विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.46.0-wmf.24 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk चर्चा:ज्ञानेश्वरी/अध्याय सातवा 1 7504 229483 18126 2026-04-23T20:37:06Z ~2026-25046-07 6009 /* Error! */ नवीन विभाग 229483 wikitext text/x-wiki adhyay copy paste kiya hai 6&7 same hai pls chack it == Error! == Adhyaya 6 and 7 are SAME! Please fix! [[विशेष:योगदान/~2026-25046-07|~2026-25046-07]] ([[सदस्य चर्चा:~2026-25046-07|talk]]) ०२:०७, २४ एप्रिल २०२६ (IST) occvuva1glyakqn9bzlny3yysbbdrbe अनुक्रमणिका:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf 106 57614 229500 229036 2026-04-24T10:35:24Z कल्पनाशक्ती 3813 229500 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड) |Language=mr |Volume=खंड क्र.१ |Author=[[:mr:स्वामी विवेकानन्द|स्वामी विवेकानन्द]] [[:en:|Swami Vivekananda]] |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=जी. एन. कुलकर्णी |Address=मुंबई |Year=1912 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=C |Pages=<pagelist 8 ="प्रकाशकाची प्रस्तावना" 12="भगिनी निवेदिता यांचा उपोद्धात" 26="अनुक्रमणिका" 31="सर्व धर्मांच्या परिषदेपुढे दिलेली व्याख्याने" 54="आत्मा, परमेश्वर आणि धर्म" 67="हिंदुधर्म" 73="कर्मयोग" 191="धर्म म्हणजे काय?"/> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} ry5z7oy0befe3mzkb49tygouhe1jqv7 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/188 104 63458 229498 159324 2026-04-24T10:32:54Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229498 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१६० |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>अथवा आत्म्याच्या स्वरूपाविषयी तुमच्या अनेक प्रकारच्या उपपत्ति ऐकण्याची माझी इच्छा नाही. परमेश्वर असला अथवा नसला तरी त्यामुळे माझ्या दानतीवर बरावाईट परिणाम काय होणार आहे? असले तुषकंडन करून कालक्षेप करण्यापेक्षा सन्मार्गवर्ति होण्यांत गेलेला वेळ सत्कार्थी तरी लागेल. स्वतःच्या सुखाची यत्किंचितहि पर्वा न करतां परोपकारार्थ कर्म करा, ह्मणजे सत्य ह्मणून जे काय असेल, त्याची तुह्मांस प्रत्यक्ष भेट होऊन तुह्मी मुक्त व्हाल." त्याच्या एकंदर जीवितयात्रेत स्वतःच्या सुखाबद्दलचा विचार त्यास शिवलासुद्धा नाही. त्याचे चित्त इतकें अहेतुक असतांहि त्याने केलेल्या कार्याचा शतांशहि इतर कोणी करून दाखविल्याचे आढळत नाही. जगाच्या इतिहासांत इतक्या अनासक्त चित्ताने एवढा मोठा कार्यभाग केल्याचे दुसरें एकहि उदाहरण आपणांस सांपडणार नाही. पृथ्वीवर मनुष्यजात अस्तित्वात आल्यापासून 'अनामिका सार्थवती' करणारे असे हे एकच नररत्न आजपर्यंत उदयास आलें. केवळ परार्थचिंतन, निःसीम त्याग आणि अत्यंत निरपेक्षबुद्धि यांचा मनोहर संयोग इतर कोठेहि तुह्मांस आढळणार नाही. अत्यंत उच्चप्रतीचे तत्वज्ञान सांगत असतां नीचतम प्राण्याबद्दलहि अत्यंत कळकळ त्याच्या अंतःकरणांत वास करीत होती. 'मी' आणि 'माझें' या शब्दांचे अर्थहि तो विसरला होता. कर्मयोगाचा शुद्ध आदर्श पहावयाचा असेल तर तुह्मी बुद्धाकडे पहा. अहंकाराची छटासुद्धा त्याच्या हृदयांत नव्हती. बुद्धि आणि अंतःकरण या दोहोंचीहि परिपक्क दशा एकत्र कोठे पाहणे असेल तर बुद्धावांचून ती दुसऱ्या कोठेहि आढळणार नाही. जीवात्म्याचे याहून अधिक उज्वल असें रूप दुसऱ्या कोठेहि सांपडणार नाही. मनुष्यजात सन्मार्गवर्ति व्हावी एवढ्याचसाठी खटपट करणारा असा हा पहिला महात्मा होय. एके वेळी तो आपल्या शिष्यांस ह्मणाला, “अमुक गोष्ट अमक्या जुन्या ग्रंथांत सांगितली आहे, एवढ्यावरूनच ती सत्य ह्मणून गृहीत धरूं नका. तुमचे आप्तइष्ट अमुक गोष्ट खरी मानतात, एवढ्यावरूनच ती तुझी खरी मानूं नका. लहानपणापासून वडिलांनी अमुक गोष्ट सांगितली, एवढ्यावरूनच तुह्मी ती खरी मानूं नका. जें जें तुह्मी ऐकाल तें तें सर्व आपल्या बुद्धीच्या कसोटीवर घांसून पहा. जर तें उत्तम ठरले तर तें खरें माना, त्याचा प्रत्यक्ष आचार करा; इतरांस तें सांगा आणि तसे करण्यास इतरांस मदत करा." 'जुनें तें सोने' असें ह्मणण्याची साऱ्या जगाची प्रवृत्ति असतां त्या प्रवृत्तीविरुद्ध उघडपणे उपदेश करणारा वीर किती निधड्या छातीचा असला पाहिजे, याचा तुह्मीच विचार करा.{{nop}}<noinclude></noinclude> ikp4lc6g538pobqjmp9diagrobis1hw पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/189 104 63459 229499 159325 2026-04-24T10:34:10Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229499 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|१६१ }} {{rule}}</noinclude>'केवळ मोठ्या नांवावर भुलू नका' असा उपदेश उघडपणे करणारा महात्मा आजपर्यंत दुसरा कोणीहि झाला नाही. अत्यंत अनासक्त चित्ताने कर्म करून बुद्धाची पदवी मिळविणे तुह्मांसहि अशक्य नाही. साऱ्या जगाला नवे वळण लावण्याचे सामर्थ्य तुह्मांसहि प्राप्त करून घेता येण्याजोगे आहे. हे तुझांस साधलें तर कर्मयोगाचे आदर्श असे तुह्मी व्हाल. 'नर करणी करे तो नरका नारायण होत.' असें सत्पुरुषांनी आश्वासन दिले आहे.
{{center|{{x-larger|ॐ शांतिः शांतिः शांतिः।}}}}

{{rule|11em}}{{nop}}<noinclude>
{{gap}}स्वा. वि. ११</noinclude> htx2l4rscl02pa2zdy48dbdnfo3uznz पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/190 104 63460 229497 159326 2026-04-24T10:21:05Z कल्पनाशक्ती 3813 /* मजकुराविना */ 229497 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="0" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><noinclude></noinclude> 6pewiyyebyc8m42d8lu6xlv59f2mxdm पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/191 104 63461 229501 159327 2026-04-24T10:40:51Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229501 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|{{xx-larger|'''धर्म म्हणजे काय?''' ?}}}} {{gap}}आगगाडीच्या रुळांवरून एक प्रचंड एंजिन झपाट्याने धावून येत आहे. त्यांपैकी एका रुळावर एक अगदी लहानसा किडा बसला आहे. एंजिन जवळ येऊ लागल्याबरोबर त्याची जाणीव त्या किड्याला होते आणि रुळावरून बाजूला सरपटून तो आपला प्राण वाचवितो. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्या नेहमी पाहण्यांत येतात. तो किडा पाहिला तर किती लहानसा प्राणी! एखाद्या लहानशा आघातानेंहि बिचारा मरून जावयाचा. तें एंजिन पाहिले तर केवढें अजस्र. त्याचे शरीर आणि शक्ति एखाद्या राक्षसासारखी विशाल! परंतु एंजिन कितीहि मोठे आणि शक्तिमान् असले तरी तें जड इंजिन; आणि किडा कितीहि सूक्ष्म असला तरी तो जिवंत प्राणी. त्या एंजिनाचा लहानसा धक्का त्या किड्याला लागता, तर त्या किड्याचा मागमूसहि या सृष्टीत राहिला नसता! असें आहे तरी आपल्या दृष्टीने त्या किड्याची योग्यता त्या राक्षसी एंजिनापेक्षा अधिक आहे. कारण किडा कितीहि सूक्ष्म असला तरी अनंत चैतन्याचा तो एक स्फुलिंग आहे. अनंत चैतन्य त्या सूक्ष्म देहांत अंशतः प्रकट झाले आहे. एका दृष्टीने पाहिले तर एंजिनहि जिवंत प्राण्याप्रमाणे हालचाल करिते. मग त्याच्या हालचालींत आणि त्या किड्याच्या हालचालींत फरक आहे, ही भावना आपल्या ठिकाणी कोठून येते? हालचाल करणारा एवढासा किडा, तशीच हालचाल करणाऱ्या प्रचंड एंजिनाहून आपणांस मोठा वाटतो तें कां? एंजिनाने कितीहि हालचाल केली तरी तें मृत आहे- जड आहे- असे आपण ह्मणतो. किडा कितीहि लहान असला तरी तो जिवंत प्राणी आहे असे आपल्या मनांत येतें. दोहोंच्या हालचाली पाहून आपल्या मनांत अगदी विरुद्ध भावना उत्पन्न होतात त्या कां, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. त्याचे कारण असे आहे की एंजिनाने कितीहि हालचाल केली, तरी ती हालचाल मर्यादित आहे. एंजिन बनविणाराने जें कांही सामर्थ्य त्या एंजिनाच्या अंगी ठेविले असेल, त्या मर्यादेचे उल्लंघन तें कधीहि करूं शकणार नाही. परंतु जिवंत प्राण्याची गोष्ट याहून वेगळी आहे. हालचाल कोणत्या प्रकारची व किती करावी हे ठरविण्याची त्याला पूर्ण स्वतंत्रता आहे. त्याने अमुक मर्यादेतच राहिले पाहिजे अशी जबरी त्यावर कोणी करूं शकत नाही. त्याच्या ठिकाणी उदित झालेल्या बुद्धीचा उपयोग करण्याची त्याला<noinclude></noinclude> 1cuyv93f9cpcg1raa13g1vtd3xg6jch 229502 229501 2026-04-24T10:41:44Z कल्पनाशक्ती 3813 229502 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>
{{center|{{xx-larger|'''धर्म म्हणजे काय?''' ?}}}} {{rule|6em}}
{{gap}}आगगाडीच्या रुळांवरून एक प्रचंड एंजिन झपाट्याने धावून येत आहे. त्यांपैकी एका रुळावर एक अगदी लहानसा किडा बसला आहे. एंजिन जवळ येऊ लागल्याबरोबर त्याची जाणीव त्या किड्याला होते आणि रुळावरून बाजूला सरपटून तो आपला प्राण वाचवितो. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्या नेहमी पाहण्यांत येतात. तो किडा पाहिला तर किती लहानसा प्राणी! एखाद्या लहानशा आघातानेंहि बिचारा मरून जावयाचा. तें एंजिन पाहिले तर केवढें अजस्र. त्याचे शरीर आणि शक्ति एखाद्या राक्षसासारखी विशाल! परंतु एंजिन कितीहि मोठे आणि शक्तिमान् असले तरी तें जड इंजिन; आणि किडा कितीहि सूक्ष्म असला तरी तो जिवंत प्राणी. त्या एंजिनाचा लहानसा धक्का त्या किड्याला लागता, तर त्या किड्याचा मागमूसहि या सृष्टीत राहिला नसता! असें आहे तरी आपल्या दृष्टीने त्या किड्याची योग्यता त्या राक्षसी एंजिनापेक्षा अधिक आहे. कारण किडा कितीहि सूक्ष्म असला तरी अनंत चैतन्याचा तो एक स्फुलिंग आहे. अनंत चैतन्य त्या सूक्ष्म देहांत अंशतः प्रकट झाले आहे. एका दृष्टीने पाहिले तर एंजिनहि जिवंत प्राण्याप्रमाणे हालचाल करिते. मग त्याच्या हालचालींत आणि त्या किड्याच्या हालचालींत फरक आहे, ही भावना आपल्या ठिकाणी कोठून येते? हालचाल करणारा एवढासा किडा, तशीच हालचाल करणाऱ्या प्रचंड एंजिनाहून आपणांस मोठा वाटतो तें कां? एंजिनाने कितीहि हालचाल केली तरी तें मृत आहे- जड आहे- असे आपण ह्मणतो. किडा कितीहि लहान असला तरी तो जिवंत प्राणी आहे असे आपल्या मनांत येतें. दोहोंच्या हालचाली पाहून आपल्या मनांत अगदी विरुद्ध भावना उत्पन्न होतात त्या कां, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. त्याचे कारण असे आहे की एंजिनाने कितीहि हालचाल केली, तरी ती हालचाल मर्यादित आहे. एंजिन बनविणाराने जें कांही सामर्थ्य त्या एंजिनाच्या अंगी ठेविले असेल, त्या मर्यादेचे उल्लंघन तें कधीहि करूं शकणार नाही. परंतु जिवंत प्राण्याची गोष्ट याहून वेगळी आहे. हालचाल कोणत्या प्रकारची व किती करावी हे ठरविण्याची त्याला पूर्ण स्वतंत्रता आहे. त्याने अमुक मर्यादेतच राहिले पाहिजे अशी जबरी त्यावर कोणी करूं शकत नाही. त्याच्या ठिकाणी उदित झालेल्या बुद्धीचा उपयोग करण्याची त्याला<noinclude></noinclude> 0glvqb92zy7tv6zjzlmyas1e78t7d4d 229503 229502 2026-04-24T10:42:06Z कल्पनाशक्ती 3813 229503 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>
{{center|{{xx-larger|'''धर्म म्हणजे काय ?'''}}}} {{rule|6em}}
{{gap}}आगगाडीच्या रुळांवरून एक प्रचंड एंजिन झपाट्याने धावून येत आहे. त्यांपैकी एका रुळावर एक अगदी लहानसा किडा बसला आहे. एंजिन जवळ येऊ लागल्याबरोबर त्याची जाणीव त्या किड्याला होते आणि रुळावरून बाजूला सरपटून तो आपला प्राण वाचवितो. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्या नेहमी पाहण्यांत येतात. तो किडा पाहिला तर किती लहानसा प्राणी! एखाद्या लहानशा आघातानेंहि बिचारा मरून जावयाचा. तें एंजिन पाहिले तर केवढें अजस्र. त्याचे शरीर आणि शक्ति एखाद्या राक्षसासारखी विशाल! परंतु एंजिन कितीहि मोठे आणि शक्तिमान् असले तरी तें जड इंजिन; आणि किडा कितीहि सूक्ष्म असला तरी तो जिवंत प्राणी. त्या एंजिनाचा लहानसा धक्का त्या किड्याला लागता, तर त्या किड्याचा मागमूसहि या सृष्टीत राहिला नसता! असें आहे तरी आपल्या दृष्टीने त्या किड्याची योग्यता त्या राक्षसी एंजिनापेक्षा अधिक आहे. कारण किडा कितीहि सूक्ष्म असला तरी अनंत चैतन्याचा तो एक स्फुलिंग आहे. अनंत चैतन्य त्या सूक्ष्म देहांत अंशतः प्रकट झाले आहे. एका दृष्टीने पाहिले तर एंजिनहि जिवंत प्राण्याप्रमाणे हालचाल करिते. मग त्याच्या हालचालींत आणि त्या किड्याच्या हालचालींत फरक आहे, ही भावना आपल्या ठिकाणी कोठून येते? हालचाल करणारा एवढासा किडा, तशीच हालचाल करणाऱ्या प्रचंड एंजिनाहून आपणांस मोठा वाटतो तें कां? एंजिनाने कितीहि हालचाल केली तरी तें मृत आहे- जड आहे- असे आपण ह्मणतो. किडा कितीहि लहान असला तरी तो जिवंत प्राणी आहे असे आपल्या मनांत येतें. दोहोंच्या हालचाली पाहून आपल्या मनांत अगदी विरुद्ध भावना उत्पन्न होतात त्या कां, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. त्याचे कारण असे आहे की एंजिनाने कितीहि हालचाल केली, तरी ती हालचाल मर्यादित आहे. एंजिन बनविणाराने जें कांही सामर्थ्य त्या एंजिनाच्या अंगी ठेविले असेल, त्या मर्यादेचे उल्लंघन तें कधीहि करूं शकणार नाही. परंतु जिवंत प्राण्याची गोष्ट याहून वेगळी आहे. हालचाल कोणत्या प्रकारची व किती करावी हे ठरविण्याची त्याला पूर्ण स्वतंत्रता आहे. त्याने अमुक मर्यादेतच राहिले पाहिजे अशी जबरी त्यावर कोणी करूं शकत नाही. त्याच्या ठिकाणी उदित झालेल्या बुद्धीचा उपयोग करण्याची त्याला<noinclude></noinclude> 53jetbxek5pasow2x9a6y1xskpyjqfg पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/192 104 63462 229504 159328 2026-04-24T10:47:44Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229504 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१६४ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>पूर्ण मुभा आहे. एंजिन कितीहि मोठे असले तरी त्याच्या ठिकाणी बुद्धि नसल्यामुळे ते केवळ परतंत्र आहे. सजीव प्राण्याच्या ठिकाणी स्वतंत्र होण्याची जी इच्छा दिसून येते, त्या स्वातंत्र्यासाठी- मुक्तीसाठी- आमची सारी धडपड चाललेली आहे. हल्लींच्या स्थितीहून अधिक स्वातंत्र्याची स्थिति कशी प्राप्त होईल या विचारांत आपण सर्व गढलों असून बुद्धिदर्शित मार्गाने चालू असलेले आपले सर्व प्रयत्नहि याच साध्याच्या प्राप्तीकरितां आहेत. पूर्णपणे स्वतंत्र होणे- मुक्त होणे ह्मणजेच पूर्णत्व पावणे होय. पूजनाचे जे जे विधि व आचार आज जगांत दिसून येतात, त्यांच्या मुळाशी हीच इच्छा ग्रथित झालेली आहे. आपलें साध्य मुक्ति हे आहे, ही गोष्ट कोणास समजत असेल अथवा कोणास समजत नसेल, पण प्रत्येकाचे प्रयत्न मात्र त्याच दिशेने चालू आहेत, ही गोष्ट निश्चित आहे.
{{gap}}जगावर चालू असलेले पूजाविधि पाहिले तर रानटी स्थितीतील लोक, भुतेंखेतें, राक्षस अथवा स्वतःच्या पूर्वजांचे आत्मे यांचे पूजन करीत असल्याचे आढळून येते. सर्पपूजा, आपल्या टोळीच्या मुख्य देवाची पूजा अथवा पूर्वजांच्या आत्म्याची पूजा ते कां करितात? कांहीं गुप्त कारणांनी भूतपिशाचांना आपणापेक्षा अधिक सामर्थ्य असते आणि आपले सध्याचे स्वातंत्र्यहि हिरावून घेण्याची शक्ति त्यांस आहे, अशी त्यांची भावना असते. यासाठी त्यांना खुष ठेवलें ह्मणजे त्यांजपासून आपणांस कांहीं अडथळा होणार नाही, असा त्यांचा साहजिक समज असतो. तसेच त्यांची मदत मिळाली तर स्वतः फारसे श्रम न करितां आपणांस जरूर असलेल्या वस्तु मिळतात, असाहि त्यांचा समज असतो. या भावनांचे पृथक्करण केले तर त्यांच्या मुळाशी प्रथम सांगितलेली स्वातंत्र्याची लालसा हीच आढळून येते. स्वतःस फारसे श्रम करावे न लागतां आपणांस जरूर असलेल्या वस्तु मिळाल्या ह्मणजे गरजा भागून आपण अधिक स्वतंत्र होऊ असा या भावनांचा तात्विक अर्थ आहे.
{{gap}}कोणाची तरी स्तुति केली अथवा पूजा केली तर तो आपणास अनपेक्षित अशी मदत करील- एखादा चमत्कार करील अशी भावना मानवहृदयात सर्वत्र आढळून येते. कोठून तरी बाहेरून मदत मिळण्याची आशा आपल्या हृदयातून सर्वथैव नष्ट अशी कधीच होत नाही. आपण केवढाहि अट्टहास केला, तरी ही भावना कोणत्याना कोणत्या रूपाने आपल्या हृदयांत घर करून राहतेच; इतकी तिची चिकाटी विलक्षण आहे. फार लांब कशाला, आपण आपल्या मनावर उठणाऱ्या नानाविध तरंगांचे पृथक्करण केले तर जगाचें अंतःस्वरूप- गुप्तरूप- काय आहे याचा विचार<noinclude></noinclude> 8zn73xcxy58tdvy8vdirg7wsctyz3ds पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/193 104 63463 229505 159329 2026-04-24T10:52:00Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229505 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|१६५ }} {{rule}}</noinclude>करण्यांत ते गुंतलेले असते असे आढळून येईल. आपल्यापासून गुप्त असें जगांत कांही असूच नये कशी आपल्या मनाची इच्छा असते. अशी भावना केवळ रानटी लोकांतच अधिक आढळून येते असें कोणी ह्मणेल; पण त्यावर आमचा उलट प्रश्न असा आहे की, त्यांच्या हृदयांत तरी ही भावना आली कोठून? परमेश्वराने एखादा मोठा चमत्कार घडवून स्वर्गलोकींचें सुख आह्मांस याच लोकी द्यावे अशी यहुदी लोकांची इच्छा होती. या गोष्टीस कित्येक शतकें लोटून गेली, तरी तेव्हांपासून सर्व जगहि वस्तुतः हीच इच्छा करीत आहे. हीच गोष्ट अतृप्ततेसहि लागू पडते. जगाच्या आरंभापासून आजतागाईत सर्व अतृप्त असल्याचा प्रत्यय येतो. अमुक एक गोष्ट सिद्ध झाली की आपली तृप्ति होईल, अशा कल्पनेने आपण एखाद्या उद्योगास सुरवात करितो; परंतु आपले काम अर्धेमुर्धे झालें न झालें तों तिसरीच एखादी इच्छा उत्पन्न होऊन अतृप्ति पुनः पहिल्या इतकीच ताजीतवानी असल्याचे आढळून येते, आणि आपले पहिले सारे बेत ढांसळून पुन्हां नव्या उद्योगास आरंभ करावासें वाटू लागते. अमुक एक गोष्ट हवीशी वाटली की तिच्या प्राप्तीकरितां आपण निकराचे प्रयत्न करितो; परंतु ती गोष्ट अंशतः साध्य झाल्याबरोबर तिचा नाद सुटून ती नकोशी वाढू लागते व आपले मन आणखी एखाद्या निराळ्याच गोष्टीकडे वेधले जाते. आपल्या साऱ्या जन्माचा अनुभव आपण चाळून पाहिला तर त्यांत अतृप्तीशिवाय दुसरें कांहीसुद्धां आपणांस आढळून यावयाचे नाही. कशाचीहि आपणांस गरज नाही, असा क्षण आपल्या साऱ्या आयुष्यांत आढळून येणार नाही. या भावनेचे स्वरूप कधीं कमी उघड तर कधी अधिक उघड असते. साऱ्या जगभर जी ही स्थिति आढठून येते ती कां? सर्व मानवजाति मुक्त होण्याकरितां- गरजेच्या पलीकडे जाण्याकरितां- एकसारखी धडपड करीत आहे, हेच या स्थितीचे कारण आहे. मानवी जीविताचा हाच प्रधान हेतु आहे. मूल जन्मास आल्याबरोबर 'कोऽहं' असा टाहो फोडिते. देहबंधनांत सांपडल्याचे त्यास झालेले दुःख तें रडून व्यक्त करतें. आपण स्वतंत्र व्हावें- मुक्त व्हावें- या भावनेपासून सर्वथैव मुक्त असा कोणी प्राणी असावा ही कल्पना ओघानेच उदयास आली. आपण मुक्त व्हावे, स्वतंत्र व्हावें, गरजेच्या पलीकडे जावें या भावनेच्या अत्यंत साहचर्याने असणारी दुसरी भावना ह्मणजे असा मुक्त प्राणी कोणी तरी असावा हीच आहे. या दोन भावना अत्यंत निकटवर्ती आहेत. यामुळे ईश्वराच्या अस्तित्वाची कल्पना मानवी हृदयांत निरंतरची वास करून राहिली आहे. मनुष्याचे अंतःकरण हे<noinclude></noinclude> 8bv7s0pqu7skcr552nczwycalzwhbj9 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/194 104 63464 229506 159330 2026-04-24T10:54:24Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229506 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१६६ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>ज्या भावनांचें समवायीरूप आहे, त्यांपैकींच ईश्वराच्या अस्तित्वाची भावना हा एक घटक आहे. वेदांतमताप्रमाणे सच्चिदानंदरूपाची भावना ही परमेश्वराच्या अस्तित्वाच्या भावनेची अत्युच्च दशा आहे. परमेश्वराबद्दल जो कांहीं कल्पनासमूह आपल्या मनांत वास करीत असेल तो सर्व समूह सच्चिदानंद या एकाच पदाने व्यक्त होतो. आपली ईश्वरविषयक कल्पना कितीहि विस्तार पावली, तरी ती 'सच्चिदानंद' या स्वरूपापलीकडे जाऊ शकतच नाही, असें वेदांताचे मत आहे. सर्व ज्ञानाचा शेवट जेथें होतो व त्यामुळे निरामय आनंदाची प्राप्ति जेथें होते, असें तें सच्चिदानंदरूप आहे. आपण अनंतकालापासून आपल्या या मुक्त होण्याच्या इच्छेस दाबून धरीत आहों. सृष्टींत भासमान होणाऱ्या कार्यकारणभावाच्या नियमांस अनुसरण्यांत अधिक सुरक्षितपणा आहे, अशा भ्रमाने आपल्या अंतःकरणांत उत्पन्न होणाऱ्या भावनांचा कोंडमारा आपण आज अनंतकालापासून करीत आहों; तथापि आपल्या या कोंडमाऱ्यास न जुमानतां आपण मुक्त व्हावें ही भावना पुनःपुनः जोराने आपल्या मनांत उद्भवतेच. कार्यकारणांचा आणि सृष्टीच्या कायद्यांचा बंध उल्लंघून पलीकडे असलेल्या सच्चिदानंदपदास जावे अशी भावना पुनःपुनः आपल्याच चित्तांत येते. आपण कितीहि प्रयत्न केला तरी ही भावना उत्पन्न होण्याचे थांबत नाही. या भावनेचा वास्तविक अर्थ आपल्या ध्यानात येत नाही, तरी मानवी बुद्धीची व दैवी बुद्धीची अहमहमिका आपल्या हृदयांत आपणांस नकळतहि सुरू असतेच; व ही अहमहमिका- हें भांडण- सुरू असेपर्यंत, प्रत्येक मनुष्याचे निराळे अस्तित्व- व्यक्तित्व- शिल्लक असते. किंबहुना व्यक्तिविशिष्टत्व असणे हेच या भांडणाचे कार्य आहे. मानवीबुद्धि आपणांस दृश्य जगाबाहेर जाऊ न देण्याचा यत्न करीत असते व दैवीबुद्धीचा यत्न दृश्य जगाबाहेर नेण्याचा असतो. या दोहोंच्या तंट्याचें जें व्यक्तरूप तेच आपले विशिष्ट वैय्यक्तिक रूप होय.
{{gap}}या जगांत आपण जन्मास आल्याबरोबर जो पहिलाच शब्द व्यक्त करता त्याचाहि अर्थ हाच. 'मी कायद्याने बांधला जाणार नाही; मी कायद्याच्या पलीकडचा आहे' हाच आपल्या पहिल्या ध्वनीचा वास्तविक अर्थ आहे. जोपर्यंत आपण ही सृष्टीची बंधनें पाळीत असतों, तोपर्यंत एखाद्या यंत्रापेक्षा आपली वास्तविक अधिक किंमत नसते. निर्जीव यंत्रांची सर्व हालचाल जशी त्याच्या कर्त्याच्या आधीन असते, तशीच आपली सर्व हालचाल सृष्टीच्या आधीन असते; व अनंतकालाच्या संवयीने आपणांस ही बंधनें फारशी जाचक वाटत नाहीत;<noinclude></noinclude> eoxpmrmiugj7idju7ftsffvi717etyl पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/195 104 63465 229507 159331 2026-04-24T10:57:12Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229507 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|१६७ }} {{rule}}</noinclude>एवढेच नव्हे तर उलट त्या बंधनांत राहणें हेंच इष्ट आहे असेंहि वाढू लागते. परंतु आपण आपली दृष्टि थोडीशी अंतर्मुख केली तर आपल्या ठिकाणी या मानवीबुद्धीहून निराळ्या स्वरूपाच्या बुद्धीचाहि वास आहे, ही गोष्ट आपल्या लक्ष्यांत येते. या दुसऱ्या बुद्धीला आपण थोडे चालन दिल्याबरोबर तिचा मानवी बुद्धीशी तंटा सुरू होतो. सृष्टिनिर्मित बंधनें तोडून पलीकडे जाण्याची त्या बुद्धीची आकांक्षा व्यक्त होऊ लागते. 'मुक्ति 'मुक्ति' या एकाच शब्दाचा ती बुद्धि जप करीत आहे. या बुद्धीनें प्रोरत झालेला जीवात्मा मुक्तीसाठी अट्टहास करीत आहे, आणि मानवीबुद्धि पुनःपुनः त्याला सृष्टिनियमांच्या पाशांनी बांधण्याचा यत्न करीत आहे. या सृष्टिनियमांच्या पाशांतच त्याने सर्वदा गुरफटलेले राहावें असें त्याच्या नशीबी लिहिले आहे काय?
{{gap}}सर्पपूजा, पिशाचपूजा आणि पूर्वजपूजा इत्यादि प्रकारचे अनेक पूजनांचे मार्ग अस्तित्वांत कां आले? आपण बाहेरून कोणाच्या तरी मदतीची अपेक्षा करतों, ती कशाकरितां? आपले जीवित, आपले अस्तित्व इत्यादि जे शब्द आपण उच्चारितों त्यांचा अर्थ काय? आपल्या या साऱ्या प्रयत्नांचे पर्यवसान कोठे होणार, हा खरोखर विचार करण्यासारखा प्रश्न आहे. ही सारी धडपड खचित अर्थशून्य नाही. या साऱ्या धडपडीचा आणि अनंत प्रश्नमालिकेचा अर्थ हाच की, प्रत्येक जीवात्मा मुक्तीसाठी प्रत्येक क्षणीं यत्न करीत आहे. अनेक भौतिक शास्त्रे आज ज्या स्थितीस पोहोचली आहेत, ती या जीवात्म्याच्या हजारों वर्षांच्या खटपटीचे दृश्य फल आहे. पूर्णत्व पावावें हे या सर्व शास्त्रांचे साध्य आहे; आणि जीवात्म्याची सारी धडपडहि याच पूर्ण स्थितीच्या प्राप्तीकरितां- मुक्तीकरितां- आहे. केवळ सृष्टीकडे पाहिले तर तींतून मुक्तीचा मार्ग कोठेच आढळत नाही. सृष्टि चोहोंकडून नियमांनी जखडलेली. या नियमबद्ध रचनेत गुरफटल्यावर मुक्तीचा मार्ग कसा दिसणार? पाहावे तिकडे नियम आणि कायदा यांचे साम्राज्य. पण नियम आणि कायदा यांचे साम्राज्य चोहोंकडे इतकें उघड रीतीने प्रत्ययास येत असतांहि हा कायदा उल्लंघन करण्याची जीवात्म्याची खटपट एकसारखी सुरू आहेच. चंद्र, सूर्य आणि ताऱ्यापासून तो गवताच्या पातीपर्यंत यच्चयावत् सृष्ट पदार्थ नियमांनी जखडलेले आहेत. मनुष्यप्राणीहि या सृष्टीतलाच असल्यामुळे सृष्टीच्या कायद्यांचा खोडा त्याच्याहि पायांत असला तर त्यांत नवल कसले? पण छे, मनुष्यप्राण्याला ही गोष्ट अद्यापिहि पटत नाही. आज हजारों वर्षे मनुष्यप्राणी या कायद्यांचा मनःपूर्वक अभ्यास करीत असूनहि<noinclude></noinclude> incou8p69fc0wxyli7xba34qi1rblrp पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/196 104 63466 229508 159332 2026-04-24T11:00:02Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229508 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१६८ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>आपण त्याच कायद्याने बांधले आहों, ही गोष्ट त्यास अद्यापिहि पटत नाहीं; आणि पुढेहि पटणार नाही. अनंतकालापासून तो 'मुक्ति' हे एकच पालोपद गात बसला आहे. हे पद गात असतां त्याला साहजिकच असे वाटले की, या नियमांच्या बाहेरचा असा एखादा प्राणी असावा. हाच ईश्वरविषयक कल्पनेचा प्रारंभ आहे. आपण मुक्त व्हावें- गरजेच्या पलीकडे जावें- अशी प्रवृत्ति एकवार उद्भवली की ती कायमची राहणार. ही कल्पना प्रत्यक्ष सिद्ध करण्याकरितां ह्मणजे मुक्त होण्याकरितां मनुष्य जे श्रम करतो व जे कष्ट सहन करतो त्यांवरून त्याच्या अंतःकरणांत मुक्तीची लालसा किती जाज्वल्य आहे, याचा अजमास होतो. दुसऱ्या एखाद्या कार्यासाठी त्याने इतके कष्ट कधीहि सोसले नसते. आपण परिस्थितीचे पक्के गुलाम आहों, व सृष्टिनियमांच्या शृंखला आपल्या पायांत खळखळत आहेत, ही जाणीव अंतःकरणास वारंवार टोंचीत असतांहि त्याला असे वाटते, की या सृष्टीच्या कायद्याबाहेरचा असा कोणी तरी प्राणी असला पाहिजे. सृष्टिबंधनांचे दुःख अनुभवास येत असतांहि ईश्वरविषयक कल्पना त्याच्या चित्तास मोठा आधार देते. यावरून ज्याप्रमाणे सृष्टिनियमांची जाणीव ही एक अंतःकरणाचा घटक आहे, त्याचप्रमाणे त्या बंधनापलीकडे असणाऱ्या ईश्वराविषयींची कल्पना हा दुसरा घटक आहे. जेथे पहिल्या कल्पनेचे वास्तव्य असेल तेथे दुसरीहि तिच्या सोबतीने येणारच. मुक्तीसाठी सुरू असणाऱ्या धडपडीमुळेच वरील दोन्ही कल्पनांचा उदय झाला आहे. सर्व सजीव सृष्टीत मुक्तीच्या कल्पनेचा उदय कमीअधिक प्रमाणाने झालेला आहे. ही कल्पना उदित न झालेली अशी एखादी वनस्पतीहि सांपडणार नाही. झाडेझुडपें आणि लहानसहान कीटक यांमध्येहि या कल्पनेचा उदय स्पष्ट दिसतो. मनुष्यांमध्य मानवीबुद्धि आणि दैवीबुद्धि अशी बुद्धीची दोन स्वरूपं असतात व या दोन बुद्धींच्या द्वैतामुळे भांडणामुळे- मनुष्यांतला विशिष्टपणा कायम असतो अस उपाय सांगितले. त्याचप्रमाणे बुद्धीची ही द्विविध दशा अल्प प्रमाणाने, झाडेझुडप आणि क्षुद्र कीटक यांमध्ये असते; आणि त्यामुळेंच मुक्तीच्या खटपटीबरोबर व्यक्तिविशिष्ट कायम ठेवण्याचीहि प्रवृत्ति प्राणिमात्रांत दिसून येते. गरजेच्या पलीकड जाण्यासाठी क्षुद्र कीटकहि प्रयत्न करीत असतात, हे आपल्या अनुभवांतले आहे. त्याचप्रमाणे आपल्या दृष्टीने त्यांची स्थिति फारशी स्पृहणीय नसतांहि त्या क्षुद्र देहास ते किती चिकटून असतात, हेहि प्रत्यही आपल्या अनुभवास येते. गरजेच्या पलीकडे जाण्याची खटपट ही दैवीबुद्धीच्या अल्प उदयाचे द्योतक असून<noinclude></noinclude> ax36aqjmsneat5uka5qb8sioysm8i8c पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/197 104 63467 229509 159339 2026-04-24T11:01:52Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229509 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|१६९ }} {{rule}}</noinclude>शरीररक्षणाची इच्छा असणे हे देहबुद्धीचे द्योतक आहे. या दोन बुद्धींच्या तंट्यामुळेच प्राण्यांमध्ये व्यक्तिविशेष आढळून येतो. या दोन बुद्धीच्या भांडणांत जिचे प्राबल्य अधिक असेल, त्या मानाने उत्क्रांतीचे प्रमाण कमी अधिक होईल. भोवतालचे जड विश्व त्याच्या देहबुद्धीस एकसारखें प्रोत्साहन देत असते व मुक्तीची कल्पना त्याला दुसऱ्या बाजूस ओढीत असते. अशा रीतीने हे भांडण अनंतकाल सुरू आहे. या भांडणास केव्हांहि खळ ह्मणून पडत नाही. मानवी जातींत नाना धर्म आणि नाना पंथ उपस्थित झाले आहेत व त्यांत पुनः पोटधर्म व पोटपंथ उपस्थित होत आहेत व लढाया करीत आहेत. या स्थितिबद्दल आपणांस केव्हां केव्हां विषाद वाटतो; परंतु वस्तुतः यांत विषाद मानण्यासारखे काही नाही. ही भांडणें मनुष्याच्या उत्क्रांतीस अत्यावश्यक अशीच आहेत. अनेक पंथ उपस्थित व्हावे हे अगदी न्याय्य आहे. आणखीहि शेकडों धर्म आणि पंथ अस्तित्वात आले, तरी त्या सर्वांचे साध्य एकच आहे, ही खूण एकवार आपणांस पटली ह्मणजे तंट्याचे कारणच उरणार नाही.
{{gap}}ज्यावर हे सर्व विश्व भासमान झाले आहे व जो सर्वदा मुक्त स्थितीत असतो, त्याला आपण परमेश्वर या नावाने ओळखितो. परमेश्वराचे अस्तित्व कबूल करणे भागच आहे. मुक्तीची कल्पना वजा केली, तर तुह्मांस जिवंत राहणेहि अशक्यच आहे. कारण ही कल्पना सत्य करण्याकरितांच ही सारी धडपड आहे. ही कल्पना नाहींशी झाली, तर धडपड बंद होणार आणि धडपड बंद झाली तर देहबंध तरी कसा टिकणार? जीवित हे या धडपडीचेंच व्यक्त रूप आहे. धडपडीची इच्छा गेली, की जीवितहि संपलेंच. याकरितां मुक्तीच्या कल्पनेस फांटा देणे तुह्मांस शक्यच नाही. मुक्तीची कल्पना कबूल केली, की तिची सहचारी कल्पना तिजबरोबर अवश्य येणारच. स्वतंत्रतेची यत्किंचित्हि कल्पना तुमच्या ठिकाणी उदय पावली नसेल, तर तुम्हांस थोडीदेखील हालचाल करणे शक्य नाही. आपण अमुक ठिकाणी जाऊ आणि अमुक करूं असा विचार जेव्हा तुमच्या मनांत येतो, तेव्हां तसें करण्यास आपण मुखत्यार आहों- स्वतंत्र आहों- या कल्पनेचाहि तुमच्या विचारांत अंतर्भाव होत नाही काय? यावरून स्वतंत्रतेच्या-मुक्तीच्या कल्पनेवांचून जगणेहि कसे अशक्य आहे, ही गोष्ट बरोबर तुमच्या ध्यानीं येईल. प्राणिमात्रांत दिसून येणाऱ्या धडपडीची शास्त्रीय मीमांसा एखादा प्राणिशास्त्रवेत्ता तुह्मांस सांगेल. त्याचे सर्व ह्मणणे कबूल केले, तरी स्वातंत्र्याची बुद्धि हीच या धडपडीच्या मुळाशी आहे हे आमचे ह्मणणे त्यास खोडून काढता येणार नाही.<noinclude></noinclude> m3iewo80uii37a9q2sm90uvg8tmm6w7 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/198 104 63468 229510 159340 2026-04-24T11:18:36Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229510 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१७० |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>विश्वनियमांनी आपण बांधले गेलो आहों, ही कल्पना जितक्या अंशानें खरी आहे, तितक्याच अंशाने मुक्तीची इच्छा आपल्या अंतःकरणांत वास करीत आहे, ही कल्पनाहि खरी आहे.
{{gap}}बद्धता आणि मुक्ति, ज्ञान आणि अज्ञान व पुण्य आणि पाप या नित्य सहचारी वस्तु आहेत. यांपैकी एका स्थितीची कल्पना चित्तांत उद्भवली, की तिच्या पोटी तिच्या दुसऱ्या सहचारी कल्पनेचा अंतर्भाव आपोआपच होतो. ज्या ज्या सृष्टिनियमांनी आपण बांधले गेल्यासारखे दिसतो, त्या प्रत्येक नियमाच्या पोटी स्वतंत्रतेचा- मुक्तीचा- गुप्तवास आहे. या कल्पनाद्वयापैकी कोणतीहि एक जितकी खरी आहे तितकीच दुसरीहि खरी आहे. अगदी रानटी स्थितीच्या मनुष्याकडे पाहिले, तर मुक्तीच्या कल्पनेचा उद्भव त्याच्या ठिकाणी विशेष उघडपणे प्रत्ययास येत नाही; याचे कारण विश्वनियमांनी आपण चोहोंकडून जखडले गेलों आहों, ही जाणीवहि त्याच्या ठिकाणी विशेषत्वाने उत्पन्न झालेली नसते. मुक्तीकरितां ज्या मानाने आपले प्रयत्न कमी अधिक दर्जाचे असतील, त्या मानाने सृष्टिनियमशृंखलेचा प्रत्यय आपणांस कमी अधिक प्रमाणाने येतो. 'आपण पापी आहों, अपवित्र आहों,' ही कल्पना सुधारलेल्या मानवसमाजांत ज्या प्रमाणाने आपल्या प्रत्ययास येते त्याप्रमाणे रानटी समाजांत आढळत नाही. 'आपण पापी आहों' ही कल्पना अगदी रानटी अवस्थेतल्या मनुष्याच्या मनांत सहसा उद्भवतच नाही. कारण त्यांची स्थिति पशूच्या स्थितीपलीकडे फारशी गेलेली नसते. 'आपण पापी आहों' ही कल्पना पशूच्या चित्तांत कधीहि येत नाही. कारण बुद्धि ह्मणून जे तत्व मानवी हृदयांत उदय पावतें, त्याचा पशूच्या ठिकाणी अत्यंत अल्प प्रमाणाने उगम झालेला असतो. पशूच्या सर्व इच्छा पाहिल्या, तर त्याच्या गरजा जड देहापलीकडे गेलेल्या नसतात. जड देह सुखांत राहिला, ह्मणजे त्याच्या सर्व गरजा भागल्या. त्याचप्रमाणे रानटी अवस्थेतील मनुष्यांच्या इच्छाही जडदेहाच्या सुखसाधनापलीकडे नसतात. यानंतर मानसिक व बौद्धिक गरजा उत्पन्न होऊ लागतात. देह अत्यंत सुखांत राहण्याजोगी अवस्था प्राप्त झाली, तरी आपण पूर्ण सुखी आहों असें मनुष्यास काहि वाटण्याचा संभव नाही. त्याचे स्वास्थ्य भंग पावेल अशा गोष्टी घडून येतात व त्या पुष्कळ वेळां त्याच्या आटोक्याबाहेर असतात. आपणास दुःखद अशी गोष्ट घडत आहे असे दिसून येत असूनहि त्याच्या प्रतिकाराचा कोणताच उपाय आपणांस दिसेनासा झाला ह्मणजे आपण परतंत्र आहों, पंगु आहों व शारीरिक<noinclude></noinclude> gqj04d4z8oqtbc1zsg97kc3kthc3k9p पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/199 104 63469 229511 159346 2026-04-24T11:21:25Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229511 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|१७१ }} {{rule}}</noinclude>सुख ही सुखाची परमावस्था नव्हे, असे त्याच्या मनांत येते. येथे शारीरिक सुखाची कल्पना संपुष्टांत येऊन मानसिक सुखाची कल्पना जन्म पावते. मानसिक सुखाची कल्पना उद्भवली की तिच्या मागोमाग पापपुण्य, बरें वाईट इत्यादि कल्पना उदय पावतात; व शेवटी हे सर्व बंध तोडून टाकून सर्वथैव स्वतंत्र होण्यास-मुक्त होण्यास-कांहीं उपाय नाही काय असा प्रश्न चित्तांत आपोआपच उद्भवतो. असा प्रश्न उत्पन्न होण्याजोगी अवस्था प्राप्त झाली, ह्मणजे अज्ञानाचे जे अत्यंत घन पटल असतें तें फाटावयास लगून ज्ञानरवीचे बालकिरण उदय पावू लागतात. यावेळी अज्ञानाचे अभ्रपटल इतकें घन असते की ज्ञानाच्या अरुणोदयास आपली दिव्यप्रभा त्यांतून व्यक्त करावयास अवसर मिळत नाही. यामुळे त्याच्या उदयाचा प्रत्यय येत नाही; तथापि त्याचा उदय झालेला असतो, हे मात्र निश्चित आहे. याच संपूर्ण ज्ञानरूपास एक, अद्वितीय, परमात्मा इत्यादि नांवें आपण देतो. यावेळी परमात्मा निराळा आणि विश्व निराळे अशी त्याची दृष्टि असते. विश्व त्याच्या दृष्टीस प्रत्यक्ष दिसत असतें ह्मणून तें खरें; आणि संपूर्ण ज्ञानरूपाचा, कल्पनेने तरी त्यास प्रत्यय आलेला असतो ह्मणून तेंहि खरें. अशा रीतीने त्याच्या अंतःकरणांत दोन सत्यवस्तूंचा वास असतो. सत्य ह्मणून दिसणाऱ्या दोन्ही वस्तु वास्तविक एकरूपच आहेत, याचा त्यास प्रत्यय नसतो. एकच वस्तु द्विधा भासणे हा स्वतःच्या दृष्टीचा दोष आहे, ही गोष्ट त्याच्या लक्ष्यांत आलेली नसते. शेवटी हाहि दृष्टिदोष नाहीसा झाला ह्मणजे सर्व विश्व एकरूपच असून निरनिराळ्या उपाधिभेदांमुळे तें अनेकधा भासते, अशी त्याची खात्री होते. मनुष्यांतील आणि पशुंतील अंतर्ज्ञान एकरूपच असतां शरीरोपाधीनें तें कमीअधिक प्रमाणाने व्यक्त होते; इतकाच मनुष्यांत आणि पशूत फरक आहे, ही गोष्ट त्याला पक्केपणी कळते.
{{gap}}अनंतरूपांनी नटलेल्या या सृष्टीकडे अवलोकन केले तर यच्चयावत् वस्तुमात्र परमेश्वराच्या पूजनांत गुंतले आहे व त्याजकडेच धांव घेत आहे असें आपणांस आढळून येईल. ज्या ज्या ठिकाणी सजीवपणा आढळतो तेथें तेथें पूर्णरूपाकडे- मुक्तीकडे धाव घेण्याची प्रवृत्ति आढळते. आपण स्वतंत्र झालों- मुक्त झालों- तर या अनंत विश्वाचें स्वामित्वहि आपणांस मिळेल, हे उघडच आहे; परंतु ही मुक्ति ज्ञानावांचून मात्र मिळणार नाही. आपणांतील अज्ञानाचा पडदा जसजसा अधिक फाटत जातो, तसतसें ज्ञान अधिक व्यक्त दशेस येऊन त्याप्रमाणाने विश्वावरील स्वामित्व आपणांस प्राप्त होऊ लागते. या स्वामित्वाचा प्रत्यय जस-<noinclude></noinclude> 7lo466o0ce4s7gciigxwz6xtjhtkkz4 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/200 104 63470 229512 159370 2026-04-24T11:23:46Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229512 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१७२ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>जसा आपल्या ठिकाणी दिसू लागतो, तसतसे आपलें बळ वाढत आहे असें आपणांस दिसून येते. केवळ मुक्त अशा स्थितींतला जर कोणी प्राणी असेल, तर तो सर्वशक्तिमान्, सर्वज्ञ आणि सर्वांतर्यामी असा असला पाहिजे हे उघड आहे. मुक्तस्थिति ही या सर्वशक्तींच्या अत्यंत साहचर्याने राहणारी असल्यामुळे मुक्तावस्थेपर्यंत गेलेला प्राणी सृष्टिबंधनापलीकडे जाणारच हेहि उघड आहे.
{{gap}}केवळ मुक्ततेची स्थिति व तिजमुळे उद्भवणारी चिरशांति प्राप्त करून देणे, हेच प्रत्येक धर्माचे ध्येय आहे. कोणत्याहि अवस्थेने अथवा कोणत्याहि काली निगडित नाही असे स्वातंत्र्य व ज्या अवस्थेत कोणत्याहि वस्तूच्या आघाताने यत्किंचिहि फेरबदल होणार नाही, अशी पूर्णावस्था ही प्राप्त करून देणे हेच धर्माचें साध्य आहे. ही पूर्णावस्था वस्तुतः आपणा सर्वांच्या ठिकाणी असून हीच खरी मुक्ति- स्वातंत्र्य- होय.
{{gap}}परमेश्वर सदोदित या मुक्तावस्थेत असून आपण त्याच्याशी एकरूप होण्यासाठी खटपट करीत आहो. परंतु मध्यंतरी आपल्या ध्येयाचा आपणांस विसर पडून आपल्या रस्त्यांत आपण अनेक आडवाटा उपस्थित करून त्यांतून धावू लागतों व यामुळे आपला पहिला राजमार्ग बाजूस राहतो. कीर्ति, पैसा, स्त्री इत्यादि अनेक आडवाटा फुटून आपला गोंधळ उडतो व राजरस्त्याचे भान नाहीसे होते. या सर्व आडवाटा मिळून एक भला मोठा चक्रव्यूह झाला आहे. त्यांतून सुटून पुन्हा राजमार्गास लागावें, हीच आपली सर्वांची इच्छा आहे. परंतु या आडवाटांत आणखी आडवाटा फुटून आपणांस अधिकाधिक भ्रमांत मात्र पाडतात. असो. जगांत वस्तुमात्राच्या ठिकाणी जें तेज प्रत्ययास येतें तें तेजहि त्यांस परमात्म्यापासूनच प्राप्त झाले. ते त्यांस सूर्यापासून, चंद्रापासून अथवा तारकांपासून प्राप्त झालेले नाही. कारण सर्याला तरी स्वतःचें तेज कोठून जात झालें? '''' यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् !'''' असें भगवान् श्रीकृष्णाचे वचन आहे. सूर्यांत आढळून येणारा प्रकाश असो अथवा आमच्या अंतर्यामी प्रत्ययास येणारा ज्ञानरूप प्रकाश असो, त्याची उत्पत्ति त्या महात्तेजापासून- परमेश्वरापासून- झाली. ''''सर्वस्य चाहं हृदि संनिविष्टो । मत्तः स्मृतिज्ञानमपोहनं च'''' असें परमेश्वराचे वचन आहे. त्याच्याच प्रकाशाने हे सर्व विश्व प्रकाशत आहे.
{{gap}}या एकंदर विवेचनावरून परमेश्वरस्वरूपाची बरीच कल्पना आपणांस आली असेल. तो स्वयंव्यक्त, निराकार, सर्वांतर्यामी, सर्वज्ञ आणि सर्व विश्वाचे अधिष्ठान असा आहे, ही गोष्ट आता आपल्या लक्ष्यांत पूर्णपणे आली असेल. सर्व विश्व<noinclude></noinclude> onkx3vn9hywmw2tchim7djvmpj80lij पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/201 104 63471 229513 159379 2026-04-24T11:25:19Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229513 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|१७३ }} {{rule}}</noinclude>त्याच्याच पूजनांत गुंतले असून आपला सर्वांचा मार्गदर्शकहि तोच आहे. जगांत जितके चांगले आहे तितकें सर्व त्याचेंच स्वरूप आहे आणि त्याचप्रमाणे ज्याला वाईट ह्मणून आपण ह्मणतो, तेंहि त्याचेच स्वरूप आहे. कोणी मनुष्य कांही वाईट गोष्ट करितो, पाप आचरितो, ह्मणून आपण त्याचा तिरस्कार करितों; परंतु त्याचा तसे करण्यांत उद्देश काय, याचा आपण विचार केला पाहिजे. पापाचरण हाहि परमेशपूजनाचा एक मार्ग आहे, हे ह्मणणे तुह्मांस खचित विलक्षण वाटेल; पण वस्तुस्थिति तशीच आहे. अत्यंत पापी मनुष्याच्या हृदयांतसुद्धां मुक्तीची इच्छा आहे. ज्याला तुह्मी पापाचरण ह्मणतां तें कृत्यहि तो या इच्छेनें प्रेरित होऊनच करीत असतो. त्याचा मार्ग चुकीचा असेल ही गोष्ट वेगळी. पण त्याची इच्छा मुक्त होण्याची- गरजेच्या पलीकडे जाण्याची- आहे ही गोष्ट तुह्मांस केव्हांहि नाकबूल करता येणार नाही. मग त्याचे कृत्य ह्मणजे वस्तुतः परमेश्वराचे पूजनच नव्हे काय? गरजेच्या पलीकडे जाण्याची- मुक्त होण्याची इच्छा त्याच्या हृदयांतून मावळली तर जगणेहि त्याला शक्य नाही, हे आपण नुकतेच सिद्ध केलें आहे. विश्वांत जेथे जेथें यत्किचित् तरी हालचाल दिसते, तेथे तेथे मुक्तीची इच्छा उद्भवली आहे, हे आपण पक्कें लक्ष्यात ठेवा. अशी प्रत्येक वस्तु परमेश्वराच्या पूजनास लागली आहे. विश्वांतील यच्चयावत् वस्तूंच्या पोटी याच कल्पनेचा वास आहे. मुक्तीकरितां सर्वांची खटपट सुरू आहे. त्यांत फरक आढळून येतो, त्याचे कारण बाह्योपाधिभेद हे आहे. ही इच्छा व्यक्त करण्यासाठी उपयोगांत येणाऱ्या शरीरादि बाह्य साधनांत जो भेद आहे तोच वस्तुवस्तूंतील दृश्य भेदास कारण आहे. यामुळे बाह्यतः अनेकतेने भासणारे विश्व मूलतः एकच कसे आहे हे आपल्या लक्ष्यांत येईल. हीच कल्पना उपनिषद्ग्रंथांत चोहोंकडे व्यापून राहिली आहे. ईश्वर आणि आह्मी वस्तुतः एकाच मूलरूपाचे आहोत असें म्हटल्याबरोबर कित्येकांच्या अंगांवर शहारे येतात. 'आह्मी किती पापी आणि परमेश्वर किती पवित्र, तो आणि आम्ही एकाच स्वरूपाचे आहों हे ह्मणणे पापात्मक आहे' असें ह्मणणारे लोक पुष्कळ आहेत. परंतु सशास्त्र विचारांती या ह्मणण्यांत कांहींच तथ्य नाही, असे आढळून येईल. गुलाबाच्या फुलाचा मनोहर वास आणि फुलपाखरांच्या अंगावरील चित्रविचित्र रंग ही त्याचीच स्वरूपें आहेत. आमच्यांत व्यक्त होणारे चैतन्य हेहि त्याच परमेश्वराचे रूप आहे. या सर्व जगाचे अस्तित्व त्याजवरच अवलंबून आहे आणि 'कालोस्मि लोकक्षयकृत् प्रवृद्धः' असें ह्मणणारा या जगाचा संहारकर्ताहि तोच आहे. तो जसा<noinclude></noinclude> cysbopo5m2647gpa82w56vwtyuhdw3y पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/202 104 63472 229514 159390 2026-04-24T11:29:37Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229514 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१७४ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>संहारकर्ता काल आहे तसेंच चिरंतन वास करणारें चैतन्यहि तोच आहे. पारध्याला भिऊन ससे जसे रानोमाळ पळतात, तसे आपण त्याच्या उग्ररूपास भिऊन इतस्ततः पळू लागतों व एखाद्या झाडाच्या ढोलीचा क्षणभर आश्रय मिळाला तर आपला जीव वांचला ह्मणून स्वतःस धन्य मानून घेतो. त्याचे उग्ररूप कोठेहि थोडें प्रकट झाल्याबरोबर सारे जग पळत सुटते. परंतु जगाच्या अंतापर्यंतहि आपण पळालों तरी जाणार कोठे? मी काशीला गेलों असतां एक वेळ एका बाजूस तलाव आणि दुसऱ्या बाजूस उंच भिंत अशा रस्त्याने जाण्याचा मला प्रसंग आला. त्याठिकाणी कित्येक माकडें बसली होती. काशींतली माकडें चांगली गलेलठ्ठ आणि खोडकर असून मनुष्याचा रस्ता अडविण्याचे कधी कधी त्यांच्या मनांत येते. मी या रस्त्याने चाललों असतां कित्येक माकडे माझ्या भोंवतीं जमली. कित्येकांनी माझ्या पायांस विळखा घातला व कित्येक तर चावूहि लागली. त्यांना कसेबसें दूर करून मी झपाट्याने पळत सुटलों; परंतु त्यांचे चापल्य माझ्याहून अधिक असल्यामुळे त्यांनी मला पुन्हां गांठले. मी पुन्हां पळत सुटणार, इतक्यांत समोरून येणारा एक गहस्थ ओरडून ह्मणाला 'त्यांना तोंड द्या. पळू नका.' मीहि ताबडतोब मागे वळून धिटाईने त्यांजकडे पाहिले तेव्हां मागे पाय घेत घेत ती पळून गेली. आपल्या आयुष्यांत अडचणीचे असे अनेक प्रसंग आपणांवर येतात. व त्यावेळी आपण पळू लागतो. परंतु पळून त्यातून आपली सुटका होणे शक्य नाही. त्या प्रसंगांना तोंड देणे हेच इष्ट आहे. अनेक आपत्तींवर जय मिळविल्यावांचून मुक्तीचा मार्ग खुला होणार नाही. आपण पळू लागलों तर अधिकाधिक बंधनांत मात्र पडूं. आपल्या भेकडपणामुळे विपत्तीस अधिक अवसान मात्र चढते. भित्र्याला जगांत कोठेहि यशप्राप्ति होणार नाही. '''"नहीं जो खारसे (कांटा) डरते वोहि उस गुल (फूल) को पात है .''' असे एका हिंदी साधूचें ह्मणणे अत्यंत अर्थपूर्ण आहे. भय, दुःख आणि अज्ञान यांशी चार हात करण्याची तयारी असल्यावांचून ती आपणांपासून दूर होणार
{{gap}}ज्या मृत्यूचे नुसतें नांव घेतल्याबरोबर आपण चळचळा कापू लागतो त्याचे स्वरूप तरी काय आहे? ही भीति कोठून उत्पन्न झाली? परमात्म्यानेच हे बागुलबोवाचे सोंग घेतले आहे. या बाहेरील घोंगडीच्या आंत आपण आपली दृष्टि घातली पाहिजे. जगांतील भयांपासून आपण पळून जाऊं लागलों ह्मणजे तीहि आपला एकसारखा पाठलाग करीत सुटतात आणि आपण त्यामुळे परमात्म्याच्या दर्शनसुखास मात्र अंतरतो. जगांत सुखाची आणि समृद्धीची आराधना करणारे<noinclude></noinclude> n0zupjl7lhdbiuovgsut9kzswah03rx पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/203 104 63473 229515 159393 2026-04-24T11:32:43Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229515 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|१७५ }} {{rule}}</noinclude>अनेक- बहुतेक- सर्व आहेत; परंतु दुःखालाहि प्रेमाने मिठी मारणारे कितीसे आढळतील? या दोहोंतहि एकच रूप पाहणे व या दोहोंचीहि आराधना न करणें- हाच मुक्तीचा मार्ग. ''''दुःखेष्वनुद्विग्न मनः सुखेषु विगतस्पृहः'''' असे आपण झाल्यावांचून मोक्षश्री आपणांस माळ घालणार नाही. ती शूराची चहाती आहे. सुखदुःखें, भय, चिंता इत्यादि अनेक दरवाजे मोक्षमार्गात आपणांस अडथळा करण्यासाठी बंद होऊन बसले आहेत. हे फोडल्यावांचून आपणांस पलीकडे कसें जातां येईल? परमात्म्याच्या दर्शनाची इच्छा होऊन आपण त्या मार्गाने जाऊ लागल्याबरोबर प्रथम आपलेंच शरीर आपल्या आड येते. सृष्टीचे कायदेहि आपला मार्ग निरोधूं लागतात. आपली दृष्टि अंधुक होते आणि आपणांस परमात्म्याचे दर्शन घडत नाही. जगांतील भीतिस्थाने, संकटे आणि दुःखें यांतहि त्याचेच वास्तव्य आहे, ही गोष्ट पटल्याखेरीज त्याचे दर्शन आपणांस होणे शक्य नाही. दोरीला सर्प समजून आपण भीत आहों. एकवार भीतीनें आपलें ठाणे अंतःकरणांत दिल्यावर जिकडे पाहावें तिकडे अंधार दिसतो. ''''दोरीच्या सापा भिऊनि भवा । भेट नाहीं जिवा शिवा । अंतरिंचा ज्ञानदिवा । मालवू नकोरे ॥'''' हा उपदेश किती योग्य आहे बरें! सद्गुणांत परमेश्वराचा वास आहे असे सांगणारे पुष्कळ आहेत. परंतु मी तुह्मांस सांगतों की सद्गुणांत ज्या परमेश्वराचा वास आहे त्याच परमेश्वराचा वास पापांतहि आहे. पापालाहि मिठी मारण्याइतके अलोट धैर्य तुह्मांपाशी नसेल तर तुमच्यासारख्या क्लीबास मुक्ति वरील काय? असें प्रचंड धैर्य ज्यावेळी आपल्या ठिकाणी येईल, आनंददायक वस्तु आणि दुःखप्रद वस्तु, नयनमनोहर रूपें आणि भयप्रद रूपें यांच्या ठिकाणी एकाच परमात्म्याचा वास जेव्हां आपणांस दिसू लागेल, तेव्हां मोक्षमार्गातले सर्व बंद असलेले दरवाजे खडाखड उघडतील. अशा स्थितीनंतरच सर्वत्र समभाव आपणांस दिसू लागेल. मोक्षपथ जितक्या झपाट्याने आपण आक्रमण करूं तितक्या झपाट्याने दुःखें आपणापासून पळू लागतील. स्वर्ग आणि नरक हे दोन्ही एकसारखेच सुखदायक आहेत, असा आपणांस अनुभव येईल. भेददृष्टि नाहींशी होऊन हा लहान आणि तो मोठा अशी खोटी रूपें आपणांस दिसणार नाहीत. सर्वांच्या अंतर्यामी एकाच परमेश्वराचा वास असतां लहान कोण आणि मोठा कोण? ''''रामसभामें हरिजन बैठे । को बडा को छोटा है !'''' इतकी समता आपल्या दृष्टीत आल्यानंतर विश्वांत सत्य ह्मणून जे काही असेल त्याची व आपली भेट होईल. आपल्या दृष्टीत समता नसल्यामुळे बरे आणि वाईट असे प्रकार या<noinclude></noinclude> 8gpq495a42cqok96mkklblbxdpdfsv8 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/204 104 63474 229516 159725 2026-04-24T11:34:51Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229516 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१७६ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>दुनियेत आपण पाहतो. समता नसल्यामुळे आपल्या अंध झालेल्या नजरेस परमेश्वर दिसत नाही.
{{gap}}एकाच वृक्षाच्या दोन निरनिराळ्या शाखांवर सुंदर पिसाऱ्याचे दोन पक्षी बसले होते. एक अगदी टोकाजवळच्या शाखेवर होता आणि दुसरा बुंधाजवळील शाखेवर बसला होता. बुंधाजवळील शाखेवर बसलेला पक्षी त्या झाडाची फळे खात होता. त्यांत कित्येक फळे गोड व कित्येक कडू होती. तो दोहोंचीहि चव घेत होता. एखाद्या फळाला चोंच मारून ते कडू लागले म्हणजे तो आपले तोंड वेडेवांकडे करी आणि दुःखी होई. पुन्हां त्याने आणखी एकदां दुसऱ्या फळाला चोंच मारिली, तों तें पहिल्यापेक्षांहि अधिक वाईट असल्याचे त्यास आढळून आले. तो शोक करीत असतां त्याची नजर सहजगत्या वर गेली, तों वर दुसरा एक पक्षी बसला असल्याचे दिसून आले. तो दुसरा पक्षी अगदी शांत होऊन बसला असून कांहींहि खात नव्हता. पहिल्या पक्ष्याने त्याजकडे पाहून पुन्हां आपली नजर फळांकडे वळविली व फळे खाण्याचा आपला उद्योग त्याने पुन्हां सुरू केला. इतक्यांत एक अत्यंत कडू फळावर त्याने चोंच मारली. त्या फळाची थोडी चव घेतांच त्याला अत्यंत दुःख झाले व त्याने पुन्हा एकवार आपली नजर वरील पक्ष्याकडे वळविली. वरचा पक्षी पहिल्यासारखाच निःसीम शांततेचा उपभोग घेत होता. खालच्या पक्ष्याला त्याच्या त्या स्थितीचे मोठे कौतुक वाटून तो हळूहळू त्याजकडे जावयास निघाला. तो त्या पक्ष्याच्या अगदी जवळ आला. इतक्यांत प्रकाशाचे शुभ्र किरण त्याच्या अंगावर पडले. त्याच्या आजुबाजूस जिकडे तिकडे तेच किरण पसरले होते. त्या प्रकाशाने दिपलेले आपले डोळे त्या पक्ष्याने उघडून पाहिले तों वर बसलेला पक्षी दुसरा कोणी नसून आपलेच तें मूलबिंब होतें असें त्यास आढळून आले. आपणच आपल्या बिंबास निराळा पक्षी समजत होतो, असे त्याच्या प्रत्ययास आले. खालील पक्षी हा वरच्या पक्ष्याचे प्रतिबिंबच होता. ही गोष्ट त्याला कळल्यानंतर त्याचा भ्रमनिरास हाऊन तो शांत व संपूर्ण वैभवयुक्त असा झाला. त्या पक्ष्याप्रमाणे आम्हीही स्वतः परमेश्वररूप असून प्रतिबिंबामुळे आपली हजारों रूपें दिसतात. एकच सूर्य दवाच्या हजार बिंदूंत प्रतिबिंबित झाला तर ज्याप्रमाणे हजार लहान लहान सूर्य दिसू लागतात, त्याचप्रमाणे एकच परमात्मा हजारों ठिकाणी व्यक्त झाल्यामुळे हजारों रूपांनी दिसू लागतो. आमच्या मूळच्या स्वरूपास आपणांस जाणे असेल तर हे प्रतिबिंब आपण सोडून दिले पाहिजे. आपल्या गरजा भागवून आपण<noinclude></noinclude> 504fze1ub3tnbceb5fzdrsdac42v6l1 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/205 104 63475 229517 159726 2026-04-24T11:38:15Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229517 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|१७७ }} {{rule}}</noinclude>गरजेच्या पलीकडे जाऊं ह्मटले, तर ती गोष्ट शक्य दिसत नाही. आपणांस सर्व विश्वाचे आधिपत्य मिळाले तरी आपल्या गरजा संपणार नाहीत. गरजेच्या पलीकडे जावें याच हेतूने प्रेरित झालेला मारवाडी कवडी कवडी करतो, चोर चोऱ्या करितो, पापी पापें करितात आणि आपण तत्वज्ञानाचा विचार करितां. सर्वांचे ध्येय एकच; गरजेच्या पलीकडे जाण्याच्या इच्छेव्यतिरिक्त दुसरी कोणतीहि इच्छा साऱ्या आयुष्यात कोणास उत्पन्न होत नाही. कोणास समजो अगर न समजो पण आपले सर्वांचे प्रयत्न या एकाच दिशेने चालले आहेत. पूर्णत्व पावण्यासाठी ही सारी धडपड आहे आणि केव्हांना केव्हां हे पूर्णत्व पावतीलच.
{{gap}}अत्यंत पातकी आणि पातकें करण्यांत सदोदित दंग असलेला माणूसहि शेवटी गरजेच्या पलीकडे जाईल. मात्र, तसें व्हावयास काळहि पुष्कळ पाहिजे, हे उघड आहे. अशा ठिकाणी आपल्या खटपटीपासून त्यास कांहींच उपयोग होणार नाही. धक्के चपेटे खाऊनच तो परमेश्वराकडे वळेल. सद्गुण, पावित्र्य, परोपकाररतता इत्यादि दैवी संपत्ति सर्वांसच प्राप्त होणार आहे. आपली सर्व खटपट कशाकरितां आहे, हे कित्येकांच्या लक्ष्यांत आलेले नाही; परंतु तुमच्या लक्ष्यांत तें आतां आले आहे. पॉल प्रेषित एकदां ह्मणाला, “ज्या देवाची तुह्मी अज्ञानानें पूजा करीत आहां, तो देव तुमच्या ठिकाणी आहे असें मी तुह्मांस सांगतो." पॉलचे हे वाक्य सर्वांनी ध्यानात ठेवण्यासारखे आहे. आपल्या आयुष्यांतील ज्या एका लक्ष्याकडे आपण सर्व धांव घेत आहों, त्या लक्ष्याला लवकर पोहोचण्यास आमची सर्व शास्त्रे आणि सर्व तत्वज्ञान यांचा उपयोग न झाला, तर ती निर्माण तरी झाली कशाला? सर्व चराचरास व्यापून राहिलेले मूलतत्व आपणच आहो, ही गोष्ट अनुभवाने पाहणे हेच आपले साध्य आहे. परमेश्वराला आकुंचित स्वरूपांत पाहणारे पंथ आणि धर्म सोडून सर्व विश्वांत तोच भरून उरला आहे असा अनुभव पटविणाऱ्या धर्माची कांस आपण धरूं या. परमेश्वराचे अस्तित्व तुह्मांस खरोखर अंतःकरणापासून मान्य असेल तर तुह्मांप्रमाणेच विश्वांतील सर्व पदार्थ त्याचीच आराधना करीत आहेत, ही गोष्ट तुह्मांस निःसंशय पटेल.
{{gap}}आपण आपला आकुंचितपणा टाकून प्रत्येक मनुष्यांत एकाच परमात्म्याचें रूप प्रकट झाले आहे, हे जाणण्यास शिकले पाहिजे. प्रत्येकाच्या अंतर्यामांत त्याचाच वास असून या निरनिराळ्या दिसणाऱ्या सर्व मनांत विचाराची प्रेरणा तोच करितो. त्याची सिद्धि बाह्य साधनांवर अवलंबून नसून तो स्वतःसिद्ध आहे. अशा प्रकारचा प्रत्यय येणे हाच धर्म. हाच खरा विश्वास. असा विश्वास आपणा<noinclude>
{{gap}}स्वा. वि. १२</noinclude> tb9xpnntgdnhepg9o1zw1snqvp7p34n पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/206 104 63476 229518 159728 2026-04-24T11:40:44Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229518 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१७८ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>सर्वांच्या अंतःकरणांत उदय पावावा, अशी आपण त्या सर्वेश्वराची प्रार्थना करूं या. त्याच्या सर्वव्यापी अस्तित्वाचा प्रत्यय जेव्हां आपणांस येईल, तेव्हांच आपण अमर आहों, हे आपणांस निःसंशय पटेल. आपण वस्तुतः शरीरानेंहि अमर असून या विश्वाशी एकरूप आहों. या सर्व विश्वाचे अधिष्ठान एकच आहे आणि त्याच एकांत माझेंहि वास्तव्य आहे. मी या शरीरांत दिसतों तितका लहान प्राणी नसून विश्वव्यापी आहे. पूर्वी होऊन गेलेली सृष्टिहि मीच. बुद्ध तो मीच, येशू मीच आणि महंमदहि पण मीच. जितके धर्मप्रवर्तक आजपर्यंत होऊन गेले ते सर्व मीच. जगांतील चोऱ्या करणारे मीच आणि फांसावर चढलेले खुनी लोकहि मीच. मी जेथें नाहीं असें ठिकाण अनंत विश्वांत एकहि नाही. प्रिय बंधूंनो, जागे व्हा. आपल्या लहान लहान खबदाडांतून बाहेर पडून अफाट मैदानावर या आणि या खऱ्या आराधनेच्या मार्गास लागा. तुह्मी अनंत असतां आपल्याच इच्छेनें क्षुद्र देहांत स्वतःस कोंडून बसला आहांत. सर्व विश्वांत त्याचेच रूप पाहणे, ब्रह्मापासून क्षुद्र तृणापर्यंत त्याचाच वास आहे हे जाणणे, हीच खरी लीनता. नुसते डोळे मिटून 'अरे परमेश्वरा, आह्मी पापी, आह्मी दीन' असे ओरडणे ही लीनता नसून लीनतेची थट्टा आहे. आपल्या डोळ्यांवर असलेला पडदा दूर होऊन सर्वत्र परमेश्वराचे स्वरूप दिसू लागणे हीच आपली अत्युच्च संस्कृति आणि हीच मानवकुलाच्या उत्क्रांतीची शेवटची पायरी. सर्वत्र एकरूप दिसणे हाच खरा धर्म. 'मी' अमुक (देहधारी) असें वाटणे हे 'मी'चें खरें स्वरूप नव्हे. 'मी' सर्वव्यापी, सर्व भूतांतरात्मा आहे, अशा भावनेने सर्वत्र स्वतःस पाहणे हेच खरें पूजन. बाह्योपचारयुक्त पूजाविधि हे खालच्या पायरीचे दर्शक आहेत. या जड विधींस फांटा देऊन सर्वत्र एकच चैतन्य पाहणे, हा अत्युच्च पूजाविधि आहे. अंतःकरण जसजसें शुद्ध होऊ लागते, तसतसा बाह्य पूजाविधि कमी होऊन मनुष्य मानसपूजा करूं लागतो; व युक्त मानसपूजेच्या योगाने परमश्वराच सर्वव्यापी रूप त्यास दृग्गोचर होऊं लागून एकच चैतन्य सर्वत्र पाहणं हाच खरी पूजा असा त्यास प्रत्यय येतो. विश्वांतील साऱ्या जड पदार्थास मर्यादा असून त्या मर्यादेत ते नियमाने जखडले आहेत. चैतन्य मात्र अमर्याद- निःसीम- असे आहे. परमात्मा ह्मणजे केवळ चैतन्यरूप आहे आणि ह्मणूनच तो अमर्याद आहे. त्याच प्रमाणे मनुष्यांत दिसणारी जीवनकलाहि चैतन्यरूप आणि ह्मणून अमर्याद आहे. मर्यादित वस्तु अमर्याद वस्तूला जाणूं शकत नाही, व तिचे पूजनहि करूं शकत नाही. अमर्याद वस्तूच अमर्याद वस्तूला जाणून तिचे पूजन<noinclude></noinclude> s658bjhle0y0v45j2wqahgqmk4lmsgm पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/207 104 63477 229519 159910 2026-04-24T11:43:02Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229519 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|१७९ }} {{rule}}</noinclude>करूं शकते. आपण अमर्याद असल्यामुळे अमर्याद होऊन अमर्यादाला ओळखावें हेच आपणांस योग्य आहे. परमेश्वराच्या पूजनाचा खरा मार्ग हाच आहे. या पूजनाचा स्वतःच्या ठिकाणी प्रत्यय घेणाराची स्थिति वर्णनातीत आहे. ती व्यक्त करण्याचे सामर्थ्य भाषेत नाही. ''''यतो वाचो निवर्तते अप्राप्य मनसासह'''' अशी ही स्थिति आहे; परंतु ही प्राप्त करून घेणेहि तितकेंच कठीण आहे. ''' 'वाचा वदे परी करणे कठीण । इंद्रियां आधीन झालो देवा ॥'''' असें ह्मणून अश्रुपात करण्याची पाळी येते. तोंडाने मोठाल्या गोष्टी मी सांगत असतो, तत्वज्ञानाचा झरा माझ्या मुखाने वाहत असतो आणि इतक्यांत कांहीं तरी क्षुल्लक कारणावरून माझा क्रोध अनावर होतो, अहंकार उच्छृखल होतो. माझ्यावांचून- या लहानशा देहांत अनुभवास येणाऱ्या अहंकारी चैतन्यावांचून- जगांत दुसरा पदार्थच मला दिसेनासा होतो. त्या वेळी मी केवळ चैतन्य आहे, मी निःसीम आहे, हा सर्व माझाच खेळ आहे, मी मुक्त आहे इत्यादि सर्व कल्पना पार मावळून जातात.
{{gap}}खरा पूजाविधि हा असिधाराव्रताइतका तीव्र आणि तुटलेल्या कड्यासारखा चढण्यास कठीण असा मार्ग आहे. आजपर्यंत होऊन गेलेल्या संतांनी अनेक प्रकारे ही गोष्ट आह्मांस पुनःपुनः बजावून सांगितली आहे. ''''काम क्रोध आड पडले पर्वत । राहिला अनंत पलीकडे । नुल्लंघवे मज न सांपडे वाट । दुस्तर हा घाट वैरियांचा ॥'''' असे उद्गार अनेक महात्म्यांनी जागोजाग काढिले आहेत. आपल्या मार्गातील भीतीची स्थले संतांनी याप्रमाणे निदर्शित करून ठेविली आहेत. या खुणांचा योग्य उपयोग करून घेणे हे आपणाकडे आहे. ''''उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत '''' असें उपनिषद्वचन आहे. हा पहाड अत्यंत दुर्गम आहे खरा; परंतु याच्या पलीकडे असलेले स्वानंदसाम्राज्य आपणास हवे असेल तर हा चढण्यावांचून दुसरी तोड नाही. याच्या भीतीने आमचें अनंत वैभव आह्मी गमावू काय? नाही. खचित नाही. आम्ही त्रैलोक्यविजयी वीर आहों. जो जों अडचणी अधिक तों तो आमचे धैर्यहि अधिक होऊन हा पहाड शेवटी आह्मी खचित पादाक्रांत करूं. दैत्यांचे आणि देवांचेहि धनी होण्याची आमची योग्यता आहे. मनुष्याची वास्तविक योग्यता अशी असतां तो दीनवाणा होत्साता दारोदार भीक मागत फिरतो, याचा बोल कोणाकडे आहे बरें! अमृताच्या शोधासाठी निघालेल्या मनुष्याच्या तोंडांत विष पडावें ही नियति आहे असें तुह्मांस वाटते काय? खऱ्या दिलाने शोध मात्र करा, मग अमृताचा जिवंत झरा तुह्मांजवळच तुह्मांस आढळून येईल. ''''सर्व धर्मान् परि-'''<noinclude></noinclude> dbnhx9rlo0xnooa5vtzq2e5m0lf4hzx पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/310 104 63580 229521 160873 2026-04-24T11:44:02Z कल्पनाशक्ती 3813 /* मजकुराविना */ 229521 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="0" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><noinclude></noinclude> 6pewiyyebyc8m42d8lu6xlv59f2mxdm पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/311 104 63581 229520 160874 2026-04-24T11:43:46Z कल्पनाशक्ती 3813 /* मजकुराविना */ 229520 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="0" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><noinclude></noinclude> 6pewiyyebyc8m42d8lu6xlv59f2mxdm पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/४४ 104 110031 229484 229447 2026-04-24T04:11:42Z JayashreeVI 4058 229484 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" />'''तीन तत्वज्ञानी.'''</noinclude> खात्री असणें शक्य आहे, तितकी माझी खात्री आहे. मी चांगल्या धन्यांजवळ जाणार आहे. व म्हणूनच मला मरणाबद्दल दुःख होत नाहीं. माझा असा दृढ समज आहे कीं, मेलेल्यांना पुढे कांहीं एका प्रकारचें आयुष्य आहे व तें आयुष्य दुष्टापेक्षां सद्गुणी माणसांना जास्त सुखावह असते.”
{{gap}}सीमीयस म्हणाला, "बरें, पण आपण हा आपला समज आपल्याजवळच ठेवून जाणार कीं, आम्हांलाही त्याचा फायदा देणार? असें दिसतें कीं, या समजांत आमचाही हितसंबंध आहे. शिवाय जर तुम्ही आमची आपल्या म्हणण्याबद्दल खात्री केली तर तुमच्या वर्तनाचें तुम्ही समर्थन केल्यासारखं होईल. "
{{gap}}सॉक्रेटिस म्हणाला, " मी प्रयत्न करून पाहतों, पण क्रिटो माझ्याजवळ बोलायला पाहतो आहे असें मला वाटतें. तर प्रथमतः त्याचें म्हणणें ऐकूं या."
{{gap}}"क्रिटो म्हणाला, " सॉक्रेटिस, मला फक्त हेंच सांगावयाचें आहे कीं तुम्हाला विष देण्याचे काम ज्या माणसाचं आहे त्याने मला तुम्हाला असें बजवायला सांगितलें आहे की आपण फार बोलू नका. कारण बोलण्यानें मनुष्याचें रक्त तापते व मग विषाचा परिणाम उष्णतेने कमजोर होतो. जे लोक आपले रक्त तापवून घेतात, त्यांना केव्हां केव्हां २ किंवा ३ वेळां सुद्धां विषप्राशन करावें लागतें."
{{gap}}सॉक्रेटिस म्हणाला, "बरें तर मग. त्याला आपल्या कामाला लागू दे व दोनदां किंवा गरज लागल्यास तीनदां मला विष देण्याची त्याची तयारी असूं दे, म्हणजे झाले."
{{gap}}क्रिटो म्हणाला, तुम्ही हेंच उत्तर द्याल, हे मला ठाऊक होते. परंतु त्या माणसाचा फार आग्रह होता."
{{gap}}सॉक्रेटिस म्हणाला, "त्याच्या म्हणण्याकडे लक्ष्य देण्याचे कारण नाहीं. पण आपण आपल्या वादविषयाकडे वळू.”
{{gap}}इतकें प्रस्तावनारूप संभाषण झाल्यावर सॉक्रेटिसाने प्रथमतः तत्वज्ञान ही एक प्रकारची मरणमीमांसा कशी आहे, हें सिद्ध केलें व नंतर आत्मा--<noinclude>{{center|३८}}</noinclude> fcvzj6nbht3nns5hszo8nopb78rljfu 229485 229484 2026-04-24T04:13:02Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 229485 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />'''तीन तत्वज्ञानी.'''</noinclude> खात्री असणें शक्य आहे, तितकी माझी खात्री आहे. मी चांगल्या धन्यांजवळ जाणार आहे. व म्हणूनच मला मरणाबद्दल दुःख होत नाहीं. माझा असा दृढ समज आहे कीं, मेलेल्यांना पुढे कांहीं एका प्रकारचें आयुष्य आहे व तें आयुष्य दुष्टापेक्षां सद्गुणी माणसांना जास्त सुखावह असते.”
{{gap}}सीमीयस म्हणाला, "बरें, पण आपण हा आपला समज आपल्याजवळच ठेवून जाणार कीं, आम्हांलाही त्याचा फायदा देणार? असें दिसतें कीं, या समजांत आमचाही हितसंबंध आहे. शिवाय जर तुम्ही आमची आपल्या म्हणण्याबद्दल खात्री केली तर तुमच्या वर्तनाचें तुम्ही समर्थन केल्यासारखं होईल. "
{{gap}}सॉक्रेटिस म्हणाला, " मी प्रयत्न करून पाहतों, पण क्रिटो माझ्याजवळ बोलायला पाहतो आहे असें मला वाटतें. तर प्रथमतः त्याचें म्हणणें ऐकूं या."
{{gap}}"क्रिटो म्हणाला, " सॉक्रेटिस, मला फक्त हेंच सांगावयाचें आहे कीं तुम्हाला विष देण्याचे काम ज्या माणसाचं आहे त्याने मला तुम्हाला असें बजवायला सांगितलें आहे की आपण फार बोलू नका. कारण बोलण्यानें मनुष्याचें रक्त तापते व मग विषाचा परिणाम उष्णतेने कमजोर होतो. जे लोक आपले रक्त तापवून घेतात, त्यांना केव्हां केव्हां २ किंवा ३ वेळां सुद्धां विषप्राशन करावें लागतें."
{{gap}}सॉक्रेटिस म्हणाला, "बरें तर मग. त्याला आपल्या कामाला लागू दे व दोनदां किंवा गरज लागल्यास तीनदां मला विष देण्याची त्याची तयारी असूं दे, म्हणजे झाले."
{{gap}}क्रिटो म्हणाला, तुम्ही हेंच उत्तर द्याल, हे मला ठाऊक होते. परंतु त्या माणसाचा फार आग्रह होता."
{{gap}}सॉक्रेटिस म्हणाला, "त्याच्या म्हणण्याकडे लक्ष्य देण्याचे कारण नाहीं. पण आपण आपल्या वादविषयाकडे वळू.”
{{gap}}इतकें प्रस्तावनारूप संभाषण झाल्यावर सॉक्रेटिसाने प्रथमतः तत्वज्ञान ही एक प्रकारची मरणमीमांसा कशी आहे, हें सिद्ध केलें व नंतर आत्मा--<noinclude>{{center|३८}}</noinclude> 1ipc1kjo3wg7x654xrqp1c6iikzzmle पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/४५ 104 110032 229489 228813 2026-04-24T04:31:34Z JayashreeVI 4058 229489 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /> {{right|'''सांक्रेटिस.'''}}</noinclude> अमर आहे, हा आपला समज कसा खरा आहे, याबद्दल विवेचन केलें. सीव्स व सोमीयस यांनीं शक्य तितके आक्षेप घेतले, परंतु या सर्व आक्षेपांचें साक्रेटिसानें खंडन केलें व आपले म्हणणें प्रमाणांनीं सिद्ध केलें. परंतु हा सर्व वादविवाद व त्यांतील प्रमाणें ह्रीं सॉक्रेटिसाची नसून त्या प्रमाणांमध्ये प्लेटोचे सर्व तत्वज्ञान व त्याची विशेष मतें यांवरच भिस्त ठेवली असल्यामुळे हा भाग बराच गहन व कांहींसा रुक्ष आहे व तो माझ्या वाचकांना कंटाळवाणा वाटण्याचा फार संभव आहे, म्हणून त्या वादविवादाचा अनुवाद येथे देत नाहीं. शिवाय सॉक्रेटिसाच्या चरित्राच्या दृष्टीने त्याचा कांहीं उपयोग नाहीं. पण हा आत्म्याचा वाद सॉक्रेटिस बहुतेक सर्व दिवसभर करीत होता. वादाच्या शेवटी सॉक्रेटिसानें मरणानंतर आत्मा आपापल्या पापपुण्याप्रमाणे निरनिराळ्या लोकीं कसा जातो, व तेथें त्याला आपल्या चांगल्या वाईट कृत्यांबद्दलचं योग्य बक्षीस किंवा शिक्षा कशी होते याबद्दलची आख्यायिका सांगितली. ही गोष्ट अतींद्रिय असल्यामुळे प्रमाणांनी सिद्ध करतां येण्यासारखी नाहीं, असेंही त्यानें कबूल केले व नंतर तो म्हणाला, "मी वर्णन केल्याप्रमाणे हुबेहूब स्थिति आहेच, असें समंजस मनुष्य आग्रहाने सांगणार नाहीं. पण आत्मा व त्याचा पुढील निवास यांसंबंधी असे कांहीं तरी असावें, असें मला वाटते. कारण आत्मा अमर आहे, एवढे आपण सिद्ध केलं आहे. तेव्हां पुढील वर्णनावर भरवसा ठेवणं बरें, व मनांत शंका आल्यास त्या असल्या गोष्टीच्या मंत्रांनी मनांतून घालवून लावणें रास्त. म्हणूनच जर मनुष्यानें शरीर व विषयमुख यांची पर्वा न करतां विद्याधन व सद्गुणघन मिळविण्यांत आपला वेळ खर्च केला असेल, तर त्याने आपल्या आत्म्या बद्दल काळजी न करतां आनंदाने मरणाला राजी असले पाहिजे. सीव्स सीमीयस व माझ्या इतर स्नेह्यांनो! तुम्ही सर्व आपापल्या योग्य वेळीं या प्रवासावर निघाल. पण कविवचनाप्रमाणे देवाने मला आतां बोलाविलें आहे, तेव्हां मी स्नान करून तयार व्हावे, हें बरें. कारण, विष--<noinclude>{{center|३९}}</noinclude> rrof3l373ey006b3pi2vzw8eoqfvwt6 229490 229489 2026-04-24T04:32:48Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 229490 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /> {{right|'''सांक्रेटिस.'''}}</noinclude> अमर आहे, हा आपला समज कसा खरा आहे, याबद्दल विवेचन केलें. सीव्स व सोमीयस यांनीं शक्य तितके आक्षेप घेतले, परंतु या सर्व आक्षेपांचें साक्रेटिसानें खंडन केलें व आपले म्हणणें प्रमाणांनीं सिद्ध केलें. परंतु हा सर्व वादविवाद व त्यांतील प्रमाणें ह्रीं सॉक्रेटिसाची नसून त्या प्रमाणांमध्ये प्लेटोचे सर्व तत्वज्ञान व त्याची विशेष मतें यांवरच भिस्त ठेवली असल्यामुळे हा भाग बराच गहन व कांहींसा रुक्ष आहे व तो माझ्या वाचकांना कंटाळवाणा वाटण्याचा फार संभव आहे, म्हणून त्या वादविवादाचा अनुवाद येथे देत नाहीं. शिवाय सॉक्रेटिसाच्या चरित्राच्या दृष्टीने त्याचा कांहीं उपयोग नाहीं. पण हा आत्म्याचा वाद सॉक्रेटिस बहुतेक सर्व दिवसभर करीत होता. वादाच्या शेवटी सॉक्रेटिसानें मरणानंतर आत्मा आपापल्या पापपुण्याप्रमाणे निरनिराळ्या लोकीं कसा जातो, व तेथें त्याला आपल्या चांगल्या वाईट कृत्यांबद्दलचं योग्य बक्षीस किंवा शिक्षा कशी होते याबद्दलची आख्यायिका सांगितली. ही गोष्ट अतींद्रिय असल्यामुळे प्रमाणांनी सिद्ध करतां येण्यासारखी नाहीं, असेंही त्यानें कबूल केले व नंतर तो म्हणाला, "मी वर्णन केल्याप्रमाणे हुबेहूब स्थिति आहेच, असें समंजस मनुष्य आग्रहाने सांगणार नाहीं. पण आत्मा व त्याचा पुढील निवास यांसंबंधी असे कांहीं तरी असावें, असें मला वाटते. कारण आत्मा अमर आहे, एवढे आपण सिद्ध केलं आहे. तेव्हां पुढील वर्णनावर भरवसा ठेवणं बरें, व मनांत शंका आल्यास त्या असल्या गोष्टीच्या मंत्रांनी मनांतून घालवून लावणें रास्त. म्हणूनच जर मनुष्यानें शरीर व विषयमुख यांची पर्वा न करतां विद्याधन व सद्गुणघन मिळविण्यांत आपला वेळ खर्च केला असेल, तर त्याने आपल्या आत्म्याबद्दल काळजी न करतां आनंदाने मरणाला राजी असले पाहिजे. सीव्स सीमीयस व माझ्या इतर स्नेह्यांनो! तुम्ही सर्व आपापल्या योग्य वेळीं या प्रवासावर निघाल. पण कविवचनाप्रमाणे देवाने मला आतां बोलाविलें आहे, तेव्हां मी स्नान करून तयार व्हावे, हें बरें. कारण, विष--<noinclude>{{center|३९}}</noinclude> tjwmt9khozpwinlqm8h4pu6qpvyd8o8 229491 229490 2026-04-24T04:34:02Z JayashreeVI 4058 229491 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /> {{right|'''सांक्रेटिस.'''}}</noinclude> अमर आहे, हा आपला समज कसा खरा आहे, याबद्दल विवेचन केलें. सीव्स व सोमीयस यांनीं शक्य तितके आक्षेप घेतले, परंतु या सर्व आक्षेपांचें साक्रेटिसानें खंडन केलें व आपले म्हणणें प्रमाणांनीं सिद्ध केलें. परंतु हा सर्व वादविवाद व त्यांतील प्रमाणें ह्रीं सॉक्रेटिसाची नसून त्या प्रमाणांमध्ये प्लेटोचे सर्व तत्वज्ञान व त्याची विशेष मतें यांवरच भिस्त ठेवली असल्यामुळे हा भाग बराच गहन व कांहींसा रुक्ष आहे व तो माझ्या वाचकांना कंटाळवाणा वाटण्याचा फार संभव आहे, म्हणून त्या वादविवादाचा अनुवाद येथे देत नाहीं. शिवाय सॉक्रेटिसाच्या चरित्राच्या दृष्टीने त्याचा कांहीं उपयोग नाहीं. पण हा आत्म्याचा वाद सॉक्रेटिस बहुतेक सर्व दिवसभर करीत होता. वादाच्या शेवटी सॉक्रेटिसानें मरणानंतर आत्मा आपापल्या पापपुण्याप्रमाणे निरनिराळ्या लोकीं कसा जातो, व तेथें त्याला आपल्या चांगल्या वाईट कृत्यांबद्दलचं योग्य बक्षीस किंवा शिक्षा कशी होते याबद्दलची आख्यायिका सांगितली. ही गोष्ट अतींद्रिय असल्यामुळे प्रमाणांनी सिद्ध करतां येण्यासारखी नाहीं, असेंही त्यानें कबूल केले व नंतर तो म्हणाला, "मी वर्णन केल्याप्रमाणे हुबेहूब स्थिति आहेच, असें समंजस मनुष्य आग्रहाने सांगणार नाहीं. पण आत्मा व त्याचा पुढील निवास यांसंबंधी असे कांहीं तरी असावें, असें मला वाटते. कारण आत्मा अमर आहे, एवढे आपण सिद्ध केलं आहे. तेव्हां पुढील वर्णनावर भरवसा ठेवणं बरें, व मनांत शंका आल्यास त्या असल्या गोष्टीच्या मंत्रांनी मनांतून घालवून लावणें रास्त. म्हणूनच जर मनुष्यानें शरीर व विषयमुख यांची पर्वा न करतां विद्याधन व सद्गुणघन मिळविण्यांत आपला वेळ खर्च केला असेल, तर त्याने आपल्या आत्म्याबद्दल काळजी न करतां आनंदाने मरणाला राजी असले पाहिजे. सीव्स सीमीयस व माझ्या इतर स्नेह्यांनो! तुम्ही सर्व आपापल्या योग्य वेळीं या प्रवासावर निघाल. पण कविवचनाप्रमाणे देवाने मला आतां बोलाविलें आहे, तेव्हां मी स्नान करून तयार व्हावे, हें बरें. कारण, विष--<noinclude>{{center|३९}}</noinclude> 73x6860uw755jxt2l14j943xahz5e6h 229492 229491 2026-04-24T04:34:56Z JayashreeVI 4058 229492 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /> {{right|'''सांक्रेटिस.'''}}</noinclude> अमर आहे, हा आपला समज कसा खरा आहे, याबद्दल विवेचन केलें. सीव्स व सोमीयस यांनीं शक्य तितके आक्षेप घेतले, परंतु या सर्व आक्षेपांचें साक्रेटिसानें खंडन केलें व आपले म्हणणें प्रमाणांनीं सिद्ध केलें. परंतु हा सर्व वादविवाद व त्यांतील प्रमाणें ह्रीं सॉक्रेटिसाची नसून त्या प्रमाणांमध्ये प्लेटोचे सर्व तत्वज्ञान व त्याची विशेष मतें यांवरच भिस्त ठेवली असल्यामुळे हा भाग बराच गहन व कांहींसा रुक्ष आहे व तो माझ्या वाचकांना कंटाळवाणा वाटण्याचा फार संभव आहे, म्हणून त्या वादविवादाचा अनुवाद येथे देत नाहीं. शिवाय सॉक्रेटिसाच्या चरित्राच्या दृष्टीने त्याचा कांहीं उपयोग नाहीं. पण हा आत्म्याचा वाद सॉक्रेटिस बहुतेक सर्व दिवसभर करीत होता. वादाच्या शेवटी सॉक्रेटिसानें मरणानंतर आत्मा आपापल्या पापपुण्याप्रमाणे निरनिराळ्या लोकीं कसा जातो, व तेथें त्याला आपल्या चांगल्या वाईट कृत्यांबद्दलचं योग्य बक्षीस किंवा शिक्षा कशी होते याबद्दलची आख्यायिका सांगितली. ही गोष्ट अतींद्रिय असल्यामुळे प्रमाणांनी सिद्ध करतां येण्यासारखी नाहीं, असेंही त्यानें कबूल केले व नंतर तो म्हणाला, "मी वर्णन केल्याप्रमाणे हुबेहूब स्थिति आहेच, असें समंजस मनुष्य आग्रहाने सांगणार नाहीं. पण आत्मा व त्याचा पुढील निवास यांसंबंधी असे कांहीं तरी असावें, असें मला वाटते. कारण आत्मा अमर आहे, एवढे आपण सिद्ध केलं आहे. तेव्हां पुढील वर्णनावर भरवसा ठेवणं बरें, व मनांत शंका आल्यास त्या असल्या गोष्टीच्या मंत्रांनी मनांतून घालवून लावणें रास्त. म्हणूनच जर मनुष्यानें शरीर व विषयमुख यांची पर्वा न करतां विद्याधन व सद्गुणघन मिळविण्यांत आपला वेळ खर्च केला असेल, तर त्याने आपल्या आत्म्याबद्दल काळजी न करतां आनंदाने मरणाला राजी असले पाहिजे. सीव्स सीमीयस व माझ्या इतर स्नेह्यांनो! तुम्ही सर्व आपापल्या योग्य वेळीं या प्रवासावर निघाल. पण कविवचनाप्रमाणे देवाने मला आतां बोलाविलें आहे, तेव्हां मी स्नान करून तयार व्हावे, हें बरें. कारण, विष--<noinclude>{{center|३९}}</noinclude> evlxop53u2zlixhwgdeo5gd0bmjaoes पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/४६ 104 110033 229486 228814 2026-04-24T04:16:14Z सुबोध कुलकर्णी 1231 /* मुद्रितशोधन */ 229486 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="सुबोध कुलकर्णी" />'''तीन तत्वज्ञानी.'''</noinclude>घेण्याच्या आधीच स्नान केलेले असले म्हणजे प्रेताला स्नान घालण्याचा त्रास बायकामाणसांना पडणार नाही."
{{gap}}सॉक्रेटिसाचे बोलणे संपल्यावर क्रिटोनें उत्तर दिले, " आपली इच्छा ठीक आहे. पण तुमच्या मित्रांना किंवा मला आपल्या मुलांबद्दल किंवा दुसऱ्या गोष्टींबद्दल काही सांगावयाचे आहे काय ? शेवटी आपल्याकरतां आम्ही काय करावे ?”
{{gap}}सॉक्रेटिस म्हणाला, " क्रिटो, मी आजपर्यंत जो तुम्हांला उपदेश करीत आलों, त्याप्रमाणे तुम्ही वागलांत, म्हणजे मला सर्व काही मिळाले. तुम्ही आपल्या आत्म्याची योग्य काळजी घ्या, म्हणजे माझी, माझ्या मुलांबाळांची व तुमची स्वतःचीही योग्य सेवा केल्यासारखे होईल. मग तुम्ही आतां मला वचन दिले नाही, तरी हरकत नाही. परंतु जर तुम्ही आपल्या आम्या बद्दल बेपर्वा राहिलां, आणि आज व दुसऱ्याही प्रसंगी वादविवादांत ज्या तऱ्हेच्या आयुष्यक्रमाचे चित्र आपण रेखाटले आहे,त्याप्रमाणे वागला नाही, तर तुम्ही आज दिलेली वचने कितीही लांबलांब आणि मनोभावाने दिलेली असोत, त्यांचा काहीएक उपयोग नाही.”
{{gap}}क्रिटो म्हणाला, " आपल्या उपदेशाप्रमाणे वागण्याचा आम्ही होईल तितका प्रयत्न करूं. परंतु तुम्हांला आम्ही कोणत्या तऱ्हेने पुरावे ?"
{{gap}}सॉक्रेटिस म्हणाला, " तुमच्या इच्छेनुरूप फक्त प्रथमतः मला तुमच्यापासून दूर जाऊ न देतां धरून ठेवले पाहिजे."
{{gap}}नंतर सॉक्रेटिसाने हंसतमुख होऊन आपल्या मित्रमंडळीकडे पाहून म्हटले, " मित्रहो ! तुमच्याजवळ बोलणारा व आपली प्रमाणे व्यवस्थेने मांडणारा तो मी सॉक्रेटिस, ही गोष्ट क्रिटोला काही पटलेली दिसत नाही. त्याला वाटते की, लवकरच प्रेत होऊन पडणारे जे माझें शरीर, तोच मी, व म्हणूनच मला कसे पुरावयाचे याबद्दल तो विचारपूस करीत आहे.विष प्राशन केल्यावर मी येथे राहणार नाही, तर भल्या लोकांच्या वस्तीला जाईन, हे सिद्ध करण्याकरतां मी जी प्रमाणे उपयोगांत आणली व ज्या प्रमाणांच्या योगाने तुमचे व माझे समाधान झालें, ती सर्व प्रमाणे क्रिटो<noinclude>{{center|४०}}</noinclude> o6bg5m8rhkbvmq1o30rdxdq2tj6ncxk पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/४७ 104 110034 229487 228815 2026-04-24T04:17:17Z सुबोध कुलकर्णी 1231 /* मुद्रितशोधन */ 229487 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="सुबोध कुलकर्णी" />{{right|'''साक्रेटिस.'''}}</noinclude>च्या मनावर उपड्या घागरीवर पाण्यासारखी झाली ! तरी तो ज्याप्रमाणे चौकशीच्या वेळी मला जामीन राहिला होता, त्याप्रमाणे आतां तुम्ही मला निराळ्या तऱ्हेनें जामीन रहा. तेव्हां मी येथून जाणार नाही, हजर राहीन, अशाबद्दल त्याने हमी घेतली होती, परंतु आतां माझ्या मरणानंतर मी तुमच्याबरोबर राहणार नाही, तर येथून जाईन, अशाबद्दल तुम्ही हमी घ्या. असे तुम्ही केले म्हणजे माझ्या मरणाबद्दल त्याला कमी दुःख होईल, व जेव्हां माझें शरीर जळतांना किंवा पुरतांना तो पाहील, तेव्हां मला भयंकर यातना होत आहेत, असे त्याला वाटणार नाही. तसेच माझ्या स्मशानाविधीच्या वेळी सॉक्रेटिसाला कपडे चढवून नीट बसवीत आहों, किंवा सॉक्रेटिसाला जाळीत किंवा पुरीत आहों, असें तो म्हणणार नाही. कारण प्रिय क्रिटो ! तुम्ही हे ध्यानात ठेवा की, अयथार्थ शब्दप्रयोग करणे हा मूळ दोष आहे इतकेच नव्हे तर त्याच्या योगाने आत्म्यालाही दोष लागतो. म्हणून तुम्ही आनंदी राहून माझें शरीर पुरावयाचे असा शब्दप्रयोग करा व तें माझें शरीर तुम्हाला वाटेल त्याप्रमाणे व तुम्हाला योग्य दिसेल त्या तऱ्हेने पुरा."
{{gap}}इतके बोलून सॉक्रेटिस उठला व स्नान करण्याकरतां दुसऱ्या खोलीत गेला. क्रिटो त्याच्या मागोमाग गेला व बाकीची मंडळी मागे राहिली. सर्वजण सॉक्रेटिसाच्या वादविषयावर बोलत होते व आपल्यावर केवढे संकट आले आहे, आज जणूं काय आपला पिताच मरत आहे व पुढील सर्व आयुष्यभर आपण पोरके होणार असे त्यांच्या मनांत येत होते.
{{gap}}इतक्यांत सॉक्रेटिसाची आंघोळ आटपली आणि त्याच्या कुटुंबाची मंडळीची-त्याला दोन अगदी लहान व एक जाणता मुलगा होता-भेट झाली. क्रिटोच्या समक्षच तो बायकामुलांजवळ बोलला. व आपली शेवटली आज्ञा त्यांना सांगून त्याने त्या सर्वांना घरी लावून दिले आणि मग तो आपल्या मित्रमंडळीकडे वळला. या वेळी सूर्य अस्ताला जाऊ लागला होता. कारण तो आंतल्या खोलीत बराळ वेळ होता. स्नान होऊन मित्रमंडळींत बसल्यानंतर फारसे बोलणें निवाले नाही.{{nop}}<noinclude>{{center|४१}}</noinclude> sj75gffqxp5swgo1d4jhhxekg8ulovb पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/४८ 104 110035 229488 228816 2026-04-24T04:18:16Z सुबोध कुलकर्णी 1231 /* मुद्रितशोधन */ 229488 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="सुबोध कुलकर्णी" />'''तीन तत्वज्ञानी.'''</noinclude>{{gap}}थोड्याच वेळांत सरकारी माणूस येऊन सॉक्रेटिसला म्हणाला, " सॉक्रेटिस, इतर माणसांप्रमाणे तुम्ही असमंजसपणाने वागणार नाही, हें मला ठाऊक आहे. सरकारी हुकमाप्रमाणे विष प्यायला मी त्यांना सांगितले, की ते माझ्यावर रागावतात व मला शिव्याशाप देतात. परंतु आजपर्यंत जे जे लोक तुरुंगांत आलेले आहेत, त्या सर्वांत तुमच्यासारखा उदार, शांत व उत्कृष्ट मनुष्य मला तर आढळला नाहीं ! आणि आतां माझी खात्री आहे, की तुम्ही माझ्यावर रागावणार नाही, तर ज्यांच्या शिरावर आपल्या मृत्यूचे खापर फुटले आहे, त्यांच्यावर रागवाल, ज्याला उपाय नाही ती गोष्ट आपण शांतपणे सोसण्याचा प्रयत्न करा. मी कां आलो आहे, हे आपल्याला ठाऊक आहेच, आतां मी आपला निरोप घेतो."
{{gap}}सॉक्रेटिसाने त्या माणसाकडे पाहून त्याला म्हटले, "ठीक आहे, तुम्ही म्हणतां त्याप्रमाणे वागण्यास मी तयार आहे."
{{gap}}नंतर मित्रमंडळीकडे वळून तो म्हणाला, “ हा मनुष्य किती सभ्य आहे ! माझ्या सर्व तुरुंगवासांत हा मनुष्य मजकडे नेहमी येत असे. हा केव्हां केव्हां माझ्याजवळ बोले व माझ्याशी फार चांगल्या तऱ्हेनें वागे. आता माझ्याकरता त्याला किती दुःख होत आहे ? किटो, चला तर आपण त्याच्या म्हणण्याप्रमाणे करूं या, विष तयार झाले असले तर आणवा व जर ते तयार झाले नसले तर तयार करवा."
{{gap}}क्रिटो म्हणाला, " नाही. सॉक्रेटिस, अजून सूर्य टेकड्यांवरच आहे. तो मावळला नाही. शिवाय मला ठाऊक आहे की, इतर माणसें अगर्दी उशीरां विष प्राशन करतात व विष घेण्याबद्दल इशारा झाल्यावर सुद्धां हौसेने खातात, पितात व आपल्या निवडक मित्रांचे सहवाससुख भोगतात, तेव्हां घाई करण्याचे कारण नाही. अजून वेळ आहे."
{{gap}}सॉक्रेटिस म्हणाला, "क्रिटो, ज्यांच्याबद्दल तूं बोलत आहेस ते साहजिकच तसे करतात, कारण असे करण्यापासून आपला फायदा आहे असे त्यांना वाटते. पण मी मात्र तसे करणार नाही. कां की थोड्या उशीराने विष पिण्यापासून मला काही एक मिळणार नाही. उलट जे<noinclude>{{center|४२}}</noinclude> kvgwa9l1czrcr2d11ovrhnbxr1c4stk पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/४९ 104 110036 229493 228817 2026-04-24T04:52:19Z सुबोध कुलकर्णी 1231 /* मुद्रितशोधन */ 229493 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="सुबोध कुलकर्णी" />{{right|'''साक्रेटिस.'''}}</noinclude>आयुष्य बहुतेक संपत आले आहे, त्या आयुष्याचा अधाशीपणाने संग्रह करण्याबद्दल मी आपल्याला तुच्छ मानूं लागेन. म्हणून मी म्हणतो, त्याप्रमाणे करण्याचे नाकारूं नका."
{{gap}}तेव्हां जवळ असलेल्या आपल्या गुलामाला क्रिटोनें खूण केली. तो गुलाम बाहेर गेला व थोड्या अवकाशाने तयार केलेल्या विषाचा पेला हातांत घेतलेल्या माणसासह तो परत आला.
{{gap}}त्या माणसाला पाहून सॉक्रेटिस त्याला म्हणाला, “ मला काय करावयाचे याची तुला सर्व माहिती आहे ?"
{{gap}}त्याने उत्तर दिले, " फक्त हे तुम्ही प्राशन करा, व पाय जड होईपर्यंत इकडे तिकडे हिंडा व मग पडून रहा. म्हणजे विषाचा आपोआप परिणाम होऊ लागेल."
{{gap}}असे म्हणून त्या माणसाने तो पेला सॉक्रेटिसाला दिला, व चेहेत किंवा आकृतीत यत्किंचितही फरक न होऊ देतां व न कापतां मोठ्या आनंदाने सॉक्रेटिसाने तो घेतला.
{{gap}}आपल्या नेहमींच्या स्थिर नजरेने त्या माणसाकडे पाहून सॉक्रेटिसाने त्याला विचारले, " या पेल्यांतून देवाचें तर्पण करण्याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे ? मी करूं की नको?"
{{gap}}तो मनुष्य म्हणाला, "आम्ही एका माणसाला पुरेल इतकेंच विष तयार करतो."
{{gap}}सॉक्रेटिस म्हणाला, “मी समजलों; पण मला तर्पण करावयाला हरकत नाही, व देवाची प्रार्थना मला केलीच पाहिजे. म्हणजे माझा येथपासूनचा प्रवास सुखाचा होईल. हीच माझी प्रार्थना, तरी त्याप्रमाणे घडो."
{{gap}}इतके बोलून साक्रेटिसाने तो पेला तोंडाला लावला व त्यांतील विष त्याने अगदी शांतपणाने व आनंदाने पिऊन टाकले, हे होईपयेंत सॉक्रेटिसाच्या स्नेहीमंडळीने आपले दुःख बरेच आवरून धरले होते; परंतु त्याला विष पितांना व तें संपवून टाकतांना त्यांनी पाहिले, तेव्हां त्यांचे<noinclude>{{center|४३}}</noinclude> moqvsa1a5mqb7fxj59nn20su54d8pfq 229495 229493 2026-04-24T04:57:11Z JayashreeVI 4058 229495 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="सुबोध कुलकर्णी" />{{right|'''साक्रेटिस.'''}}</noinclude>आयुष्य बहुतेक संपत आले आहे, त्या आयुष्याचा अधाशीपणाने संग्रह करण्याबद्दल मी आपल्याला तुच्छ मानूं लागेन. म्हणून मी म्हणतो, त्याप्रमाणे करण्याचे नाकारूं नका." {{gap}}तेव्हां जवळ असलेल्या आपल्या गुलामाला क्रिटोनें खूण केली. तो गुलाम बाहेर गेला व थोड्या अवकाशाने तयार केलेल्या विषाचा पेला हातांत घेतलेल्या माणसासह तो परत आला. {{gap}}त्या माणसाला पाहून सॉक्रेटिस त्याला म्हणाला, “ मला काय करावयाचे याची तुला सर्व माहिती आहे ?"
{{gap}}त्याने उत्तर दिले, " फक्त हे तुम्ही प्राशन करा, व पाय जड होईपर्यंत इकडे तिकडे हिंडा व मग पडून रहा. म्हणजे विषाचा आपोआप परिणाम होऊ लागेल."
{{gap}}असे म्हणून त्या माणसाने तो पेला सॉक्रेटिसाला दिला, व चेहेत किंवा आकृतीत यत्किंचितही फरक न होऊ देतां व न कापतां मोठ्या आनंदाने सॉक्रेटिसाने तो घेतला.
{{gap}}आपल्या नेहमींच्या स्थिर नजरेने त्या माणसाकडे पाहून सॉक्रेटिसाने त्याला विचारले, " या पेल्यांतून देवाचें तर्पण करण्याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे ? मी करूं की नको?"
{{gap}}तो मनुष्य म्हणाला, "आम्ही एका माणसाला पुरेल इतकेंच विष तयार करतो."
{{gap}}सॉक्रेटिस म्हणाला, “मी समजलों; पण मला तर्पण करावयाला हरकत नाही, व देवाची प्रार्थना मला केलीच पाहिजे. म्हणजे माझा येथपासूनचा प्रवास सुखाचा होईल. हीच माझी प्रार्थना, तरी त्याप्रमाणे घडो."
{{gap}}इतके बोलून साक्रेटिसाने तो पेला तोंडाला लावला व त्यांतील विष त्याने अगदी शांतपणाने व आनंदाने पिऊन टाकले, हे होईपयेंत सॉक्रेटिसाच्या स्नेहीमंडळीने आपले दुःख बरेच आवरून धरले होते; परंतु त्याला विष पितांना व तें संपवून टाकतांना त्यांनी पाहिले, तेव्हां त्यांचे<noinclude>{{center|४३}}</noinclude> 3lrled84s3mxha3urmch85p94uqs05u 229496 229495 2026-04-24T04:58:58Z JayashreeVI 4058 229496 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="सुबोध कुलकर्णी" />{{right|'''साक्रेटिस.'''}}</noinclude>आयुष्य बहुतेक संपत आले आहे, त्या आयुष्याचा अधाशीपणाने संग्रह करण्याबद्दल मी आपल्याला तुच्छ मानूं लागेन. म्हणून मी म्हणतो, त्याप्रमाणे करण्याचे नाकारूं नका."
{{gap}}तेव्हां जवळ असलेल्या आपल्या गुलामाला क्रिटोनें खूण केली. तो गुलाम बाहेर गेला व थोड्या अवकाशाने तयार केलेल्या विषाचा पेला हातांत घेतलेल्या माणसासह तो परत आला.
{{gap}}त्या माणसाला पाहून सॉक्रेटिस त्याला म्हणाला, “ मला काय करावयाचे याची तुला सर्व माहिती आहे ?"
{{gap}}त्याने उत्तर दिले, " फक्त हे तुम्ही प्राशन करा, व पाय जड होईपर्यंत इकडे तिकडे हिंडा व मग पडून रहा. म्हणजे विषाचा आपोआप परिणाम होऊ लागेल."
{{gap}}असे म्हणून त्या माणसाने तो पेला सॉक्रेटिसाला दिला, व चेहेत किंवा आकृतीत यत्किंचितही फरक न होऊ देतां व न कापतां मोठ्या आनंदाने सॉक्रेटिसाने तो घेतला.
{{gap}}आपल्या नेहमींच्या स्थिर नजरेने त्या माणसाकडे पाहून सॉक्रेटिसाने त्याला विचारले, " या पेल्यांतून देवाचें तर्पण करण्याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे ? मी करूं की नको?"
{{gap}}तो मनुष्य म्हणाला, "आम्ही एका माणसाला पुरेल इतकेंच विष तयार करतो."
{{gap}}सॉक्रेटिस म्हणाला, “मी समजलों; पण मला तर्पण करावयाला हरकत नाही, व देवाची प्रार्थना मला केलीच पाहिजे. म्हणजे माझा येथपासूनचा प्रवास सुखाचा होईल. हीच माझी प्रार्थना, तरी त्याप्रमाणे घडो."
{{gap}}इतके बोलून साक्रेटिसाने तो पेला तोंडाला लावला व त्यांतील विष त्याने अगदी शांतपणाने व आनंदाने पिऊन टाकले, हे होईपयेंत सॉक्रेटिसाच्या स्नेहीमंडळीने आपले दुःख बरेच आवरून धरले होते; परंतु त्याला विष पितांना व तें संपवून टाकतांना त्यांनी पाहिले, तेव्हां त्यांचे--<noinclude>{{center|४३}}</noinclude> mibrhiao18hv0g9zmjc150w41yx95fr पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/५० 104 110037 229494 228818 2026-04-24T04:53:30Z सुबोध कुलकर्णी 1231 /* मुद्रितशोधन */ 229494 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="सुबोध कुलकर्णी" />'''तीन तत्वज्ञानी.'''</noinclude>दुःख आवरेना; सर्वांना ओक्साबोक्शी रडू कोसळले. सॉक्रेटिसाकरितां ती मंडळी रडत नव्हती, तर आपला इतका उत्तम मित्र नाहीसा झाला याबद्दल ती रडत होती. क्रिटोला तर आपले अश्रु न आवरल्यामुळे तो बाहेर गेला होता, व त्या सर्व दिवसभर ज्याच्या रडण्याला खळ पडला नव्हता, तो अपॉलोडोरसहि मोठमोठ्याने रडू लागला, व त्याच्या हुंदक्यांनी आणि विलापांनी सर्वांच्या काळजाचे पाणी झाले. मात्र सॉक्रेटिस अगदी शांत होता. तो सर्वांना म्हणाला, "मित्रहो, तुम्ही हे काय मांडिले आहे ? अशा तऱ्हेचे प्रदर्शन होऊ नये, म्हणून मी बायकांमुलानां मुद्दाम पाठवून दिले. कारण मी असे ऐकिले आहे की, मनुष्याला शांततेने मरण यावे, म्हणून तुम्ही शांत व्हा व धीर धरा."
{{gap}}हे सॉक्रेटिसाचे भाषण ऐकून सर्व मंडळी लाजली, व त्यांनी आपला शोक आवरला. इकडे सॉक्रेटिस येरझारा घालीत होता; इतक्यांत आपले पाय जड होत आहेत, असे त्याला भासले, व मग त्याला सांगितल्याप्रमाणे तो उताणा निजला. नंतर विष देणारा माणूस राहून राहून त्याचे हातपाय तपासू लागला, व पायांला जोराने दाबून येथे संवेदना होतात का म्हणून विचारूं लागला. सॉक्रेटिस म्हणाला, "नाही होत." नंतर त्याने त्याच्या तंगड्या त्याच प्रमाणे दाबल्या, व सॉक्रेटिसाचे शरीर गार व ताठ होत चालले आहे हे सर्वांना दाखविलें, सॉक्रेटिसानेंहि ते पाहिले व " हृदयापर्यंत पोहोचले, म्हणजे मी जाईन," असे म्हटले. त्याच्या कमरेपर्यंत गारवा आला, तेव्हां साक्रेटिसाने आपल्या चेहऱ्यावरील आवरण काढून टाकलें, व पुढील शब्द उच्चारले. ते त्याचे शेवटचेच होते.
{{gap}}"क्रिटो, अस्क्लेयस देवाला मी एक कोंबडे द्यावयाचे राहिले आहे ते द्यायला तूं विसरूं नकोस."
{{gap}}क्रिटो म्हणाला, " मी खात्रीने देईन. आपली आणखी काही इच्छा आहे काय ?".
{{gap}}या प्रश्नाला सॉक्रेटिसाने उत्तर दिले नाही. पण थोड्याच वेळाने<noinclude>{{center|४४}}</noinclude> tbgq5kd4dbaqg3k3bss1rvr4sp1x9b9 सदस्य चर्चा:अविनाश बाबन दाते 3 110214 229482 2026-04-23T13:19:10Z स्वागत आणि साहाय्य चमू 815 नवीन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला 229482 wikitext text/x-wiki {{Template:Welcome|realName=|name=अविनाश बाबन दाते}} -- [[सदस्य:स्वागत आणि साहाय्य चमू|स्वागत आणि साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:स्वागत आणि साहाय्य चमू|चर्चा]]) १८:४९, २३ एप्रिल २०२६ (IST) fnmnqh8s4imjciuleiym1xtsrv4thzn