विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.46.0-wmf.24 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/148 104 63418 229345 159040 2026-04-17T11:06:55Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229345 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१२० |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>बकरी वगैरे जनावरें आमच्या खाण्याच्या उपयोगी पडावी ह्मणूनच परमेश्वराने निर्मिलीं आहेत! हा सर्व मूर्खपणाचा बाजार आहे. उद्या एखादा वाघहि असेंच ह्मणूं लागेल की परमेश्वराने सर्व मनुष्ये माझ्या पोटासाठी निर्माण केली आहेत. तोहि उद्यां प्रार्थना करूं लागेल की ‘परमेश्वरा, ही मनुष्ये मजपुढे येऊन उभी राहत नाहीत तर ती केवढी पापी आहेत! ती तुझा कायदा मोडीत आहेत!' जर जग आमच्यासाठी निर्माण झाले असेल तर आह्मींहि जगासाठी निर्माण झालों नाही काय? सर्व जग माझ्यासाठी निर्माण झाले आहे, ही घातुक कल्पनाच आमच्या साऱ्या अवनतीच्या मुळाशी आहे. कोट्यवधि मनुष्ये या जगांतून दरवर्षी नाहीशी होतात आणि कोट्यवधि जन्मास येतात. जगाचें हें रहाटगाडगें अनंतकाल चालू आहे आणि अनंतकाल चालू राहणार.<br> {{gap}}यासाठी सशास्त्र कर्म करावयाचे ह्मटले तर अगोदर आशेचा त्याग केला पाहिजे. त्यानंतर मी करतो, मी भोगतों, असल्या भावनांचा त्याग केला पाहिजे. या भावनांमुळेच तुह्मीं आणि कर्म ही इतकी एकजीव होऊन बसतां की युगानुयुगें तुह्मीं कर्म करीत राहिलां तरी ही जोडी फुटणे अशक्य होतें. यासाठी कर्म करीत असतां तुह्मीं केवळ साक्षित्व स्वीकारिलें पाहिजे. अलिप्तपणे प्रत्येक कर्म करावयाचे, ह्मणजे त्यांतील यशाने हुरळावयाचें नाहीं अथवा अपयशानें म्लान व्हावयाचे नाही. अशा बुद्धीने तुह्मीं कर्म करूं लागलां ह्मणजे साक्षित्व याचा बरोबर अर्थ तुह्मांस कळू लागेल. माझे सद्गुरु ह्मणत असत की, 'आपल्या मुलांबाळांकडे तुह्मीं दाईच्या दृष्टीने पहा.' दाईजवळ दुसऱ्या कोणाचें मूल असले तरी ती त्याच्याशी इतक्या लडिवाळपणे बोलेल, खेळेल आणि त्याचे लाड करील की जणू काय ते तिचेंच मूल आहे! परंतु घरधन्याने तिला नोकरीतून कमी केले की त्याचक्षणी आपले लुगडे चोळी कांखोटीस मारून ती तडक घराबाहेर चालती होईल. घराकडे ती परतून बघणारहि नाही. मुलावरचे तिचे प्रेम एका क्षणांत लयास जाते. तुमच्या मुलांस सोडून दुसऱ्याच्या मुलांस घेण्यासाठी तिचे हात त्याचक्षणी तयार असतात! अशाच रीतीने तुह्मी या जगांत सदोदित राहिले पाहिजे. जी कांहीं चीजवस्त तुमच्यापाशी आहे ती वास्तविक परमेश्वराची. त्याने ती काही वेळ संरक्षणार्थ तुमच्या स्वाधीन केली आहे, असेंच तुह्मीं सदोदित समजले पाहिजे. अमुक चीजवस्त 'माझी' असें तुह्मीं ह्मणूं लागला की त्याचक्षणी मोह तुह्मांस पछाडतो व दुर्बळ करितो. तुमचें सुखदुःख त्या वस्तूच्या असण्यानसण्यावर<noinclude></noinclude> aalyibzprzo1nlgjgycjkfnwmj1vnyq पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/149 104 63419 229346 159041 2026-04-17T11:14:40Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229346 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|१२१ }} {{rule}}</noinclude>अवलंबून राहूं लागते, आणि मी 'स्वतंत्र' आहे, 'परमेश्वरूप' आहे, ही भावना नाहीशी होऊन तुह्मीं आपल्या परमेश्वरस्वरूपापासून लांब जातां.<br> {{gap}}आतां याहूनहि परतंत्रतेचे एक अधिक भयंकर स्वरूप आहे. अमुक मनुष्य आपला शत्रु आहे असें निश्चित समजलें ह्मणजे त्याबद्दल सावधगिरी बाळगणे थोडे सोपे होते; पण तोच जर प्रच्छन्न शत्रु असला- मित्रत्वाचें पक्के सोंग घेऊन आला असला, तर त्याचा कावा आपणांस केव्हां गळफांस लावील याचा नेम नाही. तसेच जे दुर्गण ह्मणून उघडपणे दिसतात त्यांचा संपर्क आपणांस होऊ नये अशी खबरदारी घेणे सोपे आहे; परंतु दुर्गुणांनी सद्गुणांचे रूप घेतले ह्मणजे त्यांचा मोह अनिवार असतो. असे समजा, की, आपण श्रीमंत आहों आणि परोपकार करण्याची बुद्धि आपणांस आहे. अशा वेळी अनेक गरीब दुबळे आपला आश्रय करितात. गरीब दुबळ्यांस आश्रय देणे ही गोष्ट वस्तुतः पुण्यकारक आहे. पण तीमुळेच अभिमानाचे वारें हळूहळू आपल्या मनांत शिरूं लागते. 'मी इतक्यांचा पोषक आहे,' 'इतक्या मनुष्यांचें सुखदु:ख मजवर अवलंबून आहे' असले क्षुद्र विचार हळूच आपल्या मनांत शिरून बसतात. सामान्य जनतेकडूनहि असल्या विचारांस प्रोत्साहनच मिळतें. 'अमुक मनुष्य मोठा उदार, दिलदार आणि परोपकारी आहे' असा प्रवाद आपल्या कानी येऊ लागला की आपला अहंकार- अभिमान- बळावू लागतो, आणि सद्गुणाचे स्वरूप हळू हळू पालटावयास लागून शेवटी त्याचे दुर्गुणांत पूर्ण रूपांतर होते. वास्तविक विचार केला तर सर्व मनुष्ये परमेश्वरस्वरूप असल्यामुळे त्यांना स्वतःच्या सुखासाठी दुसऱ्या कोणाच्या तोंडाकडे पाहण्याचा प्रसंग यावा ही आनंदाची गोष्ट आहे काय? आपणांवर अवलंबून राहणारांची ही स्थिति खचित आनंददायक नाही. असें असतां त्यांच्या दुःखांत आपण आनंद मानणे हे खचित पाप होय. त्यांच्या स्थितीबद्दल आपणांस वास्तविक वाईट वाटले पाहिजे. दुसरा विचार असा की आपण जन्मासहि आलों नसतो तर त्यांचे काही अडून राहिले असते काय? आपणावर कोणाचेंहि सुखदुःख अवलंबून नाही. जो तो आपापल्या कर्मानुसार सुखदुःख भोगीत असतो, हे तत्व आपल्या हृदयांत पूर्णपणे बाणवून ठेवले पाहिजे. सर्वांचा पोषक, सर्वांचा साहाय्यकर्ता निराळाच आहे. त्याच्याच योजनेप्रमाणे कांहीं मनुष्यांस तो आपणाकडे पाठवितो. त्यांस आपण आपल्या पदरची एक काडीहि देत नसून त्यांचेच त्यांस आपण परत देत असतो आम्हासारखे कोट्यवधि कर्ण जन्मासहि आले नाहीत तरी जगांतील दुःखांत रतिभरहि भर पडा-<noinclude></noinclude> 3n45gwlpfxjnt2wj7nfqwt015erle9a पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/150 104 63420 229347 159042 2026-04-17T11:24:52Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229347 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१२२ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>वयाची नाही. यासाठी नित्य लक्ष्यांत बाळगण्यासारखी गोष्ट ही की, परोपकाराचा हा हक्क परमेश्वराकडून तुम्हांस कांहीं काल प्राप्त झाला आहे. याचा सदुपयोग तुह्मीं केलात तर दुसरे हक्कहि तुह्मांस प्राप्त होणार आहेत; पण दुरुपयोग केलात तर हा हक्क जाऊन दुसरे मिळावयाचे तेहि मिळणार नाहीत. यासाठी या हक्काचा सदुपयोग करून त्यापासून जें कांहीं शिकावयाचे असेल तें शिकून घेऊन आपल्या ईश्वरत्वाकडे एक पायरी अधिक चढणे हे आपले कर्तव्य आहे. आपणांस ही अनुपम संधि प्राप्त झाली आहे, तिचा आपण योग्य फायदा करून घेतला तर जगांत आपणांस दुःख प्राप्त होण्यास फारसे कारण उरणार नाही. तुम्ही अगदी राज्यावर बसला असलां आणि शेंकडों नोकरांचे धनी असलां, तरी जोपर्यंत वरील तत्व तुम्हीं पक्के लक्ष्यांत बाळगून वागत असाल तोंपर्यंत तुम्हांस दुःख होईल असें कांहीं करण्याची कोणासहि इच्छा व्हावयाची नाही. तुमचे काही मित्र या वर्षी कालवश झाले असतील, त्यांच्यासाठी जग वाट पाहत बसले आहे काय? त्याच्या सतत चालू असणाऱ्या प्रवाहांत कोठे लहानसा तरी बांध पडला आहे काय? नाही. तो अगदी पूर्वीप्रमाणेच चालू आहे. यासाठी जगाकरितां ह्मणून आपणांस कांहीं करावयाचे आहे ही भावना टाकून द्या. जगाला मदत करण्यासाठी आपला जन्म झाला असे वाटणे हा निर्भेळ मूर्खपणा आहे. हा दुरभिमान सद्गुणाचे सोंग घेऊन आलेला आहे हे पुष्कळ वेळां आपल्या लक्ष्यांत येत नाही. कर्मापासून जी दुःखप्राप्ति होते तिचे कारण दुरभिमान हेच आहे. कोणाचेंहि कोणावांचून अडत नाही, हा सिद्धांत आपण एक वेळ पक्का हृदयांत बाळगिला ह्मणजे अभिमानयुक्त कर्माचें फल जे दुःख तें आपणास मिळण्याचे कारण उरत नाही. आपण कोणास काही दिले व त्याजबद्दल कृतज्ञतेच्या एखाद्या शब्दाचीहि अपेक्षा केली नाही तर अशा मनुष्याच्या कृतघ्नपणाने आपणांस वाईट वाटण्याचे कारणच उरत नाही. जिची आपणास अपेक्षाच नव्हती अशी वस्तु मिळाली नाही तर त्याचे दुःख काय आहे? यासाठी कोणास कसल्याही प्रकारची मदत करतांना केवळ कर्तव्यबुद्धि जागृत ठेवावी. त्याला साहाय्य करण्याचे काम परमेश्वराने आपणाकडे सोपविलें आहे, आणि परमेश्वर दाता असून आपण केवळ साधन आहों असा आपल्या बुद्धीचा निश्चय झाला पाहिजे. आपणाकडून दुसऱ्यास जें कांहीं प्राप्त होतें तें वास्तविक त्याच्या कर्माचे फल असते. आपल्या कर्मामुळे साधनीभूत होणे, हे आपल्याकडे येते. अशी वस्तुस्थिति असतां मी देणारा<noinclude></noinclude> ebbbzpszlfrszt4bqdvjerecmy7x4xv पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/151 104 63421 229348 159043 2026-04-17T11:43:40Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229348 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|१२३ }} {{rule}}</noinclude>आणि तो घेणारा असें म्हणून गर्व वाहण्याचे तुम्हांस यत्किंचित् तरी कारण आहे काय? आपण परोपकाराची काही गोष्ट केली ह्मणजे जगाचे आपण बरें केलें असें आपल्यास वाटते; पण बरे म्हणजे काय आणि वाईट म्हणजे तरी काय ? परिस्थितीच्या दोन विशिष्ट स्वरूपांस ही नांवे आपणच दिली आहेत. आपल्या मनांत एखादी लालसा उत्पन्न झाली असतां ती ज्यायोगें तृप्त होईल तें बरें आणि याच्या उलट स्थिति असणे म्हणजे तें वाइंट, अशा आपल्या व्याख्या आहेत. परंतु कसल्याच प्रकारच्या लालसा ज्याला उरल्या नाहीत त्याला काही बरें नाही आणि कांहीं वाईटही नाही. यासाठी 'मी' आणि 'माझें' या कल्पनाद्वयापासून उद्भवणाऱ्या इच्छेचा त्याग केला, तर बरे आणि वाईट, सुख आणि दुःख या द्वंद्वाचा नाश आपोआपच होईल. इच्छेचा त्याग करावा हे म्हणणे जितकें सोपे आहे त्याहून तसे करणे शतपट अधिक कठीण आहे, ही गोष्ट मलाहि कबूल आहे. परंतु हे असिधाराव्रत तडीस गेले तर कोणत्या पदाची प्राप्ति होणार आहे, याची थोडी तरी कल्पना ज्याला होईल तो हे व्रत आनंदाने स्वीकारील. हे व्रत जसजसे सिद्ध होऊ लागते तसतसे आपण अधिक स्वतंत्र होऊ लागतो. वास्तविक आम्हांवर सत्ता चालवून आम्हांस कर्म करण्यास भाग पाडणारी अशी एकहि शक्ति या विश्वांत जन्मास आली नाही. आमच्या इच्छेविरुद्ध आम्हांवर सत्ता चालविण्यास कोणीहि समर्थ नाही; परंतु आम्ही पदभ्रष्ट होतों, अहंकार आम्हांस पछाडतो, आणि मी कर्ता, मी भोक्ता असें आम्ही म्हणूं लागतो. कर्म आणि आम्ही यांचा अशा रीतीने एकजीव झाल्यावर कर्मापासून उद्भवणारी दुःखें भोगल्यावांचून सुटका आहे काय? आपल्याच मुर्खपणाने आपण आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला तर त्याबद्दलचे दुःख आपणांस भोगल्यावांचून गत्यंतर नाही. यासाठी 'मी' आणि 'माझें' ही भावना टाकून केवळ साक्षित्वाने तुम्ही कर्मे करूं लागलां म्हणजे सध्या जी शक्ति अनिवार्यपणे तुम्हांस कर्मे करावयास लावीत आहे, तिचा एक एक अवयव तुटून शेवटी ती गतप्राण होईल. अशा खऱ्या स्वतंत्र मनुष्याचे लक्षण हेच आहे की जगांत घडून येणाऱ्या गोष्टींपासून त्याला हर्ष अथवा विषाद होत नाही. कांहीं प्राप्त झाल्याचा जसा त्याला आनंद होत नाही तसेच सर्वस्व गेल्यास त्याला दुःखहि होत नाही. सारे जग इकडचे तिकडे झाले तरी त्याच्या स्थितीत अणुमात्र फरक पडत नाही. ''''दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः । वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥'''' असे त्याचे लक्षण गीतेत सांगितले आहे.{{nop}}<noinclude></noinclude> 6h174s92juqji41rywr474dgyyz2fse पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/152 104 63422 229349 159044 2026-04-17T11:45:37Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229349 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१२४ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>{{gap}}हिंदुस्थानांत पूर्वी व्यास या नांवाचे एक महर्षि होऊन गेले. वेदांतसूत्रांचे कर्ते अशी यांची प्रसिद्धि आहे. हे मोठे साधुवृत्तीचे होते. यांच्या पित्याने पूर्णत्व मिळविण्यासाठी फार प्रयत्न केले, पण त्यास यश आले नाही. त्याचप्रमाणे व्यासांच्या आजाने व पणजानेंहि प्रयत्न केले, पण त्यांसहि सिद्धि प्राप्त झाली नाही. खुद्द व्यास महर्षीसहि चिरंतन सुखाची प्राप्ति झाली नव्हती; परंतु व्यासांचा पुत्र शुक हा मात्र जन्मतःच सिद्ध होता. व्यासांनी त्याला सर्व अध्यात्म विद्या सांगितली आणि नंतर पूर्णत्वाकरितां त्यांनी त्याला जनकराजाकडे पाठविलें. जनक हा एका मोठ्या देशाचा अधिपति होता. याला विदेह जनक असें ह्मणत असत. विदेह ह्मणजे ज्याचा देहाध्यास संपूर्ण नष्ट झाला आहे असा. जनक हा जरी जन्मतः राजा होता आणि जन्मापासून ऐषआरामांत वाढला होता तरी त्याची देहावरील आसक्ति पूर्ण नाहीशी झाली होती. 'अहं ब्रह्मास्मि' अशी जनकाची सर्वकाल भावना असे. अशा प्रकारच्या त्या राजाकडे शुकाची रवानगी व्यासांनी करून दिली. राजा जनक अंतर्ज्ञानी होता. महिर्षीचा पुत्र आपणाकडे येत आहे, ही गोष्ट त्याला अगोदरच समजली व त्याची परीक्षा पाहण्यासाठी जनकानें कांहीं अगाऊ योजना करून ठेविली. शुक राजद्वारी आला आणि आपणास राजास भेटावयाचे आहे असे सांगू लागला; परंतु देवडीवरील लोकांनी त्याच्या ह्मणण्याकडे फारसे लक्ष दिले नाही. तेथेच एक आसन देऊन त्यावर त्यांनी त्याला बसविले. याहून त्यांनी त्याची अधिक कांहीं वास्तपुस्त केली नाही. वास्तविक म्हटले तर तो महर्षीचा पुत्र होता. महर्षीची कीर्ति सर्व देशांत पसरली होती व त्यांस सर्व लोक पूज्य मानीत होते. खुद्द शुकहि मानार्ह समजला जात होता. असे असतांहि त्या देवडीवाल्यांनी त्याच्याशी आडदांडपणाचें वर्तन केलें. शुकमुनी बिचारा तीन दिवस देवडीवरच बसला होता. नंतर त्याच्या आगमनाची वार्ता राजास देवडीवाल्यांनी कळविली. तेव्हां राजा जनक आपल्या मंत्र्यांसह तेथें आला, व महर्षि पुत्राचे त्याने मोठ्या सन्मानाने स्वागत करून त्यास राजवाड्यांत नेल. नतर अंगास सुवासिक उटणी लावून त्याने त्यास मंगलस्नान घातले व त्याचा पूजा केली. इतकें सर्व होत असतां राजा त्याच्याकडे बारीक लक्ष्य लावून पाहा होता; परंतु शुकाच्या मुखावर सुखाची अथवा दुःखाची यत्किचित् छाचार त्याला दिसून आली नाही. दरवाजावर तीन दिवस बसला असतां जी त्याची वृत्ति तीच आतांहि कायम होती. त्याचे पूजन झाल्यावर राजाने त्यास दरबा<noinclude></noinclude> 6s584hn1gpcw2910ozfqzvwyiqvynn2 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/153 104 63423 229350 159045 2026-04-17T11:51:17Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229350 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|१२५ }} {{rule}}</noinclude>रांत नेले. तेथे मोठा समारंभ करून करमणुकीचे अनेक प्रकार चालू केले होते. त्यांत कित्येक सुंदर रमणी नाचत होत्या; व कित्येक गात होत्या. दुधाने कांठोकांठ भरलेला एक पेला राजाने शुकाच्या हाती देऊन, त्यास समारंभाच्या जागेत सात फेऱ्या करावयास सांगितले. त्याप्रमाणे शुकानें सात फेऱ्या केल्या; परंतु पेल्यांतील दुधाचा एक थेंबहि जमिनीवर पडला नाही. रतीला लाजविणाऱ्या त्या चारुगात्रींच्या दर्शनाने शुकाची वृत्ति यत्किंचिहि चळली नाही. शुक राजापाशी आला तेव्हां राजा त्याला ह्मणाला, “शुकमुने, तुझ्या वडिलांनी जे तुला सांगितले आहे तेंच पुन्हां बोलून दाखविण्यापलीकडे मला काही सांगावयाचे राहिले नाही. तूं पूर्णच आहेस. तूं सत्यरूप आहेस. तर आतां आपल्या पित्याकडे परत जा."<br> {{gap}}अशा रीतीने ज्याने अहंकार समूळ नष्ट केला असेल, आणि ज्याची देहबुद्धि नाश पावली असेल त्याजवर जगांतील कोणतीहि वस्तु सत्ता चालवू शकत नाही. स्वतःच्या इंद्रियांचा जो धनी झाला त्याला गुलाम करावयास या विश्वांत कोण समर्थ आहे? असा मनुष्य जगांतील अत्यंत पापमय अशा जागेत राहिला तरी तो पुण्यवानच राहणार.<br> {{gap}}जगाबद्दल आपणांस सामान्यतः दोन प्रकारची मतें ऐकू येतात. निराशावादी लोक ह्मणतात की, 'जग अत्यंत दुष्ट आहे, पापाने भरले आहे, आणि तें कधीहि सुधारावयाचें नाही.' दुसरे कित्येक आशावादी असतात, ते ह्मणतात, 'अहाहा! हे जग किती सुंदर वस्तूंनी भरलें आहे! याची भव्यता आणि सौंदर्य पाहून मन आनंदांत गर्क होतें!' ज्यांना स्वतःच्या वृत्तींवर ताबा चालवितां येत नाही, त्यांना हे जग असेंच दुःखमय भासणार; अथवा फार झालें तर, कांहीं थोडें सुखमय आणि बाकी बरेंच दुःखमय असे भासणार. आपण आपल्या वृत्तींचे धनी झालों ह्मणजे जगाचे हे एकेरी स्वरूप नष्ट होऊन जग आहे तसेच उत्तम आहे असे आपणांस दिसूं लागेल. वरवर दिसणाऱ्या सुखाच्या अथवा दुःखाच्या तरंगांनी त्याची एकतानता भंग पावत नाहीं, अगर त्याच्या शांतीस बाध येत नाही, असा आपणांस प्रत्यय येईल. असा प्रत्यय आला ह्मणजे त्यांतील घडणाऱ्या गोष्टींचे आपणांस सुख अथवा दुःखहि वाटणार नाही. हे जग ह्मणजे प्रत्यक्ष नरकवासच आहे असें ह्मणणारा मनुष्य इंद्रियांचा धनी झाला तर तो सुद्धा हे जग ह्मणजे प्रत्यक्ष स्वर्गभूमि आहे असें ह्मणूं लागेल. कर्मयोगाचा मनःपूर्वक अभ्यास करून प्रथम<noinclude></noinclude> resls8gwr6ab9mr26folvti8l4tyq2r पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/154 104 63424 229351 159046 2026-04-17T11:54:00Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229351 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१२६ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>सांगितलेली स्थिति प्राप्त करून घेण्याची आपली इच्छा असली तर तसे करण्यास आपण ताबडतोब आरंभ केला पाहिजे. आरंभ करण्यास कांहीं विशिष्ट परिस्थितीची अपेक्षा नाही. कोणत्याहि स्थितीत तुझी आरंभ केला आणि निश्चयाने चालला तर तुह्मांस अलिप्ततेची स्थिति प्राप्त होईलच होईल; आणि पूर्ण अलिप्तता प्राप्त होऊन तुमचा अहंकार निखालस मावळला ह्मणजे जें जग आज तुह्मांस पापमय दिसत आहे तेंच जग केवळ स्वर्ग आहे, आणि त्यांत पापाचा अंशहि नाही असें तुह्मी ह्मणाल. तेथे वाहणारा वायूहि शीतळ आणि पुण्यकारक आहे असें तुह्मांस वाढू लागेल. कर्मयोगाचें हेच ध्येय- हेंच साध्य- आहे आणि चालू जीविताची हीच पूर्णावस्था आहे.<br> {{gap}}प्राचीन आर्यतत्वज्ञांनी अनेक प्रकारचे योग सांगितले आहेत; तथापि प्रकार भिन्न असले तरी सर्वांचे साध्य एकच आहे. मनुष्यमात्रास पूर्णत्वास नेणे हे सर्व योगांचे ध्येय आहे. आपणांस या मार्गापैकी कोणता पसंत असेल त्या मार्गाने निश्चयाने आणि अट्टाहासाने आपण गेले पाहिजे. कोणत्याहि योगाचे रहस्य झाले तरी ते नुसते समजण्यांत तात्पर्य नाही. 'हे मला समजले ' असें नुसतें तोंडाने ह्मणून तुह्मांस कांही खरी प्राप्ति व्हावयाची नाही. तुह्मांस उच्चतम स्थिति प्राप्त करून घेणे असेल तर तुह्मीं समजून उमजले पाहिजे. उमजून त्याचा अभ्यास दृढ निश्चयाने आणि अट्टाहासाने केला पाहिजे. श्रवण, मनन आणि अभ्यास या तीन पायऱ्यांचा आश्रय करून तुह्मीं कोणताहि मार्ग निश्चयाने आक्रमिला पाहिजे. कोणताहि योग झाला तरी त्याच्या सिद्धीकरितां निश्चय आणि अभ्यास ही सतत पाहिजेत. तत्वांचें प्रथम श्रवण करून नंतर त्यांचे सदैव चिंतन केले पाहिजे. प्रथम प्रथम काही प्रमेये फार अवघडशी वाटली तरी सतत श्रवण, मनन आणि निदिध्यास या त्रयीच्या साहाय्याने ता आपोआप समजं लागतील. एकाच वेळी सर्व प्रमेयें आपणांस समजतील अस नाही. वस्तुतः तुह्मीच सर्वज्ञ आहां, यामुळे कोणीहि कोणास काही नवे शिकवू शकत नाही. या गोष्टी ज्याच्या त्यानेच शिकावयाच्या आहेत. फार झाल तर बाह्य जगाकडून कांही सूचना तुह्मांस मिळतील. त्यामुळे तुमच्या अंतरात्म्यात जागृति येऊन तो अज्ञानाचा पडदा टाकन देण्याचा प्रयत्न करितो. अशी वस्तुस्थिति असल्यामुळे बुद्धि सदैव जागृत ठेवन बाह्येंद्रियद्वारा येणाऱ्या सर्व सूचनांचा योग्य उपयोग करणे हे आपले कर्तव्य आपणच केले पाहिजे. ज्ञान ही बाहेरून येणारी वस्तु नसून अनुभवाने ती आपल्याच ठिकाणी पहावयाची<noinclude></noinclude> njxzccfyjwuba1hwlqhuzjdod29l9xz पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/155 104 63425 229352 159047 2026-04-17T11:57:09Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229352 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|१२७ }} {{rule}}</noinclude>आहे. हा अनुभव वाढत गेला ह्मणजे आपल्यांतील इच्छाशक्ति जागृत होऊं लागते. प्रथम ज्ञानाची इच्छा उद्भवते. इच्छा पक्की बळावली ह्मणजे तोच ध्यास लागून तीच इच्छा अधिक बलवत्तर होते. तिला संपूर्ण बळ प्राप्त झाल्यावर ती तुमच्या रोमरोमांतून खेळू लागते व शेवटी 'मी' आणि 'माझें' हे भान संपूर्ण नाहींसें होतें. अहंकाराचा यत्किचित् अंशहि उरत नाही, व अशा रीतीने तुह्मी पूर्णत्व पावतां. पूर्णत्व पावणे हे कोणत्याहि विशिष्ट मतावर अवलंबून नाही; अथवा विशिष्ट धर्मावर अगर पंथावरहि अवलंबून नाही. कोणी आपणास यहुदी ह्मणवो, ख्रिस्ती ह्मणवो अथवा आणखी काही ह्मणवो. पूर्णत्वाचा त्याशी कांही संबंध नाही. तुह्मीं अहंकाराचा त्याग केला आहे की नाही, हा काय तो महत्वाचा प्रश्न आहे. जर तुमचा अहंकार गेला असेल तर कोणत्याहि धर्मपुस्तकाची एखादी ओळहि न वाचतां अथवा एखाद्या देवळांत पाऊलहि न ठेवतां बसल्या जागीच मुक्ति तुह्मांस माळ घालील. प्रत्येक योगाने मार्ग जरी निरनिराळे सांगितले असले तरी एका योगाच्या अभ्यासांत दुसऱ्या एखाद्या मार्गाची मदत घ्यावी लागतेच असे नाही. कारण, प्रत्येक योग मनुष्याला पूर्णत्वाचा मार्ग दाखविण्यासाठीच निर्माण झाला आहे. कर्मयोग, ज्ञानयोग अगर भक्तियोग यांपैकी कोणत्याहि एका मार्गाने मोक्ष निश्चित मिळेल. अमक्या एका विशिष्ट मार्गानेच मोक्ष मिळेल असें ह्मणणारे मूर्ख होत. ''''सांख्य योगौ पृथग्बालाः प्रवदंति न पंडिताः।'''' ह्मणजे ज्ञानमार्ग व कर्ममार्ग हे भिन्न आहेत असें मूर्ख ह्मणतात; पंडित तसें ह्मणत नाहीत, असा भगवान् श्रीकृष्णांचा अभिप्राय आहे. जरी हे भिन्न दिसले तरी त्यांचे अंतिम पर्यवसान एकच आहे ही गोष्ट पडितांस ठाऊक असते.<br> {{rule|5em}}<br> {{center|प्रकरण ७ वें.}} {{center|'''मुक्ति.'''}} {{gap}}आपलें सांप्रतचें जीवित ज्याचे कार्य आहे त्यापूर्वकर्मासहि आध्यात्मिक भाषेत कर्म असें ह्मणतात हे पूर्वी सांगितलेच आहे. ज्याचा सांप्रतच्या जीवितावर काही परिणाम झाला आहे, अशा प्रत्येक कृत्यास व विचारास कर्म अस नांव दिले आहे. ज्याप्रमाणे कारण आणि त्याचे कार्य ही अनादिसिद्ध नियमांनी बांधिलेली आहेत त्याचप्रमाणे कर्म आणि फल हीसुद्धा त्याच नियमांनी<noinclude></noinclude> f3g9bqel22xhgj1fjcmnxwqkbe274dt पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/156 104 63426 229353 159048 2026-04-17T11:57:51Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229353 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१२८ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>बद्ध आहेत. ज्याप्रमाणे कारण उत्पन्न झाले की त्याचे कार्य घडलेच पाहिजे, तें टाळणे जसें सर्वथा अशक्यच आहे, त्याचप्रमाणे कर्म झाले की त्याचे फल येणारच; ते टाळणे अशक्य आहे. हा नियम साऱ्या विश्वरचनेच्या मुळाशी आहे असे आमच्या तत्ववेत्त्यांचे ह्मणणे आहे. या सिद्धांताप्रमाणे चालू कर्माचें स्वरूप दोन प्रकारचे आहे असे सिद्ध होते. चालू जीवनक्रमांत पाहणे, विचार करणे आणि कर्म करणे इत्यादि ज्या ज्या क्रिया आपण करतो त्या सर्व पूर्वकर्मानुरूप घडत असतात हे एक स्वरूप. चालू जीवनक्रमाचे दुसरें स्वरूप असें आहे, की त्यांत ज्या ज्या क्रिया आपण करतो त्या सर्व कारणरूप होऊन पुढील जन्मींच्या कार्याची ह्मणजे जीवनक्रमाची तयारी करीत असतात. आतां येथे नियम या शब्दाचा अर्थ काय, याचा विचार केला पाहिजे. कोणतीहि गोष्ट पुन्हा पुन्हा घडून येणे हे ज्या प्रवृत्तीमुळे होते त्या प्रवृत्तीस नियम असें ह्मणतात. आपण प्रथम कांहीं कार्य घडलेले पाहतों आणि नंतर त्याचे पाठोपाठ दुसरें कार्य घडतें हेंहि आपण पाहतो. त्यावेळी तशाच प्रकारची कार्यपरंपरा पुन्हां पुन्हां घडत राहील असें आपल्या मनांत साहजिक येतें. हिंदुतत्वज्ञांपैकी ज्यांना नैय्यायिक असें ह्मणतात त्यांनी या नियमास व्याप्ति असें नांव दिले आहे. अमुक एक गोष्ट घडली झणजे त्या कारणापासून दुसरी अमुक एक कार्यरूप गोष्ट घडणारच, असे जे आपल्या मनांत येते त्याचे कारण पूर्वीचा अनुभव आहे असें नैय्यायिकांचे मत आहे. कांहीं कार्यपरंपरा पूर्वी आपण पाहिलेली असते, व ती जशीच्या तशीच आपल्या मनांत बीजरूपाने ग्रथित झालेली असते; आणि पुन्हां जेव्हां आपण काही कार्य घडलेले पाहतो त्यावेळी त्या कार्याशी सदृश अशा पूर्वानुभवाशीं तें कार्य आपण तत्क्षणींच मनांत ताडून पाहतो. अशा वेळी जो विचार अथवा शास्त्रीय भाषेत बोलावयाचे म्हटले तर जो तरंग आपल्या चित्तांत उद्भत होतो तो आपल्या इतर मित्रांसहि जागे करितो व अशा रीतीने ती पूर्वीची सर्व कार्यपरंपरा पुनः जशीच्या तशीच आपल्या चित्तांत जागत होते, आणि त्या कार्यपरंपरेशी सांप्रतचे कार्य ताडून पाहून त्यावरून आतां या कार्यापुढे दुसरे अमुक काय घडणार असे आपल्या मनांत येते. याच पूर्वानुभवास आपण नियम ह्मणतों, असें नैय्यायिकांचे मत आहे. ही जी कार्यपरंपरा आपल्या चित्तास व्यापून राहिलेली असते, तिच्याच एका विशिष्ट स्वरूपास आपण कारण असें ह्मणतो. याच व्यापून राहण्याच्या स्थितीस संस्कृत भाषेत व्याप्ति असें नांव आहे. पूर्वी अमुक प्रकारे<noinclude></noinclude> 302fz0votu6ptnncj21oqx1gn63vmrp पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/२७ 104 110165 229337 229336 2026-04-17T06:55:05Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229337 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( १९ )}}</noinclude>{{gap}}तिला पहातांच, 'गुरु माऊली, गुरु माऊली' असें म्हणून राजानें तिच्या पायांवर लोळण घेतली. चुडालेला मनांत आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या.<br>{{gap}}कुंभकानें चेहरा उतरल्यासारखा करून म्हटलें:– "अहारे देवा, आतां काय करूं?" असें म्हणून त्यानें जमिनीवर गडबडा लोळण्यास सुरवात केली. मध्येंच कपाळही बडवून घेण्यास कमी केलें नाहीं.<br>{{gap}}राजा घाबरून म्हणाला:-'महाराज काय झाले?'<br>{{gap}}"काय सांगू कपाळ माझें? राजा, लाज वाटते. पोटांत पीळ पडतो कीं रे! बाबा, मी आतां सभेहून परत येतांना वाटेंत मला दुर्वास ऋषी भेटले. त्यांनी, "कुंभका, कुंभका येरे" असें म्हटलें. मला दुर्दैवानें काय पहा बुद्धि सुचली! मी म्हटलें "कांहो, अगदी बाईलवेड्या नवऱ्यासारखेच हाका मारतां!" मी इतकें म्हणतांच तो कोपी ब्राह्मण संतापून म्हणाला 'मला बाईलवेडा म्हणतोस काय? ठीक आहे तर यापुढें तूं बाईलच होशील!'<br>{{gap}}'राजा' मग माझे डोळे उघडले. मी त्यांचे पाय धरले. अश्रूनें त्यांना न्हाऊं घातलें. क्षमा मागितली. तेव्हां कोठें त्यांनी "बरें तर, नुसता रात्रीचाच तूं बायको होशील." असा उश्शाप दिला. राजा, मला दुसरें कांहीं नाहीं वाटत, पण तुझा वियोग तर मला एक क्षणभरही रेटत नाहीं. आणि मी स्त्री झाल्यावर आपणाला एकाच अंथरुणावर कसें निजतां येईल? हायरे देवा! हे काय केलेंस!'<br>{{gap}}"महाराज, स्त्री आणि पुरुष यांत काय आहे? हे कल्पनेचे खेळ आहेत. अहो गुरुराज, आपणचना माझा सर्व संशय रसातळाला नेलात? मग आपणाला हे आजच काय झालें? छे छे! हें नुसतें भ्रमाचें पांघरूण आहे. स्वामींना हे कधींच बाधक होत नाहीं. माझी परीक्षा पाहण्यासाठी तर हे स्वामींनी चालविलें नाहींना! आत्मानंदांत सचैल स्नान केल्या-<noinclude></noinclude> sbkcqyuquirwzc3w06v4o3b3c0mj12o पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/२८ 104 110166 229338 2026-04-17T07:01:11Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229338 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ ( २० ) वर हा भ्रम कसा उरेल? अहाहा! सर्वाठायीं सर्वभूत आत्माराम आहे. आनंद आहे. ब्रह्म आहे! महाराज हैं संशयाचें पटल काढून टाका."<br>{{gap}}"अरेरे! पहा-पहारे माझ्या जिवलगा राजा, हे पहा! अरे या जटा गेल्या! हं! ती पहा तेथें वेणी झाली! ओहो हें काय, दाढीमिशा जाऊन तेथें नथ- आणि हेंरे कानांत काय! अरे या बुगड्या बाळ्या! झालें सूर्य मावळला. माझें शरीर स्त्रीचें बनत चाललें!"<br>{{gap}}कुंभकाची रंभा अप्सरांनाही लाजविणारी मदनिका बनली. तिनें आपल्या स्त्रीजातीचा नैसर्गिक लीलांना आरंभ केला. चट्कन् आपल्या त्या मूल्यवान् वस्त्राचा पदर सांवरीत तिनें खाली मान घातली. परंतु राजाच्या चित्तवृत्तींत कांहीं बदल होतो की काय, हे ती चोरून पहात होती.<br>{{gap}}अंशा रीतीने रात्रीं मदनिका बनून राजाचें मन चळतें कीं काय, हें तिनें पाहिलें; परंतु आत्मस्वरूपी लीन झालेला राजा किचिंन्मात्रही चळला नाहीं. तेव्हां कसाच्या मात्रेचे आणखी चार वळसे चढवून परीक्षा पाहण्यासाठींच की काय, एके दिवशीं कुंभक ह्मणाला राजा, काय सांगूरे माझें दुर्दैव? बाबारे, प्रारब्ध पहा कसें खेळवितें तें! राजा, मी रात्रीं तरुण मदनिका बनल्यावर जें दुःख अनुभवितों तें तुला काय सांगूं? राजा, माझें हें वय तारुण्यानें मुसमुसलेलें, छे, रे बाबा, मला हा तोंड बांधून बुक्यांचा मार सोसवत नाहीं. राजा काय करूं? मी इतके दिवस अत्यंत कष्ट सोसले. पण आतां मला लग्नच केलें पाहिजे. त्यावांचून गत्यंतर नाहीं."<br>{{gap}}"स्वामींची मर्जी. पण मला हें खरें वाटत नाहीं. महाराज, माझें अज्ञान लयाला नेणारे आपण, हें काय बोलतां? तथापि गुरुमाउलीनें जें मनांत येईल तें करावें. देव, मनुष्य यांपैकीं पाहिजे त्या पुरुषास पसंत करून महाराजांनी लग्न करावें. मात्र दिवसभर मजपाशीं रहावें. नाहींतर त्यांना रात्रीं तेथेंच घेऊन यावें. दोघांची सेवा या दासाकडून घडेल."{{nop}}<noinclude></noinclude> rbxsbso4n1h1ny0vn477ires6p0wurw 229339 229338 2026-04-17T07:02:12Z कल्पनाशक्ती 3813 229339 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( २० )}}</noinclude>वर हा भ्रम कसा उरेल? अहाहा! सर्वाठायीं सर्वभूत आत्माराम आहे. आनंद आहे. ब्रह्म आहे! महाराज हैं संशयाचें पटल काढून टाका."<br>{{gap}}"अरेरे! पहा-पहारे माझ्या जिवलगा राजा, हे पहा! अरे या जटा गेल्या! हं! ती पहा तेथें वेणी झाली! ओहो हें काय, दाढीमिशा जाऊन तेथें नथ- आणि हेंरे कानांत काय! अरे या बुगड्या बाळ्या! झालें सूर्य मावळला. माझें शरीर स्त्रीचें बनत चाललें!"<br>{{gap}}कुंभकाची रंभा अप्सरांनाही लाजविणारी मदनिका बनली. तिनें आपल्या स्त्रीजातीचा नैसर्गिक लीलांना आरंभ केला. चट्कन् आपल्या त्या मूल्यवान् वस्त्राचा पदर सांवरीत तिनें खाली मान घातली. परंतु राजाच्या चित्तवृत्तींत कांहीं बदल होतो की काय, हे ती चोरून पहात होती.<br>{{gap}}अंशा रीतीने रात्रीं मदनिका बनून राजाचें मन चळतें कीं काय, हें तिनें पाहिलें; परंतु आत्मस्वरूपी लीन झालेला राजा किचिंन्मात्रही चळला नाहीं. तेव्हां कसाच्या मात्रेचे आणखी चार वळसे चढवून परीक्षा पाहण्यासाठींच की काय, एके दिवशीं कुंभक ह्मणाला राजा, काय सांगूरे माझें दुर्दैव? बाबारे, प्रारब्ध पहा कसें खेळवितें तें! राजा, मी रात्रीं तरुण मदनिका बनल्यावर जें दुःख अनुभवितों तें तुला काय सांगूं? राजा, माझें हें वय तारुण्यानें मुसमुसलेलें, छे, रे बाबा, मला हा तोंड बांधून बुक्यांचा मार सोसवत नाहीं. राजा काय करूं? मी इतके दिवस अत्यंत कष्ट सोसले. पण आतां मला लग्नच केलें पाहिजे. त्यावांचून गत्यंतर नाहीं."<br>{{gap}}"स्वामींची मर्जी. पण मला हें खरें वाटत नाहीं. महाराज, माझें अज्ञान लयाला नेणारे आपण, हें काय बोलतां? तथापि गुरुमाउलीनें जें मनांत येईल तें करावें. देव, मनुष्य यांपैकीं पाहिजे त्या पुरुषास पसंत करून महाराजांनी लग्न करावें. मात्र दिवसभर मजपाशीं रहावें. नाहींतर त्यांना रात्रीं तेथेंच घेऊन यावें. दोघांची सेवा या दासाकडून घडेल."{{nop}}<noinclude></noinclude> gyas47g0zqy4vzpamohqqfuiys1h1kp पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/२९ 104 110167 229340 2026-04-17T07:07:13Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229340 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ ( २१ ) {{gap}}"राजा, हें कायरे सांगतोस? पहा बरें, मी लग्न केलें कीं परतंत्रता आली ना? खेरीज तुझा वियोग तर मला क्षणभरही सोसवत नाहीं. तर माझा विचार तुझ्याशीच लग्न करण्याचा आहे आणि.........<br>{{gap}}"नका. नका. महाराज, नकाच असें बोलू. गुरुमाउली मी तुमचें पाडस ना? माझी ही आळ पुरवाच. माते, या लेकराला अशा रीतीचें कठिण फर्मान नकोच सोडूं. अरेरे! हें मी काय ऐकतों! छे! असली पातकी आज्ञा माझे गुरुराज मला नाहींच करणार."<br>{{gap}}यावर कुंभक ह्मणाला:- "राजा हा प्रारब्धाचा घाला आहे. हा विधि हरिहरांनाही चुकला नाहीं, तर तो मला चुकेल? 'राजा तूं पुन्हां भुललास का? अरे, स्त्री काय, पुरुष काय, सर्वच भ्रम! बाबारे ज्ञान झाल्यावर जसे हर्षशोकादि विकार नाहींत, त्याप्रमाणे आलेला भोग मुकाट्यानें भोगलाच पाहिजे. बाबारे, एकाच स्त्रीला, बाप माझी मुलगी ह्मणतो, पुत्र माझी आई म्हणून हांक मारतो, पति पहावा तर ही माझी प्रिय पत्नी असें ह्मणतो, भाऊ ताई म्हणून म्हणतो, दीर वहिनी म्हणून संबोधितो. असा "प्रत्येकाचा भाव जरी वेगळा तरी स्त्री एकच ना? तद्वत् गुरु काय, शिष्य काय, सर्व एकरूपच. एकाच परमेश्वरी अंशाचे दोन भाग आहेत. स्त्री आणि पुरुष हे मनाचे भेद आहेत. हें जर तुला पटलें म्हणतोस तर माझ्या आज्ञेला तूं मान कां देत नाहींस?"<br>{{gap}}राजा हतबुद्ध होऊन स्तब्धच राहिला. क्षणभर भानरहित झाला. थोड्या वेळानें भानावर येऊन म्हणाला:-<br>{{gap}}"महाराज, मला विषयाची काडीएवढी सुद्धा गोडी नाहीं; परंतु मी गुर्वाज्ञा मोडावयाला कसा तयार होऊं?"<br>{{gap}}नंतर कांहीं दिवसांनीं कुंभकानें एका सुमुहूर्तावर राजाशीं लग्न लाविलें. परंतु राजाची वृत्ति बिलकुल चळेना. चुडालेनें नानाप्रकारच्या प्रणयचेष्टा कराव्या नानाविलास दाखवावे; राजाशीं जबरीनें विलास केले. राजाच्या मनांत गुरुबुद्धी वांचून दुसरा भावच उत्पन्न झाला नाहीं. कुंभकाच्या<noinclude></noinclude> awm1sr8mt8i15derpxdqbc72qt5brz0 229341 229340 2026-04-17T07:07:41Z कल्पनाशक्ती 3813 229341 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( २१ )}}</noinclude>{{gap}}"राजा, हें कायरे सांगतोस? पहा बरें, मी लग्न केलें कीं परतंत्रता आली ना? खेरीज तुझा वियोग तर मला क्षणभरही सोसवत नाहीं. तर माझा विचार तुझ्याशीच लग्न करण्याचा आहे आणि.........<br>{{gap}}"नका. नका. महाराज, नकाच असें बोलू. गुरुमाउली मी तुमचें पाडस ना? माझी ही आळ पुरवाच. माते, या लेकराला अशा रीतीचें कठिण फर्मान नकोच सोडूं. अरेरे! हें मी काय ऐकतों! छे! असली पातकी आज्ञा माझे गुरुराज मला नाहींच करणार."<br>{{gap}}यावर कुंभक ह्मणाला:- "राजा हा प्रारब्धाचा घाला आहे. हा विधि हरिहरांनाही चुकला नाहीं, तर तो मला चुकेल? 'राजा तूं पुन्हां भुललास का? अरे, स्त्री काय, पुरुष काय, सर्वच भ्रम! बाबारे ज्ञान झाल्यावर जसे हर्षशोकादि विकार नाहींत, त्याप्रमाणे आलेला भोग मुकाट्यानें भोगलाच पाहिजे. बाबारे, एकाच स्त्रीला, बाप माझी मुलगी ह्मणतो, पुत्र माझी आई म्हणून हांक मारतो, पति पहावा तर ही माझी प्रिय पत्नी असें ह्मणतो, भाऊ ताई म्हणून म्हणतो, दीर वहिनी म्हणून संबोधितो. असा "प्रत्येकाचा भाव जरी वेगळा तरी स्त्री एकच ना? तद्वत् गुरु काय, शिष्य काय, सर्व एकरूपच. एकाच परमेश्वरी अंशाचे दोन भाग आहेत. स्त्री आणि पुरुष हे मनाचे भेद आहेत. हें जर तुला पटलें म्हणतोस तर माझ्या आज्ञेला तूं मान कां देत नाहींस?"<br>{{gap}}राजा हतबुद्ध होऊन स्तब्धच राहिला. क्षणभर भानरहित झाला. थोड्या वेळानें भानावर येऊन म्हणाला:-<br>{{gap}}"महाराज, मला विषयाची काडीएवढी सुद्धा गोडी नाहीं; परंतु मी गुर्वाज्ञा मोडावयाला कसा तयार होऊं?"<br>{{gap}}नंतर कांहीं दिवसांनीं कुंभकानें एका सुमुहूर्तावर राजाशीं लग्न लाविलें. परंतु राजाची वृत्ति बिलकुल चळेना. चुडालेनें नानाप्रकारच्या प्रणयचेष्टा कराव्या नानाविलास दाखवावे; राजाशीं जबरीनें विलास केले. राजाच्या मनांत गुरुबुद्धी वांचून दुसरा भावच उत्पन्न झाला नाहीं. कुंभकाच्या<noinclude></noinclude> gts9lnin0sv39rxtsxh4drgnue95tl5 पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/३० 104 110168 229342 2026-04-17T07:12:13Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229342 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( २२ )}}</noinclude>बोधानें पूर्ण समाधानी बनलेला राजा तिळमात्रही चळला नाहीं. ज्या ठिकाणी आपलेपणा राहिला नाहीं, त्याठिकाणीं इतरांची काय कथा? अखेर अगदी शेवटचा उपाय कुंभकरूपी चुडालेनें योजिला. तिनें ठरविलें कीं, आतां आपण याच्या देखत परपुरुषाशीं रत होऊं.<br>{{gap}}दुसऱ्या दिवशीं कुंभक व राजा असे दोघेजण स्नानसंध्यादिक कर्मे करावयास नदीवर गेले. कुंभकानें आपलें कर्म झटकन आटोपून आपण पुढें निघाला. नंतर त्यानें स्वतः मदनिका बनून, दुसरा एक पुरुष निर्माण करून, राजा येण्याच्या वाटेवर, सहज दिसेल अशा झाडीत त्या पुरुषाबरोबर विलास चालविले. राजा परत येतांना सहजी त्याची नजर तिकडे गेली. परंतु- अहाहा! आपल्या हातून हें काय घडलें! गुरुरायांना यामुळे संकोच तर वाटणार नाहीं ना? असें त्याला वाटून तसें बोलून तो पुढे गुंफेत निघून गेला. त्याच्या मनांत गुरुव्यतिरिक्त दुसरा भावच नसल्यामुळे त्याला काय वाटणार? नंतर मदनिका गडबडीनें येऊन राजापुढे हात जोडून उभी राहिली.<br>{{gap}}तिला पहातांच राजा ह्मणाला "स्वामिन्, आपण लौकर का आला? महाराज, माझी सहज तिकडे नजर गेली. परंतु माते, लेंकराची मातेला लाज ती कसली? महाराज, मी आपलें पाडस ना? माझ्या पाहण्यानें स्वामींना संकोच वाटला नाहीं ना? अरेरे हे काय झालें? माझी ही गुरुसेवा न होतां गुरूला ताप मात्र झाला! मी खरोखरीच करंटा!"<br>{{gap}}परंतु नाटकी मदनिकेने हुंदके देण्यास आरंभ केला. व हात जोडून राजाला म्हणाली. माझ्या नाथा 'मी आपली अग्नी ब्राह्मण साक्ष कल्पून लावलेल्या लग्नाची दासी आहे. महाराज ओढाळ गुरूं, त्याला हिरवें रान दिसतांच तिकडे धांव घेतेंच. मी तसाच अपराध केला आहे. महाराज आपणांला काय सांगावयाला पाहिजे? राजनीति आपण जाणतच आहां. तेव्हां योग्य न्यायानें मला जो योग्य तो दंड करा. पुन्हां माझ्याकडून असलें कृत्य होणार नाहीं. हा देह मी आपणाला अर्पण केला<noinclude></noinclude> c6k2ofgidtfd3u72zs6mrsp74x577o9 पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/३१ 104 110169 229343 2026-04-17T07:18:10Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229343 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ ( २३ ) असून आज मी घोर अपराध केला. महाराज, एकवेळ क्षमा करा. मी पुन्हां असें नाहीं हो कधीं करणार!"<br>{{gap}}मदनिकेचें भाषण ऐकून राजानें कानांत बोटेंच घातलीं.<br>{{gap}}"हाय! हाय! मी काय ऐकतों! गुरुमहाराज, नकोच हे पातक मला. महाराज, मी आपणाकडे गुरुमूर्तीशिवाय दुसऱ्या भावनेनें कधींच पाहिलें नाहीं. नको, ही गुरुनिंदा मी कशी ऐकूं? महाराज, आपल्या कृपेने मला स्त्री पुरुष, द्वैताद्वैत, वगैरे कांहीं उरलें नाहीं. महाराज, आपण ही माझी परीक्षा पहात असाल! असेना! परंतु ज्या माझ्या गुरुमाऊलीला मुंगीचेही अंतरंग समजतें, त्या माउलीला माझें अंतरंग समजणार नाहीं? समजेलच. महाराज, या डोळ्यांनीं 'गुरु' या भावनेंवांचून पाहिलें असेल तर याच्या खांचा होवोत. गुरुनामाशिवाय जर या जिन्हेंनें इतर शब्द उच्चारले असतील तर ही मांझी जिव्हा झडून जावो! अरेरे! हे मन जर गुरुचिंतनावांचून एक क्षणभर रिकामें असेल तर माझ्यावर गुरुहत्येच्या पातकाचे डोंगर कोसळून पडोत!"<br>{{gap}}झालें. भट्टीत घातलेलं सोनें बावन्न कशी उतरलें. गुरुमाउली शिष्याप्रमाणे गहिंवरली तिला मनांत राजा बद्दल धन्यता वाटली.<br>{{gap}}'छे! याचा आतां कोठपर्यंत अंत पहावयाचा! झाला- कसाला लावण्याचा कडेलोट झाला." असें मनांत म्हणून, मदनिकेच्या ठिकाणीं चुडाला दिसूं लागली! राजा आश्चर्यचकित झाला.<br>{{gap}}"अरे! मी जागा आहे का? किंवा हे स्वप्न तर नाहीं ना! ही कोण? चुडाला! माझी पत्नी चुडाला!! छे- पण ती इतक्या लांब काट्याकुट्यांतून, उन्हातान्हांतून येथें कशी येईल? अरे पण नाहीं ह्मणावें तर ती पहा चुडाला- हो- तीच! पहा-पहा कशी नेहमीप्रमाणे हंसत मुखाने पहात आहे. पण छे. हा भ्रमच असावा." असें ह्मणून राजाने आपले डोळे चोळले. हाताला चिमटा घेतला.<br>{{gap}}"हो पण कुंभक कोठें आहे? बरें ती मदनिका कोठें आहे? आलें<noinclude></noinclude> l4p3aqrhytvw4jg0w2t9w9qvmln79p6 229344 229343 2026-04-17T07:18:38Z कल्पनाशक्ती 3813 229344 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( २३ )}}</noinclude>असून आज मी घोर अपराध केला. महाराज, एकवेळ क्षमा करा. मी पुन्हां असें नाहीं हो कधीं करणार!"<br>{{gap}}मदनिकेचें भाषण ऐकून राजानें कानांत बोटेंच घातलीं.<br>{{gap}}"हाय! हाय! मी काय ऐकतों! गुरुमहाराज, नकोच हे पातक मला. महाराज, मी आपणाकडे गुरुमूर्तीशिवाय दुसऱ्या भावनेनें कधींच पाहिलें नाहीं. नको, ही गुरुनिंदा मी कशी ऐकूं? महाराज, आपल्या कृपेने मला स्त्री पुरुष, द्वैताद्वैत, वगैरे कांहीं उरलें नाहीं. महाराज, आपण ही माझी परीक्षा पहात असाल! असेना! परंतु ज्या माझ्या गुरुमाऊलीला मुंगीचेही अंतरंग समजतें, त्या माउलीला माझें अंतरंग समजणार नाहीं? समजेलच. महाराज, या डोळ्यांनीं 'गुरु' या भावनेंवांचून पाहिलें असेल तर याच्या खांचा होवोत. गुरुनामाशिवाय जर या जिन्हेंनें इतर शब्द उच्चारले असतील तर ही मांझी जिव्हा झडून जावो! अरेरे! हे मन जर गुरुचिंतनावांचून एक क्षणभर रिकामें असेल तर माझ्यावर गुरुहत्येच्या पातकाचे डोंगर कोसळून पडोत!"<br>{{gap}}झालें. भट्टीत घातलेलं सोनें बावन्न कशी उतरलें. गुरुमाउली शिष्याप्रमाणे गहिंवरली तिला मनांत राजा बद्दल धन्यता वाटली.<br>{{gap}}'छे! याचा आतां कोठपर्यंत अंत पहावयाचा! झाला- कसाला लावण्याचा कडेलोट झाला." असें मनांत म्हणून, मदनिकेच्या ठिकाणीं चुडाला दिसूं लागली! राजा आश्चर्यचकित झाला.<br>{{gap}}"अरे! मी जागा आहे का? किंवा हे स्वप्न तर नाहीं ना! ही कोण? चुडाला! माझी पत्नी चुडाला!! छे- पण ती इतक्या लांब काट्याकुट्यांतून, उन्हातान्हांतून येथें कशी येईल? अरे पण नाहीं ह्मणावें तर ती पहा चुडाला- हो- तीच! पहा-पहा कशी नेहमीप्रमाणे हंसत मुखाने पहात आहे. पण छे. हा भ्रमच असावा." असें ह्मणून राजाने आपले डोळे चोळले. हाताला चिमटा घेतला.<br>{{gap}}"हो पण कुंभक कोठें आहे? बरें ती मदनिका कोठें आहे? आलें<noinclude></noinclude> 8qcj3cs5hv0mwr4l181b070yrfby5sn