विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.46.0-wmf.23 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/138 104 63408 229276 158971 2026-04-15T06:27:33Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229276 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|११० |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>आघाताने स्पष्ट न निघतां सूक्ष्म निघतो. पहिल्या वाद्यापासून दुसरें वाद्य बऱ्याच अंतरावर असेल तर हा ध्वनि अत्यंत सूक्ष्म होईल हे उघड आहे; तसेंच माझ्या विचारतरंगांनी दुसऱ्यांच्या मनावर उमटणारे तरंग कमी अथवा अधिक स्पष्ट उमटणे हें, अंतरावर व इतर परिस्थितीवर अवलंबून राहील, हेहि उघड आहे. यावरून आपल्या मनावर बाह्य तरंगांचा परिणाम कधी सूक्ष्म, तर कधी व्यक्त, परंतु निश्चितपणे होत असतो एवढी गोष्ट सिद्ध होते. माझ्या मनांत एखादें वाईट कर्म करण्याचा विचार उद्भवला तर या विश्वांत जी मनें माझ्याशी सदृश अशा स्थितीत असतील त्यांजवर त्या विचारतरंगांचा परिणाम घडणे शक्य आहे. त्याचप्रमाणे कांही शुभ कर्म आचरावें अशी इच्छा माझ्या मनांत उद्भवली तर तीमुळे दुसऱ्या प्रकाराचे तरंग उद्भवतात व सदृश स्थितींतील मनांवर आघात करितात. हा तरंगाघात किती सूक्ष्म अथवा किती जोराचा होईल हे पहिल्या मनाच्या शक्तीवर अवलंबून आहे. दुर्बळ मनापासून निघणारे तरंग दुर्बळच असणार व त्यांच्या आघाताने होणारा परिणामही अत्यंत सूक्ष्म होईल हे उघड आहे. तसेच स्वतःच्या चैतन्यशक्तीची पूर्ण ओळख होऊन जे मन अत्यंत शक्तिमान् झाले असेल त्यांतून उद्भूत होणारे तरंग अति सामर्थ्यवान् असलेच पाहिजेत.<br> {{gap}}ज्याप्रमाणे ध्वनीचे तरंग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, त्याचप्रमाणे प्रकाशकिरणहि एकापासून दुसऱ्या स्थली जातात. कमी अधिक अंतराच्या मानाने प्रकाशकिरण पोहोंचावयास कमी अथवा अधिक वेळ लागतो. कित्येक ताऱ्यांचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास कित्येक लक्ष वर्षे लागतात. ज्यांचा प्रकाश आपल्या पृथ्वीवर अद्यापि पोहोंचला नाही, व त्यामुळे जे अद्यापि आपल्या दृष्टिपथांत आले नाहीत असे तारे विश्वांत आहेत असें ज्योतिषशास्त्राचे मत आहे. त्याचप्रमाणे एका मनावर उठणारे विचारतरंग सदृश स्थितीतील मन सांपडून त्यावर प्रतितरंग उमटवीपर्यंत कदाचित् कित्येक लक्ष वर्षेहि उलटून जाण्याचा संभव आहे. यावरून आपल्या भोवती असलेले वातावरण चांगल्या व वाईट अशा दोन्ही प्रकारच्या विचारतरंगांनी भरून गेलेल असण्याचा संभव आहे. प्रत्येक मेंदूंतून निघणारा तरंग याप्रमाणे हिंडत असतो आणि योग्य ठिकाण सांपडतांच तेथें शिरून बसतो. जे मन स्वतःच्या विचारतरंगांनी विशिष्ट स्थितीस प्राप्त झालेले असते ते आपल्याशी सदृश असणारे बाहेरील विचारतरंग ताबडतोब ग्रहण करिते. याकरितां कोणतीहि वाईट गोष्ट<noinclude></noinclude> e5b457eq4u9a1c99prhshmg4jpfr31i पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/139 104 63409 229277 158972 2026-04-15T06:33:11Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229277 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|१११ }} {{rule}}</noinclude>करावी असे एखाद्याच्या मनांत आले ह्मणजे त्याचे मन काही विशिष्ट प्रकारच्या स्थितीला प्राप्त झालेले असते व त्या स्थितीत त्यावेळी स्वतःशी सदृश अशा वातावरणांतील दुष्ट विचारतरंगांचें तें ग्रहण करिते. यामुळे दुष्ट मनुष्य नेहमींच दुष्कत्ये करतांनां आपणांस आढळतो. दुष्कृत्ये करण्याची त्याची मनःप्रवृत्ति दिवसेंदिवस वाढतच जाते. यासाठी दुष्कृत्ये करण्याचा विचार आपल्या मनांत येतो त्या वेळी एक दोनधारी शस्त्रच आपण तयार करीत असल्यासारखें होतें. एक तर, अशा वेळी बाहेरील दुष्ट तरंगांस आपल्या मनांत घुसावयास दरवाजा उघडून दिल्यासारखें होतें; आणि दुसरें असें की आपल्या मनांतून बाहेर पडणारे दुष्ट तरंग दुसऱ्या कोणास तरी अधिक दुष्ट करण्यास कारणीभूत होण्याचा संभव असतो. हा दुसरा परिणाम होण्यास कदाचित् कित्येक वर्षांचा काळ लोटावा लागेल. पण तसा परिणाम केव्हां ना केव्हां तरी होईल हे निश्चित आहे. याकरितां आपण जेव्हा एखादें दुष्कृत्य करितो, त्यावेळी आपलें नाक कापून दुसऱ्यास अपशकून केल्यासारखे होते. तसेंच आपण शुभ कर्म केले तर ते आपणांस जसें कल्याणप्रद होते तसेच त्याचा इतरांवरहि इष्ट परिणाम घडतो. मनुष्यांत ज्या कांही शक्ती गुप्तपणे वास करीत आहेत. त्या स्वतःशी सदृश असे तरंग बाहेरून गोळा करितात आणि स्वतः अधिक सामर्थ्यवान् होऊन प्रगट होतात. '''देवीसंपद्विमोक्षाय निबंधायासुरी मता''' हा भगवद्गीतेचा सिद्धांत प्रत्येकाने नीट लक्षांत बाळगावा.<br> {{gap}}कोणतेंहि कर्म एक वेळ कर्त्याच्या हातून घडलें ह्मणजे तें फळाला पोहोचेपर्यंत मध्यंतरी त्याचा नाश होऊ शकतच नाही; असा कर्मयोगाचा सिद्धांत आहे. तें फलद्रूप होण्याच्या आधी त्याचा नाश करण्यास समर्थ अशी एकहि शक्ति विश्वांत जन्मास आली नाही. जर मी कांहीं दुष्कृत्य केले तर त्यापासून उत्पन्न होणारे दुष्ट फळ मलाच भक्षण केले पाहिजे. माझें दुष्कृत्य फलद्रूप होऊ न देणे हे जसें अशक्य आहे तसेच तें कटु फळ माझ्या तोंडी न पडेसें करणें हेहि अशक्यच आहे. तसेंच मी काही चांगले कर्म केले तर त्याचे शुभ फळ प्राप्त न होणे हेहि अशक्य आहे. कारण उत्पन्न झाले की त्याचे कार्य हे घडलेच पाहिजे. यांत कमीअधिक करण्याचे कोणास सामर्थ्य नाही. आतां येथे एक अत्यंत सूक्ष्म विचाराचा प्रश्न उद्भवतो. आपण कोणतेंहि कर्म केले तरी त्यांत चांगला व वाईट अशा दोन्ही परिणामांची अत्यंत संलग्न अशी स्थिति आढळते. कोणत्याही एका कर्माचे चांगलेच परिणाम होतात व वाईट कांहींच होत नाहीत<noinclude></noinclude> 4x8q6lqw1ir3tdlo06h23zi7ioan32t 229278 229277 2026-04-15T06:34:01Z कल्पनाशक्ती 3813 229278 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|१११ }} {{rule}}</noinclude>करावी असे एखाद्याच्या मनांत आले ह्मणजे त्याचे मन काही विशिष्ट प्रकारच्या स्थितीला प्राप्त झालेले असते व त्या स्थितीत त्यावेळी स्वतःशी सदृश अशा वातावरणांतील दुष्ट विचारतरंगांचें तें ग्रहण करिते. यामुळे दुष्ट मनुष्य नेहमींच दुष्कत्ये करतांनां आपणांस आढळतो. दुष्कृत्ये करण्याची त्याची मनःप्रवृत्ति दिवसेंदिवस वाढतच जाते. यासाठी दुष्कृत्ये करण्याचा विचार आपल्या मनांत येतो त्या वेळी एक दोनधारी शस्त्रच आपण तयार करीत असल्यासारखें होतें. एक तर, अशा वेळी बाहेरील दुष्ट तरंगांस आपल्या मनांत घुसावयास दरवाजा उघडून दिल्यासारखें होतें; आणि दुसरें असें की आपल्या मनांतून बाहेर पडणारे दुष्ट तरंग दुसऱ्या कोणास तरी अधिक दुष्ट करण्यास कारणीभूत होण्याचा संभव असतो. हा दुसरा परिणाम होण्यास कदाचित् कित्येक वर्षांचा काळ लोटावा लागेल. पण तसा परिणाम केव्हां ना केव्हां तरी होईल हे निश्चित आहे. याकरितां आपण जेव्हा एखादें दुष्कृत्य करितो, त्यावेळी आपलें नाक कापून दुसऱ्यास अपशकून केल्यासारखे होते. तसेंच आपण शुभ कर्म केले तर ते आपणांस जसें कल्याणप्रद होते तसेच त्याचा इतरांवरहि इष्ट परिणाम घडतो. मनुष्यांत ज्या कांही शक्ती गुप्तपणे वास करीत आहेत. त्या स्वतःशी सदृश असे तरंग बाहेरून गोळा करितात आणि स्वतः अधिक सामर्थ्यवान् होऊन प्रगट होतात. ''''दैवीसंपद्विमोक्षाय निबंधायासुरी मता'''' हा भगवद्गीतेचा सिद्धांत प्रत्येकाने नीट लक्षांत बाळगावा.<br> {{gap}}कोणतेंहि कर्म एक वेळ कर्त्याच्या हातून घडलें ह्मणजे तें फळाला पोहोचेपर्यंत मध्यंतरी त्याचा नाश होऊ शकतच नाही; असा कर्मयोगाचा सिद्धांत आहे. तें फलद्रूप होण्याच्या आधी त्याचा नाश करण्यास समर्थ अशी एकहि शक्ति विश्वांत जन्मास आली नाही. जर मी कांहीं दुष्कृत्य केले तर त्यापासून उत्पन्न होणारे दुष्ट फळ मलाच भक्षण केले पाहिजे. माझें दुष्कृत्य फलद्रूप होऊ न देणे हे जसें अशक्य आहे तसेच तें कटु फळ माझ्या तोंडी न पडेसें करणें हेहि अशक्यच आहे. तसेंच मी काही चांगले कर्म केले तर त्याचे शुभ फळ प्राप्त न होणे हेहि अशक्य आहे. कारण उत्पन्न झाले की त्याचे कार्य हे घडलेच पाहिजे. यांत कमीअधिक करण्याचे कोणास सामर्थ्य नाही. आतां येथे एक अत्यंत सूक्ष्म विचाराचा प्रश्न उद्भवतो. आपण कोणतेंहि कर्म केले तरी त्यांत चांगला व वाईट अशा दोन्ही परिणामांची अत्यंत संलग्न अशी स्थिति आढळते. कोणत्याही एका कर्माचे चांगलेच परिणाम होतात व वाईट कांहींच होत नाहीत<noinclude></noinclude> ihltut7w8k48mxfsptvclxkcdrlzt8v पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/140 104 63410 229279 158973 2026-04-15T06:37:28Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229279 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|११२ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>असे सांगतां येणें आपणांस अशक्य आहे. ज्याचे चांगले आणि वाईट परिणाम एकाच वेळी होत नाहीत असे कोणतेंहि कर्म करता येणे शक्य नाही. याचे प्रत्यंतर पहावयास फार लांब जावयास नको. मी या क्षणी आपणाशी बोलत आहे. माझे हे कृत्य चांगले आहे असें तुह्मांपैकी काहींस वाटत असेल, पण याच वेळी माझ्या भाषणाच्या आघाताने हवेतील हजारों सूक्ष्म जंतु मृत्यु पावत असतील. ह्मणजे माझ्या एकाच कर्मापासून चांगला आणि वाईट असे परस्पर विरुद्ध परिणाम एकाच वेळी घडत आहेत. एखाद्या कृत्याचे परिणाम प्रत्यक्ष आपल्या नजरेसमोर होत असले आणि त्यामुळे आपल्या ओळखीच्यांपैकी कोणाचे बरे होत असले तर तें कर्म सत्कर्म आहे असे आपण ह्मणतों. माझे भाषण हे सत्कर्म आहे असें तुह्मी ह्मणाल पण माझ्या आवाजाने मृत्युमुखी जाणारे हजारों कीटक काय ह्मणत असतील बरें! तुह्मी आपणा स्वतःस पाहत आहां आणि माझ्या भाषणाने तुमच्या चित्तावर काय परिणाम होतो याचा स्वतः अनुभव घेत आहां. परंतु सूक्ष्म कीटक तुह्मांस दिसत नाहीत आणि त्यांजवर होणारा परिणामहि तुमच्या दृष्टिपथाबाहेरचा आहे; यामुळे माझ्या कृतीचा एकच परिणाम पाहून तुह्मी त्याला सत्कर्म असें नांव देतां. अशाच रीतीने एखाद्या दुष्कृत्याचे सूक्ष्म अवलोकन केले तर त्यांतूनहि कदाचित् एखादा चांगला परिणाम कोठे तरी घडत असल्याचे आढळून येईल. स्थूल दृष्टीने चांगल्या दिसणाऱ्या कर्माचे वाईट परिणाम पाहण्याइतकी सूक्ष्म दृष्टि ज्याला आहे आणि वाईट कर्मांतूनहि उद्भवणारे चांगले परिणाम जो पाहूं शकतो त्यानेच कर्मयोगाचे रहस्य खरोखर जाणले असे समजावें. ''''कर्मण्यकर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः । स बुद्धिमान् मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत् ॥'''' अशी बुद्धिमानाची व्याख्या गीतेत सांगितली आहे. असो.<br> {{gap}}यावरून एवढेच लक्ष्यांत ठेवावयाचें की परक्याच्या सुखदुःखानुरोधे आपल्या कर्माचा विचार केला तर केवळ सुखोत्पादक अथवा केवळ दुःखोत्पादक असे कोणतेंहि कर्म आपणांस करता येणे शक्य नाही. दुसऱ्या कोणा तरी जीवास दुःख दिल्याशिवाय आपणांस जगणे अथवा श्वासोच्छ्वास करणेहि शक्य ना. अन्नाचा एक घांस आपण भक्षण करणे ह्मणजे तेवढे अन्न दुसऱ्या कोणाच्या तरी तोंडून बाहेर काढण्यासारखेच आहे. आह्मीं स्वतः जगणे ह्मणजे पृथ्वीची जागा अडवून दुसऱ्या कोणास तरी जगण्याचा अवसर न देणे असेच होते. आपल्यामुळे ज्यांस दुःख होते ते मनुष्य असोत, पशुपक्षी असोत, अथवा अत्यंत सूक्ष्म जंतु<noinclude></noinclude> 1ie1ps8tgcxrvfbogiu33rt9jkarswq पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/141 104 63411 229280 158974 2026-04-15T06:43:33Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229280 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|११३ }} {{rule}}</noinclude>असोत; पण आपल्या जगण्यामुळे त्यांस उपसर्ग पोहोचतो व प्रसंगी त्यांचा प्राणनाशहि होतो ही गोष्ट खरी. यावरून सिद्धांत असा निघतो की केवळ कर्म करून पूर्णत्वास पोहोचणे आपणांस शक्य नाही. विश्वाच्या अंतापर्यंत आपण कर्मच करीत राहिलों तर या चक्रव्यूहांतून सुटण्यास आपणांस मार्ग नाही. कोणतेंहि आणि कितीहि कर्म केले तरी त्यांतून सुख आणि दुःख ह्मणजे अनुक्रमें पुण्य आणि पाप यांची उत्पत्ति टाळतां येण्यास मार्ग नाही.<br> {{gap}}आतां या पुढे दुसरा प्रश्न असा उद्भवतो की आपल्या ह्या साऱ्या कर्माचें पर्यवसान तरी कोठे होणार? युगानुयुगें एकसारखें कर्म करून आह्मीं साधणार तरी काय? कित्येक असें ह्मणतात की, पुढे केव्हां तरी हे जग पूर्णत्वास पोहोचणार आहे. ह्मणजे या जगांत दुःख, दुष्टपणा, रोग, मृत्यु इत्यादिकांचे जें पूर्ण साम्राज्य आपणांस दिसत आहे तें नाहींसें होऊन सर्व सृष्टि सुखाने नांदत असण्याचा काळ पुढे येईल. असें उत्तर देणारे शेकडों लोक तुह्मांस प्रत्येक देशांत आढळतील. ही कल्पना मोठी सुखकर आहे खरी; अज्ञजनांस चांगल्या कर्मास उत्तेजित करण्यास आणि दुःखप्रसंगी आधार ह्मणून या कल्पनेचा उपयोग करितां येईल हेहि खरे; परंतु ती केव्हां तरी सत्यत्वास येणे शक्य आहे काय, एवढाच काय तो विचाराचा प्रश्न आहे. क्षणभर विचार केला तर जग अशा स्थितीस येईल ही कल्पना निव्वळ अशक्य कोटीपैकी आहे, असे आपणांस आढळून येईल. अगदी वरवर विचार करणारासहि या कल्पनेची अशक्यता दिसून येण्याजोगी आहे. एका धातूच्या तुकड्यावर दोन बाजूस दोन शिक्के मारिले ह्मणजे त्यास नाणे अशी संज्ञा प्राप्त होते. हे शिक्के निघून गेले ह्मणजे त्याबरोबर त्या तुकड्याचे नाणेपणहि नष्ट झाले नाही काय? तसेच जगाची उत्पत्ति आणि स्थिति ही जर सुख आणि दुःख या द्वंद्वाच्या अस्तित्वावरच अवलंबून आहेत तर यांपैकी कोणतेंहि एक नष्ट झाले की जगाचेंहि अस्तित्व संपलेंच. सुख आणि दुःख या दोन्ही कल्पना सापेक्ष आहेत. यांपैकी कोणत्याहि एकीमुळेच दुसरीचा अनुभव होतो. यांतील कोणतीहि एक नष्ट झाली तर दुसरीचें अस्तित्व संपुष्टांत आलेच ह्मणून समजावें. केवळ सुखोत्पादक असे एकहि कर्म करता येणे शक्यच नाही, हे नुक्तेंच आपण पाहिले. तर मग पूर्णत्व या शब्दाचा अर्थ काय? पूर्ण जीविताची कल्पना ह्मणजे वंध्यासुताची काहाणी आहे. आपले सर्व जीवित केवळ चढाओढीवर अवलंबून आहे. सुखाची इच्छा उद्भवली की, तदनुरूप आपण कर्म करूं लागतो. आपण कर्म करूं लागलों ह्मणजे<noinclude><br>{{gap}}स्वा. वि. ८</noinclude> j2nkp0g499n340was4hyi1f2dnzfo50 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/142 104 63412 229281 158975 2026-04-15T06:56:07Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229281 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|११४ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>कोणाना कोणास तरी तें दुःखप्रद होणारच. मग सर्व जग सुखी होईल ही कल्पना ह्मणजे वंध्यासुताची काहाणी नव्हे तर काय? प्रत्येक क्षणी आपल्या सुखासाठी आपण कोणाना कोणाबरोबर तरी लढत असतोच. आपला जय झाला तर आपल्या कल्पनेप्रमाणे काही सुखप्राप्ति झाल्यासारखें होतें. पराभव झाला तर, एक तर जीवित नष्ट होणार अथवा पुन्हां दुसऱ्या लढाईस सुरवात होणार! आपल्या जीवितास अत्यंत आवश्यक असें अन्न आणि हवा ही सुद्धा लढाई केल्यावांचून आपणांस प्राप्त होत नाहीत. यांपैकी कोणतेंहि एक आपणास प्राप्त झाले नाही तर आपले जीवित संपलेंच. जीवित हे कोणत्याहि एकाच वस्तूमुळे झालेले नसून अनेक वस्तूंच्या समीकरणाचा तो परिणाम आहे. हा देहांतर्गत वस्तुसमुच्चय एकीकडे आणि बाह्य जग दुसरीकडे असून यांजमधील युद्धास जीवित अशी संज्ञा आहे. या युद्धाचा शेवट आणि जीविताचा शेवट ही दोन्ही बरोबरच घडतात. यावरून सुखमय अथवा पूर्ण जगाची कल्पना ह्मणजे केवळ मृगजलाभास आहे.<br> {{gap}}तर मग चिरंतन सुखमय स्थिति शक्यच नाही असें तुमचें ह्मणणे आहे काय? नाही. असे आमचे ह्मणणे नाही. ज्या वेळी सुख आणि दुःख, पाप आणि पुण्य इत्यादि द्वंद्वे पूर्णपणे नाहीशी होतील त्यावेळी सुखमय स्थिति तुह्मांस प्राप्त होईल. पण अशी स्थिति प्राप्त होण्याबरोबर चालू जीवनक्रमाचा मात्र अंत होईल. चालू जीवनक्रमाचा अंत झाल्याशिवाय- द्वंद्वे बंद झाल्याशिवाय- सुखमय स्थितीची प्राप्ति नाही; अशी ही परंपरा आहे. आपण परोपकारार्थ ह्मणून जी कर्मे करितों ती वस्तुतः स्वतःसच उपकारक होतात, हे आपण पूर्वी सिद्ध केलेच आहे. जी जी कर्मे आपण परोपकारार्थ ह्मणून करितो त्या सर्वाचा संकलित परिणाम ह्मटला तर आत्मशुद्धि हा होय. परोपकाराची इच्छा जो जों बळावत जाते तो तों आपला अहंकार मावळत जातो. परहिताचे चिंतन आपण करूं लागलों ह्मणजे स्वसुखलालसा आपोआपच कमी होऊ लागते. स्वसुखलालसा कमी होऊ लागली, ह्मणजे आपणांस अत्यंत चिकटून राहिलेल्या देहाध्यासाची मिठी सुटू लागते. जी आपणांस आपल्या जीवनक्रमांत अत्यंत महत्वाची अशी जी काही गोष्ट शिकावयाची आहे ती अहंकारविस्मृति ही होय. जगाबरोबर एकसारखें युद्ध करून मी स्वतःस सुखी करीन, असा जो आपला समज आरंभी असतो तो मूर्खपणाचा आहे असा प्रत्यक्ष अनुभव आपणांस येऊ लागतो. सुख हे बाहेरून कोठून मिळविण्याजोगी चीज नसून ती आपल्यापाशीच आहे<noinclude></noinclude> ors3mogzzlmpksc4qpvnbpqzxbhq10t पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/143 104 63413 229282 158976 2026-04-15T06:59:36Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229282 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|११५ }} {{rule}}</noinclude>व आपलपोटेपणा- अहंकार- विसरल्यावांचून तिची प्राप्ति होत नाही, असें ज्ञान आपणांस होते. परोपकारार्थ केलेले प्रत्येक कर्म, सहानुभूतीचा प्रत्येक विचार आणि प्रत्येक सत्कर्म आपणांतील अहंकार कमी करण्यास कारणीभूत होतें. आपणांतील अहंकार जसजसा कमी होत जाईल, तसेतसे आपले स्वतःचें क्षुद्रत्व अधिक ढळढळीतपणे आपणांस दिसू लागते. परोपकाराचा हा खरा उपयोग आहे. ज्ञान, भक्ति, आणि कर्म यांनी दाखविलेले निरनिराळे मार्ग एकत्र होण्याचा हाच मध्यबिंदु आहे. अहंकार संपूर्णपणे विसरून गेला ह्मणजे 'मी'पण नष्ट होते व त्याजागी 'तूं'पण येते. सर्व प्रकारची द्वंद्वे नष्ट झाली, दृश्य जग नाहीसे झाले आणि शेवटी जे काही उरलें तें 'मी' नसून 'तूं' उरलें आहे. जिकडे पाहावे तिकडे 'मी' नसून 'तूं' दिसते आणि अंतर्यामीहि 'मी' नसून 'तूं' उरतें. कर्मयोगाच्या आचाराचे शेवटी हेच पर्यवसान व्हावयाचे. कर्मयोगाचा आचार तुह्मीं समजून करा अथवा न समजतां करा पण तुमचे आचरण जर कर्मयोगाच्या तत्वांस अनुसरून होत असेल तर त्याचा निश्चित परिणाम हाच व्हावयाचा. अशा रीतीने निराकार परमरूपाशी ऐक्य होणे हेच सर्व योगांचे साध्य आहे. धर्मोपदेश हा ज्याने पोटाचा धंदा केला आहे, अशा उपदेशकाला निराकार परमेश्वर आणि त्याशी ऐक्य ही कल्पनाच भयंकर वाटेल. परमेश्वर साकार असून भक्त हा त्यापासून नेहमी निराळाच राहणार असें तो ह्मणेल. आपण बोलतों त्याचा वास्तविक अर्थहि त्याला कळणार नाही; पण असें ह्मणणे हेच त्याच्या फायद्याचे आहे. त्याच्या नीतिविषयक कल्पना कितीहि उच्च दर्जाच्या असल्या तरी 'मी'पण विसरण्याइतकी त्याची मजल कधीहि जाणार नाही. वास्तविक विचार केला तर 'मी'पण विसरणे हाच सर्व नीतिसिद्धांतांचा पाया आहे. 'मी'पण संपूर्ण विसरल्याशिवाय खरी भक्ति करणे- खरें प्रेम करणें- हेंहि शक्य नाही. मग हे प्रेम मनुष्यांविषयी असो, पशुपक्ष्यांविषयी असो, देवदूतांविषयी असो, अथवा आत्म्याविषयी असो. सर्व नीतिसिद्धांतांच्या पोटी हेच तत्व ग्रथित असल्याचे आपणांस आढळेल.<br> {{gap}}या जगांत आपणांस अनेक प्रकारचे लोक आढळून येतात. कित्येक पूर्ण संन्यासी असतात. आयुष्य संपेपर्यंत केवळ लोकांच्या बऱ्याकरितां हे कर्मे करितात. कोणाचे कल्याण यांच्या प्राणनाशाने होत असले तर तोहि करावयास ते मागे पुढे पाहणार नाहीत. यांना स्वतःच्या देहाविषयी ममता यत्किंचितहि आढळणार नाही. सर्वांत ही अत्युच्च कोटीची मनुष्ये होत. एखाद्या राष्ट्रांत जर<noinclude></noinclude> 7eg6zhxd4dvo855rdgppbi81x6hewqp पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/144 104 63414 229283 158977 2026-04-15T07:02:02Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229283 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|११६ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>अशी शंभर मनुष्ये निर्माण झाली तर अशा राष्ट्रास अवनतीची भीति नको. परंतु मनुष्यजातीचे बलवत्तर दुर्दैव ह्मणून अशी मनुष्ये फारच क्वचित् आढळतात. यानंतर दुसऱ्या प्रतीचे लोक ह्मटले म्हणजे स्वतःला उपाधि न होतां, पडवेल तितकें लोकांच्या उपयोगी पडावयाचे अशी इच्छा बाळगणारे हे होत. आणि तिसऱ्या प्रतीचे म्हटले तर केवळ आपल्याच सुखाकरितां जगणारे लोक होत. प्रसंगी परक्याचा जीव गेला तरी हरकत नाही, पण हे आपल्या सुखांत कमी पडू देणार नाहीत. यानंतर आणखी चवथा प्रकार एका संस्कृत कवीनें सांगितला आहे; व त्यांस त्याने निनांवी कोटीत ढकलले आहे. ह्मणजे त्यांस नांव काय द्यावे याची कल्पना कवीस झाली नाही. हे लोक केवळ मौजेखातर इतरांस पीडा करितील. लोकांना त्रास दिला ह्मणजे यांच्या आयुष्याची इतिकर्तव्यता झाली! पृथ्वीस जसे परस्परविरुद्ध असे दोन ध्रुव आहेत तसेच मानवसमाजालाहि दोन ध्रुव आहेत. स्वतः जिवाची पर्वा न करितां परक्याचे बरे करावयाचे हा एक ध्रुव, आणि स्वतःच्या जिवाची पर्वा न करितां परक्याचे अनिष्ट करावयाचे हा दुसरा ध्रुव. परक्याचे इष्ट करावयाचे हा जसा पहिल्याचा स्वभाव, तसाच परक्याचे अनिष्ट करावयाचे हा दुसऱ्याचा स्वभाव.<br> {{gap}}प्रवृत्ति आणि निवृत्ति असे दोन शब्द संस्कृत भाषेत नेहमी आढळतात. प्रवृत्ति ह्मणजे आंत घेणे आणि निवृत्ति ह्मणजे बाहेर टाकणे. आंत घेणे ह्मणजे सदोदित 'मी' आणि 'माझें' हाच विचार करणे. ज्या ज्या कारणांनी 'मी' आणि 'माझें' या विचारास पुष्टि मिळते ती सर्व कारणे प्रवृत्तिपर होत. यांत द्रव्य, सामर्थ्य आणि कीर्ति इत्यादिकांचा अंतर्भाव होतो. यांचा पगडा चित्तावर बसला ह्मणजे जगांतील सर्व संपत्ति, सर्व सत्ता आणि सर्व कीर्ति ही या एका 'मी'त सांठून राहावी अशी इच्छा उद्भवते. जगांतील सर्व संपत्ति इत्यादिकांचे केंद्रस्थान या 'मी'त येऊन राहते. यालाच प्रवृत्ति असें ह्मणतात. जगांतील सर्व सामान्य मनुष्यांची बुद्धि प्रवृत्तीकडे वळलेली असते; ही बुद्धि मावळू लागली ह्मणजे निवृत्तीचा उदय होऊ लागतो. व तिच्या उदयाबरोबर नीति आणि धर्म यांच्या कल्पनांचा उदय होऊ लागतो. प्रवृत्ति आणि निवृत्ति हे दोन्ही कर्माचे परिणाम आहेत. सहेतुक कर्माचा परिणाम प्रवृत्ति आणि अहेतुक कर्माचा परिणाम निवृत्ति. जगांतील सर्व धर्माचा आणि नीतिशास्त्रांचा पाया ह्मटला ह्मणजे निवृत्ति हाच होय. 'माझें' आणि 'मी' हे शब्दहि विसरून जाणे, आणि परक्याकरिता प्रसंगी जीव देण्यासहि न कचरणे ही निवृत्तीची परि-<noinclude></noinclude> 4gf7xtpjnl4r3b2x1bafn7za1e0uso6 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/145 104 63415 229284 158978 2026-04-15T07:06:14Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229284 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|११७ }} {{rule}}</noinclude>पक्व दशा होय. आपल्या मनाची इतकी तयारी झाली ह्मणजे कर्मयोगाच्या शेवटच्या पायरीस आपण पोहोंचलों असें होतें. सर्व चांगल्या कर्माचें हेंच अत्युच्च फळ आहे. एखाद्याने कोणत्याहि तत्वग्रंथाचा अभ्यास केला नसला, परमेश्वरावर त्याचा मुळीच विश्वास नसला, साऱ्या जन्मांत त्याने प्रार्थनापर असा एकहि शब्द उच्चारला नसला तथापि सत्कर्माने त्याची बुद्धि पूर्ण निवृत्तिपर झाली असली तर अत्यंत धार्मिक असा मनुष्य भक्तीने ज्या ठिकाणी जाईल अथवा मोठा तत्ववेत्ता ज्ञानाने जे ठिकाण हस्तगत करील तें ठिकाण या कर्मयोग्यासहि प्राप्त होईल. यावरून ज्ञानी, कर्मयोगी आणि भक्त हे सर्व शेवटी एकाच ठिकाणी मिळतात, असें तुमच्या लक्ष्यांत येईल. जेथें 'मी' आणि 'माझें' या शब्दांचीहि विस्मृति होते तेच ते ठिकाण. यालाच संन्यस्तवृत्ति असेंहि ह्मणतात. कोणत्याहि धर्माचा, पंथाचा अथवा तत्वविचाराचा कोणी मनुष्य असला तरी खऱ्या संन्यस्तवृत्तीच्या मनुष्याबद्दल त्याच्या मनांत अत्यंत आदरबुद्धि उत्पन्न झाल्यावांचून राहणार नाही. परक्याकरतां आपलें सर्वस्व व प्रसंगी जीवहि दान करण्याची ज्याची खरी तयारी आहे अशा मनुष्याबद्दल कोणाच्याहि मनांत अत्यंत पूज्यबुद्धि उत्पन्न झालीच पाहिजे. या ठिकाणी पंथाचा, मताचा अथवा धर्माचा प्रश्नच उद्भवत नाही. अगदी विरुद्ध मतांच्या धर्माचा अथवा पंथाचा कोणी असला तरी अशा मनुष्याबद्दल त्याला नकळतहि त्याच्या मनांत पूज्यवुद्धि उत्पन्न होते. एडविन आर्नोल्ड यांनी 'आशियाखंडाचा दीप' (Light of Asia) या नांवाने एक बुद्धाचें चरित्र लिहिले आहे; तें वाचून एखाद्या आग्रही ख्रिस्त्याच्या मनांतहि बुद्धाबद्दल पूज्यभाव उत्पन्न झाल्याचे तुह्मीं पुष्कळवेळां पाहिले असेल. बुद्ध निरीश्वरवादी होता. त्याने भक्तिमार्गाचा कधीहि उपदेश केला नाही. त्याने विशिष्ट असा तत्वमार्गहि शोधून काढिला नाही. त्याने केवळ संन्यस्तवृत्तीचा उपदेश केला. परक्यासाठी आपले सर्वस्व व प्रसंगी आपला जीवहि अर्पण करा, एवढाच त्याचा उपदेश आहे. सर्व धर्माचे, सर्व पंथांचें, सर्व मतांचें आणि सर्व तत्वदर्शनांचे अंतिम साध्य एकच आहे, ही गोष्ट आग्रही मनुष्याच्या लक्ष्यांत आलेली नसते ह्मणूनच तो एका विशिष्ट मताचा अथवा धर्माचा आग्रह धरून बसतो. भक्तिमार्गाची अगदी शेवटली पायरी म्हटली ह्मणजे सर्वत्र परमेश्वराचेंच अधिष्ठान पाहणें ही होय. खऱ्या भक्ताच्या मनांत 'मी' आणि 'माझे' या शब्दांची आठवणहि शिल्लक उरत नाही. कसल्याहि स्थितीत ‘परमेश्वरा, तुझी मर्जी' असेंच तो ह्मणतो. जगांत 'माझें' कांही नाही. जे काही आहे तें<noinclude></noinclude> 9d0np77osdlnitl3kggvdbhyjezx723 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/146 104 63416 229285 158979 2026-04-15T07:08:42Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229285 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|११८ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>'तुझें' आहे, हा निश्चय त्याच्या अंतःकरणांत पूर्ण बाणून गेलेला असतो. ही पूर्ण संन्यस्तवृत्ति नव्हे तर काय? ज्ञानाची शेवटची पायरीसुद्धा ही संन्यस्तवृत्तीच होय. जग हे काय आहे, मी कोण आणि विश्वचैतन्याचे स्वरूप काय आहे इत्यादिकांचा शोध करतां करतां सर्व जग केवळ मृगजलाभास आहे; दिसतें तसें तें नाहीं; तें प्रत्येक क्षणी बदलत आहे यामुळे तें अनिश्चित स्वरूपाचें आहे- मायानिर्मित आहे- असा त्याचा पक्का निश्चय होतो. जग अनित्य स्वरूपाचे आहे असा निश्चय एकवेळ बाणून गेल्यावर त्यांतील कोणत्या पदार्थांची त्याने इच्छा करावी? अशा रीतीनेच तो पूर्णत्यागी-पूर्ण संन्यस्तवृत्तीचा- बनतो. यावरून कर्म, भक्ति आणि ज्ञान यांचे अंतिमसाध्य- अंतिम पर्यवसान- एकच आहे असे सिद्ध होते. जगांत जे मोठे धर्मप्रवर्तक होऊन गेले, त्यांनी निरनिराळ्या मार्गाने या एकाच तत्वाचा उपदेश केला आहे. 'परमेश्वर जगांत नाहीं' असें जें त्यांनी सांगितले त्याचा वास्तविक अर्थ, जगांतील वस्तूंच्या मागे लागून परमेश्वराची प्राप्ति होणार नाही, हाच आहे. जगाचें जें स्वरूप आहे त्याहून परमेश्वराचे स्वरूप अगदी भिन्न आहे असे त्यांनी सांगितले. 'मी' आणि 'माझें' ही बहुधा सर्वत्र आढळून येणारी प्रवृत्ति हे जगाचे स्वरूप आहे, आणि या स्वरूपापासून निवृत्त होणे ह्मणजे परमेश्वररूप होण्यासारखे आहे. प्रवृत्ति हे जगाचे स्वरूप आणि निवृत्ति हे परमेश्वराचे स्वरूप आहे. एखादा मनुष्य रत्नजडित सुवर्णाच्या राजवाड्यांत राहत असून आणि सर्व प्रकारचे भोग भोगीत असूनहि जर त्याच्या मनांतून 'मी' आणि 'माझें' यांची आठवण गेली तर त्यालाहि पूर्ण संन्यासी ह्मणतां येईल. तसेंच पर्णकुटीत राहणारा आणि अंगावर फाटक्या लंगोटीवांचून दुसरें वस्त्र नसणारा असा कोणी असून जर जगांतील वस्तूंचा हव्यास त्याच्या मनांतून गेला नसेल तर तो संन्यासी नसून पूर्ण संसारीच म्हटला पाहिजे.<br> {{gap}}आपण कोणतेंहि कर्म केले तरी त्यांतून चांगला आणि वाईट असे दोन्ही परिणाम घडून येतात. केवळ चांगले अथवा केवळ वाईट असें एकहि कर्म आपणास करता येत नाही, याचा विचार आपण पूर्वी केलाच आहे. तर मग आह्मीं कर्म तरी कसे करावे हा प्रश्न साहजिक उद्भवतो. या प्रश्नाचे उत्तर देण्याच्या भानगडीत पडून जगांतील कित्येक पंथाचे प्रवर्तक बेसुमार वाहावले आहेत. कोणाला तरी दुःख दिल्यावांचून स्वतःस सुखाची प्राप्ति करून घेतां येत नाही, असे पाहून स्वतःच्या गरजा कमी करतां करतां शेवटी मरून जावयाचें<noinclude></noinclude> 73rasniwrc7x5rq7o19i2be2a03h6a5 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/147 104 63417 229286 158980 2026-04-15T07:12:22Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229286 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|११९ }} {{rule}}</noinclude>अशी तोड त्यांनी काढिली. जणूं काय आपण मरून जाणे हीच जन्माची इतिकर्तव्यता आहे! आपण जगावयाचे म्हटले तर प्रत्यक्ष अथवा परंपरेनें कोणा तरी प्राण्याची हत्या आपणांस करावी लागणारच. त्या अर्थी आपला देह नाहीसा करावा ह्मणजे सर्व पापांचें मूळच नाहीसे होईल असा त्यांचा समज असावा, असे वाटते. जैनधर्माचें हेच साध्य ह्मणून सांगितले आहे. वरवर विचार करणारास ही विचारपद्धति सुसंगतशी दिसते; परंतु कर्म ह्मणजे काय, कोणत्या कर्माचे काय परिणाम होतात आणि ते कोणावर होतात, याचा विचार केला ह्मणजे वरील विचारपद्धतीचा पोरकटपणा तेव्हांच उघड दिसून येतो. याचा उलगडा भगवान् श्रीकृष्णांनी गीतेंत केला आहे, तो असा:- जें जें कर्म तुह्मीं स्वतःच्या इंद्रियसुखलालसेनें कराल तें तें तुह्मांस बद्धक होईल. 'मी'पणा टाकून व कर्ताकरविता निराळाच आहे असें पक्केपणी समजून जें कर्म तुह्मीं कराल त्याचे बरें अथवा वाईट फळ तुह्मांस भोगावे लागणार नाही. कोणतेंहि कर्म करतांना हेतु प्रथम शोधावा. स्वतःच्या सुखेच्छेच्या प्रेरणेने आपण कर्मास प्रवृत्त होत असलो तर त्याचे परिणाम आपणांस भोगलेच पाहिजेत. आणि तसे नसेल तर ते आपणांस भोगण्याचे कारण नाही. कर्मयोगदृष्टया नुसती कृति गौण असून हेतु प्रधान आहे. स्वसुखेच्छेची प्रेरणा नसतां जर तुह्मीं सर्व विश्वाचा वध केलात अथवा स्वतः मारले गेलांत तरी त्या कृत्याचें कोणतेच बरें अथवा वाईट फळ तुह्मांस भोगण्याचे कारण नाही. अशावेळी त्या बऱ्यावाईट कर्माचे कर्तृत्वच तुमच्याकडे नसते, असा भगवान् श्रीकृष्णांच्या सांगण्याचा सारांश आहे. यासाठी कर्मयोगाचे सांगणे असें आहे की "बाबांनो, संसार सोडून उगीच रानांत जाऊन राहूं नका. जगांत राहून संसार करतां करतां जगाचे जे जे अनुभव येतील ते ते सर्व घ्या. कर्म करणें तें त्यापासून सुख होईल या आशेने करूं नका. त्यापेक्षां कर्म न केलेले बरे. इंद्रियांची तृप्ति ही जीविताची इतिकर्तव्यता नव्हे. ह्मणून प्रथम 'मी'पण विसरा, ह्मणजे 'मी' आणि जग एकच असा अनुभव तुह्मांस येईल. आपल्या इंद्रियांची तृप्ति करण्याकरितां 'जग' निर्माण झाले आहे ही कल्पना जाळून टाका." कांहीं कांहीं लोक आपल्या मुलांबाळांस असें शिकवित असतात की, हे सारे विश्व सूर्य, चंद्र वगैरे- परमेश्वराने मनुष्यांच्या सुखासाठी रचले आहे. जणूं काय परमेश्वराला दुसरा चांगला उद्योगच नव्हता! मित्रांनो, आतां यापुढे मुलांबाळांना असल्या मूर्खपणाच्या गोष्टी शिकवू नका. दुसरे काही लोक असें ह्मणणारे आहेत की<noinclude></noinclude> dar6z6fbd3q4p6tateiyedifyk1alsv पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/२ 104 103288 229288 208552 2026-04-15T07:22:50Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229288 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br><br><Br><Br> {{rule}}{{rule}} {{center|मुद्रक - रा. चिंतामण सखाराम देवळे, मुंबई वैभव प्रेस, सर्व्हेट्स<Br>ऑफ् इंडिया सोसायटीज् बिल्डिंग, सॅढर्स्ट रोड, गिरगांव - मुंबई.<Br><br> {{rule|5em}}<br> प्रकाशक, सौ. यशोदाबाई भट, भाई जिवनजीची गल्ली, ठाकुरद्वार, मुंबई.}} {{rule}}{{rule}} <br><br><Br><Br>{{nop}}<noinclude></noinclude> afpc2uj5oc2ec5soyx6wa1bcx4zv0ka 229289 229288 2026-04-15T07:23:43Z कल्पनाशक्ती 3813 229289 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br><br><Br><Br> {{rule}}{{rule}} {{center|मुद्रक - रा. '''चिंतामण सखाराम देवळे''', मुंबई वैभव प्रेस, सर्व्हेट्स<Br>ऑफ् इंडिया सोसायटीज् बिल्डिंग, सॅढर्स्ट रोड, गिरगांव - '''मुंबई'''.<Br><br> {{rule|5em}}<br> प्रकाशक, '''सौ. यशोदाबाई भट''', भाई जिवनजीची गल्ली, ठाकुरद्वार, मुंबई.}} {{rule}}{{rule}} <br><br><Br><Br>{{nop}}<noinclude></noinclude> apmvki950ia0h44geolek12h9xxv64y पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/१ 104 110129 229287 2026-04-15T07:19:37Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229287 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude> <br><br><br><br> {{center|{{xxxx-larger|'''आर्य-स्त्री-रत्ने.'''}}}} <br><br><br><br> <br><br><br><br> {{center|लेखिका<Br>{{x-larger|'''सो. यशोदाबाई भट.'''}}<Br> 'शिक्षणाच्या प्रभावानेंच'<Br>या पुस्तकाची कर्त्री.}}<br> {{rule|5em}}<br> {{center|मुंबई.}}<br> {{rule|4em}}<br> {{center|सन १९१७.}}{{nop}}<noinclude></noinclude> jw5nrrtewnjlb2q0q9w57b6tpvbc6bn पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/३ 104 110130 229290 2026-04-15T07:30:08Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229290 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br> {{center|{{x-larger|'''प्रस्तावना.'''}}}} {{rule|5em}}<Br> {{gap}}श्रीमती सौ. यशोदाबाई यांचें भट नांव 'लेखिका' म्हणून महाराष्ट्रीय वाचकांस परिचितच आहे. ललितवाङ्मयांत प्रत्यहीं दृष्टीस पडणारे त्यांचे लेख त्यांच्या लेखनकौशल्याची साक्ष देत आहेत. 'चतुर्थीचा चंद्रमा' दृष्टीस पडल्यावर, असे तारे स्त्री लेखिकांनीच निर्माण करावे, असा सहज उद्गार निघतो. 'मातृशाप' ही लहानशीच गोष्ट ऐतिहासिक माहिती ललितवाङ्मयाच्या वाचकांस देण्याच्या त्यांच्या प्रयत्नाची साक्ष पटवीत आहे, तर 'सुगृहिणी वादावरून सुचलेले विचार' हा लेख वाचतां प्रस्तुतच्या संक्रमणकालांत स्त्रीपुरुषांच्या आचरणाची दिशा रेखाटण्याचा प्रयत्न दृष्टीस पडतो.<br>{{gap}}प्रस्तुत परिस्थितीचा विचार करितांना, पाश्चात्य संस्कृतीचा परिणाम समाजावर होऊं लागला आहे; व पश्चिमेकडील चांगल्याबरोबर कांहीं वाईट चालींचाही इकडे प्रवेश होऊ पहात आहे. अशावेळी मूळचें चांगलें असेल तें कायम ठेवून, त्यांतील उणीव असलेलीच तेवढी दूर करणे, व आगंतुक गर्ह्य, त्याज्य, अथवा निंद्य गोष्टींना मज्जाव करणें प्रत्येक समाजभक्ताचें पवित्र कर्तव्य आहे. अशा प्रकारचाच प्रस्तुतचा श्री. सौ. यशोदाबाई भट यांचा प्रयत्न आहे. मानवीय समाजाचें सोपपत्तिक व व्यावहारिक निरीक्षण कैलें असतां असें दिसून येतें कीं, स्त्रिया व पुरुष ही समाजाचीं समबल व समांतर चक्रे आहेत. त्यांतूनही या उभयतांच्या नैसर्गिक भावनांचा उत्क्रांतिदृष्ट्या विचार केल्यास स्त्रियांची अंतःसंस्कृति पुरुषांपेक्षां फार उच्चतम कोटीची आहे असें दिसून येतें. स्त्रीजातीची नैसर्गिक शांतता, त्यांची परोपकारतत्परता, तसेंच अपकारसहिष्णुता, व बऱ्याच प्रसंगी अपकाराची फेड उपकाराने करणारी त्यांची साधुवृत्ति ही सर्व त्यांच्या उच्च संस्कृतीची साक्ष देत आहेत.<br>{{gap}}अशा प्रकारच्या उच्चतम कोटीतल्या स्त्रीरत्नांची ओळख करून देण्याचा श्री. सौ. यशोदाबाई यांचा हा नवीनच प्रयत्न आहे असें नाहीं हें त्यांच्या 'शिक्षणाच्या प्रभावानेच' या गोष्टींवरून लक्षांत येईल. प्रस्तुतचा त्यांचा प्रयत्न आपल्या भारतवर्षातील स्त्रीरत्नांनीं उच्चतम आत्मत्याग करून आपल्या भगिनींकरितां तयार करून ठेवलेल्या उज्ज्वल रत्नमालेपैकीं कांहीं रत्ने अर्पण करण्याचा आहे.{{nop}}<noinclude></noinclude> ld1pdilxuooq94cx5opwchis5t5o2tv पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/४ 104 110131 229291 2026-04-15T07:30:40Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ ( ४ ) प्रस्तुत पुस्तकांत (१) ' पतीचा उद्धार करणारी चुडाला' (२) 'पतींचें व स्वकुलाचें सत्व राखणारी धीर गंभीर चांगुणा' ( ३ ) 'पितृकुलरक्षणार्थं आत्मयज्ञ करणारी सुमती' (४) ' सुप्रसिद्..." 229291 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ ( ४ ) प्रस्तुत पुस्तकांत (१) ' पतीचा उद्धार करणारी चुडाला' (२) 'पतींचें व स्वकुलाचें सत्व राखणारी धीर गंभीर चांगुणा' ( ३ ) 'पितृकुलरक्षणार्थं आत्मयज्ञ करणारी सुमती' (४) ' सुप्रसिद्ध राक्षससम्राज्ञी महासाध्वी मंदोदरी' (५) पतिनिष्ठ गांधारी' या स्त्रीरत्नांच्या उज्वल चरित्रांचे साहाय्याने भारतीय महिलांचा उचतम आत्मत्यागाचा आदर्श आपले वंधुभगिनीं- पुढे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, व तो उत्कृष्ट साधला आहे, हें वाचकांच्या लक्षांत येईलच. सर्वमान्य रामायण व महाभारत यांतील नायिका सीतादेवी व सती द्रौपदी या साध्वींचा आपल्या आर्यावर्तीतील आबालवृद्धांस उत्तम परिचय आहे; परंतु त्यांच्याच मार्गांनें क्रमण करणारे दुसरे महदात्मे ज्या इतर मानवशरीरांतून अवतरण पावले, व ज्यांच्या चरित्र कथानकांचा सर्वोस लाभ मिळत नाहीं, अशा महासाध्वी स्त्रीरत्नांचा आर्यवाचकांनां प्रस्तुत पुस्तकांत परिचय करून दिला आहे. यांपैकी पहिले आख्यान सुप्रसिद्ध योगवासिष्ठांतील निर्वाण प्रकरणांपैकी ७७ ते ११० सर्गांचे आधाराने प्रथित केलें आहे. तिसरें आख्यान श्रीमन्महा- भारतांतील वनपर्व १२२ ते १२५ अध्यायांचे आधारें दिलें आहे. बाकीच्या तीन साध्वी वाचकवर्गांना परिचितांपैकीच आहेत. आर्यस्त्रियांचे राष्ट्रीय, सामाजिक, धार्मिक, व नैतिक बाबत कोणचें ध्येय असावें, यासंबंधीं एका सुसंस्कृत आर्यविदुषीचे विचार या दृष्टीने प्रस्तुत ग्रंथाचें फार महत्व आहे. अशा विचारांचा आदर्शभूत असा हा ग्रंथ कदाचित् रुचि- वैचित्र्यामुळे सर्वास सारखाच आवडणार नाहीं. परंतु सामाजिक बाबतीत श्रम करणान्या प्रत्येक व्यक्तीस हा ग्रंथ नवीन विचार व नवीन मार्ग दाखवील यांत शंका नाही. शेवटी आमचे मित्र रा. रा. माधवराव भट यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे प्रस्तुत ग्रंथाचा अवतार झाला, सबब त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून ही प्रस्तावना संपवितों. मि. कार्तिक कृ. ११२ मंगळवार शके १८३८ जगन्नाथ रघुनाथ घारपुरे.<noinclude></noinclude> fvxdig7xeyo7fcng3yu273jvkw2rdtk 229292 229291 2026-04-15T11:56:13Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229292 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( ४ )}}</noinclude>{{gap}}प्रस्तुत पुस्तकांत (१) 'पतीचा उद्धार करणारी '''चुडाला'''' (२) 'पतींचें व स्वकुलाचें सत्व राखणारी धीर गंभीर '''चांगुणा'''' (३) 'पितृकुलरक्षणार्थं आत्मयज्ञ करणारी '''सुमती'''' (४) 'सुप्रसिद्ध राक्षससम्राज्ञी महासाध्वी '''मंदोदरी'''' (५) 'पतिनिष्ठ '''गांधारी'''' या स्त्रीरत्नांच्या उज्वल चरित्रांचे साहाय्याने भारतीय महिलांचा उच्चतम आत्मत्यागाचा आदर्श आपले बंधुभगिनींपुढे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, व तो उत्कृष्ट साधला आहे, हें वाचकांच्या लक्षांत येईलच.<Br>{{gap}}सर्वमान्य '''रामायण''' व '''महाभारत''' यांतील नायिका '''सीतादेवी''' व सती '''द्रौपदी''' या साध्वींचा आपल्या आर्यावर्तीतील आबालवृद्धांस उत्तम परिचय आहे; परंतु त्यांच्याच मार्गांनें क्रमण करणारे दुसरे महदात्मे ज्या इतर मानवशरीरांतून अवतरण पावले, व ज्यांच्या चरित्र कथानकांचा सर्वांस लाभ मिळत नाहीं, अशा महासाध्वी स्त्रीरत्नांचा आर्यवाचकांनां प्रस्तुत पुस्तकांत परिचय करून दिला आहे.<Br>{{gap}}यांपैकी पहिले आख्यान सुप्रसिद्ध '''योगवासिष्ठांतील''' निर्वाण प्रकरणांपैकी ७७ ते ११० सर्गांचे आधाराने ग्रथित केलें आहे. तिसरें आख्यान '''श्रीमन्महाभारतांतील''' वनपर्व १२२ ते १२५ अध्यायांचे आधारें दिलें आहे. बाकीच्या तीन साध्वी वाचकवर्गांना परिचितांपैकीच आहेत.<Br>{{gap}}आर्यस्त्रियांचे राष्ट्रीय, सामाजिक, धार्मिक, व नैतिक बाबत कोणचें ध्येय असावें, यासंबंधीं एका सुसंस्कृत आर्यविदुषीचे विचार या दृष्टीने प्रस्तुत ग्रंथाचें फार महत्व आहे. अशा विचारांचा आदर्शभूत असा हा ग्रंथ कदाचित् रुचिवैचित्र्यामुळे सर्वास सारखाच आवडणार नाहीं. परंतु सामाजिक बाबतीत श्रम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस हा ग्रंथ नवीन विचार व नवीन मार्ग दाखवील यांत शंका नाही.<Br>{{gap}}शेवटी आमचे मित्र रा. रा. माधवराव भट यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे प्रस्तुत ग्रंथाचा अवतार झाला, सबब त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून ही प्रस्तावना संपवितों. <center> {| {{brace table parameters}} |मि. कार्तिक कृ. ११||{{brace|r|ht}}||{{gap}}'''जगन्नाथ रघुनाथ घारपुरे.''' |- |मंगळवार शके १८३८||{{brace|r|hb}}|| |} </center> <br> {{rule|5em}}{{nop}}<noinclude></noinclude> g8r9se3j6dplxcuqk4bll6pla4v2nmn