवीने दिलेली होती व खटल्यांत एक धार्मिक आरोप असल्यामुळे अथीनीयन कायद्याप्रमाणें आर्कन नांवाच्या अधिकाऱ्याने पूर्वतपास केला होता व न्यायसभेचा या दिवशीं तोच अध्यक्ष होता. ज्यूरर ५०१ होते. खटल्याचा निकाल योग्य व खऱ्या रीतीनें देऊ अशी शपथ घेतल्यावर ज्यूरर लोक चटया आंथरलेल्या लांब बांकावर येऊन बसले. शेजारी असलेल्या प्लॅटफॉर्मवर वादीप्रतिवादी समोरासमोर ठाकले. कठडयाच्या पलीकडे पुष्कळ प्रेक्षक बसले होते. धूपारती व न्यायसभेच्या घोषकानें म्हटलेली प्रार्थना होऊन कामाला सुरुवात झाली. कोर्टाच्या क्लार्कने आरोप व लेखी कैफियत वाचली. 'आरोप असा होता :-

{{gap}}"सॉक्रेटिस हा गुन्हेगार आहे. कारण तो संस्थाननें मानलेले देव मानीत नाहीं व त्यानें नवीन देवांचा लोकांत प्रसार केला आहे; आणखी तो तरुणांना बिघडवितो."

{{gap}}नंतर अध्यक्षानें वादीपक्षाच्या लोकांस अग्रासनीं येऊन बोलण्यास फर्माविलें. प्रथमतः मेलीटस कवि बोलला. त्याचे भाषण म्हणजे आपल्या देशभक्तीचें व वक्तृत्वकलेचें प्रदर्शन होतें ! परंतु त्याचें भाषण फारसें चांगले झालें नाहीं. नंतर अनीटस व लायकन यांची भाषणे झाली. तीं जास्त चांगली झाली व त्यांचा ज्यूररवर परिणामही झाला. अनीटस म्हणाला, " सॉक्रेटिसाशी आपला खाजगी द्वेष नाहीं व कोर्टाचे समन्स न मानतां जर सॉक्रेटीस देश सोडून जाता तर आपल्याला आनंद झाला असता. परंतु ज्या अर्थी सॉक्रेटिस हजर राहिला आहे त्या अर्थी आतां त्याची सुटका होणं श्रेयस्कर नाहीं."{{nop}}<noinclude>{{center|१४}}</noinclude>
towqrw962ngmvnwo5ddfvyil0ccyons
229006
229005
2026-04-08T12:18:07Z
JayashreeVI
4058
229006
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="सुबोध कुलकर्णी" />'''तीन तत्वज्ञानी.'''</noinclude>शिखरास पोहोंचलें होतें. वक्तृत्वकलेची इतकी प्रगति दुसन्या कोठेंच झाली नाहीं. आपले संरक्षण करण्यास वक्तृत्वशक्तींची जरूरी असल्यामुळे प्रत्येक नागरिकाला वक्तृत्व आवश्यक होतें व वक्तृत्वकला हें तेथल्या शिक्षणाचे एक प्रमुख अंग झाले होतें. असो.

{{gap}}ख्रिस्ती शकापूर्वी ३९९ या वर्षी सॉक्रेटिसावर खटला झाला. खटल्याची नोटिस मेलीटस या कवीने दिलेली होती व खटल्यांत एक धार्मिक आरोप असल्यामुळे अथीनीयन कायद्याप्रमाणें आर्कन नांवाच्या अधिकाऱ्याने पूर्वतपास केला होता व न्यायसभेचा या दिवशीं तोच अध्यक्ष होता. ज्यूरर ५०१ होते. खटल्याचा निकाल योग्य व खऱ्या रीतीनें देऊ अशी शपथ घेतल्यावर ज्यूरर लोक चटया आंथरलेल्या लांब बांकावर येऊन बसले. शेजारी असलेल्या प्लॅटफॉर्मवर वादीप्रतिवादी समोरासमोर ठाकले. कठडयाच्या पलीकडे पुष्कळ प्रेक्षक बसले होते. धूपारती व न्यायसभेच्या घोषकानें म्हटलेली प्रार्थना होऊन कामाला सुरुवात झाली. कोर्टाच्या क्लार्कने आरोप व लेखी कैफियत वाचली. 'आरोप असा होता :-

{{gap}}"सॉक्रेटिस हा गुन्हेगार आहे. कारण तो संस्थाननें मानलेले देव मानीत नाहीं व त्यानें नवीन देवांचा लोकांत प्रसार केला आहे; आणखी तो तरुणांना बिघडवितो."

{{gap}}नंतर अध्यक्षानें वादीपक्षाच्या लोकांस अग्रासनीं येऊन बोलण्यास फर्माविलें. प्रथमतः मेलीटस कवि बोलला. त्याचे भाषण म्हणजे आपल्या देशभक्तीचें व वक्तृत्वकलेचें प्रदर्शन होतें ! परंतु त्याचें भाषण फारसें चांगले झालें नाहीं. नंतर अनीटस व लायकन यांची भाषणे झाली. तीं जास्त चांगली झाली व त्यांचा ज्यूररवर परिणामही झाला. अनीटस म्हणाला, " सॉक्रेटिसाशी आपला खाजगी द्वेष नाहीं व कोर्टाचे समन्स न मानतां जर सॉक्रेटीस देश सोडून जाता तर आपल्याला आनंद झाला असता. परंतु ज्या अर्थी सॉक्रेटिस हजर राहिला आहे त्या अर्थी आतां त्याची सुटका होणं श्रेयस्कर नाहीं."{{nop}}<noinclude>{{center|१४}}</noinclude>
onac5ex6xnzaqn24cd046wgs8m7l8u9
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/२१
104
110008
229003
228898
2026-04-08T12:13:28Z
JayashreeVI
4058
229003
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{right|'''सॉक्रेटिस'''}}</noinclude>{{gap}}वादींच्या भाषणांत सॉक्रेटिसाच्या शिष्यांच्या दुष्कृत्यांचा पुष्कळ उल्लेख होता व त्यावरून सॉक्रेटिसाचें शिक्षण तरुणांना बिघडविणारें आहे असे वादींचें म्हणणें होतें. वादींनीं आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ कांहीं पुरावा सादर केला होता किंवा नाहीं हें कळण्यास साधन नाहीं. नंतर सॉक्रेटिसाची उत्तर देण्याची पाळी आली. त्याचें भाषण अत्यंत साधें, पण अकृत्रिम वक्तृत्वपूर्ण होतें. सॉक्रेटिस म्हणालाः—

{{gap}}'अथीनियन नागरिकहो! माझ्या प्रतिपक्षीयांनी तुमच्या मनावर आपल्या भाषणाने काय परिणाम केला आहे, हे मला सांगतां येत नाहीं. माझ्या संबंधानें विचाराल तर मी कोण आहे हें मी बहुतेक विसरून गेलो आहे, इतके त्यांचें भाषण मोहक भ्रामक आहे, तरी पण त्यांच्या भाषणांत सत्याचा अंश क्वचितच सांपडेल! परंतु त्यांच्या असत्य विधानांपैकीं मला ज्याबद्दल विशेष आश्चर्य वाटलें तें विधान हे:- त्यांनी तुम्हांला सांगितलें कीं, मी मोठा वस्ताद वक्ता आहे व तुम्हांला तेव्हांच भुरळ घालीन! आतां या विधानाचा खोटेपणा मी आपल्या तोंडांतून एक शब्द काढल्याबरोबर दिसून येईल व तुम्हांला समजेल कीं, माझ्यांत मुळींच वक्तृत्व नाहीं! खरे बोलणारा तो मोठा वस्ताद वक्ता असा जर
यांचा अर्थ असला तर मात्र गोष्ट निराळी! या अर्थानें मीं कबूल करतों कीं, मी त्यांच्यापेक्षा जास्त मोठा वक्ता आहे. कारण मी खरें खरें तेंच सांगतों व आतां सांगणार आहे. मोहक भाषेनें शृंगारलेले नाटकी भाषण करणें मला आतां शोभत नाहीं. मी आपली कैफीयत आधी तयार केली नाहीं. मला जे आयत्या वेळीं शब्द सुचतील त्या शब्दांतच मी बोलणार आहे. मला आतां सत्तरावें वर्ष लागले आहे. न्यायसभेत पाऊल टाकंण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग आहे. यामुळे येथल्या भाषणपद्धतीशीं मी अगदीं अनभिज्ञ आहे. ज्याप्रमाणें तुम्ही परकी देशांतील मनुष्याला आपल्या भाषेत आपल्याच तऱ्हेने बोलूं द्याल त्याचप्रमाणे माझ्या नेहमींच्या पद्धतीने आपण मला बोलूं द्यावें अशी विनंति आहे. माझी बोलण्याची भाषाशैली कशी आहे-ती चांगली असेल अगर वाईट असेल-<noinclude>{{center|१५}}</noinclude>
h4uia8nvawdvb61pid1z3gxvtx3iueo
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/२३
104
110010
229018
228938
2026-04-08T12:32:10Z
JayashreeVI
4058
229018
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" />{{right|'''साक्रेटिस.'''}}</noinclude>
आले असते तर फार चांगले होते. कांही लोक आपल्याला मनुष्याच्या कर्तव्यकर्माचं ज्ञान करून देतां येते अशी घमेंड मारतात व अशा त-हेने पुष्कळ पैसे मिळवितात व तरुण लोक यांचे पाठीमागे लागतात. परंतु मी अशा त-हेची घमेंड मारली नाहीं किंवा कोणाकडून पैसेही मिळविले नाहींत!

{{gap}}"पण आपणांपैकी कोणी तरी विचारील, 'अहो सॅक्रेटिस! जर तुम्हीं कांहीं केलें नाहीं असे म्हणतां तर मग तुमच्याबद्दल इतकी निंदा कां? सामान्य लोकांमध्ये नाही असे काहीं तरी असाधारण तुमच्या वर्तनांत तुमच्या पद्धतींत असल्याखेरीज तुमच्याविरुद्ध इतक्या कंड्या पिकतील कशा? तेव्हां तुमचा खरा व्यवसाय काय तो आम्हांला सांगा. म्हणजे तुमच्या खटल्याचा आम्हांस योग्य निकाल करण्यास सांपडेल.' हा प्रश्न वाजवी आहे व माझ्याविरुद्ध इतक्या कंडया कां पिकल्या व माझें नांव इतके वाईट का झाले आहे याचे स्पष्टीकरण मी आतां करणार आहे. मी विनोदाने कांही तरी सांगत आहे, असें समजूं नका. मी अगदी सत्य तेच सांगत आहे. माझें नांव बहू होण्याचे कारण माझ्यमध्ये असलेले एक प्रकारचे शहाणपण होय. हे शहाणपण सर्व मनुष्यप्राण्यांस साध्य करून घेता येण्यासारखे आहे. परंतु या निराळे एखादें शहाणपण माझे अंगीं नाहीं. माझ्या प्रतिपक्षीयांना असल्यास न कळे! या माझ्या म्हणण्याच्या समर्थनार्थ मी डेलफाय देवाची साक्ष आणू शकेन. तुम्हांला चेरीफान ठाऊक आहे. तो तरुणपणापासून माझा सोबती होता. त्यानें लोकांबरोबर जुलमी अमलात देशत्याग केला व लोकांबरोबरच तो परत आला. त्याचा स्वभावही तुम्हांला माहीत आहे. त्याने एखादी गोष्ट मनांत आणली म्हणजे ती तो शेवटास नेल्याखेरीज रहावयाचा नाहीं. त्याने एकदां डेलफाय देवाला प्रश्न विचारला कीं, 'सॉक्रेटिसापेक्षां कोणी शहाणा आहे काय?' देवाकडून उत्तर आले,'नाही.' ही गोष्ट खरी आहे याची साक्ष चेरीफानचा येथें हजर असलेला भाऊ देऊ शकेल."<noinclude>{{center|१७}}
{{left|सा...२}}</noinclude>
mye9tbguqs74w56ljhnnfgryosy1fai
229019
229018
2026-04-08T12:33:06Z
JayashreeVI
4058
229019
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" />{{right|'''साक्रेटिस.'''}}</noinclude>
आले असते तर फार चांगले होते. कांही लोक आपल्याला मनुष्याच्या कर्तव्यकर्माचं ज्ञान करून देतां येते अशी घमेंड मारतात व अशा त-हेने पुष्कळ पैसे मिळवितात व तरुण लोक यांचे पाठीमागे लागतात. परंतु मी अशा त-हेची घमेंड मारली नाहीं किंवा कोणाकडून पैसेही मिळविले नाहींत!
{{gap}}"पण आपणांपैकी कोणी तरी विचारील, 'अहो सॅक्रेटिस! जर तुम्हीं कांहीं केलें नाहीं असे म्हणतां तर मग तुमच्याबद्दल इतकी निंदा कां? सामान्य लोकांमध्ये नाही असे काहीं तरी असाधारण तुमच्या वर्तनांत तुमच्या पद्धतींत असल्याखेरीज तुमच्याविरुद्ध इतक्या कंड्या पिकतील कशा? तेव्हां तुमचा खरा व्यवसाय काय तो आम्हांला सांगा. म्हणजे तुमच्या खटल्याचा आम्हांस योग्य निकाल करण्यास सांपडेल.' हा प्रश्न वाजवी आहे व माझ्याविरुद्ध इतक्या कंडया कां पिकल्या व माझें नांव इतके वाईट का झाले आहे याचे स्पष्टीकरण मी आतां करणार आहे. मी विनोदाने कांही तरी सांगत आहे, असें समजूं नका. मी अगदी सत्य तेच सांगत आहे. माझें नांव बहू होण्याचे कारण माझ्यमध्ये असलेले एक प्रकारचे शहाणपण होय. हे शहाणपण सर्व मनुष्यप्राण्यांस साध्य करून घेता येण्यासारखे आहे. परंतु या निराळे एखादें शहाणपण माझे अंगीं नाहीं. माझ्या प्रतिपक्षीयांना असल्यास न कळे! या माझ्या म्हणण्याच्या समर्थनार्थ मी डेलफाय देवाची साक्ष आणू शकेन. तुम्हांला चेरीफान ठाऊक आहे. तो तरुणपणापासून माझा सोबती होता. त्यानें लोकांबरोबर जुलमी अमलात देशत्याग केला व लोकांबरोबरच तो परत आला. त्याचा स्वभावही तुम्हांला माहीत आहे. त्याने एखादी गोष्ट मनांत आणली म्हणजे ती तो शेवटास नेल्याखेरीज रहावयाचा नाहीं. त्याने एकदां डेलफाय देवाला प्रश्न विचारला कीं, 'सॉक्रेटिसापेक्षां कोणी शहाणा आहे काय?' देवाकडून उत्तर आले,'नाही.' ही गोष्ट खरी आहे याची साक्ष चेरीफानचा येथें हजर असलेला भाऊ देऊ शकेल."<noinclude>{{center|१७}}
{{left|सा...२}}</noinclude>
if1491b4f8g2p5qmb0fwpdo63m2c6f3
229020
229019
2026-04-08T12:34:16Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
229020
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{right|'''साक्रेटिस.'''}}</noinclude>
आले असते तर फार चांगले होते. कांही लोक आपल्याला मनुष्याच्या कर्तव्यकर्माचं ज्ञान करून देतां येते अशी घमेंड मारतात व अशा त-हेने पुष्कळ पैसे मिळवितात व तरुण लोक यांचे पाठीमागे लागतात. परंतु मी अशा त-हेची घमेंड मारली नाहीं किंवा कोणाकडून पैसेही मिळविले नाहींत!
{{gap}}"पण आपणांपैकी कोणी तरी विचारील, 'अहो सॅक्रेटिस! जर तुम्हीं कांहीं केलें नाहीं असे म्हणतां तर मग तुमच्याबद्दल इतकी निंदा कां? सामान्य लोकांमध्ये नाही असे काहीं तरी असाधारण तुमच्या वर्तनांत तुमच्या पद्धतींत असल्याखेरीज तुमच्याविरुद्ध इतक्या कंड्या पिकतील कशा? तेव्हां तुमचा खरा व्यवसाय काय तो आम्हांला सांगा. म्हणजे तुमच्या खटल्याचा आम्हांस योग्य निकाल करण्यास सांपडेल.' हा प्रश्न वाजवी आहे व माझ्याविरुद्ध इतक्या कंडया कां पिकल्या व माझें नांव इतके वाईट का झाले आहे याचे स्पष्टीकरण मी आतां करणार आहे. मी विनोदाने कांही तरी सांगत आहे, असें समजूं नका. मी अगदी सत्य तेच सांगत आहे. माझें नांव बहू होण्याचे कारण माझ्यमध्ये असलेले एक प्रकारचे शहाणपण होय. हे शहाणपण सर्व मनुष्यप्राण्यांस साध्य करून घेता येण्यासारखे आहे. परंतु या निराळे एखादें शहाणपण माझे अंगीं नाहीं. माझ्या प्रतिपक्षीयांना असल्यास न कळे! या माझ्या म्हणण्याच्या समर्थनार्थ मी डेलफाय देवाची साक्ष आणू शकेन. तुम्हांला चेरीफान ठाऊक आहे. तो तरुणपणापासून माझा सोबती होता. त्यानें लोकांबरोबर जुलमी अमलात देशत्याग केला व लोकांबरोबरच तो परत आला. त्याचा स्वभावही तुम्हांला माहीत आहे. त्याने एखादी गोष्ट मनांत आणली म्हणजे ती तो शेवटास नेल्याखेरीज रहावयाचा नाहीं. त्याने एकदां डेलफाय देवाला प्रश्न विचारला कीं, 'सॉक्रेटिसापेक्षां कोणी शहाणा आहे काय?' देवाकडून उत्तर आले,'नाही.' ही गोष्ट खरी आहे याची साक्ष चेरीफानचा येथें हजर असलेला भाऊ देऊ शकेल."<noinclude>{{center|१७}}
{{left|सा...२}}</noinclude>
k2bdjy841u5wk6014kde7n1grfqvru7
सदस्य चर्चा:Sadanand Jagtap
3
110063
229017
2026-04-08T12:30:24Z
स्वागत आणि साहाय्य चमू
815
नवीन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला
229017
wikitext
text/x-wiki
{{Template:Welcome|realName=|name=Sadanand Jagtap}}
-- [[सदस्य:स्वागत आणि साहाय्य चमू|स्वागत आणि साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:स्वागत आणि साहाय्य चमू|चर्चा]]) १८:००, ८ एप्रिल २०२६ (IST)
873j5fbusk6oc0n6r8ye9xw6wke1iza
अनुक्रमणिका चर्चा:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf
107
110064
229032
2026-04-09T10:15:50Z
कल्पनाशक्ती
3813
/* missing pages */ नवीन विभाग
229032
wikitext
text/x-wiki
== missing pages ==
page 36, 37 are missing in this edition- pdf 65=pg 35 pdf66=38 [[सदस्य:कल्पनाशक्ती|कल्पनाशक्ती]] ([[सदस्य चर्चा:कल्पनाशक्ती|चर्चा]]) १५:४५, ९ एप्रिल २०२६ (IST)
ahftcji50zszxvlfw480shmk4cq05ip