विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.46.0-wmf.23 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk पान:Gangajal cropped.pdf/13 104 20684 229098 67621 2026-04-10T17:04:08Z कल्पनाशक्ती 3813 229098 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Svnavare" />१४ / गंगाजल</noinclude>ज्या गावात देऊळ नाही, तिथे आपली धडगत नाही. ज्या जुन्या काळी ही म्हण झाली असेल, त्या वेळी तरी देवळाशिवाय गाव असण्याची शक्यता नव्हती असे वाटते. जुना काळ गेला, पण जुने संस्कार मनात रुजून आहेत. इथे पुण्यामध्ये ही नवीन वस्ती बांधणार्‍या लोकांना तमिळ म्हण काही माहीत नसणार, पण म्हणीच्या मागचा संस्कार मात्र त्यांच्या मनावर खासच आहे." {{gap}}‘आहे तरी काय हा संस्कार? त्याचे रूप काय?" परत प्रश्न आला. {{gap}}मी जरा विचारात पडले. माझी विद्वत्ता दाखवायची बरी संधी आली आहे, ह्याचीही जाणीव झाली. मी सांगू लागले : {{gap}}"गेल्या वर्षी मी एक जुने पुस्तक वाचीत होते. असेल तेराव्या किंवा चौदाव्या शतकातील. संस्कृतामध्ये लिहिलेले. सर्व पुस्तक नगररचना व घराची रचना ह्यांबद्दल असल्यामळे मला नीटसे कळले नाही. पण त्यातल्या काही गोष्टी ठळकपणे लक्षात आल्या. नगररचनेसाठी पहिल्यांदा दिशा ठरवून एक चौकोन आखला. त्या चौकोनाच्या बाजूंचे बरोबर आठ भाग करून परत चौसष्ठ चौकोन आतमध्ये आखले व एकेका चौकोनाला एकेका देवतेचे नाव दिले. सर्वात मोठे देऊळ व त्याचे अंगण मध्यभागी होते. त्यानंतर राऊळ म्हणजे राजकुलाची राहण्याची जागा. नंतर राजाच्या सरदारांचे वगैरे मोठे वाडे असलेला रस्ता. नंतर अतिशय धनिक व्यापारी, हिर्‍या-मोत्यांचा व्यापार करणारे वगैरे गोष्टींपासून सुरूवात होऊन भाजीपाला विकणारे, मीठ-मसाला विकणारे अशा प्रकारच्या लोकांची दुकाने, मध्यमवर्गाची दुकाने, शहराच्या चौकोनाबाहेर अस्पृश्यांची घरे आणि त्यांच्यापासून दूर अंतरावर नगररचना करणाच्या स्थपतींची व सुतारांची घरे, असा एकंदर आराखडा दिलेला आहे. {{gap}}“नगरामध्ये कुठे काय आहे, हे सांगताना त्या चौकोनातील देवाच्या देवळाचा उल्लेख होई. म्हणजे बरोबर कोठच्या जागेबद्दल वर्णन आहे, हे निश्चित समजे. देवांचा व देवळांचा स्थाननिश्चितीसाठी अशा तर्‍हेने केलेला उपयोग मला नवीनच होता. पण एक गोष्ट लक्षात आली की, देव हे स्थापत्यशास्त्राने निर्माण केलेले नसून, आधीच अस्तित्वात असलेल्या देवांचा स्थाननिश्चितीसाठी ह्या ग्रंथकाराने फार हुषारीने उपयोग करून घेतला. ह्या पुस्तकामध्ये कोणाची घरे कुठे असावी, हे तर दिलेच आहे पण एकेका आळीतील घरांची उंची सारखी असावी, असे देऊन कोठच्या<noinclude></noinclude> 573v175ahtjtr6i2f2kc9cc3m54qtbz पान:Gangajal cropped.pdf/15 104 20686 229099 67632 2026-04-10T17:05:10Z कल्पनाशक्ती 3813 229099 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Svnavare" />१६ / गंगाजल</noinclude>रूप देतो; तोच देव. जी मागणी मानवाजवळ करिता येत नाही, ती आपण देवाजवळ करितो. कायमचा आसरा मागतो, न्याय मागतो, निवारा मागतो, शांती मागतो... किंवा निरनिराळ्या प्रासंगिक मागण्या करितो. अगदी काहीच नाही, तर संसाराच्या भगभगीत क्षणभराची उसंत मिळावी, म्हणून देवळात जातो. काहींना असा आधार पसंत नाही. काहींना असा आधार घ्यावासा वाटतो. आपल्यापेक्षा सर्वस्वी श्रेष्ठ असे काही वाटते, त्याचे प्रतीक देऊळ!" {{gap}}“देवळाच्या उंचीचे व भव्यतेचे तू वर्णन करीत होतीस, तर राजवाडे, ताजमहाल हे नाहीत का भव्य? तेसुद्धा नाहीत का कोठच्यातरी भव्यतेची प्रतीके?'' {{gap}}"नुसतीच भव्य का, सुंदरही आहेत. पण ती उपासनेची स्थाने होऊ शकत नाहीत. शिक्षणसंस्था अशा काही भव्य व दिव्य भावनेचे प्रतीक होऊ शकतील अशी वेडी कल्पना काहींनी बाळगिली होती, पण त्याही तशा होऊ शकल्या नाहीत. इतरांची देवळे फोडणारे धर्म आहेत. स्वत:च्या देवळांना छिन्नभिन्न करून स्वत:चा भूतकाळाशी संबंध पार तोडून टाकणारेही लोक आहेत. अशा काळात देवळाविना राहू नये, म्हणणारा वेडाच ठरणार . पण अजूनही पुष्कळांच्या मनात ही भावना आहे. तीत देवळाच्या भव्यपणाला व सौंदर्याला दुय्यम स्थान आहे. आतील मूर्तीला तिच्या भोवताली गोळा झालेल्या शतकानुशतकांच्या आर्ततेच्या, कारुण्याच्या, शांतीच्या व पावित्र्याच्या भावना आहेत. ताजमहाल किंवा जयपूरचा राजवाडा पाहतो, त्या वेळच्या भावना व पंढरपूरला विठ्ठलाची मूर्ती पाहतो, त्या वेळच्या भावना अगदी निराळ्या आहेत. देऊळ नाही, तेथे भावनाही नाहीत, म्हणून तेथे राहू नये, असे त्या तमिळ माणसाचे म्हणणे दिसते." {{gap}}“ड्रेनेज, दुकाने, स्वच्छ वस्त्या, रस्ते व दवाखाना असल्या गोष्टी गावाला आवश्यक आहेत. त्या जोडीला बागा व करमणुकीची साधनेही हवीत. शाळा कॉलेजे-वाचनालयेही हवीत. पण देवळाचे काय प्रयोजन ? बाकीच्या गोष्टींनी माणसाचे आयुष्य सुसह्य होते. देवळाने काय होते ?" {{gap}}"जगातील सर्व चांगल्या गोष्टी मिळाल्या, म्हणजे मग काही हवेसे वाटत नाही, असे नाही. सर्व मिळूनही काहीतरी हुरहूर वाटते. आपल्याला शरीरस्वास्थापलीकडे काहीतरी आहे, ह्याची जाणीव असते. अगदी सर्व माणसे सुखी झाली, तरीसुद्धा आयुष्यात काहीतरी प्रश्न उरतातच. गरीब माणसे नसली, तर त्यांची स्थिती सुधारण्यासाठी धडपड करणार्‍या<noinclude></noinclude> 9b4ek8vhnjrl2u6cbp352mg5xi1guft पान:Gangajal cropped.pdf/16 104 20687 229100 67635 2026-04-10T17:05:57Z कल्पनाशक्ती 3813 229100 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Svnavare" />{{right|गंगाजल / १७}}</noinclude>माणसांचे काय होईल? अज्ञान माणसे नसतील तर त्यांना सज्ञान करण्यासाठी प्रयत्न करणाच्यांचे काय होईल? असल्या प्रकारचा हा आचरट प्रश्न नाही. माणसाला ध्येये असावीत, म्हणून देवाने जगात अपूर्णता ठेविली आहे, असेही नाही. जगात पूर्णता असली, तरी काही उणे आहे असे वाटत राहील व सारखे वाटत राहते. ते पूर्ण करायची जी इच्छा, तिचे प्रतीक देऊळ आहे" {{gap}}माझ्या मनात नव्याने एक विचार आला. मी म्हटले, "आपल्या संतांनी शरीराला 'देहगाव' म्हटले आहे. ह्या गावातसुद्धा देऊळ वा देव असलाच पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. बाहेरच्या गावातून देव नसला तरी तो चालेल, पण अंतर्यामी तो असावा, अशी त्यांची भावना होती. आयुष्यात मिळण्यासारखे असेल ते मिळाले, तरी मनाची कशासाठी तरी धडपड चाललेली असते. काहीतरी अशांतता मनाला पोखरीत असते. कशामुळे तरी निराधार वाटत असते." {{gap}}माझे म्हणणे मध्येच थांबवून तिने विचारले, “तू म्हणतेस हे मरणाच्या जाणिवेमुळे तर नसेल? अगदी सुखात बुडालेले असलो, तरीसुद्धा ह्या सुखाला अंत आहे, अशी बोचणी असते. कितीही जिवास जीव देणारे मित्र असले, तरी आपण एकाकीच आहोत, एकटेच राहणार व एकटेच जाणार, ह्या भीतीने माणूस ग्रासलेला असतो. मनाची धडपड. अशांतता, अगतिकता सर्व ह्यामुळेच असेल. हृदयातल्या देवाला शोधण्याची, त्याच्यासाठी लागलेल्या तहानेची ती धडपड नसेलच मुळी!" {{gap}}"तेही खरेच. दोन्ही तऱ्हांची माणसे आहेत. काही अंतर्यामात देव शोधीत असतात. जगण्याला काहीतरी अर्थ शोधीत असतात. आणि जीवन सर्वस्वी अर्थहीन आहे, पण ते शक्य तितके सुखावह करणे, मानाने जगणे व इतरांना जगविणे ह्या बुद्धीने काही जगत असतात. एका दृष्टीने ह्या ध्येयवाद्यांना कुठचातरी देव सापडलेला असतो. काहींना हा ध्येयवाद नसतो. ते आपले स्वत:चे. अगदी सर्वस्वी स्वत:चे असे एक जीवन जगतात. जगातले जेवढे मिळण्यासारखे असेल, ते ते घेत राहतात; आणि एक दिवस- एका क्षणी- स्वतःच्या एकाकीपणाची, असहायतेची व निष्फळतेची त्यांना इतकी तीव्र जाणीव होते की, त्याने जगणे अशक्य होऊन ते जीव देतात. {{gap}}"बाळ व लहानी तुला माहीत आहेतच. काय उमदी पोरे होती! त्यांना काही कमी नव्हते. दोघांचीही परिस्थिती बाहेरून दिसायला हेवा करण्यासारखी! दोन्ही पोरे अगदी रस घेऊन सर्वतया जीवन जगत होती.<noinclude></noinclude> 8lrfb2nsc8zcjqaappn3hxb2tz2lden पान:Gangajal cropped.pdf/17 104 20688 229101 67639 2026-04-10T17:06:42Z कल्पनाशक्ती 3813 229101 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Svnavare" />१८ / गंगाजल</noinclude>एकाने परमुलुखात जीव दिला. कुटुंबापासून दूर. एकाकी. शेवटी वडिलांना लिहिलेले एक पत्र!... {{gap}}“दुसरीने भरल्या घरात एक दिवस जीव दिला. शेवटच्या पत्रातली असहायता व एकाकीपणा हृदयाला पीळ पाडणारा होता. पण सामान्याला कळण्यासारखा नव्हता. आई, भांवडे, नवरा, मुले, संपत्ती, शिक्षण, रूप, मित्रांचा परिवार सर्व होते. मग हा एकाकीपणा का? मागे राहिलेल्यांना निरंतरचे अपराधी करून हे जीव गेले. का? का? का?'' {{gap}}“हा प्रश्न कित्येक वर्षे मी विचारीत आहे. मला आता वाटते की, त्यांच्या गावात देव नव्हता व देऊळही नव्हते. एका क्षणी भरल्या संसारात ही निराधारपणाची जाणीव तीव्र झाली असली पाहिजे" {{gap}}क्षणाची फुरसत न देता प्रश्न आला, “अग, पण ज्ञानदेव का गेले? ते तर देवाविना नव्हते ना?'' {{gap}}तितक्याच वेगाने मी उत्तरले, “त्यांचा देव व देऊळ एवढे मोठे झाले होते की, ते लहानशा शरीरात मावेनातसे झाले. शरीराचे बंधन त्यांना अशक्य झाले. शरीरात राहून देवाएवढे मोठे होणे शक्य नव्हते, म्हणून ते गेले.'' {{gap}}दोघींच्या संभाषणाचा दुवा तुटला. प्रत्येकजण आपापल्या विचारात गुरफटलो. माझे मन एक कोडे सोडवीत होते. {{gap}}संभाषणाच्या भरात का होईना, बाळ, लहानी आणि ज्ञानदेव अशी सर्वस्वी निराळी माणसे एकत्र गोवली गेली होती. सर्वांनी पंचविशीच्या आत जीव दिला होता, एवढेच का साम्य त्यांच्यात होते? त्या साम्यापाठीमागे जाणिवेचा तीव्रपणा व जाणीव झाल्याबरोबर त्याप्रमाणे कृती करण्याची उतावीळ, हेही होते ना? तिघांनीही धावत जाऊन मृत्यू कवटाळला होता. {{gap}}...आणि आम्ही इतर? आमच्या गावात देव आहे का, ह्याचा विचार आम्ही कधी केला आहे का? रिते आहोत का भरलेले आहोत, हा प्रश्न कधी आमच्या मनाला पडला आहे का? जन्मल्यापासून जिवंतपणे वावरत आहोत. हळूहळू विचाराविना वाट चालत आहोत. मृत्यू अगदी ‘उरी आदळे' पर्यंत.. {{gap}}""काय होतंय तुला?'' माझा सुस्कारा ऐकून तिने काळजीने विचारले. {{gap}}माझ्या अथांग रितेपणातून उत्तर आले, “काही नाही, अगदीच काही नाही." {{right|१९६८}} {{nop}}<noinclude></noinclude> k7dezg6ekr4kwm1efc8ctaclzoa7tk4 229102 229101 2026-04-10T17:13:33Z कल्पनाशक्ती 3813 229102 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Svnavare" />१८ / गंगाजल</noinclude>एकाने परमुलुखात जीव दिला. कुटुंबापासून दूर. एकाकी. शेवटी वडिलांना लिहिलेले एक पत्र!... {{gap}}“दुसरीने भरल्या घरात एक दिवस जीव दिला. शेवटच्या पत्रातली असहायता व एकाकीपणा हृदयाला पीळ पाडणारा होता. पण सामान्याला कळण्यासारखा नव्हता. आई, भांवडे, नवरा, मुले, संपत्ती, शिक्षण, रूप, मित्रांचा परिवार सर्व होते. मग हा एकाकीपणा का? मागे राहिलेल्यांना निरंतरचे अपराधी करून हे जीव गेले. का? का? का?'' {{gap}}“हा प्रश्न कित्येक वर्षे मी विचारीत आहे. मला आता वाटते की, त्यांच्या गावात देव नव्हता व देऊळही नव्हते. एका क्षणी भरल्या संसारात ही निराधारपणाची जाणीव तीव्र झाली असली पाहिजे" {{gap}}क्षणाची फुरसत न देता प्रश्न आला, “अग, पण ज्ञानदेव का गेले? ते तर देवाविना नव्हते ना?'' {{gap}}तितक्याच वेगाने मी उत्तरले, “त्यांचा देव व देऊळ एवढे मोठे झाले होते की, ते लहानशा शरीरात मावेनातसे झाले. शरीराचे बंधन त्यांना अशक्य झाले. शरीरात राहून देवाएवढे मोठे होणे शक्य नव्हते, म्हणून ते गेले.'' {{gap}}दोघींच्या संभाषणाचा दुवा तुटला. प्रत्येकजण आपापल्या विचारात गुरफटलो. माझे मन एक कोडे सोडवीत होते. {{gap}}संभाषणाच्या भरात का होईना, बाळ, लहानी आणि ज्ञानदेव अशी सर्वस्वी निराळी माणसे एकत्र गोवली गेली होती. सर्वांनी पंचविशीच्या आत जीव दिला होता, एवढेच का साम्य त्यांच्यात होते? त्या साम्यापाठीमागे जाणिवेचा तीव्रपणा व जाणीव झाल्याबरोबर त्याप्रमाणे कृती करण्याची उतावीळ, हेही होते ना? तिघांनीही धावत जाऊन मृत्यू कवटाळला होता. {{gap}}...आणि आम्ही इतर? आमच्या गावात देव आहे का, ह्याचा विचार आम्ही कधी केला आहे का? रिते आहोत का भरलेले आहोत, हा प्रश्न कधी आमच्या मनाला पडला आहे का? जन्मल्यापासून जिवंतपणे वावरत आहोत. हळूहळू विचाराविना वाट चालत आहोत. मृत्यू अगदी ‘उरी आदळे' पर्यंत.. {{gap}}"काय होतंय तुला?" माझा सुस्कारा ऐकून तिने काळजीने विचारले. {{gap}}माझ्या अथांग रितेपणातून उत्तर आले, “काही नाही, अगदीच काही नाही." {{right|१९६८}} {{nop}}<noinclude></noinclude> 8a2fj2h11h40s6t8q2gsnb88skgtn03 पान:Gangajal cropped.pdf/20 104 20691 229103 67647 2026-04-10T17:14:24Z कल्पनाशक्ती 3813 229103 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Svnavare" />{{right|गंगाजल / २१}}</noinclude>दृष्टीतून निसटत नसे. मी चुकीची उत्तरे दिली की, ते मला समजावून सांगायचा प्रयत्न करीत. पण मी इतकी भेदरलेली असे की, ते काय सांगतात, हे मला ऐकूच यायचे नाही. संध्याकाळी ते क्लबातून घरी यायच्या आत दोन घास खाऊन मी बिछान्यावर झोपेचे सोंग घेऊन पडत असे. पण ही युक्ती नेहमीच जमायची नाही. त्यांची भीती वाटायचे आणखी एक कारण म्हणजे घरातल्या मुलांना ते आळीपाळीने इंग्रजी वाचायला सांगत. ते आरशापुढे दाढी करायचे व बहुतकरून शकू व कधीमधी दुसरे कोणीतरी उभे राहून पुस्तक वाचायचे. वाचताना चूक झाली की, ते जोराने खेकसायचे व चूक सुधारून द्यायचे. मला आठवते आहे की, एकदा साळूताई (अप्पांच्या घरी असलेली आणखी एक मुलगी) त्यांच्याजवळ वाचीत असताना एका इंग्रजी शब्दाचा उच्चार करायला चुकत होती; ते परत-परत तिला बरोबर उच्चार करून दाखवीत होते व तिला ते काही कळत नव्हते. शेवटी ती बिचारी घेरी येऊन पडली. हा प्रकार पाहिल्यावर तर अप्पांच्या दाढीच्या वेळेला लांबूनसुद्धा त्यांच्या दृष्टीस न पडण्याची खबरदारी मी घेऊ लागले. तिसरे कारण म्हणजे अप्पांचा निरीश्वरवाद. संधी मिळेल तेव्हा देवपूजा व व्रतवैकल्ये ह्यांची ते चेष्टा करीत असत. कुठे मला लागले, किंवा परीक्षेत नापास झाले, तरी मला म्हणत, “आता कुठे गेला होता तुझा देव? कर की त्याला नवस!'' त्यांच्या चेष्टेला मला उत्तर देता येत नसे, पण मनाला वाईट वाटे, व त्यामुळेही मी होता... होईतो त्यांच्यापासून लांब राही. {{gap}}अप्पांचे घर म्हणजे सुखवस्तू, आतिथ्यशील गृहस्थाचे घर होते.घरी गडी मनुष्य, म्हशी, घोडागाडी वगैरे होते. पण माझ्या आठवणीत, ते मिनिस्टर होईपर्यंत स्वयंपाकी नव्हता, वहिनी, साळूताई व आम्ही मुली अशा स्वयंपाकघरातली कामे करीत असू. अगदी लहानपणी भाज्या, कोशिंबिरी, जरा मोठी झाल्यावर भात, भाकरी, पोळी वगैरे जिन्नस करायला शकूच्याबरोबर मीही शिकले. निवडणे-टिपणेही सगळ्यांकडून-मुलगे व मुली मिळून होत असे. डाळ-तांदूळ, गहू-जोंधळा सर्व जिनसा सगळ्यांना वाटे घालून सारख्या निवडायला देत असत. असडी तांदूळ कांडायलाही मी त्यांच्याकडेच शिकले. शकू व सईताईही कांडप करीत. खाणे, पिणे, काम करणे, कुठच्याही बाबतीत आपली मुलगी व इतर असा भेद त्या घरात झाला नाही. फरक काय तो माझ्या आठवणीत एका बाबतीत होई. तो म्हणजे शकू आमच्यापेक्षा कितीतरी जास्त वेळा मार मात्र खात असे. तिने परवा नुकतीच<noinclude></noinclude> i8yq6gwik09et85gy4nkv6f9qg2nzs7 पान:Gangajal cropped.pdf/21 104 20692 229104 67651 2026-04-10T17:15:09Z कल्पनाशक्ती 3813 229104 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Svnavare" />२२ / गंगाजल</noinclude>एक आठवण नव्याने सांगितली. ती शाळेतला इंग्रजीचा धडा अप्पांच्या समोर वाचीत होती. अप्पांनी तिला एका शब्दाचा अर्थ विचारिला. तो तिला काही आला नाही. मी असते, तर मुकाट्याने अप्पांचे बोलणे ऐकून घेतले असते. पण शकू कसली खट! त्यांना म्हणाली वाटते, “तुमच्या इरावतीला विचारा. तिलासुद्धा माहीत नाही ह्या शब्दाचा अर्थ!'' अप्पांनी मला बोलाविले, आणि त्या शब्दाचा अर्थ विचारला. माझ्या सुदैवाने मी तो धडा करिताना तो शब्द डिक्शनरीत पाहून ठेविला होता व तो मला माहीत होता. अर्थात मी तो बरोबर सांगितला. शब्दाचा अर्थ माहीत नाही म्हणून व वर तोंड करून बोलली म्हणून आणखी अशा दुहेरी अपराधाबद्दल शकूला चांगला चोप बसला. शकुला चोपणे हेच मला वाटते त्यांच्या तिच्यावरल्या मायेचे चिन्ह होते. आजतागायत त्यांची ही वृत्ती कायम आहे. त्यांची नात सई चित्रे छान काढिते, नाटके लिहिते, नाटकात स्वत: काम करिते. पण कधी एका शब्दाने तिला शाबासकी देतील तर शपथ. परवा मजजवळ म्हणाले, “सईचं आजचं नाटक छान झालं होतं नाही?'' तेव्हा मी म्हटले "अप्पा, पोरीजवळ का नाही मग तसं म्हणत?'' तर मला म्हणतात, "उगीच स्तुती केली तर शेफारून जाईल! आपलं न बोललेलच बरं." {{gap}}अप्पा जरी काव्याचे भोक्ते नाहीत, तरी एका ठराविक कालखंडा पर्यंतच्या इंग्रजी वाङमयाचे अगदी एकनिष्ठ भक्त आहेत. भाषांतरित फ्रेंच वाङमय त्यांनी वाचलेले आहे व काही आम्हा मुलींकडून वाचूनही घेतले आहे. पण इंग्रजी वाङमयाशी त्यांचा संबंध अगदी जिव्हाळ्याचा आहे. नुसत्या कादंब-याच त्यांनी आमच्याकडून वाचून घेतल्या असे नव्हे, तर शेरिडन, गोल्डस्मिथ थोड्या प्रमाणात शेक्सपियर ह्यांची नाटकेही वाचुन घेतली. {{gap}}जेन ऑस्टेनच्या बाबतीत तर त्यांची भक्ती पराकोटीची आहे. जेन ऑस्टेनच्या निरनिराळ्या कादंब-यांतील माणसे पुस्तकातच न राहता आमच्या घरी जणू नित्य वावरत असत. आयुष्यात प्रत्येकजण आपल्या मताने आपली स्वत:ची अशी एक भूमिका वठवीत असतो. एका मनुष्याच्या भूमिका सदैव व सर्वत्र एकच असत नाही. घरी, कचेरीत, मित्रमंडळींच्या घोळक्यात, क्रीडांगणावर मनुष्य आपापल्या मताप्रमाणे काही विशिष्ट कल्पना मनात ठेवून त्या आचरीत असतो. अप्पांनी घरामध्ये तरी निदान जेन ऑस्टेनच्या ‘प्राइड अँड प्रेज्युडिस'मधील मिस्टर बेनेटची भूमिका वठवायचे<noinclude></noinclude> edvj1jwfptgucsgshal8fbw5v2qtko0 पान:Gangajal cropped.pdf/23 104 20694 229105 67672 2026-04-10T17:15:50Z कल्पनाशक्ती 3813 229105 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Svnavare" />२४ / गंगाजल</noinclude>लागे. अप्पांचे शब्दज्ञान मोठे अचूक. शकू व मी शब्द अडला की, एकमेकींना विचारून, कधी सईताईंना विचारून, तर कधी अदमासाने ठोकून देत असू. आम्ही कोणाला शब्द विचारितो, हे अप्पांना ऐकू आले की ते "डिक्शनरीत पहा की! त्या आहेत कशाला घरी?" असे मोठ्याने म्हणत, शब्दार्थावरून एक प्रसंग आठवतो आहे : कॉलेजमधले संस्कृत पुस्तक चालू असता शकू मला ‘नितम्ब' शब्दाचा अर्थ विचारीत होती. हाच शब्द मराठीतही माझ्या वाचनात आला होता. जो शब्द शकू विचारीत होती, तो ‘‘प्रियानितम्बोचितसंनिवेशैर्विपाटयामास युवा नखाग्रै:।' ह्या ओळीतला होता. मी अगदी नि:शंकपणे सांगितले, “त्या शब्दाचा अर्थ गाल. अप्पा तेथेच होते. ते म्हणाले, “काहीतरी सांगू नकोस; त्या शब्दाचा अर्थ आहे ढुंगण अथवा कुल्ले" मीपण माझ्या संस्कृतप्रभुत्वाच्या व माझ्या वाङमयाच्या कल्पनांच्या धुंदीत होते. मी अगदी सोवळ्या घरात वाढत होते. जे वाङमय अप्पा वाचून घेत, तेही सोवळेच होते. प्रियेच्या नितंबांचा उल्लेख वाङमयात येईल, ही कल्पनाही मला नव्हती. शिवाय, अप्पांना संस्कृत फारसे समजत नाही, ह्या ऐटीतही मी होते. मी म्हटले. “इश्श. अप्पा! काहीतरीच काय सांगता?" {{gap}}ते म्हणाले, “मी काहीतरी सांगत नाहीः बरोबर तेच सांगतो आहे." {{gap}}मी म्हटले, “माझेच अगदी पैजेनं बरोबर आहे." {{gap}}अप्पा म्हणाले, “बरं, बरं, हजार रुपयांची पैज! पण आता तेवढा आपट्यांचा कोश आण आणि तो शब्द बघ." {{gap}}..अजून मी अप्पांचे देणे फेडले नाही. {{gap}}अप्पांच्या घरचा कार्यक्रम संथ. एका ठराविक मागनि जाई. मोठयाने वाचन करण्यात खंड बहुधा पडत नसे. मोठ्याने नाट्यवाचन करणे हे दुसरे इतर वाचन करण्याइतकेच अप्पांना फार आवडत असे. वर सांगितलेल्या इंग्रजी नाटकांखेरीज 'शारदा', 'संशयकल्लोळ' व 'सौभद्र' ही त्यांची आवडती नाटके. एखाद्या शनिवार, रविवारी दुपारची जेवणे लवकर आटोपून एकेकाच्या हातात एकेक पुस्तक ह्याप्रमाणे सईताई, अप्पा, शकू व मी वाटून दिलेल्या भूमिकांप्रमाणे तासा-दोन-तासांच्या बैठकीत सबंध नाटक वाचून काढीत असू. सर्व कुटुंब एकत्र बसून. अशा ,तऱ्हेने इंग्रजी भाषेतील कित्येक पुस्तके आम्ही वाचली. त्यामध्ये स्विफ्टच्या लिलिपुट-ब्रॉबडिंगनॅगच्या सफरी होत्या, डिकन्सचे ‘पिक्विक पेपर्स' होते, थेकरेचे 'व्हॅनिटी फेअर'<noinclude></noinclude> sy0fy4m1fdrd3c6cnefplz3jt7r1e04 पान:Gangajal cropped.pdf/24 104 20695 229106 67673 2026-04-10T17:16:25Z कल्पनाशक्ती 3813 229106 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Svnavare" />{{right|गंगाजल / २५ }}</noinclude>होते, जॉर्ज एलियटचे ‘सायलस मार्नर' होते. ‘सायलस मार्नर' ही आम्हा सगळ्यांनाच आवडणारी कथा होती. आम्ही दोन-तीनदा तरी ती वाचली असेल. माझ्या आयुष्यात ज्या काही अत्यंत सुखाच्या आठवणी आहेत, त्यांमध्ये ह्या एकत्र कौटुंबिक वाचनाच्या आठवणी आहेत. {{gap}}अप्पांनी आम्हाला आधुनिक ललितलेखक मॅट्रिक पास होईपर्यंत वाचू दिले नाहीत. शाँ तर त्यांना बिलकुल आवडत नसे. पण आम्ही तो भांडून वाचलाच. पण शाँ किंवा बॅरी ह्यांची नाटके व वेल्स, बेनेट किंवा गॉल्सवर्दी यांच्या कादंबऱ्या कौटुंबिक वाचनात कधी आल्या नाहीत. अप्पांच्या मते पूर्वी झालेल्या ब्रिटिश लेखकांच्या तोडीचे हे नवे लेखक नाहीत. {{gap}}अप्पांची वाङमयीन आवड त्यांच्या मनाच्या ठेवणीची निदर्शक म्हणावी की ह्या लेखकांनी ती ठेवण तशी बनविली, हे काही मला नीटसे सांगता येत नाही. मूल आपले गुण घेऊन जन्माला येते, ही गोष्ट तर खरीच, पण संस्कारक्षम वयामध्ये झालेल्या वाचनाचाही परिणाम मनावर होत असला पाहिजे. मिल, स्पेन्सर, बेंथम ही मंडळी बुद्धिवादी, सुधारणावादी व व्यक्तिस्वातंत्र्याची भोक्ती अशी होती. ह्या सर्वांच्या नीतिमत्तेबद्दलच्या कल्पना त्या वेळच्या काळाप्रमाणे ठाम अशा होत्या. नवीन मानसशास्त्राचा विकास त्या वेळी झालेला नव्हता. त्याचप्रमाणे समाजशास्त्राचाही प्रसार त्या वेळी इतका झालेला नव्हता. मनुष्य आडवाटेने जातो, त्याला कारणे म्हणून लहानपणी घडलेले संस्कार, वैफल्य, समाजरचनेचे दोष वगैरे दाखवून त्याच्या कृतीचे आकलन आणि त्याचबरोबर थोडेबहुत समर्थन हल्लीच्या वाङमयात जितके होते, तसे अप्पांना आवडणाच्या लेखकांत मुळीच दिसून येत नाही. बनियनच्या 'पिल्ग्रिम्स प्रोग्रेस' मध्ये म्हटल्याप्रमाणे सदाचरणाची वाट अगदी सरळ व अरुंद अशी होती. त्या वाटेने जाणार्‍याला कुठे फाटा भेटायचा नाही, किंवा वाटेवरच्या वाटेवरच जरा पाऊल इकडचे तिकडे करायला जागा नव्हती. जेन ऑस्टेनच्या सगळ्या कादंब-यांतही हीच वृत्ती दिसून येते. तिने रंगविलेले काही खलनायक किंवा तिच्या मताने कसोटीस न उतरलेल्या स्त्रिया तिच्या नायक-नायिकांपेक्षा एक दोन उदाहरणांत तरी जास्त आकर्षक वाटतात. पण कुठे तरी चूक घडल्यामुळे जेन ऑस्टेनने त्यांना भरपूर प्रायश्चित्त दिलेले आहे. {{gap}}सईताई आणि अप्पा ह्यांच्याबद्दलच्या माझ्या सुरुवातीच्या भावना हळूहळू बदलत गेल्या. मी मोठी होत होते, माझी समज वाढत होती, हे जसे<noinclude></noinclude> 058amoubfsnw084yyxnos0z0tlevvq5 पान:Gangajal cropped.pdf/25 104 20696 229107 74745 2026-04-10T17:16:59Z कल्पनाशक्ती 3813 229107 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Svnavare" />२६ / गंगाजल</noinclude>त्याचे एक कारण, तसेच त्या दोघांचा स्वभाव हेही दुसरे कारण. सईताई सुरेख होत्या, प्रेमळ होत्या, त्यांना काव्याची गोडी होती, पण त्यांचे मन लहान मुलाचे, अविकसित असे राहिले. संसारातील अनुभवांनी त्यात जी खोली यायची, ती आलीच नाही. इतकेच नाही, तर मानसिक विकृतीला बळी पडून त्यांची सगळीच मानसिक वाढ एक प्रकारे खुंटली होती. शकू त्यांची पहिली मुलगी. तिच्या पाठोपाठच दीड वर्षात त्यांना मुलगा झाला आणि तो वर्षाच्या आतच गेलाही. त्या दु:खाने त्यांच्या मनावर काही विलक्षण परिणाम झाला असला पाहिजे. माझ्या लहानपणी मला ह्या गोष्टी कळत नसत, पण आता मात्र त्यांची संगती लागते. आपल्याभोवती कोणी तरी लहान मूल असल्याखेरीज त्यांना जेवणच जात नसे. आम्ही सगळी मुले जेवून शाळेत गेलो, म्हणजे त्या शेजारच्या लिमयांच्या घरची मुलं तरी आणीत, नाही तर गुण्यांच्या मधूला तरी घेऊन येत व आपल्या समोर बसवून जेवत. सईताईंच्या बरोबर बाजारात जायला मोठी गंमत असे. त्या नेहमी मला आणि शकूला काही तरी खाण्याची, खेळण्याची किंवा लेण्याची वस्तू घेऊन देत. स्वतः इतके जिन्नस खरेदी करीत की, त्यांची मागाहून येणारी बिले भागवता-भागवता बिचाऱ्या अप्पांच्या अगदी नाकी नऊ येत. त्यांना खेळायच्या वस्तू विकत घ्यायचा फार नाद. हटकून एखादी तरी बाहुली त्या दर महिन्याला विकत आणीत असत. मी लहान असताना सर्वच गोष्टींबद्दल त्यांचे ऊतू जाणारे औत्सुक्य व आनंद एवढ्यापुरतीच ही विकृती होती. पुढे मात्र रोग फारच बळावला, तो थेट त्यांच्या मृत्यूपर्यंत. त्यांचे वर्षाचे काही महिने पहाटेपासून रात्रीपर्यंत अतिशय धांदल, समारंभ, हालचाल ह्यात जात; व काही महिने अगदी स्वस्थ बसून, नाही जेवण, नाही खाणे, नाही आंघोळ, केवळ उदासीनता- असे जात. त्यांच्या प्रेमळपणाने मी त्यांच्याकडे आकर्षित झाले खरी, पण पुढे ह्या आकर्षणाचे रूपांतर करुणेत झाले. {{gap}}अप्पांच्याबद्दल मात्र पहिल्याने भिऊन वागणारी मी हळूहळू त्यांच्याकडे ओढली गेले. त्यांचे मोठ्याने हसणे किंवा बोलणे, किंवा त्याच्या वागण्यातील खडबडीतपणा ह्यांच्या मागचे वात्सल्य मला जाणवू लागले. इंग्रजी वाङमयाची गोडी त्यांनीच मला लाविली. पहिल्यांदा मुलांच्या अदभुत-कथांपासून सुरुवात झाली. हळूहळू प्रसिद्ध-प्रसिद्ध कादंबऱ्या वाचून झाल्या. त्यामागून स्पेन्सर, मोर्ले, मिल वगैरेंचे ग्रंथ मी त्याच्याजवळ वाचले. ग्रंथ वाचताना मोठेपणी अधूनमधून त्यावर संभाषणही<noinclude></noinclude> 52yywyg7x8je3b8op6q286q8fshf0bk पान:Gangajal cropped.pdf/30 104 20701 229108 70875 2026-04-10T17:17:43Z कल्पनाशक्ती 3813 229108 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Hevisnavare" />{{rh| | |गंगाजल / ३१}}</noinclude>असताना त्यांनी पोटसडामबद्दल लिहिलेले शब्द वाचले त्या वेळची. पोटसडाम बर्लिनशेजारी आहे. तेथे फ्रेडरिक द ग्रेट ह्या राजाने पॅरिस जवळच्या फ्रेंच राजांनी बांधलेल्या व्हर्साय ह्या राजवाड्याची नक्कल करून एक गचाळ राजवाडा व बाग उठविली आहे. अप्पांनी आपल्या आत्म- चरित्रात गंभीरपणे एक असे वाक्य ठेवून दिले आहे की, “पोटसडामचा राजवाडा सौंदर्याच्या बाबतीत काही व्हर्सायच्या राजवाड्याच्या तोडीचा नाही.' औरंगाबादचा बिबीचा मकबरा ही दगडाचुन्यात बांधलेली ताजमहालची प्रतिकृती ताजमहालइतकी चांगली नाही, असा गंभीर शेरा देण्याचाच हा प्रकार! बारकावे त्यांना समजत नाहीत, ह्याचे एक उदाहरण म्हणजे शकूने त्यांच्या मनाविरुद्ध लग्न करायचे ठरविल्यावर ते रागावले होते व लग्न झाल्याचे तिने कळविल्यावर तिला त्यांनी लग्नाची भेट म्हणून दोनशे रुपये पाठविले! दुसऱ्या कोणी हे केले असते, तर ह्या कृतीत किती अर्थ-की अनर्थ दिसला असता! अजून ह्या प्रसंगाची आठवण झाली की, शकू चिडते. पण त्याचे मूल्य तिच्याच शब्दांत द्यायचे म्हणजे “अप्पा फार पारंपरिक (traditional) आहेत. अमक्या वेळी एखादी गोष्ट करायची, म्हणून ते करितात. तीतील अर्थच मनात घेत नाहीत." हे मूल्यमापन मला सर्वस्वी पटत नाही, पण ह्या विचित्र देणगीचा(!) अर्थ मलासुद्धा दुसरा लाविता येत नाही. {{gap}}अप्पांचे जिवलग मित्र एक बालकराम. त्यांच्यानंतर अप्पांची इतकी अंत:करणापासून कोणाशीच मैत्री झाली नाही. पण त्यांच्याजवळ वात्सल्याचे भांडवल मात्र कधी न संपणारे असे आहे. त्यांच्या आयुष्यात एका दृष्टीने त्यांनी आपल्या बायको-मुलीला सहभागी केले नाही. पण तसे करणे त्यांना अवघड जाते म्हणून, स्वत:च्या मोठेपणामुळे नव्हे. अप्पांवर अतोनात प्रेम करणारी माणसे खूप आहेत. स्वत:च्या मुली-नातींखेरीज भाऊ-भावजया, त्यांची मुले, मुलांची मुले अशा सर्वांवर, माझ्या कुटुंबावर, त्यांची फार माया आहे. शकू व सई ह्यांचे मित्रमंडळ घरी येते व अप्पांच्या आकर्षणात सापडून ती सर्व मंडळी त्यांची होतात. पण व्यक्तिपूजा व तीमागची आंधळी भक्ती किंवा तीमागे असणारी पुढेपुढे करण्याची वृत्ती ही त्यांच्यात किंवा त्यांच्या आसपास चुकूनही दिसली नाही. {{gap}}मला वाटते, तेही अप्पांच्या स्वभावविशेषामुळेच. मी लहान असताना अप्पांच्या घरी त्या वेळी भारतात प्रसिद्ध असलेल्या बहुतेक सर्व व्यक्ती येऊन<noinclude></noinclude> c4yptoepmo2hbj691a8a99qin0f2icy पान:Gangajal cropped.pdf/40 104 20711 229109 67990 2026-04-10T17:27:41Z कल्पनाशक्ती 3813 229109 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Svnavare" />{{right|गंगाजल / ४१}}</noinclude>लेकीची स्नेहाळ दृष्टी माझ्यावर लागली होती. मी अजून का बरे उठले नाही, म्हणून पाहायला ती आली होती. {{gap}}झोपेतील अनुभवांत मी अजून बुडून गेले होते. अवकाश आणि काळ ह्यांत काही धरबंधच राहिला नव्हता, इतके ते कालवले गेले होते. मागचं पुढे, पुढचं मागे. ह्या आयुष्यात अनुभविलेले, कधी न पाहिलेले असा सगळ्यांचा काला झाला होता. पाषाणयुगातून, ताम्रयुगातून, पेशवाईतून... कालपर्यंत माझे मन भटकत होते; असंख्य मैल तुडवून पाय दमले होते; अगणित जन्म अनुभवून मन थकले होते.<ref>काल का परवा, का आठवड्यापूर्वी थेऊरला चाललेले उत्खनन पहायला मी एकटीच मोटारीने गेले होते. गणपतीचे देऊळ डावीकडे टाकल्यावर हा एक खडबडीत रस्ता जातो, त्याने सुमारे अर्धा-पाऊण मैल गेल्यावर उत्खननापाशी मी पोहोचले. ख्रिस्तपूर्व १००० वर्षांची वस्ती असावी, असे सांगतात. एकमेकांवर लहान-मोठे दगड रचून वर्तुळाकार भिंती (-कोकणात ज्याला गडगा म्हणतात-) पूर्वी रचिलेल्या होत्या. (भिंती जाऊन फक्त पायाच्या दगडांची वर्तुळे मात्र शिल्लक राहिली होती) अशी एकाशेजारी एक ५०-५०, १००-१०० फूट अंतरावर कितीतरी वर्तुळे त्या माळावर होती. उत्खननात एका घराचे अवशेष एका वर्तुळात सापडले होते. घर कसले छप्पर म्हणायचे! त्याच वर्तुळात मासेमारीत वापरायचा एक तांब्याचा गळ सापडला होता, वर्तुळात उभे राहिले की, खाली मुळा-मुठा नदी दिसत होती. गडगे उभे असते, तर २५-४० गडगे दिसले असते. एका बाजूने गणपतीचे देऊळदिसत होते. 'थेऊर' हे ग्रामनाम थर-पुर ह्या पाली नावावरून आले असावे, अशी माझी कल्पना. म्हणजे थेऊरात एके काळी बुद्धमठ असावा. दगडी वर्तुळे ख्रिस्तपूर्व हजार वर्षांची (सुमारे महाभारतकालीन)- बुद्धमठ (?) ख्रिस्तशकाच्या अलीकडेपलीकडे कार्ले भाजे लेण्यांच्या वेळचा- नंतर पेशवे-</ref> {{gap}}युंगम्हणतो की, कधीतरी काही प्रसंगाने आपल्या पूर्वजांचे संस्कार<noinclude><hr>{{reflist}}</noinclude> l48dacm8ivz6vf2f8y1w865g5glwzkf पान:Gangajal cropped.pdf/41 104 20712 229110 67992 2026-04-10T17:28:04Z कल्पनाशक्ती 3813 229110 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Svnavare" />४२ / गंगाजल</noinclude>आपल्या मनात उसळी मारून उठतात. कालिदास म्हणतो, जन्मांतरांचे संस्कार ‘भावस्थिर' असतात, व एखादे वेळी डिवचले जाऊन उठतात. हे संस्कार माझ्या पूर्वजन्मीचे होते की आजची मी माझ्या सर्व पूर्वजांचे संस्कार घेऊन जन्माला आले होते, कोण जाणे! एवढे मात्र खचित की, त्या रात्री कित्येक लाखांपासून काही शतकांपूर्वीच्या माझ्या पूर्वजांबरोबर मी पृथ्वी पालथी घातली होती. रात्रीच्या काही तासांत मी युगे जगले होते. वेळेची अशी गल्लत होते कशी? काळ वा वेळ हा एक अनुभव आहे. तो काय घड्याळाच्या काट्यात बसविता येणार आहे? का घड्याळाच्या काट्यानी मोजता येणार आहे? {{right|१९७०}} {{nop}}<noinclude></noinclude> rndtpvds8u3itoct4iwlizqjg5flmzk पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/78 104 63348 229087 155958 2026-04-10T16:13:49Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229087 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|५० |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>कांठी एखाद्या धक्क्या जवळ उभे असतां एखादी मोठी लाट येऊन त्या धक्क्यावर आदळते. त्या वेळी त्या लाटेनें केवढा मोठा आवाज उत्पन्न केलासें आपणास वाटते. परंतु कोट्यवधि सूक्ष्म तरंगांच्या एकीकरणाने ती लाट उत्पन्न झालेली असते; आणि आपण जो मोठा आवाज ऐकला तो त्या सूक्ष्म तरंगांच्या लहान लहान आवाजांच्या एकीकरणाचेंच फल असतो. ते सूक्ष्म आवाज स्वतंत्रपणे आपल्या प्रत्ययास येत नाहीत. अशाच रीतीने आपलें हृदय उडणे वगैरे सर्व क्रिया कर्मेच होत. कित्येक स्वतंत्रपणे आपल्या प्रत्ययास येतात; परंतु ती सर्व सूक्ष्म कर्माच्या समुच्चयाचा परिणाम असतात. कोणत्याहि मनुष्याची खरी दानत तुह्मांस समजून घ्यावयाची असली तर त्याने केलेल्या एखाद्या मोठ्या कृत्यावरून तिची बरोबर पारख होणार नाही. प्रसंगी एखादा अत्यंत कृपण मनुष्य कर्णालाहि लाजवील. परंतु अशा एखाद्या प्रसंगावरून आपण कोणाच्या दानतीचें अनुमान केले तर ते पुष्कळ वेळां चुकीचे ठरण्याचा संभव आहे. मनुष्य रोजच्या व्यवहारांत कसा वागतो, आणि बारीकसारीक गोष्टी कशा करतो याचे सूक्ष्म अवलोकन करूनच त्याच्या दानतीचे यथार्थ ज्ञान होईल. प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात काही प्रसंग असे येतात की त्या वेळी आपले लघुत्व विसरून तो काही महत्कार्य करून जातो. परंतु सर्वदा आणि सर्वकाली ज्याची वागणूक एकसारखीच मोठी असते तोच खरा मोठा मनुष्य होय.<br> {{gap}}कर्माचा मनुष्याच्या दानतीवर होणारा परिणाम पाहिला ह्मणजे कर्म ही एक अचाट शक्तीच आहे असे वाटते. प्रत्येक मानवी प्राणी हा ईश्वरांश असल्यामुळे जगांतील सर्व शक्ती जणूं काय त्याच्या ठिकाणी एकवटलेल्या असतात. व तो या शक्तीस कर्माच्या रूपाने पुन्हां जगांत फिरावयास लावतो. जेथे या सर्व शक्ती एकवटतात आणि जेथून पुन्हां कर्मरूपाने बाहेर पडून जगभर वावरतात तीच मनुष्यांतील जीवनकला होय. या चालककलेंत सर्व सामर्थ्य एकवटलेले आहे. ही कला सर्वशक्तिमति अशा स्वरूपाची असल्यामुळे गुरुत्वाकर्षणाच्या नियमाने विश्वांतील अनेक शक्ती तिच्याकडे ओढल्या जातात, आणि तिच्याभोवती फिरत राहतात. त्यांचा उपयोग करून आपल्या दानतीच्या द्वारें मनुष्य या शक्तींस बरें अथवा वाईट रूप देऊन त्यांस जगांत परत पाठवीत असतो. इतर शक्तींस आकर्षण करण्याचे जसें त्यास सामर्थ्य आहे तसेच त्यांचे रूपांतर करून त्यांस जगभर फिरावयास पाठविण्याचेंहि त्यास सामर्थ्य आहे.<br> {{gap}}जगांत जें जें कार्य आपण पाहतों तें तें सर्व मानवी विचारांचे दृश्यरूप आहे. मनुष्याची इच्छाशक्ति चित्तांत गुप्तरूपाने असते व तीच कार्यरूपाने दृश्य होते.<noinclude></noinclude> 3z8wf0vk8oe1voyrtznbuyysfs4eh6y पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/79 104 63349 229088 155959 2026-04-10T16:19:00Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229088 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|५१ }} {{rule}}</noinclude>कार्य हे अव्यक्त इच्छाशक्तीचें व्यक्त रूप होय. या रीतीने आपणांस दिसणारी सर्व यंत्रे, कारखाने, शहरे, आगबोटी वगैरे जिनसा मनुष्याच्या इच्छाशक्तीची दृश्यफले आहेत. मनुष्याच्या दानतीस अनुरूप अशी इच्छा उद्भवते. आणि दानत कर्मानुरूप बनलेली असते. यामुळे जसें कर्म तद्वतच इच्छा हे उघड झाले. आपल्या अचाट इच्छाशक्तीने जगाचे स्वरूप ज्यांनी बदलून टाकिलें असे सामर्थ्यवान् पुरुष जबर व्यासंगी होते. सर्व जग सुलट्याचे उलटें व उलट्याचे सुलटे करावें असें सामर्थ्य युगानुयुगें कर्मे करून त्यांनी आपल्या ठिकाणी आणून ठेविले होते. भगवान् बुद्ध अथवा भगवान् येशुख्रिस्त यांची अलोट इच्छाशक्ति ही एकाच जन्मांतील कर्माचे फल नसून जन्मजन्मांतरीची कर्मफलें जी त्यांनी सांठविली होती त्यांचे एक दृश्यफळ आहे. आपणांतील विशिष्ट मनोवृत्ति आनुवंशिक संस्कारांनी आपणांस प्राप्त झाल्या आहेत असें ह्मणणारांनी बुद्ध अथवा ख्रिस्तचरिताचा विचार करावा. ख्रिस्ताचा बाप जोसेफ हा एक साधारण दर्जाचा सुतार होता. तत्त्वज्ञानाचा एक शब्दहि त्याने उच्चारिला असल्याचे कोणाच्या ऐकिवांत नाही. त्याच्यासारखे रंधापटाशी बहाद्दर आजपर्यंत अनेक होऊन गेले व आजहि अनेक आहेत. अशा साधारण दर्जाच्या सुताराच्या पोटी अर्धे जग प्रकाशमय करून सोडणारा ज्ञानदीप पेटविण्यासारखा पुत्र निर्माण व्हावा हे आनुवंशिक संस्कारांचें फल आहे काय? बुद्धाचा बाप एक सामान्य राजा होता. स्वतःच्या नोकरांवर तरी त्यास ताबा चालवितां येत होता की नाही कोणास ठाऊक! परंतु त्याच्या पोटी उत्पन्न झालेल्या पुत्रास ईश्वरावतार मानून अर्ध जग प्रत्यही त्याची पूजा करीत आहे. जोसेफ सुतार आणि त्याचा पुत्र या दोघांत दिसून येणारे जमीनअस्मानाचे अंतर आनुवंशिक संस्कारांच्या उपपत्तीने भरून येईल काय? बुद्ध आणि ख्रिस्त यांनी ज्या आपल्या इच्छाशक्तीने जगांत क्रांति घडवून आणली ती शक्ति कोठून आली? अनेक लहान लहान शक्ती युगानुयुगें एकवटत होत्या व शेवटी त्या बुद्ध व ख्रिस्त या रूपाने प्रगट झाल्या असेंच ह्मटले पाहिजे.<br> {{gap}}आपली जी काही दानत आजमितीस आहे, ती आपल्या सर्व पूर्वकर्माचा परिपाक आहे. स्वतः श्रम करून मिळविल्याशिवाय कोणासहि आयतें असें कांहींच प्राप्त व्हावयाचे नाही, असा अनादिसिद्ध नियम आहे. कित्येक वेळां अशा प्रकारचा नियम कांहींच नसावा असे वाटण्यासारख्या गोष्टी घडतात; परंतु आपली दृष्टि जसजशी शुद्ध होत जाते तसतशी या नियमाच्या अस्तित्वाबद्दल आपली<noinclude></noinclude> qxuq0gatjl0q45k3emex1p7xuxzem8b पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/80 104 63350 229089 155960 2026-04-10T16:23:48Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229089 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|५२ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>खात्री होत जाते. एखादा मनुष्य पैसा मिळविण्यासाठी एकसारखी धडपड करित असतो. प्रसंगी कोणाची मान मुरगळण्यासहि मागेपुढे पाहत नाही; परंतु इतकें करूनहि त्यास कांहीं प्राप्ति होत नाही. आणि आयुष्य त्याला कंटाळवाणे वाढू लागते. पैसा मिळावा अशी त्या मनुष्याची योग्यताच नसते. स्वतःच्या सुखासाठी हजारों वस्तु आपण जमवून ठेवितों; परंतु त्यांतील जितक्यांचा उपभोग घडण्याची आपली पात्रता असते तितक्याच आपल्या उपयोगी पडतात. एखाद्या मूर्खाने जगांतील सर्व पुस्तकांचा संग्रह केला तरी त्यांतील जितकी वाचण्याची त्याची योग्यता असते तितक्यांचाच त्यास उपयोग होतो. ही योग्यता त्याला स्वतःच्या कर्मानुसार प्राप्त झालेली असते. आपली योग्यता काय आहे व आपणास कोणत्या गोष्टी आपल्याशा करता येतील याचा आपल्या कर्मानुरोधाने निश्चय होतो. आपली जी कांहीं आज स्थिति आहे ती आपण स्वतःच प्राप्त करून घेतली असून आपल्या इच्छेप्रमाणे वाटेल ती स्थिति प्राप्त करून घेण्यास आपणांस मोकळीक आहे. आज आपणांस जी काही स्थिति प्राप्त झाली आहे ती पूर्व कर्माचे फल असल्यामुळे पुढें प्राप्त होणारी स्थिति वर्तमान अथवा चालू कर्मानुरूप होणार हे उघड आहे. असें आहे तर कर्म कसे करावे हे समजून घेणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. 'कर्म कसे करावे यांत समजून घेण्यासारखे काय आहे? आह्मी रोज कसे तरी कर्म करीत असतोच' असे कोणी ह्मणेल. परंतु कर्म करावें कसें; तसेंच कर्म कोणते आणि अकर्म कोणतें याचा बोध झाला नसल्यामुळे आपल्या कर्तव्यशक्तीचा दुरुपयोग होतो, व प्रसंगी तर तिचा फुकट व्यय होतो, ही गोष्ट त्याच्या लक्ष्यांत आलेली नसते. 'योगः कर्मसुकौशलम्' व 'ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि' असें भगवंतांनी गीतेत सांगितले आहे. कर्म कसे करावे हे जाणून सशास्त्र मार्गाने कर्म केले तर अत्यंत फलदायी होते. मानसिकशक्ति अव्यक्तपणांतून व्यक्तपणांत आणणे व निद्रित आत्म्यास चेतना देणे हे कर्माचें साध्य आहे, हे आपण नित्य लक्ष्यांत धरिले पाहिजे. प्रत्येक मनुष्यांत एकसारखी चिच्छक्ति निद्रित असून ती कर्मरूप आघातांनी जागृत होते.<br> {{gap}}प्रत्येक मनुष्य कर्म करूं लागला ह्मणजे तें करण्यांत त्याचा काही तरी हेतु असतो. हेतूवांचून कर्मप्रवृत्ति होत नाही. कित्येकांनां कीर्तिमान होण्याची इच्छा असते, ह्मणून कीर्तीसाठी ते कर्म करितात. दुसऱ्या कित्येकांना द्रव्य हवें असते; ते द्रव्यप्राप्तीच्या हेतूस्तव कर्म करीत असतात. कित्येकांना स्वर्गसुखाच्या प्राप्तीचा हव्यास असतो; व ते तशा दृष्टीने कर्मे करितात. कित्येक<noinclude></noinclude> l6hk4cldwv0r0n5argdlos72qmljcfs पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/81 104 63351 229090 156237 2026-04-10T16:27:21Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229090 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|५३ }} {{rule}}</noinclude>आपले नांव मागें रहावें ह्मणून कर्मे करितात. चिनी लोकांत मनुष्य मेल्यानंतर त्यास त्याच्या योग्यतेप्रमाणे पदवी मिळते. विचारांती चिनांतली ही चाल आपल्या चालीपेक्षां बरी आहे असे मला वाटते. कोणी एखादें मोठे कृत्य केलें तर त्याच्या बापाला अथवा आजाला सरदाराची पदवी देण्याची चाल चीन देशांत आहे. तेव्हां तिकडे कित्येक लोक आपल्या बापाचें नांव मोठे व्हावें ह्मणून कर्म करितात. आपण मेल्यानंतर आपलें खूप मोठे थडगे बांधले जावें अशा हेतूने मुसलमानांतील काही विशिष्ट पंथाचे लोक कर्में करीत असतात. मूल जन्माला आल्याबरोबर त्याचे थडगे बांधणारे काही पंथ मला ठाऊक आहेत. हे थडगें जितके मोठे आणि सुंदर असेल त्या मानाने आईबापांची पदवी अधिक समजली जाते. सुंदर आणि मोठे थडगे बांधणे हाच हेतु बाळगणारे लोक अशा पंथांत पुष्कळ असतात. दुसरे कित्येक शरीराला खूप त्रास देण्यांतच आनंद मानितात. आणखी कित्येक लोकांची घरे बुडवून देवळे बांधतात व भिक्षुकादिकांस खूप धर्म करितात. जणूं काय स्वर्गद्वारावर दाखविण्यासाठी भटांपासून ते पासच घेत असतात! इत्यादि अनेक प्रकारच्या हेतूंनी प्रेरित होऊन मनुष्य कर्मे करीत असतो.<br> {{gap}}केवळ कर्तव्य ह्मणून कर्म करणारे थोडे. असे लोक कीर्ति अथवा वित्त अथवा दुसरा कांही स्वार्थ मनांत न आणितां केवळ कोणाचे तरी बरें व्हावें याचसाठी कर्में करितात. कोणाचें तरी बरे झालेले पाहिले ह्मणजे त्यांस आनंद होतो. कीर्तीच्या हेतूने केलेल्या कर्माचा परिपाक नेहमी बहुधा सावकाश होत असतो. कीर्तीसाठी साऱ्या जन्मभर खटपट केली आणि ती अगदी वृद्धापकाळी- मरावयाच्या वेळी- मिळाली असें पुष्कळ वेळां घडतें. जर मनुष्य कोणताहि हेतु मनांत न धरितां कर्मे करील तर त्या कर्माचा त्यास कांहींच फायदा मिळणार नाही काय? मिळेल, खचित मिळेल. सर्वांत अत्युच्च दर्जाचा असा फायदा त्यास मिळेल. निर्हेतुक कर्माइतकें फायदेशीर दुसरे कोणतेंहि कर्म नाहीं; परंतु तें फलद्रूप होईपर्यंत वाट पहात बसण्या इतका धीर सामान्य मनुष्याच्या ठिकाणी असत नाही. अशा कर्माचा शरीरप्रकृतीवरहि फारच उत्तम परिणाम होत असतो. प्रेम, सत्य, आणि निःस्वार्थबुद्धि हे शब्द केवळ अलंकारिक भाषेने मी योजिले नसून आपणांपैकी प्रत्येकाने तेच आपलें साध्य आहे असें जाणावें. आपल्या चैतन्यशक्तीस पूर्णपणे जागृत करण्याची शक्ति या तीन गुणांतच आहे. कोणताहि हेतु- मग तो कीर्तीचा, पैशाचा, स्वर्गसुखाचा<noinclude></noinclude> p1cy6obmlubjaz60d3el3tia8d1ucuz पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/82 104 63352 229091 156238 2026-04-10T16:30:29Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229091 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|५४ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>अथवा दुसरा कसलाहि असो- मनांत न धरितां जर कोणी पांच दिवस किंबहुना पांच मिनिटें कर्म केले तर अशा मनुष्यांत उत्तम मानसिक धैर्याचें बीज आहे असे समजावें. अशा प्रकारचे कर्म करणे अत्यंत बिकट आहे, ही गोष्ट खरी; परंतु अशा कर्मात वसत असणाऱ्या सामर्थ्याचा प्रत्यय आपणास कधीच आलेला नसतो, असें नाही. असें कर्म करण्यासाठी जी आकलनशक्ति लागते तिची किंमत वास्तविक कर्म करण्यांत दिसून येणाऱ्या शक्तीपेक्षा अधिक आहे. कोणतेंहि कर्म करित असतां स्वार्थाचा यत्किंचितहि उदय न होऊ देण्यासाठी मनावर केवढा मोठा ताबा असावा लागतो याची कल्पना नुसत्या वर्णनाने कधींच करितां येणार नाही. स्वार्थी कर्म करण्यांत केवढेहि सामर्थ्य दिसून आले तरी त्या सामर्थ्याचे महत्व वरील प्रकारच्या आकलनांत लागणाऱ्या सामर्थ्यापेक्षां निःसंशय कमी दर्जाचे आहे. चार घोडे जोडलेली एखादी गाडी उतरणीवरून भरधाव जात असतां ती तशीच जाऊ देण्यास जें बळ लागते त्याहून ती एकदम थांबविण्यास अधिक बळ निःसंशय लागतें. एखादा गोळा तोफेंतून मोठ्या वेगाने निघाला आणि त्याच्या वाटेत कोणताच पदार्थ आड आला नाही तर बऱ्याच अंतरावर तो जाऊन पडतो व तेथे त्यांतील विनाशक शक्तीचा फारसा प्रत्यय येत नाही. परंतु तो मध्येच एखाद्या कठीण पदार्थावर आपटला तर अत्यंत परिमाणाची उष्णता तो उत्पन्न करितो. स्वार्थबुद्धीने प्रेरित होऊन आपण कोणतेंहि कर्म करूं लागलों म्हणजे आपलें जें सामर्थ्य खर्च होतें तें कोणत्याहि उपायाने आपणास परत मिळत नाही. परंतु स्वार्थबुद्धि टाकून देण्यास- मनावर ताबा ठेवण्यास- जें सामर्थ्य खर्च होतें तें मात्र किती तरी अधिक वाढून आपणांस परत मिळते. अशा रीतीने ज्याचे मन ताब्यात आले आहे, त्याची इच्छाशक्ति अत्यंत बळावत जातजात तोच पुढे ख्रिस्ताची अथवा बुद्धाची पदवी पावतो. मनुष्यमात्राने आपणापुढे नमावे अशी. पुष्कळांची इच्छा असते; परंतु शक्तीच्या वृद्धीचे हे रहस्य त्यांस ठाऊक नसते. आज अत्यंत मूर्ख असा दिसणारा मनुष्यहि हे रहस्य जाणून व त्याप्रमाणे वागून जगाचा शास्ता होऊ शकेल. आपणापुढें मनुष्यांनी नमून राहावे अशी इच्छा मात्र त्याने प्रथम समूळ टाकिली पाहिजे. ज्या दिवशी अशा इच्छेची त्यास आठवणहि नाहीशी होईल त्याच दिवशी मनुष्ये त्याजपुढे नमत आहेत असें त्यास दिसेल. ज्याप्रमाणे कित्येक प्राण्यांस कांही थोड्याशा पावलांपलीकडील जमीन दिसत नाही, त्याच प्रमाणे आह्मां मनुष्यांची नजर काही थोड्या वर्षांपली-<noinclude></noinclude> 4hjwyrd66d9vgp8m042flp04ucp7aci पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/83 104 63353 229092 156239 2026-04-10T16:33:54Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229092 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|५५ }} {{rule}}</noinclude>कडे जात नाही. आमच्या सभोवती दिसणाऱ्या परिघापलीकडे आणखी जग आहे ही गोष्टच आमच्या ध्यानात येत नाही. दृष्टीच्या या आकुंचितपणामुळेच आम्ही दुष्ट आणि अनीतिमान् बनलो आहों. हाच आमचा मोठा दुर्बळपणा आहे.<br> {{gap}}कर्म कितीहि हलक्या दर्जाचे असले तरी त्याचा विषाद मानूं नये. हलके कर्म झाले तरी ते शक्य तितक्या उत्तम रीतीने करण्यास शिकले पाहिजे. केवळ कीर्तीसाठी कोणी काही कर्म करित असतील तर असोत. परंतु आपले कर्तव्य करतांनां कीर्तीची दृष्टि ठेऊ नये. आपल्या स्वतःचें मानसिक सामर्थ्य वाढावें ही दृष्टि नेहमी जागृत असली पाहिजे. ''''कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन'''' ही भगवंताची उक्ति सतत ध्यानांत वागविली पाहिजे. एखाद्याला मदत करण्याची तुम्हांस इच्छा झाली तर तो पुढे आपल्याशी कसा वागेल असल्या प्रकारचे विचार चित्तास शिवूहि देऊं नयेत. कोणत्याहि चांगल्या कार्यास आरंभ करावा असे वाटले तर तें शेवटास जाईल की नाही याची चिंता करित न बसतां कार्यास आरंभ करावा.<br> {{gap}}अशा प्रकारचे कर्म करण्याचा निश्चय केला तर एक नवीच अडचण दिसूं लागते. सदोदित कार्यरत राहावयाचा आम्ही निश्चय करूं; वस्तुतः कर्माशिवाय आमचा एक क्षणहि जात नाही. हे तुमचे ह्मणणे आह्मीं कबूल केले, तर सदोदित कार्यरत राहिल्यावर आमांस विश्रांति केव्हां मिळणार? जगांत राहून कर्म करावयाचे ह्मटले तर निवळ चरितार्थासाठी सुद्धा इतका उद्योग करावा लागतो की त्याखालीच आमचा चुराडा होऊन जातो. संसार सोडून अरण्यवास पत्करावा म्हटले तर तेथील शांतताहि सहन करण्याची आम्हांस मानसिक शक्ति नाही. पशुपक्ष्यांवांचून इतरांचा शब्दहि ऐकू येण्याची मारामार, अशा स्थितीत या दोन्ही स्थिति अर्धवट वाटतात. एखाद्या अरण्यवासी मनुष्याला संसारांत आणिलें तर भोंवतालच्या गडबडीनें तो बिचारा भांबावून वेडा व्हावयाचा. उलटपक्षी एखाद्या संसायाला अरण्यांत पाठविले तर तेथल्या निःसीम शांततेने तो वेड्यासारखा होतो. समुद्राच्या खोल पाण्यात राहणाऱ्या माशाला पृष्ठभागावर आणिलें तर त्याच्या शरीराचे तुकडे होतात. कारण त्याच्या शरीरावर जें पाण्याचे प्रचंड वजन असतें तें नाहींसें झाल्यामुळे त्याचे शरीर विस्कळित होते. अशी स्थिति दिसत असतां या दोहींचा योग्य संयोग करावयाचा कसा? जगांतील एकसारख्या चालू राहणाऱ्या गडबडींत ज्याला अत्यंत स्थिर राहतां येते आणि अरण्याच्या निःसीम शांततेत ज्याला अत्यंत कार्यरत राहतां येते<noinclude></noinclude> 5jqrf3rah4lz3pevh8r36jqoezr9t5g पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/84 104 63354 229093 156240 2026-04-10T16:46:42Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229093 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|५६ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>अशी मानसिक स्थिति आम्हांस प्राप्त करून घ्यावयाची आहे. माणसांनी गजबजून गेलेल्या रस्त्यांत अरण्यांतील गुहेची शांतता मिळविणे आणि अरण्यांतील गुहेत अत्यंत कार्यरत राहतां येणें अशी संयुक्त स्थिति आपणास प्राप्त करून घ्यावयाची आहे. कर्मयोगाचे हेच ध्येय आहे. ही स्थिति तुह्मास प्राप्त करून घेतां आली तरच कर्मयोगाचे रहस्य तुह्मीं जाणलें असें होईल.<br> {{gap}}ही स्थिति प्राप्त करून घेण्याकरितां आपल्या चालू परिस्थितीत राहूनच आपणास आरंभ करावयास पाहिजे. कोणताहि उद्योग निःस्वार्थी मनाने करावयाला शिकणे हा या शाळेतील पहिला धडा आहे. आपल्याला कोणतेंहि काम करण्याची इच्छा उद्भवली की तिच्यापलीकडे असणारा हेतु शोधावा. हेतूवांचून इच्छा उद्भवत नाही. इच्छा उद्भवली की तिचे स्वरूप अधिक व्यक्त असल्यामुळे हेतूपुढे पडदा आल्यासारखा होऊन तो अदृश्य होतो. तो हेतु शोधून काढून त्याचे वास्तविक स्वरूप अवलोकन करावें. पहिल्या पहिल्याने आपली प्रत्येक इच्छा स्वार्थी हेतूने प्रेरित असते असे आपणास आढळून येईल. परंतु आपल्या इच्छाशक्तीने या स्वार्थांच्या निःपाताचा उद्योग निश्चयाने आरंभिला तर केव्हांना केव्हां तरी यश खचित येईल. या दुस्तर संसृतींतून आपला रस्ता काढित असतां हळू हळू प्रयत्न करून शेवटी सर्वथा निःस्वार्थी बनणे हे प्रत्येकाला शक्य आहे. ज्या दिवशी आपण पूर्ण निःस्वार्थी बनूं त्या दिवशी आमचे सर्व सामर्थ्य एकवटले आहे असा प्रत्यय येऊन आपली मूळची केवळ ज्ञानमय स्थिति आपणास प्राप्त होईल.<br> {{rule|6em}}<br> {{center|{{x-larger|'''प्रकरण २ रे'''}}}} {{center|'''स्वकर्तव्यदक्ष प्रत्येक मनुष्य सारखाच मोठा आहे.'''}} <br> {{gap}}सांख्यमताप्रमाणे विश्व हे त्रिगुणात्मक आहे. या तीन गुणांस सत्व, रज आणि तम अशी नांवे आहेत. या तीन गुणांचें सृष्टीतील प्रत्यक्ष अथवा दृश्य स्वरूप अनुक्रमें स्थैर्य, चापल्य आणि जाड्य अशा तीन अवस्थांत दिसून येते. दगडासारखी जडावस्था तमोगुणाचे दृश्यस्वरूप आहे. रागलोभादि विकारांस वश होऊन कार्यास प्रवृत्त होणे हे रजोगुणाचे दृश्यस्वरूप आहे. या दोहोंस ताब्यांत ठेऊन त्यांच्यांत समतोलपणा उत्पन्न करणारा तो सत्वगुण.<br> {{gap}}प्रत्येक मनुष्यांत हे तीन गुण असतात. त्यांपैकी जो गुण ज्या वेळी प्रबल असेल त्यास अनुसरून प्रत्येक मनुष्य त्यावेळी कर्म करित असतो. जेव्हां तमोगुण प्रबल असतो तेव्हां आपणास आळस येतो- आपण अगदी स्तब्ध आणि<noinclude></noinclude> isrtgu8pbpmvnt16vs2o24ap6icwiqf 229094 229093 2026-04-10T16:47:03Z कल्पनाशक्ती 3813 229094 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|५६ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>अशी मानसिक स्थिति आम्हांस प्राप्त करून घ्यावयाची आहे. माणसांनी गजबजून गेलेल्या रस्त्यांत अरण्यांतील गुहेची शांतता मिळविणे आणि अरण्यांतील गुहेत अत्यंत कार्यरत राहतां येणें अशी संयुक्त स्थिति आपणास प्राप्त करून घ्यावयाची आहे. कर्मयोगाचे हेच ध्येय आहे. ही स्थिति तुह्मास प्राप्त करून घेतां आली तरच कर्मयोगाचे रहस्य तुह्मीं जाणलें असें होईल.<br> {{gap}}ही स्थिति प्राप्त करून घेण्याकरितां आपल्या चालू परिस्थितीत राहूनच आपणास आरंभ करावयास पाहिजे. कोणताहि उद्योग निःस्वार्थी मनाने करावयाला शिकणे हा या शाळेतील पहिला धडा आहे. आपल्याला कोणतेंहि काम करण्याची इच्छा उद्भवली की तिच्यापलीकडे असणारा हेतु शोधावा. हेतूवांचून इच्छा उद्भवत नाही. इच्छा उद्भवली की तिचे स्वरूप अधिक व्यक्त असल्यामुळे हेतूपुढे पडदा आल्यासारखा होऊन तो अदृश्य होतो. तो हेतु शोधून काढून त्याचे वास्तविक स्वरूप अवलोकन करावें. पहिल्या पहिल्याने आपली प्रत्येक इच्छा स्वार्थी हेतूने प्रेरित असते असे आपणास आढळून येईल. परंतु आपल्या इच्छाशक्तीने या स्वार्थांच्या निःपाताचा उद्योग निश्चयाने आरंभिला तर केव्हांना केव्हां तरी यश खचित येईल. या दुस्तर संसृतींतून आपला रस्ता काढित असतां हळू हळू प्रयत्न करून शेवटी सर्वथा निःस्वार्थी बनणे हे प्रत्येकाला शक्य आहे. ज्या दिवशी आपण पूर्ण निःस्वार्थी बनूं त्या दिवशी आमचे सर्व सामर्थ्य एकवटले आहे असा प्रत्यय येऊन आपली मूळची केवळ ज्ञानमय स्थिति आपणास प्राप्त होईल.<br> {{rule|6em}}<br> {{center|{{x-larger|'''प्रकरण २ रे'''}}}} {{center|'''स्वकर्तव्यदक्ष प्रत्येक मनुष्य सारखाच मोठा आहे.'''}} {{gap}}सांख्यमताप्रमाणे विश्व हे त्रिगुणात्मक आहे. या तीन गुणांस सत्व, रज आणि तम अशी नांवे आहेत. या तीन गुणांचें सृष्टीतील प्रत्यक्ष अथवा दृश्य स्वरूप अनुक्रमें स्थैर्य, चापल्य आणि जाड्य अशा तीन अवस्थांत दिसून येते. दगडासारखी जडावस्था तमोगुणाचे दृश्यस्वरूप आहे. रागलोभादि विकारांस वश होऊन कार्यास प्रवृत्त होणे हे रजोगुणाचे दृश्यस्वरूप आहे. या दोहोंस ताब्यांत ठेऊन त्यांच्यांत समतोलपणा उत्पन्न करणारा तो सत्वगुण.<br> {{gap}}प्रत्येक मनुष्यांत हे तीन गुण असतात. त्यांपैकी जो गुण ज्या वेळी प्रबल असेल त्यास अनुसरून प्रत्येक मनुष्य त्यावेळी कर्म करित असतो. जेव्हां तमोगुण प्रबल असतो तेव्हां आपणास आळस येतो- आपण अगदी स्तब्ध आणि<noinclude></noinclude> jg1v0pd87mtvxljsfr1hhc7f0wm6xfj पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/85 104 63355 229095 156241 2026-04-10T16:49:28Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229095 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|५७ }} {{rule}}</noinclude>क्रियाशून्य होतो. अशा वेळी आळसामुळे कोणताच विचार उत्पन्न होत नाही. कित्येक वेळां विलक्षण चपलतेचा आपल्या अंगीं संचार होऊन एखादें अवघड कामहि त्रास वाटल्याशिवाय आपण पार पाडतों; अशावेळी रजोगुणाचे प्राबल्य असते; आणि कित्येक वेळी आळस बिलकुल नसतां आपली वृत्ति अगदी शांत असते; अशा वेळी सत्वगुण अधिक प्रबल असतो. याहून अधिक स्थिर असेंहि ह्या गुणांचे दुसरें एक स्वरूप आढळून येते. कित्येक मनुष्यांत या तिहींपैकी कोणत्या तरी एका गुणाचे प्राबल्य नेहमीच विशेष असते. कित्येक स्वभावतःच आळशी असतात. कित्येक स्वभावतः अत्यंत उद्योगप्रिय आणि चळवळे असतात; आणि कित्येक शांत स्वभावाचे आणि मित व मधुरभाषी असतात. हे तीन स्वभावविशेष अनुक्रमें तम, रज आणि सत्व या गुणांचे द्योतक आहेत. या त्रिगुणांवांचून असणारा एकहि पदार्थ या सृष्टीत नाही. झाडेझुडपें, पशुपक्षी आणि मनुष्ये यांत कमीअधिक प्रमाणाने या गुणत्रयाचें मूर्तस्वरूप दृग्गोचर झाले आहे.<br> {{gap}}कर्मयोगांत मुख्यत्वेकरून या त्रिगुणांचाच विचार केला आहे. यांच्या गुणांचें स्वरूप काय आहे, आणि त्यांचा यथायोग्य उपयोग कसा करता येईल याचे ज्ञान आपणास झाले ह्मणजे आपले कर्तव्य अधिक सशास्त्र मार्गाने कसे करावें हे आपणास समजतें. मानव समाजांची रचना देशकालानुरूप निरनिराळ्या प्रकारची झालेली आहे. नीति ह्मणजे काय याचें सामन्य ज्ञान आम्हांस सारखेच असते. तसेच कर्तव्य ह्मणजे काय हेहि आह्मांस सामान्यपणे समजतें. तथापि निरनिराळ्या देशांच्या निरनिराळ्या चालीरीतींस अनुसरून या शब्दांच्या व्याख्यांत बदल होत असतो. जी गोष्ट एका देशांत नीतीची अशी समजली जाते तीच दुसऱ्या देशांत नीतीस अगदी विघातक समजली जाते. काही देशांत चुलत बहिणीशी लग्न करणे ही सामान्य व्यवहारांतील गोष्ट आहे. परंतु दुसऱ्या देशांत तीच चाल नीतीस अगदी विरुद्ध अशी मानली जाते. कित्येक देशांत मेहुणीशी लग्न करणे हे पाप आहे असे समजतात. तर दुसऱ्या कित्येकांत तसे समजत नाहीत. कित्येक देशांत एका पुरुषास एका वेळी एकच पत्नी असणे हे नीतीचें दर्शक मानले जाते, तर दुसऱ्या कित्येकांत एकाच वेळी चारपांच अथवा शेपन्नास बायका असणे ही सामान्य चाल आहे. अशाच रीतीने नीतीच्या इतर तत्वांचेंहि व्यवहार्य रूप प्रत्येक देशांत निरनिराळे आढळतें.<br> {{gap}}याचप्रमाणे कर्तव्याचीही गोष्ट आहे. मनुष्याने काही एखादी गोष्ट केली नाही तर तो कर्तव्यच्युत झाला असे काही ठिकाणी समजले जाते. परंतु<noinclude></noinclude> rdmejnjymjngr8dcuv5iej6noaafjgj पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/86 104 63356 229096 156253 2026-04-10T16:51:53Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229096 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|५८ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>दुसऱ्या कित्येक देशांत तीच गोष्ट करणारा मनुष्य मूर्ख समजला जातो. अशी वस्तुस्थिति आहे तरी नीतीच्या व कर्तव्याच्या सामान्य कल्पना आपणा सर्व मानव जातीच्या एकच आहेत अशी जाणीव आपल्या अंतर्यामी नेहमी जागरूक आहे. अंतर्यामी असणाऱ्या जागरूकतेचा अनुभव आणि त्याच गोष्टींचा व्यवहार्य स्वरूपांतील भिन्नपणाचा अनुभव यांचा मेळ कसा घालावयाचा हा प्रश्न आपणापुढे उभा राहतो. या परस्परविरोधी अनुभवांची एकवाक्यता करण्यास दोन मार्ग मोकळे आहेत. 'मी ह्मणतों अथवा करतो तेंच बरोबर, तसें न करणारे इतर लोक मूर्ख आणि अनीतिमान्' अशा रीतीने एकवाक्यता करणे हा एक मार्ग आहे; परंतु हा मूर्खाचा मार्ग झाला. शाहण्यांचा मार्ग याहून भिन्न आहे. भिन्न देशकालवर्तमान आणि भिन्न परिस्थिति यांमुळे एकाच सिद्धांताच्या व्यवहार्य स्वरूपांत भेद दिसतो. हा बाह्यतः दिसणारा भेद खरा नसून तो त्या सिद्धांताचे वैय्यर्थ्य न दाखवितां केवळ भिन्न परिस्थिति मात्र दाखवितो. एकवाक्यतेचा हा शहाण्या पुरुषांचा दुसरा मार्ग आहे. सिद्धांत एकच असला तरी त्याचे व्यवहार्य स्वरूप परिस्थित्यनुरूप बदलणे शक्य आहे येवढेच नव्हे तर तसे होणे इष्टहि आहे असें पंडितांचे मत आहे.<br> {{gap}}उदाहरणार्थ, 'दुष्टाचा प्रतिकार करूं नये' असा उपदेश येशुख्रिस्ताप्रमाणे इतर धर्मप्रवर्तकांनीहि केला आहे. स्वसंरक्षणार्थसुद्धा कोणालाहि दुखवावयाचें नाही हे ध्येय निःसंशय उच्च दर्जाचे आहे, ही गोष्ट आपणांस अंतर्यामी पटते. आतां आपण हे ध्येय नित्याच्या व्यवहारांत आणूं लागलों तर केवढे अनर्थ ओढवतील याची कल्पना करा. आमचें वित्त आणि जीवितहि सुरक्षित राहणार नाही. सर्व समाजसंघटना विस्कळित होऊन कोणाचा पायपोस कोणाच्या पायांत नाही, अशी स्थिति होऊन जाईल. फार काय सांगावें, आपण एकच दिवस वरील तत्वास अनुसरून वागावयाचे ठरविलें तरी सर्वत्र झोटिंगशाही माजेल. यासाठी या तत्त्वाचा उच्चपणा आपणांस अंतर्यामी पटला असला तरी त्याला व्यवहार्यरूप देणे आजच्या समाजाच्या स्थितीत अनिष्ट आहे. हे तत्त्व चांगले आहे त्या अर्थी याप्रमाणे न वागणारा तो पापी असे आपण ह्मणूं लागलों तर या पापांतून मुक्त असे मनुष्य फारसे आढळणार नाहीत. ह्मणजे या दृष्टीने बहुतेक सर्व मानवजाती पापी असें ह्मणावयाची पाळी येईल. आपण पापी अशी कल्पना जर एकवेळ खरोखर रूढ झाली तर ती केवढे अनर्थ करील व आपणा मनुष्यांस कोणत्या खाड्यांत नेऊन टाकील याचा नेम सांगवत नाही.{{nop}}<noinclude></noinclude> 1sjj06ldwddqy3z94c4lnr0atord97x पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/87 104 63357 229097 156254 2026-04-10T16:54:25Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229097 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|५९ }} {{rule}}</noinclude>'मी पापी आहे' असें मनापासून कोणास वाढू लागले की त्याचा पहिला घातक परिणाम मनोदौर्बल्य हा होय. अशा दुर्बळ मनुष्याच्या हातून निश्चयाने कोणतीहि गोष्ट पार पडणे सर्वथा अशक्य आहे; आणि मनुष्य एक वेळ असा घसरणीस लागला की प्रतिक्षणी त्याचा वेग वाढत जाऊन तो अगदी तळाशी जाईपर्यंत मध्ये कोठे थांबण्यास त्यास अवसरच सांपडत नाही. मनोदौर्बल्याइतके मोठे पाप जगांत दुसरे कोणतेंहि नाही. मनुष्यजातीचा याच्याएवढा दुसरा मोठा शत्रु नाही. ज्याप्रमाणे मनोदौर्बल्य हे एका व्यक्तीच्या घातास कारण होते, त्याचप्रमाणे तें सबंध राष्ट्राच्या नाशासहि कारण होते. 'आह्मी मूर्ख, आह्मी पापी,' असें पठण करित बसणारे लोक दुर्गतिपंकांत असावयाचेच यांत कांही शंका नाही.<br> {{gap}}आपल्या स्वतःबद्दल आपले कधीहि अनिष्ट मत होऊ देऊ नये. मला असाध्य असें या जगांत कांहीं नाहीं असा अत्यंत दृढ विश्वास चित्तांत प्रथम उत्पन्न झाला पाहिजे; आणि नंतर परमेश्वरावर विश्वास पाहिजे. परमेश्वर जे जे काही करतो तें तें सर्व आपल्या बऱ्यासाठीच आहे, असा भरंवसा परमेश्वरावर पाहिजे. ज्याच्या ठिकाणी आत्मविश्वास नाही, त्याचा विश्वास परमेश्वरावरहि नाहींच, असें तुह्मी पक्कें समजा. सारांश, नीति आणि कर्तव्य यांचे स्वरूप देशकालानुरूप बदलतें ही गोष्ट नित्य ध्यानात बाळगून कोणासहि त्यांच्या चालीरीतीबद्दल दूषण देऊ नये. 'दुष्टाचा प्रतिकार करूं नये' हे जसें कर्तव्य आहे तसेंच, परिस्थिति बदलली तर 'दुष्टाचा प्रतिकार करावा' हेहि आपले कर्तव्यच होईल.<br> {{gap}}भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायांत भगवान् श्रीकृष्णांनी अर्जुनाला दांभिक व भित्रा ह्मणून दूषण दिले आहे, याबद्दल कित्येकांना मोठे नवल वाटत असेल. आपले आप्त, स्नेही यांजबरोबर युद्ध करणे हे अर्जुनाला मोठे पाप वाटले. सर्व विश्वावर प्रेम करणे हे आपले कर्तव्य असतां स्वजनांचा वध करावयाचा ह्मणजे प्रेमाला उघड्या डोळ्यांनी तिलांजुलि द्यावयाची असें होतें. अशा कल्पनेने अर्जुन युद्धास प्रवृत्त होईना. या प्रसंगापासून आपणा सर्वांस बोध घेतां येण्यासारखा आहे.<br> {{gap}}उजेड अत्यंत मंद असला तर तो आपणांस दिसत नाही. तसेंच तो अत्यंत तीव्र असला तरीहि आपणांस दिसत नाही. त्याचप्रमाणे आवाजाचे आहे. आवाज अगदी लहान असला तर जसा आपणांस ऐकू येत नाही, त्याच प्रमाणे अत्यंत मोठा आवाजहि आपणांस ऐकू येत नाही. गतीची गोष्टहि अशीच आहे.<noinclude></noinclude> reo584iuwy1sq29zfhdg0v3k6fxahq6 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/88 104 63358 229111 156263 2026-04-11T10:09:36Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229111 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|६० |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>घड्याळांतील अवर कांट्याची गति आपणांस दिसत नाही. तसेच एखाद्या अत्यंत झपाट्याने फिरणाऱ्या भोवऱ्याची गतीहि आपणांस दिसत नाही. तो भोंवरा निश्चळ उभा आहे असेंच आपणास वाटते. यावरून कोणत्याहि स्थितीची आत्यंतिक रूपं बाह्यतः अगदी एकसारखींच असतात, असे सिद्ध होते. अत्यंत हळु आणि अत्यंत झपाट्याची गति, ही गतीची वस्तुतः परस्पर अगदी विरुद्ध अशी स्वरूप असतां आत्यंतिकपणामुळे अगदी एकसारखी दिसतात. हा बोध आपणांपैकी कित्येकांनी मनन करण्यासारखा आहे. जड पदार्थांसंबंधी जसा हा नियम खरा आहे, तसाच तो चैतन्ययुक्त पदार्थासहि लागू पडतो. आपणास रस्त्याने जाणारा कोणी मनुष्य अपशब्द बोलत आहे हे पाहून एखादा स्तब्ध राहिला तर त्या कृतींत परस्परविरुद्ध असे दोन हेतु संभवतात. आपला शत्रु धष्टपुष्ट आहे हे पाहून भीतीने गप राहणे निराळे; आणि त्याचे तोंड एका तडाक्याने बंद करतां येण्याची शक्ति आपल्या मनगटांत आहे अशी पूर्ण जाणीव असतांहि त्याला केवळ क्षमा करून गप राहणे हे निराळे. बाह्यतः कृतीचे स्वरूप एकच आहे. परंतु हेतूंत मात्र जमीनअस्मानाचे अंतर आहे. यामुळे वरील कृति एकच असतां तिजपासून उद्भवणाऱ्या पापपुण्याचे स्वरूप मात्र अगदी भिन्न होतें. भीतीने गप राहणे ही कृति पापपरिणामी असून दुसरी कृति पुण्यकारक आहे. बुद्ध जन्मतः राजपुत्र असून सुखविलासांत वाढलेला असतांहि त्याने त्या सर्वांवर लाथ मारिली. याचें नांव खरा त्याग. परंतु खायाला मिळत नाही ह्मणून एकादशी करणारा भिकारी पुण्यवान् ह्मणतां येईल काय? यास्तव ज्यावेळी आपण प्रतिकार करणे हे पाप आहे असें ह्मणतो ते कोणत्या हेतूने ह्मणतों याचा विचार केला पाहिजे. येथे हेतु प्रधान असून कृति गौण आहे, ही गोष्ट नित्य लक्ष्यांत बाळगिली पाहिजे. प्रतिकार करण्याची ताकद आपल्यांत आहे की नाही याचा विचार प्रथम केला पाहिजे. आपणांत सामर्थ्य आहे अशी पक्की जाणीव असतांहि आपण दुष्टाचा प्रतिकार केला नाही तर आपण खरोखर मोठे पुण्य केल्यासारखे होईल. परंतु अप्रतिकाराच्या तत्वामागे आपला भेकडपणा लपवू पाहणे यासारखें दुसरें कोणतेंहि मोठे पाप नाही. आपणासमोरील प्रचंड सेना पाहून अर्जुनाचे चित्त क्षणभर कंपित झाले, आणि असें कंपित चित्त असतां त्यास अप्रतिकाराच्या तत्वाचे स्मरण झाले. परंतु या तत्वाच्या स्मरणाबरोबर तो स्वतःचे कर्तव्य विसरला; अथवा ही विस्मृति तरी कसली? अप्रतिकाराच्या तत्वामार्गे तो आपली भीति लपवू पाहत होता. परंतु भगवान् श्रीकृष्णांनी ती<noinclude></noinclude> iw5n8jhuqbi4svgulik35l5q6je3q50 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/89 104 63359 229112 156264 2026-04-11T10:17:15Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229112 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|६१ }} {{rule}}</noinclude>स्थिति ओळखूनच त्यास ''''अशोच्यानन्व शोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे'''' असें ह्मटलें, व ''''क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप'''' असा उपदेश केला.<br> {{gap}}याप्रमाणे कर्मयोगाची प्रमुख कल्पना आहे. अप्रतिकाराचे तत्व अतिशय उच्च आहे ही गोष्ट प्रत्येक कर्मयोगी जाणत असतो. प्रतिकाराचे पूर्ण सामर्थ्य अंगी असतांहि मनावर ताबा ठेवून प्रतिकार न करण्यांत उत्पन्न होणाऱ्या शक्तीची जाणीवहि त्याला पूर्ण असते. परंतु इतकी अत्युच्च दशा प्राप्त होईपर्यंत प्रतिकार करूनच आपलें सामर्थ्य वाढविले पाहिजे हे ओळखून तो तदनुरूप वागत असतो. अत्युच्च ध्येय साध्य होईपर्यंत मधील मुक्कामावर थांबून आपल्या सामर्थ्याचा आढावा काढणे हाच मार्ग प्रत्येकास श्रेयस्कर आहे. जोपर्यंत भेकडपणाची यत्किचिहि छाया शिल्लक आहे तोपर्यंत अप्रतिकाराची कास धरणे ह्मणजे बुडत्या गलबतावर नांगराला मिठी मारण्यासारखे आहे.<br> {{gap}}माझ्या देशांत एक अत्यंत आळशी आणि मूर्ख मनुष्य मला भेटला. तो दोन पायांवर चालणारा प्राणी असल्यामुळेच केवळ त्यास मनुष्य अशी संज्ञा प्राप्त झाली होती. तो मला ह्मणाला “अहो, परमेश्वरप्राप्तीचा कांहीं मार्ग मला दाखवाल काय? मी मुक्त कसा होईन ते मला सांगाल काय?" मी त्याला विचारिलें “तुला खोटे बोलतां येते काय?" तो ह्मणाला “नाही." यावर मी. त्याला ह्मटले “तर मग अगोदर खोटे बोलायाला शीक. लांकडाच्या ठोकळ्यासारखा होऊन बसण्यापेक्षां खोटे बोलणेहि कांही वाईट नाही. बाह्यतः अत्यंत निश्चल दिसणारी तुझी स्थिति स्थितप्रज्ञाची नसून दगडाची आहे. त्यामुळे कांही वाईट कृत्यहि तुझ्या हातून घडत नाही. तर प्रथम कांहीं वाईट कृत्य तरी करायाला शीक." मित्रांनों, यांतील थट्टेचा भाग सोडून दिला तर केवळ दगडाच्या स्थैर्यातून स्थितप्रज्ञाच्या स्थैर्याला पोहोचण्याकरितां कर्मयोगाच्या अगदी तळच्या पायरीपासून आरंभ करणे जरूर आहे हे माझ्या सांगण्याचे तात्पर्य तुमच्या लक्ष्यांत आलेच असेल.<br> {{gap}}दगडासारखी निश्चल स्थिति कधीहि स्पृहणीय नाही; एवढेच नव्हे, तर सर्वथैव त्याज्य आहे. स्थितप्रज्ञाची शांतता प्राप्त होईपर्यंत प्रत्येकानें उद्योग हा केलाच पाहिजे; आणि उद्योग म्हटला की त्यांत प्रतिकार उत्पन्न होणारच. यास्तव उद्योगरत राहून वाईटाचा प्रतिकार करतां करतां स्थितप्रज्ञता तुह्मांस प्राप्त करून घेतली पाहिजे. 'कोणाचाहि द्वेष करूं नका, आणि वाईटाचा प्रतिकार करूं नका' हे ह्मणणे फार सोपे आहे; परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे<noinclude></noinclude> jzhkr57yhfggim8r9f2r1tdxqfmtrs7 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/90 104 63360 229113 156265 2026-04-11T10:21:29Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229113 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|६२ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>किती धोक्याचे आहे याचे विवरण अगोदर केलेच आहे. आपल्या स्वतःवरहि या तत्वाच्या अंमलबजावणीचा परिणाम अत्यंत अहितकरच होतो. आपल्या कृतीकडे सर्व जग पाहत आहे ही जाणीव असेपर्यंत प्रतिकार न करण्याचे सोंग आपण आणूं. परंतु या सोंगाची बतावणी करित असतां आपणांस किती त्रास होतो व तोंड बांधून बुक्क्यांचा मार कसा सोसावा लागतो याचा अनुभव ज्याचा त्यालाच विचारला पाहिजे. स्थितप्रज्ञाचा निरिच्छपणा, समता व शांतता यांचे कवच नसतां जगाचे तीक्ष्ण बाण सोसावयाचे ही गोष्ट अशक्य आहे, असा आपणांस त्यावेळी अनुभव येतो व आपलें ढोंग सोडून देऊन जोराचा प्रतिकार करून पुढे सरावें असें मनांत आल्यावांचून राहत नाही. आपण श्रीमंत व्हावे अशी इच्छा तुम्हांस झाली आणि पैशाच्या मागे लागणे हे जगाच्या दृष्टीने पाप आहे असे समजून तुम्ही पैशाकरितां उद्योग केला नाही तरी तुमचे मन सदोदित 'कवडी कवडी' असा जप केल्यावांचून कधीहि राहणार नाही. असा जप अहोरात्र चालू असतां त्यागी म्हणून स्वस्थ बसण्यांत काय शहाणपण आहे बरें! अशावेळी स्वस्थ न बसतां व जगाच्या बरें अथवा वाईट ह्मणण्याकडे लक्ष्य न देतां सपाटून उद्योग करा. म्हणजे संपत्तीच्या प्राप्तीकरितां भोगावी लागणारी सुखदुःखें कशी असतात यांचा प्रत्यक्ष अनुभव येऊन तुमचें मन आपोआप शांत होऊं लागेल, व त्यागाचा सरळ रस्ता तुम्हांस दिसू लागेल. कोणतीहि इच्छा अतिप्रबळ झाली तर तिची तृप्ति करून घेणे हे ढोंगीपणापेक्षा परिणामी अधिक हितकर असतें. इच्छातृप्तीनंतर जो थोडा शांततेचा काल सांपडतो, त्यावेळी विचार जागृत झाला तर आपण एवढी खटपट करून मिळविलेलें सुख तुच्छ आहे असें तुमचे तुह्मांसच वाढू लागते. आणि ही जाणीव एक वेळ पक्की उत्पन्न झाली ह्मणजे त्यागापासून मिळणाऱ्या अननुभूत सुखाची खरी गोडी तुह्मांस कळेल. प्रखर उन्हाचा ताप अनुभवल्यावांचून सावलीच्या सुखाची खरी किंमत कळत नाही. त्यागापासून शांति मिळते असा उपदेश आज हजारों वर्षे साधुसंत करित आले आहेत. आपल्या जन्मापासून हे शब्द आपल्या कानांवर नेहमी आदळत आहेत. असे असतांहि खरे त्यागी आपणांस कितीसे दिसतात? मी अर्ध्या जगावर फिरून अनुभव घेतला, परंतु असे वीस इसम सुद्धां आजपर्यंत माझ्या पाहण्यांत आले नाहीत.<br> {{gap}}आपल्या नजरेपुढे काही तरी साध्य ठेवून त्याच्या प्राप्तीकरितां यत्न करण्यास प्रत्येकाने प्रथम सुरवात करावी. हाच मार्ग नेहमी हितपरिणामी असतो. कोणी<noinclude></noinclude> 23lwe48oukg2tzavni6c9m759v0c1w5 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/91 104 63361 229114 156797 2026-04-11T10:32:02Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229114 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|६३ }} {{rule}}</noinclude>एखाद्याने अमुक साध्य इष्ट आहे असे सांगितले ह्मणून त्या साध्याच्या मागे लागणे हे निःसंशय अनिष्ट आहे. उदाहरणार्थ, आपण एखाद्या लहान मुलाला त्याच्या शक्तीचा विचार न करितां आठदहा कोसांची मजल मारावयास सांगितले तर मुक्कामास पोहोचण्यापूर्वीच त्या बिचाऱ्याचा अंत होईल. जगांत वागतांना आपण पुष्कळ वेळां अशाच प्रकारचे वर्तन करीत असतो. कोणत्याहि एका समाजांतील सर्व स्त्रीपुरुष मनाच्या एकाच अवस्थेची अशी कधीहि असावयाची नाहीत. त्या सर्वांकडून एकच गोष्ट एकाच मार्गाने होणे शक्य नाही. त्यांपैकी प्रत्येकाचे ध्येय निराळे असणार व त्याच्या सिद्धतेचे मार्गहि निराळे होणार हे उघड आहे. ह्मणून कोणाच्याहि साध्यसाधनासंबंधाने त्यास नांवे ठेवण्यास अथवा त्याचा तिरस्कार करण्यास आपणांस अधिकार नाही. प्रत्येकाने आपल्या मार्गाने चालून इतरांसहि बिनहरकत त्यांच्या मार्गाने जाऊ देणे हे योग्य आहे. आंब्याचे लांकूड सागवानाइतके चांगले नाही ह्मणून अथवा सागवानाला आंब्यासारखी मधुर फळे येत नाहीत ह्मणून त्या दोहोंसहि वाईट ठरविणारा मनुष्य स्वतः शहाणा ठरेल काय ?<br> {{gap}}जगांत कितीहि भिन्नता दिसली तरी तिच्या मुळाशी एकात्मकता आहे. सृष्टि आकाराला आली ह्मणजे तींत भिन्नता आणि वैचित्र्य यावयाचंच असा नियम आहे. किंबहुना भिन्नतेवांचून सृष्टि आकाराला येणेच अशक्य आहे. तेव्हां या भिन्नतेस अनुसरून प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र ध्येय आणि स्वतंत्र मार्ग असावे हे सृष्टिनियमास अनुसरूनच आहे. सर्वांपुढे एकच ध्येय आणि एकच मार्ग ठेवला तर त्यांत कांहीं मागे पडणारच. तसे झाले ह्मणजे समाजांत निष्कारण द्वेष आणि दुही यांचे पीक येणार. आपण या मार्गात मागे पडतों असें दिसले ह्मणजे अशा मनुष्यांच्या ठिकाणचा आत्मविश्वास नाहीसा होतो, आणि आत्मविश्वास नाहीसा झाला ह्मणजे असा मनुष्य प्रायः स्थितप्रज्ञाची स्थिरता सोडून दगडाची स्थिरता पावण्याच्या मार्गास लागतो. ज्याचे जे साध्य असेल त्याला तदनुरूप मार्ग दाखविणे आणि त्याच्या उन्नतींत त्यास शक्य ती मदत करणे इतकेंच आपले कर्तव्य आहे. त्याचे ध्येय चुकीचे असेल तर हळुहळु ती चूक त्याच्या लक्ष्यांत आणून दिली पाहिजे.<br> {{gap}}हिंदु महात्म्यांनी हे तत्व जाणल्यास आज फार काळ लोटून गेला आहे. या तत्वाची अंमलबजावणी करण्याकरितां त्यांनी निरनिराळे आश्रम कल्पून तदनुरूप आश्रमधर्माची योजना केली आहे. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम असे हे चार आश्रम आहेत.{{nop}}<noinclude></noinclude> t9aawh9m3it5gqigz6wrvuzchketxf2 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/92 104 63362 229115 156798 2026-04-11T10:36:03Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229115 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|६४ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>{{gap}}सर्वसामान्य मनुष्यजातीला उक्त असें जें आचरण असेल त्याशिवाय या प्रत्येक आश्रमास उचित असे निराळे धर्म हिंदुतत्वग्रंथांत सांगितलेले आहेत. यांतील पहिला ब्रह्मचर्याश्रम हा आहे. यानंतर लग्न होऊन मनुष्य संसार करूं लागला ह्मणजे पहिल्या आश्रमांतून निघून तो गृहस्थाश्रमांत प्रवेश करतो. यानंतर वृद्धापकाळी संसारांतून विरक्त झाल्यावर तो वानप्रस्थाश्रमी होतो व शेवटी सर्वसंगपरित्याग करून संन्यासाश्रमाचा तो स्वीकार करतो. या सर्व आश्रमांस निरनिराळे धर्म ह्मणजे कर्तव्ये सांगितलेली आहेत. यांपैकी अमुक आश्रम अमक्यापेक्षा मोठा असा मात्र भाव नाही. ब्रह्मचर्याश्रम आजन्म स्वीकार करून धर्मज्ञानदानाचे काम करणारा मनुष्य आणि लग्न करून गृहस्थाश्रमांत पडून त्या आश्रमास अनुरूप अशा धर्माने वागणारा मनुष्य हे आध्यात्मिक दृष्टया सारख्याच योग्यतेचे आहेत. फार काय सांगावें, पण स्वधर्मरत असणारा रस्त्यांतील झाडूवाला आणि स्वधर्मपरायण तक्ताधिपति यांचीहि योग्यता आध्यात्मिकदृष्टीने अगदी एकसारखीच आहे. क्षणभर झाडूवाल्याला राजा केले आणि राजाला झाडूवाल्याचे काम सांगितले तर काय मौज होईल याची तुझीच कल्पना करा. कोणी त्यागी होऊन अरण्यांत जाऊन राहिला ह्मणून तो संसारी मनुष्यापेक्षा मोठा होतो असें नाही. वास्तविक विचार केला तर संसारांत स्वधर्मरत राहून परमेश्वराची उपासना करणे हे अरण्यवासाहून अधिक कठिण आहे. पूर्वीचे चार आश्रम सांप्रत नष्ट होऊन त्यांच्या जागी सध्या दोनच आश्रम मुख्यत्वे करून आढळतात. एक गृहस्थाश्रम आणि दुसरा संन्यासाश्रम. गृहस्थाश्रमी मनुष्याने संसारी होऊन लौकिक आचार पाळावे व ईशचिंतन करावें. संन्याशाने केवळ धर्मपरायण राहून परमेशचिंतन करावें, आणि लोकांस धर्ममार्ग दाखवावा. महानिर्वाणतंत्रांतील कांहीं वचने मी तुह्मांस सांगतों ह्मणजे गृहस्थाश्रमाचे धर्म तंतोतंत पाळणे हे किती दुष्कर आहे याची तुह्मांस कल्पना येईल.<br> {{gap}}प्रत्येक गृहस्थाने परमेशचिंतन करित असावें. परमेश्वरप्राप्ति हेच साध्य त्याच्या नजरेसमोर सदोदित असावें; असें आहे तरी त्याने नित्यकर्मात कधी अंतर पडू देऊ नये. कर्म करणें तें फलाशेसाठी न करता केवळ कर्तव्य ह्मणून करावें.<br> {{gap}}या जगांत कर्म करीत असतां फलाची यत्किंचिहि अपेक्षा न बाळगणे हे किती दुष्कर आहे याचा अनुभवच घेतला पाहिजे. एखाद्याला मदत करून नुसत्या कृतज्ञतादर्शक शब्दांचीहि अपेक्षा न करणे, तसेंच एखादें कृत्य करून कीर्ति आपल्या पाठीमागून येत आहे की काय, हे कळण्यासाठी नुसते मागे<noinclude></noinclude> kxcisl1hgv9s18bqxjte9bvi919tcas पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/93 104 63363 229116 156799 2026-04-11T10:40:13Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229116 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|६५ }} {{rule}}</noinclude>वळूनहि न पाहणे हे खरोखर असिधाराव्रतच आहे यांत संदेह नाही. जगाचा स्तुतिपाठ ऐकून एखाद्या क्लीबाचे बंदहि तटातट तुटतील. जगांत आपलें नांव राहील अशी आशा दिसली तर एखादा यःकश्चित मनुष्यहि प्रसंगी मोठी कृति करील! कीर्तीची प्रचंड लालसा मानवी हृदयांत आहे. ती लालसा निखालस नष्ट करून जगाच्या स्तुतीची यत्किचितहि पर्वा न करतां लोकांचे बरे करण्यासाठी सदोदित झटावयाचे हे कर्म सोपें ह्मणतां येईल काय? वास्तविक विचार केला तर हा यज्ञ सर्व यज्ञांत मोठा आहे. आपला व आपल्या कुटुंबियांचा चरितार्थ चालविण्याकरितां धनसंपादन करावयाचे हे गृहस्थाश्रमधर्माचें एक कर्तव्यच आहे; परंतु खोटे बोलून, कोणास फसवून अथवा चोरून धनसंपादन करता कामा नये. परमेश्वर आणि गरीब मनुष्ये यांच्या सेवेकरितांच आपलें जीवित आहे ही गोष्ट गृहस्थाने नित्य लक्ष्यांत बाळगिली पाहिजे.<br> {{gap}}आपली मातापितरें ही प्रत्यक्ष परमेश्वराची स्वरूपे आहेत असे समजून गृहस्थाने त्यांना सदोदित संतोष होईल असें वागले पाहिजे. मातापितरांचा संतोष तोच परमेश्वराचा संतोष होय. आपल्या मातापितरांस एकहि कटु शब्द जो चुकूनसुद्धां बोलत नाही तोच खरा सुपुत्र होय.<br> {{gap}}थट्टेचा अगर फाजील शब्द मातापितरांदेखत उच्चारूं नये, अधीरपणा दाखवू नये अथवा क्रोध येऊ देऊ नये. मातापितरांस नमन करून त्यांच्या समोर उभे राहावें व बसण्याबद्दल त्यांची आज्ञा झाल्यावांचून बसू नये.<br> {{gap}}आपली मातापितरें, आपली मुलेंलेंकरें व आपली धर्मपत्नी यांच्या अन्नवस्त्राची प्रथम तरतूद केल्याशिवाय त्या पदार्थाचा जो गृहस्थ उपभोग घेतो तो पातकी समजावा. मातापितरें या देहाच्या उत्पत्तीचे कारण असल्यामुळे कितीहि कष्ट पडले तरी ते सोसून त्यांस संतोष देणे हा पुत्रधर्म आहे.<br> {{gap}}आपल्या धर्मपत्नीस कठोर शब्दांनी गृहस्थाने ताडन करूं नये, व आपल्या मातेप्रमाणेच तिची चांगली तरतूद ठेवावी. आपणास कितीहि त्रास पडत असला अथवा कष्ट सोसावे लागत असले तरी तिच्या देखत त्रासिक मुद्रा धारण करूं नये अथवा क्रोधाचा शब्द उच्चारूं नये.<br> {{gap}}आपल्या पत्नीवांचून इतर स्त्रीबद्दल मनाने देखील व्यभिचार घडला तर असा गृहस्थ दारुण नरकवासाचा धनी होतो.<br> {{gap}}कोणत्याहि स्त्रीसमक्ष अनुचित शब्द गृहस्थाने उच्चारूं नये; आणि आत्मश्लाघा करूं नये.{{nop}}<noinclude><br>{{gap}}स्वा. वि. ५</noinclude> 0is36tiagyj137msoz6qnoeg5motht4 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/94 104 63364 229117 156800 2026-04-11T10:51:16Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229117 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|६६ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>{{gap}}द्रव्य, कपडे, प्रेम आणि अमृतोपम भाषण यांनी आपल्या पत्नीस सदोदित तुष्ट करित असावें. तिच्या शांततेचा भंग होईल असे कोणतेंहि कृत्य करूं नये. ज्याला सुशील धर्मपत्नीचे प्रेम संपादितां आलें त्याने धर्मार्थकाममोक्षादि चारी पुरुषार्थ संपादिले असे समजावें. आपल्या मुळांबाळांसंबंधी वर्तणुकीचे नियम सांगितले आहेत ते असे:-<br> {{gap}}पुत्र चार वर्षांचा होईपर्यंत त्याचे प्रेमाने लालनपालन करावे. सोळावर्षीचा होईपर्यंत त्याला शिक्षण द्यावें. ता वीस वर्षांचा झाल्यानंतर त्यास उद्योगधंद्यास लावावे. नंतर त्याशी मित्राप्रमाणे प्रेमाने वागावें. याचप्रमाणे कन्येलाहि काळजीपूर्वक शिक्षण द्यावें, व तिच्या विवाहप्रसंगी तिला वस्त्रे भूषणे द्यावी.<br> {{gap}}आपले बंधु, आपल्या भगिनी आणि त्यांची मुले, तसेच इतर बांधव व चाकरनोकर यांसंबंधीहि विशिष्ट कर्तव्यांचा निर्देश केलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्या मदतीची अपेक्षा करणारांस गृहस्थाने योग्य मदत करावी. जवळ पैसा असतां जो गृहस्थ गरीबगुरिबांस मदत करित नाही तो पशुवृत्तीचा समजावा. खरोखर तो मनुष्यच नव्हे.<br> {{gap}}स्वतःच्या शरीरावरील वस्त्रप्रावरण व स्वतःचे शरीर यांवर गृहस्थाने अतिप्रेम ठेवू नये. केंस तुळतुळीत राखण्याचा हव्यास गृहस्थास नसावा. अंतःकरणाने पवित्र व देहाने स्वच्छ राहावें; तसेंच त्याने उद्योगप्रिय आणि उद्योगरतं असावें.<br> {{gap}}आपल्या शत्रूंशी निकराने सामना करावा. शत्रूचा प्रतिकार करणें हें गृहस्थाचे कर्तव्यच आहे. त्याने कोपऱ्यांत बसून अप्रतिकाराचे रडगाणे गाऊं नये. शत्रूला पाठ दाखविणारा गृहस्थ स्वकर्तव्यभ्रष्ट होतो. आपले मित्र आणि आप्त यांशी अत्यंत लीनतेने राहावें.<br> {{gap}}दुष्टांपुढे न वांकणे हे गृहस्थाचे कर्तव्य आहे. दुष्टांपुढे मान वांकविणारा गृहस्थ जगांतील दुष्टपणा वाढविण्यास पर्यायाने कारण होतो. तसेंच जे मानार्ह असतील त्यांस मान द्यावा. मित्रांशी उच्छृंखल वर्तन करूं नये. मित्र करण्यासाठी जिकडेतिकडे फिरूं नये. आपल्या परिचितांपैकी आपल्या कसाला कोणी उतरला असेल तेवढ्यासच मित्र ह्मणावें.<br> {{gap}}स्वतःच्या सत्कृत्याचा स्वतः उच्चार करूं नये. आपल्या सामर्थ्यांची स्वतः टिमकी वाजवू नये. स्वतःच्या संपत्तीबद्दल बोलू नये. तसेच कोणाचा रहस्यस्फोट करूं नये.{{nop}}<noinclude></noinclude> nnseul1pgnklg0joz3ja8uksrg211ow पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/95 104 63365 229118 156801 2026-04-11T10:56:44Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229118 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|६७ }} {{rule}}</noinclude>{{gap}}'मी गरीब आहे, अनाथ आहे,' असें गृहस्थाने कधीहि म्हणूं नये. तसेच 'मी संपत्तिमान् आहे' असाहि उच्चार करूं नये. विहिताविहिताचा स्वतःशी विचार करून जें करणें तें करावें; दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिऊ नये. याप्रमाणे न वागणारा गृहस्थाश्रमी अनीतिमान् ह्मणविला जातो.<br> {{gap}}प्रत्येक गृहस्थाश्रमी मनुष्य समाजाच्या आधारस्तंभांपैकी एक मानला जातो. गरीब आणि अशक्त माणसें, मुलें व स्त्रिया इत्यादिकांचा तो पोषणकर्ता आहे. इतक्यांच्या पोषणाचा भार उचलण्याचे सामर्थ्य त्याच्या अंगी पाहिजे. आणि हे सामर्थ्य सदोदित वाढतें राहिले पाहिजे. याकरिता प्रसंगी त्याच्या हातून चूक झाली तरी तिजबद्दल सर्वांसमक्ष त्याने काही बोलू नये. अशा रीतीने त्याने स्वतःस उणेपणा आणला तर त्यामुळे त्याच्या ठिकाणी हृदयदौर्बल्य उत्पन्न होण्याचा संभव असतो. दुर्बळ मनुष्याकडून आश्रमधर्म पाळण्याचे काम बरोबर होणार नाही. तसेंच वित्त आणि ज्ञान यांच्या प्राप्तीसाठी त्याने खटपट केली पाहिजे. ही मिळविणे हे त्याचे कर्तव्यच आहे. तें तो न करील तर तो गृहस्थाश्रमास नालायक ठरेल. पैशाकरितां मेहनत न करणारा गृहस्थ अनीतिमान् आहे. जो आळशी आहे आणि आळसांत आयुष्य घालविणे ज्याला आवडतें तो गृहस्थाश्रमी मनुष्य अनीतिमान् समजावा. तो श्रीमान् झाला तर शेंकडों लोकांच्या उपयोगी पडतो. तुमच्या या शहरांत शेकडों लोकांनी श्रीमंत होण्याचा जर प्रयत्न केला नसता, तर येथे दिसणारी ही सदावर्ते आणि इतर लोकोपयोगी कृत्ये कधी तरी नजरेस पडती काय? परोपकारी लागणारा पैसा मिळविण्यासाठी श्रम करणे हा गहस्थाचा धर्मच आहे. कारण जेथून सर्व लोकोपयोगी कार्यास मदत होते असें मध्यवर्ति ठिकाण ह्मणचे गृहस्थाचें घरच होय. नीतीने पैसा मिळवून तो परोपकारार्थ खर्च करणाऱ्या मनुष्याची योग्यता ससंगपरित्याग करून परमेश्वरप्राप्तीसाठी तप करणाऱ्या योग्याहून तिळभरहि कमी नाही. योग्यांत आढळून येणारा आत्मत्याग आणि परोपकारार्थ पैसा खर्च करणाऱ्या गृहस्थाचा आत्मत्याग यांत काय फरक आहे ?<br> {{gap}}आपली कीर्ति वाढविण्याची खटपट योग्य मार्गाने करणे हा गृहस्थाचा धर्म आहे. गृहस्थाने जुगार खेळू नये, दुष्टांच्या संगतीत राहूं नये, मिथ्या भाषण करूं नये, आणि दुसऱ्यास त्रास होईल असे कोणतेंहि काम करूं नये.<br> {{gap}}एखादी गोष्ट आपल्या हातून होण्यासारखी नसली तरी ती करावयाची हांव पुष्कळांस असते. अशा प्रकारची एखादी गोष्ट करावयास ते आरंभ करितात;<noinclude></noinclude> ndo8hms2vqhpe03l6gumlnj4m5yo0mx पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/96 104 63366 229119 157718 2026-04-11T11:03:12Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229119 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|६८ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>व तिच्या पूर्ततेसाठी दुसऱ्या कोणास तरी फसवून आपला कार्यभाग साधतात. त्याचप्रमाणे कोणतीहि गोष्ट करतांना युक्तायुक्ततेचा विचार अवश्य केला पाहिजे. एखादेवेळी जी एक गोष्ट करणे युक्त असेल तीच गोष्ट दुसऱ्या प्रसंगी अयुक्त ठरण्याजोगी असेल.<br> {{gap}}परक्याशी भाषण करतांना तें अनुद्वेगकर, सत्य, प्रिय आणि हितकर असें असावें. परक्याच्या कामाविषयीं गृहस्थाने चर्चा करीत बसू नये.<br> {{gap}}तळी व विहरी खणणारा, रस्त्याच्या बाजूस वृक्ष लावणारा, धर्मशाळा बांधणारा, आणि रस्ते व पूल बांधणारा गृहस्थ, योगमार्गाने प्राप्त होणाऱ्या लोकी जातो.<br> {{gap}}याप्रमाणे गृहस्थाश्रमधर्मापैकी एका बाजूचें निरूपण केले आहे. तसेंच आपल्या देशासाठी व धर्मासाठी धारातीर्थी देह ठेवणारा गृहस्थ ध्यानी योग्याच्या गतीस जातो, असेंहि ह्मटले आहे.<br> {{gap}}या एकंदर निरूपणाचा मथितार्थ असा आहे, की, प्रत्येकाने आपापल्या आश्रमधर्माप्रमाणे वागावें. तसेंच योग्य आश्रमधर्म आस्थेने आचरणाऱ्या सर्व मनुष्यांची योग्यता सारखीच आहे. आपापल्या परिस्थितीप्रमाणे प्राप्त होणारी कर्तव्ये आचरणे हेच धर्माचे रहस्य आहे.<br> {{gap}}याप्रमाणे सर्व आश्रमधर्माचे निरूपण पाहिले तर सर्वात प्रमुखत्वाने आढळणारे असें एकच तत्व आहे. मनोदौर्बल्य नाहीसे करणे हेच मुख्यतः धर्माचें कार्य आहे असे विचारा अंती दिसून येईल. आश्रमधर्म म्हटला की, मग तो गृहस्थाचा असो अथवा संन्याशाचा असो, पहिली बाब मनोदौर्बल्य नाहीसे करणे हीच आहे. आपण सर्व वेद पाहिले तर ही हृदयदौर्बल्यत्यागाची कल्पना चोहोंकडे व्यापून राहिली आहे, असें आपणांस आढळून येईल. भीति ही दौर्बल्याची सूचक अशी वृत्ति आहे. जग काय ह्मणतें, मला कोणी हंसते की काय, असल्या क्षुद्र विचारांस थारा न देतां स्वतःला योग्य वाटेल तें कर्म नित्य आचरणे हे सर्व जीविताचे रहस्य आहे.<br> {{gap}}कोणी एखादा वनवासी होऊन राहिला तर जगांतील संसारी लोक पापी आणि अभक्त असें त्याने स्वतःस वाढू देऊ नये. तसेंच संसारी लोकांनी त्यागी मनुष्य ह्मणजे निरुद्योगी व परान्नपुष्ट आहे असें ह्मणू नये. जो कोणी स्वीकृत तत्वाचा कोणासही न भितां आचार करित असेल तो मोठाच आहे. याबद्दल एक गोष्ट सांगतो; ह्मणजे तिजवरून या तत्वाचे मर्म आपल्या ध्यानी येईल.{{nop}}<noinclude></noinclude> sjzo6ygek4vvwclhekikd36wvm5vkn9 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/97 104 63367 229120 157719 2026-04-11T11:08:57Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229120 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|६९ }} {{rule}}</noinclude>{{gap}}एका शहरी एक राजा होता. तेथे कोणी संन्यासी आला की राजाने त्याला बोलावून आणून प्रश्न करावा की “यति महाराज, संसारी मोठा की संन्यासी मोठा?" यावर अनेकांकडून अनेक प्रकारची उत्तरे येत असत. कोणी ह्मणत की संन्यासी मोठा; परंतु त्यांचे ह्मणणे त्यांना सप्रमाण सिद्ध करतां न आले ह्मणजे राजाने त्यांस लग्न करून संसारी होण्याचा हुकुम करावा.<br> {{gap}}असें होता होतां एके दिवशी एक संन्यासी त्या शहरी आला असतां राजाने त्यास बोलावून आणून हाच प्रश्न विचारला. तेव्हां संन्यासी ह्मणाला, “राजा, अमुक एक आश्रम मोठा असें नाही. जो कोणी स्वीकृत आश्रमधर्म पाळतो तो मोठा.” राजा ह्मणाला, “आपण ह्मणतां या गोष्टीची सत्यता प्रत्यक्ष प्रमाणाने आपण मला पटवून दिली पाहिजे.” राजाचे हे बोलणे यतीने कबूल करून राजासह तो त्या नगरांतून बाहेर पडला.<br> {{gap}}याप्रमाणे फिरतांफिरतां ते दुसऱ्या एका मोठ्या राजाच्या नगरांत गेले. तेथे जिकडेतिकडे गर्दी उडून गेली होती. तासे, तर्फे आणि ढोल मोठमोठ्याने वाजत होते. त्या दिवशी तेथील राजकन्येचा स्वयंवरसमारंभ होता. मंडपांत उंची पोषाक करून हजारों प्रजाजन जमले होते. हे कौतुक पाहण्यासाठी आपला राजा व यति हेहि तेथेच उभे राहिले. याप्रमाणे स्वयंवर करण्याची चाल पुरातनकाळी आर्यावर्तात होती. प्रत्येक राजकन्या आपल्या पसंतीप्रमाणे वराची निवड करीत असे. कोणी राजकन्या उत्तम रूपावर लुब्ध होत असे, तर दुसरी एखादी अप्रतिम शौर्याची चहाती असे. आसपासचे सर्व राजपुत्र अशा समारंभास यावयाचे व त्यांतून एकाला कन्येने आपल्या पसंतीने वरावयाचे, अशी पद्धत होती. राजकन्येला तिची सखी प्रत्येक राजपुत्राचे गुण सांगत तिच्याबरोबर फिरत असे. असें होता होतां जो राजपुत्र कन्येच्या पसंतीस उतरे त्याला ती माळ घालीत असे.<br> {{gap}}आपला राजा व यति ज्या नगरांत आले होते तेथील राजकन्या अप्रतिम लावण्यवती होती. तसेच त्या राजास पुत्रसंतान नसल्यामुळे राजाच्या पाठीमागे सर्व राज्यहि त्याच्या जावयासच मिळावयाचे होते. ही राजकन्या अप्रतिम रूपाची चहाती असल्यामुळे आपला पति अतुल सौंदर्यवान् असावा अशी तिची इच्छा होती. हजारों लोक व देशोदेशचे राजपुत्र त्या ठिकाणी जमले होते. राजकन्या त्या सभामंडळींत सखीसह फिरूं लागली. कित्येक राजपुत्रांस व इतरांस तिने पाहिले परंतु कोणीच तिच्या पसंतीस उतरेना. मोठ्या आशेने जम-<noinclude></noinclude> 00ygfl61cj8n1rf7m5b0enkjxx0yh3s