विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.46.0-wmf.24 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/158 104 63428 229402 159050 2026-04-20T08:59:45Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229402 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१३० |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>विचारांत आणतां येते आणि ज्याची ज्याची आपण नुसती कल्पना करूं शकतों, त्या सर्व अस्तित्वाला आपण विश्व अशी संकलित संज्ञा देतो. आपण ज्यांना कायदे असें ह्मणतो, त्यांची व्याप्ति अशा विश्वापुरतीच असणार हे उघड आहे. याबाहेरील अस्तित्वांत नुसत्या कल्पनेनेंहि जर आपल्या मनाचा प्रवेश होत नाही, तर तेथे हे आपले कायदे आपण लागू कसे करणार? त्यांत घडून येणाऱ्या कार्यपरंपरेची तुलना करण्यास तिच्याशी सदृश अशी परंपरा आपल्या मनांतच तयार नाही. यामुळे अमुक कारण आणि अमुक त्याचे कार्य असें ठरविण्यास आपणांस कोणतेंहि साधन उपलब्ध नाही. यावरून जेव्हां कोणतीहि वस्तु नाम-रूप धारण करते, तेव्हांच ती कायद्याच्या हद्दीत येते असें उघड झाले. जेथे आपले मन पोहोचू शकत नाही, तेथें देश-काल-निमित्त या रेषात्रयीला अस्तित्व नाही; आणि जेथे या दोहोंचे अस्तित्व नाही, तेथें नाम-रूपहि नाही. यांतच आणखी एक गोष्ट आपोआप सिद्ध झाली; ती ही की, स्वतंत्र इच्छा असें मनाच्या काही विशिष्ट स्थितीस जे आपण नांव देतो, त्याला अस्तित्वच नाही. 'स्वतंत्र' आणि 'इच्छा' या दोन शब्दांचा संधि होणे, हे दोन शब्द एकत्र उच्चारणे ह्मणजे अर्थशून्य शब्द उच्चारण्यासारखेच आहे. 'स्वतंत्र' आणि 'इच्छा' हे दोन शब्द परस्परविरुद्ध अशा अर्थाचे द्योतक आहेत. इच्छेचें अस्तित्व कल्पनेवर अवलंबून आहे. कल्पना विश्वाने बद्ध आहे आणि विश्व देश-काल-निमित्ताने बद्ध आहे. अशा बद्ध वस्तुसंघांतून मुक्त-स्वतंत्र-इच्छा कशी निर्माण होणार? ज्या कोणत्याहि वस्तूबद्दल आपणांस ज्ञान झालेले असतें अथवा होण्याचा संभव असतो, ती प्रत्येक वस्तु आणि तें ज्ञान ही पूर्वीच्या निमित्तानेच उद्भवलेली असतात. ती निमित्तबाह्य ह्मणजे स्वतंत्र नसतात. जी वस्तु आज कार्यरूप आहे असें आपणांस वाटत असते, तिजवर दुसऱ्या काही वस्तूंचा आघात होऊन ती स्वतः कारणरूप होण्याचा संभव आहे. यावरून वस्तुनिर्मित ज्ञान स्वतंत्र नाही असे सिद्ध झाले. परंतु वस्तूच्या आघातामुळे ज्या मूलरूपाने हे ज्ञानाचे रूप धारण केलें, तें मूलरूप स्वतंत्र आहे. जेव्हां हे ज्ञान देश-काल-निमित्ताच्या हद्दीतून बाहेर जातें, तेव्हां तें स्वतंत्र होते; ह्मणजे आपल्या मूलरूपांत एकजीव होते. ते मूळचें स्वतंत्र आहे, पण देश-काल-निमित्ताने बद्ध होऊन वस्तु आणि ज्ञान या स्वरूपास येते व या देश-काल-निमित्ताचे अस्तित्व संपले, की त्याबरोबर त्याचे पारतंत्र्य नष्ट होऊन ते आपल्या स्वतंत्र मूलरूपास जातें.{{nop}}<noinclude></noinclude> slefdmkr3vx3g0y5aih7naez1nqe04g पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/159 104 63429 229403 159051 2026-04-20T09:02:53Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229403 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|१३१ }} {{rule}}</noinclude>{{gap}}या विश्वाची उत्पत्ति कोठून झाली, याचे अस्तित्व कशावर अवलंबून आहे आणि याचे पर्यवसान कोठे होणार, अशा प्रकारची प्रश्नपरंपरा नेहमी विचारण्यांत येत असते. तिचे उत्तर असें की विश्वाची उत्पत्ति पूर्णापासून झाली असून, बद्धता ही त्याची स्थिति-अस्तित्व-आहे, आणि पूर्वीच्या पूर्णावस्थेतच त्याचा लय होणार. यासाठी मनुष्यप्राणी पूर्ण आहे असे जेव्हां आपण ह्मणतो, तेव्हां आपल्या मनांत या अनंत अस्तित्वाच्या एका अत्यंत सूक्ष्म अशा भागाविषयींच बोलावयाचे असते, हे लक्ष्यांत ठेविले पाहिजे. आपल्या दृष्टीस पडणारे हे शरीर आणि हे मन, ही अनंत अस्तित्वांतील एका सूक्ष्म बिंदूइतकी आहेत. खुद्द हे सर्व विश्व, अनंत अस्तित्वाचा एक सूक्ष्म अंश आहे. आमचे सर्व कायदे, सर्व बंधनें, सर्व सुखें, सर्व दुःखें आणि सर्व आशा अतिशय विशाल झाल्या, तरी या बिंदुरूप विश्वाबाहेर जाऊ शकत नाहीत. आमच्या सर्व संस्कृती आणि विकृती या सूक्ष्म बिंदूंत सांठविल्या आहेत. तर मग यावरून हे सर्व विश्व, की ज्याला आपल्या चित्ताबाहेर अस्तित्व नाही- तें असेंच चालावें अशी अपेक्षा करणे, आणि स्वर्गसुख भोगण्याची इच्छा करणे हे किती पोरकटपणाचे आहे, याची तुह्मीच कल्पना करा. स्वर्गसुख ह्मणजे काय, तर याच जगाची सुधारून वाढविलेली दुसरी आवृत्ति. ज्यांना आपण कायदे- नियम- असें भपकेबाज नांव देतो आणि ज्यांवर या बिंदुरूप विश्वाचे अस्तित्व अवलंबून आहे असे आपण समजतो, त्यांवरून अनंत अस्तित्वाचे नियम ठरवू पाहणे, हे किती अशक्य आणि बालिशबुद्धीचे लक्षण आहे, याची तुह्मांस निःसंशय खात्री पटली असेल. या बिंदुरूप विश्वांतच अनंत काल कोंडलेले राहून यांतील पंकाचे पुनःपुनः चर्वण करण्याची ज्यांना इच्छा असेल, आणि ही इच्छा तृप्त करण्याजोगा सवलतीचा धर्ममार्ग ज्यांना हवा असेल त्यांची बुद्धि वठून गेलेल्या झाडासारखी आहे, असें तुह्मी निश्चित समजा. आपल्या चालू स्थितीहून उच्चतर स्थिति असणे शक्य आहे, ही कल्पनासुद्धा त्यांस शिवत नाही. चालू स्थिति हीच त्यांच्या दृष्टीने मानवी जीविताची इतिकर्तव्यता असते. स्वतःच्या अनंत रूपाचा त्यांस पूर्ण विसर पडलेला असतो. चालू क्षणी जी सुखदुःखें अनुभवास येतात त्यांहून कांही निराळी स्थिति असेल असे त्यांस स्वप्नांतहि वाटत नाही. रोज अनेक वस्तूंचा नाश होत आहे हे पाहूनहि त्याच वस्तु निरंतरच्या आहेत या कल्पनेची मिठी ते सोडीत नाहीत. तृष्णा, तृष्णा ह्मणून एकसारखे ते मृगजल पीत सुटतात. आपल्या बिंदुमात्र विश्वाच्या बाहेर अनंत अस्तित्व आहे, त्यांत<noinclude></noinclude> r59f0ofaui9mpyy94guky8v5sool7ip पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/160 104 63430 229404 159052 2026-04-20T09:07:42Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229404 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१३२ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>अनंत सुखकर वस्तु भरल्या आहेत, तेथें अनंत जीवांची वस्ती आहे, तेथे अनंत प्रकारचे कायदे, अनंत राष्ट्र आणि अनंत संस्कृती आहेत; आणि हे अनंत अस्तित्व सगळे आपल्या विश्वाच्या बाहेर आहे. यावरून आपल्या विश्वाच्या बाहेर आणखी किती विस्तार आहे याची काही अंशी तरी तुह्मांस कल्पना होईल; आणि येवढा मोठा विस्तार आपल्या स्वतःच्या अनंतत्वाचा एक लहानसा भाग आहे.<br>{{gap}}जर आपणांस खरें स्वातंत्र्य- मुक्ति- मिळवावयाची असेल तर या विश्वांत कोंडून घेऊन ती मिळणें नाही. ती मुक्ति या दृश्य विश्वात नाहीं; अगर ती अदृश्य स्वर्गातही नाही. तसेच ज्या ज्या ठिकाणी आपल्या कल्पनेची धांव पोहोचू शकते, अशा कोणत्याहि ठिकाणी जाऊन मुक्ति मिळणार नाही. तुह्मी कसल्याहि प्रकारच्या स्वर्गाची अथवा दुसऱ्या एखाद्या लोकाची कल्पना केली. तरी जेथे आपल्या कल्पनेस अवसर आहे, ती जागा आपल्या विश्वांतच अंतर्भूत होणार; आणि विश्व तर देश-काल-निमित्त या रेषात्रयीने बद्ध आहे. आमच्या या जगाहून आणखी काही निराळ्याच प्रकारची जगें असूं शकतील; तेथे येथल्याहून कांहीं अधिक सुखकर वस्तु असतील; परंतु जोपर्यंत त्यांचे अस्तित्व विश्वाबाहेर नाही, जोपर्यंत त्यांनी देश-काल-निमित्त ही त्रयी ओलांडली नाही, तोपर्यंत ती विश्वाच्या कायद्यांनी बांधलेली राहणारच. यासाठी मुक्तीची वाट या विश्वाबाहेर जाऊन शोधिली पाहिजे. ह्मणून विश्व जेथे संपतें तेथेच खऱ्या धर्ममार्गास आरंभ होतो. जोपर्यंत जीविततृष्णा आम्हास सोडून गेली नाही, आणि जोपर्यंत या क्षुद्र सुखांच्या कल्पनेने आपण लाळ घोटित आहों, तोपर्यंत मुक्तीचा मार्ग स्वप्नांतहि दिसण्याची आशा नको. यावरून हे निःसंशय सिद्ध होतें की मानवी जीविताचा खरा हेतु जी मुक्ति ती मिळण्याकरितां आपणांस, या विश्वाचा, या जगाचा, या स्वर्गकल्पनेचा, या देहाचा, या मनाचा, या चित्ताचा आणि जें जें ह्मणून मर्यादित असेल त्याचा सर्वथा त्याग केला पाहिजे. ज्या क्षणी इंद्रियजन्यसुखाची ही आसक्ति नाहीशी होईल, त्याच क्षणी मुक्ति आपणांस माळ घालील. ज्या शृंखलांनी सध्या आपण बद्ध झालो आहो. त्या तोडण्याचा मार्ग एकच. कल्पनेने जेथें प्रवेश करतां येतो त्याचा त्याग करा, कल्पनातीत व्हा, ह्मणजे तुह्मी मुक्तच आहां.<br>{{gap}}'कल्पनातीत व्हा' हे ह्मणणे सोपे आहे; पण करणे अत्यंत कठीण आहे. हजारों मनुष्यांपैकी एखादा त्या मार्गास लागतो, आणि अशा हजारों मार्गस्थां-<noinclude></noinclude> mfarv29ewkmkkp9d2ycb19xbm9yanda पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/161 104 63431 229405 159053 2026-04-20T09:11:54Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229405 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|१३३ }} {{rule}}</noinclude>पैकी एखादाच त्यांत यश मिळवितो. ''''मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये । यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्वतः॥'''' अशी वस्तुस्थिति आहे. कल्पनातीत होण्यास आमच्या तत्ववेत्त्यांनी दोन मार्ग सांगितले आहेत. एक 'नेति' आणि एक 'इति.' पहिला मार्ग निषेधरूप असून दुसरा विधिरूप आहे. यांपैकी पहिला निषेधरूप मार्ग अत्यंत दुर्गम आहे. अद्वितीय मनस्थिति आणि प्रचंड इच्छाशक्ति ही ज्यांस प्राप्त झाली असतील, त्यांनाच त्या मार्गात पाऊल टाकणे शक्य आहे. कोणतीहि सुखेच्छा नुसती उत्पन्न झाल्याबरोबर हे ह्मणतात, 'जा, तुझी मला जरूर नाही;' आणि त्यांचे मन व शरीर त्यांची आज्ञा अक्षरशः पाळितात. पण इतक्या प्रचंड शक्तीचे लोक कितीसे असणार? असे लोक क्वचितच असतील. यासाठी प्रायः सर्व मनुष्ये दुसऱ्या मार्गाचाच स्वीकार करितात. जगांतील सर्व बंधने पाहून त्यांजबद्दल विचार करून आणि त्याच बंधनांचा उपयोग स्वतःस करून घेऊन ते बंधनमुक्त होतात. कांट्याने कांटा काढून शेवटी जसे दोन्ही कांटे फेंकून द्यावयाचे, त्याप्रमाणे एक प्रकारच्या बंधनांनी दुसऱ्या प्रकारची बंधनें तोडून शेवटी दोहोंतूनहि सुटावयाचे. हा मार्गहि वस्तुतः त्यागाचाच आहे. त्याचेंहि पर्यवसान शेवटी 'नेति' या मार्गातच होते; पण ते फार हळू हळू होत असल्यामुळे फारसे कष्टप्रद होत नाही. जगांतील वस्तूंकडे पाहून, त्यांजबद्दल विचार करून, त्यांचा उपभोग घेऊन आणि त्यांजपासून प्राप्त होणाऱ्या सुखाची खरी योग्यता काय आहे, याचा अनुभव घेत घेत त्यांजपासून हळू हळू मनास परावृत्त करावयाचे असा हा 'इती'चा मार्ग आहे. पहिला मार्ग विवेकप्रधान असून दुसरा कर्मयोगाचा आणि अनुभवप्रधान आहे. पहिल्या मार्गाला ज्ञानयोग असेंहि नांव आहे. यांत पूर्ण विवेकाने कर्मसंन्यास करावयाचा असतो. ह्मणजे कोणतेंहि कर्म करावयाचें नाहीं असा बुद्धीचा निश्चय विवेकानें करावयाचा. दुसऱ्या मार्गात कोणतेंहि कर्म करणे सोडावयाचे नसते. विश्वांतील प्रत्येक प्राण्याला कोणत्याना कोणत्या प्रकारचे तरी कर्म करावेच लागते. ज्यांचे मन स्वतःच्या ठिकाणींच पूर्ण संतुष्ट असते त्यांची मात्र गोष्ट निराळी आहे. आत्मज्ञानाशिवाय त्यांना दुसऱ्या कशाचीहि वासना नसते. यामुळे स्वस्वरूप सोडून त्यांचे मन बाह्य जगांत कधीहि भटकत नाही. बाह्य वस्तूंपैकी कशाचीहि अपेक्षा उरली नसल्यामुळे ज्यांची बुद्धि अंतर्मुखता कधीहि सोडीत नाहीं अशा पुरुषांस मात्र कोणत्याहि कर्माचा अवलंब करण्याचे कारण नाही.<noinclude></noinclude> rbdlso2i6fe4af5n1ih9tt8lqw3bmj4 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/162 104 63432 229406 159054 2026-04-20T09:14:42Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229406 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१३४ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>याहून अन्यप्रतीच्या सर्व लोकांस कर्म करणे भागच आहे. ज्याप्रमाणे उंचावरून खोल दरीत पडणारा पाण्याचा झोत खाली पडल्याबरोबर प्रथम भोंवरा उत्पन्न करतो, आणि त्या भोवऱ्यांत चक्राकार फिरून नंतर पुढे जातो, तद्वतच मनुष्यप्राण्याचीहि गति आहे. मनुष्यप्राणी जन्मास आल्यापासून या संसाररूपी भोवऱ्यांत सांपडतो. त्यांत चक्राकार परिभ्रमण करीत असतां तो कोणाला बाप ह्मणतो, कोणाला भाऊ ह्मणतो, 'माझी कीर्ति, माझें नांव' असे ओरडतो आणि अनुभवाने शहाणा होऊन शेवटी आपल्या मुक्तस्थितीस परत जातो. सर्व विश्व नेहमी याच स्थितीत असतें. समजून अथवा न समजतांहि आपण सर्व जगद्रूपी स्वप्नांतून जागे होण्याचाच प्रयत्न करीत आहों. या संसाररूपी भोवऱ्यात जे जे अनुभव आपणांस प्राप्त होतात त्यांचा उद्देश हाच की त्यांच्या योगाने आपणांस त्या भोवऱ्यांतून सुटण्यास मदत व्हावी.<br>{{gap}}आपणांपैकी बहुतेकांस कर्मसंन्यास करता येणे शक्य नाही. आपणांस कर्माचा अवलंब केलाच पाहिजे. असें आहे, तर कर्म करता करतांच मुक्ति मिळविण्याचे साधन असेल तर ते आपणांस हवें आहे. कर्मयोगानें असें साधन आपणांस दिलें आहे. कर्मयोगाने आपणांस कर्मसंन्यासाचे रहस्य प्राप्त होते. आपणासभोंवतालचे सर्व विश्व कार्यरत आहे हे आपण नित्य पाहतो. या सर्व कार्याचा उद्देश काय? मुक्ति-स्वातंत्र्य हाच या सर्व कार्याचा अंतिम हेतु आहे. जगांतील अणुरेणूपासून तों हत्तीपर्यंत एकंदर सर्व प्राणी केवळ मुक्तीसाठीच धडपडत आहेत. या शरीरबंधांतून सुटावें, मनोबंधाचा त्याग करावा आणि आत्म्याला मोकळे करावें यासाठीच ही सारी गडबड आणि धडपड सुरू आहे. प्रत्येक वस्तूची गति पाहिली तरी तिचा हेतु हाच आहे. मुक्ति-स्वातंत्र्य- यावांचून दुसरा कोणताहि हेतु या गतीच्या मुळाशी नाही. सूर्य, चंद्र, पृथ्वी आणि इतर सर्व गोलसुद्धा बंधनातून मुक्त होण्याकरितांच भ्रमण करित आहेत. सशास्त्र ज्ञानाच्या अभावी आपणास अनंतकाल प्रवास करावा लागेल आणि अनेकवेळां ठोकरा खाण्याचा प्रसंग आपणावर येईल. परंतु कर्मयोगाचे रहस्य आपणांस बरोबर समजले, तर हा सर्व त्रास आपणांस चुकवितां येतो. कर्मयोग, हे कर्मरहस्य सांगणारे शास्त्र आहे. कर्म करीत असतां त्याचवेळी त्या कर्मापासून आपली शक्ति कशी वाढवावी आणि तिचा उपयोग मुक्तीकडे कसा करावा, याचे ज्ञान आपणांस कर्मयोगापासूनच प्राप्त होते. अनंत काल आपण कर्म करीत राहिलों तरी आपले कर्म अशास्त्र असेल तर आपली सर्व शक्ति अनाठायी खर्च होऊन मुक्तिपथाची एक<noinclude></noinclude> 5mgfezi9mkvdmlwjqsb38uxwuenjo9y पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/163 104 63433 229407 159056 2026-04-20T09:17:52Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229407 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|१३५ }} {{rule}}</noinclude>पायरीहि आपण चढलों नाही असे होते. रसायनशास्त्रामुळे जसे पदार्थांचा बरोबर उपयोग आपणांस समजून क्षुद्र पदार्थांपासून मोठी कार्ये आपण निर्माण करितों, अथवा पदार्थविज्ञानशास्त्रामुळे अल्पशक्तीने जशी प्रचंड कार्ये आपण लीलेने पार पाडितों, तसेंच कर्मयोगाच्या सशास्त्र ज्ञानाने इच्छाशक्तीची योग्य संघटना करून आपण मुक्ति मिळवू शकतो. कर्मत्याग जर आम्हास अशक्य आहे, तर मग कर्म करून कर्मत्यागाचे पूर्ण फल मिळेल, अशी कांहीं युक्ति सांपडेल तर आम्हास हवी आहे. हे जग म्हणजे काही थोडासा वेळ विश्रांतीची जागा आहे, ही गोष्ट कबूल करणे भाग आहे. ही आपली निरंतर वस्तीची जागा नसून केवळ मधल्या मुक्कामाची जागा आहे हे प्रतिक्षणी आपल्या प्रत्ययास येते. येथून कोठे तरी दुसरीकडे जाणे आह्मांस भाग पडते. येथे राहून स्वातंत्र्य मिळणे शक्य नाही, ही गोष्टहि दरक्षणी आमच्या अनुभवास येते. जर आम्हास स्वातंत्र्य- मुक्ति पाहिजे असेल तर ती जगाच्या पलीकडे कोठे तरी शोधिली पाहिजे, हे उघड आहे. या जगाच्या बंधनांतून बाहेर पडण्याचा मार्ग हळुहळु पण निश्चयाने आक्रमिला पाहिजे. एकदम 'नेति' ह्मणून जगाचे सर्व पाश एकदम तोडणारे काही पुरुष असतील. ज्याप्रमाणे सर्प आपली कात टाकून मोकळा होतो, त्याप्रमाणे केवळ इच्छामात्रेकरून जगाची बंधनें टाकून मोकळे होणारे धीर पुरुष कांहीं थोडेसे असतील यांत संशय नाही. पण त्यांचा मार्ग बाकीच्या गरीब दुबळ्यांस कितपतसा उपयोगी पडणार? कर्म करता करतां मुक्ति मिळविण्याचा मार्ग त्यांस हवा आहे. हा मार्ग- हें कर्मरहस्य- कर्मयोगानेच आपणांस मिळविता येते. आपल्या प्रत्येक कर्मानें मुक्तिमंदिराची पायरी कशी बांधावी, हे रहस्य कर्मयोग आपणांस शिकवितो.<br>{{gap}}'सदोदित कर्म करा, पण तें अलिप्तपणे करा,' हे कर्मयोगाचे मुख्य सांगणे आहे. आपण आपली बुद्धि थोडी सूक्ष्म केली तर आपणांस असे आढळून येईल की, कर्म करता करतां आपण स्वतःस विसरून कर्माशीच एकजीव होऊन राहतो. हीच आपली पहिली मोठी चूक आहे. कर्म आणि आपण निरनिराळे आहों, ही भावना प्रथम दृढ केली पाहिजे. याच भावनेने आपण आपले मन स्वतंत्र ठेविले पाहिजे. आपणाभोवती अनेक प्रकारची दुःखें आणि संकटें आपण हरघडी पाहतो; परंतु जगाचे अस्तित्वच जर त्यांच्यावर अवलंबून आहे, तर त्यांजबद्दल अधिक विचार करून आपले डोके फिरविण्यांत काय फायदा आहे? ती अनंत काल अशीच राहणार आहेत. त्याचप्रमाणे<noinclude></noinclude> e2fz6p03qd92s67c4s5lwzo8rvc1nlq पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/164 104 63434 229408 159058 2026-04-20T09:23:20Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229408 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१३६ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>गरिबी अगर श्रीमंती हीसुद्धा थोडा वेळ टिकणारी आहेत. आमचे जे खरें अनंत अस्तित्व आहे, त्याशी या गरिबीचा, अगर श्रीमंतीचा, अगर लौकिक सुखाचा यत्किंचित्हि संबंध नाही. आमचे नित्य स्वरूप त्याच्या फार पलीकडचे आहे. येवढेच नव्हे, तर तें प्रत्येक दृश्यपदार्थापलीकडे आणि कल्पनेच्याहि पलीकडे आहे. ''''यतो वाचो निवर्तते अप्राप्य मनसासह''' असें तें आपले नित्यरूप आहे. त्या आपल्या मूळरूपास परत जाण्याचा मार्ग नित्य कर्म करीत असतांच आपणांस आक्रमावयाचा आहे. यासाठी आपण एक सिद्धांत नित्य लक्ष्यांत वाळगिला पाहिजे; तो हा की, ''''दुःखाची प्राप्ति कर्मामुळे होत नसून फलासक्तीमुळे होते.'''' कर्म आणि त्याचा कर्ता हे एकजीव होऊन राहिले ह्मणजे त्यापासून उद्भवणारी दुःखें भोगणें कर्त्यांच्या नशीबी येतेच येते. परंतु कर्म आणि कर्ता हे वेगळे झाले, तर कर्मापासून उद्भवणाऱ्या सुखदुःखाशी कर्त्याचा काही संबंध उरत नाही. दुसऱ्याच्या एखाद्या सुंदर वस्तूचा नाश झालेला पाहून तिऱ्हाइतास कांहीं दुःख वाटत नाही. पण तिऱ्हाइताची स्वतःची तसलीच वस्तु नाश पावली तर? तर तो ऊर बडवून घेऊ लागतो. वास्तविक त्या दोन्ही वस्तु सुंदर होत्या. अगदी एकसारख्याच सुंदर होत्या. परंतु एकीच्या नाशाने दुःख झाले नाही आणि दुसरीच्या नाशाने तें झालें. असें कां? याचे कारण पहिल्या वस्तूशी त्याचे मन संलग्न नव्हतें; ते मोकळे होते; पण दुसऱ्या वस्तूशी त्याचे चित्त एकजीव होऊन गेले होते. यामुळे तिच्या नाशाने त्याच्या चित्तास धक्का बसून तेथे दुःखाची उत्पत्ति झाली. 'मी'आणि 'माझें' या दोन शब्दांत साऱ्या जगांतलें दुःख सांठविले आहे. ही वस्तु 'माझी' अशी भावना झाल्याबरोबर तेथें आसक्ति उत्पन्न झाली व तिजबरोबर तिचेंच अपत्य जें दुःख तेंहि येणारच. 'मी' आणि 'माझें' ही भावना धरून कोणतेंहि कर्म केलें अथवा या भावनेने प्रेरित असा एखादा विचार आपल्या चित्तांत उद्भवला की तत्क्षणीच आपण त्या कर्माचे अगर त्या विचाराचे गुलाम बनतों. तत्क्षणींच धन्याचे गुलामांत रूपांतर होते. 'मी' आणि 'माझे' या विचारानें आपलें चित्त तत्क्षणीच आपल्या भोंवतीं पडणाऱ्या शृंखलेचा एक एक दुवा घडवू लागते. 'मी' आणि 'माझें' हा विचार जसजसा वाढत जातो, तसतशी आपली शृंखला अधिक जड आणि कष्टप्रद होऊ लागते. यासाठी जगाच्या स्वरूपाकडे पाहून आनंद करा, आणि त्यांतून शिकण्यासारखें कांहीं असेल तें शिका; पण त्याच्या तडाक्यांत सांपडूं नका, असें कर्मयोगाचे<noinclude></noinclude> 8zmrk9e44ifcv2qr1fcgeidkfsvy9ga पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/165 104 63435 229409 159059 2026-04-20T09:28:07Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229409 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|१३७ }} {{rule}}</noinclude>आम्हांस सांगणे आहे. 'माझें' असें कांहींच म्हणूं नका. 'माझें' या शब्दाबरोबर दुःखाचें बीज पेरले जाते. मुलाच्या लीला पाहून आनंद करा, पण 'माझें' मूल म्हणूं नका. 'माझे घर, 'माझे' शरीर हेहि म्हणूं नका. 'माझे' हेच सर्व दुःखांचें आणि संकटांचे मूळ आहे. वास्तविक शरीर तुमचे नव्हे, माझे नव्हे आणि कोणाचेच नव्हे. सृष्टीच्या कायद्यास अनुसरून हजारों देह येतात आणि जातात. त्यांचे जाणे आणि येणे यांचे आपण नुसते साक्षी आहों. नुसत्या शरीराची खरी योग्यता ही भिंत अथवा हिजवरील तें चित्र याहून अधिक नाही. तर मग या मातीच्या गोळ्यास आपण इतके काय म्हणून चिकटावें? एखाद्या चिताऱ्याने चित्र रंगविले आणि तो पुढे चालता झाला, तर त्या चित्राचे त्यास स्मरणहि उरत नाही; पण तेंच जर त्याने 'माझे' चित्र असे म्हटले तर तत्क्षणीच त्याच्या भोवती एक नवा बंध उपस्थित होतो. बंधाबरोबर त्याचे सहचारी जें दुःख तें येणारच.<br>{{gap}}यासाठी कर्मयोग आपणांस कंठरवाने सांगतो की, 'मी' आणि 'माझें' या भावनेचा प्रथम त्याग करा. या भावनेवर थोडासा ताबा चालवितां येऊं लागला, की तेथे तसेच हट्टाने चिकटून राहून मनास या लाटेच्या तडाक्यांत जाऊ देऊ नका. असा ताबा ठेवून मग खुशाल जगांत जा आणि वाटतील तितकी कर्मे करा. वाटेल तेथे जा, आणि वाटेल त्या मंडळींत मिसळा. पाप तुह्मांस स्पर्शहि करूं शकणार नाही. कमळाचे पान पाण्यांत जन्मास येते आणि पाण्यातच राहते; पण पाणी जसें त्यास चिकटून राहू शकत नाही, तसेंच तुमचा ताबा तुमच्या मनावर आहे, तुह्मी त्याचे धनी आहांत, तोपर्यंत पाप आणि दुःख तुह्मांस स्पर्शहि करूं शकणार नाहीत. यालाच वैराग्य असें ह्मणतात. 'साधकाची वृत्ति असावी उदास।' ह्मणून संतांनी जो उपदेश केला आहे, ती उदासवृत्ति हीच. उदासवृत्ति पूर्ण बाणल्यावांचून कर्मयोगच काय, पण कोणताहि योग साध्य होणे शक्य नाही. अनासक्ति ही सर्व योगांचा मूळ पाया आहे. पण उदासवृत्ति ह्मणजे काय, याची कल्पना प्रथम बरोबर असली पाहिजे. कोणी घरदार सोडून अरण्यांत जाऊन आणि नुसती लंगोटी लावून कंदमुळे भक्षून राहिला, ह्मणून तो खरा उदासी असेलच असे नाही. त्याची हांव फक्त त्याच्या शरीरापुरतीच असू शकेल; आणि त्यामुळे त्याच्या धडपडीचे क्षेत्र आकुंचित झालें इतकेंच. उदासीनता या शब्दानें शारीरिक सुखदुःखाचा बोध होत नसून ती केवळ मानसिक स्थिति आहे. 'मी' आणि 'माझें' या बंध-<noinclude></noinclude> 6x9y4fw633dpz431edr7qpmtd7da19x पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/166 104 63436 229410 159060 2026-04-20T09:33:03Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229410 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१३८ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>नाचा वास बाह्य देहावर नसून त्याच्या आंत आहे. बाह्य वस्तु आपल्या मनाशी जोडून देण्याचे काम इंद्रियद्वारा देह करितो इतकेंच. पण त्यापासून जें बंधन प्राप्त होते ती सांखळी आंतच तयार होते. यासाठी 'मी' आणि 'माझे' ही भावना जाऊन बाह्य पदार्थाचा व आपला संबंध तुटला, तर आपण उदासीन होऊ. एखादा मनुष्य राजा असून आणि सर्व भोग भोगूनहि उदासीन असू शकेल; आणि दुसरा एखादा लंगोटी लावूनहि अत्यंत आसक्त असू शकेल. यासाठी. प्रथम उदासवृत्ति बाणली पाहिजे; आणि नंतर सदैव कार्यरत असले पाहिजे. ही उदासीनवृत्ति आपल्या अंगी कशी आणावी याचा कर्मयोगानें बराच खुलासा होतो; तथापि ही स्थिति साध्य करणे मोठे बिकट काम आहे.<br>{{gap}}कर्मयोगाने मुख्यतः दोन मार्ग सांगितले आहेत. एक मार्ग निरीश्वरवादी लोकांकरितां आहे. ज्यांना परमेश्वराचे अस्तित्व मान्य नाही अथवा त्याबद्दल ज्यांच्या वृत्ती साशंक आहेत आणि परमेश्वराचे आपल्या कार्यात आपणांस साहाय्य मिळते अशी भावना ज्यांच्या चित्तांत उत्पन्न होत नाही, अशा लोकांकरितां एक मार्ग कर्मयोगाने आंखून दिला आहे. त्यांनी स्वबुद्धीनेच सदैव कार्यमग्न असावें. स्वतःस सुचेल अथवा बरा वाटेल असा मार्ग त्यांनी स्वीकारून कार्यरत रहावें. त्यांची स्वतःची सदसद्विवेकबुद्धि हाच त्यांचा मोठा आधार. अशा रीतीने कार्यमग्न असतां मनाने मात्र त्या कार्यात चिकटूं नये. मन अगदी मोकळे ठेवावें. 'मला यांतून सुखदुःखाची अपेक्षा करावयाची नाही' असे त्यांनी सदोदित चिंतन ठेवावें. कार्य करीत असतां फल काय येईल याची चिंता न करितां बऱ्याचे सुख अथवा वाईटाचे दुःख मानू नये. ज्यांचा परमेश्वराच्या अस्तित्वावर पक्का भरंवसा आहे, त्यांच्याकरितां कर्मयोगाने दुसरा मार्ग सांगितला आहे. हा मार्ग पुष्कळ सोपा आहे. अशा मनुष्यांनी सदैव उद्योगरत राहून सर्व कार्य 'कृष्णार्पण' ह्मणावें. कार्याचें जें कांहीं फळ येईल तें 'माझें' नव्हे, तर 'परमेश्वराचें' आहे, असे त्यांनी सदोदित चिंतन करावे. जें कांहीं करावयाचें तें सारें परमेश्वराप्रीत्यर्थच करावयाचे. स्वतःच्या सुखासाठी ह्मणून कांहीं करावयाचेंच नाही असा पक्का निर्धार असावा. जे काही पहावयाचे, ऐकावयाचे अथवा दशविध इंद्रियांनी जे काही करावयाचें तें सर्व परमेश्वरासाठी. कांही चांगले काम त्यांच्या हातून घडले तर त्याबद्दल स्वतःच्या स्तुतीचा शब्दहि ऐकावयाचा नाही. कारण तें कार्य परमेश्वराचे ह्मणून स्तुतीसहि तोच पात्र आहे. आपण ह्मणजे निवळ परमेश्वराचे नोकर अथवा हस्तक असून तो<noinclude></noinclude> o1d3wely9zo7yn81rlos4gcpiy5vn7m पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/167 104 63437 229411 159061 2026-04-20T09:39:12Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229411 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|१३९ }} {{rule}}</noinclude>आपल्याकडून स्वतःची कर्में करवितो आणि अमुक करावे असे आपल्या मनांत येतें, तो त्याचाच हुकूम अशी दृढभावना त्यांनी धरिली पाहिजे. ''''यत्करोषि यदश्रासि यज्जुहोषि ददासि यत् । यत्तपस्यसि कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणं ॥'''' असा हा कर्म योगाचा दुसरा मार्ग भगवान् श्रीकृष्णांनी गीतेत सांगितला आहे. कर्ता करविता सर्व परमेश्वर आहे, मग आपण सुखदुःखांनी स्वतःस व्यर्थ शीण कां करून घ्यावा? अशा विचाराने भक्तांनी सदोदित संतुष्टवृत्तीने राहिले पाहिजे. त्यांनी आपले शरीर आणि आपले मन भगवंतास अर्पण केले पाहिजे. मोठमोठे अग्नि प्रदीप्त करून त्यांत आहुती देण्यापेक्षा हा महायज्ञ करा. हा शेवटास गेला की, ज्ञानजलाच्या अवभृथस्नानाने तुह्मी मुक्त व्हाल. 'या जगांत आढळणाऱ्या वस्तु, बऱ्या, वाईट अगर उपेक्ष्य असोत, त्या सर्व त्याच्या आहेत. मला त्यांपैकी कांहींच नको' असे आपण सदोदित आपल्या चित्तांत वागवू या. ही सवय सदोदित राहिली ह्मणजे ती हळु हळु स्वभावरूप होऊन तिचा प्रवेश आनखशिखाग्र आपल्या देहांत होईल; आपल्या रोमरोमांत ती पक्की भिनून जाईल. इतकी स्थिति झाल्यावर मग हातघाईच्या लढाईत प्रवेश करून, आपल्या प्रचंड कडकडाटाने मेघराजाला लाजवू पाहणाऱ्या तोफांच्या तोंडावर आपण चाल करून गेलों, तरीहि आपली मनःशांति आपणांस सोडून जाणार नाही.<br>{{gap}}सामान्य व्यवहारांत ज्याला आपण कर्तव्यकर्म असें म्हणतो ती कर्मयोगाच्या दृष्टीने अगदी खालची पायरी आहे. अशी कर्तव्ये आपणा सर्वांच्या मागें रोजची लागलेली आहेत. कर्तव्य कर्तव्य म्हणून रोजची कामें करीत असतां, त्यांतच दुःखाची उत्पत्ति होते, असा आपणांस नेहमीं अनुभव येतो. अशावेळी त्या कर्माचे कर्तव्य हे रूप जाऊन तो एक रोगच आपणांस जडल्यासारखा होतो. आणि मग या कर्तव्यरोगाचे पाऊल एकसारखें पुढे पुढेच पडत जाते. जें जें कांहीं करावेंसें चित्तांत येतें तें तें सारें कर्तव्यच वाढू लागते. आणि या कर्तव्यभ्रमाच्या चरकांत आपण एकदां सांपडलों म्हणजे सर्व आयुष्य संपेपर्यंत त्यांतून सुटका होत नाही. कर्तव्यभ्रम हा आपल्या साऱ्या आयुष्याचे मातेरें करितो. भर उन्हाळ्यांतला माध्यान्हींचा सूर्य जसा वस्तु करपवून टाकतो तसा हा कर्तव्यभ्रम आपल्या सााऱ्या आयुष्याची होळी करतो. संसारचक्रांत पूर्ण सांपडलेल्या आणि कर्तव्यभ्रमानें गुलामाच्या स्थितीस पोहोंचलेल्या या पामरांकडे पहा! सकाळी उठल्यापासून त्यांची 'कर्तव्ये' त्यांच्या<noinclude></noinclude> 4ymvn99jmdql2emxgh4xzn5jevduiqb पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/३७ 104 110176 229396 2026-04-20T07:01:39Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229396 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( २९ )}}</noinclude>आईबापांवरही ताण. अहो, भाट काय कीर्ति गातीलच पण सारा मृत्युलोक त्याच्या कीर्तीनें दरवळतो आहे. आज मी जेथें जाई तेथे चांगुणा, श्रीयाळ, चिलया या शिवाय लोकांच्या तोंडीं गोष्ट नाहीं. जिकडे तिकडे हेंच."<br>{{gap}}"कां नारदा, फारशी स्तुति करतोस?"<br>{{gap}}"स्तुति कसली? माझ्या हातावर कांहीं त्यानं गूळ खोबरं नाहीं दिलं. किंवा त्याची कांहीं उपवर मुलगी नाहीं! बाकी असती हाणून काय ह्मणा! मी बालबह्मचारी. पण आपलं ऐकलं, व आपण विचारलंच ह्मणून सांगितलं,"<br>{{gap}}"हं! काय सांगितलं काय! सारा मृत्युलोक त्याच्या कीर्तीनें दरवळला! आमच्या देवललना त्याच्या बायकोच्या पासंगालाही पुरणार नाहींत!"<br>{{gap}}"होय, देवा हे खरंच आहे."<br>{{gap}}अत्यंत खवळून शंकर उठले. आपल्या जटा आपटीत ते झणाले:- "पहा नारदा पहा! हा मी निघालों त्या तुझ्या श्रियाळाचे सत्त्व पाहण्यास."<br>{{gap}}असें ह्मणून शंकरांची स्वारी निघून गेली. नारदही निघाले. पार्वती आई मनांत ह्मणाल्या 'हा कोठें गेला आणि कळ लावली नाहीं असं नाहींच व्हायचं. आतां पुढे काय होतं कुणास ठाऊक!'<br>{{gap}}"आहाहा!" धन्यच ती माऊली! धन्य तो बाळ! सुखी असोत बिचारीं! असें बोलत कांहीं ब्राह्मण चालले होते. इतक्यांत वाईट वेष धारण करून, वृद्धावस्थेनें कांपत, कोलमडत, गलित कुष्ठाची दुर्गंधी सोडीत शंकराची स्वारी राजद्वारीं येऊन थडकली. दारावरच्या पहारेकऱ्यांस ते लगेच खेकसून ह्मणाले:-{{nop}}<noinclude></noinclude> 2wwkwi79utmkgerknft1lll1cwpb1y2 पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/३८ 104 110177 229397 2026-04-20T07:05:51Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229397 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( ३० )}}</noinclude>{{gap}}"कायरे, हा दाता दाता ह्मणून ज्याचा डांगोरा पिटतात त्या श्रियाळाचाच ना वाडा! जा त्याला ह्मणावं दाराशीं अतिथी आला आहे."<br>{{gap}}हा प्रकार पाहून बिचारा पहारेकरीही चकित झाला. 'कुणीकडे महाराज नि कुणीकडे हे ओंगळ ध्यान! असें त्याला आश्चर्य वाटलें.<br>{{gap}}थोड्याच वेळांत राजा श्रियाळ बाहेर आला. त्याने नम्रपणे अतिथीला नमस्कार केला. परंतु त्याकडे दुर्लक्ष्य करून अतिथी महाराज ह्मणाले:- "कायरे राजा, तुझ्याच का कीर्तीचा पाढा सगळे ब्राह्मण वाचतात! वाहवारे विप्रप्रेम! अरे, मी केव्हांचा येथे उन्हांत तळमळतो आहे आणि तूं खुशाल चैनींत आंत बसला आहेस! हाच कांरे ब्राह्मणाचा तुझ्या दरबारीं सत्कार!<br>{{gap}}"दीन दयाळ! क्षमा करा. हा दास आपल्या सेवेला तयार आहे. चलावें वाड्यांत."<br>{{gap}}असें ह्मणून राजानें आपल्या दोन्ही हातांचा आधार देऊन त्यांना आंत नेलें. मऊशा आसनावर बसवून आपण नम्रपणे उभा राहिला. अत्यंत श्रमल्याप्रमाणें धांपा टाकीत ब्राह्मण बसला.<br>{{gap}}"महाराज, वारा घालतों आपल्याला." राजा नम्रपणे ह्मणाला.<br>{{gap}}ताबडतोब दहा पांच नौकर धांवलें. 'राजा बोले, दळ हाले,' स्वतः राजानेच अतिथीला हात धरून आंत आणल्यावर नौकरांची धांदल काय विचारतां? भराभर पंखे घेऊन नौकर ब्राह्मणास वारा घालूं लागले.<br>{{gap}}"राजा, तुझी दाता ह्मणून कीर्ती ऐकून मी एवढ्या लांब आलो. तूं वाचेनें देतों ह्मटलेंस कीं तें खरें केल्याविना रहातच नाहींस, असें लोक सांगतात."<br>{{gap}}"आपली कृपा महाराज. दुसरं काय? पण महाराजांना काय पाहिजे?"{{nop}}<noinclude></noinclude> 2i055mkgg2kgs2cj76f8pc540k2qnay पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/३९ 104 110178 229398 2026-04-20T07:12:00Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229398 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( ३१ )}}</noinclude>{{gap}}"अरे, ती मिळण्याची आशा असली तर सांगून उपयोग? काय पाहिजे! देशील काय?"<br>{{gap}}"होय महाराज. काय पाहिजे? एखादा गांव इनाम करून देऊं? सुवर्ण पाहिजे? दासदासी पाहिजेत काय? दिव्य रत्ने, हिरे यांपैकीं कांहीं देण्याचा हुकूम सोडूं? फार काय, हें राज्यही मागत असल्यास स्वामींना अर्पण करीन. इतकेंच काय, पण हा प्राणही खर्ची घालण्यांस मागें पुढें पाहणार नाहीं!"<br>{{gap}}"बस, बस. राजा असे बोलघेवडे मी पुष्कळ पाहिले आहेत. अरे, तोंडानें वल्गना तर खूप केलीस! बाबारे, मला ब्राह्मणाला राज्य घेऊन काय करावयाचे आहे? ते संभाळण्यास हातांत तरवार धरण्याचेंही माझ्या अंगीं सामर्थ्य नाहीं. मग ती गाजविण्याचे कोठून असेल? तूं तोंडाने बोललास यापैकीं मला कांहीं नको."<br>{{gap}}"आज्ञा करावी महाराज! तत्काळ देतों,"<br>{{gap}}"बाबारे, मला मांस- नरमांस- पाहिजे आहे!"<br>{{gap}}"जशी आज्ञा." असें ह्मणून राजा निघाला.<br>{{gap}}"जशी आज्ञा! कसें चटकन् बोललास? ऐक, नरमांस खरें पण तें वृद्ध, रोगी, अशक्त, युद्धांत जखमी झालेला अशाचे नको."<br>{{gap}}"नाहीं महाराज." राजा उद्गारला.<br>{{gap}}"अरे ए, थांब थोडा- मला वाटलें होतें तितकें कांहीं तुला समजत नाहीं. मी जर न बजावतों, तर तूं अशांचें मांस मला घालणार होतास, असें दिसतें. खरें ना?"<br>{{gap}}राजा मुकाट्यानें उभा होता.<br>{{gap}}"तुला एकदां सगळ्यांचा पाढा वाचू दे. अरे, त्याप्रमाणेंच चोर, जार, कैदी अगर कोणास बळजबरीनें धरून आणशील–"<br>{{gap}}"नाहीं महाराज. आपल्या राजीखुषीनें जो स्वदेह द्रव्य घेऊन विकील अशालाच आणतों."{{nop}}<noinclude></noinclude> 2vwlcvbdhapgeoulnkqp36qurkyramz पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/४० 104 110179 229399 2026-04-20T07:16:51Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229399 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( ३२ )}}</noinclude>{{gap}}"नाहीं- राजा! नाहीं. विकत घेतलेल्या माणसाचेंही मांस मला चालणार नाही"<br>{{gap}}"मग कोणाचें देऊ? मी आपलें देतों."<br>{{gap}}"अहारे! तूं काय मला खुळा समजतोस कारे? अरे, राजा प्रजेचा पालक तूं."<br>{{gap}}"माझें मांस मी आनंदानें देईन." हात जोडून दाराबाहेर येत देवी चांगुणा ह्मणाली.<br>{{gap}}"बाबांनो, तुह्मी दोघे याचकांचे मायबाप तुह्यांला मारल्यावर हे अवाढव्य राज्य, हें अन्नछत्र कसें चालेल? छे, तुह्मी दोघेही माझ्या उपयोगी नाहीं. त्याप्रमाणेंच मला पवित्र असें मांस पाहिजे."<br>{{gap}}"महाराज, मी मूढ आहे. आपणच मला सांगावें कोणाचें मांस देऊं तें."<br>{{gap}}"सांगतों ऐका. तुह्माला एकुलता एक सुकुमार असा मुलगा आहेना? बस. त्याचेंच मांस दे."<br>{{gap}}राजा व राणी चांगुणा यांच्या डोक्यावर जर आकाश कोसळतें, विजेचा धक्का बसता, हृदयावर इंद्राच्या वज्राचा आघात होता, तरीही बरें झालें असतें. तीं त्या दुःखद कल्पनेच्या आघातानें फार विव्हल झाली. तोंच गर्जना करीत ब्राह्मण ह्मणाला:-<br>{{gap}}"राजा, छे छे. थकलों बोवा! आज तुझ्याशीं गांठ पडली आहे. दुर्दैव माझें दुसरें काय? हा याचकाचा सन्मान करे? अरे, दोन शब्दांचेच काम! 'नाहीं' ह्मण. हा मी चाललों. मला का उद्योग नाहीं? कां, दाता तेवढा तूंच एकटा आहेस?"<br>{{gap}}राजानें अर्थपूर्ण नजरेनें पत्नीकडे पाहिलें. अहाहा! चांगुणेच्या धैर्यमेरूचें काय वर्णन करावें? तिनें नेत्रांनीं आपली संमत्ति दिली.{{nop}}<noinclude></noinclude> ko2m0z56jbilevnl4aohl30xplw854d पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/४१ 104 110180 229400 2026-04-20T07:22:52Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229400 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( ३३ )}}</noinclude>{{gap}}"महाराज, अतिथी विन्मुख जातां उपयोगी नाहीं! त्याला आसनावर बसवावें." राणी नम्रपणे ह्मणाली.<br>{{gap}}"दयाळा, नका हो उठू! माझा बाळ कोठें आहे? त्याला आणवितें, व आपली इच्छा पूर्ण करतें." चांगुणा ह्मणाली.<br>{{gap}}"राजा,कष्टानें नको रे माझी इच्छा पुरवू."<br>{{gap}}"नाहीं, महाराज आत्तांच जाऊन मी माझ्या तान्ह्यास घेऊन येतें. आपण जरा बसावें."<br>{{gap}}शाबास! चांगुणे शाबास! तुला मानवी स्त्री कसें म्हणावें? देवतांची देवता तूं अरेरे! तुजवर मुलाचा प्राण घेण्याकरितां त्यास बोलावून आणण्याचा प्रसंग! तो तूं पतीच्या सत्त्वाच्या रक्षणाकरितां आनंदानें रेटण्यास तयार व्हावेंस! हें अलौकिक सामर्थ्य देवतेवांचून कोणांत असणार?<br>{{gap}}चांगुणा आपल्या बाळाला आणण्यासाठी निघाली. ती एक दालन ओलांडते तोंच, 'रुणझुण' असा पायांतल्या तोरड्यांचा आवाज आला. पहाते तों चिलया धांवत तिच्याकडेच येत होता. आपल्या मातेच्या कमरेस आपल्या सुकुमार हातांनीं विळखा घालून कडेवर बसण्याची धडपड करूं लागला. मातेचे अंतःकरणास चटके बसूं लागले. बाळाला पोटाशी कवटाळून तिनें एक हुंदका दिला.<br>{{gap}}"आई, काय ग झालं?"<br>{{gap}}"बाळा नको, नको रे मला आई या नांवानं हाक मारूं! मी तुझी आई कशी?" असें बोलत भरून आलेलें अंतःकरण मोकळे करीत ती माता बाळाला घेऊन चालली होती. तिचे पाय उचलेनात. परंतु ती याचकाची मूर्ति दिसली की तिनें चार पावलें झपाझप टाकावीत. मुलगा 'तूं का रडतेस? तुला काय झालं?" असें विचारित होता. अतिथी<noinclude></noinclude> 2mn5stolr42dso6pj0dhddhuw84rt4d पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/४२ 104 110181 229401 2026-04-20T07:27:51Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229401 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( ३४ )}}</noinclude>होते तेथपर्यंत चांगुणा मुलाला घेऊन आली. आईची वेडी माया ती. तिला वाटलें मुलाला त्यांच्या पायावर घालावें. माझ्या बाळाला आशिर्वाद देतील. कदाचित् त्याचें हें सुंदर रूप पाहून त्यांना दया येईल. मग तरी ते त्याच्या ऐवजीं माझें मांस घेण्यास कबूल होतील पण काय!<br>{{gap}}"अरे राजा भुकेनें बाबा माझा जीव चालला रे! कुठे आहे तुझी थापाडी बायको? पोराचें मांस मला देतां कीं नाहीं? नाहीं तर मी आपला जातो तरी." असे म्हणतांच चिलयानें त्यांच्यां पायांवर आपलें तें लहानसें मस्तक ठेविलें.<br>{{gap}}"राजा, हाचका तुझा पोरगा? आतां तरी बिलंब नको. मला एकदां याचं मांस घालतों म्हटलंत तें घाल नाहीं तर मी जातो तरी."<br>{{gap}}"महाराज, माझं मांस का आपणाला पाहिजे? तात, मग कां हो उशीर? अहाहा! बाबा यांच्यापेक्षां देह सार्थकी आणखी कसा लागणार? बाबा, तुम्हींच ना नेहमी मला उपदेश करितां कीं, क्षत्रियाचं शीर हातावरच असावं म्हणून? बाबा, क्षत्रियानें मरणाला भिणें हें त्याला शोभत नाहीं ना? आईने मला हें सांगितलें आहे. बाबा, याच्यापेक्षां चांगलें मरण कशांत आहे? बाबा, आई मला नेहमी सांगते कीं, याचकांचे मनोरथ पूर्ण करणें हेंच आपल्या कुळाचं भूषण, हाच आपला धर्म आणि हेंच आपलं कर्मही पण. चल आई चल. यांचे मनोरथ पूर्ण कर. आई, तूं दुःख करूं नकोस. मला खरोखर यांत आनंदच वाटत आहे. माझं मन, आई तुला काय सांगू? किती उल्हसित झालं आहे? बाबांच्या व्रतपालनासाठी- आई, तुमच्या ब्रिदासाठीं- माझा देह खर्ची पडला, तर त्यांत मला फार संतोष वाटतो. आई, बाबा, तुम्हीच ना नेहमी मला सांगतां कीं, हा देह नश्वर आहे म्हणून. मग असा हा नश्वर देह सत्कारणी लावण्याचा प्रसंग आला असतां, मी माघार का घ्यावी? आई तूंच ना<noinclude></noinclude> jumeudsv43vfwz485md2girpz3s8eux पान:कृष्णाजी शामराव विरचित भाऊसाहेबांची बखर.pdf/१५५ 104 110182 229412 2026-04-20T09:47:44Z ~2026-24100-76 6006 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "१३८ भाऊसाहेंवघिळी नरवर. मीही व[चण[र नाहीं. तुमची सांगार्तांण होईन. ” म्हणोन बोलिळीं. मामलों" बळवतरपिं यांणीं उत्तर केले कीं, “ अप्पाराव मूल तेणते आहे, समागते येणें उचितनळाहृळी"॰”..." 229412 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="2401:4900:5021:1FAE:578B:B8D2:79F:4A18" /></noinclude>१३८ भाऊसाहेंवघिळी नरवर. मीही व[चण[र नाहीं. तुमची सांगार्तांण होईन. ” म्हणोन बोलिळीं. मामलों" बळवतरपिं यांणीं उत्तर केले कीं, “ अप्पाराव मूल तेणते आहे, समागते येणें उचितनळाहृळी"॰”हेऐकनस्त्रळीमें उत्तरदिले कीं, “त्यचिंप्रालव्घा असेलतेसें घडेल, त्याची आस्था कशळासणांहेजें? ” म्हणोन परस्परें बोहून बाहेर आले. १२२. [नंतर]नगार[करून, फौजसिद्ध करून, खंदक सौदून निपाल. , तोंदुराणी व रोहिले य[च"[ फौजते[दवशीं मारी चटून आळी. वळनतराव व प्गलचे यांचे युद्धास ताड लागले. मोठा प्रलय जाला. इरँचे कळाम. वहूत्तच कडनिकङ केली. परंतु रळोहिले व दुराणी यांणीं केवळ आगींनें पळून कळाढिडें". घुराची व रैर्तीचळी व घुरा’लेयाचीं गर्दी जाळी. कोणास फांहौ' दितेनळाते जाले. उमप दळतिळील यंत्रांचा एकत्र मा’डेमारझाला. घोर्डी मनुष्यें पुंदजार्ली. तो प्रळय मराटियांस सेंसिनासा जालळा. गनींम गोटाचे मुमारे' तडक पळीं लागले. त्या घुराळेयाचे गदं`॰[॰त्[ शिंदे होळकर यांस त्रुहँहिळी दितैनळाते जाले. फौज पळोन क्योंरँळिमयापविर्तो आला. तां शिंदे होळकर यांजवर मागून डेव्माळ गोळ्या पहूंलागल्या. र्तोतशांतकांहीं वाग्रूसुटला. त्याते युराळामना जाला. पाहातात तों रोहिळिलयांचीं धमघमियझी निलैंर्णि जाऊन र्पोचर्ली. घमघमि- याशळी' गेल्यावर चळर्वतराव यांणीं तोंड कळाय दाखवाते, म्हणोन माघारे पिग्रोंन मारामार केळी. दुराणी व रोहिल्याचे तोंड थोपून राहिले. तेसेंच पळळाले असते तरि दुराणी येऊन गोटांत शिरते. तसांत एकळाएकींच वळवंतराव यांचे आयुष्याची दोरी स्वर्गीचीं तुटळीं. आयुष्याच्या संग्रह सरला म्हणोन कुटुंबाचा ऋणलुव'घ पुरलळा. आयुष्याची मयोंदग् जाळी म्हृणोनगोंळी लागतांच घोडियावरच प्राण निघोन गेला. ठार होऊन घोडियारपातीं आले. तों दुराणीची गांठ पडली. त्यांणीं वळवंतराव यांचे र्शीर कळापावयास उरावर पाय देक्का गळयाचीं घाटळी सौडा’वैलळी. तों हैं अनुचित पाहुन खंडेराव नाद्देक निंबाळकर अकप्टुंर्फेकर यांणींकेवळसती पडताततेतेच त्यामुरयैवर जाऊनवर्पले. र्शिपायगिंरींची २०. “धुरळियांन गर्दीत” पुणें मत. म्भ्’ फांहों क्रायहँबिंतेंक्सिलेनाहों' नं० मन॰ २ ’. उमाळ् ( अत्तिशयनर्षाव )पुष्ऋ- ळ झा अर्यपुं’ " गाळ्यांचा उमाळ पहूं ळप्गळप् त० प्रत. वंद्पाळिव्त्वळो.’ क्र ० २४ निळाप्र्णे .. ॰ ”` म्प्‘ श्याश्या- खद्कळाच्या ` लाल वाजन प्रत [" तोफा लावण्यासळार्दी रचलेला मातीचा बांध, मारचप्- २५. उग्क्रळूज सालाफ्र जिल्ह्मांतअक्ति २६. ‘शत्रूवै अ'गावर ॰"पढोन सां’ मत,,<noinclude></noinclude> a9k8onzw583428f77c4nwueillvtify