विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.46.0-wmf.24
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
अनुक्रमणिका:आर्य-स्त्री-रत्ने.pdf
106
70411
229422
229393
2026-04-20T16:16:59Z
कल्पनाशक्ती
3813
229422
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=आर्य-स्त्री-रत्ने
|Language=mr
|Volume=
|Author=यशोदाबाई भट
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=यशोदाबाई भट
|Address=मुंबई
|Year=1917
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist 3="प्रस्तावना" 5="माझे दोन शब्द" 7="अनुक्रमणिका" 8 ="अभिप्राय" 9="पतीला उद्धारणारी चुडाला" 35 ="पतीचें सत्व राखणारी चांगुणा" 52="सुमती"/>
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=

[[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]]
47ezizy4bx56swela1ct2vilfs0ijk2
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/२५
104
110012
229424
229357
2026-04-21T05:22:06Z
JayashreeVI
4058
229424
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="सुबोध कुलकर्णी" />{{right|'''साक्रेटिस.'''}}</noinclude>प्रश्नपद्धतीचे ते आपापसांत अनुकरण करीत व या पद्धतीचा प्रयोग दुसऱ्यावरही करीत
{{gap}}"याप्रमाणे ज्या लोकांचे अज्ञान बाहेर पडे ते लोक आपल्यावर रागावण्याऐवजी मजवर रागावत व साक्रेटिस हा तरुणांना बिघडवितो, अशा प्रकारचा आरोप मजवर करीत. हे आरोप तुम्ही लहानपणापासून ऐकत आला आहांत व येवढ्याशा थोड्या वेळांत तुमचे दुराग्रह काढून टाकणे कठीण आहे. परंतु मी जे सांगितले आहे ते सर्व खरे आहे. मी कांहीं एक चोरून ठेवले नाही, किंवा काहीएक गाळले नाही. आहे तसे स्पष्टपणे सांगितले आहे व हा माझा स्पष्टवक्तेपणाच मला नेहमी भोवला आहे व आतांही तो भोवणार.

{{gap}}"आता मला देशाभिमानी मेलीटसकडे वळले पाहिजे, याचा आरोप असा आहे, "सॉक्रेटिस हा तरुणांना बिघडविणारा व शहरच्या देवतांवर भरंवसा न ठेवतां दुसऱ्याच देवतांवर भरंवसा ठेवणारा वाईट मनुष्य आहे." आतां मी तरुणांना बिघडवितों हा आरोप मेलीटसने फारसा विचार न करता केला आहे असें मी त्याची प्रत्यक्ष तुमच्यापुढे उलट तपासणी करून दाखवितो. (साकेटीस मेलीटसची उलट तपासणी न्यायाधीश सभेपुढे घेतो.) "अथीनियन लोकहो! पाहिलेत तुम्ही की मेलीटसने याविषयीं मुळीच विचार केला नाही, असें त्याच्या विसंगत विधानांवरून स्पष्ट होत आहे. तोच प्रकार दुसऱ्याही आरोपाचा आहे. त्यांतही सर्वस्वी विसंगतपणाच भरलेला आहे. परंतु तुमच्यापैकी कोणी विचारील 'साक्रेटिस! ज्या व्यवसायामळे तुमच्या जीवावर येऊन बेतली, असा व्यवसाय चालू ठेवण्याचे तुमच्या मनांत येते कसे? याला माझे उत्तर म्हणजे माझा सर्व आयुष्यक्रमच होय. कोणत्याही माणसाने आपले कर्तव्यकर्म आपल्या आयुष्याची पर्वा न करता केले पाहिजे. मी तीन वेळां तुमच्या सेनापतीच्या हाताखाली काम केले व या तीनही वेळां मी आपल्या जीवाकडे किंवा सुरक्षितपणाकडे पाहिले नाही. या प्रमाणे सेनापतीची आज्ञा पाळ-<noinclude>{{center|१९}}</noinclude>
06hrkxvhsh37ovftk59xrjg3jght1q5
229425
229424
2026-04-21T05:23:59Z
JayashreeVI
4058
/* प्रमाणित */
229425
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="JayashreeVI" />{{right|'''साक्रेटिस.'''}}</noinclude>प्रश्नपद्धतीचे ते आपापसांत अनुकरण करीत व या पद्धतीचा प्रयोग दुसऱ्यावरही करीत

{{gap}}"याप्रमाणे ज्या लोकांचे अज्ञान बाहेर पडे ते लोक आपल्यावर रागावण्याऐवजी मजवर रागावत व साक्रेटिस हा तरुणांना बिघडवितो, अशा प्रकारचा आरोप मजवर करीत. हे आरोप तुम्ही लहानपणापासून ऐकत आला आहांत व येवढ्याशा थोड्या वेळांत तुमचे दुराग्रह काढून टाकणे कठीण आहे. परंतु मी जे सांगितले आहे ते सर्व खरे आहे. मी कांहीं एक चोरून ठेवले नाही, किंवा काहीएक गाळले नाही. आहे तसे स्पष्टपणे सांगितले आहे व हा माझा स्पष्टवक्तेपणाच मला नेहमी भोवला आहे व आतांही तो भोवणार.
{{gap}}"आता मला देशाभिमानी मेलीटसकडे वळले पाहिजे, याचा आरोप असा आहे, "सॉक्रेटिस हा तरुणांना बिघडविणारा व शहरच्या देवतांवर भरंवसा न ठेवतां दुसऱ्याच देवतांवर भरंवसा ठेवणारा वाईट मनुष्य आहे." आतां मी तरुणांना बिघडवितों हा आरोप मेलीटसने फारसा विचार न करता केला आहे असें मी त्याची प्रत्यक्ष तुमच्यापुढे उलट तपासणी करून दाखवितो. (साकेटीस मेलीटसची उलट तपासणी न्यायाधीश सभेपुढे घेतो.) "अथीनियन लोकहो! पाहिलेत तुम्ही की मेलीटसने याविषयीं मुळीच विचार केला नाही, असें त्याच्या विसंगत विधानांवरून स्पष्ट होत आहे. तोच प्रकार दुसऱ्याही आरोपाचा आहे. त्यांतही सर्वस्वी विसंगतपणाच भरलेला आहे. परंतु तुमच्यापैकी कोणी विचारील 'साक्रेटिस! ज्या व्यवसायामळे तुमच्या जीवावर येऊन बेतली, असा व्यवसाय चालू ठेवण्याचे तुमच्या मनांत येते कसे? याला माझे उत्तर म्हणजे माझा सर्व आयुष्यक्रमच होय. कोणत्याही माणसाने आपले कर्तव्यकर्म आपल्या आयुष्याची पर्वा न करता केले पाहिजे. मी तीन वेळां तुमच्या सेनापतीच्या हाताखाली काम केले व या तीनही वेळां मी आपल्या जीवाकडे किंवा सुरक्षितपणाकडे पाहिले नाही. या प्रमाणे सेनापतीची आज्ञा पाळ-<noinclude>{{center|१९}}</noinclude>
pwxg124r3qx7xdfhdhhdtb9dwtx0ge2
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/२८
104
110015
229426
229362
2026-04-21T05:26:05Z
JayashreeVI
4058
229426
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="सुबोध कुलकर्णी" />'''तीन तत्वज्ञानी.'''</noinclude>व या उपकारांची खरी फेड म्हणजे आपल्याला आपल्या उतार वयांत शहराने आपल्या खर्चाने पोषण करणे ही होय असे सांगितले. परंतु मित्राच्या मुर्वतीखातर व न्यायाधिशाच्या समजुतीखातर साक्रेटिसानें तीस मिनींचा दंड देण्यास आपण कबूल आहो असे जाहीर केले.
{{gap}}मते घेतल्यावर असे दिसून आले की, पहिल्यापेक्षां पुष्कळच जास्त मताने सॉक्रेटिसास मरणाची शिक्षा देण्यात आली. ही शिक्षा ऐकून त्याला मुळीच वाईट वाटले नाही. मात्र आपल्याला अन्यायाने शिक्षा दिल्याबद्दल तुम्हांला पुढे पश्चात्ताप होईल असे सॉक्रेटिसाने भविष्य सांगितले.

{{gap}}शेवटी सॉक्रेटिस म्हणाला, " परंतु आतां वेळ झाली व आपण येथून निघाले पाहिजे, मी मरायला जाणार, आपण जगण्यास जाणार, पण आयुष्य जास्त चांगले किंवा मृत्यु जास्त चांगला, हे फक्त देवालाच ठाऊक ! ! !"
{{Css image crop
|Image = तीन_तत्त्वज्ञानी.pdf
|Page = 28
|bSize = 582
|cWidth = 143
|cHeight = 162
|oTop = 317
|oLeft = 204
|Location = center
|Description =
}}<noinclude>{{center|२२}}</noinclude>
32hkqt1v0pitolmaq66nys11odd0xwq
पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/४३
104
110183
229413
2026-04-20T15:35:07Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
229413
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( ३५ )}}</noinclude>मला गर्भात असतांना पुत्रधर्माचा घडा घालून दिलास? मला तूंच गुरूच्या ठिकाणी आहेस ना? माझ्या अंतःकरणांत ठसविलेला उपदेश तू आतां पाळ- चल, आई चल. हे महाराज खोळंबले आहेत."
{{gap}}अहाहा! ते बोल- त्या साध्वीच्या जणूं प्रतिबिंबाच्या तोंडचेच बोल- ऐकून अतिथी मनात द्रवला. परंतु अद्याप त्याला त्यांची पूर्ण परीक्षा पहावयाची असल्यानें, त्यानें आपले मन अधिकच कठोर केलें.
{{gap}}स्वारी पुन्हा गरगरां ढोळे फिरवू लागली. चांगुणेनें मुलाला कडेवर घेऊन आंत नेलें. त्याला आपल्या मांडीवर बसवून अनेकदां कुरवाळिलें. चुंबने घेतली. पोटाशी धरलें. त्याच्यावर अश्रुसिंचन केलें. जणुं काय, ती आपल्या लाडक्याला उष्ण अश्रूंनी शेवटचें नहाण घालीत होती!
{{gap}}वाचकहो, मातेनें बाळास मारावयाचें आहे. कसा धीर व्हावा? आपल्या पोराच्या पायांत बोंचलेला कांटा काढतांना सुई जोरानें लाववत नाहीं, मग हें व्हावें कसें? परंतु साध्वी स्त्रिया, सत्यवचनी स्त्रीरत्ने, पतीच्या जिवासाठीं, त्याच्या ब्रिदासाठी स्वतःचा जीव जाळून खाक करीत, त्यांना ही कठिण नव्हतें.
{{gap}}"आई रडूं नकोस- आई, तूंचना सांगत होतीस कीं, मरणाच्या वेळीं जी इच्छा असते तो जन्म येतो ह्मणून? झालं तर मग आई; मीही हीच इच्छा धरीन कीं, याच माझ्या आईच्या पोटीं मी जन्माला यावें. आई, तू दुःख करूं नको. मी पुन्हा तुझ्या पोटीं येईन. आई, आतां वेळ नको लावू ...........
{{gap}}"बाळा— माझ्या बाळा, मला आई कशालारे आतां ह्मणतोस! बाळा, आपल्या लेंकरावर सुरी घालणारी आई, ती आई कशाची! पण बाळा हा दुर्लोकिक लोकांत होईल! माझ्या पाडसा मी केवळ हे याचक राजवाड्या बाहेर जाण्याचीच वाट पाहीन. लागलींच मी तुझ्या मागोमाग<noinclude></noinclude>
oa81ygmfnayh3j94b8g3vzmc330kac0
पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/४४
104
110184
229414
2026-04-20T15:40:01Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
229414
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( ३६ )}}</noinclude>आलेच. बाळा, पाहिला, पुष्कळ विचार करून पाहिला. पण जर वचन मोडावं तर हे याचक मला तरी सामान्य दिसत नाहींत. ते आपणाला शापूनच बाहेर पडतील. बाळा, मग तशा तन्हेनें मरण्यापेक्षां सत्यासाठी, धर्मासाठी मेलेलें कांहीं वाईट नाहीं. ते सगळं खरं. पण काय करूं! माझ्या चिमण्या, तुझ्या या सुकुमार व सुंदर अशा देहाकडे पाहिलं कीं, हें कसे होईल असं वाटतं."
{{gap}}"आई, मी लवकर मोठा होऊन लढाईवर जाऊं लागलों, आणि रणांगणावर मला मृत्यु आला- तर- तर आई, तूं अश्रू ढाळशील काय? नाहीं, खचित ढाळणार नाहींस. उलट तुला संतोष होईल. तसंच आई बाबांच्या ब्रिदासाठीं तूं मला मार. आई, मला मुळींच दुःख होत नाहीं. आई, इतक्या लहान वयांत हें सर्व तूंचना मला शिकविलंस! मग आई, तुला काग इतकं कोडं पडलं! मी पुन्हा तुझा मुलगा होऊन खचित येईनग."
{{gap}}"होय बाळ. असें ह्मणून पुनःपुनः आपल्या लाडक्याला कवटाळून व त्याचीं वारंवार चुंबनें घेऊन त्या सत्वस्थ मातेनें घट्ट डोळे मिटले, आणि सुरी उगारली. पण- पण तिच्या हातांत शक्ति कुठें होती! ती खालींच पडली.
{{gap}}"अशी भिऊ नकोसंग आई. याचकांना विलंब होईल." पुन्हा देवि चांगुणेनें डोळे मिटले. मन दगडाहूनही कठोर कैलें. तोच त्या कोपिष्ठ याचकाचा चेहरा तिला डोळ्यापुढ़ें दिसूं लागला. त्यासरशी तिनें सुरी उगारली, क्षणांत चिलयाचें शीर धडापासून वेगळें झालें. तें शीर तें कमळ- कसें होतें! वाचकहो, त्या चांगुणेचा- त्या देवतेचाना तो कुसवा! त्या चेहऱ्यावर हास्यच विलसत होतें. तिकडे एकवार डोळे उघडून त्या मातेने पाहिलेसें केलें. तिला जबर मूर्च्छा आली परंतु त्यांतही तिला तो अतिथि दिसला. झालें. कर्तव्य हैं सारिलेंच पाहिजे. असें मनांत येतांच ती अर्धवट भानावर आली.{{nop}}<noinclude></noinclude>
qmfdj31mvenddrdvhv3bywj6glr7luy
पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/४५
104
110185
229415
2026-04-20T15:43:51Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
229415
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( ३७ )}}</noinclude>{{gap}}इकडे ब्राह्मणाचा तगादा लागलेला पाहून राजा स्वतः पाकशाळेत आला. तोच छिन्नविछिन्न होऊन पडलेला पुत्र, व त्या दुःखानें मूर्छित पडलेली पत्नी पाहून त्याला आलेला गहिंवर दाबून त्यानें ह्मटलें:- "उठ, चांगुणे उठ!"
{{gap}}पण छे! ती प्रबल मूर्छेंनें पडली होती. शेवटीं राजानें तिचें मस्तक आपल्या अंकावर घेऊन तिच्या डोळ्यांना पाणी लाविलें.
{{gap}}"चांगुणे, सावध हो, सावध हो. जें होणें अवघड म्हणून मला वाटत होतें तें माझ्यासाठी या अभाग्याच्या सत्वासाठीं तूं पार पाडलेंस. आतां याचकाचा शाप तरी कशाला? चांगुणे- माझ्या देवते चांगुणे, अतिथीला तृप्त करून नंतर आपल्या चिलयाच्या भेटीला जाऊं."
{{gap}}राणी सावध झाली. ती म्हणाली :- "चिलया,- महाराज, या पापणीनें तुमचा वंशमुकुट छिन्नविछिन्न- महाराज, तुमचं सत्व जाऊं नये, अतिथीनें क्रोधानें शाप देऊ नये, म्हणून हें माझं बाळ, तुमचं लेंकरूं मी त्याच्या पायावर घातलं हो!"
{{gap}}"नाहीं. माझे कुलभूषणे, सत्वस्थ चांगुणे मला असं कसं वाटेल? माझ्या लाडक्या चांगुणेचं हृदय लोण्याहूनही मृदु आहे, हें मला माहीत नाहीं काय? आहे! लाडके, आज याचक तृप्त होणार, तें माझ्या चांगुणेच्या धैर्यानं चांगुणेच्या स्वार्थत्यागानें! हें मी न जाणण्याइतका मूढ आहे कां? चांगुणे, शब्द मी दिला; पण पार तूं पाडलास. ऊठ ऊठ. आतां हें मांस ताटांत वाढून ते जाई तो आपण गप्प राहिलों की आपलं कर्तव्य संपलं."
{{gap}}चांगुणेनें तें मुखकमल उचललें, एकवार प्रेमानें त्याचें चुंबन घेतलें, व तें तसेंच पाहण्यासाठी ठेवून बाकीच्या शरीराचें मांस सोन्याच्या ताटांत ठेविलें व अतिथीला बोलवावयास तिने सांगितलें, तिच्या डोळ्यांतून वारंवार आसवे येतच होती!{{nop}}<noinclude></noinclude>
49jk01e3rtu476o0saj6jsqtgq6dbli
पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/४६
104
110186
229416
2026-04-20T15:48:15Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
229416
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( ३८ )}}</noinclude>{{gap}}राजाने ब्राह्मणाला बोलाविलें. अतिथि पाटावर बसला. त्याने क्षणमात्र ताटांतील मांसाकडे पाहून राजाला म्हटलें:-
{{gap}}"कायरे श्रियाळा, तूं काय माझी मस्करी चालविली आहेस काय? व्यवहारशून्या, मी काय व्याघ्रसिंहासारखा पशू म्हणून तूं माझ्यापुढें हे कच्चें मांस ठेवलेंस? हें पहा अशा अवहेलनेपेक्षां मला तूं साफ नाहीं म्हणतास, तर मला राग आला नसता, आणि वाईटही पण वाटतें ना."
{{gap}}दुःखावेगाने गहिवरलेला राजा हात जोडून म्हणाला:-
{{gap}}"महाराज, रागावूं नका. व्यवस्था करतों."
{{gap}}थोड्याच वेळांत मांस शिजवून आलें.
याचकाने त्याकडे पाहिलें. बराच विचार करून खेकसून म्हणाले "छे, छे! नको-नकोसा जीव झाला. राजा या ब्राह्मणाचें सामर्थ्य तुला ठाऊक नाहीं. अरे, ब्रह्मांड जाळून भस्म करीन!- ब्रह्मांड! बाबांनों, मला तुम्ही निव्वळ जटाधारी गोसावडा समजतां काय? कपटी तुम्ही महाकपटी आहां. या शरिरांत शीर मुख्य- तेंच तुह्मी- माझ्याशीं कपट करून ठेऊन या अपवित्र धडाचा पाक करून वाढलात! तें कांहीं नाहीं हा पहा मी चाललों- मला तुमच्या पाहुणचाराची गरज नाहीं! तुमच्यावर माझा बिलकूल विश्वास नाहीं बस्स. माझ्या देखत तुझ्या पत्नीनें तें शीर उखळांत घालून कांडावें. आणि यापुढे जर तुमच्या नेत्रांतून अश्रूंचा एक टिपूस जरी आला तरी मी अस्साच्या अस्सा- तुमचें तें मांस अपवित्र समजून निघून जाईन. बोल- राजा बोल. तुला हें कबूल आहे?
{{gap}}भक्तिपूर्ण चांगुणेला हा याचक कोणीतरी मोठा असावा, म्हणूनच त्यानें शीर ठेवल्याचें ओळखिलें; व असे महामुनि सहसा उगाच दुसऱ्याला त्रास देणार नाहींत परंतु हे आपली कसोटीच पहात आहेत, हें उमगलें असावें. याचसाठीं अतिथी म्हणतील ती गोष्ट करावयाची असा तिचा<noinclude></noinclude>
ajxdrd7hwr3ve1adr65q3dsesmfcqc3
पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/४७
104
110187
229417
2026-04-20T15:54:23Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
229417
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( ३९ )}}</noinclude>निश्वयच झाला. म्हणून जेव्हां राजा जास्तच चिंतातुर मुद्रेनें पाहूं लागला, तेव्हां तीच म्हणाली:-
{{gap}}"महाराज, ती चूक माझी आहे. आपण दयेचे समुद्रच आहांत. तरी या आपल्या कन्येला क्षमा करा व जरा थांबा. आपल्या आज्ञेप्रमाणें मी बाळाच्या शिराचा पाक करून लौकरच आपणांस वाढते."
{{gap}}"ऐकतोंच आहें. तुमच्या दर वेळच्या चुक्याच होत आहेत. पण माझ्या पोटांत खिळे कोंबले तरीसुद्धां पचतील, इतका भुकेनें काहूर केला आहेना? पण सांगितलेलं लक्षांत आहे ना? नाहींतर रडुन भेकून घातलेल्यापेक्षां मला मुळींच नसलेलं पुरवलं."
{{gap}}"नाहीं महाराज. आपल्या आज्ञेप्रमाणंच मी करितें," असें म्हणून चांगुणेनें आपलें सत्व राखण्यासाठी पदर कसला. तें मुख आणून अतिथी पुढे ती कांडूं लागली. अहाहा! त्यावेळी अतिथीसही आश्चर्य वाटलें कां? होय आश्चर्य वाटलें एवढेच नव्हे तर अंतःकरणांत त्याला अनुकंपा उत्पन्न झाली. परंतु जो जो भक्त कसोटीची एकएक पायरी वर चढेल, तो तो देवरायांना गांजणूकीच्या अधिक पायऱ्या रचण्याची इच्छा होते. आत्तांच पहा ना! चांगुणेनें महाकष्टानें दुःख दाबून कांडण आरंभितांच अतिथी म्हणाले:-
{{gap}}"काय ग चांगुणे, तुम्ही बायका दळतांना मंगलदायक गाणी गाता. ना? चांगुणे, तूं मग मुकाट्यानें कां बरं कांडतेस? अग माझ्यासारखा याचक, तुझ्यासारखी दाती सांग बरं केवढा अपूर्व योग! तेव्हां आनंदानं चार गाणी म्हण."
{{gap}}चांगुणा मनांत म्हणाली:- "आजचा माझा मंगलगीते गाण्याचा समयच हा!" परंतु तितक्यांत तिला वाटलें, खरंच, आम्ही बायका तरी काय, ज्यावेळी दळण दळवत नसेल, तें कसें तरी दळावयाचें तेव्हांच ना गाणी गातों? असें म्हणून तिनें गाणीं म्हटली:-{{nop}}<noinclude></noinclude>
kf06f5rleit85ztzzbd9nfbbrlpp3jp
पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/४८
104
110188
229418
2026-04-20T15:59:31Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
229418
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( ४० )}}</noinclude>{{Block center|<poem>अतिथि येऊन, मागे तुझें मांस ।
न होतां उदास देह देसी ॥ १ ॥
सत्वासाठीं तुला, स्वहस्तें कापिला ।
देह हा लाविला योग्य काजा ॥ २ ॥
तुझ्या भेटिलागीं मी बाळा येईन ।
जाऊं दे जेवून अतिथीशीं ॥ ३ ॥
उदरा येऊनीं सार्थक वा केलें ।
पित्याच्या राखिलें ब्रिदाशीं वा ॥ ४ ॥</poem>}}
{{gap}}चांगुणे धन्य! धन्य तुझी बाई! परंतु अद्यापि तुझ्या कसोटीच्या दोन पायऱ्या राहिल्या आहेत.
{{gap}}असो. अशा रीतीनें कांडणे होऊन त्याचा पाक बनवून तिनें भोजनाची तैयारी करून अतिथीला उठविण्यास सांगितलें.
{{gap}}चांगुणेला वाटत होते, आतां स्वारी आनंदानें भोजन करून जाईल व मग आपण लौकरच आपल्या लाडक्याच्या भेटीला जाऊं. पण छे! अतिथि गुरगुरत ह्मणाले:- राजा, तुह्मी क्षत्रियांनीं नुसत्या लढायाच माराव्या. शत्रूच्या माऱ्यापुढें आपल्या छातीचा कोट करून तूं कित्येकदां रणांगणावर उभा असशील! शत्रूला जेरीस आणण्याचे डावपेंच तुला माहीत असतील. परंतु व्यवहार नाहीं! मुळींच नाहीं! या चांगुणेपाशीं तरी त्याचे चार दिवस धडे घे. अरे मी तुझ्या दाराशीं आलों ह्मणून कायरे? माझी योग्यता तुला ठाऊक नाहीं? मी एकट्यानें कसें जेवावें? पंक्तीला यजमान नको काय? तेव्हां तूं ये. आणि हें पहा, आज या चांगुणेनं आम्हाला भोजन घालण्याचं सर्व श्रेय घेतलं आहे, तेव्हां तिलाही येऊ दे."
{{gap}}राजा, हें भाषण ऐकून दगडी पुतळ्याप्रमाणें निश्चल उभा राहिला. त्याला वाटलं, चांगुणा झाली ह्मणून काय झालं! आतां कांहीं या संक-<noinclude></noinclude>
j3muwyzma6eo62hwiolc4rgen41mgoq
पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/४९
104
110189
229419
2026-04-20T16:07:26Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
229419
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( ४१ )}}</noinclude>टांतून आपण निभावत नाहीं. परंतु तितक्यांत त्याची नजर तिच्याकडे जातांच तिनें, "कांहीं हरकत नाहीं." अशा अर्थाची खूण केली. इतकेंच नव्हे तर राजाचें व आपलें अशीं पानें वाढून घेऊन ती ह्मणाली:-
{{gap}}"महाराज, आपणांस इतकं संकट कां बरं वाटतं? चिलया आपलं बाळना? नाथा, मग पोटची वस्तु पोटांत घालण्यास काय हरकत! त्याचसाठी अतिथीचें मन मोडून आपल्या सत्वाची हानी होणार ना? चला महाराज, आपलं बाळ जाऊन पुनः अतिथि नाराज होऊन जातील असं करून तरी अधिक काय आहे!"
{{gap}}"ही बोलत आहे ही आपली लाडकी चांगुणाच का? कां आज साक्षात् लक्ष्मीनें इच्या अंगांत प्रवेश केला काय! अतिथींच्या एकेका आज्ञेनें माझं काळीज फाटून जातें. आतां यावेळीं खास माझी चांगुणा यांच्या आज्ञेच्या कचाटांतून तगणार नाहीं असं वाटतं होतं. परंतु ही तर आपणच होऊन सर्व गोष्टींस राजी होऊन उलट मला धीर देते! चांगुणे, अत्यंत कोमल अंतःकरणाचे चांगुणे, शाबास तुझी! आज मला तूं लाजविलंस!" राजाचे मनांत असे विचारतरंग उभे राहिले. परंतु पुनः स्वारीची तब्येत जावयाची, या धास्तीनें राजा उठून अतिथसिह पानावर बसला. आतां मात्र आपण निभावणार, अशा विचारानें त्यांचा जिव जरा हलका पडला. आतां फक्त घास घेण्याचंच राहिलें. तोंच अतिथीची स्वारी ताडकन् उठून म्हणाली:- "बरी लौकरच आठवण झाली ! कायरे राजा, खरंच • तुह्माला दुसरा मुलगा नाहीं ? मग नाईलाज. अरे खुळ्या, तुम्हां निपुत्रिकांची तोंडसुद्धां पाहूं नये. मग मजसारख्या ब्राह्मणानं अन्न ग्रहण कसे करावें! अशक्य, अगदीं अशक्य. जातों राजा, तूंच सांग निपुत्रिकाच्या घरीं अन्न घ्यावं का?"
{{gap}}अतिथि उठून दोन पावले टाकतात तोंच उभी राहिलेली चांगुणा धाडकन जमिनीवर पडली. तिनें आतांपर्यंत दगडापेक्षा कठोर केलेलें मन<noinclude></noinclude>
2l71g1cqeh71yqzn2ip3mzwtt4i5hv4
पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/५०
104
110190
229420
2026-04-20T16:12:02Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
229420
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( ४२ )}}</noinclude>कोठच्या कोठें वितळून गेलें. तिला राहवेना. डोळ्यांतून आश्रूंच्या धारा वाहू लागल्या. कंठमुक्त करून तिनें हंबरडा फोडला.
{{gap}}"बाळा, जळोतरे माझे हात! अहारे दैवा! माझं बाळ जाऊनच्या जाऊन पुनः अतिथिही गेले! धरणीमाते, नको नकोच अंत पाहूं! घे-घे मला पोटांत! हाय! हाय! मी कुठं जाऊं! माझं बाळ- गेलं माझं बाळ!" मीच चांडाळणीनं त्याचा गळा कापला. अतिथि, एकच होतं ते बाळ तुह्मांला दिल्यावर आह्मी पुत्रवान् कशी राहूं? आणि असं जर करावयाचं होतं. तर का हो माझं बाळ बळी घेतलं! आणि आपल्या मधुरस्वरानं 'माझा देह. सार्थक लागू दे' असें ह्मणून तुह्मासाठी आपला प्राण उदारतेनं देणारा माझा बाळ गेला काय! नाहीं! तो सूर्यचंद्र असे तोंपर्यंत आपल्या तेजान जीवंतच आहे. मग आह्मी निपुत्रिक कशीं! मी त्या दिव्य चिरायु बाळाची माताच आहें. नका, अतिथीराज, जाऊं नका. तुह्मीच सांगा, माझा बाळ कीर्तीनं जिवंत नाहीं काय? महाराज, मी आपली कन्या आहें. येवढं माझं ऐकाच. माझा बाळ गेलाच. आतां आपण तसेच जाऊं नका. असें ह्मणून अतिथीच्या पायांवर मस्तक ठेवून चांगुणा पडली.
{{gap}}अहाहा! अतिथींच्या दोन्ही डोळ्यांतून प्रेमाश्रूंच्या धारा लागल्या... इकडे पार्वतीआई गुप्तरूपानें, पुढे काय होतें तें पाहण्यासाठी आल्या होत्या. त्यांना काय वाटलें! खरें तेंच वाटलें. आपणापेक्षां चांगुणा अधीक श्रेष्ठ आहे, हें खरें, असेंच वाटलें.
{{gap}}नारदाने अशा रीतीनें श्रीशंकर सत्व घेण्यास निघतांच, ती वर्दी सर्व देवांना दिली होती. त्यामुळे देवही विमानांतून हा सोहळा पाहतच होते!इतकेंच काय, परंतु त्यांना धाक पडला, कीं, आतां या चांगुणेस हे काय देतील कोण जाणे! परंतु त्यांनीही पुष्पवृष्टि केली. अतिथींनी पायांवर पडलेल्या चांगुणेस उठविण्यास ते कैलासनाथ खालीं वांकलेच.
{{gap}}"ऊठ, वत्से चांगुणे उठ. शोक आवर. मी जात नाहीं. भोजन<noinclude></noinclude>
970ysyhhlbvalwoz37w02i1lwzj4cn5
पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/५१
104
110191
229421
2026-04-20T16:16:03Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
229421
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />
{{center|( ४३ )}}</noinclude>करतों. मात्र तें तुझ्या पुत्राखेरीज नाहीं. तर माझ्यावर तूं विश्वास ठेव पाहूं. आपल्या मुलास हांक मार- मार, चांगुणे तो येईल.
{{gap}}"येरे माझ्या तान्हुल्या- चिलया येरे. हे पहा अतिथी तुझ्यावांचून जेवीत नाहींत."
{{gap}}नुसत्या दृष्टिक्षेपानें ब्रह्मांड उत्पन्न करण्याचें ज्यांचें सामर्थ्य, त्यांनी ह्मटल्यावर चिलया कसा येणार नाहीं! चांगुणेचें बोलावणें सरतें तोंच झुमझुम असा आवाज झाला! चांगुणा तिकडे पहाते तो काय, आपला पुत्र धांवत येत आहे. तिनें दोन्ही हात पसरले. आपल्या लाडक्या कवटाळणार तोंच अतिथींचे ऐवजी हातांत डमरू, डोक्यावर जटा, त्यांतून वाहणारी गंगा, कपाळावर अर्धा चंद्र अशा थाटांत श्रीशंकर दिसले. त्यांनीं चिलयाला मांडीवर बसविलें. चांगुणा व राजा श्रियाळ यांच्या अलौकीक आनंदाचें वर्णन काय करावें!
{{gap}}"जा बाळा, अगोदर आपल्या आईला भेट जा. चांगुणे, हा अतिथि तुला यमासारखा वाटला असेल नाहीं? चांगुणे, माझ्याकडे पाहून आश्चर्य मानूं नको. तुह्माला कसाला लावण्यासाठीं मी महादेव आलों होतो. वत्से, तुझ्यासारख्या सद्गुणानें वैभवशिखरीं चढलेल्या कन्येस मी काय देणार? त्यांतून तुला माहितच आहे कीं, मी स्मशानांत राहणारा दरिद्री तुला काय देणार? तरीपण तूं कांहीं तरी माग.
{{gap}}'''"देवा, मला दुसरं कांहीं नको. पतीच्या व याचकांच्या सेवेस हा देह असाच झिजो, आणि आपल्या कृपेनें माझी बुद्धि सद्भक्तीने नेहमी अशीच ओली चिंब राहो!"'''
{{gap}}माझ्या वाचकभगिनींनो, अशा आपल्या पुराणकाळच्या आर्यभगिनी. होत्या बरं! आज आपलं कामही त्यांचीं चरित्रें, (नाटकें कांदबऱ्या वाचण्यापैकीच थोडा वेळ काढून) वाचणे, व आपल्या लहान मुलींच्या मनावर ही चरित्रें बिंबविणें हेंच होय. आणि हें केलें तरी पुष्कळच होईल!

{{rule|5em}}{{nop}}<noinclude></noinclude>
i9s8gdxfcbk7718z1w008zd57wq42ky
पान:आर्य-स्त्री-रत्ने.pdf/५२
104
110192
229423
2026-04-20T16:20:47Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
229423
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|( ४४ )}}</noinclude>

{{center|{{x-larger|'''सुमती.'''}}}}
{{rule|7em}}

{{gap}}पूर्वकाळीं काशिराज नांवाचा एक राजा राज्य करीत होता. त्याला दोन मुली होत्या. पैकीं वडील मुलगी शांडिल्या ही लग्नाला योग्य झाल्या वर तिच्या वरशोधनाची राजाने तयारी चालविली.
{{gap}}सायंकालचा समय. सूर्य पश्चिम दिशेला अत्यंत वेगाने जात होता. त्याचे किरण अत्यंत तेजःपुंज दिसत होते. राजवाड्याच्या मागील पुष्करणीवर ते किरण पडल्यानें तिला मनोहर स्वरूप प्राप्त झालें होतें. त्याच पुष्करणीवर राजकन्या शांडिल्या येऊन बसली. तिनें आपले गौरवर्ण पाय पुष्करणीच्या पायऱ्यांवर बसून पाण्यांत सोडले. तिच्या मागच्या पायरीवर तिचा पदर रूळत होता. ते सुकुमार गोंडस हात डोळ्यांवर येणारे कुरळे केस मागे सारीत होते. पाण्यांत ती सुंदर राजकन्या पाय नाचवीत असल्याने तिच्या पायांतल्या तोरड्यांचा कर्णमधुर ध्वनि निघत होता. त्यायोगानें पायांजवळ येणारे लहानलहान मासे दूर पळत. अशा रीतीनें ती एकाग्र बसली असतां एकदम मागून तिचे कोणी डोळे झांकले.
{{gap}}"कोण बरं ? हात चाचपत शांडिल्या ह्मणाली. " हं समजलं- सुमती!"
{{gap}}"ताई, कसं ग मला ओळखलंस!
{{gap}}"हो- न ओळखायला काय झालं! माझ्या सुमतीखेरीज इतके रेशमासारखे मऊमऊ हात दुसरे कोणाचे असणार!
{{gap}}इतक्यांत दोन तीन सख्या आल्या. एकीनें नुकत्याच तोडून आणलेल्या फुलांचे गुच्छ करून दोघी राजकन्यांस दिले.
{{gap}}"ताई आपण गडे येथें कांहींतरी खेळूया! सुमती ह्मणाली.{{nop}}<noinclude></noinclude>
hyka07eqoptnb2jx5uku0inj105nibz