विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.46.0-wmf.23
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
पान:Gangajal cropped.pdf/83
104
20754
229234
75094
2026-04-13T15:31:21Z
कल्पनाशक्ती
3813
229234
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Svnavare" /></noinclude>

{{block center|'''अकरा :'''
{{x-larger|'''लोक आत्मचरित्र का लिहितात?'''}}}}

{{gap}}आपल्या स्वतःबद्दल लिहावेसे वाटणे हे म्हातारपणाचे लक्षण आहे. मला
वाटते, मी पाहिलेली आत्मचरित्रे, आठवणी सर्व म्हाताऱ्यांनीच लिहिलेली
आहेत. तरुण माणसांनीही क्वचित स्वतःबद्दल लिहिले आहे, पण ते स्वतःचे
एखादे कृत्य वा भूमिका ह्यांच्या समर्थनासाठी आहे. “मी माझा धर्म का
सोडला?" “मला कम्युनिझमचा वा भांडवलशाहीचा कंटाळा का आला?"-
अशासारखी ती आत्मनिवेदने आहेत. स्वतःच्या आयुष्यावरच आधारलेल्या
एखाद्या प्रसंगाचे चित्रण, नाटक, कादंबरी, कथा वा काव्य ह्या रूपानेही ती
आपल्यापुढे आलेली आहेत. पण त्यांतही चितारलेल्या स्वानुभवातील 'मी'
नाहीसा होऊन त्या 'मी' चे एक सर्वात्मक प्रतीक बनते. अशा तऱ्हेच्या
वाङमयातील आनंद, दुःख, त्वेष ही अमक्या-एका कालातील, अमक्या-एका
ठिकाणी असलेल्या अमक्या-एका व्यक्तीची न राहता तशा तऱ्हेच्या प्रसंगातील
कोणाचीही बनतात. असे झाले असते, तर आपल्यालाही असेच वाटले असते,
अशी भावना तशा प्रसंगातून न गेलेल्या व्यक्तींनासुद्धा निर्माण होते. थोड्याफार
फरकाने सर्वच वाङमयाबद्दल असे म्हणता येईल. पण आत्मकथा व्यक्तिगत
राहते; ज्या गोष्टी आपण आपल्या मित्रांजवळ बोलू, त्या सर्वांजवळ बोलल्या
जातात. हे म्हातारपणाचेच लक्षण नाही का?
{{gap}}माझे एक मित्र काही दिवस 'आत्मचरित्र' म्हणजे काय व लोक ते का
लिहितात, ह्याबद्दल सारखी चर्चा करीत होते. त्यांनीही आत्मचरित्र लिहिले
होते. ते का, हे त्यांनी सांगितले नाही. मीही विचारिले नाही. पण त्यांचे
आत्मनिवेदन काही थोडे प्रसंग वगळल्यास प्रसंगनिष्ठ व वस्तुनिष्ठ झालेले<noinclude></noinclude>
n34dwbu7qe7dajwpabkh6k996fxyxio
पान:Gangajal cropped.pdf/84
104
20755
229235
75098
2026-04-13T15:34:37Z
कल्पनाशक्ती
3813
229235
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Svnavare" />{{right|गंगाजल / ९१}}</noinclude>होते. 'आत्मा' एका समाजातील, एका कालातील सुशिक्षित माणसाचे
प्रतीक होता. त्यातील 'व्यक्ती' सापडत नव्हती. ते माझ्या मामंजींना
विचारीत होते, “अण्णा, तुम्ही आत्मचरित्र का लिहिले?' अण्णांचे उत्तर
त्यांच्या स्वभावाला धरून होते. ते म्हणाले, “पुढील लोकांना मार्गदर्शन
व्हावे, ही माझी इच्छा," परत मी प्रश्न विचारिला, “चार पाउले उमटवु
आपुली ठेवु खुणेचा मार्ग बरा' अशा अर्थाने का?" ते म्हणाले, “होय.” हा
हेतू म्हणजे म्हातारपणाची बडबड खासच नाही. कार्य काय, अकार्य काय,
चांगले काय, वाईट काय, ह्याबद्दल ज्यांचे विचार पक्के आहेत, कसोटीचा
प्रसंग आला असता धीर करून ज्यांनी आपले विचार आचरणात आणिले व
ज्याच्या मनात स्वतःबद्दल कधी शंका आली नाही, अशा एका माणसाचे हे
उद्गार होते. बेंजामिन फ्रैंकलिनचे आत्मचरित्र असेच असणार. फार काय,
अचाट कार्य करणाऱ्या चर्चिलचे आत्मचरित्र, त्याचा तितकाच अचाट शत्रू
जो हिटलर त्याचेही आत्मनिवेदन ह्याच तऱ्हेचे. प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वामुळे,
कार्याच्या व्याप्तीमुळे व लिहिण्याच्या शैलीमुळे त्यांत फरक आहे, जमीन-
अस्मानाचा वाटावा, इतका फरक आहे; पण त्या निवेदनाच्या मागची
भूमिका सारखीच. हेही एक प्रकारे आत्मसमर्थनच आहे; पण त्याच्या
बुडाशी स्वतःबद्दलची म्हणजे स्वतःच्या कृत्यांच्या, व मतांच्या सर्वथैव
योग्यतेची खात्री आहे.
{{gap}}मी ज्या आत्मनिवेदनाबद्दल बोलते आहे, ते ह्या प्रकारचे नव्हे. ते एक
निवेदन असते, -अगदी स्वतःबद्दलचे निवेदन असते. त्याच्या पाठीमागे काही
मोठा हेतू नसतो. आपले सांगावेसे वाटते, बोलावेसे वाटते, म्हणून बोललेले
असते. त्या बोलण्यात नेहमीच्या बोलण्याप्रमाणेच खूपसे लपविलेले असते;
पण बरचसे लपविलेले निसटून बाहेर पडतेच. स्वतःबद्दलचे खूपसे सांगितलेले
असते; पण म्हातारपणीच असे का सांगावेसे वाटते?
{{gap}}सर्वच म्हातारी माणसे खूपच बडबडतात. त्यातली काही साक्षर
असतात. साक्षरांतल्या काहींना आपली बडबड कागदावर उतरवायला वेळ
असतो. ही बडबड छापून काढणारे काही आढळतात. कारण अशी
कागदावर उतरलेली, स्वतःच्या घरच्या नसलेल्या म्हाताऱ्याची वटवट
ऐकायला काही रिमाटेकड्या लोकांना वेळ असतो.
{{gap}}सगळे खरे, पण रिकामा वेळ असला म्हणून तरी स्वतःबद्दल लिहावेसे
का वाटावे? तरुणपणी का वाटत नाही? म्हातारपणीच का वाटावे?{{nop}}<noinclude></noinclude>
5ognuq3caibau4h0gj1xwqu5vqj5n2z
229236
229235
2026-04-13T15:35:05Z
कल्पनाशक्ती
3813
/* Proofread */
229236
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Svnavare" />{{right|गंगाजल / ९१}}</noinclude>होते. 'आत्मा' एका समाजातील, एका कालातील सुशिक्षित माणसाचे प्रतीक होता. त्यातील 'व्यक्ती' सापडत नव्हती. ते माझ्या मामंजींना विचारीत होते, "अण्णा, तुम्ही आत्मचरित्र का लिहिले?' अण्णांचे उत्तर त्यांच्या स्वभावाला धरून होते. ते म्हणाले, "पुढील लोकांना मार्गदर्शन व्हावे, ही माझी इच्छा," परत मी प्रश्न विचारिला, "चार पाउले उमटवु आपुली ठेवु खुणेचा मार्ग बरा' अशा अर्थाने का?" ते म्हणाले, "होय." हा हेतू म्हणजे म्हातारपणाची बडबड खासच नाही. कार्य काय, अकार्य काय, चांगले काय, वाईट काय, ह्याबद्दल ज्यांचे विचार पक्के आहेत, कसोटीचा प्रसंग आला असता धीर करून ज्यांनी आपले विचार आचरणात आणिले व ज्याच्या मनात स्वतःबद्दल कधी शंका आली नाही, अशा एका माणसाचे हे उद्गार होते. बेंजामिन फ्रैंकलिनचे आत्मचरित्र असेच असणार. फार काय, अचाट कार्य करणाऱ्या चर्चिलचे आत्मचरित्र, त्याचा तितकाच अचाट शत्रू जो हिटलर त्याचेही आत्मनिवेदन ह्याच तऱ्हेचे. प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वामुळे, कार्याच्या व्याप्तीमुळे व लिहिण्याच्या शैलीमुळे त्यांत फरक आहे, जमीन- अस्मानाचा वाटावा, इतका फरक आहे; पण त्या निवेदनाच्या मागची भूमिका सारखीच. हेही एक प्रकारे आत्मसमर्थनच आहे; पण त्याच्या बुडाशी स्वतःबद्दलची म्हणजे स्वतःच्या कृत्यांच्या, व मतांच्या सर्वथैव योग्यतेची खात्री आहे.
{{gap}}मी ज्या आत्मनिवेदनाबद्दल बोलते आहे, ते ह्या प्रकारचे नव्हे. ते एक निवेदन असते, -अगदी स्वतःबद्दलचे निवेदन असते. त्याच्या पाठीमागे काही मोठा हेतू नसतो. आपले सांगावेसे वाटते, बोलावेसे वाटते, म्हणून बोललेले असते. त्या बोलण्यात नेहमीच्या बोलण्याप्रमाणेच खूपसे लपविलेले असते; पण बरचसे लपविलेले निसटून बाहेर पडतेच. स्वतःबद्दलचे खूपसे सांगितलेले असते; पण म्हातारपणीच असे का सांगावेसे वाटते?
{{gap}}सर्वच म्हातारी माणसे खूपच बडबडतात. त्यातली काही साक्षर असतात. साक्षरांतल्या काहींना आपली बडबड कागदावर उतरवायला वेळ असतो. ही बडबड छापून काढणारे काही आढळतात. कारण अशी कागदावर उतरलेली, स्वतःच्या घरच्या नसलेल्या म्हाताऱ्याची वटवट ऐकायला काही रिमाटेकड्या लोकांना वेळ असतो.
{{gap}}सगळे खरे, पण रिकामा वेळ असला म्हणून तरी स्वतःबद्दल लिहावेसे का वाटावे? तरुणपणी का वाटत नाही? म्हातारपणीच का वाटावे? {{nop}}<noinclude></noinclude>
8i724rm9ia2psn8fr7n01hojnmjj56c
पान:Gangajal cropped.pdf/88
104
20759
229237
75118
2026-04-13T15:37:39Z
कल्पनाशक्ती
3813
229237
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Svnavare" />{{right|गंगाजल / ९५}}</noinclude>संबंधाने दोन अंगांनी होतो, तसा लोपही दोन अंगांनी होत असतो. ज्यांमुळे
स्वत्वाची जाणीव झाली, त्यांना आतून आत्मा विसरत असतो. बाहेरून इतर
लोक त्या व्यक्तीला विसरत असतात. एखादी महान व्यक्तीसुद्धा एक पुसट
आठवण म्हणून राहते. माझ्या मामंजींना 'भारतरत्न' ही पदवी मिळाली, त्याचे
दिल्लीहून मुंबईला पत्र आले व 'मालक सापडत नाही,' ह्या शेऱ्यानिशी परत
गेले. हा प्रसंग मी विसरूच शकत नाही. शाळेतल्या पुस्तकांतून ज्याच्याबद्दल
धडा येतो, असा हा गृहस्थ जिवंतपणी बऱ्याच जणांना फक्त नाममात्रच झाला
होता,- तोसुद्धा मुंबईत! त्यांनी तरुणपणी विधवाविवाह केला; त्यांच्याबद्दल
पुणे-मुंबईच्या वर्तमानपत्रांनी उलट-सुलट टीका केली; गावाने त्यांना वाळीत
टाकिले. त्या वेळी त्यांचे व्यक्तिमत्त्व उत्कट होते. ते कोणाचेतरी, कशाचेतरी
विरोधक होते. ते कोणत्यातरी व्यवहाराचे हिरीरीने मंडन करीत होते. शेवटी ते
जगाला विसरले होते: जग त्यांना विसरले होते. ह्याच अर्थाने व्यक्तिमत्त्वाचा
लोप होतो, असे मी म्हटले. प्रेम आणि राग, मैत्री आणि विरोध, आपुलकी
आणि दुरावा-अगदी त्रयस्थपणासुद्धा- अशा अनेक व्यवहारातूनच माझा
अमुकपणा निर्माण होतो. निरनिराळ्या व्यक्तींना मी निरनिराळी असते, माझी
भूमिकाही प्रत्येकाशी निरनिराळी असते. वयाप्रमाणे हा व्यवहार कमी होतो. जी
अगदी जवळची असतात. ती मेलेली तरी असतात किंवा दूर तरी गेलेली
असतात. कृतीमागील व विचारामागील तारुण्यातील उत्कटता नाहीशी होऊन
फक्त आचाराच्या व विचाराच्या सवयी तेवढ्या राहिलेल्या असतात. संध्येच्या
दाट छाया सबंध दिवसभर पडलेल्या असतात. सर्वस्वी नाहीसे होण्याच्या
काळोखात जाण्याची वेळ आलेली असते, आणि अगदी ह्याचमुळे
आत्मनिवेदनाची उबळ येते.
{{gap}}'खुणेचा मार्ग' मागे ठेवून पुढच्या पिढीला वाट दाखवावयाची ह्या
विचारामागेसुद्धा बऱ्याच अंशी वरील भावना असते. स्वत:ची 'खूण' ठेवायची
धडपड असते. सर्व 'अमुकपणा'. सर्व 'मीपणा' नाहीसा होणार, अजिबात
जाणार हे कळते, आणि जन्मभर ज्याने सोबत केली तो मीपणा टिकावा,
ज्यांच्यामुळे हे व्यक्तिमत्त्व मिळाले त्यांच्या स्मृतीत काही दिवस घर करून
राहावे, म्हणून धडपड चालते. कोणी बोलत राहतात, कोणी फोटो काढतात,
कोणी आपली बडबड कागदावर उतरवितात. "मी अमुक-अमुक आहे.-
इथेच आहे,- अगदी तुमच्यातच आहे," असा तो आक्रोश असतो.
{{right|१९६८}}{{nop}}<noinclude></noinclude>
10yhlqjd6eegoypz3rblg3ojpbpnvws
पान:Gangajal cropped.pdf/89
104
20760
229238
75122
2026-04-13T15:39:28Z
कल्पनाशक्ती
3813
229238
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Svnavare" /></noinclude>

{{block center|'''बारा :'''
{{x-larger|'''किंकाळी'''}}}}
{{gap}}चित्राचं नाव काय असावं, नक्की आठवत नाही. बहुधा 'द क्राय!
'किंकाळी' - असावंसं वाटतं. चित्रकाराचंही नाव आठवत नाही. आठवतं ते
फक्त चित्र आणि दरवेळी आठवलं म्हणजे भीतीनं अंग शहारतं. चित्र अगदी
साधं- फक्त काळपांढरं. एक बाई, तीही अगदी साधी. अतिरेखीव नाही,
विकृत तर नाहीच नाही. तिनं किंकाळी मारताना तोंड उघडलं आहे, एवढंच
चित्र. पण पहिल्या क्षणापासून आतापर्यंत चित्र डोळ्यांपुढं आलं की, ती
किंकाळी ऐकू येते. तो एकाकी असहायपणा, सगळं संपलं, अशी अगतिक
जाणीव चित्र पाहताना जी झाली, ती आजही होत आहे.
{{gap}}आणखी एक किंकाळी सारखी आठवते,- मनात घर करून राहिली
आहे- ती म्हणजे काम्यूच्या 'फॉल' नावाच्या कादंबरीतील. ह्या
कादंबरीतील सबंध कथानक एका किंकाळीभोवती गुंफिलेले आहे. ह्या
कादंबरीचा नायक एक तरुण, हुशार माणूस आहे. गरीबगुरीब माणसांचे
खटले कोर्टात चालवून, त्यांना न्याय मिळवून देणारा म्हणून त्यानं प्रसिद्धी
मिळविली होती. गरिबांचा कनवाळू म्हणून त्याचा सगळीकडे बोलबाला
झाला होता. त्याची ही कीर्ती चढत्या कमानीत होती. म्हातार्या-
कोताऱ्यांना तो मोठ्या आस्थेनं रस्ता ओलांडायला मदत करी. तोही
आपल्याला हुशार, लोकांत मानमान्यता पावलेला समजत असे. रस्त्यातून
जाताना, किंवा विशेषतः कोर्टाच्या आवारात, त्याला पाहिल्याबरोबर
खाली वाकून नमस्कार करणारे, त्याला दुवा देणारे, हा पहा तो अमका
अमका,' म्हणून त्याच्याकडे बोट दाखविणारे लोक खूपच होते. तो स्वतःही<noinclude></noinclude>
8j5xrb6jphqrpgwdm092box90hkm1xi
पान:Gangajal cropped.pdf/96
104
20767
229239
75214
2026-04-13T15:45:10Z
कल्पनाशक्ती
3813
229239
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Svnavare" /></noinclude>

{{block center|'''तेरा :'''
{{x-larger|'''उकल'''}}}}

{{gap}}कधीतरी काहीतरी कोडे पडलेलं असतं. तेही इतक्या मागं की,
आपल्याला एखादी गोष्ट कळली नाही ही गोष्टसुद्धा मन-जागृत मन-
विसरलेलं असतं आणि एकदम एखादे दिवशी अगदी भलत्याच संदर्भात
जुन्या आठवणी जाग्या होतात, मनाला डिवचतात व पुन्हा विचार करायला
लावतात. जुनी कोडी उलगडतात, कधीकधी पूर्णपणे, कधीकधी नवी कोडी
मनापुढे उभी करून.
{{gap}}ज्ञानदेवीच्या अठराव्या अध्यायाची सुरुवात म्हणजे शब्दांची कसरत
आहे. प्रत्येक शब्द समास आहे. त्या समासातील शब्दांचे अर्थ समजून सबंध
समास कळायचा, म्हणजे मन एकाग्र करून वाचावं लागतं. माझ्या
समजुतीपमाणे सर्व चित्त देऊन मी वाचीत होते. पण माझ्या मनाचा काही
भाग मला नकळत भटक्या मारीत असला पाहिजे. डोळे वाचीत होते.
"जन्मजराजलदजालप्रभंजन' मन एकदम म्हणालं, “मदन-एडका मदन."
मदन हा शब्द 'प्रभंजन' सारखाच आहे. प्रभंजन-भंग करणारा; तसेच, ‘मदन'
म्हणजे मद आणणारा, मदास असणारा, म्हणजेच मद आलेला. 'एडका
मदन" म्हणजे 'मद आलेला एडका' अठरावा अध्याय राहिला बाजूला
आणि जणू आता घडत आहे अशा प्रकारे पन्नास वर्षांपूर्वीच्या आठवणी
जागृत झाल्या. आजीच्या बरोबर मी रत्नागिरीच्या विठोबा-मंदिरात होते.
सभामंडपात भजन रंगात आलं होतं. सोनार मंडळींची दिंडी होती म्हणे.
एकजण गळ्यात पखवाज अडकवून वाजवीत होता. इतरांच्या गळ्यात झांजा
होत्या. सर्वजण अगदी रंगात येऊन भजन म्हणत होते व नाचत होते -<noinclude></noinclude>
8s0i7buozpuknzby26zixuaqwwryn38
पान:Gangajal cropped.pdf/98
104
20769
229240
75263
2026-04-13T15:49:30Z
कल्पनाशक्ती
3813
229240
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Svnavare" />{{right|गंगाजल / १०५}}</noinclude>रूपकं आहेत. तसंच हे एक. मदन म्हणजे एडकाच, व तो इतका मस्त की,
तो वाघाप्रमाणे सामर्थ्यवान. सबंध रूपकच देते. नाही तर दुसऱ्या कोणा
मनाला माझ्याप्रमाणे कोडं पडायचं.
{{gap}}एडका मदन तो केवळ पंचानन ॥ध्रु॥

{{gap}}धडक मारिली शंकरा । केला ब्रह्मयाचा मातेरा।

{{gap}}इन्द्रचन्द्रासी भेदरा । लाविला ज्यानं

{{gap}}तो केवळ ॥ध्रु.॥

{{gap}}धडक मारिली नारदा । केला रावणाचा चेंदा

{{gap}}दुर्योधना मारिली गदा । घेतला प्राण ।

{{gap}}तो केवळ ॥ध्रु.॥

{{gap}}भस्मासुर मुकला प्राणांसी । तेचि गती झाली वालीसी

{{gap}}विश्वामित्रासारिखा ऋषी । नाडिला ज्यानं

{{gap}}तो केवळ ॥ध्रु.॥

{{gap}}शुकदेवानें ध्यान धरूनी । एडका आणिला आकळोनी

{{gap}}एका जनार्दनाचे चरणी । बांधिला जेणें।

{{gap}}तो केवळ पंचानन ॥

{{gap}}मदनरूपी एडक्यानं सर्वांना लोळविलं. फक्त शुकानं त्याच्यावर मात
केली म्हणून शेवटच्या ओळीतलं 'पंचानन' हे विशेषण एडक्याला लागू
नसून शुकाचं समजण्यास हरकत नसावी. आता ह्या ओळीशी विठोबाचा
संबंध काय, हा दुसरा प्रश्न. त्याचं उत्तर माझ्या हातातच होतं.
'सकलसंतगाथे'त संतांची कविता होती,- मुख्यतः वैष्णव वारकरी संतांची
कविता होती. ह्या कवींच्या तोड्न जे- जे बाहेर पडलं, ते- ते सर्व थेट
विठोबाशी रुजू होतं, हा वारकऱ्यांचा दृढ विश्वास. शब्द काहीही असोत,
'हरि मुखे म्हणा' असोत. 'चंदनाची चोळी, माझे अंग अंग पोळी' असोत,
'विटंबिती रांडापोरें' असोत. 'नाम घेतां उठाउठी, होय संसाराची तुटी'
असोत वा 'एडका मदन' असोत. सर्व काही सारख्या प्रमाणात विठोबाच्या
चरणी रुजू होतं. दोन्ही प्रश्न एकदम सुटले.
{{gap}}ह्या एडक्याच्या आधीही आईनं मला एका कोड्यात टाकिलं होतं.
आम्ही त्या वेळी ब्रह्मदेशात होतो. वडील दर दोन वर्षांनी काहीतरी<noinclude></noinclude>
2byht0uuhi4ahmohenk5g65c9u6s3yu
पान:Gangajal cropped.pdf/99
104
20770
229241
75267
2026-04-13T15:52:45Z
कल्पनाशक्ती
3813
229241
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Svnavare" />१०६ / गंगाजल</noinclude>कामानिमित्त हिंदुस्थानात यायचे. परत जाताना तिकडे न मिळणाऱ्या
कितीतरी गोष्टी मुंबईहून व कलकत्त्याहून आणायचे. मुख्य जिन्नस असत
नव्या गाण्यांच्या तबकड्या. ते आले म्हणजे आम्ही दिवसभर त्या तबकड्या
लावून गाणी तोंडपाठ करीत असू; आणि मग दिवसभर आम्ही ती गाणी
म्हणत असू. 'नका टाकून जाउं, डावा डोळा पाण्याने माझा भरला' हे गाणं मी
घोळून-घोळून म्हणत होते. आईनं देवघरातून दरडाविलं, “माई, ते गाणं
म्हणायचं नाही." मी 'बरं' म्हटलं व थांबले. थोड्या वेळानं आई बाहेर
आली व तिनं एक धपाटा लगावला. “सांगितलं होतं ना ते गाणं म्हणायचं
नाही!” तेव्हा कुठं माझ्या लक्षात आलं की, मी पाटीवरील बेरीज
वजाबाक्या करिता-करिता अगदी अनवधानानं परत तेच मना केलेलं गाणं
म्हणत होते म्हणून. मोठ्या प्रयत्नानं मी ते गाणं मनातून काढून टाकिलं. पण
एक प्रश्न उरला होता, 'ते गाणं का म्हणायचं नाही?' आईला विचारावं, तर
ती रागावलेली. प्रश्न तसाच राहिला व पुढे मी विसरूनही गेले. नंतर
कितीतरी वर्षांनी मी पुण्यातच दुपारची बसायला म्हणून माहेरी आले होते.
रविवार असल्यामुळे सर्व मुलं घरीच होती. गाण्याच्या नव्या-जुन्या सगळ्या
तबकड्या लावावयाचा बूट निघाला. मी तिथं गप्पा मारीत बसले होते.
गाण्यांकडे विशेष लक्ष नव्हतं, पण एकदम 'नका टाकून जाउं' ही जुनी रेकॉर्ड
ऐकू आली. मी ते गाणं जवळजवळ विसरलेच होते. फक्त पहिली ओळ
आठवत होती. गप्पा थांबवून मी उत्सुकतेनं पुढं होऊन गाण्याचे शब्द ऐकू
लागले. 'नका टाकून जाउं डावा डोळा पाण्याने माझा भरला।तीन दिवस
झाले म्हणूनि तंटा हो माझ्याशी केला' वगैरे वगैरे शब्द. सगळ्या शब्दांचे
अर्थही लक्षात आले; एवढेच नव्हे, तर आईनं गाण्यास मनाई का केली,
अनवधानानं गाणं घोकून म्हणत असता धपाटा का मारिला, हेही उलगडलं.
गाणं जुनं झालं होतं. मुलांच्या तोंडी राहिलं नव्हतं. बऱ्याच जणांना जुनंपण
नवीन वाटलं. माझ्या लेकीनं मला हलवून विचारिलं, “म्हणजे काय गं?"
“अग, काय विचारिते आहेस?" मी आपल्या तंद्रीतून जागी होऊन
विचारिलं. “तीन दिवस झाले म्हणुनी तंटा हो माझ्याशी केला' म्हणजे काय
ग? आणि डावाच डोळा एकटा कसा ग पाण्यानं भरतो?" तिनं मला
कोड्यात टाकलं होतं. “डावाच डोळा पाण्यानं कसा भरतो, हे मला नाही
बाई समजत." मी प्रांजळ कबुली दिली. पण तिचा पहिला प्रश्न कायमच
होता. “अग, ती बाई तीन दिवस विटाळशी म्हणून त्याला भेटायला गेली<noinclude></noinclude>
bhkvjv7h12pky7p2uudhwjxj93zywez
पान:Gangajal cropped.pdf/101
104
20772
229242
75278
2026-04-13T15:54:53Z
कल्पनाशक्ती
3813
229242
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Svnavare" />१०८ / गंगाजल</noinclude>'आज्ञा', 'सांगावा', 'आयुक्ती'. 'तुझा नियोग' म्हणजे 'तुझी आज्ञा',
'तुझं सांगणं' असा अर्थ होतो. 'ह्या तुझ्या सांगण्यामुळे मी कोण, हे उमजलं;
आता मी आनंदानं लढाईत मरेन, कारण मी क्षत्रिय असल्यामुळे या
क्षत्रियोचित मरणानं मी स्वर्ग साधीन,' असं कर्णाचं म्हणणं सरळ दिसतं.
त्यात घोटाळा काही नाही. 'नियोग' हा शब्द व नियुज ह्या धातूची रूपे
माझ्याही परिचयाची होती. 'तक्तिं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव' ही
ओळ कितीदा तरी वाचनात आली होती. 'नियोग- ‘सांगितलेली आज्ञा' हा
अर्थही कित्येक वाक्यांत आलेला होता. पण महाभारताच्या परत-परत
केलेल्या वाचनानं व त्यातील राण्यांच्या 'नियोगा'नं माझं मन इतकं व्यग्र
झालेलं होतं की, साधा-सरळ अर्थही मला सुचेनासा झाला होता. तो
उलगडा एका विद्वान व व्यग्र नसलेल्या लख्ख मनानं केला.
{{gap}}देवळातले शिल्प, धातूच्या मूर्ती, मध्ययुगापासून काढलेली चित्रं
ह्यांतल्या बऱ्याचशा कलाकृतींत मनुष्यदेह वस्त्राच्छादित असूनही देहाकृती
स्पष्टपणे दर्शविलेली आहे. वस्त्राच्या चुण्या, खांद्यावरून व पोटावरून
लपेटलेले वस्त्र यांचा आकारही स्वच्छ दाखवून त्यांच्या आडचे अवयवही
स्पष्ट दाखविलेले आहेत. मला वाटायचं, हा एक संकेत आहे म्हणून. वस्त्राचं
सौंदर्य व मनुष्यदेहाचं सौंदर्य ही दोन्ही दाखविण्याचा मोह कलाकाराला
आवरला नाही व त्यातून वस्त्रही दाखवायचं व त्याच्या मागची देहाची
आकृतीही दाखवावयाची, असा संकेत पडला असावा, अशी माझी ठाम
समजूत होती. एक दिवस माझा हा भ्रम नाहीसा झाला. ओरिसात जाजपुर
रोड स्टेशनवरच्या प्रतीक्षालयात सकाळच्या वेळी मी बसले होते. मी
बसलेली खोली सावलीची होती. खिडक्या पश्चिमेकडे होत्या. पुढे पूर्वेला
प्लॅटफॉर्म व त्याच बाजूला दार होतं. सूर्याचे किरण दारातून खोलीच्या
मध्यापर्यंत आले होते. मी सहप्रवाशांकडे पाहत होते. अधूनमधून
प्लॅटफॉर्मवर दृष्टी टाकीत होते; मधून-मधून घड्याळाकडे बघत बसले होते.
इतक्यात एक वयस्क विधवा बाई आपल्या नातवाचा हात धरून दाराशी
आली. ती आत येण्याच्या आतच तिला दुसरी कोणी मुलं भेटली, व ती
त्यांच्याशी बोलत दारातच उभी राहिली. बाई उघड-उघड जुन्या वळणाची
होती. तिच्या अंगात चोळीपोलकं काही नव्हतं. त्याचप्रमाणे नेसल्या
साडीच्या खाली हल्लीच्या मुली घालतात, तसा परकर नव्हता. तिचं
नेसणंपण जुन्या त-हेच्या उडिया बाईचं. पांढऱ्या शुभ्र साडीचा एक एकेरी<noinclude></noinclude>
2kryhp61r6j3ua1y6ttqyokrhq5vvfh
पान:Gangajal cropped.pdf/105
104
20776
229244
75294
2026-04-13T15:58:23Z
कल्पनाशक्ती
3813
/* Proofread */
229244
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Svnavare" />११२ | गंगाजल</noinclude>येईपर्यंत अगदी चिरंतन उघडं सत्यही दिसलं नव्हतं. सत्य कायम, डोळ्यांपुढे उघडं असतं. ते पडद्याआड नसतं. कुठूनतरी उकरून काढायचं नसतं. त्याला न ओळखणं, न पाहणं, पाहूनही दृष्टीआड करणं ही सर्व आपल्या मनाची किमया आहे. वाचायला येऊन उमजत नाही. अनुभव घेऊनही आपण कोरडेच राहतो. कारण सत्य समजून घेण्याची, त्याचा आविष्कार सहन करण्याची मनाची तयारी नसते. मनाच्या तयारीप्रमाणे एकेक कोडी उलगडतात, आणि कितीतरी न उलगडता तशीच राहत असली पाहिजेत. कोडी आहेत, ह्याची जाणीवही आपल्याला न होता आपला अंत होत असेल, हा सगळा विचार संपतो, तो हवं असलेलं वाक्य तैत्तिरीय उपनिषदात सापडलं. तिथं खूण घालून हायडेगर पुढे वाचावयास घेतला..
{{gap}}व्यक्तीला (तत् ला) नाहीसं होण्याची कायम भीती आहे. पण हायडेगर एवढ्यावरच थांबला नाही. त्याची चिकित्सा पुढे चालू झाली. हे जे तत् असतं, त्याचं आणि त्याच्या असण्याच्या क्रियेतच जे नसण्याचं भय असतं, त्याचं एक रूपांतर ते तत करितं. ते रूपांतर म्हणजे इतरांबद्दल काळजी वा चिंता. व्यक्ती कसल्या-ना-कसल्या काळजीत असते. ती दुसर्यांबद्दल काळजीत असते, सगळ्यांची चिंता करीत असते आणि ही दुसऱ्याबद्दल वाटणारी काळजी वा चिंता दुसरं-तिसरं काही नसून स्वतःला स्वतःच्याबद्दल जी चिंता वाटते, तिचं एक रूपांतर आहे. स्वतःच्या नष्ट होण्याची चिंता बाळगीत राहिल्यानं जीवन दुःसह होईल. पण त्या चिंतेला असं रूप दिलं, म्हणजे जीवनौघ व्यवस्थित चालू राहतो, ही हायडेगरच्या विचारावर पडलेली फ्रॉइडची छाया. ह्या दोघांनी मिळून मला माझं खरं रूप दाखविलं. माझ्या प्रकृतीबद्दल विचारणाऱ्या माणसाला हसून उलट, "आता तुमची प्रकृती कशी आहे? मध्ये फार आजारी होता, नाही?" असं काळजीच्या सुरात विचारणारी मानभावी मी, "अग, तुला हल्ली बरं नसतं. एवढी बडबड करू नकोस; घरी बसून विश्रांती घे" असं कर्त्यासवरत्या शहाण्यासुरत्या मुलीला बजावणारी मी, "हे बघ धाकटीला पडसं झालं आहे. तिच्या अंगात गरम घाल. तिला बाहेर नेऊ नकोस. भारी काळजी वाटते बाई तिची." असा उपदेश करणारी मी, म्हणजे स्वतःच्या भयानं वळवळणारा वरवर दुसऱ्याबद्दलच्या काळजीचा बुरखा घेतलेला माझाच क्षुद्र जीव आहे हे स्पष्ट झालं. {{nop}}<noinclude></noinclude>
6bysaq23u4lhih6ize71g2qw0he1kvj
पान:Gangajal cropped.pdf/106
104
20777
229243
75298
2026-04-13T15:56:32Z
कल्पनाशक्ती
3813
229243
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Svnavare" />{{right|गंगाजल / ११३}}</noinclude>{{gap}}एखादी गोष्ट हातात घेतली की, बुद्धी जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत
तिचा पाठपुरावा करायचा, मध्ये थांबायचं म्हणून नाही; अगदी शेवटाला
जायचं, हा जर्मन लोकांचा गुण आहे. रस्त्यावर खडी चेपणारा रूळ असतो
ना, तसं त्यांचं आहे. तोच अजस्त्रपणा, तोच संथपणा, तोच एकमार्गीपणा,
तोच अटळपणा आणि तेच सामर्थ्य, हायडेगरने माझा आत्मा पार भुईसपाट
करून टाकिला.
{{right|१९६८}}{{nop}}<noinclude></noinclude>
124g1q0x6hiphmqmaidqb5432oi9q2s
पान:Gangajal cropped.pdf/107
104
20778
229245
75299
2026-04-13T16:01:51Z
कल्पनाशक्ती
3813
/* Proofread */
229245
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Svnavare" /></noinclude>

{{block center|'''चौदा:'''
{{x-larger|''''ते सर्व तूच आहेस!''''}}}}

{{gap}}"आज पुरे. माझं डोकं चालत नाही. आजचं तपासून झालं तेवढं उद्या नीट करून आण-पुढचं उद्या वाचू"
{{gap}}"तुम्हांला बरं आहे ना? माझा रोज येण्यानं त्रास नाही ना होत?" तिने काळजीच्या स्वरात विचारिले.
{{gap}}"छे, छे! तसं काही नाही. पण हल्ली मला पहिल्यासारखं काम होत नाही. माझी प्रकृती पार बिघडायच्या आत संपवून टाक उरलेलं काम, म्हणजे सुटलीस."
{{gap}}"किती काळजी करता बाई तुम्ही माझी! काम माझं, आणि ओझं तुम्हांला. दुसऱ्यासाठी फार खपता तुम्ही!"
{{gap}}ती अगदी मनापासून पण विचार न करिता बोलली. मला हसू आलं. तिनं विचारलं, "हसण्यासारखं बोलले मी?"
{{gap}}"हसण्यासारखंच नाही तर काय? तू म्हणालीस, 'काम माझं आणि ओझं तुम्हांला म्हणून तुला वाटतं, तू माझी विद्यार्थिनी, मी तुझी शिक्षिका -तुझ्यासाठी मी स्वतःला झिजविते आहे म्हणून-"
{{gap}}माझे बोलणे पुरे व्हायच्या आत उताविळीने तिने म्हटले, "मग हे खरं नाही का?"
{{gap}}मी नकारार्थी मान हलविली. "हे पहा तापी, तू विद्यार्थिनी खरी, पण त्याच्या पाठीमागं विशेषण काय लावते मी? माझी विद्यार्थिनी. मी तिला शिकविते. ती पास झाली, म्हणजे तिच्याबरोबरच माझीही परीक्षा पास होते. तू पास होतेस विद्यार्थिनी म्हणून, मी पास होते शिक्षिका म्हणून. तुला<noinclude></noinclude>
kw6pmfhygyckm6yvzxetuzxh15nly85
पान:Gangajal cropped.pdf/108
104
20779
229246
75301
2026-04-13T16:04:07Z
कल्पनाशक्ती
3813
/* Proofread */
229246
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Svnavare" />{{right|गंगाजल / ११५}}</noinclude>कल्पना नाही. ही परीक्षा किती कठीण आहे ती. बाहेरचे परीक्षक तुझ्या निबंधाबद्दल जे लिहितील, ते तुझ्यापेक्षा मलाच जास्त लागू असतं. माझ्या सुदैवानं ही शोभा फार प्रकटपणे होत नाही! जे विद्यार्थी नापास, त्यांच्याबरोबर मीही नापास; पण जे पास होतात, त्यांच्याबरोबर मी क्वचितच नीटपणे पास होते. ही परीक्षा पास होण्यासाठी माझी धडपड. मी तुझ्यावर रागावते, कधी तुला चुचकारते, तुझं लिखाण नीट व्हावं म्हणून मेहनत घेते, ह तुझ्यासाठी नसून स्वत: साठीच आहे. आयुष्यात मी निरनिराळ्या भूमिका पार पाडीत असते. त्यांतील एक शिक्षकाची. माझ्या मनात मी शिक्षक म्हणून एक स्वत: चं चित्र उभं केलं आहे. प्रत्येक विद्यार्थी हा दुहेरी त-हेने मीच असतो. माझ्या शिक्षणाचं, शिक्षकत्वाचं ते एक प्रतीक असतं. माझ्या विद्यार्थीपणाचं ते दुसरं एक प्रतीक असतं. माझी सर्व धडपड ही माझ्यासाठीच आहे. माझ्यात जे अनंत 'मी' आहेत ना, त्यांतल्या एकेका 'मी' साठी मी जीव टाकीत असते."
{{gap}}मी थोडा वेळ थांबले. तापी माझं बोलणं ऐकून विचार करीत होती.
{{gap}}"हे बघ तापी, उपनिषदांत म्हटलं आहे ना ग कुठेसं, 'अरे, तू स्त्रीवर बायको म्हणून प्रेम करीत नाहीस, आपल्या आत्म्यावरचं प्रेम असतं ते. वगैरे?"
{{gap}}तापीने नुकतीच उपनिषदे वाचली होती. तिचे स्मरणही माझ्या मानाने तल्लख होते. तिने माझ्या कपाटातून बृहदारण्यकोपनिषदातील ते पानच माझ्यापुढे धरिले:
{{gap}}"न वा अरे पत्यु: कामाय पतिः प्रियो भवति।

{{gap}}आत्मनस्तु कामाय पतिः प्रियो भवति।

{{gap}}न वा अरे पुत्राणां कामाय पुत्राः प्रिया भवन्ति।

{{gap}}आत्मनस्तु कामाय पुत्राः प्रिया भवन्ति।

{{gap}}न वा अरे देवानां कामाय देवाः प्रिया भवन्ति।

{{gap}}आत्मनस्तु कामाय देवाः प्रिया भवन्ति।

{{gap}}न वा अरे भूतानां कामाय भूताः प्रिया भवन्ति।

{{gap}}आत्मनस्तु कामाय भूताः प्रिया भवन्ति।"

{{gap}}बघ तापी, याज्ञवल्क्यानं गुरुशिष्याचं निराळं असं उदाहरण दिलं नाही कारण त्याची बायकोच त्याच्यापुढे शिष्या म्हणून बसली होती."
{{gap}}"आई जे आपल्या मुलावर प्रेम करिते, त्याच्या खस्ता खाते, ते काय<noinclude></noinclude>
40gach3qa8umodyvjs06ykjmimssnr1
पान:Gangajal cropped.pdf/111
104
20782
229248
75345
2026-04-13T16:06:55Z
कल्पनाशक्ती
3813
/* Proofread */
229248
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Svnavare" />११८ / गंगाजल</noinclude>त्यांची प्रवृत्ती ह्यांचा विचार करितो आहोत, -जणू काही गुन्हेगार म्हणजे आपल्यापेक्षा काहीतरी निराळे, काहीतरी लोकविलक्षण म्हणून. पण ते खरं नाही. मानवाच्या- तुमच्या, माझ्या, सर्वांच्या-प्रवृत्ती सगळीकडे सारख्याच असतात. सुस्थितीत राहण्यासाठी स्वतःला, बायकोला, मुलांना खाणेपिणे, कपडेलत्ते नीट मिळावे, असं सर्वांनाच वाटतं. अगदी ह्याच साधारण प्रवृत्ती गुन्हेगारांच्याही असतात. आपल्यापेक्षा मानाने, वयाने, शिक्षणाने, अधिकाराने मोठे असतील, त्यांचं म्हणणं ऐकावं, हीही सामान्य प्रवृत्तीच आहे, आणि तिचा फायदा राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात वडील माणसं व पुढारी घेतातच. खुनी फक्त पैशासाठी खून करितो, सूडासाठी करितो, असं थोडंच आहे? धर्मवेडाने, देशप्रेमानेही माणसं दुसऱ्यास मारावयास प्रवृत्त होतात."
{{gap}}"तुमचं म्हणणं असं की लढाई म्हणजे खूनच?" वर्गातील एक आवाज.
"{{gap}}"प्रश्न विचार करण्यासारखा आहे, पण आज आपला विषय आहे समाजातील गुन्हेगारी. तेवढ्यापुरताच आपण विचार करू."
{{gap}}"तुमचं म्हणणं असं की धार्मिक भावना, पितृप्रेम, देशप्रेम ह्या उदात्त प्रवृत्तीही गुन्हेगाराला प्रेरक होतील?" दुसरा आवाज.
{{gap}}"माणसं काही वेळा भावनेने भारून जातात. गुरू, पुढारी, वडील माणसं जे सांगतात, ते करून जातात. आपली स्वतःची अशी मूल्यं आहेत, आपल्या धार्मिक मूल्यांचा विचार करून त्यातली काही तरतमभावाने स्वीकारण्याचा आपला हक्क आहे, हे माणसं विसरतात. इतर विचार, नोकरी, सुखी जीवन हीही अशा गोष्टी विसरायला मदत करतात. पूर्वी माणूस राजाच्या नोकरीत राहिला म्हणजे आपल्या आश्रयदात्याचं ऐकण्यात भूषण मानीत असे. जीव देणं व घेणं ह्या गोष्टी त्याच्या लेखी सारख्याच होत्या. परमभक्तीचं एक लक्षणच असं आहे की, मनुष्य सर्वथा दुसऱ्याचा होतो. अशा मनःस्थितीतही गुन्हा होणे शक्य आहे. नुसतं शक्य आहे, इतकंच नव्हे, तर महाभयंकर गुन्हे झाल्याचं इतिहासात नमूद आहे. युरोपात मध्ययुगात ख्रिश्चन धर्माच्या नावाने 'इन्क्विझिशन' या संस्थेमार्फत कित्येक वर्ष लोकांचे अनन्वित हाल झाले. तिची आपल्या इकडे गोव्यामध्येही झळ लागली. मनुष्यजातीविरुद्ध ही एक भयानक गुन्हेगारीच होती, आणि धर्मवेडाने उत्पन्न झालेली होती."{{nop}}<noinclude></noinclude>
h3merp7qn1uvbpzq7yxx9vcw4b3f5vk
229249
229248
2026-04-13T16:07:19Z
कल्पनाशक्ती
3813
229249
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Svnavare" />११८ / गंगाजल</noinclude>त्यांची प्रवृत्ती ह्यांचा विचार करितो आहोत, -जणू काही गुन्हेगार म्हणजे आपल्यापेक्षा काहीतरी निराळे, काहीतरी लोकविलक्षण म्हणून. पण ते खरं नाही. मानवाच्या- तुमच्या, माझ्या, सर्वांच्या-प्रवृत्ती सगळीकडे सारख्याच असतात. सुस्थितीत राहण्यासाठी स्वतःला, बायकोला, मुलांना खाणेपिणे, कपडेलत्ते नीट मिळावे, असं सर्वांनाच वाटतं. अगदी ह्याच साधारण प्रवृत्ती गुन्हेगारांच्याही असतात. आपल्यापेक्षा मानाने, वयाने, शिक्षणाने, अधिकाराने मोठे असतील, त्यांचं म्हणणं ऐकावं, हीही सामान्य प्रवृत्तीच आहे, आणि तिचा फायदा राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात वडील माणसं व पुढारी घेतातच. खुनी फक्त पैशासाठी खून करितो, सूडासाठी करितो, असं थोडंच आहे? धर्मवेडाने, देशप्रेमानेही माणसं दुसऱ्यास मारावयास प्रवृत्त होतात."
{{gap}}"तुमचं म्हणणं असं की लढाई म्हणजे खूनच?" वर्गातील एक आवाज.
{{gap}}"प्रश्न विचार करण्यासारखा आहे, पण आज आपला विषय आहे समाजातील गुन्हेगारी. तेवढ्यापुरताच आपण विचार करू."
{{gap}}"तुमचं म्हणणं असं की धार्मिक भावना, पितृप्रेम, देशप्रेम ह्या उदात्त प्रवृत्तीही गुन्हेगाराला प्रेरक होतील?" दुसरा आवाज.
{{gap}}"माणसं काही वेळा भावनेने भारून जातात. गुरू, पुढारी, वडील माणसं जे सांगतात, ते करून जातात. आपली स्वतःची अशी मूल्यं आहेत, आपल्या धार्मिक मूल्यांचा विचार करून त्यातली काही तरतमभावाने स्वीकारण्याचा आपला हक्क आहे, हे माणसं विसरतात. इतर विचार, नोकरी, सुखी जीवन हीही अशा गोष्टी विसरायला मदत करतात. पूर्वी माणूस राजाच्या नोकरीत राहिला म्हणजे आपल्या आश्रयदात्याचं ऐकण्यात भूषण मानीत असे. जीव देणं व घेणं ह्या गोष्टी त्याच्या लेखी सारख्याच होत्या. परमभक्तीचं एक लक्षणच असं आहे की, मनुष्य सर्वथा दुसऱ्याचा होतो. अशा मनःस्थितीतही गुन्हा होणे शक्य आहे. नुसतं शक्य आहे, इतकंच नव्हे, तर महाभयंकर गुन्हे झाल्याचं इतिहासात नमूद आहे. युरोपात मध्ययुगात ख्रिश्चन धर्माच्या नावाने 'इन्क्विझिशन' या संस्थेमार्फत कित्येक वर्ष लोकांचे अनन्वित हाल झाले. तिची आपल्या इकडे गोव्यामध्येही झळ लागली. मनुष्यजातीविरुद्ध ही एक भयानक गुन्हेगारीच होती, आणि धर्मवेडाने उत्पन्न झालेली होती."{{nop}}<noinclude></noinclude>
l6mnrmeta2xkgwkreei5s28i9jzcywq
पान:Gangajal cropped.pdf/112
104
20783
229247
75316
2026-04-13T16:05:08Z
कल्पनाशक्ती
3813
229247
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Svnavare" />{{right|गंगाजल / ११९}}</noinclude>{{gap}}तास झाला. मुले पांगली. पण माझे विचार चालूच होते. गुन्हेगारांच्या
प्रवृत्ती इतर मानवांसारख्याच असतात हे जर खरे, तर ह्याचाच दुसरा अर्थ
म्हणजे कोणीही मनुष्य काही विशिष्ट परिस्थितीत गुन्हा करणे शक्य आहे.
लाखांमध्ये एखादा असा सापडतो की, तो 'प्राण गेला तरी बेहेत्तर, पण माझी
स्वत:ची अशी मूल्ये बाळगून राहीन,' असे म्हणतो, आणि दहा लाखांत
एखादाच असा की, कसोटीची वेळ आली, म्हणजे खरोखरच तसा वागतो.
गुन्हेगारी, दुर्वर्तन, लबाडी हे सर्व प्रकार म्हणजे सर्वसाधारण मानवी
प्रकृतीचाच आविष्कार मानिला, म्हणजे मानवी प्रकृती कुठल्या टोकापासून
कुठल्या टोकापर्यंत जाण्याचा संभव आहे, ह्याची गुन्हेगारी ही एक खूण व
आठवणच म्हणावयाची. गुन्हेगाराच्या रूपाने आपल्यापुढे जे येते, ते
आपलेच सुप्त अनाविष्कृत स्वरूप का?
{{gap}}माझे मन दचकून मागे सरले.
{{gap}}जुना विषय संपून नवा सुरू झाला होता. सामाजिक संबंध किती
प्रकारचे असतात, हे समजावून देणे चालले होते. फार खोल विचार न करता
पाठ म्हणावा, तशी मी बोलत होते. “उच्चनीचपणा, पुढारीपणा,
अनुयायीपणा परस्परसाहाय्य व विरोध-"
{{gap}}"विरोध हाही एक सामाजिक संबंधच म्हणायचा का?" वर्गातून एक
आवाज आला.
{{gap}}"संबंध आल्याशिवाय विरोध येणारच नाही. एवढंच काय, जेथे-जेथे
सहकार्य आहे तेथे-तेथे विरोध दिसून येतो. मालक व मजूर या दोघांच्या
प्रयत्नांनी उत्पादन होत असते व त्याच क्रियेत दोघांचा एकमेकांशी विरोध
दिसून येतो. समाजाच्या विधिनिषेधाच्या कल्पना आत्मसात करून व्यक्ती
समाजाभिमुख होताना असा विरोध तर सारखा दिसून येतो. लहान मुलाचेच
पहा. सकाळी दात घातल्याशिवाय खायचं नाही, ही सवय त्याला लावायला
श्रम पडतात ना? त्यांचा विरोध होत-होत हळूहळू त्याच्या सामाजिक
जाणिवेचा विकास होत असतो. समाजाची मूल्यं गळी उतरत असतात,
आत्मसात होत असतात. ह्याहीपलीकडे जाऊन फ्रॉइड म्हणतो की, विरोध
हा बर्याच प्रसंगी संमतीचं लक्षण असतो. मनातून संमती असते, बाहेरून
विरोध असतो. जागृत मनाला म्हणजेच समाजाभिमुख मनाला अमक्या गोष्टी
वाईट, अमक्या गोष्टी चांगल्या, अशी ठाम शिकवण मिळालेली असते. पण
खोलखोल दुसरं मन दडलेलं असतं. लांडग्याचं क्रौर्य, वाघाचा शिकारीपणा,<noinclude></noinclude>
bnhk2h7vg3vzolo9ldg9ohnh8l1j2e1
पान:Gangajal cropped.pdf/114
104
20785
229250
75320
2026-04-13T16:08:36Z
कल्पनाशक्ती
3813
/* Proofread */
229250
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Svnavare" />{{right|गंगाजल / १२१}}</noinclude>झाला? पहिल्या महायुद्धानंतर युरोपात काही विशिष्ट घडी बसवण्याची विल्सन स्वप्ने रचीत होता, पण इंग्लंड-फ्रान्सच्या कुटिल राजकारणाचा वीट येऊन तो निघून गेला व जर्मनी या दुकलीच्या चिमट्यात गवसला. आपला प्रतिस्पर्धी, पहिले महायुद्ध करणारा गुन्हेगार, म्हणून जर्मनीच्या या दोन शत्रूनी पुरेपूरपणे जर्मनीचे नाक खाली करण्याचा चंग बांधला. जर्मनीच्या पुढाऱ्यांना त्या वेळच्या राष्ट्रसंघात न्याय मिळणे अशक्य झाले. तिच्या साध्या व रास्त मागण्याही धुडकाविल्या गेल्या. मी जर्मनीत गेले, तेव्हा ते सबंध राष्ट्र रागाने धुमसत होते. जे याचनेने मिळाले नाही, ते हिटलरने दांडगाईने घेतले, तेव्हा जर्मनीवर एकच आवाज उमटला, "असेच पाहिजे होते. इंग्लंडला, फ्रान्सला व अमेरिकेलाही सभ्य, रास्त मागण्या समजत नाहीत; त्यांना बडगाच कळतो." पहिली दांडगाई पचल्यावर हिटलरने निरपराध राष्ट्रांना गिळंकृत केले; ती दांडगाई ह्या बड्यांनी ऐकून घेतली. त्या वेळी दटावले असते. परिणामाचा भयंकर परिपाक लक्षात घेऊन वेळीच ठोकले असते, तरी जर्मनी गप्प बसता. पण पहिल्याने स्वार्थामुळे डोळ्यांवर पडदा ओढला. आता भीतीने गप्प बसले. ह्या भानगडीत मध्ययुरोपातील फिनलंडपासून अल्बानियापर्यंत सर्व चिमुकल्या राष्ट्रांचे स्वातंत्र्य पहिल्याने जर्मनीने व नंतर रशियाने नष्ट केले व लक्षावधी असहाय ज्यूंची अमानुष हत्या झाली. ह्याला जबाबदार फक्त जर्मनीच का? जर्मनीच्या गुन्हेगारीत सर्व युरोपचा, पर्यायाने सर्व जगाचा वाटा नाही का? जी गोष्ट राजकीय गुन्हेगारीची, तीच, सामाजिक गुन्हेगारीची.
{{gap}}एका भयंकर सत्याच्या जाणिवेने मी व्याकुळ झाले होते. 'तत्त्वमसि', "ते तू आहेस'- माझ्यापढे बोट नाचवीत मन म्हणत होते. मी थरथर कापत म्हटले, "होय, हे मीच आहे. आइश्मान, स्टालिन, हिटलर आणि त्यांनी मारिलेले लोकसद्धा मीच आहे."
{{gap}}पण एवढ्यावरच हा ज्ञानाचा लोट थांबणार नव्हता. "इतर देशांतल्या माणसांची व घटनांची नावे का घेतेस? घरचीच, जवळचीच नावे घे की." मनाने छेडले.
{{gap}}"स्वातंत्र्याच्या चळवळीत काही निरपराध माणसं मारिली गेली. काय म्हणालीस तु त्या वेळेला? आठवतं?"
{{gap}}मला आठवलं, "देश युद्धात पेटलं, म्हणजे असं एखादे वेळेला व्हायचंच."{{nop}}<noinclude></noinclude>
0yn6envgdnp6brpybilz0stcpo7zka6
पान:Gangajal cropped.pdf/120
104
20791
229251
69358
2026-04-13T16:12:43Z
कल्पनाशक्ती
3813
229251
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="सुबोध कुलकर्णी" />{{left|१२८ / गंगाजल }}</noinclude>त्यांचे रूपांतर होताना मी पाहिले आहे. आणि त्या-त्या लेखामागची त्या-
त्या वेळची बाईंची मनोवृत्ती मी बऱ्याच जवळून पाहिली आहे.

{{gap}}मी जे काही लिहीन, त्याहून सर्वस्वी निराळे असे सूत्र दुसऱ्या कोणास
सापडले, व त्याने ते मांडले, तर त्यात मला आनंदच आहे. 'परिपर्ती'
व ‘भोवरा' हे ललित निबंध संग्रह एकाच वेळी वाचले म्हणजे आपोआपच एक
ठळक गोष्ट लक्षात येते. या संग्रहातून बाई स्वतःच्या जीवनाबद्दल आणि
स्वतःच्या विचारसरणीबद्दल खूपसे काही सांगून जातात.

{{gap}}भोवरामधील ‘सुटका' या लेखात त्यांनी ते जास्त स्पष्टपणे सांगितले
आहे.

{{gap}}"एका माणसाची आयुष्याची कमाई किती असणार? ती कमाई
करताना अनुभूतींचा प्रवाह तुडुंब भरून वाहून चालला की, मनुष्य आपण
होऊन दुसऱ्याला बोलावते, व आपली कमाई वाटीत सुटते."

{{gap}}बाईंच्या अनुभूतीचा प्रवाह तुडुंब भरून वाहून जाऊ लागला की,
बाई सांगायला लागतात. मग त्यांना कुणी आग्रहही करावा लागत नाही.

{{gap}}'गंगाजल'मधील ललित-निबंधांत बाईंची अनुभूती कुठे सापडते का
हे पाहू गेले की, ‘बॉय फ्रेण्ड'पासूनच त्याच्या खुणा दिसू लागतात. बाई
स्वतः होऊनच आपले आणि पंढरपूरच्या विठोबाचे नाते सांगतात. त्यात
भक्ताचे विविध प्रकार सांगताना आर्त होऊन पंढरपूरला जाणाऱ्या बाई
एकीकडे अर्थार्थीही असतात.

{{gap}}सोसवेनासा भार शिरी पडला की, त्यांना हरी आठवतो. एकाकीपणे
प्रसंगाला तोंड देण्याचा प्रसंग आला की, बाई पंढरपूरच्या विठोबाजवळ बळ
मागायला जातात. आलेला प्रसंग सोसायचे सामर्थ्य दे, म्हणून काकुळती
येऊन त्याला मिठी मारतात. बाईंची ही काकुळती लौकिक नसते.
व्यावहारिक अर्थाने त्यांना काही मागावयाचे नसते. माणसाच्या
भावजीवनाची गुंतागुंत मोठी विलक्षण असते. माणूस जवळ आला आणि
स्वतःला विसरून आपण त्याच्यावर प्रेम करू लागलो (मग ते प्रेम
स्वतःसाठी का असेना), की, ही व्याकुलता, हे रडणे-हसणे सगळे आलेच.

{{gap}}कधी कधी ही गुंतागुंत फारच वाढते. तीतील सुटा धागा कुठे सापडत
नाही. अशाही काही प्रसंगी बाई आपल्या जिवलगाला भेटण्यास जात आणि
बऱ्याचशा शांत होऊन परत येत, असे मला बऱ्याच वेळा जाणवले आहे.

{{gap}}बाईंच्या मनात जीवनासंबंधी अपार श्रद्धा होती. देवळाविना गाव<noinclude></noinclude>
qla98llsgx26h89n150fxgul398pcgd
पान:Gangajal cropped.pdf/123
104
20794
229252
74842
2026-04-13T16:14:52Z
कल्पनाशक्ती
3813
229252
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Svnavare" />{{right|गंगाजल / १३१}}</noinclude>लागल्या होत्या. मूत्यूचे आव्हान त्यांनी स्वीकारिले होते. त्याचप्रमाणे त्या
जास्त अंतर्मुख बनल्या होत्या.
{{gap}}सत्याचे दर्शन फार भयंकर असते. ते पहायला मनाला बळ यावे
लागते. जोपर्यंत माणूस आपल्या मनाच्या किमयेने सत्याकडे डोळेझाक
करितो, तोपर्यंत एका अर्थाने तो सुखी असतो; पण या पेटाऱ्याचे दार उघडून
त्यातले सत्य पाहण्याची धडपड सुरू झाली, म्हणजे शेवटाला जाईपर्यंत ते
चैन पडू देत नाही. आणि सगळ्यांत कसोटीची अवघड गोष्ट अशी आहे की,
सत्याचे ज्ञान झाल्यानंतर त्याचा आविष्कार सहन करण्याचे बळ राहणे हे
कार्य महाकठीण.
{{gap}}या सत्याबद्दल बोलताना इरावतीबाई काही मृत्यूच्या जाणिवेबद्दल
बोलत नाहीत, तर स्वतःच्या भावनेबद्दल बोलतात. स्वतःच्या निरपेक्ष
प्रेमाचीही त्या अशीच चिरफाड करितात. दुसऱ्याबद्दलचे वाटणारे प्रेम,
दुसऱ्याची काळजी म्हणजे स्वतःला स्वतःबद्दल वाटणाऱ्या काळजीचे,
प्रेमाचे, भीतीचेच ते एक स्वरूप आहे. माणसाचे स्वतःवरचे प्रेम हेच काय ते
खरे. हा सगळा अटाट आपण करितो, हा पसारा मांडतो तो स्वतःसाठी,-
स्वतःवरच्या प्रेमानेच मांडलेला असतो. म्हणूनच आपण त्यात इतके गुंतून
पडतो; ते का, असे प्रश्नचिन्ह आहे.
{{gap}}स्वतःच्या मनाची चिरफाड करणे आणि त्याचा आविष्कार
सोसण्याएवढी मनाची तयारी करणे या दोन्ही स्थितीत माणसाने सतत
आत्मचिंतन तर केले पाहिजेच; पण स्वतःशी अत्यंत कठोर झाले पाहिजे.
{{gap}}इरावतीबाई स्वतःला अशा सारख्या भट्टीत घालीत होत्या.
स्वतःमधले हिणकस जाळून टाकण्याची धडपड करीत होत्या. आणि त्या
धडपडीतून स्वतःला तावून-सुलाखून घेतानाच त्यांना 'हे सर्व तूच आहेस'
याची जाणीव झालेली असावी.
{{gap}}हिटलरने ज्यूच्या केलेल्या शिरकाणात कर्वे-कुटुंबियांचे अनेक
जवळचे स्नेही मारिले गेले. त्यामुळे हिटलरचे नाव काढिले की, त्या
सात्त्विक संतापाने उफाळून उठत.
{{gap}}कुठे अन्याय झालेला दिसला की, प्रथम त्या अन्यायाच्या विरुद्ध
प्राणपणाने विरोध केल्यासारखा अन्यायाला विरोध करीत. त्या घटनेला,
त्या व्यक्तीला न्याय मिळेपर्यंत विरोधाला तोंड देत. न्याय मिळेपर्यंत त्यांना
चैन पडत नसे; परंतु म्हणून असे कोणी समजण्याचे कारण नाही की, त्यांना<noinclude></noinclude>
dk1udidpwv7nhb3wbwla9foav2j4rtm
पान:Gangajal cropped.pdf/124
104
20795
229253
69147
2026-04-13T16:16:45Z
कल्पनाशक्ती
3813
229253
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Svnavare" />१३२ / गंगाजल</noinclude>विरोध करणाऱ्या माणसांच्याबद्दल बाईंच्या मनात द्वेष किंवा चीड असे.
{{gap}}अन्याय्य कृत्य करणाऱ्यांबद्दल त्यांच्या मनात अपार करुणा होती, हे
मला माहीत आहे; ती मला जाणवलेली आहे.
{{gap}}त्यांना कोणी कितीही दुखावले असले, तरी त्या माणसाला न्याय
देताना त्या स्वतःशी तर कठोर होतच; पण आपल्या माणसाच्या विरुद्ध त्या
न्यायाच्या बाजूने उभ्या राहत.
{{gap}}त्यांच्या पहिल्या सूनबाईंशी त्या जे वागल्या ते ज्यांना माहीत आहे,
त्यांना मी लिहिते यात अतिशयोक्ती वाटणार नाही.
{{gap}}डेक्कन कॉलेजमधील प्रकरणात अनेक माणसे त्यांना दोष देताना मी
ऐकिले आहे. बाईंना जे अन्यायाचे वाटले, त्याविरुद्ध त्या सर्व शक्तीनिशी
झगडल्या, हे जितके खरे, तितकेच त्या ज्यांच्याशी झगडल्या त्यांच्यावर
त्यांचा मनापासून राग नव्हता, हेही खरे.
{{gap}}ज्या हिटलरबद्दल त्यांना अत्यंत घृणा होती, तेही स्वतःचेच एक रूप
आहे, हे झालेले सत्याचे दर्शन त्यांनी मनोमनी स्वीकारले होते.
{{gap}}बाईंची वृत्ती 'मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास । कठीण वज्रास भेदू
ऐसे' अशीच होती. बाईंच्या लेखांसंबंधी हे लिहीत असताना बाईंना कुणी
संतीण बनविण्याचा माझा हेतू नाही. पण या मार्गावरील साधकांपैकी त्या
एक होत्या.
{{gap}}स्वतःमधील हिणकस नष्ट करण्याची धडपड करणारा तो एक अत्यंत
प्रामाणिक आत्मा होता, की ज्याने स्वतःच स्वतःशी कठोर आत्मपरीक्षण
करून स्वतःला तावून-सुलाखून घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे.
{{gap}}या 'गंगाजला' बद्दल एवढे लिहिण्याचे कारण नव्हते; पण या
संग्रहातील हे निबंध बाईंची अनुभूती सांगत असले तरी ही अनुभूती लौकिक
किंवा प्रापंचिक नाही. त्यांच्या नित्याच्या व्यवसायातील, शास्त्रातील नाही,
तर ती सर्वस्वी आत्मचिंतनात्मक आहे.
{{gap}}१९५३ सालापासून ७० सालापर्यंत आम्ही एकमेकींच्या फार निकट
होतो असे मला जाणवले, म्हणून या निबंधांची मोड सांगण्याचा हा प्रपंच केला.
{{right|- '''सुलोचना देशमुख'''}}{{nop}}<noinclude></noinclude>
90j6la5mefggq39gmu9sbfnxo6vtsuq
पान:यांचे सध्या काय चाललेय...(Yanche Sadhya Kay Chalaley...).pdf/39
104
30109
229233
49018
2026-04-13T14:35:46Z
~2026-22691-40
6001
/* तपासणी करायचे साहित्य */
229233
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="2401:4900:C092:EAC:C7A8:E0CB:5C0D:ED1F" /></noinclude>________________
ही पोरगी माझ्या मनातली.
Yes
[[चित्र:Rohan Tarange|इवलेसे]]<noinclude></noinclude>
husqgk4wgh9zwz8uc6bny355zt5xrqk
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/118
104
63388
229256
157795
2026-04-14T09:25:55Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229256
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|९० |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>स्वतःच्या देशांत करण्याचे त्यांच्या स्वप्नांतहि येणार नाही अशा गोष्टी परक्या देशांत ते बिनदिक्कत करतात. युरोपियन आणि अमेरिकन लोकांस चिनी लोक 'परकीय पिशाच्चे' ह्मणतात, तें बहुधा अशा कारणामुळेच असावे. अमेरिकन अथवा युरोपियन लोकांत असणारे चांगले गुण त्या बिचाऱ्यांच्या प्रत्ययासच आले नसावे.

{{gap}}यासाठी आपली अंतर्दृष्टि जागृत करून परकीयांचे वर्तन त्यांच्या स्वतःच्या चालीरीतीशी सुसंगत आहे की नाही हे पाहण्यास शिकले पाहिजे. आपल्या चालीरीतींवरून परक्यांच्या वागणुकीवर टीका करणे कधीहि इष्ट होणार नाही. सर्व सृष्टीने माझ्या वर्तणुकीप्रमाणे चालावें असा एखादा ताम्रपट मी मिळविला आहे काय? सारे जग कांहीं माझ्या सुखासाठी निर्माण झाले नाही ही गोष्ट प्रत्येक मनुष्याने नित्य लक्ष्यांत बाळगून सर्वत्र सहानुभूति ठेविली पाहिजे. भोंवतालच्या परिस्थित्यनुरूप आपल्या कर्तव्याची दिशा बदलते हे ध्यानांत ठेवून विशिष्ट प्रसंगी स्वतःच्या मनास पवित्र व युक्त वाटेल असें वर्तन ठेवणे हेच आपले कर्तव्य आहे. आपला जन्म ज्या परिस्थितीत झाला तिला अनुरूप अशी कांहीं सामान्य कर्तव्ये लावून दिलेली असतात, ती प्रथम नीट करणे हे आपले कर्तव्य आहे. तसेच ज्या समाजांत आपण लहानाचे मोठे झालों त्या समाजाच्या स्थितीस आणि स्वतःच्या दर्जास अनुरूप अशी काही सामाजिक कर्तव्ये असतात ती नीटपणे पार पाडणे हे आपले दुसरें कर्तव्य आहे. असें करीत असतां जो एक मोठा अडथळा आपल्या वाटेंत नेहमी येत असतो त्याचा आतां विचार केला पाहिजे. हा मोठा अडथळा ह्मटला ह्मणजे आत्मप्रौढी हा होय. आपल्या हातून कधीं कांहीं चूक होत असेल असें आपणांस वाटत नाही. आपल्याला याच क्षणी राज्यावर बसविलें तरी तितकी आपली योग्यता आहेच असें आपणांस नित्य वाटते. ही भावना नित्य जागृत राहिल्यामुळे आपला आत्मपरीक्षणाचा मार्ग बंद झालेला असतो. एखादें राज्य चालविण्याची पात्रता खरोखरच आपल्या अंगी असली तरी चालू परिस्थितीत प्राप्त होणारी कर्तव्ये उत्कृष्ट रीतीनें बजावून आपली पात्रता आपण प्रथम सिद्ध केली पाहिजे. आपण हलक्या दर्जाचे असलो तरी त्या दर्जाची कर्तव्ये उत्तम प्रकारे केली ह्मणजे वरचा दर्जा आपणांस आपोआप प्राप्त होतो. लौकिक व्यवहाराच्या भोवऱ्यात शिरून आपली कर्तव्ये आपण करूं लागलों ह्मणजे चोहोंकडून जे धक्केचपेटे आपणांस सोसावे लागतात त्यांमुळे आपली स्वतःची खरी योग्यता काय आहे हे<noinclude></noinclude>
4lu6okqgzawhkpbszf84eg1plpwy8ph
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/119
104
63389
229257
157796
2026-04-14T09:30:05Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229257
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|९१ }}
{{rule}}</noinclude>आपणांस समजतें. आपल्या डोळ्यांवर आत्मप्रौढीची जी धुंदी असते ती अशा धक्यांनी खाड्कन् उतरते. यदृच्छेनें प्राप्त झालेल्या उच्च दर्जाची कर्तव्ये उत्तम प्रकारे चालविण्याची एखाद्याला पात्रता नसली तर त्याचा तो उच्च दर्जा फार दिवस टिकून राहणे शक्य नाही. ज्याला त्याला त्याच्या योग्येतनुरूप त्याच्या जागी बसविणे हे सृष्टीचे कामच आहे. तेव्हां त्याबद्दल रिकामी कुरकुर करून फायदा नाही. याकरितां कोणाचीहि खरी योग्यता केवळ त्याच्या दर्जावरून पारखतां येत नाही. एखादा मनुष्य हलकें काम करीत असला तर केवळ तेवढ्यावरूनच त्याची योग्यता कमी लेखणें अनुचित आहे. कार्य कसलेंहि असो, तो मनुष्य ते कोणत्या प्रकारे आणि किती उत्साहाने पार पाडतो याचा विचार करणे अवश्य आहे.

{{gap}}या नंतर कर्तव्याविषयींच्या आपल्या कल्पनेत आणखीहि थोडा बदल केला पाहिजे, असें आपणांस आढळून येईल. अत्यंत निरपेक्षबुद्धीने प्रेरित असल्याशिवाय कोणतेंहि महत्वाचे काम आपल्या हातून नीटपणे पार पडत नाही. असें आहे तरी अमुक एक काम कर्तव्य ह्मणून मला केले पाहिजे अशी भावना नसेल तर एखाद्या कार्याचा आरंभहि आपणाकडून व्हावयाचा नाहीं; यासाठी प्रथम कर्तव्य ह्मणूनच एखाद्या कार्यास आरंभ करावयास पाहिजे. व शेवटी स्वार्थबुद्धीचा पूर्ण नाश होऊन जगांतील हरएक कर्म ह्मणजे परमेश्वराचे प्रत्यक्ष पूजनच आहे असे वाढू लागलें ह्मणजे खरें निष्काम कर्म आपल्या हातून होऊ लागतें व आपणांस अलिप्तता ह्मणजे काय याचा खरा अर्थ कळतो. अनेक प्रकारची स्वार्थी कर्मे अनंतकालापासून आपण करीत असल्याने आपल्या ज्ञानमय मूलरूपावर अज्ञानाचा जो दाट पडदा पडला आहे तो नाहीसा करून आपल्या ज्ञानस्वरूपास पूर्णपणे व्यक्त होण्यास अवसर करून देणे हेच सर्व योगमागांचें ध्येय आहे; व कर्मयोगाचे तरी वास्तविक रहस्य हेच आहे. ज्ञानदृष्टया आपण आपल्या चालू स्थितीत अगदी खालच्या दर्जाचे लोक आहों, व जी कर्मे स्वसुखासाठी ह्मणून आपण करितों त्यांत आपल्या शक्तीचा व्यर्थ व्यय फार होऊन आपल्याभोंवती असलेल्या जाळ्यांत अधिकच गुंतागुंत होत जाते. अशी गुंतागुंत न होतां पहिल्या जाळ्याची बंधनें हळूहळू ढिली कशी करावयाची व शेवटीं अज्ञानरूपी जाळ्यांतून आपणांस कसे मुक्त करून घ्यावयाचे हे रहस्य कर्मयोगाने आपणांस प्राप्त करून घ्यावयाचे आहे. कर्तव्य ह्मणून कोणतेंहि कार्य आरंभिलें ह्मणजे त्याच्या पूर्ततेकरितां हलक्या प्रतीच्या सुखकल्पनांवर आपणांस पाणी सोडावें<noinclude></noinclude>
ndtz35csegk7k11xb7dpz4vthdc4s3j
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/120
104
63390
229258
157797
2026-04-14T09:34:44Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229258
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|९२ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>लागतें. प्रथम लहानसान सुखें सोडावयास आपण तयार झालो म्हणजे संवयीने आपली कर्तव्याची कल्पना अधिक विस्तृत होऊन मोठया सुखाच्या कल्पनाहि हळुहळू विराम पावू लागतात. ज्या मूळतत्वांवर सांप्रतची समाजाची रचना झाली आहे ती तत्वेंहि याच स्वरूपाची आहेत. मनुष्यप्राणी संघ अथवा समाज करून राहूं लागला ह्मणजे त्याच्याभोवती काही सामाजिक बंधनें आपोआपच उद्भवतात. त्यामुळे त्याचा उच्छृंखळपणा आपोआप नाहीसा होतो. तसेंच केवळ स्वतःच्या सुखापुरताच उद्योग करावयाचा ही त्याची पशुबुद्धि हळुहळू कमी होत जाते. इतरांसाठीहि काही तरी कर्तव्य ह्मणून मला करावयाचे आहे ही जाणीव त्याच्या ठिकाणी उद्भवते; व शेवटी स्वतःच्या एकाच देहाशी संलग्न असणारा आकुंचितपणा टाकून देऊन विश्वव्यापक व्हावयाची संधीहि सध्यांच्या समाजरचनेत त्यास प्राप्त होते. अशी ही समाजरचना कोणी जाणूनबुजून निर्माण केली असेल अथवा अनंतकालाच्या अनुभवाने तीस हे स्वरूप प्राप्त झाले असेल. तें कसेंहि असले तरी सांप्रतच्या समाजरचनेचे स्वरूप वर दाखविल्याप्रमाणे झाले आहे ही गोष्ट खरी.

{{gap}}केवळ कर्तव्य ह्मणून कोणतेंहि काम करावयाचें म्हटलें ह्मणजे तो मार्ग अगदी अकंटक नाही असा आपणांस अनुभव येऊ लागतो. ज्या मनुष्याबद्दल आपल्या मनांत यत्किंचिहि प्रेमबुद्धि नाही अशा मनुष्यासाठी एखादें काम कर्तव्य ह्मणून करण्याची वेळ आली ह्मणजे आपल्या मनाची स्थिति कशी होते ती अनुभवानेच जाणिली पाहिजे. गाडीच्या चाकाला वंगण नसले ह्मणजे प्रत्येक फेरीला जसें तें कर्णकटु आवाज काढिते तसेंच आपले मनहि अशा प्रसंगी हरघडी आपणाशी भांडूं लागते. केवळ प्रेमाच्या वंगणाने हे कर्मचक्र सुरळीत चालते. हे वंगण मनुष्याजवळ नसते तर आईबाप मुलांसाठी ज्या खस्ता खातात, पुरुष पत्नीसाठी जो स्वतःला प्रसंगी विकूनहि घेतो ते त्याने केले असते काय? जेथे प्रेमाचा अभाव असतो, अशा एखाद्या कुटुंबात होणारे तमाशे आपण नेहमी पहातोंच. केवळ प्रेमामुळेच आपला कर्तव्यमार्ग सुखकर होतो; आणि प्रेमाचा प्रवाह ज्या मानाने अनिरुद्ध व स्वतंत्रपणे चालेल त्या मानानें तो अधिक अधिक विस्तृत व खोल होत जातो. येथे अनिरुद्धता-स्वतंत्रता-ह्मणजे काय याचा विचार केला पाहिजे. इंद्रियजन्य सुखासाठी त्यांचा गुलाम होऊन राहणे, क्रोधास वश होणे व व्यवहारांत नित्य उद्भवणाऱ्या हजारों विकारांस बळी पडणे हे स्वातंत्र्य आहे काय? अगदी<noinclude></noinclude>
nx4g9ows9zgizbi4qnhrsxomdsakuyf
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/121
104
63391
229259
157821
2026-04-14T09:37:49Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229259
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|९३ }}
{{rule}}</noinclude>खालच्या पायरीच्या मनुष्याच्या दृष्टीने स्वातंत्र्याचा असाच अर्थ असतो असें वाटते. त्याच्या इंद्रियजन्यसुखतृप्तीच्या आड कांहीं आलें तर तो आपलें स्वातंत्र्य गमावलें ह्मणून शेंडी उपटण्याच्या बेतास येतो; पण वास्तविक विचार केला तर हे स्वातंत्र्यहि नव्हे आणि ही अनिरुद्धताहि नव्हे. अशा प्रसंगी सहनशीलता दाखविणे हे खरे स्वातंत्र्य प्रगट करणे होय. परक्यासाठी स्वतःच्या क्रोधादि भावनांवर ज्याचा पूर्ण ताबा चालतो तो परतंत्र नसून स्वतंत्र आहे- गुलाम नसून धनी आहे- असे समजावें. पतीने एखादी गोष्ट अपल्या मनासारखी केली नाही असे वाटतां क्षणींच स्वातंत्र्य गेलें ह्मणून ओरड करणारी स्त्री स्वतःच्या क्षुद्र मनोविकारांची पक्की दासी बनलेली असते. तिला खऱ्या स्वातंत्र्याची प्राप्ति स्वप्नांतहि शक्य नाही. आपल्या स्त्रीस सदोदित नांवें ठेवीत असलेल्या पुरुषाचीहि स्थिति वास्तविक अशीच आहे. केव्हांहि परद्वार न करणे हे स्त्रीपुरुषाचे पहिले कर्तव्य आहे. खऱ्या पतिव्रतेच्या प्रेमाचा प्रभावच असा आहे की पुरुष कितीहि बिघडला असला तरी तिच्या अमृततुल्य मधुर वाणीने तो सन्मार्गवर्ती झाल्यावांचून राहणार नाही. स्त्रीच्या शुद्ध आणि क्षमाशील वर्तनाने ज्याचे हृदय यत्किचितहि द्रवणार नाही, इतका पशुतुल्य मनुष्य क्वचितच असेल. खरोखर, जग अद्यापि इतकें बिघडलेले नाही. पुरुष जात भ्रष्ट व पशुतुल्य झाली आहे अशी ओरड आपण सर्वत्र ऐकतों, परंतु स्त्रियांच्या संबंधाने विचार केला तर बऱ्याच स्त्रियांवरहि हा आक्षेप लागू होणार नाही काय? स्त्रिया तोंडाने बोलून दाखवितात तितक्या जर त्या खरोखर पवित्र असत्या तर सर्व जगांत एकहि वाईट पुरुष सांपडताना; याबद्दल माझी पूर्ण खात्री आहे. पावित्र्याला अजिंक्य असा एकहि दुर्गुण जगांत नाही. स्वतःच्या पतीशिवाय इतर सर्व पुरुषांकडे केवळ पुत्रदृष्टीने अवलोकन करावयाचें इतकी जिची दृष्टि पवित्र झाली आहे तिला भ्रष्ट करण्याला चंग बांधून कोणी आला तरी तिच्या समोर आल्याबरोबर त्याचे अपवित्र विचार मावळून तो तिजकडे केवळ मातृभावानेच अवलोकन करील. पतिव्रता अनसूयेच्या गोष्टीचें तात्पर्य हेच आहे. त्याचप्रमाणे स्वतःच्या पत्नीशिवाय इतर सर्व स्त्रीजातीकडे केवळ मातृभावाने अगर भगिनीभावाने अवलोकन करावयाचे असें पुरुषाने आपले वर्तन ठेविले पाहिजे. तसेंच धर्मज्ञान देण्याचे ज्याने पत्करिले असेल त्याने सर्व स्त्रियांस मातेसमान पूज्य मानून तदनुरूप प्रत्येक स्त्रीशी आपले वर्तन ठेविले पाहिजे.{{nop}}<noinclude></noinclude>
i0hfixrseogf1rfbb0e7gqqg8r4o06g
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/122
104
63392
229260
157825
2026-04-14T09:41:27Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229260
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|९४ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>{{gap}}मातृत्व हे सर्व जगांत अत्यंत श्रेष्ठ असें मानिले आहे. स्वार्थ अथवा आपलपोटेपणा विसरावयास शिकावयाचे असेल तर तें मातेपाशी शिकावें. ईश्वरीप्रेमावांचून दुसरे कोणतेंहि जगांतील प्रेम मातृप्रेमापेक्षा श्रेष्ट नाही. मातृप्रेमाहून प्रेमाचे इतर सर्व प्रकार निःसंशय हलक्या प्रतीचे आहेत. स्वतःच्या सुखाकडे न पाहतां आपल्या मुलांच्या सुखाकडे प्रथम लक्ष्य पुरविणे हे मातेचे आद्यकर्तव्य आहे. मुलांच्या सुखाकडे प्रथम लक्ष्य न पुरवितां जी आईबापें स्वसुखार्थ अत्यंत दक्ष असतात ती जवळ जवळ पशुपक्ष्यांच्या कोटींत बसविण्यास योग्य आहेत असे समजावें. पिलांना पंख फुटून ती स्वरक्षणास योग्य झालीं ह्मणजे ज्याप्रमाणे आईबाप व पिलें ही परस्परांची ओळख विसरतात त्याचप्रमाणे मुलें मोठी व मिळविती झाली ह्मणजे आईबापांनी घालून दिलेला धडा गिरवून वृद्ध मातापित्यांकडे ती दुर्लक्ष्य करितात. परमेश्वराचें सृष्टीवरील प्रेमच स्त्रीरूपाने उद्भवले आहे असें ज्या पुरुषास वाटतें तो पुरुष धन्य होय! परमेश्वराचें पितृत्व पुरुषरूपाने व्यक्त झाले आहे असें ज्या स्त्रीस वाटते ती स्त्री धन्य होय! आणि मातापितरें ही खचित परमेश्वररूपेंच आहेत असा ज्या मुलांचा निश्चय आहे ती मुलेंहि धन्य होत !

{{gap}}आत्मविकासाचा निश्चित मार्ग ह्मटला ह्मणजे प्राप्तकर्तव्ये निश्चयाने पार पाडण्यास प्रथम शिकले पाहिजे. अशी कर्तव्ये करीत असतां निश्चय पक्का होत गेला ह्मणजे आत्मश्रद्धा व निश्चयाचे बळ ही वाढत जातात व त्यांमुळे स्थितप्रज्ञाची स्थिति प्राप्त होते. याविषयीं महाभारतांत एक कथा आहे ती मी आपणांस सांगतो. एकेवेळी एक तरुण संन्यासी अरण्यांत तप आचरीत होता. बरीच वर्षे योगसाधन केल्यानंतर एके दिवशी तो एका वृक्षाखाली बसला असतां वरून कांही वाळलेली पाने व काटक्या त्याच्या अंगावर पडल्या. तेव्हा त्याने वर पाहिलें तो दोन पक्षी भांडत असलेले त्याच्या दृष्टीस पडले. त्यांजकड पाहून संन्याशास क्रोध येऊन तो ह्मणाला, 'अरे, मी खाली बसलो असता मला त्रास देण्यास तुमची छाती तरी कशी झाली?' असें ह्मणून मोठ्या क्रोधाने त्या पक्ष्यांकडे त्याने अवलोकन केले. त्यावेळी त्याच्या ठिकाणी असलेले योगसामर्थ्य अग्निज्वालेच्या रूपाने प्रगट होऊन क्षणार्धात ते बिचारे पक्षी जळून भस्म झाले! स्वतःच्या तपःसामर्थ्याची ही प्रतीति पाहून त्या योग्यास मोठा हर्ष झाला. काही वेळानें तो नेहमीप्रमाणे भिक्षा मागण्यास गांवांत गेला. गांवांतील एका घरी जाऊन 'माई, भिक्षा लाव' असा त्याने पुकारा केला. 'बावाजी,<noinclude></noinclude>
ccsn3ivd0jhuyucigvsqdyuiligg2xm
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/123
104
63393
229261
157826
2026-04-14T09:43:31Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229261
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|९५ }}
{{rule}}</noinclude>जरा धीर धरा.' असा आतून आवाज आला. संन्यासी मनांतल्या मनांत फार संतप्त होऊन ह्मणाला 'अग भिकारडे, मला वाट पहायला लावतेस काय? तुला अद्यापि माझ्या सामर्थ्यांचा प्रभाव कळला नाही ह्मणून तूं इतकी उद्दाम झालीस अं!' अशा प्रकारे तो मनांत विचार करीत आहे इतक्यांत आंतून पुन्हां आवाज निघाला. 'यतिराज, इतका अहंकार असणे अनुचित आहे. मी रानांतील पक्षी नव्हें." हे शब्द ऐकून संन्यासी अगदी चकित झाला. परंतु तेथून निघून न जातां तो तसाच वाट पाहत उभा राहिला. आणखी कांही वेळ गेल्यानंतर आंतून बोलणारी स्त्री भिक्षान्न घेऊन आली. तिजकडे पाहून मनांत ओशाळलेला तो संन्यासी तिला वंदन करून ह्मणाला 'माते, रानांतील हकीगत तुला कशी समजली?' ती स्त्री ह्मणाली, 'माझ्या मुला, तुझा योगबीग मला काही समजत नाही. अगदी सामान्यप्रतीची अशी मी एक स्त्री आहे. माझे पति थोडेसे आजारी असल्यामुळे त्यांची शुश्रूषा मी करीत होते, इतक्यांत तूं आलास. त्यामुळे त्यांचे पथ्यपाणी होईपर्यंत तुला थांबावयास सांगणे मला भाग पडले. माझ्या पत्नित्वाची कर्तव्ये उत्तम पार पाडावी इतकेंच मला समजतें. आणि आजपर्यंत सर्वजन्म मी तेवढेच करीत आहे. माझे लग्न झाले नव्हते तेव्हां कन्या या नात्याने माझ्या मातापितरांची मी सेवा केली. लग्न झाल्यापासून माझ्या प्रिय पतीची सेवा मी करीत आहे. माझें योगसाधन ह्मणशील तर इतकेंच. मला सध्या जे काही थोडेबहुत ज्ञान प्राप्त झाले आहे तें या सेवेमुळेच होय. त्या ज्ञानानेच रानांतील सर्व इतिवृत्त मला कळलें. तुला याहून कांहीं अधिक जाणण्याची इच्छा असली तर... गांवीं एक व्याध असतो त्याची भेट घे ह्मणजे तुझी इच्छा तृप्त होईल. बाजारांत चवाठ्यावर त्याचे दुकान आहे.' व्याधाचें नांव ऐकून तो तरुण संन्यासी मनांत प्रथम थोडा खजील झाला; परंतु त्यावेळेपर्यंत जे कांही त्याच्या अवलोकनांत आले होते, त्यामुळे उत्पन्न झालेली त्याची जिज्ञासा त्याला स्वस्थ बसू देईना. तो तेथून निघून त्या स्त्रीने सांगितलेल्या गांवीं गेला व बाजारांत जाऊन त्या व्याधाचे दुकान त्याने शोधून काढले. दुकानांत एक भला लठ्ठ व्याध हाती मोठा सुरा घेऊन बसला आहे व मांसाचा विक्रय करीत आहे असें त्याच्या दृष्टीस पडले. त्याला पाहून संन्यासी मनांत ह्मणाला, 'देवा! आतां या खाटकापासून ज्ञानप्राप्ति होणार.! हा तर निव्वळ यमदूत दिसतो. तो असा विचार करीत आहे, इतक्यांत त्या व्याधाचीहि नजर संन्याशाकडे जाऊन त्याने पटले, "स्वामी महाराज, आपणास... गांवच्या एका<noinclude></noinclude>
bwz9gx3jhg1lw256jcjabqe9hh54ac9
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/124
104
63394
229262
157827
2026-04-14T09:45:54Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229262
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|९६ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>स्त्रीने मजकडे पाठविले आहे, नाहीं बरें? आपण कृपा करून जरा थांबा. थोड्या वेळाने दुकान बंद करून आपण घरी जाऊं.' आतां येथे कोणता चमत्कार नजरेस पडणार याचा आपल्या मनाशी विचार करीत तो संन्यासी तेथे उभा राहिला. थोड्या वेळाने येण्याचे बंद झाले तेव्हां दुकान बंद करून व्याध त्या संन्याशाला बरोबर घेऊन आपल्या घरी गेला. ओसरीवर कांहीं बसावयास घालून व त्या संन्याशाला त्यावर बसवून व्याध आंत गेला. आंत जाऊन आपल्या वृद्ध मातापितरांस त्याने स्नान घातले व नंतर जेवू घालून ती तृप्त झाल्यानंतर तो बाहेर संन्याशाजवळ येऊन ह्मणाला, 'स्वामीमहाराज, आपण येथपर्यंत येण्याची तसदी घेतली, हा मजवर मोठा अनुग्रह आहे. आतां आपली कोणत्या प्रकारची सेवा करूं याबद्दल आज्ञा व्हावी.' यानंतर संन्याशाने अध्यात्मवियेतील अनेक कूट प्रश्न त्यास केले व व्याधाने त्या सर्वांची समर्पक उत्तरे दिली. तो कथाभाग वेदांतरसाने ओथंबलेला असून त्यालाच महाभारतांत व्याधगीता असें नांव आहे. त्या व्याधाचें तें ज्ञान पाहून संन्यासी अगदी थक्क होऊन त्याला ह्मणाला, 'तुह्मांस एवढ्या विमल ज्ञानाची प्राप्ति झाली असतां व्याधजातींत तुमचा जन्म का झाला? आणि तसा जन्म झाला असला तरी मांस विकण्याचे ओंगळ कर्म तुह्मीं कां करतां?' व्याध ह्मणाला, 'माझ्या बेटा, अमुक कर्म चांगलें, आणि अमुक कर्म वाईट ह्मणणे ही दृष्टीच खोटी आहे. जगांतील कोणतेंहि कर्तव्य वाईट अथवा अमंगल नाही. पूर्वकर्मानुसार मला ज्या परिस्थितीत जन्म आला, त्या परिस्थितीची कर्तव्येहि मला जन्मादारभ्यच प्राप्त झाली आहेत. लहानपणी मी हाच धंदा शिकलो. या धंद्यांत होणाऱ्या नफ्याने जसा मला आनंद होत नाही तसाच प्रसंगी होणाऱ्या तोट्याने मला शोकहि होत नाही.या दोहोंपासूनही अलिप्त राहून मी माझें कर्तव्य उत्तम प्रकारें बजावितों. गृहस्थाश्रमाला अनुरूप अशी माझी कर्तव्ये नीट संभाळून माझ्या मातापितरांची मी सेवा करतो. मी कसल्याहि प्रकारचे योगसाधन करीत नाही अथवा मी संन्यासीहि झाला नाही हे तुला दिसतच आहे. मला जे काही थोडे फार ज्ञान प्राप्त झाले आहे तें मी आपली कर्तव्यकर्मे अलिप्तपणे परंतु उत्तम रीतीने पार पाडल्यामुळेच प्राप्त झाले आहे.

{{gap}}हिंदुस्थानांत सध्या एक महायोगी राहत आहेत. माझ्या साऱ्या आयुष्यांत त्यांच्या तोडीची विभूति माझ्या पहाण्यांत आली नाही. त्यांची वृत्ति थोडी विलक्षण आहे. कोणी काही प्रश्न विचारला तर ते त्याचे सरळ उत्तर ताबडतोब कधींच देणार नाहीत, कोणाचा गुरु होण्याची आपली योग्यताच नाही असें<noinclude></noinclude>
8dbg9lprqbq8xx2t6e3s5z9yzo3nf32
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/125
104
63395
229263
157828
2026-04-14T09:48:48Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229263
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|९७ }}
{{rule}}</noinclude>त्यांस वाटते. परंतु एखादा प्रश्न विचारून काही दिवस तुह्मी वाट पाहात बसलां तर एखादे दिवशी बोलण्याच्या ओघांत तुमच्या प्रश्नाचे उत्तर ते अशा प्रकारे देतील की अननुभूत अशी ज्ञानप्राप्ति आपणांस झाली असें तुह्मांला वाटेल. कर्माचें मुख्य रहस्य काय असा प्रश्न त्यांना मी एक वेळ केला. काही दिवसांनी ते सहज एकदां ह्मणाले, "साध्य आणि साधनें ही चित्तांत एकरूप झालेली असावी." याचा अर्थ असा आहे की ज्यावेळी तुह्मीं कांहीं कार्य करीत असाल त्या वेळी साध्य आणि साधनें यांशिवाय इतर कोणत्याहि गोष्टीचा विचार करूं नका. साधनांनी साध्य सिद्ध होईपर्यंत मध्यंतरी जो वेळ जातो त्या वेळांत इतर भलत्याच गोष्टीचा विचार करूं नका. व्याधाच्या गोष्टींतील तात्पर्य हेच आहे. प्राप्तकर्तव्य उत्तम रीतीने पार पाडणे हीच परमेश्वराची पूजा करण्याचा उच्च मार्ग आहे. अशा रीतीने प्रत्येक कर्म ह्मणजे त्याचे पूजन, आणि त्याचे आज्ञापालन आहे अशी भावना पक्की झाली ह्मणजे ज्ञान आपोआप प्राप्त होऊ लागते. आपली परिस्थिति आणि आपला दर्जा यांस अनुरूप अशी जी प्राप्तकर्तव्ये असतील ती निष्काम मनानें-अलिप्तपणानें-पार पाडली म्हणजे अशा कर्मातून ज्ञान उदय पावू लागतें, व ज्ञानाने आत्म्यास मोक्ष मिळतो.

{{gap}}ज्याच्या हृदयांत फलापेक्षा आहे, अशा मनुष्याच्या हातून आनंदी वृत्तीने कोणतेंहि काम होणे शक्यच नाही. जरा कोठे कांही अडचण आल्याचा भास झाला, की अशा मनुष्याचे डोके ठिकाणावर राहत नाही. यामुळे ज्ञानप्राप्तीचा प्रसंग आला तरी तो वाया जातो. ज्याला फलापेक्षा नाही त्याला सर्व कर्तव्ये सारख्याच योग्यतेची वाटतात. यामुळे प्रचंड उद्योग करीत असतांहि एखाद्या गुहेत राहिल्याप्रमाणे निःसीम शांतता त्याच्या हृदयांत वास करिते. यामुळेच त्याचे प्रत्येक कर्म ह्मणजे तीक्ष्ण हत्यारच होऊन बसते; व या हत्याराने स्वार्थ आणि इंद्रियसुखलोलुपता यांचा समूळ उच्छेद करून तो ज्ञानवान् होतो. ''''यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्प वर्जिताः। ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पंडितं बुधाः॥'''' अशी पंडिताची व्याख्या भगवान् श्रीकृष्णांनी केली आहे. स्वतःच्या ज्ञानाबद्दल घमेंड वाटणे हा मनुष्यजातीचा सामान्य स्वभाव आहे. यामुळे कोणतेंहि कर्तव्य प्राप्त झालें ह्मणजे तें कमी दर्जाचें असें आपणांस वाटते. परंतु कर्माची वाटणी योग्यतेनुरूपच झालेली असते, हा त्रिकालाबाधित सिद्धांत आपणांस ठाऊक नसतो. अथवा ठाऊक असला तरी 'मी मोठा' या भावनेने अंध झालेल्या मनुष्यास तो दिसत नाही. मोठेपणाच्या भावनेने मोह पावलेल्या बुद्धीला या<noinclude>
{{gap}}स्वा. वि. ७</noinclude>
ayk50nedc1omn5h1u2o8y98g428066t
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/126
104
63396
229264
157852
2026-04-14T09:52:19Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229264
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|९८ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>सिद्धांताचा उमजच पडत नाही. यामुळेच नित्य व्यवहारांत चढाओढ सुरू होते. अगोदरच मोहाने व्यापलेली बुद्धि चढाओढीने अधिक भ्रष्ट होते व राग, द्वेष, असूया इत्यादिकांचा प्रवेश होण्याजोगें महाद्वार तेथे उघडतें. रागद्वेषांचा प्रवेश बुद्धीत झाल्याबरोबर दयाक्षमादि दैवी गुणांचा झरा कोरडा होतो. कुरकुऱ्या स्वभावाच्या मनुष्याला जगांतील प्रत्येक कर्म नावडतेंच असतें. त्याला कोणी राजा केले तरी तो रडणार! आणि रंकाच्या अवस्थेचाहि त्याला हेवा वाटणार! अशा मनुष्याच्या हातून कर्तबगारी ती कशाची होणार! यासाठी प्राप्तकर्तव्ये आनंदाने आणि नेटाने पार पाडून आपण ज्ञानवान् होऊ या. आपण ज्ञानवान् झालों ह्मणजे मोक्ष आपल्या मागच्या दारीच आहे.

{{rule|6em}}

{{center|{{x-larger|प्रकरण ५ वें.}}}} {{center|'''परोपकार स्वतःसच कल्याणप्रद आहे.'''}}
{{gap}}आपल्या आध्यात्मिक उन्नतीस कर्मयोग किती पोषक आहे याचा विचार पुढे चालू करण्यापूर्वी 'कर्म' या एका शब्दांत ज्या अनेक कल्पनांचा अंतर्भाव आह्मी हिंदुलोक करितों, त्यांपैकी आणखी एक कल्पना तुह्मांस प्रथम सांगणे इष्ट आहे. प्रत्येक धर्माची प्रमुख अशी तीन अंगें असतात. तत्वविचार, पुराणे अथवा दंतकथा आणि आचार. यांपैकी तत्वविचार हा भाग सर्वात अत्यंत महत्वाचा असतो हे उघड आहे. तत्वविचारांत ज्या तत्वांचे उद्घाटन असते त्यांचे प्रत्यक्ष आचरण कसे करावे याचा बोध दंतकथा व काल्पनिक गोष्टी यांवरून होतो. ठराविक आचारांमुळे तत्वविचारांस प्रत्यक्ष दृश्य स्वरूप येते. किंबहुना, आचार हे अमूर्त तत्वविचारांचे मूर्त रूपच होय. अगदी सामान्य बुद्धीच्या मनुष्यास आचारामुळे तत्वविचारांचे आकलन करणे सोपे जाते. कर्म या शब्दात अशा प्रकारच्या आचारांचा अंतर्भाव होतो. प्रत्येक धर्ममार्गात अशा प्रकारच्या आचारांची जरूर असते. आमची बुद्धि विचाराने तीव्र होईपर्यंत केवळ भावरूप सिद्धांताचें पूर्ण आकलन करण्याची तिला शक्ति नस. कोणताहि विषय लवकर कळतो असे आपल्या अहंकारामुळे आपणास वाटत असते; परंतु प्रत्यक्ष प्रसंग आला ह्मणजे निव्वळ भावरूप सिद्धांतापुढे आपल्या बुद्धीची कशी त्रेधा उडते हे अनुभवानेच कळण्याजोगे आहे. या कारणामुळे प्रत्येक धर्मात काही विशिष्ट खुणा अथवा चिन्हें यांचा उपयोग केलेला असतो. या चिन्हांच्या<noinclude></noinclude>
7w3dt9tsp6kteb4naqq4c3bovhv4r21
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/127
104
63397
229265
157853
2026-04-14T09:58:31Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229265
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|९९ }}
{{rule}}</noinclude>साहाय्याने आपला मार्ग बराच सोपा होतो. सर्व धर्मात आणि सर्वकाळी अशा प्रकारच्या काही विशिष्ट चिन्हांची योजना केलेली आहे. फार काय पण विशिष्ट चिन्हांवांचून तत्वविचार मनांत आणणेहि अशक्य आहे. शब्दसृष्टि ही विचारांची चिन्हेंच आहेत असें ह्मणावयास हरकत नाही. किंबहुना, सर्व दृश्य विश्वांतील प्रत्येक पदार्थ हे एक चिन्हच आहे. अदृश्य चैतन्यात्मक अधिष्ठानावर ही सर्व दृश्य सृष्टि उत्पन्न झाली आहे. ह्मणजे अदृश्य परमेश्वराचें सृष्टि हे दृश्य चिन्ह आहे. अशा रीतीने अस्तित्वात आलेली चिन्हसृष्टि ही केवळ मनुष्यकृतच आहे असें नाही. एखाद्या धर्माचे काही विद्वान एकत्र जमले आणि त्यांनी ही चिन्हें एकत्र विचार करून तयार केली असें नाही. अनेक सृष्ट पदार्थाप्रमाणेच या चिन्हांचीहि आपोआप वाढ झालेली आहे. असे नसते तर काही विशिष्ट चिन्हें पाहून अनेक व्यक्तींच्या चित्तांत एकाच प्रकारच्या कल्पना उद्भवल्या नसत्या. कित्येक चिन्हांचा तर सर्वत्र आणि सर्वकालीं सारखाच उपयोग होत असल्याचे आढळून येते. ख्रिस्तीधर्माच्या उदयाबरोबर क्रुसाचे चिन्ह प्रचारांत आले असावे असा तुह्मांपैकी बऱ्याचजणांचा समज असेल; पण वस्तुस्थिति तशी नाही. ख्रिस्तीधर्म जन्मास येण्यापूर्वी व मोझेसच्याहि जन्माच्या पूर्वी, वेदप्रचारांत आले नव्हते तेव्हांहि हे चिन्ह अस्तित्वात होते; इतकेच नव्हे पण मनुष्यकृतीची कोणतीहि नोंद नव्हती तेव्हांहि हे चिन्ह अस्तित्वात होतें. फिनीशियन आणि अॅझटेक्स लोकांतहि या चिन्हाचा उपयोग होत असल्याचे आढळतें. जगांतील सर्व जातीच्या लोकांस थोड्याशा फरकाने हे क्रुसाचे चिन्ह ठाऊक होते. त्याचप्रमाणे वर्तुळाचे चिन्हहि फार प्राचीनकाळापासून सर्वत्र प्रचारात असल्याचे आढळते. त्याचप्रमाणे स्वस्तिकाची आकृतीहि बहुधा सर्व देशांत आणि सर्वकाळी आढळते. बौद्धधर्माच्या प्रसाराबरोबर स्वस्तिकाच्या चिन्हाचा प्रसार झाला असावा असा समज होता; परंतु बुद्धाच्या जन्माच्याहि अगोदर या चिन्हाचा सर्वत्र उपयोग होत होता, असे आढळून आले आहे. जुन्या बाबिलोन आणि मिसर देशांत हे चिन्ह अस्तित्वात होते. ही चिन्हें कोणी विशिष्ट व्यक्तींनी विशिष्ट कारणापुरतीच प्रचारांत आणली नसावीं एवढी गोष्ट या हकीगतीवरून सिद्ध होते; एवढे नव्हे, तर मानवी मन आणि चिन्हें यांमध्ये काही तरी अदृश्य संकेत असावा असे वाटते. अशीच गोष्ट भाषेचीहि आहे. चार पुऱ्याांनी जमून अमक्या पदार्थास अमुक ह्मणावें असें ठरविल्याचे कोणास माहीत नाही. भाषेची रचना अशाप्रकारे झालीच नाही. तिची उत्पत्ति<noinclude></noinclude>
76mpud1vf1zuxd0vpnxdpb1apr2tq04
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/128
104
63398
229266
157854
2026-04-14T10:09:37Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229266
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१०० |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>आणि वाढ ही मनुष्यजातीबरोवर आपोआपच झाली आहेत. ज्या कल्पनेला शब्द नाही अशी कल्पना अस्तित्वांतच आली नाही; तसेंच जे शब्द प्रचारांत आले ते कल्पनेवांचून आलेले नाहीत. कल्पना आणि शब्द यांचे अविभाज्य संमेलन झालेले आहे. यांस केव्हांहि विभक्त करता येणार नाही. कल्पना व्यक्त करण्याकरितां दोन प्रकारच्या चिन्हांचा उपयोग होतो. एक प्रकार ध्वनिचिन्हांचा, आणि दुसरा वर्णचिन्हांचा. जन्मापासून बहिरे आणि मुके अशा लोकांस ध्वनिचिन्हांचा काही उपयोग नाही. त्यांना ध्वनिचिन्हांहून निराळ्या चिन्हांचा उपयोग करावा लागतो. जो जो विचार मनात येतो त्याचे दृश्यचित्र मनःपटावर ताबडतोब उमटते. पर्वताचें, नदीचे अथवा दुसरें कसले तरी चित्र काढावयाचे एखाद्या चिताऱ्याच्या मनांत आले तर कागदाला त्याची कुंचली लागण्यापूर्वी तें सर्व चित्र पूर्णपणे त्याच्या चित्तपटावर प्रथम रंगविले जाते व नंतर त्याची नक्कल तो कागदावर काढितो. अशाप्रकारे मनःपटावर प्रत्येक विचाराचे दृश्य स्वरूप प्रथम चित्रित होते. या चित्राला आर्यतत्वज्ञांनी नाम-रूप अशी संज्ञा दिली आहे. ज्याप्रमाणे काही विशिष्ट मनुष्यांनी भाषा निर्माण केलेली नाही, त्याचप्रमाणे चिन्हेंहि कोणी निर्माण केलेली नाहीत. धर्मतत्वांचा प्रत्यक्ष आचार सुरू होतांच त्याबरोबर विशिष्ट चिन्हेंहि आपोआप प्रचारांत येत गेली. धर्माचे विशिष्ट आचार आणि देवळे, मशिदी वगैरे विशिष्ट जागा असण्याचे काय कारण आहे, असा प्रश्न अलीकडे अनेक लोक करितात. धर्मविचारांत तान्ह्या मुलांपेक्षा ज्यांची योग्यता अधिक नाही, अशा लोकांनाहि धर्मविषयक हवे ते प्रश्न विचारण्याची जणूं काय पूर्ण मुभा मिळाली आहे! तथापि देवळांत जाऊन मूर्तीस नमस्कार करणाऱ्या अथवा प्रार्थना करणाऱ्या लोकांच्या वर्तणुकीची, तसे न करण्यांत अभिमान बाळगणाऱ्या लोकांच्या वर्तणुकीशी सूक्ष्म तुलना केली तर त्यांजमधील फरक कळतो. देवळे व पूर्वी सांगितलेली चिन्हें यांच्या संबंधी ज्या विशिष्ट भावना मानवी मनोवृत्तीत अत्यंत संलग्न आहेत, त्या देवळात जाण्याबरोबर अथवा चिन्हदर्शनाबरोबर जागृत होऊन त्यांचा परिणाम चित्तावर होतो. याकरितां अशाप्रकारच्या विशिष्ट चिन्हांचा त्याग करणे युक्त नाही. चिन्हांचा वास्तविक अर्थ समजून त्यांचा उपयोग करणे हाहि कर्मयोगाचाच एक भाग आहे.

{{gap}}कर्मयोगशास्त्रांत महत्वाची अशी दुसरी अनेक अंगें अंतर्भूत होतात. विचार आणि उच्चार यांजमधील परस्पर संबंध काय आहेत व उच्चारांत ह्मणजे विचा-<noinclude></noinclude>
ri1otcoek75hune6bves2a4ebi5jqrv
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/129
104
63399
229267
157855
2026-04-14T10:18:02Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229267
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|१०१}}
{{rule}}</noinclude>राच्या शब्दस्वरूपांत काय सामर्थ्य आहे यांचा निश्चय करणे हे कर्मयोगाचेच एक अंग आहे. प्रत्येक धर्मात शब्दाचे अतिशय महत्व मानण्यांत आले आहे; इतकें की 'आरंभी शब्द होता, आणि शब्दांतून सृष्टि निर्माण झाली' असें कित्येक तत्त्ववेत्त्यांनी अनुमान केले आहे. परमेश्वराच्या चित्तांत उद्भूत झालेला विचार शब्दरूपाने बाहेर पडताक्षणीच त्याने सृष्टीचे रूप धारण केले. परमेश्वराच्या मनांत प्रथम विचार उद्भवला. विचाराचें इच्छेत रूपांतर झाले. इच्छेने शब्द उत्पन्न झाला आणि त्याने सृष्टीचे रूप धारण केले अशी सृष्टीची उपपत्ति कांहीं तत्वज्ञ सांगतात. वारंवार जूं घांसल्यामुळे बैलाच्या मानेस घट्टा पडून जसे तेथील ज्ञानतंतू मरून गेलेले असतात, तसेच आपले ज्ञानतंतूहि चालू व्यवहाराच्या रोजच्या घर्षणाने मठ्ठ बनतात. जो जो वृद्धापकाल अधिक होतो तो तों हा मठ्ठपणा वाढतच जातो. तशांतून सांप्रतच्या काळी जडवाद अधिक मोहकरूपाने नटलेला असल्यामुळे आपल्या ज्ञानदृष्टीवर एक आवरण अधिकच पडल्यासारखे झाले आहे. यामुळे आपल्या सभोंवतीं प्रत्यहीं घडणाऱ्या गोष्टींचे नुसतें महत्वहि आपणांस समजत नाहींसें होतें. तथापि मनुष्य कितीहि मठ्ठ असला तरी कित्येकवेळां असे काही चमत्कारिक प्रकार घडून येतात की त्याची जिज्ञासा जागृत झाल्यावांचून राहत नाही. अमुक गोष्ट अशी कां घडली हा विचार मनावर वारंवार आघात करून निद्रित जिज्ञासेस जागृत करितो. जिज्ञासा जागृत होणे ही ज्ञानार्जनाच्या मार्गातील पहिली पायरी आहे. शब्द आणि सृष्टीची उत्पत्ति यांविषयी जे नुकतेंच विवेचन केले त्यांतील तात्विक विचार क्षणभर बाजूस ठेविले तरी ध्वनिचिन्हांकडून रोजच्या व्यवहारांत बजाविली जाणारी कामगिरी कमी महत्त्वाची आहे असें नाही. याक्षणी मी तुह्मांशी बोलत आहे. तुह्मांपासून मी बऱ्याच अंतरावर आहे. माझा स्पर्श तुह्मांस होत नाही; तथापि माझ्या भाषणाने हवेवर उत्पन्न होणारे तरंग तुमच्या कानांत शिरून मनावर काही परिणाम उत्पन्न करितात. हा परिणाम होण्याचे बंद करणे तुमच्या हातांत नाही. तुह्मांस यत्किचित् स्पशेहि न करितां तुमच्या मनांत मी इतक्या अंतरावरून खळबळ उत्पन्न करू शकतों ही गोष्ट चमत्कारिक नाहीं काय? एक मनुष्य दुसऱ्यास मूर्ख ह्मणतो. इतक्यांत तो दुसरा मनुष्य उभा राहून संतापाने दुसऱ्याच्या तोंडावर मारतो! हे शब्दाचे-ध्वनिचिन्हाचे प्रत्यक्ष सामर्थ्य पहा! एखादी स्त्री दुःखव्याप्त होऊन रडत असली आणि इतक्यांत दुसरी स्त्री येऊन तिने तिच्याशी थोडेसें<noinclude></noinclude>
5lj48ppo8wple4q8phv2ibl3s0v8riy
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/130
104
63400
229268
157856
2026-04-14T10:24:39Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229268
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१०२ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>गोड भाषण केले तर दुःखी स्त्रीचें अवनत मुख एकदम वर होते. तिजकडे पाहावें तो क्षणापूर्वीचा तो म्लान चेहरा जाऊन मंदहास्य त्या जागी विलसूं लागल्याचे आढळून येते. शब्दांत काय सामर्थ्य आहे याचा प्रत्यय याप्रमाणे क्षणोक्षणी आपणांस येतो. तत्वविचारांत काय अथवा सामान्य व्यवहारांत काय शब्दांचें-ध्वनिचिन्हांचें-सामर्थ्य सारखेच प्रकट होते. आपल्या जाग्रदवस्थेत या आपल्या सामर्थ्याचा मन मानेल तसा उपयोग आपण करीत असतो. या शक्तिसंबंधी कसल्याच प्रकारचा विचार आपल्या मनांत येत नाही, किंवा तिचें कांहीं कौतुकहि आपणांस वाटत नाही. आपल्या या सामर्थ्याची उपपत्ति समजून घेऊन तदनुरूप त्याचा योग्य उपयोग करणें हेंहि कर्मयोगाचेंच एक अंग आहे.

{{gap}}रोजचा व्यवहार सुरळीत चालण्याकरितां आपणांस जी कांहीं कर्तव्ये करावी लागतात त्यांचे प्रायः दोन प्रकार आपण कल्पितों. एक स्वतःसाठी करावयाची कर्मे आणि दुसरा प्रकार ह्मणजे लोकांसाठी करावयाची कमें. या दुसऱ्या प्रकारच्या कर्तव्यांस परोपकाराची कामें असें आपण नांव देतो. ही परोपकाराची कामें करीत असतां आपण केवळ लोकांच्याच उपयोगी पडतों असें बाह्यतः दिसते; तरी वस्तुतः आपण आपल्या स्वतःच्या कल्याणासाठीच ती कामें करीत असतो. केवळ परोपकारासाठी काही उद्योग करणे हे चांगले आहे, व प्रत्येकानें ही इच्छा सदोदित करावी हे इष्ट आहे; परंतु परोपकारी कृत्यांचा तत्वदृष्ट्या विचार केला तर आपल्यावांचून जगाचें यत्किंचित्हि अडत नाहीं असें आपणांस दिसून येईल. आपण जन्मास येण्यापूर्वी जग सुरळित चालले होते व आपल्या पाठीमागेंहि तें सुरळीत चालणारच. त्याने आपल्या मदतीची केव्हांहि अपेक्षा केलेली नव्हती व सध्यांहि तें करीत नाही. एका ख्रिस्ती उपदेशकाचें एक धार्मिक प्रवचन माझ्या वाचनात आले. त्यांत तो ह्मणाला, "ही सर्व सुंदर सृष्टि फार चांगली आहे. कारण तिजमुळे परोपकाराची कृत्ये करावयास आपणास संधी मिळते." केवळ वरवर पाहिले तर या विचारांत नाव ठेवण्यासारखे कांही नाही. पण आमच्या मदतीसाठी जग जणू काय वाटच पाहत आहे असा जो ध्वनि या भाषणांत निघतो तो जगाला आणि परंपरेने परमेश्वराला उपमर्दकारक नाहीं काय? जग इतकें लंगडें लुलें आहे काय की, तुमच्या मदतीवांचून त्याचे त्याला काही करता येऊ नये? जग अनंत प्रकारच्या दुःखांनी व्यापिलें आहे ही गोष्ट खरी; व दुःखितांचे संकट नाहीसे करण्यास आपण त्यांस मदत करावी हेहि युक्त आहे. पण त्या आपल्या मदतीचा शेवटी<noinclude></noinclude>
4wmjmk75w5osw3r4xlrjy76h6aqtzz3
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/131
104
63401
229269
157886
2026-04-14T10:26:55Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229269
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|१०३ }}
{{rule}}</noinclude>आपणांसच उपयोग होत असतो ही गोष्ट विसरतां येत नाही. मी लहानपणी कांही पांढरे उंदीर बाळगिले होते. त्यांच्या पिंजऱ्यांत एक पितळेचा रहाट वसविला होता. ते उंदीर त्यावर चढू लागले ह्मणजे तो रहाट गरगर फिरूं लागे. उंदीर जों जों जलदीने पाय उचलीत तों तों रहाट अधिक झपाट्याने फिरूं लागे; परंतु या सर्व गतीचा शेवट पाहिला तर उंदीर आणि रहाट जागच्या जागीच असलेले आढळावयाचे. रहाटावरून पलीकडे जाण्यासाठी निघालेला उंदीर चालून चालून थकला तरी शेवटीं जागच्या जागींच रहावयाचा. जगाच्या कल्याणासाठी हाती वीरकंकण बांधून निघालेल्याची गोष्टहि अशीच आहे. अशा कृत्यांचा वास्तविक उपयोग म्हटला तर ती करणाराची नीतिमत्ता सुधारते व दृढ होते, हा होय. तत्वदृष्टया जगाला चांगले अथवा वाईट असें कांहीं निश्चित स्वरूपच नाही. जो ज्या दृष्टीने त्याजकडे अवलोकन करितो त्याप्रमाणे तें त्यास दिसते. ''''ना जानुं तेरा राम कैसा है'''' असे कोणी कबीरास म्हटलें तेव्हां त्यावर त्याने उत्तर दिले ''''राम जैसेकू वैसाहै.'''' हीच गोष्ट जगासहि पूर्णपणे लागू पडते. या दृष्टीने पाहतां प्रत्येक मनुष्य आपल्या स्वतःचे निराळेंच जग निर्माण करीत असतो असें ह्मणण्यास प्रत्यवाय नाही. जन्मांधाला दृक्प्रत्यय नसल्यामुळे जग थंड आहे, उष्ण आहे, कठीण आहे अथवा मृदु आहे, अशा प्रकारचा स्पर्शानुभव तो जगाविषयी सांगेल. एकाच मनुष्याविषयी विचार केला तरी त्याचे निश्चित स्वरूप अमुक असें ठरविता येणार नाही. एक ह्मणेल, 'हा लुच्चा आहे.' दुसरा ह्मणेल, 'हा चांगला मनुष्य आहे.' तिसरा ह्मणेल, 'हा फार प्रेमळ आहे.' चवथा ह्मणेल, ' हा दुष्ट आहे.' याचा अर्थ इतकाच की, त्या विशिष्ट मनुष्याविषयी ज्याला जसा अनुभव असेल तसें तो त्याचे स्वरूप समजेल. वस्तुतः आपण मनुष्य ह्मणजे सुखदुःखाचे डोल्हारे आहों; आपण ह्मणजे सुखाची आणि दुःखाची रहावयाची घरे. या माझ्या ह्मणण्याचा अनुभव आपल्या आयुष्यात आपणांस हजारों वेळ आला असेल. तरुण पुरुष आशावादी आणि ह्मातारी माणसें निराशावादी असावयाची असा सामान्य नियम आहे. तरुणांपुढे आयुष्याचा बराच काळ शिल्लक असतो; आपले आयुष्य निघून गेलें ही जाणीव वृद्धांत असते. आपल्या पुढील काळांत आपल्या इच्छा तृप्त होतील असा भरंवसा तरुणाच्या हृदयांत असतो, आणि अतृप्त राहिलेल्या आशा वृद्धाच्या हृदयास आंच लावीत असतात. वास्तविक विचार केला तर अशा निरनिराळ्या अवस्थांतले तरुण काय अथवा वृद्ध काय, सारखेच मूर्ख असतात.<noinclude></noinclude>
4ce0pq2cblig8oip3ku5hzhcl0di1oc
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/132
104
63402
229270
157888
2026-04-14T10:29:19Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229270
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१०४ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>आपण ज्या दृष्टीने विचार करितों तीप्रमाणे आपले चरित्र सुखाचे अथवा दुःखाचें असें आपणांस वाटते. सुख अथवा दुःख वस्तुगत नसून आत्मगत आहे. ही जाणीव नसल्यामुळे अमुक जीवित सुखाचे आणि अमुक दुःखाचें अशी भावना करून कोणी हंसत असतो आणि कोणी रडत असतो! उदाहरणार्थ, अग्नि हा स्वतः सुखमय नाही व दुःखमयहि नाही. परंतु कडाक्याची थंडी पडली असतां शेकोटीजवळ बसून आपण ह्मणतो, “अहाहा! अग्नि किती सुखदायक आहे!" पण इतक्यांत एखाद्या निखाऱ्याला हात लागून बोटें भाजली ह्मणजे त्याच अग्नीला दोष देण्यासहि आह्मी तयार होतो. परंतु वास्तविक पाहिले तर अग्नीने आह्मांस सुख अथवा दुःख या दोहोंपैकी स्वतः कांहींच दिले नसून दोन्ही भावना आमच्याच ठिकाणी होत्या, त्या प्रसंगानुरोधाने जागृत मात्र झाल्या. आपण ज्याप्रमाणे अग्नीचा उपयोग केला त्याप्रमाणे तो आपणांस सुखदायक अथवा दुःखदायक झाला. हीच गोष्ट जगासंबंधीहि खरी आहे. जग हे स्वतः अत्यंत पूर्णावस्थेत आहे. पूर्णावस्था ह्मणजे ज्या कार्याकरितां जगाची उत्पत्ति झाली, त्या कार्याच्या पूर्तीकरितां लागणाऱ्या साधनांनीं तें पूर्ण आहे असा अर्थ समजावा. आह्मीं जगलों अथवा मेलों तरी त्यामुळे त्या साधनांत कांहीं भर पडत नाही अथवा त्यांत कांहीं उणीवहि येत नाही. जगाच्या बऱ्याचा विचार करून मेंदूला शीण देण्याचे आस कांहीं कारण नाही.

{{gap}}हे जरी खरे आहे तरी आपण सदोदित परोपकार करीत असले पाहिजे हेहि खरे आहे. परोपकाररत राहणे हे स्वतःच्याच फायद्याचे आहे व हा एक मोठा हक्कच आपणांस प्राप्त झाला आहे अशी जाणीव आपल्या अंतःकरणांत सदोदित असली तर त्या परोपकारबुद्धीचा एखाद्या प्रचंड चालक शक्तीसारखा आपणांस उपयोग होतो. एखाद्या भिकाऱ्याला काही द्यावयाचे तुमच्या मनात आले तर छाती काढून डौलाने एखादें नाणे त्याजकडे भिरकावू नका. तुमची उपकारबुद्धि त्याच्यामुळे जागृत झाली ही गोष्ट लक्ष्यांत ठेवून त्याला जे देणं असेल तें द्यावें. अशा कृत्यापासून जी कांहीं मानसिक उन्नति होते व मनाला शक्ति प्राप्त होते ती दान घेणाऱ्यास होत नसून दान देणाऱ्याला होत असते. परोपकाराच्या कृत्यांनी अहंकार मावळू लागतो, व अहंकार मावळू लागला ह्मणजे मनुष्य आपल्या पूर्णरूपाकडे जाऊं लागतो. कोणी तरी उपकार घेण्याच्या स्थितीत आहेत ह्मणून पूर्णरूप पावण्याच्या साधनांतील एकाचा आपणांस उपयोग करून घेतां येतो याजबद्दल उपकार घेणाऱ्याचे आपण आभार मानिले<noinclude></noinclude>
sd87zj5yadldel89m7qzpr2366vjcyk
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/133
104
63403
229271
157889
2026-04-14T10:31:50Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229271
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|१०५ }}
{{rule}}</noinclude>पाहिजेत. प्रत्येक परोपकाराच्या कृत्याने आपल्या क्षुद्रवृत्ति नाश पावण्यास मदत होत असते. त्यामुळे आपण पवित्र होऊन पूर्णावस्थेस जातो. यासाठी आपल्या दातृत्वाचा गर्व वाहण्यासारखी त्यांत कांहींच थोरवी नाही. तुमच्या जवळ पांच चार लाख रुपये असले तर मोठा परोपकार तो तुह्मी काय कराल! एखादें इस्पितळ बांधाल, एखादा टाऊनहॉल बांधाल, एखाद्या अधिकाऱ्याचा पुतळा उभाराल, अथवा कोणाला मोठी मेजवानी द्याल; पण विश्वशक्तीच्या दृष्टीने या लांबलचक यादीची खरी किंमत काय आहे ? '''' बाडीबीचमें बंगला बनाया, रचा कमलका फूल।'''' ही गोष्ट खरी. पण जर पांचच मिनिटे प्रचंड झंझावात सुटला- विश्वांतील अनेक शक्तींपैकी एकच जागृत झाली- तर 'दो घडीसे देखना, तो आखर धूलकी धूल।' असेंच ह्मणण्याची पाळी यावयाची! एखादा ज्वालामुखी पर्वत लीलेने फूत्कार करूं लागला तर तुमची प्रचंड शहरें, लांबचलांब रस्ते आणि हजारों इमारती जागच्या जागीच भस्मसात् होतील. यासाठी जगाचे उपकारक ह्मणून गर्व वाहणे यासारखे दुसरें मूर्खत्व कोणतेंच नाही. तुमच्या अथवा माझ्या मदतीवांचून जगाचे अडलें आहे असें नाही. तर परोपकारामुळे आपल्या स्वतःच्या उन्नतीस मदत होते ही गोष्ट नित्य लक्षांत बाळगून आपण नेहमीं परोपकाररत राहिले पाहिजे. स्वत्व विसरून पूर्णत्व पावण्याचा हाच मार्ग आहे. एखादा भिकारी आमचे काही देणे लागत नसतो. पण आमची उपकारबुद्धि जागृत करून तो मात्र आम्हास ऋणी करून ठेवितो. माझ्यामुळे जगाचे अमुक बरे झाले अथवा अमक्या तमक्याला माझ्यामुळे मदत झाली हा विचारच मूर्खपणाचा आहे. ज्यामुळे अहंकार वाढतो असा प्रत्येक विचार मूर्खपणाचाच असतो व दुःखप्राप्ति होणे हे मूर्खत्वाचे निश्चित पर्यवसान आहे. एखाद्याला आपण कांही दिले आणि त्याच्याकडून कृतज्ञतादर्शक शब्दांची अपेक्षा केली असतां तो काहीच बोलला नाही ह्मणजे आपल्या अहंकारास ताबडतोब एक धक्का बसतो व आपणांस क्षणभर तरी दुःख होतें. आपण जे काही करतो त्याचे काही तरी प्रतिफल आपणांस मिळावे अशी इच्छा करणेच चुकीचे आहे. ज्याने उपकार करावयास संधी दिली त्याचे आभार मानणे रास्त आहे. परमेश्वराच्या पूजनाचा हा एक अत्युत्कृष्ट मार्ग आहे. दातृत्वबुद्धि असणे हे भाग्य सर्वांच्याच वांट्यास येत नाही. अशी बुद्धि हा एक मोठा हक्क आहे. हा हक्क आपणांस प्राप्त झाला आणि तो अमलांतहि आला याबद्दल आपणच कृतज्ञ असले पाहिजे. कोणत्याहि प्रतिफलाची अपेक्षा न करण्या-<noinclude></noinclude>
t4pt0oseo3xnv507oymqh6v6mhsy4ad
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/134
104
63404
229272
157890
2026-04-14T10:34:06Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229272
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१०६ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>इतकी आपली अलिप्तता जागृत असली म्हणजे निराशेचे दुःख प्राप्त होण्याची भीति नको. अलिप्त राहून केलेल्या कर्मापासून दु:खाची प्राप्ति होणे ही गोष्ट सर्वथैव अशक्य आहे. आपण कांहीं केलें अथवा न केले तरी सुखदुःखांचे अनुभव घेत घेत हे जग असेंच अनंत कालपर्यंत चालावयाचे आहे.

{{gap}}एके गांवीं एक मनुष्य राहत होता. तो फार गरीब असल्यामुळे त्याला पैसा मिळण्याची इच्छा होती. त्याला कोणी असे सांगितले की, जर एखादें भूत तुला वश होईल तर तें तूं मागशील तें तुला आणून देईल. त्यालाहि हे सांगणे बरे वाटून तो भूत वश करून देणाऱ्या मांत्रिकाचा शोध करूं लागला. शोध करतां करतां त्याला शेवटी एक सत्पुरुष भेटला. त्या सत्पुरुषाला सिद्धी प्राप्त झाल्या होत्या. तेव्हां त्याजजवळ जाऊन तो ह्मणाला, "महाराज, मला एखादें भूत वश करून द्याल काय?" सत्पुरुषाने विचारिले, "बाबा, तुला भुताशी काय करावयाचे आहे?" त्याने उत्तर दिले “वाटेल तें काम पार पाडण्याची शक्ति भुताला असते असें मी ऐकिलें आहे. तर कृपा करून मला माझ्या कामासाठी एखादें भूत मिळवून द्या.” त्यावर सत्पुरुष ह्मणाला, "वेड्या, असल्या भलत्याच नादाला लागू नको. आपल्या घरी जाऊन स्वस्थ बैस." दुसऱ्या दिवशी तो मनुष्य पुन्हां त्या सत्पुरुषाकडे जाऊन रडून आणि त्याची करुणा भाकून ह्मणाला, “महाराज, कसेंहि करून एखादें भूत मला मिळवून द्याच." तेव्हां त्याच्या रडण्याला कंटाळून सत्पुरुष ह्मणाला, “हा ताईत घेऊन जा आणि मी सांगतों तो मंत्र ह्मण, ह्मणजे एक भूत ताबडतोब तुजपाशी येईल. तें तूं सांगशील तें काम करील. पण संभाळ हो, भुतें मोठी भयंकर असतात. त्यांस एकसारखें कामास लाविले पाहिजे. जर एक क्षणभर तूं त्यास रिकामें ठेविलेंस तर तें ताबडतोब तुला खाऊन टाकील.” तो मनुष्य ह्मणाला, "अंः, त्यांत काय मोठे कठीण आहे? त्याच्या जन्माला पुरून उरेल इतके काम मी त्याला देइन." असें ह्मणून व सत्पुरुषाने दिलेला ताईत घेऊन तो एका अरण्यांत गेला, आणि मंत्र ह्मणूं लागला. बराच वेळ मंत्राचा जप झाल्यानंतर एक मोठे धिप्पाड भूत त्याजजवळ येऊन ह्मणाले, "अरे, मी तुझा सेवक झालो आहे. तूं सांगशील ते काम मी करीन; पण जर क्षणभर मी रिकामा राहिलों तर ताबडतोब तुला खाऊन टाकीन." मनुष्य ह्मणाला, "बरें तर, माझ्यासाठी एक प्रचंड राजवाडा बांध." इतकें तो ह्मणत आहे तोच भुताने उत्तर दिले, “राजवाडा बांधून तयार झाला. आतां आणखी काम सांग." मनुष्य ह्मणाला," पुष्कळसें द्रव्य<noinclude></noinclude>
mlr8fasme3esk6qta1iby3i44xol74h
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/135
104
63405
229273
157891
2026-04-14T10:35:43Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229273
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|१०७ }}
{{rule}}</noinclude>घेऊन ये." भुताने उत्तर दिले, "राजवाड्यांत द्रव्यकोश आणून ठेविला. आतां आणखी काम सांग.” त्या बिचाऱ्या गरीब मनुष्याची छाती धडधडू लागली. जे सांगावें तें काम झालेच आहे, असे हे भूत ह्मणतें तर आतां त्यास काय काम सांगावें? असा विचार करता करतां तो मनुष्य एकदम पळत सुटला व सत्पुरुषाजवळ येऊन त्याला त्याने सर्व हकीगत सांगितली. त्याची हकीगत संपते न संपते तोच पाठोपाठ तें भूतहि येऊन हजर झाले आणि त्या मनुष्याला ह्मणाले, “आतां काम सांग, नाही तर तुला खाऊन टाकितो." त्याने त्या मनुध्यास खाऊन टाकिलें असते; परंतु सत्पुरुष इतक्यांत ह्मणाला, “अरे मनुष्या, त्या कुत्र्याचे शेपूट कापून आण, आणि या भुताला तें सरळ करावयास सांग." सत्पुरुषाच्या सांगण्याप्रमाणे त्या मनुष्याने कुत्र्याचे शेपूट कापून आणिलें आणि तें भुताजवळ देऊन म्हटले. “हे मला सरळ करून दे." भुताने मोठ्या कुशलतेने ते जमिनीवर ठेवून सरळ केले. परंतु त्याजवरील बोटे काढतांच ते पुन्हां वांकडे झाले. भुताने याप्रमाणे बराच वेळ खटपट करून पाहिली, परंतु तें शेपूट सरळ होईना. तेव्हां त्रासून ते ह्मणाले, “ खरोखर, साऱ्या जन्मांत मला कोणतेंहि काम इतकें अवघड वाटले नाही. अरे मनुष्या, जर तूं आतां या कामांतून मला मुक्त करशील तर तुला दिलेली दौलत बक्षीस देईन आणि पुन्हां कधीहि तुला त्रास देणार नाही." तो मनुष्य आनंदाने ह्मणाला, "बरें, तुझी अट मला मान्य आहे."

{{gap}}हे जग कुत्र्याच्या शेपटासारखें सदोदित वांकडे आहे आणि हजारों वर्षे त्यास सरळ करण्याचा उद्योग अनेकजण करित आले आहेत. पण त्याच्यावरचा दाब ढिला पडल्याबरोबर ते पुन्हां लगेच वांकडे होते. हे असेंच चालावयाचे आहे. यासाठी जग सरळ करण्याच्या खटपटीस लागू नका. या इच्छेनें प्रेरित होऊन तुझी कोणतेंहि काम करूं लागला तर जग सरळ होत नाहीच पण तुम्ही मात्र वेडे होतां- आततायी होतां. जर हे आततायित्व जगांत उत्पन्न झालें नसते तर जगाची प्रगति सध्याहून अधिक झपाट्याने झाली असती. हट्टानें आणि आततायीपणानें कोणतीहि सुधारणा जगावर लादण्याचा प्रयत्न करणे मूर्खपणाचे आहे. यामुळे क्रोधादि शत्रुंची वाढ मात्र झपाट्याने होऊन मारामाऱ्या आणि रक्तपात होतात. तुमच्या हट्टामुळे तुह्मांबद्दल असलेली सहानुभूति मात्र लोकांच्या मनांतून नाहीशी होते. आपण जे कांहीं करतों तें उत्तम; आपणाजवळ जे काही आहे त्याला जगांत कोठें तोड नाही; तसेंच इतरांचे जें<noinclude></noinclude>
fy22qr33ocm4y6oi6tzfhhik8470976
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/136
104
63406
229274
157892
2026-04-14T10:37:37Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229274
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१०८ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>कांहीं ह्मणणे असेल तें सर्व चुकीचे असे वाटणे हा मानवी स्वभावच आहे. यासाठी जगावर सुधारणा लादण्याची इच्छा तुह्मांस होईल तेव्हां कुत्र्याच्या शेपटाच्या गोष्टीचे स्मरण करा. जगाच्या नादी लागून आपले डोके फिरवून घेऊन आपल्या विश्रांतीचा भंग करावा यांत काय शहाणपण आहे बरें! तुह्मीं जन्मभर निजून राहिलांत, व जगाकडे ढुंकूनहि पाहिले नाही, तरी जग जसें चालावयाचे तसे चालणारच. यासाठी आपलें सुखदु:ख जगाच्या बऱ्यावाईटावर न ठेवितां व आततायीपणा न करितां अलिप्त मनाने कर्म करीत राहणे इतकेंच आपले कर्तव्य आहे. यत्किंचितहि हटवादीपणा अंगी आहे तोपर्यंत खरे चांगले कार्य आपल्या हातून कधीहि होणे नाही. ज्याच्या चित्तांतून अहंकार नष्ट झाला आहे, निस्सीम शांतता ज्याच्या हृदयांत वास करीत आहे, खरे प्रेम आणि सहानुभूति ज्याच्या हृदयांत उत्पन्न झाली आहे, तोच पुरुष सत्कर्म करून इतरांच्या उपयोगी पडतो आणि स्वतःचेंहि कल्याण करून घेतो. आततायी मनुष्याला सहानुभूति ह्मणजे काय याची ओळखहि नसते. जगाची दुःखें हलकी करण्याचे सामर्थ्य त्याच्या अंगी कधीहि येत नाही, अथवा तो स्वतःचेंहि कल्याण करून घेत नाही.

{{gap}}यासाठी थोडक्यांत तुह्मांस इतकेच सांगावयाचें की, जग आपलें ऋणी नसून आपण जगाचे ऋणी आहों ही गोष्ट प्रथम लक्ष्यांत बाळगिली पाहिजे. परोपकार करणे ह्मणजे पर्यायाने स्वतःच्या कल्याणाचाच प्रयत्न करणे होय, हा दुसरा मुद्दा ध्यानांत धरण्यासारखा आहे. तसेंच जग तुमच्या आमच्या मदतीसाठी अडून राहिले नसून त्याचा नेता व शास्ता परमेश्वर आहे, याचा विसर पडू देऊ नये. त्याची तेथे नित्य वस्ती असून त्याच्या उद्योगास कधींहि खळ पडत नाही. तो यच्चयावत् प्राणिमात्राची काळजी वाहून त्याच्या बऱ्याचा मार्ग त्याला दाखवितो. सर्व विश्व झोपी गेलें तरी तो जागत असतो. जगांत जें जें कांहीं दृष्टीस पडतें तें त्याच्यामुळेच होय. या गोष्टी नित्य लक्ष्यांत बाळगिल्या पाहिजेत. आणखी असे की, जग जसें आजवर चालत आले आहे तसेच अनंत काळपर्यंत राहणार. यासाठी कोणावर रागावण्यांत अथवा कोणाचा द्वेष करण्यांत फायदा नाही. गरीबदुबळ्यांस शक्य ती मदत करणे आणि दुष्टावरहि प्रेम करणे इतकेंच आपले कर्तव्य आहे. जग हे मोठ्या तालीमखान्यासारखें आहे. कसरतीने जसे शरीर धष्टपुष्ट होते तसे या तालीमखान्यांत कसरत करून मन धष्टपुष्ट होते. तसेच कोणत्याहि कार्यात हट्ट आणि माथेफिरूपणा<noinclude></noinclude>
gumzqiwhnei6dnqe0dwbjnjrzp5sh8l
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/137
104
63407
229275
158970
2026-04-14T10:40:21Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229275
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|१०९ }}
{{rule}}</noinclude>करूं नये. कारण त्यामुळे नफा कांहींच न होतां नुकसान मात्र हटकून होते. धर्माभिमानाचा आव घालणारे काहीजण असें ह्मणतात की "आह्मीं पाप्यांचे द्वेष्टे नसून पापाचे द्वेष्टे आहों." असे धर्माभिमानी अथवा धर्मवेडे तुमच्याहि पाहण्यांत आले असतील. पापी मनुष्य आणि त्याने केलेले पाप ही स्वतंत्रपणे पाहण्याइतकी ज्याची दृष्टि दिव्य झाली आहे, त्याच्या दर्शनासाठी जगाच्या दुसऱ्या टोकापर्यंत मी पायाने चालत जाईन. पाप आणि पापी मनुष्य ही भिन्न आहेत असें तोंडाने बडबडणे फार सोपे आहे; परंतु अंतःकरणांत तसा अनुभव येऊन त्याप्रमाणे कृति घडणें दुष्कर आहे. तसेच आपले चित्त सदोदित शांत ठेविलें तर प्रेमाचा उदय आपल्या हृदयांत लवकर होऊन निष्काम कर्म आपल्या हातून होऊं लागेल.

{{rule|6em}}

{{center|'''प्रकरण ६ वें.'''}}
{{center|'''अनासक्ति हाच अहंकारनाश.'''}}
{{gap}}ज्याप्रमाणे आपल्या कृतीचे परिणाम फळरूपाने आपणांकडे येतात त्याच प्रमाणे आपल्या कृतीचे परिणाम परक्यावर व परक्याच्या कृतीचे परिणाम आपणांवर घडत असतात. कोणत्याहि मनुष्याने काही वाईट कर्म केले तर त्याच्या प्रतिफलाने त्याची बुद्धि भ्रष्ट होऊन दिवसेंदिवस तो अधिकच वाईट होत जातो; तसेंच शुभकर्माने बुद्धि शुद्ध झालेल्या मनुष्याची प्रवृत्ति दिवसेंदिवस अधिक चांगल्या कर्माकडे आपोआप वळते. हा अनुभव आपल्यांपैकी बहुतेकांस आलाच असेल. आपण जी कर्मे करितो त्यांचे परिणाम परस्परांवर घडत नसते तर वर दाखविलेली बुद्धीची वाढ अधिक चांगल्या अगर अधिक वाईट दिशेने झाली नसती. जड पदार्थासंबंधी केलेल्या अवलोकनावरूनहि वरील प्रमेयाची सिद्धि होते. एखाद्या खोलीत एका जातीची दोन तीन तंतुवाद्ये असली आणि आपण त्यांपैकी एखादें वाद्य वाजवून कांहीं विशिष्ट स्वर उत्पन्न केला तर त्या स्वराने हवेवर जे तरंग उत्पन्न होतात ते बाकीच्या वाद्यांवर आदन त्यांतून सजातीय स्वराची उत्पत्ति करितात. ही गोष्ट पदार्थविज्ञानशास्त्राने सिद्ध केली आहे. तसेंच माझ्या मनांत कांहीं विचारतरंग उठले तर त्यांचा परिणाम सजातीय मनांवर होऊन तेथेही तत्सदृश विचारांची उत्पत्ति होते. प्रत्यक्ष आघाताने वाद्यांतून निघणारा स्वर जितका स्पष्ट असतो तितका तरंगांच्या<noinclude></noinclude>
ahoevgcucuownndp3b0hje6dni9jpof
अनुक्रमणिका चर्चा:तीन तत्वज्ञानी.pdf
107
110127
229254
2026-04-14T06:14:49Z
कल्पनाशक्ती
3813
/* duplicate book? */ नवीन विभाग
229254
wikitext
text/x-wiki
== duplicate book? ==
@[[सदस्य:QueerEcofeminist|QueerEcofeminist]] Looks like this is a duplicate copy of
<nowiki>https://mr.wikisource.org/wiki/अनुक्रमणिका:तीन_तत्त्वज्ञानी.pdf</nowiki>
Please check and advice. [[सदस्य:कल्पनाशक्ती|कल्पनाशक्ती]] ([[सदस्य चर्चा:कल्पनाशक्ती|चर्चा]]) ११:४४, १४ एप्रिल २०२६ (IST)
ekfn1cn6bem0ohv2my84hkvhvk1hoo1
पान:तुकारामवचनामृत.pdf/२९
104
110128
229255
2026-04-14T07:28:38Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "१. तुकारामांच्या चरित्रांतील ऐतिहासिक प्रसंग.. १. तुकारामांस गुरूचा उपदेश. सद्गुरुरायें कृपा मज केली । परि नाहीं घडली सेवा कांहीं ॥ सांपडविलें वाटे जातां गंगास्नाना। मस्तकीं तो..."
229255
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>१. तुकारामांच्या चरित्रांतील ऐतिहासिक प्रसंग..
१. तुकारामांस गुरूचा उपदेश.
सद्गुरुरायें कृपा मज केली । परि नाहीं घडली सेवा कांहीं ॥
सांपडविलें वाटे जातां गंगास्नाना। मस्तकीं तो जाणा ठेविला कर ॥
भोजना मागती तूप पावशेर । पडिला विसर स्वप्नामाजी ॥
काय कळे 'उपजला अंतराय । म्हणोनियां काय त्वरा जाली ॥
राघवचैतन्य केशवचैतन्य । सांगितली खूण मालिकेची ॥
बाबाजी आपुले सांगितले नाम । मंत्र दिला रामकृष्णहरि ॥
माघ शुद्ध दशमी पाहूनि गुरुवार । केला अंगीकार तुका म्हणे ॥
२. तुकारामांस आवडीचा मंत्र मिळतो.
माझिये मनींचा जाणोनियां भाव। तो करी उपाय गुरुराजा ॥
आवडीचा मंत्र सांगितला सोपा । जेणे नव्हे गुंफां कांहीं कोठे ॥
जाती पुढे एक उतरले पार । हा भवसागर साधुसंत ॥
जाणत्या नेणत्या ज्या जैसी आवडी । उतार सांगडी तापे पेटी ॥
तुका म्हणे मज दावियेला तारु । कृपेचा सागरु पांडुरंग ॥
३. आपण कुणबी जन्मल्याबद्दल तुकारामांचा आनंद.
बरें देवा कुणबी केलों । नाहीं तरि दंर्भे असतो मेलों ॥
भले केले देवराया | नाचे तुका लागे पायां ॥
विद्या असती कांहीं । तरी पडतों अपायीं ॥
सेवा चुकतों संताची । हेचि नागवण फुकाची ॥
१ गुरुपरंपरा. २ गुंता. ३ ताफे.<noinclude></noinclude>
cn123crftxt0t8y9g16lmh33k46x1gr