विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.46.0-wmf.24
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/168
104
63438
229462
159062
2026-04-22T15:27:07Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229462
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१४० |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>पाठीस लागतात. त्यांना स्नान करावयास अथवा परमेश्वराचे नांव घ्यावयासहि वेळ मिळत नाही. सारी 'कर्तव्ये' करून मट्ट्यास आलेलें शरीर जमिनीवर आडवें होईपर्यंत एकसारखें 'कर्तव्यास' जुंपलेले असावयाचें. कामावरून हे लोक घरी आले तरी कामाचे विचारच त्यांच्या डोक्यांत घोळावयाचे. स्वप्नांतहि त्यांस तें पिशाचरूपी 'कर्तव्य' सोडीत नाही. त्या बिचाऱ्यांस झोपहि चांगलीशी लागत नाही. अरेरे, 'कर्तव्य' 'कर्तव्य' ह्मणून भ्रमात पडलेला हा प्राणी याच भ्रमांत एखादे दिवशी मरण पावतो. सामान्यव्यवहारांत ज्याला कर्तव्य असे आपण समजत असतो, त्याचा हाच प्रकार चोहोकडे आपणांस आढळून येतो. परंतु हे आपले कर्तव्य नव्हे. बायकापोरांच्या, आप्तेष्टांच्या अथवा स्वतःच्या सुखकल्पनांस बळी पडून कर्मे करणे, हे कर्तव्य नव्हे. आनासक्त चित्ताने आणि स्वतःच्या सुखकल्पनांस बळी न पडतां प्राप्त झालेली कामें केवळ ईश्वराची आज्ञा ह्मणून पार पाडून फल त्यास अर्पण करावयाचे हे आपलें खरें कर्तव्य आहे. सर्व कर्मे ही त्याचीच आज्ञा ह्मणून करावयाची. आपणांस त्याच्या हुकमानें या जगांत मनुष्यदेह मिळाला हा त्याचा उपकार. त्याच्या हुकमानें प्राप्त झालेली कर्तव्ये सुचतील तशी करावयाची. ती बरी अगर वाईट झाली तर त्याचा तो पाहून घेईल. त्याचा विचारच आह्मांस नको. ती चांगली झाली तर त्यांची चांगली फळे आह्मांस नकोत, तसेंच ती वाईट झाली तर त्यांची वाईट फळेहि ज्याची तोच घेणार. चित्त सदोदित शांत ठेवा; सुखकल्पनांचे बंदे गुलाम होऊन दिवसभर राबू नका; आणि मग प्राप्तकर्तव्य खुशाल करा. हा धनीपणा- हें स्वातंत्र्य- मिळविणे फार कठीण काम आहे. भिकारदेहाच्या तुच्छ वासना तृप्त करण्याकरितां नीच कर्में करून त्यांस 'कर्तव्ये' असें सोज्वल नांव द्यावयाचे हे मात्र सध्या फार सोपे झाले आहे. वाटेल त्याच्या माना कापाव्या, वाटेल तसे घातपात करावे आणि वाटतील ती कर्म करावी. 'अमुक असें तूं कां केलेंस' ह्मणून विचारणारा कोणी भेटलाच तर 'काय करावे, हे माझें कर्तव्य ह्मणून मी केले,' असा जबाब द्यावा. याहूनहि अधिक मखलाशी करावयाची असली तर आपल्या या धनतृष्णाकूपावर आणखी काही फुलें पसरावी हाणजे झाले. आपल्या कृतीला काही देशाहिताचें, मित्रहिताचे अथवा कुटुंबहिताचे रूप द्यावें, ह्मणजे त्याखाली हवी ती कृष्णकृत्ये लपली जातात. कर्तव्य या शब्दाचा हाच अर्थ सध्या पुष्कळांस पटल्या सारखे दिसतें!{{nop}}<noinclude></noinclude>
1pkz0akro15hrocq2idcw74n5nzosm7
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/169
104
63439
229463
159063
2026-04-22T15:30:15Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229463
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|१४१ }}
{{rule}}</noinclude>{{gap}}कर्तव्य या शब्दाचा खरा अर्थच आपणांस समजत नाही. अमुक कर्म करावें. असे आपल्या मनांत येते त्यावेळी काही तरी शारीरिक सुखाच्या कल्पनेने हा विचार आपल्या चित्तांत उद्भवलेला असतो. हा विचार बहुधा नेहमी तृष्णाजन्य असतो. अनंत कालाच्या संवयीने इंद्रियजन्य सुख हेच आपले सर्वस्व होऊन बसते आणि त्याच्या प्राप्त्यर्थ करावी लागणारी कर्में ही सर्व कर्तव्येच आहेत, असे आपणांस वाटू लागते. उदाहरणार्थ, आपण काही सांसारिक कर्मास पतिपत्नीमधील कर्तव्ये असें ह्मणतो. पण ज्या देशांत लग्नविधीच नाही, तेथें पति आणि पत्नी हे नातेंच नाही. त्यामुळे तेथें पतिपत्नीची कर्तव्ये हा शब्दहि ठाऊक नाही. स्त्रीपुरुष लग्न करितात ती एकमेकांच्या सुखाकरितां करितात. अशी चाल बरीच काल चालू राहिली ह्मणजे त्याच चालीने कर्तव्ये निर्माण होऊ लागतात. एखादा मंदरोग जडला ह्मणजे फारसा त्रास न देतां तो मनुष्याचे शरीर हळुहळु भक्षण करतो! मनुष्याच्या शरीरावर एखाद्या विकाराचा जाज्वल्य परिणाम झाला तर त्याला आपण रोग असें नांव देतो; पण तोच परिणाम अत्यंत मंद- दृष्टोत्पत्तीस न येण्या इतका मंद- असला ह्मणजे प्रकृतीच तशी असें वाटू लागते. मंदगतीमुळे त्याचे रोग हे वाईट स्वरूप आपल्या नजरेस येईनासें होतें; तथापि सशास्त्र दृष्टीने तो रोगच. तसेंच पत्नीबद्दल फाजील आसक्ति असणे हाहि वास्तविक रोगच आहे; पण त्याचे सान्निध्य कित्येक शतकें-सहस्रकें-असल्यामुळे आपण त्याला कर्तव्य हे गोंडस आणि भपकेबाज नांव दिले आहे. लग्न झालें ह्मणजे तासेमर्फे वाजवावे, ब्राह्मणांनी मंत्र ह्मणावे, देव आणि अग्नि साक्षीस आणावे, आणि लोकांनी फुलें अक्षता उधळाव्या; आणि लग्न झाल्यावर त्याच बायकोच्या नादी लागून नवऱ्याने वाटतील ती अमानुष कृत्ये करावी आणि त्याला कुटुंबाचे कर्तव्य असें नांव द्यावें, हा प्रकार जगांत जिकडे तिकडे चालू आहे. सामान्य व्यवहारांत ज्याला आपण कर्तव्य असें ह्मणतो, त्याचा थोडासा उपयोग इतकाच आहे की तेवढी तरी जाणीव असल्याने मनुष्य अगदीच पशूच्या कोटीस न जातां थोडा तरी शुद्धीवर असतो. ज्या पामरांना याहून उच्च दर्जाचा विचारच मनांत येणे शक्य नाही, त्यांस अधिक खाली जाऊ न देण्याकरितां या बागुलबोवाचा उपयोग होतो. पण ज्यांना कर्मयोगी व्हावयाचें असेल त्यांनी कर्तव्याच्या या सामान्य कल्पनेस आपल्या डोक्यांतून प्रथम, हद्दपार केले पाहिजे. असले कर्तव्य तुमच्या आमच्यासारख्यांच्या उपयोगी नाही. जगाकरितां कांहीं करावयाचे आमच्या मनांत असेल तर ते आम्ही खास<noinclude></noinclude>
i4hz50dp2454ncytycpbitwee3ehpms
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/170
104
63440
229464
159064
2026-04-22T15:32:47Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229464
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१४२ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>करूं; पण कर्तव्याच्या या बागुलवोवास भिऊन मात्र नाही. कर्तव्याचे भूत आमच्या पुढे उभे करून आम्हांस कोणी काही करावयास भाग पाडील ही गोष्ट कोणी स्वप्नांतहि आणूं नये. आम्हांस कोणतेंहि कर्म करावयास भाग पाडणारा कोणी मायेचा पूत जन्मास आला आहे काय? नाहीं, खास नाही. आपण नित्य लक्ष्यांत बाळगिले पाहिजे ते हे की, कोणासहि भिऊन अथवा कोणी भाग पाडले ह्मणून आपण कांहीं कर्म केले तर त्याचे पर्यवसान शेवटी आसक्तींत व्हावयाचेंच. अमक्यासाठी कर्तव्य आणि तमक्यासाठी कर्तव्य असला नेभळटपणाचा विचारच मनांत आणू नका. आपला देह, आपलें मन आणि आपले सर्वस्व परमेश्वराच्या चरणी अर्पण करा. धडाडून पेटलेला हा संसाराग्नि आपणा सर्वांची पूर्णाहुती घेण्याची इच्छा करीत आहे. त्याच्या ज्वाळा प्रत्येक क्षणी जवळ जवळ येत आहेत. त्यांचा दुःसह ताप आपणांस भाजून काढीत आहे. मित्रांनो, हा अमृताचा पेला घ्या ह्मणजे हाच अग्नि चंद्रासारखा शीतळ होईल, आणि तुह्मांस अनुपमेय सुखाची प्राप्ति होईल. वास्तविक कर्ता करविता निराळा असून आपण सर्व त्याचे नुसते हस्तक आहों. असे असतां तुह्मांला एखाद्या कर्माबद्दल बक्षिस हवेसे वाटले तर दुसऱ्या एखाद्या कर्माबद्दल चाबूक खाण्याचीहि तुमची तयारी असली पाहिजे. चाबूक नको असे वाटत असेल तर बक्षिसाची आशा सोडली पाहिजे. चाबूक आणि बक्षिस हे सहोदर आणि संलग्न असल्यामुळे जेथें एक जातो तेथे दुसरा येणारच. त्यांची जोडी फुटणे नाही. तुमच्या एका बाजूस सुख आणि दुसऱ्या बाजूला दुःख अशी जोडीने चालली आहेत. एका बाजूला जीवित आहे तर दुसऱ्या बाजूस मृत्यु आहे. जर तुम्हांस मृत्यूच्या पलीकडे जावयाचे असेल तर जीविताची आशा सोडली पाहिजे. तशा स्थितीत तुम्ही प्रवेश केला तर चालू जीवित आणि मृत्यु यांची किंमत तुम्हांस सारखीच वाढू लागेल. असो. यावरून दुःखावांचून निर्भेळ सुखाचें जीवित आणि मृत्युवांचून जीवित ह्या कल्पना शाळेत जाणाऱ्या पोरांसच शोभणाऱ्या आहेत, अशी तुमची खात्री होईल. ज्याची दृष्टि ज्ञानमय झाली आहे, त्याला या स्थितीची अशक्यता तेव्हांच पटते आणि तो या कल्पनेचा तत्क्षणीच त्याग करून सुखी होतो. जें काही तुम्ही करीत असाल त्यापासून स्तुतीचा एखादा शब्द अथवा कांहीं बक्षिस मिळण्याची आशा करूं नका. आपण एखादे चांगले कृत्य करण्याचीच खोटी, की त्याजबद्दल आपला गौरव व्हावा असे आपणांस वाढू लागते. एखाद्या निराश्रितांच्या फंडाला थोडेसे पैसे दिले की आपलें नांव कोणकोणत्या पत्रात आले आहे<noinclude></noinclude>
30el82qmijar088th3tz6cdvdhj0lkj
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/171
104
63441
229465
159072
2026-04-22T15:35:24Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229465
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|१४३ }}
{{rule}}</noinclude>याचा आपण प्रथम शोध करू लागतो. आपल्या मनांत तृष्णा इतकी रसरसत असतां तिच्यापासून दुःखाची प्राप्ति होऊ नये हे शक्य तरी आहे काय? ज्यांनी जगावर महदुपकार करून ठेविले आहेत अशा महात्म्यांची नांवेंहि कोणास ऐकू न येतां ते जग सोडून गेले. बुद्ध आणि ख्रिस्त हे ज्यांच्या तुलनेने फिके पडतील अशा मनुष्यांनी आपली नुसती नांवेंहि कोणाच्या कानी जाऊ दिली नाहीत. आजपर्यंत प्रत्येक देशांत असे शेकडों महात्मे जन्मास आले आणि आपलें कार्य करून गेले. देहधारी असतां त्यांनी जगावर अनंत उपकार केले आणि ते गेले. त्यांचेच विचार बुद्ध आणि ख्रिस्त या रूपाने आपणांस प्रत्यक्ष दिसले; पण खुद्द त्यांचे दर्शन आपणांस झाले नाही, एवढेच नव्हे तर त्यांची नांवेंहि आपणास ऐकू आली नाहीत. स्वतःच्या ज्ञानाचे पर्यवसान मोठ्या नांवांत- कीर्तीत- व्हावे अशी इच्छाहि त्यांस कधी शिवली नाही. आपला विचार जगावर सोडून ते मोकळे होतात. त्याजबद्दल स्तुतीचा एखादा शब्द ऐकावा अथवा एखादा नवा धर्म अगर पंथ काढावा असेंहि त्यांस वाटत नाही. ''''की बृहस्पतीचेनि पाडें । सर्वज्ञता तरी अंगी जोडे । परी वेडिवे माजी दडे । महिमे भेणें ।'''' अशी त्यांची स्थिति असते. त्यांची वृत्ति ह्मणजे शुद्ध सात्विकतेची मूर्तीच असते. प्रेमरसाने ते ओथंबलेले असतात. गडबड आणि धडपड ही त्यांच्या स्वभावास खपतच नाहीत. हिमालयांतील एका गुहेत अशा एका योग्याचे दर्शन मला झाले. त्याचा अहंकार अगदी समूळ नष्ट झाला होता. सर्वतोपरी बद्ध असें जें मानवरूप तें पूर्ण नष्ट होऊन शुद्ध परमेश्वरस्वरूप तो झाला होता. त्याच्या एका हातास एखाद्या प्राण्याने दंश केला तर तो आपला दुसरा हात ताबडतोब पुढे करी. 'परमेश्वराची मर्जीच तशी' असें तो ह्मणत असे. जें जें कांहीं घडतें तें तें परमेश्वराच्या मर्जीनेच घडते, असा त्याच्या बुद्धीचा निश्चय झाला होता. त्याचे दर्शन फार करून कोणास होत नसे; तथापि प्रेम आणि ज्ञान यांची केवळ चिन्मूर्तीच तो होता.<br>{{gap}}या सात्विक पुरुषांच्या खालोखाल ज्ञानी पण रजोगुणी अशा पुरुषांची पायरी असते. सात्विक पुरुषांपासून मिळालेले ज्ञान सर्व जगाला सांगण्याचे काम हे पुरुष करितात. अत्युच्च दर्जाच्या सात्विक पुरुषांनी जें शुद्ध ज्ञान सांठविलेले असतें तें जगांत पसरविण्याचे काम बुद्ध आणि ख्रिस्त करीत असतात. 'मी पंचविसावा बुद्ध आहे' असे गौतमबुद्धाने जागोजाग सांगितले आहे. पहिले चोवीस बुद्ध कोण होते, त्यांनी काय सांगितले वगैरे हकीकत आपणा मानवजातीस उपलब्ध नाही. तथापि त्यांच्याच ज्ञानाच्या बळावर ज्याने आपल्या ज्ञानरूपी<noinclude></noinclude>
ed607a1tznzr279mjtcloyqmu2z5lng
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/172
104
63442
229466
159074
2026-04-22T15:38:30Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229466
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१४४ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>इमारतीचा पाया रचला, तो पंचविसावा बुद्ध मात्र आपणांस माहित आहे. केवळ विचारांत केवढें सामर्थ्य वास करीत असते, याची जाणीव त्या पूर्वीच्या बुद्धांस पूर्णपणे होती. मनुष्यजातीस अज्ञात अशा एखाद्या गुहेत आपण जाऊन राहिलों व केवळ पांचच विचारतरंग आपल्या चित्तांत उद्भवले तरी ते अनंतकाल जगांत राहतील अशी त्यांची पक्की खात्री होती. असे पांच विचारतरंग पर्वतांच्या कित्येक गुहा फोडून व अनेक समुद्र ओलांडून सर्व जगभर प्रवास करून त्यांत भरून राहतील असें सामर्थ्य त्यांत असते. त्यांचे ग्रहण करण्यास योग्य अशी मानवी अंतःकरणें सांपडतांच ते त्यांत शिरून त्यांस जागे करितात. ज्यांना या विचारांनी जागृति आली आहे, अशी स्त्रीपुरुषे त्या विचारांचे व्यवहार्यरूप आचरणांत व्यक्त करितात. जगाच्या कल्याणाकरितां झाले तरी त्यांत फिरून ज्ञान सांगावयाचे म्हणजे वादविवाद होणार, आणि अनेक प्रकारच्या अडचणींशी तोंड देण्याचे नित्य प्रसंग येणार हे उघड आहे. हे करावयास बऱ्याच रजोगुणाची अपेक्षा असते. यामुळे सत्वगुणैकमूर्ति महात्मे जगांत येऊन आपले ज्ञान व्यक्त करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. केवळ ब्रह्मरूप होऊन बसल्यानंतर जगाच्या अस्तित्वाची जाणीव उत्पन्न होण्याइतकाहि रजोगुण त्यांच्या ठिकाणी नसतो. प्रत्यक्ष कार्यकारी जे बुद्ध आणि ख्रिस्त हे कितीहि उत्तम पुरुष असले तरी अज्ञानाची शेवटची छटा त्यांच्या ठिकाणी राहिलेली असते. आपल्या हृदयांत अशुद्धत्व थोडे तरी शिल्लक असल्याशिवाय जगांत येऊन काम करणे आपणांस शक्य नाही. कोणतेंहि कर्म झालें. तरी कर्म म्हटले की त्यांत हेतु आणि आसक्ति यांची अगदी थोड्या अंशाने तरी उत्पत्ति असावयाचीच. कर्माचा हा स्वभावच आहे. परंतु एखादें क्षुद्र कार्य करून त्याबद्दल महत्कीर्तीची अपेक्षा करणे हे मूर्खपणाचे आहे. ज्याच्या इच्छेवांचून गवताची एक काडीहि इकडची तिकडे होऊ शकत नाही व जो अगदी अणुवत् कीटकाचीहि पूर्ण काळजी वाहतो त्या परमात्म्यासमोर उभे राहून आपण आपल्या क्षुद्र कृत्यांचा डांगोरा पिटावा हे आपणास शोभते काय? वास्तविक विचार केला तर असें करणें हे, परमेश्वराचा अत्यंत उपमर्द करण्यासारखें आहे. त्याच्या समोर उभे राहून 'परमेश्वरा तुझी मर्जी' इतकेच ह्मणण्याची आपली योग्यता आहे.<br>{{gap}}सत्वगुणैकमुर्ति पुरुष प्रत्यक्ष जगांत कांहींच कार्य करीत नाहीत; कारण त्यांच्या ठिकाणी आसक्तीचा यत्किंचित् अंशहि उरलेला नसतो. ज्यांच्या वृत्ति ब्रह्माच्या<noinclude></noinclude>
mq2pubwylcq8ersoes6843x0zbnzsgr
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/173
104
63443
229467
159076
2026-04-22T15:42:35Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229467
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|१४५ }}
{{rule}}</noinclude>ठिकाणी अत्यंत लीन झाल्या आहेत, ज्यांच्या सर्व वासना ब्रह्मरूप पावल्या आहेत, सदैव ब्रह्मचिंतन करणे हाच ज्यांचा उद्योग,. त्यांस करावयाचे असें कांहींच उरलेले नसते. ही अगदी शेवटची पायरी झाली. पण त्यांशिवाय बाकीच्या सर्वांस कर्म करणे भागच आहे. परंतु कर्म करीत असतां त्यामुळे विश्वांतील एखाद्या अणूसहि आपल्याकडून मदत होत आहे, असा विचार आपल्या चित्तास शिवू नये. कारण त्यास स्वतंत्रपणे मदत करणे हे आपणांस शक्यच नाही. या जगद्रूपी तालमीत आपण आपलेच शरीर कमावीत असतो. कर्म करीत असतां सदैव ध्यानांत बाळगावयाचें तें हेंच. आपण या गोष्टीचा केव्हांहि विसर पडू दिला नाही व कर्म करणे हा एक विशिष्ट हक्कच परमेशाच्या कृपेने आपणांस प्राप्त झाला आहे, अशी भावना बाळगली ह्मणजे आसक्ति आपल्या चित्तांत बिऱ्हाड करणार नाही. तुमच्या आमच्यासारखे लक्षावधि लोक स्वतःस मोठे समजून त्यांत गर्क असतात; पण तुह्मी आम्ही मरण पावलों तर पांच मिनिटांच्या आंतच तुमचे आमचे विस्मरण जगास होईल. परमेश्वराची मर्जी नसेल तर एक क्षण तरी जीवंत राहणे तुह्मां आम्हांस शक्य आहे काय? सर्व कर्ता करविता तोच आहे. सर्व सामर्थ्य त्याचेंच. विश्वांतील यच्चयावत् वस्तूंत आढळणारे सामर्थ्य त्याच्या इच्छेवरच अवलंबून आहे. त्याच्याच आशेनें वारा वाहतो, सूर्य प्रकाशतो, माणसें जगतात आणि मृत्यु हरण करतो. सर्व तोच आणि सर्वांतर्यामी तोच. त्याची पूजा करावी इतकीच आपली योग्यता. सर्व कर्माचे फल त्यास अर्पण करा. चांगले कर्महि केवळ त्याच्याचसाठी त्याच्याच हुकमाने करावयाचे अशी दृढ भावना धरा; ह्मणजे अनासक्ति तुमच्या ठिकाणी उत्पन्न होईल. आपणांस जखडणारे पाश खटाखट तुटून आपण मुक्त होऊं. मुक्ति मिळविणे हेच कर्मयोगाचें साध्य आहे.<br>
{{rule|6em}}<br>
{{center|प्रकरण ८ वें.}}
{{center|'''कर्मयोगाचा आदर्श.'''}}
{{gap}}अनेक प्रकारच्या निरनिराळ्या मार्गानी गेले तरी सर्वांचे पोहोचण्याचे ठिकाण एकच आहे. ही वेदांताची कल्पना अत्युच्च दर्जाची आहे. हे मार्ग सामान्यतः चार प्रकारचे आहेत. कर्मयोग, भक्तियोग, राजयोग आणि ज्ञानयोग. हे चार मार्ग भिन्न असले तरी त्यांचा परस्परांशी काहीच संबंध नाहीं असें मात्र नव्हे. केवळ नांवांवरून भिन्नता दिसते तितकी ती प्रत्यक्ष आचारांत नसते, ही गोष्ट<noinclude><br>{{gap}}स्वा. वि. १०</noinclude>
lg49ekrbljzx38vnhky7i2rklp5o9ms
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/174
104
63444
229468
159077
2026-04-22T15:45:36Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229468
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१४६ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>आपण लक्ष्यांत ठेवली पाहिजे. बाह्यतः जरी ते माग वेगळे दिसले तरी तत्वतः त्यांचा एकमेकांशी अत्यंत निकट संबंध आहे. त्यांच्यापैकी व्यवहारांत ज्याचें स्वरूप अधिक उघड दिसतें त्यावरून एखादें विशिष्ट नांव त्या मार्गास आपण देतो; पण त्यामुळे इतर मार्गातले कोणतेंहि तत्व त्यांत अंतर्भूत होणार नाहीं असें नाही. एखादा मनुष्य कर्मयोगी असला तरी तो ज्ञानी असणार नाही असें नाही. एखादा भक्त असूनहि राजयोगी असू शकेल. अथवा तिसरा एखादा ज्ञानी असून भक्तहि असेल. एखाद्या मनुष्यांत एखाद्या मार्गाचे स्वरूप उघड दिसते व त्यावरून तो अमुक मार्गाचा असे आपण ह्मणतों इतकेंच. हे चार मार्ग आरंभी भिन्न दिसले तरी त्यांचं लक्ष्य एकच असल्यामुळे पुढे पुढे ते ऐकमेकांजवळ येतात, व शेवटी त्या लक्ष्यांत एकरूप व एकजीव होतात. त्याचप्रमाणे जगांतील सर्व धर्म आणि पंथ यांचे पर्यवसानहि शेवटी त्याच लक्ष्यांत होते.<br>{{gap}}हे लक्ष्य- साध्य- कोणते याचा उलगडा मी पूर्वी केलाच आहे. मुक्ति मिळविणे हेच सर्वांचें साध्य आहे. आपणाभोंवती दिसणारा प्रत्येक अणुरेणु मुक्तीसाठीच धडपड करीत आहे. नुसत्या डोळ्यांनी न दिसण्याइतक्या सूक्ष्म पदार्थापासून तो मनुष्यापर्यंत आणि अगदी निर्जीव जड पदार्थापासून तो जगांतील अत्युच्च दर्जाच्या जीवात्म्यापर्यंत सर्वांची धडपड केवळ मुक्तीकरतां आहे. किंबहुना ही धडपड आहे ह्मणूनच हें विश्व आकाराला आले आहे. प्रत्येक अणूच्या गतीचे सूक्ष्म अवलोकन केले, तर तो इतरांपासून दूर दूर जाण्याचा प्रयत्न करीत असून, इतर अणू त्याला आपल्याजवळ ओढीत असतात असे आढळून येईल. आपली ही पृथ्वि सूर्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न प्रत्येक क्षणी करीत आहे; तसेंच चंद्रहि पृथ्वीपासून दूर जाण्यासाठी प्रत्येक क्षणी धडपड करीत आहे. भोवतालची बंधनें तोडून अनंतांत जाऊन मिळावें हाच हेतु या साऱ्या धडपडीच्या मुळाशी आहे. केवळ याच हेतूने प्रेरित होऊन सत्पुरुष परमेश्वराची भक्ति करतात आणि याच हेतूने चोरहि चोऱ्या करतात. सर्व कर्मांच्या मुळाशी हेतु एकच आहे. हा हेतु सिद्ध करण्याचा मार्ग अयोग्य असला ह्मणजे त्याला आपण पातक असें नांव देतों व योग्य मागाने हेतु सिद्ध करूं पाहणारास आपण सज्जन ह्मणतों. मार्गाच्या इष्टानिष्टतेप्रमाणे नांवें भिन्न झाली तरी मुळांत हेतु तोच आहे. मुक्ति मिळवून अनंताशी एकरूप- एकजीव- होणे हाच हेतु सर्व विश्वांतील पदार्थाचा आहे. आपणाभोवती असणारे पाश कोणत्या प्रकारचे आहेत याचे ज्ञान होऊन त्यांच्या जाचामुळे श्रमी झालेला<noinclude></noinclude>
jdgagklnoj2411hjkvyx7r1dqwbsgmg
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/175
104
63445
229469
159078
2026-04-22T15:47:48Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229469
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|१४७ }}
{{rule}}</noinclude>पुरुष परमेश्वराची प्रार्थना करतो, आणि आपणापाशी अमुक वस्तु नाही या विचाराने श्रमी झालेला पुरुष ती वस्तु मिळविण्याकरितां चोरी करतो. 'माझ्याजवळ अमुक वस्तु नाही,' हा विचारच येथें पाशरूप झालेला असतो. ती वस्तु मिळाली म्हणजे या पाशाचे अस्तित्व नाहीसे होईल, या भावनेनें चोर चोरी करितो. विश्वांतील यच्चयावत् पदार्थ- जड अथवा सचेतन- मुक्तीसाठींच धडपडत आहेत. आपण मुक्तीसाठी धडपडत आहों याचे ज्ञान कित्येकांस असते आणि कित्येकांस नसते. पण एवढ्या फरकामुळे मार्ग भिन्न होऊन अंतिम परिणामहि विपरीत होतात. आपली गरज काय आहे व ती पुरविण्याचा मार्ग कोणता याचे ज्ञान ज्यास बरोबर झाले आहे, असा मनुष्य योग्य मार्गावर आरूढ होऊन शेवटीं अनिर्वाच्य सुखाच्या स्थितीस पोहोचतो. परंतु आपली वास्तविक गरज काय आहे याचेच ज्ञान चोरास नसते; यामुळे विपरीत मार्गाने जाऊन शेवटी त्याची फसगत होते. जीवात्मा मोकळा व्हावयाचा तें बाजूस राहून उलट आणखी नवे पाश त्याच्या गळ्यांत पडतात. याकरितां आपणास पाहिजे काय व तें मिळविण्याचा मार्ग कोणता याचे बरोबर ज्ञान असणे प्रत्येकास आवश्यक आहे.<br>{{gap}}जगांतील सर्व धडपड मुक्तीकरतां सुरू आहे, ही गोष्ट सर्व धर्मांनी सूचित केली आहे. सर्व धर्मांनी प्रतिपादिलेली नीतितत्वें व सांगितलेला स्वार्थत्याग यांच्या मुळाशी हेच तत्व आहे. मी ह्मणजे देह हा जो जन्मापासून लागलेला अध्यास तो सुटून जीवात्मा मुक्त व्हावा याच करितां सर्व धर्माचा अवतार आहे. ज्यावेळी एखादा मनुष्य परोपकारासाठी झटतो असे आपण पाहतों त्यावेळी त्याची बुद्धि केवळ 'मी' आणि 'माझें' एवढ्यांतच गुंतली नसून ही हद्द त्याने ओलांडिली आहे असे सहज आपल्या लक्ष्यांत येते; तथापि परोपकार करीत असतां दिसून येणारा स्वार्थत्याग कितीहि मोठा असला तरी ती शेवटची पायरी नव्हे, हे आपण लक्ष्यात ठेवले पाहिजे. परोपकाराकरितां जीव दान दिला तरी त्याच्या मुळाशी कीर्तिसंपादनाचा स्वार्थ असण्याचा संभव आहे. यासाठी 'मी' आणि 'माझें' यांची पूर्ण विस्मृति होणे हेच साध्य आहे असे सांगण्याचा सर्व धर्माचा, पंथांचा, अथवा नीतिशास्त्रांचा रोंख आहे. मनुष्याला अशा प्रकारचा पूर्ण त्याग करितां आला, तर त्याची स्थिति तरी कोणत्या प्रकारची होईल अशा प्रकारचा प्रश्न उद्भवेल. त्यावर उत्तर असे की, अशी स्थिति प्राप्त झाल्यानंतर असा मनुष्य अमुक एक गोमाजी<noinclude></noinclude>
242jfifplhjxjdu4r4ahkhz21r6ltg3
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/176
104
63446
229470
159084
2026-04-22T15:50:19Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229470
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१४८ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>(देहधारी) अशा स्वरूपाचा राहिला नसून तो विश्वव्यापी झाला, असे समजावें. विश्वांत जे जे ह्मणून दृश्यास आलेले आहे, तें तें सर्व तोच, इतका त्याचा मोठा विस्तार होतो. ''''हे विश्वचि माझें घर । ऐसी मति जयाची स्थिर । किंबहुना चराचर । आपण झाला ॥'''' हेच त्याच्या स्थितीचे योग्य वर्णन होय. 'मी' आणि 'माझें' ह्मणणारी त्याची क्षुद्रवृत्ति अनंतत्वांत एकवार हरवली ह्मणजे तिचा पुनः पत्ता लागत नाही. सर्व धर्म, सर्व नीतिशास्त्रे आणि सर्व तत्वज्ञान हेच साध्य साधा, म्हणून उपदेश करीत आहेत. हे स्थितिवर्णन ऐकून देहाध्यासपिशाचाने पूर्ण पछाडलेल्या मनुष्याची भीतीने गाळण उडते. परंतु अशी मनुष्येहि नीतितत्वांचा उपदेश करीत असतात, असें पुष्कळ वेळां आढळून येते. अशावेळी स्वतःस न समजतां ती त्याच साध्याचा उपदेश करीत असतात. मनुष्य कितीहि देहाध्यासी असला तरी अमुक एक प्रतीचा स्वार्थत्याग केला ह्मणजे नीतीची परम सीमा झाली, असें ह्मणत नाही. किंबहुना अशा प्रकारची परम सीमा निश्चित करता येणेच त्यास शक्य नाही. अशा रीतीने केवळ नीतिशास्त्राचा पूर्ण अवलंब करावयाचा म्हटले तरी विश्वरूप होईपर्यंत मध्ये कोठे थांबतां येणेच शक्य नाही. आमचें तरी ह्मणणे हेच आहे की विश्वरूप होणे हीच शेवटची पायरी आहे. मग ती तुह्मीं कोणत्या मार्गाने सिद्ध केली हा प्रश्न यत्किंचिहि महत्वाचा नाही. आमच्या विचारांत व देहाध्यासी मनुष्याच्या नीतिमार्गात फरक इतकाच की त्याला स्वतःच्याच सदसद्विवेकबुद्धीस शेवटपर्यंत चिकटून राहण्याची छाती होत नाही. त्याच्याच बुद्धीने दाखविलेले अंतिम साध्य पाहून त्याला भीति वाटते. जिच्यासाठी सर्व सृष्टि धडपड करीत आहे त्या मुक्तीचा मार्ग दाखविणे हेच कर्मयोगाचेंहि साध्य आहे. स्वार्थ विसरून अनासक्त विचाराने कर्म केलें ह्मणजे मुक्ति मिळते, असें कर्मयोगाचे सांगणे आहे. या एकंदर विवेचनाचा मथितार्थ हा आहे की, स्वार्थप्रेरित प्रत्येक कर्म आपणांस आपल्या साध्यापासून दूर नेते, आणि अनासक्त चित्ताने केलेले प्रत्येक कर्म आपणांस आपल्या साध्याच्या जवळ नेतें. यावरून नीति आणि अनीति यांची व्याख्या अशी आहे की प्रत्येक स्वार्थप्रेरित कर्म अनीतिवर्धक, आणि निःस्वार्थी असे प्रत्येक कर्म नीतिवर्धक.<br>{{gap}}अनीतिवर्धक कर्मे आणि नीतिवर्धक कर्में यांची व्याख्या परमार्थतः इतकी सोपी असली तरी त्या कर्माचे प्रत्यक्ष-व्यवहार्य- स्वरूप ठरविणे सोपे नाही. परिस्थिति बदलली ह्मणजे पूर्वीची विहित कर्में अविहित कशी होतात व पूर्वी अविहित ह्मणून समजलेली कर्मे विहित होण्याचा संभव कसा उत्पन्न होतो, याचे<noinclude></noinclude>
8kp2jd6fz76w7u2zxhjessxgxb8s88e
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/177
104
63447
229471
159130
2026-04-22T15:53:29Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229471
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|१४९ }}
{{rule}}</noinclude>विवेचन पूर्वी एकवार केलेच आहे. एक कर्म एखाद्या परिस्थितीस अनुरूप व विहित असले, तरी तेंच कर्म परिस्थिति बदलल्याबरोबर अननुरूप व अविहित होते. तसेच विशिष्ट परिस्थितीत एखादें कर्म निःस्वार्थी असले तरी परिस्थिति बदलली तर तेच कर्म स्वार्थी होण्याचा संभव असतो.<br>{{gap}}अमुक एक कर्म स्वार्थी व अमुक दुसरें निःस्वार्थी असें निश्चयाने ठरवितां येणें शक्य नाहीं; त्या अर्थी अशा कर्माची सर्वसामान्य व्याख्या सांगितली आहे. देश, काल आणि परिस्थिति यांस अनुसरून विहित कर्म कोणते आणि अविहित कोणतें, हे ज्याचें त्यानेच ठरविले पाहिजे. एखाद्या देशांत अमुक एक प्रकारची वागणूक नीतिसंमत समजली जाते परंतु दुसऱ्या देशांत निराळ्या परिस्थितीमुळे तीच वर्तणूक नीतिबाह्य ठरण्याचा संभव आहे. सर्व धडपडीचा- सर्व कर्माचा- अंतिम हेतु मुक्ति हा असून अत्यंत निःस्वार्थी कर्मे करणे हाच मोक्षाचा मार्ग होय, इतकेंच तात्विकदृष्टया सांगणे शक्य आहे. अत्यंत निःस्वार्थी असें प्रत्येक कर्म, असा प्रत्येक विचार आणि शब्द आपणांस मोक्षाकडे नेतो आणि ह्मणूनच तो नीतिवर्धक. प्रत्येक धर्मात आणि प्रत्येक नीतिग्रंथांतील विवेचनांत नीतीची हीच व्याख्या लागू पडते असे आपणांस आढळून येईल. कित्येक ग्रंथांत नीति ही परमेश्वराची आज्ञा आहे, असे प्रतिपादन केले आहे. मनुष्याने अमुक एक कर्म कां करावें अथवा अमुक एक कर्म कां करूं नये अशा प्रश्नांस 'परमेश्वराची आज्ञा ह्मणून' इतकेंच उत्तर आपणांस मिळेल. नीतिविषयक कल्पनांच्या उत्पत्तीचें मूलस्थान कोणतेंहि असले तरी त्यांच्या पोटी निःस्वार्थ हेच तत्व गोवले असल्याचे आपणांस आढळून येईल. नीतिदृष्टया अथवा धर्मदृष्टया या सिद्धांताचा उच्चपणा इतका उघड असतां 'तूं स्वतःला विसर' असें ह्मटल्याबरोबर कित्येक लोक गर्भगळित होतात, हे आश्चर्य नव्हे काय? एखाद्याने केवळ स्वतःसाठी असे कोणतेंहि कर्म करावयाचे सोडून दिले, स्वतःबद्दल तो अक्षरहि उच्चारीनासा झाला अथवा स्वतःबद्दल काही विचारहि त्याच्या मनांत येईनासा झाला तर अशा मनुष्यांत 'मी' आणि 'माझें' यांचे वास्तव्य कोठे आढळेल? किंबहुना, 'तूं कोण?' असा प्रश्न आपण त्या मनुष्यास केला तर तो स्वतः तरी या प्रश्नाचे काय उत्तर देईल? स्वतःबद्दल यत्किंचित् तरी विचार शिल्लक असल्याशिवाय 'मी' आणि 'माझें' या भावनेची उत्पत्ति होणेच शक्य नाही. मग स्वतःबद्दलचा विचारहि ज्याच्या चित्तांतून लुप्त झाला आहे, स्वतःबद्दलची ज्याची भावना विश्वभावाशी एकरूप झाली आहे, अशा मनुष्याच्या चित्तांतून<noinclude></noinclude>
gpg2fzlayz2tos3qyeainuwyqazbkla
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/178
104
63448
229472
159131
2026-04-23T08:26:52Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229472
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१५० |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>हरवलेले 'मी' आणि 'माझें' पुन्हां परत मिळण्याची आशा आहे काय? त्याने उत्तर दिलेच तर ''''मनोबुद्धयहंकारचित्तानि नाहं । न च श्रोत्रजिव्हे न च घ्राणनेत्रे।'''' अशाच प्रकारचे काही उत्तर तो देईल. 'मी' आणि 'माझें' हे एकवार अनंतत्वांत हरवलें ह्मणजे तें कायमचेच हरवले.<br>{{gap}}अशा रीतीने नीतितत्वे आणि धर्मतत्वे यांचा सुखकर मिलाफ कर्मयोगांत झाला असून 'निःस्वार्थी होऊन आणि युक्तकर्मे करून मुक्त हो,' असा त्याचा उपदेश आहे. अमुक एका मतावर विश्वास ठेवला पाहिजे अथवा अमुक एक धर्म खरा मानिला पाहिजे असें बंधन कर्मयोग्यास नाही. फार काय, पण परमेश्वराचे अस्तित्वहि त्यास मान्य नसले तरी चालेल. आत्मा काय आहे आणि परमात्मा कोण इत्यादि प्रमेयांचे उद्घाटन करीत बसण्याचेंहि त्यास प्रयोजन नाही. या देहांत प्रत्ययास येणारा इतकाच 'मी' नसून त्याचे खरे स्वरूप जाणण्याचा कर्मयोग्याचा मार्गच निराळा आहे. हा मार्ग कर्मयोग्याने स्वतःच आक्रमिला पाहिजे. आयुष्याच्या प्रत्येक क्षणी त्याने स्वार्थ विसरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जी प्रमेये बुद्धीला आटोकाट ताण देऊन समजावयाची तींच प्रमेयें कर्मयोग्याला कर्मे करून प्रत्यक्ष प्रमाणाने अनुभवावयाची असतात. त्याला कोणत्याहि मताची अथवा कोणत्याहि उपपत्तीची मदत होण्याचा संभव नसतो. अव्यभिचारी भक्तीनें भक्ताला अथवा अत्युच्च ज्ञानाने ज्ञात्याला जो अनुभव होतो, तोच कर्मयोग्याला कर्मांनी मिळवावयाचा असतो. निःस्वार्थी कर्म हाच कर्मयोगांतील पहिला धडा आहे.<br>{{gap}}आतां यापुढे आणखी एका प्रश्नाचा विचार कर्तव्य आहे. 'कर्म ह्मणजे काय? निःस्वार्थी कर्म करा, जगाच्या बऱ्यासाठी कर्म करा, असें तुह्मीं ह्मणतां; पण आमच्या हातून जगाचें बरें काय होणार?' अशा प्रकारच्या प्रश्नपरंपरेस काय उत्तर देतां येईल याचा आतां विचार करूं. आपणास जगाचे बरे करता येईल की नाही, या प्रश्नास केवळ निरपेक्षदृष्टीनें- केवळ परमार्थदृष्टया- उत्तर द्यावयाचे म्हटले तर तें नकारार्थीच दिले पाहिजे. केवळ तात्विकदृष्टया बोलावयाचें म्हटले तर जगाचेंच काय पण एखाद्या अत्यंत क्षुद्र व्यक्तीचेहि आपण बरे करूं शकत नाही. पण या विचारांत दुसरीहि एक दृष्टि आहे, ही गोष्ट विसरून चालावयाचें नाही. सापेक्षदृष्टीने पाहतां आपणांस बऱ्याच गोष्टी जगाच्या बऱ्याकरितां करता येणे शक्य आहे. जगाचे चिरकालिक कल्याण होईल अशी एकहि गोष्ट आपणांस करता येणे शक्य नाही. कारण तसें असतें तर आजला<noinclude></noinclude>
n7o5kawdz5u34l4gqgv9ley4rjxfhnx
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/179
104
63449
229473
159132
2026-04-23T08:30:45Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229473
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|१५१ }}
{{rule}}</noinclude>जगाची जी स्थिति आहे तशी ती आपणांस आढळली नसती. क्षुधिताला अन्नदान करून त्याची भूक चालू वेळापुरती भागविली तरी थोड्या वेळाने ती पुनः उद्भवणारच. अशाच रीतीनें मनुष्याच्या सुखासाठी आपण केलेला प्रत्येक प्रयत्न खरोखर क्षणभंगुर आहे, असे आपल्या प्रत्ययास येते. सुखदुःखांचा जो ताप साऱ्या जगाच्या अंगांत भिनून गेला आहे, त्यावर रामबाण उपाय अजून कोणीहि योजिला नाही. चिरस्थायी सुखाचें जीवित जगास देणे शक्य तरी आहे काय? समुद्रांत एका ठिकाणी लाट उठवावयाचा आपण उद्योग केला, तर तितक्याच प्रमाणाने दुसरीकडे खाडा पडतो. सुखसाधनांची कितीहि समृद्धि केली, तरी मनुष्यांची हांव आणि ती पुरी करण्याची साधने यांचा मेळ अनादिकालापासून आजपर्यंत पडला नाही. जी स्थिति तेव्हां होती तीच आज आहे. त्या स्थितीत वृद्धि अथवा क्षय यांपैकी काहींच झालेले नाही. जगांतील आनंद आणि दुःख आणि उच्चनीच भाव पूर्वीप्रमाणेच आतांहि आहेत. गरीब आणि श्रीमंत, रोगी आणि निरोगी, आनंदी आणि दुःखी अशा अत्यंत विरुद्ध दशेतील लोक पूर्वीप्रमाणेच आतांहि नाहीत काय? इजिप्शियन लोकांच्या वेळी, ग्रीक लोकांच्या अमदानींत, रोमन रियासतींत अथवा सध्याच्या अमेरिकन लोकसत्ताक अमलांत लोकस्थितीत यत्किचितहि फरक नाही. इतिहासकालापासून चालू क्षणापर्यंत जगाची स्थिति अगदी एकसारखी आहे. असे असले तरी मानवी दुःख हलके करण्याचे प्रयत्नहि इतिहासकालापासून चालू आहेतच. इतिहासकालापासून प्रत्येक शतकांत इतरांच्या बऱ्याकरितां झटणारी हजारों स्त्रीपुरुष जन्मास आली, आणि त्यांच्या प्रयत्नांस कितपत यश आले याचा आढावा काढला तर? पण या प्रश्नाचे उत्तर देण्याची जरूरच नाही. फूटबॉलच्या खेळांत ज्याप्रमाणे चेंडू इकडून तिकडे आणि तिकडून इकडे जातो, त्याचप्रमाणे जगांतील सुखदुःखांची गति आहे असे आपणांस आढळून येते. शारीरिक यातना हलक्या करण्यासाठी यत्न करावे तो त्या यत्नांनींच मानसिक यातनांची वृद्धि होते, असा अनुभव येतो. सर्व जग सुखमय करून सोडावयाचे ही आपली कल्पना आरबी भाषेतील गोष्टींत शोभण्यासारखी आहे आणि तिची वास्तविक योग्यताहि तितकीच आहे. सर्व जग सुखी करण्यासाठी ह्मणून जें जें राष्ट्र पुढे सरतें, त्याची इच्छा पाहिली तर हीच की त्यांतल्या त्यांत त्या सुखांत स्वतःला मोठा वाटा मिळावा. अहाहा! यापेक्षा अधिक निःस्वार्थी उद्योग कोणता आहे बरें? आणि असल्या निःस्वार्थी उद्योगाने जगाचें कोटकल्याण होणार!{{nop}}<noinclude></noinclude>
akqxx8nbip2bbx6hud6w56qg53dwfyq
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/180
104
63450
229474
159133
2026-04-23T08:33:35Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229474
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१५२ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>{{gap}}जगांत सुखाची वृद्धि करणे जसें अशक्य आहे, त्याचप्रमाणे त्याच्या दुःखांतहि थोडीसुद्धां भर टाकणे आपणांस अशक्य आहे. सुखदुःखाचें व्यक्त स्वरूप कोठे अधिक अथवा उणे दिसले तरी त्यामुळे ज्या शक्तीच्या योगाने या संवेदना भासतात त्या शक्तींत कांहीं अधिक उणेपणा येत नाही. सुखदुःखें इकडून तिकडे गेली अथवा तिकडून इकडे आली तरी एकंदर समवायी परिणामांत त्यामुळे वैगुण्य येत नाही. निरंतर एकरूप राहणे हा त्या शक्तीचा स्वभावच आहे. त्याचप्रमाणे जीवित आणि मरण व सुख आणि दुःख ही द्वंद्वे असणे, हा जगाचा स्वभाव आहे. या द्वंद्वावांचून जगाची उत्पत्ति आणि स्थिति शक्यच नाही. तसें नसते तर अनंतकालपर्यंत आपण देह धारण करूं अशी इच्छा करणे वावगें झाले नसते. परंतु जीविताची कल्पना आली की तिजबरोबर मृत्यूचीहि कल्पना अवश्य येणारच. सुखाच्या कल्पनेबरोबर दुःखाच्याहि कल्पनेचा जन्म होणारच. ही द्वंद्वे आहेत ह्मणून जग आहे. ही द्वंद्वे नाहीशी झाली, तर त्याच क्षणी जगहि अदृश्य होईल. खरें चिरकाल जीवित तुह्मांस हवे असेल तर ते मिळविण्यासाठी तुह्मांस क्षणोक्षणीं मेले पाहिजे. ज्यांना आपण जीवित आणि मृत्यु या नांवांनी ओळखतो, ती तात्विकदृष्ट्या एकाच स्थितीची दोन अंगे आहेत. परंतु दृष्टिभेदामुळे त्यांची एकतानता आपल्या लक्ष्यांत येत नाही. समुद्रांत एका ठिकाणी लाट उठली म्हणजे उंचवटा झाल्यासारखा दिसतो व दुसऱ्या ठिकाणी खाडा दिसतो तरी त्यामुळे ज्याप्रमाणे त्याच्या पृष्ठभागांत वास्तविक वैगुण्य येत नाही, त्याचप्रमाणे जीवित आणि मृत्यु ही एकाच स्थितीत उत्पन्न होणाऱ्या लाटेप्रमाणे आणि खाड्याप्रमाणे आहेत; अशा रीतीने दोन अंगें मिळून एक स्थिति आहे. केवळ मृत्यूच्या ह्मणजे खाड्याच्या अंगाकडे पाहणारे ते निराशावादी बनतात व जीविताच्या ह्मणजे लाटेच्या बाजूकडे पाहणारे असतात ते आशावादी बनतात. शाळेत जाणारी मुलें पाहावी तेव्हां आनंदी दिसतात; त्यांच्या गरजा भागविण्यास त्यांचे आईबाप हजर असतात; त्यांना या जगात काही उणीव आहे, याचे भानच नसते; यामुळे नैराश्याचे प्रसंगहि त्यांस ठाऊक नसतात. तीच वृद्धाची स्थिति पहा. ती मुलाच्या स्थितीच्या अगदी उलट असते. जगांत अनेक प्रकारच्या कष्टांचा त्यास अनुभव येऊन त्याच्या वृत्ती शांत झालेल्या असतात. यामुळे कसल्याहि स्थितीनें तो हुरळून जात नाही. जी गोष्ट व्यक्तीला तीच राष्ट्रालाहि लागू आहे. तारुण्यांत नुक्तेच प्रवेश करूं लागलेले राष्ट्र आशावादी असलें- आपण ह्मणूं तें करूं अशी धमक त्यास वाटत असली- तर त्यात<noinclude></noinclude>
fhvrjgyv7rfaul1bbz4egtugjf2hpyp
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/181
104
63451
229475
159134
2026-04-23T08:36:25Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229475
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|१५३ }}
{{rule}}</noinclude>नवल नाही. परंतु वृद्ध राष्ट्राची स्थिति याहून निराळी आहे. अनेक शतकें निरनिराळ्या परिस्थितींचा अनुभव येऊन त्याच्या वृत्तीत नैराश्यवादाचा प्रवेश झालेला असतो. 'हजार वर्षे शहर आणि हजार वर्षे रान' अशा अर्थाची एक ह्मण आहे. ही ह्मण साऱ्या जगाच्या स्थितीस लागू आहे. आज वैभवाच्या शिखरावर असलेली राष्ट्र उद्या धुळीस मिळतात! आणि आज अत्यंत अवनतावस्थेतला समाज उद्या प्रगतीच्या उच्च शिखरावर आरूढ झालेला दिसतो. अशा रीतीने परिस्थितीत बदल होत असतां ज्याच्या नजरेस जी परिस्थिति येते तिच्याकडे पाहून तो आशावादी अथवा निराशावादी बनतो. पण अशा अदलाबदलीमुळे जगाच्या सामान्यरूपांत काही बदल होत नाही. जगांतील दुःखें. नाहीशी करूं पाहणारांच्या मतांपैकी एकाचा विचार येथवर केला.<br>{{gap}}अशा लोकांचे दुसरे एक तत्व समता हे आहे. जगांतील विषमावस्था हे त्याच्या दुःखाचे एक मोठे कारण असून ती नाहीशी होऊन सर्वत्र समता नांदूं लागली तर जग सुखी होईल, असें या लोकांचे दुसरें तत्व आहे. सर्व जगाला सुखी करण्याची इच्छा करणे ही कल्पना एका दृष्टीने प्रशंसनीय आहे. केवळ याच कल्पनेने प्रेरित असे अनेक उद्योग चालू असल्याचे आपल्या पाहण्यांत येते. हिच्या अभावी ही कार्ये सुरू झाली नसती. सर्व मानवजातींत समता उत्पन्न करणे हे आपल्या धर्माचे एक ब्रीदच आहे असे कित्येक धर्माचे उपदेशक सांगत असतात. खुद्द परमेश्वर या पृथ्वीवर राज्य करण्यास येणार असून त्याच्या अंमलांत विषमावस्था कोठे औषधासहि मिळणार नाही असें प्रतिपादन हे लोक मोठ्या जोराने करीत असतात. असे प्रतिपादन करणारे लोक हे वस्तुतः धर्मवेडे असतात. धर्मवेड्यांइतके खरे भाविक कोणी नाहीत. ग्रीक आणि रोमन रियासतींतील गुलामांस ख्रिस्ती धर्म इतका मानवला याचे कारण हेच की, या धर्माच्या उपदेशांत समतेच्या तत्वाचा प्रमुखपणे उल्लेख होत असे. त्यामुळे त्या बिचाऱ्यांची साहजिकच अशी कल्पना झाली की सर्व जग ख्रिस्ती झाले, तर त्यामुळे सर्वत्र समता उत्पन्न होऊन गुलामगिरीचे समूळ उच्चाटन होईल. आपण एकदां गुलामगिरीतून सुटलों ह्मणजे यथेच्छ खाऊन पिऊन आनंद करूं, अशी त्या बिचाऱ्यांस आशा उत्पन्न होऊन ख्रिस्ताच्या निशाणाभोंवतीं ते जमा झाले. ज्यांनी या तत्वाचा उपदेश केला ते उपदेशक धर्मवेडे असले, तरी खरोखर फार भाविक होते. परमेश्वर या जगावर राज्य करण्यास येईल, ही कल्पना खरी मानण्याइतका भोळा आणि भाविक<noinclude></noinclude>
lhx3sx5j0yatrk17p8lmcbqv79bbvb2
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/182
104
63452
229476
159135
2026-04-23T08:39:09Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229476
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१५४ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>माणूस सध्याच्या काळी फारसा आढळावयाचा नाही. यामुळे पूर्व कालींच्या या समतेच्या तत्वाचे थोडेसें रूपांतर झाले आहे. या रूपांतराचे समानार्थक असे स्वातंत्र्य आणि बंधुभाव हे शब्द आतां जिकडे तिकडे ऐकू येतात. व्यक्तिस्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य इत्यादि प्रकारची अनेक स्वातंत्र्य मिळाली व परमेश्वर सर्व मनुष्यांचा पिता ही कल्पना एकसमयावच्छेदेंकरून सर्वांस पटली ह्मणजे सर्वत्र समता उत्पन्न होऊन जग सुखी होईल, असा घोष सध्या ऐकू येतो. परंतु हाहि दुसऱ्या प्रकारचा वेडेपणाच आहे. पूर्वीचें धर्मवेड जाऊन त्या जागी हे नवें वेड आले, इतकेंच. खरी समता या पृथ्वीवर पूर्वी केव्हांहि नव्हती, सध्या नाही, आणि पुढेहि कधी होणार नाही. सर्वांची स्थिति एकसारखी असणे ही गोष्ट शक्य कोटीतील तरी आहे काय? राजा आणि रंक यांस जेथें एकसारखाच मान मिळतो असें ठिकाण या पृथ्वीवर एकच आहे. ते ठिकाण कोणतें ह्मणाल तर स्मशान! सर्वत्र समता उत्पन्न करण्याकरितां सर्व जगाचें स्मशानभूमीत रूपांतर करावे लागेल! जग ज्या स्वरूपाने आपणांस भासत आहे तें रूप त्यास कां प्राप्त झाले, याचा प्रथम विचार केला पाहिजे. सृष्टिमालिकांपैकी आपल्या या एका सृष्टीचा आपण विचार केला, तर अगदी आरंभी ह्मणजे प्रलयकाली जगाचें रूप सध्या आहे तसे नव्हतें असें आपणांस दिसून येईल. त्यावेळी सर्व तत्वें एका महत्तत्वांत लीन होती व जगाला दृश्य स्वरूप नव्हते. अग्नि जसा गारगोटीच्या पोटीं लीनावस्थेत असतां अदृश्य असतो त्याचप्रमाणे जगाची अवस्था होती. ज्या त्रिगुणांच्या साहाय्याने हे जग दृश्य स्थितीस आले आहे, ते तीन गुण ह्मणजे सत्व, रज आणि तम, हे समसमान स्थितींत होते. ह्यांची जी समावस्था ती जगाची लीन अथवा अदृश्य स्थिति होय. जेव्हां या समावस्थेचा भंग होतो, जेव्हां या त्रिगुणांत असमान स्थिति उत्पन्न होते, तेव्हां जग दृश्य होते. ह्मणजे जग दृश्य होण्याकरितां या गुणांत असमानावस्था उत्पन्न व्हावी लागते असे सिद्ध होते. या गुणत्रयांत चढाओढ आणि अहमहमिका सुरू झाली ह्मणजेच जग दृश्य होते. चढाओढीबरोबर कमी अधिकपणा अवश्य येणारच. ज्या अणुरेणूंचें हें जग बनले आहे त्या अणुरेणूंतील चळवळ बंद होऊन त्याची समावस्था झाली तर काय होईल? अशावेळी त्यातून कशाचाहि उत्पत्ति होणे शक्य नाही. आपल्या भौतिक शास्त्रांनी ही गोष्ट प्रत्यक्ष सिद्ध केली आहे. एखाद्या भांड्यांत शांत असलेले पाणी आपण हाताने ढवळले तर त्या पाण्यांतील प्रत्येक बिंदु आपली पूर्वीची समता प्राप्त करून घेण्यासाठी धडपड<noinclude></noinclude>
1xg4uxulcda79cfg22phtllg8cbdecg
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/183
104
63453
229477
159319
2026-04-23T08:43:43Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229477
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|१५५ }}
{{rule}}</noinclude>करतो. सर्व बिंदु एकमेकांच्या आश्रयानें पूर्वस्थिति प्राप्त करून घेण्यासाठी धडपड करीत असतात. त्याच प्रमाणे या विश्वांतील यच्चयावत् पदार्थ आपल्या पूर्वीच्या समानावस्थेस जाण्याकरितां धडपडत आहेत. अशी समानावस्था प्राप्त होते न होते तोच पुन्हां एखादा आघात होऊन तो समानावस्थेचा बिघाड करतो व जग पुन्हां दृश्यावस्थेस येते. यावरून असमानावस्था हेच जगाच्या दृश्यस्वरूपाचे आदिकारण आहे असे सिद्ध होते. तसेच जग दृश्यस्वरूपास येण्याकरितां आघाताची जशी जरूर आहे, त्याचप्रमाणे त्याकारितां समावस्थेस जाऊ पाहणाऱ्या गुणांचीहि आवश्यकता आहे.<br>{{gap}}यावरून गुणत्रयाची सर्वत्र समता उत्पन्न झाल्याशिवाय जगांत समानता उत्पन्न होणे ही गोष्ट अगदी अशक्य कोटींतली आहे, हे सिद्ध झाले. गुणत्रयाची समावस्था सर्वत्र आणि एकाच काली उत्पन्न होईल ही गोष्ट शक्य नाही. गुणत्रयाची समावस्था उत्पन्न होऊ लागली तर त्यावेळी जगांत सध्या असलेले सर्व पदार्थ निराळ्या स्थितींत जाऊ लागतील. ज्या दोन वायूंचे पाणी बनले आहे, त्यांतील गडबड बंद झाली ह्मणजे पाण्याचे अस्तित्व नाहीसे होईल. अशा रीतीनें पदार्थमात्राचे रूपांतर होऊ लागले ह्मणजे आपणा मनुष्यांस जीव धारण करणे शक्य आहे काय? ह्मणजे ज्या काली पदार्थमात्रांत समता उत्पन्न होईल, त्याच क्षणी हे जग आपणांस राहावयास अयोग्य होऊन जग ह्मणजे एक मोठी स्मशानभूमि होऊन राहील! स्मशानांत मात्र खरी समता असते, हे आपण नित्य पाहत आहोंच! या एकंदर विवेचनावरून सर्वत्र समता आणि बंधुभाव उत्पन्न करण्याचे आपले प्रयत्न किती बालिशतेचे आहेत, हे आपल्या लक्ष्यांत आलेंच असेल. हे प्रयत्न केवळ बालिशतेचे आहेत येवढेच नव्हे, तर ते फलद्रूप करण्याच्या प्रयत्नांत आपणांस यश आलेच तर त्याच दिवशी प्रलयकाल सुरू होईल! मनुष्यांमनुष्यांत जो फरक आढळतो त्याचे कारण काय? दोन मनुष्यांच्या मेंदूत जो फरक असतो तोच पुढील अवस्थेत असमता उत्पन्न करतो, असें ह्मणणे वावगे होणार नाही. एकाच दिवशी जन्मलेली चार मुले आपण पाहिली तरी त्यांच्या मेंदूत फरक असतोच, असे शास्त्रज्ञ आपणांस सांगतात. सर्व मनुष्यांचे मेंदु सारख्याच शक्तीचे असतात, असें निवळ वेड्यावांचून सध्याच्या काली तरी कोणी ह्मणणार नाही. आपण ज्या शस्त्रास्त्रांनी सिद्ध होऊन या जगांत अवतरतो त्या शस्त्रास्त्रांत आरंभीच फरक असतो. हा फरक गर्भावस्थेतच उत्पन्न झालेला असतो.<noinclude></noinclude>
dgt89a8ttbfx6vwu5r1l1r2m0d8js5c
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/184
104
63454
229478
159320
2026-04-23T08:46:25Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229478
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१५६ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>गर्भावस्थेतून बाहेर येऊन आपण जगांत वावरूं लागलों ह्मणजे बुद्धीच्या कमी अधिकपणास दृश्य स्वरूप येऊ लागते. बुद्धीचा कमी अधिकपणा नाहीसा करणे शक्य आहे काय? तुमच्या या देशांत (अमेरिकेंत) मूळचे लोक- ज्यांना तुह्मी इंडियन लोक ह्मणतां- हजारों वर्षे राहत होते. त्यानंतर तुमचे मूठभर पूर्वज येथे आले. त्यावेळची स्थिति पाहिलेला एखादा मनुष्य सध्या येथे आला, तर त्यावेळच्या आणि सध्यांच्या स्थितीत त्यास जमीनअस्मानाचे अंतर दिसून येईल. पूर्वीचा देश तो हाच, ही गोष्ट त्यास खरीहि वाटणार नाही. अमेरिकन इंडियन लोकांनी हजारों वर्षे या देशांत राहून एखादें तरी शहर वसविलें होतें काय? एखादा कारखाना तरी त्यांनी उभारला काय? त्यांनी असें कां केलें नाही? जन्मतः सर्वांच्या बुद्धीचे प्रमाण जर एकसारखें आहे, तर तुमच्या मूठभर पूर्वजांनी जी गोष्ट थोड्याशा अवधींत करून दाखविली तीच हजारों वर्षे वस्ती करून राहिलेल्या हजारों इंडियनांस कां करितां आली नाहीं बरें? तुमच्या पूर्वजांबरोबर या भूमीत आलेली बुद्धिमत्ता निराळ्या प्रकारची होती. त्यांचे निराळे पूर्वसंस्कार त्यांजबरोबर आले होते; व येथें अनुकूल भूमि सांपडतांच त्या संस्कारांस दृश्यस्वरूप येऊन झोंपड्यांची इंद्रभुवनें आणि वनांची उपवनें बनली. सर्वत्र समावस्था ह्मणजे मृत्यूचे साम्राज्यच होय! जोपर्यंत जग आहे तसेंच चालेल, तोपर्यंत त्यांतील विषमावस्था कधीहि नाहीशी होणार नाही, आणि सर्वत्र समता उत्पन्न करून जगाला सुखी करण्याचा आपला प्रयत्न प्रलयकाली मात्र सिद्ध होईल! प्रलयकालावांचून इतर कोणत्याहि काली समावस्था शक्य नाही. असें आहे तरी सुद्धा या कल्पनेने प्रेरित असे महत्वाचे अनेक उद्योग सुरू आहेत, ही गोष्ट विसरता कामा नये. जग दृश्यस्वरूपास येण्यास ज्याप्रमाणे असमतेची जरूर आहे, त्याचप्रमाणे ती असमता अधिक होऊ नये अशा प्रयत्नांचीहि जगाच्या स्थितीस जरूर आहे. अशा मार्गानी प्रयत्न करून मनुष्य आपल्या मूळच्या सच्चिदानंदस्वरूपास परत जातो. आपल्या मूळच्या स्वरूपास परत जाण्याची इच्छा न उद्भवती तरीसुद्धां जगाला दृश्यस्वरूप प्राप्त झाले नसतें. ह्मणजे जग दृश्यस्वरूपास येण्यास व त्याची स्थिति कायम राहण्यास, पूर्वस्वरूपास परत जाण्याची इच्छा आणि असमता या दोहोंचीहि सारखीच आवश्यकता आहे. याकरितां जगाची स्थिति बदलण्याचा यत्न करणारे आणि ती स्थिति कायम ठेवू पाहणारे अशा दोन्ही प्रकारच्या मनुष्यांची जगास जरूर आहे. या दोहोंपैकी जी एक इच्छा अंतःकरणांत प्रबळ असते तिला<noinclude></noinclude>
rrhsjzweb1lax0fgh34jcym9atlyn1o
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/185
104
63455
229479
159321
2026-04-23T08:49:59Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229479
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|१५७ }}
{{rule}}</noinclude>अनुरूप असा हेतु उत्पन्न होतो व त्या हेतूस अनुसरून मनुष्य कर्मास प्रवृत्त होतो. जगाला जोपर्यंत अस्तित्व आहे, तोपर्यंत हे दोन्ही प्रकार कायम राहणारच व हे दोन्ही प्रकार कायम आहेत तोपर्यंतच जगाला अस्तित्व असणार; असा हा परस्परावलंबी संबंध आहे.<br>{{gap}}या प्रचंड संसारचक्राच्या पोटांत इतर अनेक चक्रांची इतकी भयंकर गुंतागुंत आहे की, आपला हात त्यांत कोठेहि एकवेळ गुंतला, की ही चक्रे आपणांस आंत ओढून शुष्क करून टाकण्यास चुकत नाहीत. आपण एखाद्या कर्मास प्रवृत्त झालों, ह्मणजे तें कर्म संपल्याबरोबर आपणांस विश्रांति मिळेल अशी आपली अपेक्षा असते. परंतु आपल्या हातचे कर्म अर्धवट झाले न झालें तोंच आपल्या पाठीशी दुसरें कर्म दत्त ह्मणून उभे राहते. आज आपण सर्वजण या प्रचंड चक्राच्या सपाट्यांत सांपडलो आहों. यांतून सुटण्यास आपणास दोनच मार्ग आहेत. पहिला मार्ग असा आहे की या चक्राशी आपला काही संबंधच येऊ द्यावयाचा नाही. ह्मणजे सर्व वासनांचा त्याग एका क्षणींच करावयाचा. सांगतांना हे फार सोपे वाटते, पण करणे मात्र जवळ जवळ अशक्य आहे. '''"बोल बोलतां वाटे सोपें । करणी करतां टीर कांपे ।'''' हा अनुभव कोणास नाही? कोट्यवधि मनुष्यांत असा एखादा असला तर असेल. दुसरा मार्ग हा की, या चक्रांच्या भेसूर स्वरूपाला न भितां एकदम त्यांत उडी घालावयाची व ती कशी फिरतात, कशाच्या जोरावर फिरतात आणि मधूनच त्यांतून निसटण्यास कोठे रस्ते आहेत की काय, इत्यादि रहस्याचा शोध करावयाचा. हे रहस्य सांपडले की, चक्रांचे धनीपण आपणांस प्राप्त होते. हेच रहस्य आपल्या स्वाधीन करणे, हा कर्मयोगाचा उद्देश आहे. या चक्रव्यूहाला भिऊन पळून जाऊ नका. पळून जाऊन रक्षण होणे शक्य नाही. तर मग निधड्या छातीने एकदम आंत शिरून बाले किल्ला हस्तगत करा, ह्मणजे तुमचे काम झाले. या कामास फार चातुर्याने हात घातला पाहिजे. आंत शिरून योग्य मार्गाने तुह्मीं गेलां, तर सुरक्षितपणे बाहेर पडण्याचा मार्गहि तुह्मांस आपोआप दिसेल.<br>{{gap}}कर्म ह्मणजे काय याचा विचार आपण पूर्वी एक वेळ केलाच आहे. जगाचे अस्तित्वच कर्मावर अवलंबून आहे हेहि आपणांस समजून आले आहे. तसेच जगाला सुखी करूं पाहणें हें मुर्खपणाचें व सर्वथैव अशक्य आहे, हेहि आपणांस कळून आले आहे. अंतःकरणापासून ईश्वराच्या अस्तित्वावर ज्यांचा खरा विश्वास असतो त्यांस हे लवकर पटते. आपल्या मदतीची अपेक्षा करण्याइतका परमेश्वर लंगडा-<noinclude></noinclude>
mgcm93k85acvegj89rfaptxvfvhh3pe
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/186
104
63456
229480
159322
2026-04-23T08:52:49Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229480
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१५८ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>लुला नाही, ही गोष्ट ते केव्हांहि विसरत नाहीत. जग जसें चालले आहे तसें चालणारच. आपले काम मुक्ति मिळविण्याचे आहे, आणि अत्यंत निःस्वार्थी होणे हा मुक्तीचा मार्ग आहे. कर्म करीत असतांच निःस्वार्थी होणे आणि निःस्वार्थी होऊन मुक्ति मिळविणे यालाच कर्मयोग ह्मणतात. जगाला सुखी करण्याची ही कल्पना धर्मवेड्या लोकांना कार्यरत ठेवण्यास उपयोगी पडते ही गोष्ट खरी, पण धर्मवेडापासून जसे काही चांगले कार्य होते, तसेच अनेक अहितकर भावना त्यापासून निर्माण होतात, ही गोष्टहि खरी आहे. आपण मुक्त व्हावे अशी जी लालसा प्रत्येक वस्तूंत आढळते, तिला अनुसरून वस्तुमात्र प्रयत्न करीतच असते. ही इच्छा इतकी बलवती आहे की, ती तुह्मांस स्वस्थ बसू देणारच नाही. मग कर्मास प्रवृत्त करण्यास बाहेरील एखाद्या शक्तीची अपेक्षा का असावी, असा आपणांस कर्मयोगाचा प्रश्न आहे. 'मी अमुक करीन आणि त्याचे तमुक फल भोगीन' इत्यादि लौकिक विचार झुगारून देऊन फलासक्ति न ठेवतां कर्म करा. सतत अभ्यासाने हे सर्व साध्य होण्याजोगे आहे असें कर्मयोगाचे सांगणे आहे. स्वतःच्या इंद्रियजन्य सुखार्थ कर्म करावयाचे नाही, अशा भावनेनेच कर्म करण्याचा अभ्यास सुरू केला, ह्मणजे स्वार्थाचा समूळ लोप होऊन, परार्थ हाच कर्त्याच्या जीविताचा एक घटक होऊन बसतो. आपल्या हातून परार्थ न घडेल तर जगणेहि योग्य नाही, इतकी उत्कट भावना त्याच्या ठिकाणी उत्पन्न होऊ लागते. असें आहे तर कार्यरत राहण्यास चालकशक्ति बाहेरून येण्याची अपेक्षा कां करावी? अमुक कार्य चांगले आहे असे आपणांस वाटले, तर तें करण्यास आपली सदोदित तयारी असली पाहिजे. त्यांत स्वतःच्या सुखाची अपेक्षा मुळीच असतां कामा नये. इहलौकिक सुखाची अपेक्षा तर राहोच, परंतु स्वर्गसुखाच्या अपेक्षेने केलेले सत्कर्मसुद्धां आत्म्यास बद्धक होते. स्वार्थांची यत्किचिहि छटा शिल्लक असेपर्यंत केलेले प्रत्येक कर्म मुक्तिपथापासून आपणांस दूर ठेवतें; येवढेच नव्हे, तर आपणाभोंवतीं अगोदरच असलेल्या शृंखलेत त्या कर्माच्या योगाने आणखी एका दुव्याची भर पडते.<br>{{gap}}यासाठी कर्मयोगाचे त्रिवार सांगणे हेच आहे की, प्रत्येकाने कर्म करीत असतां फलाची आसक्ति ठेवू नये. जग हे आमच्यासाठी उत्पन्न झाले नाहीं; अथवा आम्हीही जगासाठी उत्पन्न झालों नाही. कोणी कोणाचे बरें अगर वाईट करूं शकत नाही. तसेंच बाह्यशरीरावरून दिसून येतें तें आमचे स्वरूप नव्हे. अनेक कर्मे करून फळे भोगतांना जरी आह्मी दिसलों, तरी<noinclude></noinclude>
enoczc4dcnqmhwzchzwy8nxo7zoot5r
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/187
104
63457
229481
159323
2026-04-23T08:55:30Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229481
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|१५९ }}
{{rule}}</noinclude>तें आमचे खरे स्वरूप- मूळरूप- नाही. आमचे खरे रूप ह्मणजे सच्चिदानंदरूप हेच आहे. आह्मी कर्म करतांना आढळलों, तरी वस्तुतः आह्मी काहीच करीत नाही. असें आहे तर, आह्मी सध्याचा बंदिवास कां भोगावा? या बंदिवासांतून मुक्त होण्याचा राजमार्ग एकच आहे. अत्यंत अनासक्त चित्ताने केलेले प्रत्येक कर्म आमच्या पायांतील शृंखलेचा एक एक दुवा तोडीत असते. चित्त अनासक्त असतां त्यांतून एखादाहि शुभ विचार निघून जगांत संचार करूं लागला तर त्या विचारालाहि असला एखादा दुवा तोडण्याचे सामर्थ्य येते; व अशा रीतीने शुद्धीकरणाची क्रिया पूर्ण होऊन आह्मी अत्यंत पवित्र बनतो. आतांपर्यंत केलेले सर्व विवेचन इतकें उघड असतांहि निव्वळ वेड्याची बडबड आहे, असे समजणारे वेडेपीर अस्तित्वांत आहेत. कर्मयोग हा निवळ बोलण्याचा विषय असून तो कृतींत येणे अशक्य आहे, असें ह्मणणारे अनेक लोक माझ्या पाहण्यांत आले आहेत. काही तरी हेतु असल्याशिवाय मनुष्याच्या हातून कोणतेंहि कर्म घडणे शक्य नाही व यासाठी गीताप्रतिपादित मार्ग दिसण्यास चांगला दिसला, तरी तो सर्वथा अव्यवहार्य आहे, असें ह्मणणारे अनेक लोक मला भेटले. परंतु यांतील तात्पर्य इतकेंच की, अनासक्तचित्ताने कर्मे करणारे कर्मयोगी त्यांच्या पाहण्यांत आले नसल्याने ते असें बोलतात. केवळ परोपकारार्थ कर्म करणे ही गोष्ट धर्मवेड्यासच शक्य आहे, असे त्यांस वाटते.<br>{{gap}}कर्मयोगाने दाखविलेला मार्ग पूर्ण व्यवहार्य आहे, ही गोष्ट भगवान् बुद्धानें तो मार्ग स्वतः पूर्णपणे आचरून प्रत्यक्ष सिद्ध करून दाखविली आहे. कर्मयोगाचा आचार प्रत्यक्ष करून दाखविणारा असा हा एकच महात्मा या भूतलावर झाला. जगांत आजपर्यंत जितके धर्मप्रवर्तक झाले, त्यांच्या चरितांत कोणताना कोणता तरी हेतु प्रधान होता. अगदी अहेतुक असें चरित एकट्या बुद्धाचेंच आहे. बुद्धाखेरीज जितके धर्मप्रवर्तक होऊन गेले, त्यांत मुख्यतः दोन प्रकार आढळतात. आपण प्रत्यक्ष परमेश्वराचे अवतार आहों असें कांहीं प्रवर्तक ह्मणत, हा एक प्रकार; आणि आपण परमेश्वराचे केवळ दूत असून त्याचा संदेश मनुष्यजातीस पोहोचवावयाचा हे आपले काम आहे, असें ह्मणणारे प्रवर्तक हे दुसऱ्या प्रकारचे होत. या प्रकारचे प्रवर्तक कितीहि उच्च दर्जाचे असले व त्यांची धर्मबुद्धि कितीहि श्रेष्ठ असली, तरी त्यांची कर्मे अगदी अनासक्त चित्ताने केलेली होती असें ह्मणवत नाही. कसल्या तरी प्रतिफलाची अपेक्षा त्यांस होतीच. एका वादविवादाचे प्रसंगी भगवान् बुद्ध ह्मणाला, "ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल<noinclude></noinclude>
j4i5vwyasstsotoq2pwztl3y1559ert