विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.46.0-wmf.24 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk पान:तीन तत्वज्ञानी.pdf/39 104 58183 229379 175258 2026-04-18T08:10:58Z सुबोध कुलकर्णी 1231 /* प्रमाणित */ 229379 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>{{right|'''साक्रेटिस.'''}} आम्ही तुमचे संगोपन व पालनकर्ते, तेव्हां यांत कृतघ्नपणाचा दोष येतो. व शेवटी तुमचा आमचा करार झालेला तेव्हां यांत करार मोडण्याचा दोष येतो. शिवाय, खटल्यास सुरुवात होण्यापूर्वी कायद्याप्रमाणेच तुम्हाला हा देश सोडून जाण्याची मुभा होती. त्या वेळी जे करणे तुमच्या हाती होते ते तुह्मी केले नाहीत व आमच्या निकालावर विसंबून राहिलां. तुम्हाला तुमचा निरपराधीपणा शाबीत करण्याचीहि पूर्ण मुभा होती. अशा सर्व गोष्टीची तुह्माला सलवत असताना तुमच्याकडून त्यांचा अवलंब झाला नाही व आतां तुमच्याविरुद्ध निकाल झाल्यावर तुम्ही देशांतर करण्याचे मनांत आणतां, याला काय ह्मणा ? समजा, तुझी दुसऱ्या देशांत पळून गेलांत तर तेथे तुम्हाला या पुढे सुख लागेल काय ? तुमच्याकडे लोकवांकड्या नजरेनेच पाहणार. तुम्ही कायद्यांना धाब्यावर बसविणारे, असेंच लोक समजणार. सुव्यवस्थित राज्य पद्धतीच्या देशांत तुमाला लोक राहूं देणार नाहींत. कारण, तुम्ही आपल्या वर्तनाने अशा व्यवस्थेविरुद्धच बंड केल्यासारखें होईल व या आपल्या पळपुट्या वर्तनाने तुम्ही तुमच्या प्रतिपक्षीयांच्या म्हणण्याचे समर्थनच कराल, थेसलीसारख्या अव्यवस्थित व बेबंदशाई देशांत कदाचित् तुम्हाला राहूं देतील; परंतु तेथे तुमी काय करणार ? सद्गुण, न्यायीपण', सुव्यवस्थितपणा व कायदापालन यांविषयीं तुह्मी तेथे बोलणार काय? परंतु या गोष्टींचा तेथे गंधहि नाही. शिवाय, तुमच्या ह्मणण्याला कोण मानील ? कारण, तुमच्या प्रत्यक्ष वर्तनाने तुह्मीं या गोष्टी जीवापेक्षां व सुखनिवासापेक्षा कमी महत्त्वाच्या आहेत असे दाखविले आहे. तेव्हा थेसलींत तुह्मांला सन्मान्य शिक्षक ह्मणून राहतांच येणार नाही तर लोकांचा दास व खुषमस्कऱ्या अशा तऱ्हेनेंच रहावे लागेल व अशा वागण्यांत जर तुम्हाला सुख वाटेल तर तुमच्या आजपर्यंतच्या सदगुणच्या गौरवाच्या गप्पा होत असें लोक समजणार नाहीत काय? तेव्हां साक्रेटीस आह्मी ह्मणतो त्याचा विचार करा. आही कायद्यांनीच तुमचे सर्वस्वीं संगोपन केले आहे. तरी मुलाबाळांचा विचार करूं नका, आपल्या जीवाचा विचार करूं नका, किंवा न्यायापलीकडे दुसऱ्या कोणत्याहि<noinclude>{{center|२९}}</noinclude> rz9mrvjd02p1eg479daxh92k9waqdjb पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/157 104 63427 229354 159049 2026-04-17T12:00:46Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229354 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|१२९}} {{rule}}</noinclude>काही कार्यपरंपरा घडून आली होती आणि आतांहि त्या परंपरेपैकी एक कार्य घडून आलेले पाहतांच बाकीची कार्येहि पूर्वीप्रमाणेच घडून येतील अशी जी अपेक्षा आपल्या चित्तांत उद्भूत होते, त्या अपेक्षेलाच आपण नियम अथवा कायदा असें नांव देतो. यावरून असे सिद्ध होते की, सृष्टींत अमुक एक नियम अगर कायदा असा कांहीं अस्तित्वात नाही. यासाठी पृथ्वीच्या मध्यबिंदूंत गुरुत्वाकर्षणाचे सामर्थ्य असणे हा कायदा आहे- नियम आहे- असें ह्मणणे चुकीचे आहे. किंबहुना सृष्टीतील अमुक एक वस्तु अमुक एका नियमाने बद्ध आहे, असें नाही; तर एका विशिष्ट रीतीनें- पद्धतीने- कांही वस्तुसंघात पाहण्याची आपणांस संवय लागली आहे, असे समजावें. अमुक एक कार्यपरंपरा एकाच विशिष्ट रीतीने घडते असा अनुभव आपणांस आला ह्मणजे आपण त्या रीतीस अथवा पद्धतीस नियम- कायदा- असें ह्मणतो. यावरून त्या कायद्याने अथवा नियमाने वस्तु बद्ध नसून त्या कायद्याची व्याप्ति आपल्या चित्तांतच असते असें सिद्ध होतें.
{{gap}}आतां यापुढे आपण जे काही नियम अगर कायदे विश्वव्यापी आहेत असें समजतो, त्याचा अर्थ काय हे पाहावयाचे आहे. यासाठी विश्व ह्मणजे काय, याचा अर्थ प्रथम निश्चित केला पाहिजे. देश-काल-निमित्त या रेषात्रयीने एकंदर अस्तित्वाचा जेवढा भाग अंकित केला जातो, त्याला आपण विश्व असें नांव देतो. एकंदर अस्तित्व अनंत आहे. त्यापैकी काही भाग देश-काल-निमित्त या उपाधीने बद्ध झाल्यासारखा दिसतो आणि त्यास आपण विश्व अशा संज्ञेनें ओळखतो. या उपाधिविरहित असें अनंत अस्तित्व त्यापलीकडे आहे. ज्यांना आपण नियम अथवा कायदे ह्मणतो, त्यांचे अस्तित्व वस्तूंत नसून आपल्या मनांतच असते, हे आपण नुकतेच सिद्ध केले आहे. तेव्हां विश्वव्यापी कायदे असें आपण ज्यांस ह्मणतो त्यांचेंहि अस्तित्व देश-काल-निमित्त या उपाधीने निगडित असलेल्या विश्वांतच असणे शक्य आहे. या उपाधीबाहेर असलेल्या अस्तित्वांत हे कायदे असणे शक्य नाही. विश्व असें ज्याला आपण ह्मणतों तें व्यष्टिरूप आहे. व्यष्टि ह्मणजे अनेकांपैकी एक. जसें गांव ही समष्टि आणि घर ही व्यष्टि. अरण्य ही समष्टि आणि झाड ही व्यष्टि. याचप्रकारें अनंत अस्तित्वापैकी जितका भाग कोणत्या तरी रीतीने आपल्या मनाच्या हद्दीत येतो, त्याला आपण विश्व असें ह्मणतों. ह्मणजे अनंत अस्तित्व समष्टिरूप असून विश्व हे व्यष्टिरूप आहे. आपल्याला जे जे दिसते, जें जें स्पर्शितां येते, जें जें ऐकू येते.<noinclude>
{{gap}}स्वा. वि.९</noinclude> ciek7qibouh27luuu204hh0itidpcqw 229355 229354 2026-04-17T12:01:19Z कल्पनाशक्ती 3813 229355 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|१२९}} {{rule}}</noinclude>काही कार्यपरंपरा घडून आली होती आणि आतांहि त्या परंपरेपैकी एक कार्य घडून आलेले पाहतांच बाकीची कार्येहि पूर्वीप्रमाणेच घडून येतील अशी जी अपेक्षा आपल्या चित्तांत उद्भूत होते, त्या अपेक्षेलाच आपण नियम अथवा कायदा असें नांव देतो. यावरून असे सिद्ध होते की, सृष्टींत अमुक एक नियम अगर कायदा असा कांहीं अस्तित्वात नाही. यासाठी पृथ्वीच्या मध्यबिंदूंत गुरुत्वाकर्षणाचे सामर्थ्य असणे हा कायदा आहे- नियम आहे- असें ह्मणणे चुकीचे आहे. किंबहुना सृष्टीतील अमुक एक वस्तु अमुक एका नियमाने बद्ध आहे, असें नाही; तर एका विशिष्ट रीतीनें- पद्धतीने- कांही वस्तुसंघात पाहण्याची आपणांस संवय लागली आहे, असे समजावें. अमुक एक कार्यपरंपरा एकाच विशिष्ट रीतीने घडते असा अनुभव आपणांस आला ह्मणजे आपण त्या रीतीस अथवा पद्धतीस नियम- कायदा- असें ह्मणतो. यावरून त्या कायद्याने अथवा नियमाने वस्तु बद्ध नसून त्या कायद्याची व्याप्ति आपल्या चित्तांतच असते असें सिद्ध होतें.
{{gap}}आतां यापुढे आपण जे काही नियम अगर कायदे विश्वव्यापी आहेत असें समजतो, त्याचा अर्थ काय हे पाहावयाचे आहे. यासाठी विश्व ह्मणजे काय, याचा अर्थ प्रथम निश्चित केला पाहिजे. देश-काल-निमित्त या रेषात्रयीने एकंदर अस्तित्वाचा जेवढा भाग अंकित केला जातो, त्याला आपण विश्व असें नांव देतो. एकंदर अस्तित्व अनंत आहे. त्यापैकी काही भाग देश-काल-निमित्त या उपाधीने बद्ध झाल्यासारखा दिसतो आणि त्यास आपण विश्व अशा संज्ञेनें ओळखतो. या उपाधिविरहित असें अनंत अस्तित्व त्यापलीकडे आहे. ज्यांना आपण नियम अथवा कायदे ह्मणतो, त्यांचे अस्तित्व वस्तूंत नसून आपल्या मनांतच असते, हे आपण नुकतेच सिद्ध केले आहे. तेव्हां विश्वव्यापी कायदे असें आपण ज्यांस ह्मणतो त्यांचेंहि अस्तित्व देश-काल-निमित्त या उपाधीने निगडित असलेल्या विश्वांतच असणे शक्य आहे. या उपाधीबाहेर असलेल्या अस्तित्वांत हे कायदे असणे शक्य नाही. विश्व असें ज्याला आपण ह्मणतों तें व्यष्टिरूप आहे. व्यष्टि ह्मणजे अनेकांपैकी एक. जसें गांव ही समष्टि आणि घर ही व्यष्टि. अरण्य ही समष्टि आणि झाड ही व्यष्टि. याचप्रकारें अनंत अस्तित्वापैकी जितका भाग कोणत्या तरी रीतीने आपल्या मनाच्या हद्दीत येतो, त्याला आपण विश्व असें ह्मणतों. ह्मणजे अनंत अस्तित्व समष्टिरूप असून विश्व हे व्यष्टिरूप आहे. आपल्याला जे जे दिसते, जें जें स्पर्शितां येते, जें जें ऐकू येते, जे जे<noinclude>
{{gap}}स्वा. वि.९</noinclude> mn6ssxgdxl8mykcy7c0b91xbymsb9s0 अनुक्रमणिका:आर्य-स्त्री-रत्ने.pdf 106 70411 229393 229300 2026-04-18T11:43:16Z कल्पनाशक्ती 3813 229393 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=आर्य-स्त्री-रत्ने |Language=mr |Volume= |Author=यशोदाबाई भट |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=यशोदाबाई भट |Address=मुंबई |Year=1917 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=X |Pages=<pagelist 3="प्रस्तावना" 5="माझे दोन शब्द" 7="अनुक्रमणिका" 8 ="अभिप्राय" 9="पतीला उद्धारणारी चुडाला" 35 ="पतीचें सत्व राखणारी चांगुणा"/> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} [[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]] 2fc4qqbgji2gccipmjn86xryn0f6m6g पान:मधुशाला.pdf/३ 104 107493 229366 221857 2026-04-17T15:02:40Z सुबोध कुलकर्णी 1231 /* प्रमाणित */ 229366 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude> : अनुवाद :
तारा भवाळकर

: प्रकाशक :
अनंत लक्ष्मण बल्लाळ
इंडिया बुक कंपनी
१२७५ सदाशिव पेठ
बाजीराव रस्ता
पुणे ४११०३०

© प्रा. तारा भवाळकर

: प्रथमावृत्ती :
१ जून १९७९

: मुखपृष्ठ :
अनंत सालकर

: मुद्रक :
सौ. कमल रामचंद्र घळसासी
संजीव मुद्रणालय
४६९ सदाशिव पेठ
पुणे ४११०३०

<noinclude></noinclude> a46ru0kl3arzpy2fuxtb1b0rp674gd1 पान:मधुशाला.pdf/४ 104 107494 229367 221859 2026-04-17T15:02:56Z सुबोध कुलकर्णी 1231 /* प्रमाणित */ 229367 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>
{{Css image crop |Image = मधुशाला.pdf |Page = 4 |bSize = 366 |cWidth = 188 |cHeight = 216 |oTop = 78 |oLeft = 87 |Location = center |Description = }}
{{center|'''श्री. बच्चन'''}}
{{gap}}हिन्दी काव्य-रसिकांचा सर्वांत प्रिय कवी आहे 'बच्चन!' आणि त्यांची 'मधुशाला' तर गेली तीस वर्षे लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान झालेली आहे. १९३५ मध्ये प्रथम प्रकाशित झाल्यापासून आजपर्यंत या संग्रहाच्या बावीस आवृत्ती निघाल्या असून सुमारे दोन लाख प्रती वाचकांपर्यंत पोहचल्या आहेत. महाकवी पंतजींच्याच शब्दात सांगायचे झाले तर 'मधुशाले'ची मादकता अक्षय आहे.
{{gap}}'मधुशाला' काव्यात मदिरा, पेला, मधुबाला आणि मधुशाला या चार प्रतीकांच्या माध्यमातून कवीने अनेकानेक क्रान्तिकारक, मर्मस्पर्शी प्रणयभाव आणि गूढभाव शब्दबद्ध केले आहेत.
{{gap}}'मधुशाला' काव्याची धुंदी आणि मादकता यांत हरवून जाण्यासाठी रसिकांना हे आग्रहाचे निमंत्रण आहे.{{nop}}<noinclude></noinclude> dxe14lh9scyxwwebi9op079tk0fd787 पान:मधुशाला.pdf/६ 104 107496 229368 221861 2026-04-17T15:04:38Z सुबोध कुलकर्णी 1231 /* प्रमाणित */ 229368 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>
{{center|{{x-larger|'''संबोधन'''}}}} '''प्रियतम,'''
{{gap}}त्या दिवशी उमर खैय्यामची भाव-पुष्पं माझ्या शब्दांच्या धाग्यात गुंफून मी तुझ्या चरणी वाहिली होती. ती पाहून तू प्रसन्न झालास. तुझ्या एका भक्तानं तुझ्या एका आज्ञेचं पालन केलं म्हणून तू प्रसन्न झालास खरा; पण माझ्या मनाचं मात्र समाधान झालं नव्हतं. परक्याची वस्तू आपल्या पूजापात्रात घेऊन तुझ्या मंदिरात येताना माझ्या मनाला किती संकोच वाटत होता, हे तुला कसं कळणार! ती भावपुष्पं आणण्याची तुझी आज्ञा नसती आणि केवळ स्वेच्छेनंच आणण्याचा माझा प्रयत्न असता, तर कदाचित रस्त्यातच मी संपून गेलो असतो. पण तुझी आज्ञा आणि आनंद या विचारांनीच मला तुझ्यासमोर येणं भाग पाडलं. अर्थात भक्त भगवंताला भेट देतो तो काही त्याच्या प्रसन्नतेचा विचार करून नव्हे; आणि हे सांगण्यात मला माझं काही नुकसान आहे असंही वाटत नाही. भगवंताला परमानंद व्हावा, अशी काही वस्तू आपण त्याच्या चरणी अर्पण करू शकू असं त्या दीन, हीन, निर्धन भक्ताच्या मनात येणं तरी कसं शक्य आहे? केवळ आपल्याच मनाच्या समाधानासाठी तो त्याच्या चरणी आपली भेट अर्पण करीत असतो. भगवंताच्या चरणी काही तरी वाहून भक्तच आपल्या हृदयावरचा भार हलका करीत असतो, मनावरचं ओझं उतरवीत असतो. परक्याची फुलं तुझ्या चरणी वाहात असताना त्या दिवशी माझ्या हृदयावरचा भार हलकाही झाला नाही आणि माझ्या मनाचं समाधानही झालं नाही.
{{gap}} माझं हे म्हणणं ऐकल्यावर तुझ्या लक्षात येईल की, तुझ्या आनंदात आनंद न मानणारा मी किती स्वार्थी आहे ते! आनंद तर मला झालाच. आपल्या आराध्यदैवताच्या अधरावर प्रसन्नतेची स्मितरेषा पाहताना कोणत्या भक्ताला परमानंदाचा स्पर्श होणार नाही? पण आनंद आणि प्रसन्नतेसाठीच केवळ भक्ताचं हृदय व्याकुळ झालेलं नसतं. प्रसन्नता ही आत्मचैतन्याची एक अनुभूती आहे. आत्मार्पणातच तर भक्ताला<noinclude></noinclude> kym7c3903imzsf22tljjzcj4msxq0wl पान:मधुशाला.pdf/७ 104 107497 229369 221862 2026-04-17T15:06:38Z सुबोध कुलकर्णी 1231 /* प्रमाणित */ 229369 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="सुबोध कुलकर्णी" />{{RunningHeader|सहा||मधुशाला}}</noinclude>हर्ष-विषादापलीकडची विस्मृती सापडते. अरे! हे 'मी'पणाचं ओझं! हे फेकून देण्याची ही आतुरता! या महान त्यागातही स्वार्थाची सत्ता! किती अपूर्ण आहे नाही हे मानवी जीवन! आमच्या महान त्यागातही आमचा महान स्वार्थ आहे. या त्यागस्वार्थाच्या भावनेवरच तर संस्कृतीचा पाया दृढपणे उभा आहे.
{{gap}}मेघ आपलं 'मी'पण अनंत बिंदूंमध्ये, बिंदू आपलं 'मी'पण जलधारा आणि नदीप्रवाहांमध्ये, आणि नद्या आपलं 'मी'पण सागरात लुप्त करण्यासाठी आतुर आहेत; आणि ज्याच्या चरणी आपला संपूर्ण जलनिधी अर्पण करून रिकामं व्हावं अशा कुणाच्या शोधात तर तो सागरही सदैव क्षुब्ध असतो. पृथ्वी आपलं 'मी'पण अगणित वृक्ष- लता-रोपट्यांमध्ये, वृक्ष-लता- रोपटी आपलं 'मी' पण कळ्या-फुलांमध्ये, कळ्या-फुलं आपलं 'मी'पण सुगंध- वायुलहरींमध्ये मिसळून टाकण्यासाठी व्याकुळ आहेत. आणि तो पदर एकदा- फक्त एकदाच झुलवून लोपून जावं, अशा कोणाला तरी धुंडाळत तो वायू, तर सतत अस्थिर होऊन भटकतो आहे. पतंग आपलं 'मी'पण दीपकासमोर, दीपक आपलं 'मी'पण रजनीसमोर, आणि ती रजनी- शशी- तारक-मणिमंडित अशी ती रजनी सूर्याच्यासमोर आपलं 'मी'पण अर्पण करण्यासाठी व्याकुळ आहे. आणि तो सूर्यसुद्धा जिच्यावरून आरती ओवाळून विझून जावं अशा कोण्या एका महज्ज्योतीच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या करतो आहे.
{{gap}}त्याचप्रमाणे कोणाच्या कानी एक क्षणभर गुंजन करून विशाल नभात क्षीण होऊन विरून जाण्यासाठी वादक आपलं 'मी'पण स्वरातून प्रकट करू पाहतो. कोणाच्या नेत्रांमध्ये पळभर का होईना प्रतिबिंबित होऊन, अंधुक होऊन अंतर्धान पावण्यासाठी चित्रकारही आपलं 'मी'पण रंग-रेखांमधून प्रकट करू इच्छितो. एक क्षणभर का होईना, कोणाच्या तरी कोमल तळव्याचा स्पर्श व्हावा आणि मग खंडित होऊन धरतीवर विखरून पडावं म्हणून शिल्पकारही आपलं 'मी'पण पाषाणमूर्तीमध्ये व्यक्त करण्याची अभिलाषा धरतो. आणि कोणाच्या अंतःकरणाला अतिवेगानं हळुवार स्पर्शून जगाच्या घनदाट कोलाहलात लपून जाणाऱ्या सजीव शब्द-काव्यांमध्ये कवीही आपलं 'मी'पण अभिव्यक्त करू पाहतो.{{nop}}<noinclude></noinclude> o61nrn2qytl6umw23m8gg26mo2csdfb पान:मधुशाला.pdf/८ 104 107498 229370 221863 2026-04-17T15:08:15Z सुबोध कुलकर्णी 1231 /* प्रमाणित */ 229370 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="सुबोध कुलकर्णी" />{{RunningHeader|मधुशाला||सात}}</noinclude>{{gap}}हं! तर या स्वार्थी माणसांच्या- त्यांत मीही एक आहेच- सर्वश्रेष्ठ अभिलाषा, आत्मानंद नाही- आत्मसमर्पण आहे! मला त्या दिवशी हे सद्भाग्य मिळालं नाही. म्हणून तर माझं 'मी'पण घेऊन इतक्या लौकर आज पुन्हा तुझ्या पायाशी आलो आहे. या अनिवार स्वार्थासाठी मी तुझ्याजवळ क्षमेची भीक मागतो. माझी खात्री आहे, मी निराश होऊन परतणार नाही; कधी परतलोही नाही.
{{gap}}आज मदिरा घेऊन आलो आहे.- मदिरा! जिच्या प्राशनानं भविष्यातली भयं पळून जातात आणि भूतकाळातली दारुण दुःखं दूर होतात; जिच्या प्राशनानं मानापमानाचं भानच राहात नाही आणि गौरवाचा गर्वही लोपून जातो; जी ओतल्यानं माणसाला आपल्या जीवनातली व्यथा वेदना आणि संकटं काही जाणवतच नाहीत आणि माणूस श्रम, संकटं, ताप सगळं विसरून जातो! अरेरे!- जीवनाची मदिरा! जी अगतिक होऊन प्यावीच लागते- खरंच किती कडू आहे नाही ही! किती? 'ही' मदिरा 'त्या' मदिरेची नशा उतरवील. जीवनाची वेदनामय जाणीव विस्मृतीच्या गर्तेत लोटील आणि बलशाली दैव, दुर्दम्य काळ, कठोर कर्म आणि निर्दय नियतीच्या क्रूर, कठोर आघातापासून रक्षण करील. क्षीण, क्षुद्र, क्षणभंगुर, दुर्बल मानवाजवळ जग-जीवनाच्या सगळ्या आधिव्याधीं- वरची हीच एक महौषधी आहे. आज तुला हिची गरज आहे; असं माझं मनच मला सांगतंय. घे!- पी! आणि विसरून जा आपलं दुःख, दुःखाचा काळ आणि काळाची कठिण चक्र- सगळं सगळं विसरून जा! घे! पी आपल्या जीवनातला नवउल्हास, नवी स्फूर्ती आणि उत्साह या मदिरेनं तुडुंब भरून घे. अरेरे! दुसऱ्यांना मदोन्मत्त करणारा असा मी किती निराशांचा पुंज आहे, हे तरी कुणाला माहीत आहे? कुणाला माहीत की दुसऱ्यांना शीतलता देणारा स्वतः किती भीषण ज्वालांमध्ये जळत असतो ते!
{{gap}}माझ्या हृदयाची मदिरा आहे ही! तू एकटाच जळतोस असं नको समजूस! तू जळतोस, पण त्याचा प्रभाव माझ्यावर पडतो. तू जळतोस आणि मी विरघळतो, तू तापतोस, आणि मी वितळतो. शीतल-मधूच्या शोधात तर मीही आलो होतो; पण तू मला तुझं हृदय दिलंस, हृदयाची<noinclude></noinclude> q9td8jpo7yvnq84fbdqsc6gb42xwx0x पान:मधुशाला.pdf/९ 104 107499 229371 221864 2026-04-17T15:10:32Z सुबोध कुलकर्णी 1231 /* प्रमाणित */ 229371 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="सुबोध कुलकर्णी" />{{RunningHeader|आठ||मधुशाला}}</noinclude>ज्वाला दिलीस, तुझ्या ज्वालेनं माझ्या हृदयाची ही मदिरा विरघळून प्रवाहित होत आहे. घे ना! आणि पिऊन आपला हृदयाग्नी शांत कर! काल जे हृदय मदिरेचं तहानलेलं होतं ते आज तहान शमविणारी मदिराच झालं आहे.
{{gap}}कवीचं हृदय हे केवळ कवीचंच नसतं. त्रिकाल आणि त्रिभुवन त्या हृदयात निद्रावश होतात. दूधबाळीसारखी सृष्टीही तेथे क्रीडा करते आणि अवखळ बालकासारखा प्रलयही तेथे उत्पात घडवतो. आकाशाचं गाणं, वायूचं हसणं आणि सागराचं रडणं यांनीच त्याचं हृदयांगण प्रतिध्वनित होतं, जन्म, जीवन-मरण अविरत गतीनं त्याच्याच हृदयमंदिरात नृत्य करतात. आज त्याचं हृदय विरघळताच सगळं विश्व मादक मदिरेनं म्हणूनच तर चिंब झालं आहे. जल-स्थल, गगन-पवन, सिन्धुवसुंधरा, स्वर्ग-नरक, जड-चेतन, रात्र-दिवस, वन-उपवन, सर-सरिता, मीलन- विरह, प्रणय-संघर्ष, आशा-निराशा, जन्म-जीवन, काल-कर्म- - या विश्वातील सगळ्याच गोष्टी आज मदिरा-चषक– सगळंच मधुशालामय झाल्याचा भास होतो आहे.
{{gap}}प्रियतम, पाहा ना! सगळी प्रकृतीच मधुशाला होऊन झुलते आहे. ये, तू पुरुष हो आणि मी मायारूपिणी चंचला साकीबाला होईन. आपल्या हातानं चषक भरभरून मी तुझ्या ओठाशी आणीन आणि तू अनंत पिपासू होऊन अनंत काल प्राशन करीत राहा. मी पाजताना कंटाळणार नाही आणि तू पिताना थकू नकोस.
{{gap}}भगवन्! क्षमा, क्षमा, क्षमा! अरे! माझं हे मृण्मय पात्र तुझ्या ज्योतिर्मय अधरांशी घेऊन येण्याचं माझं हे धाडस! माझ्या औद्धत्याला क्षमा कर. माझे हात कापत आहेत, चषक थरथरतो आहे, माझी मदिरा सांडते आहे; अरे, पायही कापत आहेत... देहाचा कण न् कण रोमांचित होतो आहे... अरे मी कोसळले...!!
{{gap}}तरीही माझी मदिरा तुझ्या चरणी समर्पित झालीच. मी खूप समाधानी आहे. भक्ताची ही मदिरा! विनम्र भक्ताची ही मदिरा, परमात्म्याच्या ओठाशी नव्हे चरणांवरच समर्पित होणं अधिक उचित आहे. मी वर पाहते ना! हे काय? तुझ्या नेत्रांत हा उन्माद कसला? उन्मत्तता कसली?{{nop}}<noinclude></noinclude> il0fbuw7rkm81yjw4yuqogsg35uvubm पान:मधुशाला.pdf/१० 104 107500 229372 221865 2026-04-17T15:11:35Z सुबोध कुलकर्णी 1231 /* प्रमाणित */ 229372 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="सुबोध कुलकर्णी" />{{RunningHeader|मधुशाला||नऊ}}</noinclude>मस्ती कसली? तुझे ओठ हलताहेत? तू हसतोस काय म्हणून? काय? तू काही म्हणतोस काय? काय? हेच ना, की- {{Block center|<poem>सुरा प्राशुनी धुंदी- ही का रीत असे मधु-प्रीतीची?</poem>}} {{gap}}हे काय? माझ्या मदिरापानाच्या अभिलाषेनंच तू एवढा प्रमत्त झालास? धन्य तू आणि धन्य मी!
{{gap}}पण तुझ्या त्या मदिरनेत्रांनी तू माझ्याकडे पाहू नकोस ना! बघ माझं -मन कसंसंच होतंय! बघ मी डोळे मिटून घेते झालं!
{{gap}}बाई ग! त्या मदिरनेत्रांकडे पाहवतही नाही आणि पाहिल्याशिवाय राहवतही नाही. पुन्हा एकदा त्यांच्याकडे पाहते.
{{gap}}अरे, अरे! पण ते मादक नेत्र गेले तरी कुठं? ते मादक दृश्य कुठं गेलं? आता शोधू तरी कुठं ते! पण का?
{{gap}}नाही शोधणार मी ते!
{{gap}}मला अनंत काळ मस्तीत ठेवील, त्या मादक नयनांचा एकच कटाक्ष! भक्ताला हवी असते सागराची तहान आणि बिंदूनं समाधान!
{{gap}}तुझ्या मदिरधुंद नेत्रांची मदिरा सदैव माझ्या पापणीच्या पेल्यात ओसंडत राहू दे आणि जो जो म्हणून मला पाहील तो तो तुझ्या मदिरेनं धुंद होऊ दे! {{right|तुझ्या मंदिर-नेत्रांच्या
निरंतर ध्यानात -
{{gap}}'मी'{{gap}}
'''(बच्चन)'''}} प्रयाग,
२७ ऑगस्ट १९३३{{nop}}<noinclude></noinclude> m9ema4oyz0o7s6mui1ghh5qjwsd5qlg पान:मधुशाला.pdf/९२ 104 107582 229373 222031 2026-04-17T15:18:39Z सुबोध कुलकर्णी 1231 /* प्रमाणित */ 229373 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude> {| |+ |- ! {{left|प्रथम पंक्ती}} !! क्रमांक !! {{left|प्रथम पंक्ती}} !! क्रमांक |- | वादक होउन मधुविक्रेता || ४१ || कशास इवला घोट सुरेचा || ६८ |- | चित्रकार ये होउन साकी || ४२ || म्हणालास रे काय? न उरली || ६९ |- | घनःश्याम मधुद्राक्षलतेतुन || ४३ || भाळावरती लिखित जेवढे || ७० |- | हिमपर्वत पंक्ती द्राक्षलता || ४४ || खुशाल हो तू कृपण सखे || ७१ |- | हृद्रक्ताची वीरपुतांच्या || ४५ || मान आणि अपमानहि सरले || ७२ |- | तुच्छ मानुनी झिडकारियले || ४६ || क्षीण, क्षुद्र, क्षणभंगुर दुर्बल || ७३ |- | चिरयात्री होउन भटकत मी || ४७ || घडवुन आम्हा चषकासम कुणि || ७४ |- | मशिद विलंकृत आणि मौलवी || ४८ || घडवुनि चषकासम आम्हाला || |- | शिंग वाजले आणि नमाजी || ४९ || द्राक्षासम देहात आपुल्या || ७५ |- | भिन्न हिंदु अन् मुसलमान पण || ५० || यम येइल नेण्याला तेव्हा || ७६ |- | शेख, नमाजी किंवा पंडित || ५१ || मधुसंवाद घडीभर केला || ७७ |- | अन्य रसांचा स्वाद तोवरी || ५२ || जीवनपीडा विसरण्यासही || ७८ |- | आज सोवळे करो जगत परि || ५३ || कालाच्या ओघात सांडते || ७९ |- | धडधडते ही यज्ञकुंडसम || ५४ || सरते सरते सखे प्रतिदिनी || |- | सोम-सुरा पूर्वज प्राशियले || ५५ || साकीवेशे यम येइल मग || ८० |- | तीच सुरा जी होती सागर || ५६ || देहघटातुन जेव्हा सखये || ८१ |- | ऐकु न येती शब्द कधीही || ५७ || मम ओठावर वस्तू अंतिम || ८२ |- | श्रम संकट अन् पाप-तापही || ५८ || शोक करावा मम मृत्यूचा || ८३ |- | समान सर्वांचे सुस्वागत || ५९ || आणि चितेवर ओता माझ्या || ८४ |- | पुनःपुन्हा करुनी लाचारी || ६० || नाव विचारियले जर कोणी || ८५ |- | उद्या? उद्यावर कधी विसंबे || ६१ || ज्ञात आगमन होइ यमाचे || ८६ |- | आज सुसंधी मिळे मला, तर || ६२ || यम आला नेण्यास तर असो || ८७ |- | चैतन्याचा कंद सखे गे || ६३ || सुरापान जर अधम तर तिन्ही || ८८ |- | चषक सुवर्णाचा ग सुंदरी || ६४ || साकीबाले ! शान्त कधी हो || ८९ |- | दोन दिवसही पाजुनी सुरा || ६५ || ज्या मदिरेचा आसुसलेला- || ९० |- | प्रीत किती, मधुपान किती || ६६ || समोर माझ्या दिसे कधीची || ९१ |- | अद्वैतानन्दच हा, जोवर || ६७ || कधी निराशेच्या अंधारी || ९२ |} <noinclude>{{rh|मधुशाला||९१}}</noinclude> 7pod5d86vcqwauj3mhfqsn8ocq490hm पान:मधुशाला.pdf/९३ 104 107583 229374 222032 2026-04-17T15:19:32Z सुबोध कुलकर्णी 1231 /* प्रमाणित */ 229374 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude> {| |+ |- ! '''प्रथम पंक्ती''' !! '''क्रमांक''' !! '''प्रथम पंक्ती''' !! '''क्रमांक''' |- | 'ये रे पुढती' म्हणून मागे || ९३ || मिळे ना सुरा म्हणून प्यालो || ११४ |- | हाती आला म्हणता म्हणता || ९४ || उदंड आली आणिक सरली || ११५ |- | प्राप्य नसे- तर लुप्त न का मग || ९५ || किति अधरांचे स्मरण, बिचाऱ्या || ११६ |- | प्राप्त न हो, पण लोभावुन का || ९६ || दारोदार भटकलो तेव्हा || ११७ |- | मदिरालयि केव्हाचा बसलो || ९७ || मी मधुशालेमध्ये आणिक || ११८ |- | नशीबात खापरी रिकामी || ९८ || कोण न येथे मदिराप्रेमी || ११९ |- | हातापासुन दूरचि ऐशा || ९९ || तीच माधवी शान्त खरोखर || १२० |- | साकीजवळ असे किंचितशी || १०० || मत्तपणा मदिरेचा घेउन || १२१ |- | इवलीशी ही मदिरा साकी || १०१ || मधुशालेचे दार ठोकवी || १२२ |- | हे साकी ! धडपडुनी हाती || १०२ || कोठे स्वर्गिय साकी तो अन् || १२३ |- | ज्या मदिरेने तहानला मज || १०३ || ज्याला त्याला वाटे अनुपम || १२४ |- | मद, मदिरा, मधु ऐकऐकुनी || १०४ || 'मय' शब्दच शुद्धीकृत करुनी || १२५ |- | कशास मागू साकीपाशी || १०५ || पुन्हा पुन्हा किति मर्म नवोनव || १२६ |- | याचक होउन मागितली मी || १०६ || सखोल व्यापकता हृदयाची || १२७ |- | तृप्त एकदा तुडुंब होतो || १०७ || ज्या अधरांना स्पर्श करिल, त्या || १२८ |- | खूप पाहिली मद्यगृहे मी || १०८ || जिभेजिभेवर दिसेल आता || १२९ |- | थिरकत होती एके काळी || १०९ || सुरेत माझ्या सकल जनांना || १३० |- | हृदभट्टीच्या ज्वालेतुन मी || ११० || हे अश्रू का मधुशालेचे ? || १३१ |- | किती त्वरेने रंग बदलते || १११ || उदासीनता चुरडून किती || १३२ |- | थेंबाथेंबासाठि तुला कधि || ११२ || विषमय जीवनि तुझ्या विश्व हे ! || १३३ |- | पक्ष-पंथ सोडियले तेव्हा || ११३ || सन्मानाने मी आजवरी || १३४ |}  {{rule|8em}}<noinclude>{{rh|९२ ||मधुशाला}}</noinclude> 77jildwydlya1df0fkb473zc1v08r8b पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/२२ 104 110009 229387 228936 2026-04-18T08:21:44Z सुबोध कुलकर्णी 1231 229387 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{left|'''तीन तत्त्वज्ञानी.'''}}
{{left|{{rule|6em|height=2px}}}} {{dhr|1cm}}</noinclude>त्याकडे आपण लक्ष्य देऊ नका. परंतु मी म्हणतों तें न्याय्य आहे किंवा नाहीं हे आपण पहा. कारण ज्याप्रमाणें खरें बोलणे हे वकिलाचे कर्तव्य कर्म आहे; त्याप्रमाणेच न्याय्य कोणते हे ठरविणें न्यायाधिशाचे काम आहे."
{{gap}}माझ्या प्रतिपक्षीयांचे दोन वर्ग आहेत. एक जुने एक नवे. मेलीटस व त्याचे स्नेही हे नवे आहेत. त्यांचे मला इतके भय वाटत नाहीं, परंतु माझे जुने प्रतिपक्षी हे याच्यापेक्षाही जास्त प्रबल आहेत. कारण यांनी आज कैक वर्षे तुमच्या कानीकपाळी माझी नालस्ती केली आहे. तुमच्या कोवळ्या मनावर त्यांच्या मतांचा दृढ परिणाम झालेला आहे. शिवाय हे प्रतिपक्षी असंख्य आहेत. व त्यांची मला नांवेंही ठाऊक नाहींत. यामुळे त्यांना पुढे उभे करून त्यांची उलट तपासणी करून माझ्या म्हणण्याचे समर्थन करणे मला शक्य नाहीं. तरी पण ते माझे जुने प्रतिपक्षी आहेत म्हणून त्यांच्या आरोपाचे खंडन प्रथमतः करून मग मी मेलीटस व त्याचे स्नेही यांचेकडे वळणार आहे.
{{gap}}जणू काय माझे प्रतिपक्षी येथे माझ्या समोर आहेत असें धरून मी त्यांचा आरोप आपल्याला सांगतों. ते म्हणतात, 'सांक्रेटिस हा एक फार वाईट मनुष्य आहे. कारण तो पृथ्वीवरील व आकाशांतील वस्तुजाताचा शोध करतो; तसेच त्याला वाईट व असत्य यांना चांगल्याचें व सत्याचं आभासरूप देण्याची कला अवगत आहे व या सर्व गोष्टी तो तरुणाना शिकवितो.' नाटकांतून माझे असेच असत्य चित्र काढले आहे, परंतु अशा प्रकारचें ज्ञान मला मुळींच नाहीं! अशा प्रकारचें ज्ञान मनुषयास मिळणे शक्य असल्यास तें वाईट नाहीं, परंतु असले ज्ञान मला नाहीं हें खास! माझी पुष्कळ भाषणें आपल्यापैकी पुष्कळांनी ऐकली असतील, त्यांनी मी अशा विषयावर कधी बोललों आहे काय याबद्दल आठवण करून पहावी, म्हणजे माझ्या म्हणण्याच्या खरेपणाला त्यांची मनोमय साक्ष पटेल.
{{gap}}"तसेंच मी तरुणांस शिकवितों व त्यांचेकडून गुरुदक्षिणा घेतों, असें तुम्ही ऐकले असेल, परंतु तेही अगदी खोटें आहे! असें जर मला करता<noinclude>{{center|१६}}</noinclude> 2z1zspsgk3z6xxfkmzbvw5azfc3p381 229388 229387 2026-04-18T08:22:13Z सुबोध कुलकर्णी 1231 229388 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />'''तीन तत्त्वज्ञानी.'''</noinclude>त्याकडे आपण लक्ष्य देऊ नका. परंतु मी म्हणतों तें न्याय्य आहे किंवा नाहीं हे आपण पहा. कारण ज्याप्रमाणें खरें बोलणे हे वकिलाचे कर्तव्य कर्म आहे; त्याप्रमाणेच न्याय्य कोणते हे ठरविणें न्यायाधिशाचे काम आहे."
{{gap}}माझ्या प्रतिपक्षीयांचे दोन वर्ग आहेत. एक जुने एक नवे. मेलीटस व त्याचे स्नेही हे नवे आहेत. त्यांचे मला इतके भय वाटत नाहीं, परंतु माझे जुने प्रतिपक्षी हे याच्यापेक्षाही जास्त प्रबल आहेत. कारण यांनी आज कैक वर्षे तुमच्या कानीकपाळी माझी नालस्ती केली आहे. तुमच्या कोवळ्या मनावर त्यांच्या मतांचा दृढ परिणाम झालेला आहे. शिवाय हे प्रतिपक्षी असंख्य आहेत. व त्यांची मला नांवेंही ठाऊक नाहींत. यामुळे त्यांना पुढे उभे करून त्यांची उलट तपासणी करून माझ्या म्हणण्याचे समर्थन करणे मला शक्य नाहीं. तरी पण ते माझे जुने प्रतिपक्षी आहेत म्हणून त्यांच्या आरोपाचे खंडन प्रथमतः करून मग मी मेलीटस व त्याचे स्नेही यांचेकडे वळणार आहे.
{{gap}}जणू काय माझे प्रतिपक्षी येथे माझ्या समोर आहेत असें धरून मी त्यांचा आरोप आपल्याला सांगतों. ते म्हणतात, 'सांक्रेटिस हा एक फार वाईट मनुष्य आहे. कारण तो पृथ्वीवरील व आकाशांतील वस्तुजाताचा शोध करतो; तसेच त्याला वाईट व असत्य यांना चांगल्याचें व सत्याचं आभासरूप देण्याची कला अवगत आहे व या सर्व गोष्टी तो तरुणाना शिकवितो.' नाटकांतून माझे असेच असत्य चित्र काढले आहे, परंतु अशा प्रकारचें ज्ञान मला मुळींच नाहीं! अशा प्रकारचें ज्ञान मनुषयास मिळणे शक्य असल्यास तें वाईट नाहीं, परंतु असले ज्ञान मला नाहीं हें खास! माझी पुष्कळ भाषणें आपल्यापैकी पुष्कळांनी ऐकली असतील, त्यांनी मी अशा विषयावर कधी बोललों आहे काय याबद्दल आठवण करून पहावी, म्हणजे माझ्या म्हणण्याच्या खरेपणाला त्यांची मनोमय साक्ष पटेल.
{{gap}}"तसेंच मी तरुणांस शिकवितों व त्यांचेकडून गुरुदक्षिणा घेतों, असें तुम्ही ऐकले असेल, परंतु तेही अगदी खोटें आहे! असें जर मला करता<noinclude>{{center|१६}}</noinclude> 5majgu1giifs1jcmucsmam89bni13kc पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/२४ 104 110011 229386 229296 2026-04-18T08:20:40Z सुबोध कुलकर्णी 1231 /* प्रमाणित */ 229386 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="सुबोध कुलकर्णी" />'''तीन तत्त्वज्ञानी.'''</noinclude>{{gap}}"या डेलफाय देवाच्या म्हणण्याचा अर्थ तरी काय? असा मी विचार करूं लागलों. मला तर मुळींच शहाणपण नाहीं, हे मला ठाऊक आहे. तेव्हां देवाच्या म्हणण्याचा अर्थ काय? देव तर खोटे बोलणार नाहीं. कारण तो देवच आहे. शेवटी देवाचें म्हणणें खरें आहे कीं खोटें आहे याचा खालील पद्धतीप्रमाणे मी पडताळा पाहण्याचा निश्चय केला. शहाणपणाबद्दल अत्यंत नाणावलेल्या एका मुत्सद्याकडे मी गेलों व त्याला पुष्कळ प्रकारचे प्रश्न विचारून त्याच्याशी संभाषण केलें, त्यावरून मला असे समजलें कीं, जरी त्याला सर्व लोक ज्ञानी समजतात, व तो आपल्या स्वतःलाही ज्ञानी समजतो, तरी पण तो अज्ञानी आहे व या अज्ञानाची त्याला जाणीव नाहीं. तेव्हां मी व तो या दोघांनाही ज्ञान नाही असे दिसले. माला माझ्या अज्ञानाची मला जाणीव होती, पण त्याला मात्र ती नव्हती. तेव्हां या बाबतींत मी त्याच्यापेक्षां शहाणा खरा, असें अनुभवास आले. पुढे मी एका कवीकडे गेलों. परंतु त्याला आपल्या कवितेबद्दल व आपल्या कवनपद्धतीबद्दल कांहींच ज्ञान नाहीं असे मला दिसून आलें. तेव्हां मी ताडलें की कवींना आपल्या कलेचे ज्ञान नसते, ते कविता करतात खऱ्या, परंतु त्या ज्ञानानें नव्हे तर साहजिक स्फूर्तीनें करतात. पुढे मी कारागिरांकडे गेलों, त्यांना माझ्यापेक्षां जास्त शहाणपण असेल असे मला वाटलें. त्यांना आपल्या कलेबद्दल व धंद्याबद्दल माहिती होती खरी, परंतु या एका प्रकारच्या ज्ञानावरून आपल्याला सर्व त-हेचेंज्ञान आहे असे त्यांना वाटत असे. या बाबतीतही मी त्यांचेपेक्षां बरा, असे मला दिसून आलें. याप्रमाणे देवाच्या जणुं कांहीं आज्ञेनेंच मी आपला व्यवसाय चालविला होता. परंतु यामुळे मी आपल्याला जास्त जास्त शत्रु करीत होतों. ज्याच्या ज्याच्या जवळ संभाषण करून मी त्याला कुंठित करून त्याचें अज्ञान दाखवीत असे, तो तो मनुष्य आपल्या अज्ञानाला दोष न ठेवता मलाच शिव्या देई.! तरुण मंडळी हा वादविवाद पहात असत. तेव्हां त्यांना मी जास्त शहाणा आहे असे वाटे व माझ्या<noinclude>{{center|१८}}</noinclude> jvtbo7c72zfpldurtl01s8870tijh11 पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/२५ 104 110012 229357 229298 2026-04-17T12:30:54Z सुबोध कुलकर्णी 1231 /* मुद्रितशोधन */ 229357 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="सुबोध कुलकर्णी" />{{right|'''साक्रेटिस.'''}}</noinclude>प्रश्नपद्धतीचे ते आपापसांत अनुकरण करीत व या पद्धतीचा प्रयोग दुसऱ्यावरही करीत.
{{gap}}" याप्रमाणे ज्या लोकांचे अज्ञान बाहेर पडे ते लोक आपल्यावर रागावण्याऐवजी मजवर रागावत व साक्रेटिस हा तरुणांना बिघडवितो, अशा प्रकारचा आरोप मजवर करीत. हे आरोप तुम्ही लहानपणापासून ऐकत आला आहांत व येवढ्याशा थोड्या वेळांत तुमचे दुराग्रह काढून टाकणे कठीण आहे. परंतु मी जे सांगितले आहे ते सर्व खरे आहे. मी कांहीं एक चोरून ठेवले नाही, किंवा काहीएक गाळले नाही. आहे तसे स्पष्टपणे सांगितले आहे व हा माझा स्पष्टवक्तेपणाच मला नेहमी भोवला आहे व आतांही तो भोवणार.
{{gap}}" आता मला देशाभिमानी मेलीटसकडे वळले पाहिजे, याचा आरोप असा आहे, " सॉक्रेटिस हा तरुणांना बिघडविणारा व शहरच्या देवतांवर भरंवसा न ठेवतां दुसऱ्याच देवतांवर भरंवसा ठेवणारा वाईट मनुष्य आहे.' आतां मी तरुणांना बिघडवितों हा आरोप मेलीटसने फारसा विचार न करता केला आहे असें मी त्याची प्रत्यक्ष तुमच्यापुढे उलट तपासणी करून दाखवितो. (साकेटीस मेलीटसची उलट तपासणी न्यायाधीश सभेपुढे घेतो.) "अथीनियन लोकहो ! पाहिलेत तुम्ही की मेलीटसने याविषयीं मुळीच विचार केला नाही, असें त्याच्या विसंगत विधानांवरून स्पष्ट होत आहे. तोच प्रकार दुसऱ्याही आरोपाचा आहे. त्यांतही सर्वस्वी विसंगतपणाच भरलेला आहे. परंतु तुमच्यापैकी कोणी विचारील 'साक्रेटिस ! ज्या व्यवसायामळे तुमच्या जीवावर येऊन बेतली, असा व्यवसाय चालू ठेवण्याचे तुमच्या मनांत येते कसे ? याला माझे उत्तर म्हणजे माझा सर्व आयुष्यक्रमच होय. कोणत्याही माणसाने आपले कर्तव्यकर्म आपल्या आयुष्याची पर्वा न करता केले पाहिजे. मी तीन वेळां तुमच्या सेनापतीच्या हाताखाली काम केले व या तीनही वेळां मी आपल्या जीवाकडे किंवा सुरक्षितपणाकडे पाहिले नाही. या प्रमाणे सेनापतीची आज्ञा पाळ-<noinclude>{{center|१९}}</noinclude> pjb743zncsrhafpsaxwc63rl6792rxt पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/२६ 104 110013 229358 228794 2026-04-17T12:33:23Z सुबोध कुलकर्णी 1231 /* मुद्रितशोधन */ 229358 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="सुबोध कुलकर्णी" />'''तीन तत्वज्ञानी.'''</noinclude>तांना जर मरणाची भीति मनांत आणली नाही, तर हा माझा व्यवसाय मला देवानेच लावून दिला आहे तेव्हा मी त्याची अवज्ञा कशी करूं? मी जर आता मरणाच्या भीतीने देवाची आज्ञा उलंधिली तर मात्र मेलीटस याला मजवर नास्तिक्याचा आरोप खरोखरी आणता येईल. मला जर तुम्ही म्हणालात, को 'साकेटस ! एक वेळ आम्ही तुला गय करतों परंतु या पुढे हा अपला व्यवसाय थांबीव.' तर मी याला असे उत्तर देईन की, 'अयोनियन लोकहो ! मला तुमच्याबद्दल अत्यंत आदर व प्रेम वाटते. परन्तु तुमच्यापेक्षा मी देवाच्या आशेला जास्त मान देतों व जोपर्यंत माझ्या जिवात जीव आहे व जोपर्यंत माझ्या व वाचेतून शब्द निघत आहे तोपर्यंत मी सत्यपरीक्षणचा व्यवसाय व तुम्हांला उपदेश करण्याचा व्यवसाय सोडणार नाही! मी तुमच्या कानी कपाळी तुमच्या अज्ञानाबद्दल तुमच्या कामचुकारपणा बदल तुमची कानउघाडणी करीत राहणार. आपल्या आत्म्याच्या पूर्णतेकडे आपले सर्व लक्ष लावा पैशाकडे किंवा विषयसुखाकडे लक्ष देऊ नका. पैशापासून सद्गुण निघत नाही तर सद्गुणापासूनच पैसा व इतर श्रेयस्कर गोष्टी उत्पन्न होतात, असाच उपदेश मी करीत रहाणार! हाच उपदेश मी तरुण पिढीला करीत आलो आहे व या उपदेशानेच जर मी तरुणांना बिघडवीत असेन तर माझ्या हातून मोठाच गुन्हा होत आहे. अर्थीनियन लोक हो ! तरी तुम्ही अनीटसचें ऐकून मला शिक्षा तर करा, किंवा माझे ऐकून मला सोडा. परंतु हे ध्यानात ठेवा की, मी हा आपला व्यवसाय कधीही सोडणार नाही. याकरतां जरी मला असंख्य वेळ मरावे लागले तरी बेहेत्तर !
{{gap}}अथानियन नागरिकहो ! झाले. माझ्याकडून होईल तसें मी आपल्या बाजूचे समर्थन केले आहे. तुमच्यापुढे नेहमी येणाऱ्या आरोपींप्रमाणे आपली बायकामुले पुढे करून तुमच्या मनांत दया उत्पन्न करून आपली सुटका करून घेण्याची रीत आहे. परंतु मी तसे कधीही करणार नाहीं ! मलाही मुलेबाळे आहेत, माझाही संसार आहे, परंतु न्यायाविशाचे काम न्याय करणे हे होय व आरोपीने आपल्या निरपराधीपणाची<noinclude>{{center|२०}}</noinclude> ldwqzjbh0omty8p1ostclv9xpoeohke पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/२७ 104 110014 229359 228795 2026-04-17T12:35:46Z सुबोध कुलकर्णी 1231 /* मुद्रितशोधन */ 229359 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="सुबोध कुलकर्णी" />{{right|'''साक्रेटिस.'''}}</noinclude>खात्री युक्तिवादाने पटविली पाहिजे. आपली सुटका करून घेण्याचे दुसरे मार्ग-दयादि उत्पन्न करणें-हे न्यायाधिशाला व आरोपीला कमीपणा आणणारे आहेत. तेव्हां असल्या कमीपणा आणणाऱ्या मार्गाचा मी अवलंब करणार नाही व तुम्हीही कधी करूं नये, अशी आपल्याला विनंति आहे. तुम्ही खरा न्याय देण्याची शपथ घेतली आहे. तेव्हां तुमच्या दयेचा फायदा घेणे म्हणजे तुमची शपथ तुम्हांला मोडण्यास लावणे होय. मी असे केले तर मात्र देव नाही असेंच मी तुम्हांला शिकविल्यासारखें होईल व मेलीटसचा आरोप मी आपल्या वर्तनाने शाबीत केल्याप्रमाणे होईल! अर्थानियन नागरिक हो ! खरा प्रकार निराळा आहे. माझ्या प्रतिपक्षीयांचा सुद्धा नसेल असा माझा देवावर भाव आहे व माझा खटला मी तुमच्यावर व देवावर सोपवितो; म्हणजे त्याचा निकाल तुम्हांला व मला श्रेयस्कर असा होईल!
{{gap}}सॉक्रेटिसाचे अशा तऱ्हेचे भाषण झाल्यावर सर्व न्यायाधिशांची मते घेण्यांत आली व सॉक्रेटिसाला २८१ विरुद्ध २२० मतांनी अपराधी ठरविले. नंतर अथीनियन कायद्याप्रमाणे वादीने आरोपीला कोणची शिक्षा द्यावयाची याबद्दल सूचना आणावयाची असते. त्याप्रमाणे साक्रेटिसाला मरणाची शिक्षा व्हावी अशी मेलीटसने सूचना आणली. आरोपीला दुसरी कमी दर्जाची शिक्षा सुचविण्याचा अधिकार असतो व ही शिक्षा सुचवितांना आरोपीने न्यायाधिशाशी नम्रपणाचे वर्तन करून त्याची करुणा भाकून आपल्या दुःखाचें प्रदर्शन केले म्हणजे न्यायसभेचे बहुतेक कमी शिक्षेला बहुमत पडत असे. त्याप्रमाणे साक्रेटिसाने गयावया केले असते, आपण मरणार याबद्दल त्याने दुःख प्रदर्शित केले असते, आपली मुले-बाळे आणून त्यांचे व आपल्या विपन्न स्थितीचे प्रदर्शन केले असते, तर त्याची थोड्या दंडावरही सुटका झाली असती. परंतु साक्रेटिसासारखा धीरगंभीर कर्तव्यपरायण साधुपुरुष अशी लाजिरवाणी गोष्ट कशी करील ? उलट त्याने आपले निरपराधित्व मोठ्या अभिमानाने सांगितले. आपण अथेन्सवर कसे उपकार केले आहेत हे त्याने दाखवून दिले<noinclude>{{center|२१}}</noinclude> jny47nnecy5a6e1m54id2bta5c9qegn पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/२८ 104 110015 229360 228796 2026-04-17T12:37:40Z सुबोध कुलकर्णी 1231 /* मुद्रितशोधन */ 229360 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="सुबोध कुलकर्णी" />'''तीन तत्वज्ञानी.'''</noinclude>व या उपकारांची खरी फेड म्हणजे आपल्याला आपल्या उतार वयांत शहराने आपल्या खर्चाने पोषण करणे ही होय असे सांगितले. परंतु मित्राच्या मुर्वतीखातर व न्यायाधिशाच्या समजुतीखातर साक्रेटिसानें तीस मिनींचा दंड देण्यास आपण कबूल आहो असे जाहीर केले.
{{gap}}मते घेतल्यावर असे दिसून आले की, पहिल्यापेक्षां पुष्कळच जास्त मताने सॉक्रेटिसास मरणाची शिक्षा देण्यात आली. ही शिक्षा ऐकून त्याला मुळीच वाईट वाटले नाही. मात्र आपल्याला अन्यायाने शिक्षा दिल्याबद्दल तुम्हांला पुढे पश्चात्ताप होईल असे सॉक्रेटिसाने भविष्य सांगितले.
{{gap}}शेवटी सॉक्रेटिस म्हणाला, " परंतु आतां वेळ झाली व आपण येथून निघाले पाहिजे, मी मरायला जाणार, आपण जगण्यास जाणार, पण आयुष्य जास्त चांगले किंवा मृत्यु जास्त चांगला, हे फक्त देवालाच ठाऊक ! ! !" {{Css image crop |Image = तीन_तत्त्वज्ञानी.pdf |Page = 28 |bSize = 582 |cWidth = 141 |cHeight = 167 |oTop = 318 |oLeft = 206 |Location = center |Description = }}<noinclude>{{center|२२}}</noinclude> igccmbmrm3nrap78rww9j6y3ck7hrps 229361 229360 2026-04-17T12:38:51Z सुबोध कुलकर्णी 1231 229361 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="सुबोध कुलकर्णी" />'''तीन तत्वज्ञानी.'''</noinclude>व या उपकारांची खरी फेड म्हणजे आपल्याला आपल्या उतार वयांत शहराने आपल्या खर्चाने पोषण करणे ही होय असे सांगितले. परंतु मित्राच्या मुर्वतीखातर व न्यायाधिशाच्या समजुतीखातर साक्रेटिसानें तीस मिनींचा दंड देण्यास आपण कबूल आहो असे जाहीर केले.
{{gap}}मते घेतल्यावर असे दिसून आले की, पहिल्यापेक्षां पुष्कळच जास्त मताने सॉक्रेटिसास मरणाची शिक्षा देण्यात आली. ही शिक्षा ऐकून त्याला मुळीच वाईट वाटले नाही. मात्र आपल्याला अन्यायाने शिक्षा दिल्याबद्दल तुम्हांला पुढे पश्चात्ताप होईल असे सॉक्रेटिसाने भविष्य सांगितले.
{{gap}}शेवटी सॉक्रेटिस म्हणाला, " परंतु आतां वेळ झाली व आपण येथून निघाले पाहिजे, मी मरायला जाणार, आपण जगण्यास जाणार, पण आयुष्य जास्त चांगले किंवा मृत्यु जास्त चांगला, हे फक्त देवालाच ठाऊक ! ! !" {{Css image crop |Image = तीन_तत्त्वज्ञानी.pdf |Page = 28 |bSize = 582 |cWidth = 140 |cHeight = 167 |oTop = 314 |oLeft = 206 |Location = center |Description = }}<noinclude>{{center|२२}}</noinclude> p26tuf9tjkbro4l3jdxd72k1v2qs3bj 229362 229361 2026-04-17T12:39:57Z सुबोध कुलकर्णी 1231 229362 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="सुबोध कुलकर्णी" />'''तीन तत्वज्ञानी.'''</noinclude>व या उपकारांची खरी फेड म्हणजे आपल्याला आपल्या उतार वयांत शहराने आपल्या खर्चाने पोषण करणे ही होय असे सांगितले. परंतु मित्राच्या मुर्वतीखातर व न्यायाधिशाच्या समजुतीखातर साक्रेटिसानें तीस मिनींचा दंड देण्यास आपण कबूल आहो असे जाहीर केले.
{{gap}}मते घेतल्यावर असे दिसून आले की, पहिल्यापेक्षां पुष्कळच जास्त मताने सॉक्रेटिसास मरणाची शिक्षा देण्यात आली. ही शिक्षा ऐकून त्याला मुळीच वाईट वाटले नाही. मात्र आपल्याला अन्यायाने शिक्षा दिल्याबद्दल तुम्हांला पुढे पश्चात्ताप होईल असे सॉक्रेटिसाने भविष्य सांगितले.
{{gap}}शेवटी सॉक्रेटिस म्हणाला, " परंतु आतां वेळ झाली व आपण येथून निघाले पाहिजे, मी मरायला जाणार, आपण जगण्यास जाणार, पण आयुष्य जास्त चांगले किंवा मृत्यु जास्त चांगला, हे फक्त देवालाच ठाऊक ! ! !" {{Css image crop |Image = तीन_तत्त्वज्ञानी.pdf |Page = 28 |bSize = 582 |cWidth = 143 |cHeight = 162 |oTop = 317 |oLeft = 204 |Location = center |Description = }}<noinclude>{{center|२२}}</noinclude> gwqe1jzrna61cjy8gox80ft98kua5n5 पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/२९ 104 110016 229363 228797 2026-04-17T12:40:58Z सुबोध कुलकर्णी 1231 /* मुद्रितशोधन */ 229363 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>{{center|(३)}} {{center|{{xx-larger|'''साक्रेटिसाचा तुरुंगवास.'''}}}} {{gap}}साक्रेटिसाला मरणाची शिक्षा झाली ती कांहीं आगंतुक कारणांनी नाही. त्याचा तुरुंगवास मात्र आगंतुकच होता. त्याची शिक्षा ही मानवी स्वभावांत असलेल्या दोन परस्परविरोधी तत्वांचा परिणाम होय. या दोन तत्वांच्या झगड्यांत मनुष्यमात्राची प्रगति घडून आलेली आहे. साकेटीस व त्याचे प्रतिपक्षी यांच्या तंटयाचे मूळ या तत्त्वांत आहे. साक्रेटीस हा नव्याचा अभिमानी होता, तर त्याचे प्रतिपक्षी हे जुन्याचे अभिमानी होते; तो सुधारणावादी होता, तर ते रूढिवादी होते; साक्रेटिसाला डोळस अशी धर्मभक्ति पाहिजे होती, तर त्यांना अंधधर्मश्रद्धा हवी होती; साक्रेटिसाची पारमार्थिक दृष्टि होती, पर त्यांची सांसारिक दृष्टि होती तो खऱ्याचा भोक्ता होता, तर ते आभासावर भिस्त ठेवणारे होते; त्याला अस्सल पाहिजे होते, त (त्यांचे नकलेवर समाधान होत होते; तो दूरदृष्टि होता, तर ते संकुचितदृष्टि होते; तो स्वार्थपराङ्मुख होता, तर ते स्वार्थपरायण होते. याप्रमाणे परस्परविरोधी तत्त्वांच्या वालींचा झगडा अपरिहार्यच होता, व या झगड्यांत साक्रेटिसाच्या प्रतिपक्षीयांचा क्षणैक विजयहि झाला खरा. परंतु आपल्या अन्यायी कृत्याबद्दल पुढे अथीनियन लोकांना इतका पश्चात्ताप झाला की, ज्या पुरुषाला त्यांनी गुन्हेगार म्हणून विष प्राशन करावयास लावले त्यालाच त्यांनी पुरुषश्रेष्ठाचा मान दिला व त्याच्या पश्चात् त्याचे विलक्षण गौरव केलें, साक्रेटिसाचा तुरुंगवास ही मात्र एक आकस्मिक गोष्ट होती व त्याचे कारणहि क्षुल्लकच होते व केव्हां केव्हां क्षुल्लक गोष्टीपासून फार मोठे परिणाम झालेले आपण पाहतो त्या कोटीपैकी हा तुरुंगवास होता. अथीनियन लोकांचे-नव्हे<noinclude>{{center|२३}}</noinclude> rr8tw96ajgpf5lq7aoxyxnsr3x4omex पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/३० 104 110017 229364 228798 2026-04-17T12:42:03Z सुबोध कुलकर्णी 1231 /* मुद्रितशोधन */ 229364 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="सुबोध कुलकर्णी" />'''तीन तत्वज्ञानी.'''</noinclude>सर्व जगाचे-सुदैव की, साक्रेटिसाला मरणाची शिक्षा झाली असतांना सुमारे एक महिना त्याला तुरुंगवास भोगावा लागला व यामुळे त्याच्या अंगच्या कित्येक गुणांचे प्रदर्शन झाले. हे तुरुंगांतील दिवस साक्रेटिसाने मोठ्या शांत वृत्तीने व मोठ्या आनंदांत घालविले. या दिवसांत त्याने आपल्या आजन्मव्यवसायाला खळ पडू दिला नाही. तुरुंगांत त्याच शिष्य व परकीय लोक येत व त्यांच्याशी निरनिराळ्या विषयांवर वादविवाद करीत. असा क्रम थेट त्याच्या मरणाच्या क्षणापर्यंत चालला होता. शिक्षा झालेली असूनहि आपले कर्तव्यकर्म करीत असतांना साक्रेटिसाला मरण आले हे त्याचे केवढे भाग्य ! असें भाग्य फारच थोड्यांच्या वाट्यास येते. असो.
{{gap}}डेलॉस या बेटावर असलेल्या डेलफॉय देवावर अथोनियन लोकांची फार भक्ति होती. ते त्या देवाला आपला संरक्षक देवच मानीत. यामुळे दरवर्षी एका विवक्षित वेळी एक स्वतंत्र गलबत नगरातर्फे या देवाच्या पूजेअर्चेकरितां पाठविण्यात येत असे. अथेन्सच्या बंदरांतून हे गलबत सुटल्यापासून परत येईपर्यंतचा काळ- याला सुमारे महिना लागे-पवित्र व धार्मिक मानला जात असे, व या पर्वणींत कोण याहि माणसाला मरणाची शिक्षा दिली जात नसे. साक्रेटिसाच्या खटल्याचा ज्या दिवशी निकाल झाला त्याच दिवशी हे गलबत बंदरांतून हाकारल्यामुळे साकेटिसाची मरणाची शिक्षा ताबडतोब अमलांत आली नाहीं, व या कारणाने त्याला महिनाभर तुरुंगांत काढावा लागला व तो साक्रेटिसाने कशा प्रकाराने घालविला याचे दिग्दर्शन वर आलेच आहे.
{{gap}}साक्रेटिसच्या तुरुंगवासास जवळ जवळ महिना होत आला असतांना एके दिवशी अगदी पहाटेस साक्रेटिसाचा पूर्वीचा शिष्य व उतारवयांतील मित्र क्रिटो हा तुरुंगांतील साक्रेटिसाच्या खोलीशी आला. परंतु त्याला गाढ झोप लागली आहे असे क्रिटोला समजले. हे पाहून आपल्या गुरूच्या शांत व आनंदी वृत्तीबद्दल त्याला सप्रेम कौतुक वाटले, साक्रोटिस आपोआप जागा झाल्याबरोबर त्याने आपल्या मित्राची विचार<noinclude>{{center|२४}}</noinclude> le3fprmkk4afkq22ydcxx8tlijicaa7 पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/३१ 104 110018 229365 228799 2026-04-17T12:43:49Z सुबोध कुलकर्णी 1231 /* मुद्रितशोधन */ 229365 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="सुबोध कुलकर्णी" />{{right|'''साक्रेटिस.'''}}</noinclude>पूस करून इतक्या पहांटेस येण्याचे कारण विचारले, तेव्हां क्रिटोने डेलासला गेलेले गलबत आज येणार अशी दुःखदायक बातमी आली आहे असे मोठा सुस्कारा टाकून सांगितले. साक्रेटिसास ही बातमी ऐकून काहीएक वाईट न वाटतां उलट ही सुदैवाची बातमी आहे असेंच त्याला वाटले. परंतु तो म्हणाला " गलबत आज येईल असे मला वाटत नाही. कारण आतांच एक शुभ्र वस्त्र परिधान केलेली सुंदर स्त्री माझ्या स्वप्नांत आली व ती मला म्हणाली:-
{{gap}}"आज पासूनी तिसरे दिवशी जाशिल तूं यमलोकाला !' तेव्हां तुम्ही मला उठविले नाही हे चांगले केले; पण तुमचे येण्याचे कारण सांगा."
{{gap}}क्रिटो मोठया कळकळीने बोलला " गुरुजी, मी आपल्याला किती तरी वेळा विनति केली आहे व आतां ही शेवटची करीत आहे. आपण आपल्या जीवाची उगाच आहुती घालीत आहां. या आपल्या करण्याने आम्ही आपल्या मित्रांनी आपली सुटका करण्याचा काही प्रयत्न केला नाही, असा आमच्यावर जनापवाद राहील. मी आपल्याला सांगतो की, मी आपल्या सुटकेची सर्व तयारी करून ठेविली आहे. तुरुंगावरच्या सर्व अधिकाऱ्यांची समजी केली आहे. या कामाला फारसा खर्च येतो अशांतला प्रकार नाही, व जरी माझी सर्व संपत्ति या कामी खर्च झाली तरी मी ती करण्यास एका पायावर तयार आहे. आपण आपल्या मित्राच्या साहाय्याने तुरुगांतून निघून गेल्यास आपल्या मित्रांना सरकाराकडून त्रास, दगदग व खर्च सोसावा लागेल, या भीतीने जर आपण माघार घेत असाल तर त्याबद्दल आपण अगदी बेफिकीर असा. आमचे आम्ही पाहून घेऊ! दुसऱ्या शहराचे लोक आपले आदरातिथ्य करण्यास व आपल्यास आश्रय देण्यास उत्सुक आहेत. सर्व व्यवस्था मी थेसलींत करून ठेविली आहे. आपला नुसता रुकार पाहिजे आहे. शिवाय,जीव जगविणे हातांत असतां तो जाणूनबुजून घालविणे हे पाप नाही का ? आणखी असें पहा, आपण सडे नाहीत आपल्याला मुलेबाळे आहेत; ज्यांचे संगोपन करणे व त्यांना शिक्षण देऊन उत्तम नागरिक बनविणे<noinclude>{{center|२५}}</noinclude> 8iu56k0jtebqvx3eqgyyt84tj13mpgw पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/३२ 104 110019 229375 228800 2026-04-18T08:06:28Z सुबोध कुलकर्णी 1231 /* मुद्रितशोधन */ 229375 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="सुबोध कुलकर्णी" />'''तीन तत्वज्ञानी.'''</noinclude>हे आपले कर्तव्यकर्म आहे, ते कर्तव्यकर्म आपल्या मरणाने आपण टाळीत नाही काय ? हा एक आपला भित्रेपणाच आहे. आपल्या पश्चात् आपली मुले पोरक्यासारखींच होणार व अशा मुलांची स्थिति पुढे कशी होते हे आपल्याला ठाऊकच आहे. आपल्या मुलांचे संगोपन व संवर्धन करण्याचे काम करण्याची ज्याची इच्छा नाही त्या मनुष्याने संसारांत पडूं नये ! शिवाय, आपल्या या प्रसंगांत प्रथमपासून अन्याय व चुका झालेल्या आहेत. प्रथमतः आपल्याला मुळी खटल्यांत हजर राहण्याचेच कारण नव्हतें ! पुढे खटला चालविण्याच्या कामांतहि चुका झाल्या व आतां शेवटी आपला अन्यायाने जीव जाणार. तरी आपण या अन्यायाला कां बळी पडावें ? तेव्हां गुरुजी, माझें ऐका. मी सर्व तयारी केली आहे. आतां विचार करण्यास वेळ नाही. आजच्या रात्रीच येथून गेले पाहिजे. नाही तर सर्व घात झालाच म्हणा. तरी ही माझी शेवटची विनति मान्य कराच !"
{{gap}}या कळवळ्याच्या भाषणास साक्रेटिसाने तितक्याच कळवळ्याने पण गंभीरपणाने उत्तर दिले. साक्रेटिस ह्मणाला 'प्रिय क्रिटो ! माझ्या सुटकेबद्दलची तुमची कळकळ जर चांगली असली तर ती बहुमोलाची होय खरी; परंतु जर ती वाईट असली तर मात्र फार भयंकर आहे ! मी आजपर्यंत कोणतीहि गोष्ट अविचाराने केली नाहीं; सुविचारास पटल्याखेरीज कोणतीहि गोष्ट करावयाची नाही असा माझा क्रम आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे. तुमच्या ह्मणण्याप्रमाणे आज माझ्यावर दुर्दैव ओढवल आहे म्हणून मी आतां सुविचाराची कास सोडणे रास्त होईल काय ? तेव्हां, तुह्मी ह्मणतां तसे वागणे हे नीतिदृष्टया चांगले आहे किंवा नाहीं याचा आपण पाहिजे तर पुनः विचार करून विचारांती जे चांगले ठरेल त्याप्रमाणे वागू; परंतु नुसत्या लोकांच्या मताला मान देण्याकरितां, किंवा दुसऱ्या कोणत्याहि कारणाकरितां, अयोग्य तऱ्हेने वागणे आपल्याला व आपल्या आजपर्यंतच्या उपदेशाला शोभणार नाही. खर्चाचा, मुलांच्या शिक्षणाचा, दुसऱ्या शहरांच्या आश्रय देण्याच्या उत्सुकतेचा, किंवा इतर<noinclude>{{center|२६}}</noinclude> bxmo8foz1dihtxtkfb5bh8bubvoykyo पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/३३ 104 110020 229376 228801 2026-04-18T08:07:46Z सुबोध कुलकर्णी 1231 /* मुद्रितशोधन */ 229376 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="सुबोध कुलकर्णी" />{{right|'''साक्रेटिस.'''}}</noinclude>कारणांचा येथे संबंध येत नाही. आपले करणे सुविचाराला पटते किंवा नाही, हाच काय तो आपला महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रिय क्रिटो ! मी करीत आहे हे युक्तीस व सुविचारास धरून आहे, अशी माझी पूर्ण खातरी आहे व तुमचीहि तशीच व्हावी अशी माझी इच्छा आहे. जनतेच्या मताला मान देण्याचे कारण नाही, हे मी आजपर्यंत म्हणत आलों नाहीं का ? मत आपल्या फायद्याचे आहे ह्मणून ते मत आजच ग्राह्य झाले काय ? वाईट तें सर्वत्र वाईटच ना ? आपल्यावर दुर्दैव ओढवले ह्मणून. वाईटाचे चांगले असें ह्मणावयाचे नाही ना ? मग अथीनियन लोकांच्या हुकुमाने मला येथे आणून ठेविले असतां त्यांच्या संमतीवांचून येथून जाणे रास्त होईल का ? एकाने अन्याय केला ह्मणून दुसऱ्याने त्याचप्रमाणे वागावे काय ? एकाने गाय मारली तर दुसऱ्याने वासरूं मारूं नये असे आजपर्यंत आपण शिकवीत आलो ते आतां धाब्यावर बसवावयाचे काय ? अथोनियन लोकांनी मला अन्यायाने शिक्षा केली ह्मणून आपण आपले ब्रीद सोडावे काय ? तेव्हां कोणत्याहि दृष्टीने विचार करतां माझे येथून निघून जाणे गैर होईल; असें तुह्माला दिसत नाही काय ? मला तर माझे असे वर्तन म्हणजे सर्व आयुष्यातील विचारांवर क्षणिक जीवाच्या आशेकरितां पाणी सोडण्यासारखे वाटत आहे ! कायदा पालन करणे हा एक सद्गुणाचा प्रमुख भाग आहे. त्याचे अशा करण्याने उल्लंघन होत नाही का ? मला तर या क्षणी माझ्यापुढे जणूं कांहीं अथेन्सचे कायदे व राज्यघटना ही मूर्तिमंत उभी असून ती माझी कानउघाडणी करीत आहेत असे वाटते. 'साक्रेटिस ! काय करावयाचे मनांत आणिलें आहे ? तुमच्या पळण्याच्या प्रयत्नाने तुझी आमचा गळाच दाबीत नाही काय ? कायदा व राज्यघटना यांखेरीज कोणता समाज सुरळित चालू शकेल ? जेथे कायद्याची पायमल्ली होते, जेथे खासगी व्यक्ति कायद्याला धाब्यावर बसवितात, जेथें न्यायाधिशांचा निकाल कोणी जुमानीत नाही, तेथे सुरक्षितपणे राहणे तरी शक्य आहे. काय ? साक्रेटीस ! तुम्ही म्हणाल, कायद्यांनी मला अन्यायाने वागविलें.{{nop}}<noinclude>{{center|२७}}</noinclude> hjwwaad7rq0imsyx9uw9fdmslbs6b34 पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/३४ 104 110021 229377 228802 2026-04-18T08:08:52Z सुबोध कुलकर्णी 1231 /* मुद्रितशोधन */ 229377 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="सुबोध कुलकर्णी" />'''तीन तत्वज्ञानी.'''</noinclude>म्हणून त्यांना मी झुगारून देतो. यावर आम्ही कायदे तुम्हांला विचारतों की, असा का तुमचा आमचा करार होता! तुमच्या फायद्याचे हिताचे असले म्हणजेच कायदे पाळावे असें म्हणाल तर मग त्यांत कायदा पाळण्याचा सद्गुण तो काय ? तुम्ही स्वार्थाकारितां कायदा पाळला असे होईल. एका विवक्षित प्रसंगी कदाचित् तुम्हांला अन्याय झाला असेल पण सामान्यत्वे कायद्यांचा तुम्हाला उपयोग होतो ना ? तुमचे जीवित, तुमचे संगोपन, तुमचे शिक्षण, तुमचे जीवितसंरक्षण, तुमची विश्रांति ही मुळी कायद्यामुळेच आहेत ना ? कायद्याने तुमचे आईबाप विवाहपाशबद्ध झाले व त्याअन्वयेंच तुमचे कुलीनपणाने जगांत येणे संभवनीय झालें. पुढे तुमचे संगोपन, शिक्षण वगैरे सर्व कायद्याच्या बंधनामुळे झाली. असे मनुष्याच्या सर्वतोपरी उपयोगी पडणारे जे आम्ही कायदे, त्यांच्या मुळावर आपल्या वर्तनाने तुम्ही घाला घालण्यास कसे प्रवृत्त होतां ? कायदा जे काम करावयास सांगेल ते केलेच पाहिजे, हेच नागरिकांचे कर्तव्यकर्म नाहीं का ? कायदा पाळण्याच्या सद्गुणाचे तुम्हींच इतके दिवस गोडवे गायलेत ना ? आतां तुमच्यावर कायद्याचा अनिष्ट परिणाम होऊ लागल्याबरोबर तुम्ही आम्हाला झुगारून देणे रास्त होईल काय ? शिवाय जर आमचा अंमल तुम्हाला सुखावह वाटत नव्हता तर तुम्हाला शहर सोडून जाण्याची मुभा होती. परंतु तुम्हाला तर आमचे साम्राज्य आवडत होते. जरी तुम्ही अथेन्स खेरीज दुसऱ्या राज्यव्यवस्थेची तारीफ करीत होता, तरी तुम्ही आपले सत्तर वर्षांचे आयुष्य येथेच घालविलें; आपला संसार येथेच केलात; येथल्या व कायद्याच्या अंमलाखाली आपले इतके दिवस सुखासमाधानाने गेले. तुमच्या येथे राहण्यानें, येथे संसार करण्याने तुम्ही अथेन्सचे कायदे पाळण्याचा प्रत्यक्ष करार केला नाही काय ? व आतां तुमच्या मते तुम्हाला अन्यायाने शिक्षा झाली म्हणून तुम्ही मुळी कायद्याच्या मुळावरच घाला घालावयास लागला, याला काय म्हणावें ? कायदा मोडण्याने तुम्ही तिहेरी पापाचे धनी होत नाही काय? आम्ही तुम्हाला गुरूसमान, तेव्हां यांत गुरूची अवज्ञा होते.<noinclude>{{center|२८}}</noinclude> owma7mzf47lwlmw4sisqd1li9wkfvps पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/३५ 104 110022 229378 228803 2026-04-18T08:10:55Z सुबोध कुलकर्णी 1231 /* मुद्रितशोधन */ 229378 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="सुबोध कुलकर्णी" />{{right|'''साक्रेटिस.'''}}</noinclude>आम्ही तुमचे संगोपन व पालनकर्ते, तेव्हां यांत कृतघ्नपणाचा दोष येतो. व शेवटी तुमचा आमचा करार झालेला तेव्हां यांत करार मोडण्याचा दोष येतो. शिवाय, खटल्यास सुरुवात होण्यापूर्वी कायद्याप्रमाणेच तुम्हाला हा देश सोडून जाण्याची मुभा होती. त्या वेळी जे करणे तुमच्या हाती होते ते तुह्मी केले नाहीत व आमच्या निकालावर विसंबून राहिलां. तुम्हाला तुमचा निरपराधीपणा शाबीत करण्याचीहि पूर्ण मुभा होती. अशा सर्व गोष्टीची तुह्माला सलवत असताना तुमच्याकडून त्यांचा अवलंब झाला नाही व आतां तुमच्याविरुद्ध निकाल झाल्यावर तुम्ही देशांतर करण्याचे मनांत आणतां, याला काय ह्मणा ? समजा, तुझी दुसऱ्या देशांत पळून गेलांत तर तेथे तुम्हाला या पुढे सुख लागेल काय ? तुमच्याकडे लोकवांकड्या नजरेनेच पाहणार. तुम्ही कायद्यांना धाब्यावर बसविणारे, असेंच लोक समजणार. सुव्यवस्थित राज्य पद्धतीच्या देशांत तुमाला लोक राहूं देणार नाहींत. कारण, तुम्ही आपल्या वर्तनाने अशा व्यवस्थेविरुद्धच बंड केल्यासारखें होईल व या आपल्या पळपुट्या वर्तनाने तुम्ही तुमच्या प्रतिपक्षीयांच्या म्हणण्याचे समर्थनच कराल, थेसलीसारख्या अव्यवस्थित व बेबंदशाई देशांत कदाचित् तुम्हाला राहूं देतील; परंतु तेथे तुमी काय करणार ? सद्गुण, न्यायीपण', सुव्यवस्थितपणा व कायदापालन यांविषयीं तुह्मी तेथे बोलणार काय? परंतु या गोष्टींचा तेथे गंधहि नाही. शिवाय, तुमच्या ह्मणण्याला कोण मानील ? कारण, तुमच्या प्रत्यक्ष वर्तनाने तुह्मीं या गोष्टी जीवापेक्षां व सुखनिवासापेक्षा कमी महत्त्वाच्या आहेत असे दाखविले आहे. तेव्हा थेसलींत तुह्मांला सन्मान्य शिक्षक ह्मणून राहतांच येणार नाही तर लोकांचा दास व खुषमस्कऱ्या अशा तऱ्हेनेंच रहावे लागेल व अशा वागण्यांत जर तुम्हाला सुख वाटेल तर तुमच्या आजपर्यंतच्या सदगुणच्या गौरवाच्या गप्पा होत असें लोक समजणार नाहीत काय? तेव्हां साक्रेटीस आह्मी ह्मणतो त्याचा विचार करा. आही कायद्यांनीच तुमचे सर्वस्वीं संगोपन केले आहे. तरी मुलाबाळांचा विचार करूं नका, आपल्या जीवाचा विचार करूं नका, किंवा न्यायापलीकडे दुसऱ्या कोणत्याहि<noinclude>{{center|२९}}</noinclude> ef7p5vde1jh5bis6lhgljjyba91mi3v पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/३६ 104 110023 229380 228804 2026-04-18T08:12:34Z सुबोध कुलकर्णी 1231 /* मुद्रितशोधन */ 229380 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="सुबोध कुलकर्णी" />'''तीन तत्वज्ञानी.'''</noinclude>बाबतीचा विचार करूं नका ? तुम्ही अशा तऱ्हेनें वागलांत तरच तुह्माला स्वर्गातील न्यायाधीशापुढे उजळ माथ्याने उभे राहतां येईल व आपले संरक्षण योग्य प्रकारे करता येईल. हे अगदी उघड आहे की, तुमच्या पळपुट्या वर्तनाने तुमाला किंवा तुमच्या मित्रांना इहपरलोकीं मुळीच सुख होणार नाही, किंवा तुमचे आयुष्य उन्नत किंवा पवित्र होणार नाही. आतां तुही जर मेलांत तर लोक असें ह्मणतील की, अथीनियन लोकांनी साक्रेटिसास अन्यायाने शिक्षा दिली; परंतु तुमच्या विरुद्ध त्यांना चकार शब्दहि काढतां येणार नाही. परंतु जर तुम्ही अशा लज्जास्पद रीतीने अन्यायाची अन्यायाने फेड केलीत व वाईटाची वाईटाने फेड केलीत आमच्याशी केलेले करारमदार मोडलेत व ज्याच्या घाताचा विचार तुझी स्वप्नांतहि कधी आणूं नये त्या तुमच्या मित्रांचा, तुमच्या देशाचा व आमचा घात तुह्मीं केलात तर आह्मी तुमच्या जीवांत जीव आहे तो तुमच्यावर रुष्ट राहूं व तुह्मी मेल्यावर आमचे परलोकचे कायदेबंधु प्रेमाने तुमचे आदरातिथ्य करणार नाहीत. कारण, त्या कायद्यांना समजेल की, पृथ्वीवर असतांना तुम्ही आपल्या हातून होईल तितकी कायद्याची पायमल्लीच केलीत. तेव्हां तुम्ही आमचे म्हणणे ऐका. क्रिटोच्या मनधरणीकडे लक्ष देऊ नका !"
{{gap}}प्रिय क्रिटो ! हे कायद्यांचे शब्द माझ्या कानांत सारखे गुणगुणत आहेत असे मला वाटते व यामुळे मला दुसरें कांहीहि ऐकू येत नाहीं व म्हणूनच माझें मन वळविण्याचा तुमचा प्रयत्न अगदी व्यर्थ आहे ! तरी सुद्धां जर तुम्हाला आपला हेतु साध्य वाटत असेल तर तुम्ही आपला प्रयत्न चालू ठेवा."
{{gap}}यावर क्रिटो म्हणाला " साक्रेटीस ! आपल्या म्हणण्यापुढे माझ्याने कांहींहि बोलवत नाही, मी कुंठित झालो आहे."
{{gap}}साक्रेटीस म्हणाला " प्रिय क्रिटो ! तर मग आपण हा वाद थांबवूया व ईश्वर जशी आपणाला प्रेरणा करीत आहे त्याप्रमाणेच वागू या."<noinclude>{{center|३०}}</noinclude> 6cplilqgfnr6iocos53px5svhfhm7el पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/३७ 104 110024 229381 228805 2026-04-18T08:14:56Z सुबोध कुलकर्णी 1231 /* मुद्रितशोधन */ 229381 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>{{center|(४)}} {{center|{{xx-larger|'''साक्रेटिसाचा मृत्यु.'''}}}} {{gap}}'''"नास्ति जीवितादभिमततरं किमपीह जन्तूनाम् ”''' ही बाणभट्टाची उक्ति किती यथार्थ आहे ! प्राणिमात्राला आपल्या जीवापेक्षा जास्त प्यारे काही नाही ! मातेचे पुत्रावरील प्रेम अत्यंत निरपेक्ष व प्राणापलीकडील असते असे आपण म्हणतो. परंतु खरी स्थिति एका हरिदासी गोष्टींत वर्णिलेल्या वानरीच्या स्थितीप्रमाणे आहे, यांत शंका नाही. एकदां एक वानरी एका पुरांत सांपडली, तेव्हां ती आपले मूल पाठीवर वेऊन एका उंच ठिकाणी जाऊन बसली; परंतु तेथेहि पाणी आल्यावर ती आणखी उंच ठिकाणी गेली, पण पाणी तितक्या उंच चढले, तेव्हां वानरीचा निरुपाय होऊन ती दोन पायांवर उभी राहिली, आणि आपल्या मुलाला तिने डोकीवर घेतले परंतु पाणी भराभर चढतच चाललें, व तिच्या गळ्यापर्यंत येऊन तिचा जीव गुदमरूं लागला, तेव्हां तिने आपले डोकीवरचें मूल काढून आपल्या पायांखाली घातले, व त्यावर उभी राहून पाण्यापासून आपला बचाव करूं लागली, पण व्यर्थ ! शेवटी त्या पुरांत वानरी व तिचे पिलूं या दोघांचाहि अंत झाला. तेव्हां सर्वांना आपल्या स्वप्राणापलीकडे प्रियतम काही नाही, हे खरे आहे, व हीच गोष्ट मनुष्यप्राण्यालाही लागू आहे. मनुष्याला जीवितासारखें दुसरें कांहीएक प्रिय नाही. '''"अंगं गलितं पलितं मुंडं, दशनविहीनं जातं तुंडम्"''' अशा जख्खड म्हाताऱ्यालासुद्धां जीवाची आशा सुटत नाही. एकाद्या इरसाल तिमाजी नाईकासारख्या चिक्कू माणसाला प्राणापेक्षां पैसा प्रिय आहेसा दिसतो; परंतु अशा तिमाजी नाईकापुढे जर यमराज खरोखरच दत्त म्हणून उभे ठाकले, तर त्याची<noinclude>{{center|३१}}</noinclude> j6mq8vrro0mmu41hd03e2uvbx9cp2kv पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/३८ 104 110025 229382 228806 2026-04-18T08:16:02Z सुबोध कुलकर्णी 1231 /* मुद्रितशोधन */ 229382 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="सुबोध कुलकर्णी" />'''तीन तत्वज्ञानी.'''</noinclude>घाबरगुंडी वळून तो तिमाजी नाईक आपली सर्व संपत्ति यमराजाला देऊन टाकून जीव घेऊन धूम ठोकीत घराची वाट धरील, यांतः शंका नाही. परंतु ज्याप्रमाणे प्राणिमात्राला समान असलेल्या षड्रिपूंवर आपली विवेकबुद्धि व मनोदेवता या दोन शक्तींच्या योगें मनुष्य विजय मिळवितो, त्याचप्रमाणे याच दोन शस्त्रांच्या सहाय्याने तो आपला अत्यंत प्रिय जीवहि आनंदाने सोडण्यास तयार होतो. खरी साधुवृत्ति अशा विजयातच आहे. व अशा साधुकोटी पैकीच साक्रेटिस होता, हे आतांपर्यंतच्या त्याच्या आयुष्यक्रमावरून आमच्या वाचकांना समजून आलेच आहे. आता या साधुपुरुषाचे मरणसमयीं वर्तन कसे होते हे त्याच्या आयुध्यांतील शेवटच्या दिवसाची साग्र हकीगत देऊन वाचकांना दर्शविण्याचा मानस आहे.
{{gap}}साक्रेटिसाला मरणाची शिक्षा झाली होती, हे वाचकांना स्मरत आहेच. परंतु अथेन्सच्या नेहमीच्या चालीप्रमाणे त्या संस्थानचे गलबत त्याच संघींत धार्मिक सफरीवर गेले. व ते परत येईपर्यंत साक्रेटिसाची शिक्षा तहकूब राहिली होती. तें गलबत परत आल्यावर दुसऱ्याच दिवशी साक्रोटेसाची शिक्षा अमंलांत यावयाची होती. यामुळ ज्या दिवशी संस्थानचे गलबत परत आल्याची बातमी शहरांत पसरली, त्याच्या दुसऱ्या दिवशी अगदी उजाडत साक्रोटसाची शिष्य मडळी व मित्रमडळी आपल्या पूज्य गुरूचे व मित्राचे शेवटचे दर्शन घेयाकारेतां व त्याच्या शेवटच्या संभाषणाचे पान करण्यासाठी तुरुंगाच्या बाहेर जमली. त्या दिवशी पहांटेलाच साक्रेटिसाच्या पायांतील बिड्या काढण्यांत आल्या होत्या. प्रथमतः साक्रेटिसाच्या बायकामुलांना आंत धाडण्यांत आले. साक्रेटिसाची बायकामुले फार रडू लागली, म्हणून साटिसाने लवकरच त्यांना परत लावून तो आपल्या आवडत्या शिष्यामित्र मंडळींत येऊन बसला, व आपल्या हाताने आपले पाय चोळीत चोळीत म्हणाला " मनुष्य ज्याला सुख म्हणतात, ती किती विचित्र वस्तु आहे! सुखाच्या उलट असलेले जे दुःख त्याच्याशी सुखाचा किती आश्चर्यकारक<noinclude>{{center|३२}}</noinclude> s2l2f1uxymx3rp7ylk3exapo7zfuh1q पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/३९ 104 110026 229383 228807 2026-04-18T08:16:57Z सुबोध कुलकर्णी 1231 /* मुद्रितशोधन */ 229383 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="सुबोध कुलकर्णी" />{{right|'''साक्रेटिस.'''}}</noinclude>संबंध आहे ! सुख व दुःख ही मनुष्याला एकदम मिळत नाहीत; परंतु सुखाचा पाठलाग करून ते माणसाने मिळविलें, की, त्याच्या मागोमाग दुःख आलेच म्हणून समजा ! जणूं काय सुखदुःख या दोन भिन्न वस्तूंची एका टोकाला गांठ बांधलेली आहे ! ही सुखदुःखांची सांगड जर ईसाबाने पाहिली असती, तर त्याने यावर एक अशी गोष्ट रचली असती, की, सुख-दुःखांचे भांडण होत असतां देवाने त्यांचा समेट करण्याचा प्रयत्न केला. परंतु हे त्याला साधले नाही, तेव्हां त्याने त्यांची टोकें एके ठिकाणी बांधिली, व म्हणूनच मानव प्राण्याला एक मिळाले की, दुसरें त्याच्या पाठोपाठ मिळणारच म्हणून समजावे. पहा, माझी अशीच स्थिति झाली आहे. माझ्या पायांतल्या बिड्यांमुळे आतांपर्य मला दुःख होत होते, परंतु त्या बिड्या काढल्याबरोबर दुःखाच्या मागोमाग सुख आलेच !"
{{gap}}असे म्हणून साक्रेटिसाने आपल्या सभोवार जमलेल्या मित्रमंडळीकडे दृष्टि फेंकली. तेव्हां त्या मंडळींत अथेन्सशिवाय इतर शहारांतले परकी गृहस्थहि आले आहेत, असे त्याला आढळून आले व त्यांपैकी सीन्स या गृहस्थाने प्रथमतः बोलण्यास सुरवात केली. तो म्हणाला ' अहो साक्रेटिस ! तुम्ही तुरुंगांत असतांना अपोलो देवांची प्रार्थना कवितेत केली, व ईसाबाच्या गोष्टींना पद्यात्मक स्वरूप दिले याबद्दल दोन दिवसांपूर्वी ईव्हीनस हा कवि मजजवळ चौकशी करीत होता. तरी कृपा करून याचे कारण आपण सांगाल काय?"
{{gap}}सॉक्रेटिस उत्तरला, " सीन्स, त्यांना खरें तेच सांगा. त्यांना म्हणावें आपल्याशी किंवा आपल्या कवितांशी स्पर्धा करण्याच्या बुद्धीने मी कविता केल्या नाहीत. तसे करणे कांही सोपें काम नाही. परंतु नेहमीं नेहमी मला एक स्वप्न पडत असे, ते असे की, सॉक्रेटिस, काव्याचा अभ्यास करून काव्य रचा." या स्वप्नाचा मी नेहमी असा अर्थ घेत असे की. देव मला माझ्या अंगीकृत कामांत उत्तेजनच देत आहे. कारण मी आपले सर्व आयष्य अध्यात्मविद्येत घालविले आहे व अध्यात्मविद्या हीच सर्वांत<noinclude>{{center|३३}}</noinclude> 6r2kx2v4ljysu72ffh92rmfyrgu5scm पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/४० 104 110027 229384 228808 2026-04-18T08:17:59Z सुबोध कुलकर्णी 1231 /* मुद्रितशोधन */ 229384 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="सुबोध कुलकर्णी" />'''तीन तत्वज्ञानी.'''</noinclude>उच्चतम कविता आहे, अशी माझी समजूत होती. परंतु मी तुरुंगांत पडल्यानंतर हे माझं स्वप्न मला लौकिक अर्थाने काव्य करण्यास तर सांगत नाही ना असे वाढू लागले आणि म्हणून आपल्या मरणापूर्वी या लौकिक अर्थाने कविता रचून मी स्वप्नांतली आज्ञा पाळण्याचा बेत केला. तदनुरूप मी देवाची एक प्रार्थना रचली व मग मला कल्पित गोष्टी रचतां येत नाहीत, म्हणून ईसाबाच्या ज्या काही गोष्टी मला आठवत होत्या, त्यांनाच पद्याचे स्वरूप देऊन मी आपल्या मनाचे समाधान केले. तेव्हां सीन्स, तुम्ही ईव्हीनस कवीला हे सर्व निवेदन करा. व माझा त्यांना नमस्कार सांगून माझ्या पाठोपाठ येण्याबद्दल त्यांना माझ्या तर्फे विनंति करा. कारण अथीनियन लोकांच्या इच्छेप्रमाणे मी आज प्रयाण करीन असे दिसते."
{{gap}}भाषण ऐकून सीमियस आश्चर्याने म्हणाला, " सॉक्रेटिस, ईव्हीनसला आपला कोण विलक्षण उपदेश हा ! मी त्याला पुष्कळ वेळां भेटलो आहे व त्यांच्याबद्दल मला जी माहिती आहे, तीवरून मला असे वाटते की शक्य असेल तेथपर्यंत ईव्हीनस आपल्या उपदेशाप्रमाणे खात्रीने वागणार नाही!"
{{gap}}सॉक्रेटिसाने विचारले, "काय, ईव्हीनस हा तत्वज्ञानी नाही काय?"
{{gap}}सीमीयस उत्तरला,"होय, तो आहे असे मला वाटते."
{{gap}}सॉक्रेटिस म्हणाला, " तर मग ईव्हीनस मरणाची इच्छा करील व ज्याला ज्याला म्हणून तत्वज्ञानाच्या अभ्यासाची गोडी आहे, तो तो अशीच इच्छा करील. मात्र तो आत्महत्या करणार नाही. कारण असे करणे पाप आहे असे म्हणतात."
{{gap}}इतके बोलून सॉक्रेटिसाने आपले पाय खाटेवरून जामनीवर ठेवले. व राहिलेल्या सर्व संभाषणाच्या वेळी तो असाच बसून होता.
{{gap}}नंतर सीन्सने सॉक्रेटिसाला विचारले, " सॉक्रेटिस, आत्महत्या करणे वाईट, पण तत्वज्ञानी मरणाऱ्या माणसाच्या लागोपाठ जाण्यास इच्छा करील असे आपण म्हणतो, याचा अर्थ काय ?<noinclude>{{center|३४}}</noinclude> 94iufpstk6s3dv63rdvx6oo8580dec2 पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/४१ 104 110028 229385 228809 2026-04-18T08:19:03Z सुबोध कुलकर्णी 1231 /* मुद्रितशोधन */ 229385 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="सुबोध कुलकर्णी" />{{right|'''साक्रेटिस.'''}}</noinclude>{{gap}}सॉक्रेटिस म्हणाला, तुम्ही दोघेजणांनी फायलोलासजवळ जाऊन या गोष्टीबद्दल ऐकले नाही काय ?"
{{gap}}" निश्चित असें कांही ऐकले नाही."
{{gap}}"बरें, मलाही सांगोसांगीच ठाऊक आहे. तरी पण मी जे ऐकलें आहे, ते तुम्हांला सांगावयाला काय हरकत आहे ? खरोखरी जर मी परलोकाच्या प्रवासाला निघण्याच्या तयारीत आहे, तर त्या प्रवासाच्या स्वरूपाबद्दल व त्या प्रवासाबद्दल बोलणे रास्त नाही काय ? आतांची वेळ व सूर्यास्त यांमधल्या काळाचा यापेक्षा जास्त चांगला सद्व्यय आपण काय करणार?"
{{gap}}" तर मग साक्रेटिस, आत्महत्या करणे वाईट असे ते कां म्हणतात? थीन्स शहरी असतांना असे करणे चांगले नाही, असें फायलोलॉस म्हणतांना मी ऐकले आहे, हे अगदी खरे आहे. दुसऱ्यांच्या तोंडूनही मी तेच ऐकले आहे, परंतु कोणाकडूनही मला निश्चयात्मक असें कांहीएक कळले नाही."
{{gap}}सॉक्रेटिस म्हणाला, " तुम्ही धीर सोडतां कामा नये. कदाचित कधी काळी तुम्हांला काही तरी निश्चयात्मक कळेल. दुसऱ्या नियमांना अपवाद असतील, परंतु या नियमाला अपवाद नाही. तुम्हांला आश्चर्य वाटत असेल, ते असे की, वाईट गोष्ट केव्हां केव्हां व कांहीं कांहीं माणसांच्या बाबतीत चांगली होते. परंतु मरणाला मात्र ही गोष्ट लागू नाही. ज्या माणसांनी मरणे बरे, त्यांनी देखील आपल्या हातांनी आपल्यावर मरण आणता कामा नये, त्यांनी त्याकरतां दुसऱ्याची वाट पहात राहिले पाहिजे."
{{gap}}हंसत हंसत व आपल्या प्रांतिक भाषेत सीस म्हणाला, "खरेंच."
{{gap}}सॉक्रेटिस म्हणाला, " खरेंच. अशा तऱ्हेचे विधान तुम्हांला विचित्र वाटल. तरी पण ते सयुक्तिक आहे. आणि या विधानाला एक सयुक्तिक कारणही दाखविता येईल. पण मनुष्यप्राणी हा एका प्रकारच्या तुरुंगांत आहे व तेथून त्याने आपली मुक्तता करून घेता कामा नये, अथवा तेथून<noinclude>{{center|३५}}</noinclude> sbw927bcx1z813hfh7z907guxz05tj7 अनुक्रमणिका चर्चा:तीन तत्वज्ञानी.pdf 107 110127 229356 229254 2026-04-17T12:24:30Z सुबोध कुलकर्णी 1231 /* duplicate book? */ Reply 229356 wikitext text/x-wiki == duplicate book? == @[[सदस्य:QueerEcofeminist|QueerEcofeminist]] Looks like this is a duplicate copy of <nowiki>https://mr.wikisource.org/wiki/अनुक्रमणिका:तीन_तत्त्वज्ञानी.pdf</nowiki> Please check and advice. [[सदस्य:कल्पनाशक्ती|कल्पनाशक्ती]] ([[सदस्य चर्चा:कल्पनाशक्ती|चर्चा]]) ११:४४, १४ एप्रिल २०२६ (IST) :शीर्षक नीट न दिल्याने एकच पुस्तक दोनदा अपलोड केले आहे. या प्रतीतला दुरुस्त केलेला मजकूर [[अनुक्रमणिका:तीन तत्त्वज्ञानी.pdf]] यातील पानांवर हलवणे योग्य होईल असे वाटते. केलेले काम वाया जाऊ नये. [[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) १७:५४, १७ एप्रिल २०२६ (IST) 4ldrq5spln14qh9zap5yxsyil3qght9 पान:धडपडणारी मुले खंड १ ला.pdf/४२ 104 110170 229389 2026-04-18T10:05:29Z ~2026-23920-17 6005 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "घडपडणारींमुले ३८ बाहेरोलद्दीतेतीकरून घनघान्यविंतिलानटत्रून क्रुस्यांफ्’ळांनींतिलाइंसवून द्रुष्काळाकरूंदूक्षाआम्हीभ् ॥ ह्यदयांतीळ्हितेतीकस्का रचेह्रद्द्येचेमळेपि..." 229389 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="196.1.114.252" /></noinclude>घडपडणारींमुले ३८ बाहेरोलद्दीतेतीकरून घनघान्यविंतिलानटत्रून क्रुस्यांफ्’ळांनींतिलाइंसवून द्रुष्काळाकरूंदूक्षाआम्हीभ् ॥ ह्यदयांतीळ्हितेतीकस्का रचेह्रद्द्येचेमळेपिकवृन समानताप्रेमालानिर्मून सौख्याअणूंपूर||अळान्हो० ।। रोगराईतीकरुनिदूर घाणसक्कहिकदनिढूर स्वर्गनिर्मूतोयाफूवीचर बदल्’रूंसारानूसाआग्हीभां दिवसभरअसेकष्ठवभ्रून जाऊंघामाधूमहोक्का राचींमजनींजाऊंरफूप् भक्तींचाघरूंसूस्राआग्हीं° ॥ कमाँमध्येंल्फिद सेवेमध्र्येदिचानन्’॰'. नाहींअत्यफ्ग्ळांचाछंद नाहींक्तींक्का||आम्ही० ।। “गड्यांनौ! असे देवाचे मजूरतुम्होपुढेंव्हालअशौमीआशाघस्कायेर्थे वागतआहॅ. माझीद्दीआशाव्वर्थंनाहींनादवङणारट्र हौचआशाथङनदेवर्नि तुम्हांला जन्माला घातले. त्याची ती थोर आशा नाहीं ना धुळींतमिळवणारट्व परमेश्वरअनंतनिराशासहृन करतो. त्यट्याआसविद्रीण्यास अंत नाहीं. परंतु माझ्यासारख्यापामरांनाअढ्यामंगसहृनहोत नाहों.आफान्याहृदयांतकेळवकेया‘ अढ्याविंपल्लाझळालेल्यापाहाणेंयाढूनतोत्रवकटुदुऱ्खदुसरेंकोणतेआहेट्र “असो. अत्सांनामदेवबांसरींवाजवोल.तौऐछमगआपणजाऊंया.”<noinclude></noinclude> nfpr4lo0fb9487r23t854n7od7kubfs पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/३२ 104 110171 229390 2026-04-18T11:24:15Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229390 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( २४ )}}</noinclude>लक्षांत. माझें मन पहाण्यासाठीं स्वामींनी चुडालेचें रूप घेतलें. घ्या, स्वामीराज, पाहिजे तशी माझी परीक्षा घ्या."
{{gap}}राजा अशा संशयांत पडलेला पाहून चुडाला ह्मणाली:-
{{gap}}"अहो महाराजा, माझ्या प्राणेश्वरा, आपणाला संशय का वाटतो? मी आपली पत्नी चुडालाच आहे. आपण स्वप्नांत नाहीं."
{{gap}}"सांग, प्राणसखे सांग. तूं येथें कशी आलीस? तुझ्या या सुकुमार पायाला खडे खुपले नाहींत? माझ्या प्राणेश्वरी, तूं या उन्हांतून नेमकी कशी आलीस? मी येथें आहें हे तुला कसें कळलें?"
{{gap}}"महाराज, आपणाला आठवतच असेल कीं, मी आपणास वनांत जाऊं नये म्हणून परोपरीने सांगितलें. आपली आपणाला ओळख झाल्यावर रान अगर राजवाडा एकच. आपणाला उपरति झाली आहे तर आत्मबोध मनावर पक्का ठसवा. त्यासाठी वनांत जावयास नको. पण आपण तर मला झोप लागतांच तेथून निघालां. नंतर मी योगाभ्यास शिकलें व आपला गुप्तरूपानें शोध केला. आपणाला येथें पाहिलें. कर्माच्या कटकटीला आपण विटल्याचें पाहिलें. नंतर मी कुंभकाचा वेष घेतला. आणि आपणाला आत्मबोध केला. इंद्रादिदेवही मीच झालें होतें. ब्रह्मांड मीच दाखविलें. नंतर या दासीनें आपणाला कसाला लावण्यासाठी मदनिकेचें रूप घेतलें. पण आपण बिलकूल चळलां नाहीं. नंतर मीच पुरुषवेष घेतला. आपणामागें पुन्हां मदनिकारूपानें येऊन बरेंच बोलूनही पाहिलें. परंतु आपली पूर्ण समाधानवृत्ती पाहून आतां मी खरें रूप प्रगट केलें."
{{gap}}अहाहा! तो आनंद- त्यावेळचा पति-पत्नींचा-गुरु-शिष्यांचा ह्मणू पाहिजे तर- कोण वर्णन करील!
{{gap}}राजानें आनंदातिशयानें चुडालेला मांडीवर बसविलें.
{{gap}}"चुडाला- धन्य माझी चुडाला! मी अधोगतीच्या खाड्यांत पडत असतां, कष्टांची परवा न करतां, निश्वयानें मला त्या खाड्यांतून वर<noinclude></noinclude> 277tadc4vgjt5m0l40rwa7505lr8mcl पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/३३ 104 110172 229391 2026-04-18T11:33:33Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229391 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( २५ )}}</noinclude>काढणाऱ्या माझ्या देवते, तुला काय म्हणूं? आहाहा, व्यवहारिक नात्यानें मी तुझा गुरु ना? पण- काय माझ्या गुरुदेवते! तुला मी काय संबोधूं! छे! चुडाला हा माझा देह जरी मी तुजवरून ओंवाळून टाकला तरी याची फेड होईल काय ! नाहीं इतकेंच नव्हे तर या शरीराच्या कातड्याचे जोडे जरी सात जन्म तुझ्या पायीं घातले तरीसुद्धां मी तुझ्या ऋणांतून मुक्त होणार नाहीं. चुडाले माझे चुडाले! म्यां मूढानें तुला काय ग दुरुत्तरें केलीं? हा गुरु टाकून गुरु शोधण्यासाठीं मी वनांत आलोंना! पण माझ्या चूडालेनें तेथेही उडी घेतली. चुडाले कर- आपली ओटी पुढें कर. माझ्या अनंत अपराधांनीं तुझी ओटी मला भरू दे. पण नाहीं, मी तुझे पाय धरून क्षमेची याचनाच केली पाहिजे. माझी चुडाला दयेची खाण आहे. मला क्षमा करीलच."
{{gap}}असें ह्मणून राजा तिच्या पायांवर मस्तक ठेऊन पडला. "चुडाले, हा देह तुझा तुझ्या पायांवर घातला बरें. पण छे, हा मुळीं पहिला तुझाच आहे."
{{gap}}राजा पत्नीकडे पाहून आनंदसागरांत पोहूं लागला.
{{gap}}"महाराज, आपणास स्वानुभव बाणलाना? महाराज, माझे उपकार कसले मानितां? महाराज, आपण व मी दोन कोठें आहोत! महाराज, आपणच आपल्या पायांतला कांटा काढला, तर हाताचे आभार कां मानायला पाहिजेत! तें असो. पण आतां तरी आपली आपणास ओळख पटलीना?
{{gap}}"होय, चुडाले होय."
{{gap}}पण महाराज, आतां आपला हेतु काय!
{{gap}}"कसला हेतु चुडाले! हं समजलों. आतां हा देह पडेपर्यंत राजमंदिरांत असला काय किंवा स्मशानांत राहिला काय मला दोन्ही सारखेच वाटतें.
{{gap}}"चला महाराज, तर मग नगरांत चला. पूर्वीसारखेंच आपलें राज्य चालवा. प्रारब्ध आहे तें भोगून सारूं या.{{nop}}<noinclude></noinclude> 7ett15063i7daem3wq2580gsqx2ofn2 पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/३४ 104 110173 229392 2026-04-18T11:41:32Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229392 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( २६ )}}</noinclude>{{gap}}"बरें आहे चुडाला; परंतु माझें एकच मागणे आहे. चूडाले, तुझा सहवास मला नित्य असावा. मी राज्यसिंहासनावर बसलों कीं तेथे माझी चुडाला पाहिजे.
{{gap}}चुडाला हंसत हंसत ह्मणाली:- "महाराज, काय हरकत आहे! होईल, तसेच होईल.
{{gap}}चुडालेला इच्छा होतांच काय उशीर! चतुरंग सेना तयार झाली. राजाला वस्त्राभूषणे घालून व त्याच्यासह रथांत बसून चुडाला शहरांत निघाली. प्रधान मंत्री वगैरे सामोरे आले. नगरजनांनी राजाराणीला पंचारत्या ओवाळल्या. राजा दरबारांत आल्याची बातमी हां हां झणतां पसरली. नजराणे घेऊन अनेक राजे आले होते. शिखिध्वज राजानेही त्यांचा योग्य सत्कार करून त्यांना देणग्या दिल्या. पुढे राज्यकारभार न्यायानें हांकून आपल्या प्रजेला सुखी व संतुष्ट केलें. कित्येक वर्षे राज्य करून दोघांनी देहत्याग केला. या प्रमाण हैं वसिष्टानें श्रीरामाला सांगितलेलें चुडालेचें पवित्र व सुंदर चरित्र आहे.
{{gap}}माझ्या वाचक भगिनींनो, आज तुह्मांला चुडाले सारखे षड्रिपूंपासून पतीचे रक्षण करण्यास इतके कष्ट, इतकी यातायात करावी लागणारच नाहीं. तिने पतीला मायामोहाच्या, अहंकाररूपी व्यसनाच्या तडाक्यांतून ओढून काढिलें तसें केलेत तर फारच स्तुत्य; निदान आज तुह्मी (असतील तर) पतींच्या शरीराची अब्रूची, नाश करणारीं जीं दुर्व्यसनें समाजांत धिंगाणा घालीत आहेत; तीं सुटण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे पतीचें आरोग्य वाढेल. आरोग्यवाढीबरोबर आयुष्यवृद्धि ठरलेलीच. शिवाय, करमणुकीच्या वेळीं तुह्मीं चुडालेसारख्यांच्या कथा- आर्य-स्त्रियांच्या उज्ज्वल अशा कथा- वाचण्याचा परिपाठ ठेवाल तर ते संतोष व सुखदायक होय, असें मी समजेन.
{{rule|5em}}{{nop}}<noinclude></noinclude> 4tq91lvz279iqcx1v8e6jbsj9xfywtl पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/३५ 104 110174 229394 2026-04-18T11:55:09Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229394 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>
{{center|{{x-larger|'''पतीचें सत्व राखणारी चांगुणा'''}}}} {{rule|7em}}
{{gap}}पूर्वकाळीं कांतिनगरीत श्रियाळ राजा राज्य करित होता. तो अत्यंत शूर, सत्यवचनी, दाता आणि उदार असा होता. सुदैवाने त्याला पत्नी- छे! पत्नी कशाची- रत्नच तें! अमूल्य रत्न! होय! अमोल रत्नच अशी लाभली होती! किंबहुना श्रियाळापेक्षां पुढें येणाऱ्या गोष्टींत चांगुणेसच जास्त महत्त्व दिलें पाहिजे.
{{gap}}भक्ताला देव नेहमीं कसोटीला लावून पहात असतो. तशीच कसोटी चांगुणेची व श्रियाळाची घेण्याची देवांनी गोष्ट घडवून आणिली. तो भाग ओघानेच पुढे येणार आहे. परंतु त्यापूर्वी त्यांची थोडीशी माहिती वाचकांना देऊ या.
{{gap}}चांगुणेस फारा नवसासायासानें एकच मुलगा झाला होता. त्याचे नांव चिलया. राजवैभवांत रुळत असलेल्या चांगुणेच्या पोटी झालेल बालक सुंदर असणारच. परंतु त्याहीपेक्षां आश्चर्य हे कीं तो चिलया अत्यंत बुद्धिमान व सद्गुणी होता. उघडच आहे. "शुद्धबीजापोटी फळे रसाळ गोमटी" तें काय खोटें! छे! चांगुणेचा चिलया लहान असतांनांच तिनें त्याला नाना तऱ्हेच्या गोष्टी सांगाव्या. कधीं खोटें बोलूं नये. दुसऱ्याचे वाईट करूं नये हे त्याच्या मनावर फार उत्कट तऱ्हेनें बिंबविलें होतें. खेरीज आईबापांचें वर्तन त्याचे पुढे होतेच.
{{gap}}आपल्यांत अशी ह्मण आहे- होणार तें ब्रह्मादिकांसही चुकणार नाहीं. तेंच खरें.
{{gap}}एके दिवशीं नारद कैलासाला गेले होते. श्रीशंकर आनंदांत बसले होते. जवळच त्यांची बालकें षडानन व गजानन होतीं. देवी पार्वती<noinclude></noinclude> iavpqec09axpvyl231e3jdsvqm81l1x