विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.46.0-wmf.26 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk अनुक्रमणिका:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf 106 57614 229765 229666 2026-05-01T06:23:33Z कल्पनाशक्ती 3813 229765 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड) |Language=mr |Volume=खंड क्र.१ |Author=[[:mr:स्वामी विवेकानन्द|स्वामी विवेकानन्द]] [[:en:|Swami Vivekananda]] |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=जी. एन. कुलकर्णी |Address=मुंबई |Year=1912 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=C |Pages=<pagelist 8 ="प्रकाशकाची प्रस्तावना" 12="भगिनी निवेदिता यांचा उपोद्धात" 26="अनुक्रमणिका" 31="सर्व धर्मांच्या परिषदेपुढे दिलेली व्याख्याने" 54="आत्मा, परमेश्वर आणि धर्म" 67="हिंदुधर्म" 73="कर्मयोग" 191="धर्म म्हणजे काय?" 210="अनुभवाचा मार्ग" 225="विवेचकबुद्धि आणि धर्म" 250="आर्यज्ञानमंदिराची सोपानपंक्ति"/> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} q5f5ufvo1fqi2jhfra1bs389a48nhid पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/236 104 63506 229742 160329 2026-04-30T15:59:45Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229742 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२१० |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>चुकीचे आहे. आपण निवळ जडवादी आहों असें गृहीत धरले, तर आपल्या मतें सर्व दृश्य विश्व ह्मणजे अनेक जड पदार्थाचा एक मोठा समुद्र आहे, हाच आपला शेवटचा सिद्धांत होईल. समुद्रांत ज्याप्रमाणे निरनिराळ्या लाटा उत्पन्न झालेल्या दिसतात, त्याचप्रमाणे तुह्मी, मी आणि इतर लोकहि या प्रचंड जडसमुद्रांतील लहानलहान लाटांसारखेच आहों असें म्हटले पाहिजे. एकच प्रकारचे जडपदार्थ एकत्र येऊन कांही वेळ लाटेसारखे दिसतात आणि ती लाट फुटल्यावर ते पुन्हां विस्कळित होतात, असेंच मानणे भाग आहे. समुद्रांत लाटा उत्पन्न झाल्या आणि मोडल्या ह्मणजे सर्व पाणी एकत्र मिसळले जाते; आणि पुन्हां लाटा उठू लागल्या ह्मणजे पहिल्या लाटांच्या पाण्याची अदलाबदल होतेच. त्यांत अमुक पाण्याच्या अमुक लाटा अशी निवडानिवड करणे शक्य नाही. त्याचप्रमाणे पूर्वी आपण सर्व निरनिराळ्या लाटा होतो. मध्यंतरी आपण विस्कळित स्वरूपास गेला; आणि आतां पुन्हां लाटांच्या रूपाने उद्भवलों. अशा स्थितीत माझ्यांतील जडपदार्थ सूर्यात अथवा तुमच्यांतील जडपदार्थ एखाद्या वनस्पतींत गेले नसतील अस कोणी ह्मणावें? ह्मणजे अशारीतीने तुमच्या आमच्यांतील व विश्वांतील यच्चयावत् सृष्ट पदार्थात अदलाबदल चालू असतां आपण शरीराने तरी भिन्न कसे असणार? अशारीतीने आपली शरीरें भिन्न दिसत असतांहि त्यांत एकतानता आहे ही गोष्ट सिद्ध होते. अशाच रीतीने चैतन्यांतहि एकतानता आहे हे सिद्ध करणे कठीण नाही. अनेक विचारतरंगांचा जो एक समुद्र आहे, त्यांतील काही विचार एकत्र होऊन माझें मन, तुमचे मन व इतर लोकांची मने तयार झाली आहेत. अंतर्यामी या सर्वांची अत्यंत एकतानता आहे. फार लांब कशाला? मी आतां बोलत आहे व आपण ऐकत आहां; आणि याचवेळी आपल्या विचारांची झपाट्याने अदलाबदल होत आहे, हे थोड्या विचाराअंती आपल्या लक्ष्यांत येण्याजोगे आहे. अशारीतीने आपणा सर्वांत बाह्यतः भेद दिसला तरी वस्तुतः आपण सर्व विचाराने एकरूपच आहों असें सिद्ध होते. ज्या अर्थी आपण शरीराने व मनाने एकच आहों, त्या अर्थी ही दोन्ही ज्या मूळस्वरूपापासून उद्भवली आहेत ते आमचें मूळरूपहि एकच असले पाहिजे हे उघड होत नाही काय? यावरून आमचे निराळेपण हा केवळ दृश्याभास असून आपण सर्व वस्तुतः एकरूपच आहों, असें निःसंशय सिद्ध होते. आजपर्यंत भौतिकशास्त्रांनी जितके शोध लाविले तितक्या सर्वांचे पर्यवसान शेवटी याच सिद्धांतांत होणार, अशी उघड चिन्हें आज दिसू लागली आहेत. छाती काढून आपल्याच डौलांत चाल-<noinclude></noinclude> 82aoeowhrxvnl7xxykpcgdmhp9c446d पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/237 104 63507 229743 160330 2026-04-30T16:03:05Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229743 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|२११ }} {{rule}}</noinclude>णारा मनुष्य आणि गटारांत लोळणारा सूक्ष्म जंतु हे भौतिकशास्त्रज्ञांच्या दृष्टीने एकरूपच आहेत. दोघांतहि एकाच जातीच्या घटकांचा वास आहे असें भौतिकशास्त्रे त्या गर्विष्ठ मनुष्यास निक्षून सांगत आहेत. आह्मी पौवात्य शास्त्रज्ञ यापुढेंहि आणखी एक पाऊल टाकून असें ह्मणतों की तो गर्विष्ठ मनुष्य एकेकाळी किड्याच्या रूपाने खरोखरच गटारांत लोळत होता. आणि त्यानंतर दुसरे अनेक जन्म घेऊन तो सध्या मनुष्य झाला आहे. जगांत जें जें दृश्यास आले आहे त्या सर्वांचें एकस्वरूप पाहणे, किंबहुना आपण स्वतःच इतक्या अनंतरूपाने नटलो आहों, हा अनुभव घेणे ही मानवी ज्ञानाची परमावधि आहे. आपणा सर्वांना शिकण्यासारखें जें कांही आहे ते हेच. आपला गर्व नेहमी अशा अनुभवाच्या आड येत असतो. एखाद्या मोठ्या मनुष्याची व आपली योग्यता एकच आहे असें ह्मणवून घेणे आपणांस भूषणास्पद वाटते; पण आपले साम्य किड्याशी आहे असे कोणी ह्मटल्याबरोबर आपणांस क्रोध येतो. मनुष्याचे भयंकर अज्ञान त्याच्या स्वतःच्या उन्नतीच्या प्रत्येक मार्गात आडवें पडून त्यास पुढे पाऊल टाकू देत नाही. आपला एखादा पूर्वज श्रीमान् असला तर आपण अमक्या श्रीमानाचे खापरपणतू असें लोकांना सांगण्यांत आपणांस भूषण वाटते. त्याने तो पैसा चोऱ्या करून अथवा दरवडे घालून मिळविला असला तरी त्याच्या कौशल्याची आणि धाडसाची आपण तारीफ करीत सुटतो. पण आपला पूर्वज एखादा नीतिमान् पण भिकारी मनुष्य असला तर त्याच्या नांवाशी आपला काही संबंध नाही असे दाखविणे आपणांस भूषणरूप वाटते.<br>{{gap}}भौतिकशास्त्रांचा जो जो उत्कर्ष होत जाईल तो तों आमच्या डोळ्यांवरचें एक एक पटल गळून पडेल यांत संशय नाही. सत्य आपला मार्ग, हळू हळू पण निश्चयाने, आक्रमूं लागले आहे. सनातनधर्माच्या दृष्टीने हा मोठा विजयच आहे. आज कित्येक शतकें हीच गोष्ट आमचा अद्वैत सिद्धांत सर्व जगास सांगत आहे. माझ्या आत्म्याचें जें मूलरूप तेंच वस्तुतः सर्व विश्वाचे रूप आहे; येवढेच नव्हे तर सर्व पदार्थ मूलतः एकरूपच आहेत व दृश्याभासामुळे ते वेगळे आहेत असे दिसते, हेच अद्वैतसिद्धांताचे सांगणे आहे. आमचा अद्वैतसिद्धांत प्रत्येकाला ह्मणतो 'तत्वमसि' 'तेंच तूं आहेस.' तूं विश्वापासून आपणास निराळा समजून दुःख भोगतोस. तुला सुखरूप व्हावे असे वाटत असेल तर या एकतानतेचा अनुभव घे. ज्याला या एकात्मकतेचा अखंड अनुभव असेल त्यालाच अखंड सुखाची प्राप्ति होईल.{{nop}}<noinclude></noinclude> 8gldhly3bx0de8y5hy5s1hr204yqg9s पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/238 104 63508 229744 160331 2026-04-30T16:11:19Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229744 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२१२ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>{{gap}}यावरून वेदांतधर्माने सांगितलेली तत्वें भौतिकशास्त्रांच्या सिद्धांतांविरुद्ध नाहीत; एवढेच नव्हे तर तेच सिद्धांत वेदांताच्या आधाराने अधिक चांगल्या प्रकारे सिद्ध होतात. ''''सर्वं खल्विदं ब्रह्म'''' असा वेदांताचा सिद्धांत आहे. ब्रह्म हेच सर्वांचे अधिष्ठान असून त्याबाहेर कांही राहू शकत नाही. ब्रह्म विश्वबाह्य नसून विश्वांतील यच्चयावत् पदार्थात भरून राहिले आहे किंबहुना सर्व दृश्य सृष्टी हे ब्रह्माचेंच व्यक्तरूप आहे. पुरुषांत आणि स्त्रीत एकाच ब्रह्माची व्याप्ति आहे: आपल्याच गर्वात छाती काढून चालणारा तरुण बांड जसा ब्रह्मरूप आहे, तसाच पाठीची कमान झालेला व काठीच्या आधाराने पाउले टाकणारा वृद्धहि ब्रह्म आहे. आपण जें जें कांही पाहतों, व ज्याला ज्याला स्पर्श करतो तें सर्व ब्रह्मच आहे. आपण सर्व ब्रह्मांत वास करतों, सर्व व्यवहार करतों व त्याच्याच आश्रयाने जगतो. या प्रकारची कल्पना नव्या करारांतहि आढळून येते. विश्वात चोहोंकडे परमेश्वराची व्याप्ति आहे, तो सर्व दृश्याचे सत्वसार आहे, व वस्तुमात्राचा अंतरात्मा तोच आहे, ही कल्पना नव्या करारांतहि ग्रथित केली आहे. जग दृश्य स्वरूपास येते याचा अर्थ असा आहे की अव्यक्त ब्रह्म व्यक्तस्वरुपास येतें. सच्चिदानंदस्वरूप व्यक्त होण्याचे आपण सर्व मार्ग आहो. आपल्या या शरीररूपी लहान लहान प्रवाहांनी ब्रह्मच वाहत आहे. मनुष्यामनुष्यात, देवदूतांत आणि मनुष्यांत, मनुष्यांत आणि पशूत, पशूत आणि वृक्षात व वृक्षात आणि दगडांत जो भेद दिसतो, तो मूलस्वरूपाचा भेद नव्हे. या सर्वातील सारभूततत्व एकच असल्यामुळे त्या सर्वांची जात एकच असें ह्मणण्यास हरकत नाही. फरक दिसतो तो कमीअधिक परिमाणामुळे उत्पन्न झालेला आहे. माझ्या व्यक्तपणाचे परिमाण कमी असले तर मला कमी दर्जाचा असे समजतात. याच रीतीने व्यक्तपणाच्या अधिक परिमाणामुळे तुह्मी माझ्यापेक्षा कदाचित अधिक उच्च दर्जाचे असाल. येथे दर्जा कमीअधिक वाटतो त्याचे कारण मूलतत्वातील उच्चनीच भाव नव्हे; तर त्याच्या व्यक्त होण्याच्या परिमाणातील कमीअधिकपणा हेच त्याचे कारण आहे. तुमच्यांत माझ्यांत काय अथवा पशूत आणि दगडात काय, एकाच परमात्मरूपाची व्याप्ति आहे. याकरिता तुम्ही, मी आणि इतर सर्व सृष्टि वस्तुतः परमात्मरूपच आहे. परमेश्वररूप असणे हा जसा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे तसाच माझाहि आहे. तुह्मी केवळ पावित्र्याचे पुतळे आहात आणि मी केवळ पापमूर्ति आहे, तथापि तुमच्या पुण्यरूपांत आणि माझ्या पापरूपात एकच सच्चिदानंद भरून राहिला आहे. तुमच्या व्यक्तपणाचें परिमाण<noinclude></noinclude> frru3f6nt0uy6e0dbm0pvedqloi1n0g पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/239 104 63509 229745 160332 2026-04-30T16:16:36Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229745 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|२१३ }} {{rule}}</noinclude>आज अधिक दिसत आहे; पण एक दिवस असा येईल की आजचा पापमूर्ति जो मी तोच त्यादिवशी वंदनीय सत्पुरुष ह्मणवीन. कारण जें पूर्णरूप तुमच्यांत आहे तेच माझ्यांतहि ओतप्रोत भरून राहिले आहे. माझा दर्जा कमी कां आणि तुमचा अधिक कां, या प्रश्नास उत्तर देण्याकरितां विश्वबाह्य सैतानाची अथवा परमेश्वराची अपेक्षा करावी लागत नाही. वस्तुगत पदार्थातूनच या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. अर्वाचीन भौतिकशास्त्रांच्या पद्धतीनेच हे उत्तर आपणांस मिळालें आहे. विश्वांत जे जे काही दिसतें तें सर्व परमेश्वररूपच आहे. सर्व जड पदार्थातहि परमेश्वरच भरला आहे असे म्हटले, म्हणून परमेश्वर जडरूप आहे असे मात्र समजू नये; तर ज्या इंद्रियांच्या द्वारा आपण परमात्म्याचे रूप पाहतों, त्यांच्या दोषामुळे परमात्म्याचे स्वरूप जड आहेसें भासते, असे समजावें. परमात्मा वस्तुतः सर्वत्र एकसारखाच व्यक्त झाला असतांहि इंद्रियांच्या दोषांमुळे त्याच्या स्वरूपांत भिन्नता उत्पन्न होते. बाह्येंद्रिये बंद करून केवळ मनाने त्याला अवलोकन केले तर तोहि मनोमयस्वरूपाचा दिसतो. मनाचाहि त्याग करून केवळ चैतन्यद्वारा त्याचा अनुभव घेतला तर तो केवळ चैतन्यरूप आहे असा अनुभव येतो. तो जडपदार्थ नाही, तर जडांतील सत्यांश तो आहे. आपण असें समजूं की, अर्धवट अंधार आहे अशा जागी मी गेलों तो समोर मला कांहीं पदार्थ दिसला. काडी ओढून पाहिली तों ती खुर्ची आहे, असा माझा निश्चय झाला. या उदाहरणांत 'खुर्ची आहे' अशी प्रतीति होण्यास दोन कारणे लागतात. तेथे काही तरी असणे हे एक कारण; व प्रकाश उत्पन्न करून तो पदार्थ 'अमुक आहे' असा निश्चय करणे हे दुसरें कारण. पहिल्या कारणाने केवळ अस्तित्वाचा बोध होतो. हेच परमात्म्याचे रूप. दुसऱ्या कारणाने 'तें अमुक' असा मी निश्चय करतो. हे माझ्या इंद्रियद्वारा घडलें आहे ह्मणून तें परमात्म्याचें सत्यरूप नसून मी त्यावर नामरूपाचा आरोप केला असें होतें. अशाच रीतीने परमात्मस्वरूपावर अनेक प्रकारचे आरोप करून आपण खुर्ची, खोली, घर, जग, चंद्र, सूर्य आणि तारे इत्यादि पदार्थ इंद्रियद्वारा उत्पन्न करतो. ''''मया ततमिदं सर्व जगदव्यक्तमूर्तिना । मत्स्थानि सर्वभूतानि नचाहं तेष्ववस्थितः ॥ न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम् । भूतभृन्नच भूतस्थो ममात्मा भूत भावनः ॥'''' अशी परमेश्वरस्वरूपाची व्याप्ति आहे. आतां येथे एक प्रश्न उपस्थित होण्याचा संभव आहे. तो प्रश्न असा की, आपणा सर्वांस अमुक पदार्थ खुर्ची, अमुक चंद्र आणि अमुक घर असा एकच बोध का होतो? जर आपण आपल्या<noinclude></noinclude> qxl6issi98u7egh5nq8tw7yzmp632wk पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/240 104 63510 229746 160333 2026-04-30T16:20:20Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229746 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२१४ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>इच्छेनें परमात्मपटावर ही चित्रे रंगवितों, तर ती सर्वांची एकसारखींच कशी उठतात? याचे कारण असे आहे की आपण सर्व एकाच मानसिक परिस्थितींतले असल्यामुळे भिन्नशरीरी असतांहि वस्तुतः एकच प्राणी आहों. यामुळे आपण रंगविलेली चित्रंहि एकाच प्रकारची दिसतात. मानसिक परिस्थितीत अत्यंत साम्य असल्यामुळे एकाच परिस्थितीत अनुभवांची भिन्नता उत्पन्न होत नाही. यामुळे 'चंद्र' ह्मटल्याबरोबर आपणा सर्वांसमोर एकच चित्र उभे राहते. आपल्या आजच्या मानसिक परिस्थितीत दगड आपणांस जडवस्तु दिसते; परंतु आपली ती परिस्थिति बदलली तर दगडांतील चैतन्य आपणांस दिसू लागून तो जडवस्तु नाही असे आपण ह्मणूं. आपणांस जे पदार्थ ज्या स्वरूपाचे दिसतात त्याहून त्यांची भिन्न रूपे पाहणारे अनेक लोक या भूतलावर असतील. जडपदार्थाचे बाह्यतः दिसणारे जडस्वरूप सत्य नसून त्यांचे खरे स्वरूप सूक्ष्म आहे, असें सिद्ध करण्याकडे पदार्थविज्ञानशास्त्राचा कल होऊ लागला आहे, हे आपणांस ठाऊक असेलच. असो. एकंदर विवेचनाचा मथितार्थ हा की, भौतिकशास्त्रांच्या भट्टींत तावून सुलाखून सुरक्षितपणे बाहेर पडण्याचे सामर्थ्य कोणा धर्मात असेल तर तें वेदांतधर्मातच आहे. आपल्या सूक्ष्म विवेचकबुद्धीच्या कसोटीवर त्याला तुम्ही घांसलें तरीहि तें बावनकशी सुवर्णच आहे असें तुमच्या प्रत्ययास येईल. सर्वव्यापी तत्वाचा शोध अद्वैतमतानंच लाविला आहे. एकंदर पदार्थमात्रांतील चिरस्थायी तत्वाचा निश्चय दुसऱ्या कोणत्याहि मताने केलेला नाही. विश्वबाह्य परमेश्वराची कल्पना अत्यंत प्रखर अशा विवेचकबुद्धसि कधीहि मान्य होणार नाही. परमेश्वर विश्वबाह्य ह्मटला की, त्यावर अनेक गुणांचा आरोप करावा लागणारच. कारण गुणांवांचून उत्पत्ति करणेच शक्य नाही. तो 'दयाळु आहे, पवित्र आहे' इत्यादि अनेक गुणांचा आरोप त्याजवर करावा लागेल. पण दयाळु आणि पवित्र अशा परमेश्वराने उत्पन्न केलेल्या जगांत आम्हास पुण्य आणि पाप व सुख आणि दुःख इत्यादि द्वंद्वे दृष्टीस पडतात. आपणांस जें जें कांही बरे वाटते, त्या सर्वांची एक मूस तयार करून आपण परमेश्वरास बनवितों असाच 'विश्वबाह्य परमेश्वर' या कल्पनेचा अर्थ होईल! या दृष्टीने परमेश्वराची व्याख्या पूर्ण करावयाची म्हटले तर 'तो चोर नाही, तो दुष्ट नाही, तो आततायी नाही' असेंहि ह्मणावे लागेल. आपल्या दृष्टीने सद्गुण ह्मणून वाटणाऱ्या गुणांचा जर त्याजवर आरोप करावयाचा तर त्याबरोबरच दुर्गुणांचा बाधहि करणे आवश्यक नाहीं काय? परमेश्वर विश्व बाह्य असून तो सद्गुणैक मूर्ति<noinclude></noinclude> f9drkik6wsq06rx1o1damebuvsmtrqt पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/241 104 63511 229747 160418 2026-04-30T16:23:47Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229747 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|२१५ }} {{rule}}</noinclude>आहे असें ह्मणणारे लोक अन्य रीतीनें परमेश्वराच्या व्याख्येची अशीच पूर्तता करीत असतात. परमेश्वर जसा सद्गुणैक मूर्ति तसाच सैतान दुर्गुणैकमूर्ति. सद्गुण आणि दुर्गुण इत्यादि द्वंद्वे प्रतीत होत आहेत त्या अर्थी दोन्ही गुणांचे पुतळे जोडीनेच वास करतात, असे मानण्यावांचून गत्यंतर नाही. यावरून सद्गुणैक मूर्ति परमेश्वराचे अस्तित्व मानणे चुकीचे आहे असे आपणांस दिसून येते. परमेश्वराचे सत्यस्वरूप पाहण्यास आपणांस गुणांच्या पलीकडे जाणे भाग आहे. या दृष्टीने विचार केला ह्मणजे आपणांस असे आढळून येईल की, चांगले आणि वाईट ही एकाच वस्तूची दोन अंगे आहेत. एकच वस्तु दोन निराळ्या स्वरूपांनी व्यक्त झाली आहे.<br>{{gap}}खऱ्या दृष्टीने पाहतां चांगले आणि वाईट असा भेद पाहणे ही दृष्टीच खोटी आहे. हा फरक वस्तूंत नसून आमच्या दृष्टीमुळे उत्पन्न झाला आहे. अमुक चांगले आणि तमुक वाईट ही भावना रूढ झाल्याने मानवजातीचें भयंकर नुकसान मात्र झाले आहे. वाईट आणि चांगले ही वस्तुतः भिन्न आहेत. व ती चिरकाल भिन्नच राहणार, ही कल्पना आमच्यांत अनेक भेद उत्पन्न करण्यास मात्र कारण झाली. अमुक वस्तु अनंतकाल चांगली राहील अथवा तमुक वस्तु चिरकाल वाईट राहील असे कोणी मला सिद्ध करून दाखवील, तर त्याला मी शतशः प्रणाम करीन. जगांतील अमुक एक आढळणारी वस्तु अथवा परिस्थिति चिरकाल एकाच स्वरूपाची राहील असें छातीवर हात ठेवून कोणास सांगतां येणे शक्य आहे काय? आज जे काही चांगले ह्मणून आपण ह्मणतो, तेच उद्यां परिस्थिति बदलली तर आपणांस वाईट दिसूं लागेल. तसेंच आजचे वाईट उद्यां चांगले वाटण्याचाहि संभव आहे. तसेच तुह्मी ज्याला वाईट असें नांव देतां तेंच माझ्या विशिष्ट परिस्थितीमुळे मला हितकर असू शकेल, व त्यामुळे मी त्याला चांगलें ह्मणेन. एकंदरीत, ध्यानांत ठेवण्याचा मुख्य मुद्दा हा की, एकंदर जगाच्या उत्क्रांतीबरोबरच चांगल्याची व वाईटाचीहि उत्क्रांति होत आहे. उत्क्रांतितत्वास अनुसरून प्रत्येक वस्तूंत प्रत्येक क्षणी रूपांतर सुरू आहे. यामुळे एकाच वस्तूच्या एका विशिष्ट रूपास आपण चांगले ह्मणतों व त्याच वस्तूच्या दुसऱ्या स्वरूपास आपण वाईट असें नांव देतो. प्रचंड झंझावात सुटला आहे अशा वेळी त्या वातामुळे उपडलेलें झाड माझ्या एखाद्या मित्राच्या डोक्यावर पडून त्याचा प्राण गेला तर ते वादळ वाईट असें मी ह्मणतो; परंतु त्या वादळामुळे हजारों रोगकारक जंतूंचा नाश होऊन त्यामुळे कित्येकांचे प्राण वाचले असतील!<noinclude></noinclude> eyqx0oivlb83fybx49botaygpeyrrbr पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/242 104 63512 229748 160466 2026-04-30T16:27:44Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229748 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२१६ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>ह्मणजे एकाच्या दृष्टीने जे वाईट तेंच दुसऱ्याच्या दृष्टीने चांगलें झालें, असें नाहीं काय? याकरितां चांगले आणि वाईट, सुख आणि दुःख व पुण्य आणि पाप ही द्वंद्वे वस्तुगत नसून केवळ आपल्या दृष्टीमुळे उत्पन्न झाली आहेत, हे निःसंशय सिद्ध होतें. साकार व सगुण परमेश्वराची व्याप्ति नेहमीच सापेक्ष असणार. ह्मणजे जगांत कांहीं तरी वाईट आहे व तें नित्य वाईट राहणार ह्मणून अशा स्थितीच्या अपेक्षेनें परमेश्वर विश्वबाह्य, साकार व सगुण मानावा लागतो. परंतु वेदांतधर्मानें प्रतिपादिलेल्या निर्गुण व निराकार ब्रह्माचे स्वरूप सापेक्ष नाही. तें केवलरूप आहे. ह्मणून ते बरेंहि नाही व वाईटहि नाही. तें गुणाच्या पलीकडचे रूप आहे. याकरितां चांगले ह्मणजे परमात्मपदाच्या अधिक जवळ पोहोचलेलें रूप आणि वाईट ह्मणजे परमात्मपदापासून अधिक लांबचें रूप, इतकेंच फार तर ह्मणतां येईल.<br>{{gap}}निर्गुण आणि निराकार ब्रह्माचीच व्याप्ति सर्वत्र आहे असे मानले, तर त्यापासून आमचा अधिक फायदा काय होईल? त्रिविध तापांनी पोळलेल्या आह्मां प्रापंचिकांस त्यापासून समाधानाची प्राप्ति होईल काय? आह्मी दुर्बळ अंतःकरणाचे आहों असा आह्मांस नित्य अनुभव येतो. अशा प्रसंगी आम्हास कोणाच्या तरी मदतीची अपेक्षा वाटते. अशा वेळी तुमच्या निर्गुण आणि निराकार ब्रह्मापासून आम्हास मदत काय होणार आणि शांति काय मिळणार? एखादें संकट आले ह्मणजे कोणाची तरी मदत मागण्याची इच्छा आमच्या अंतःकरणांत उद्भवते, ती नष्ट होईल काय? असे अनेक प्रश्न उद्भवण्याचा संभव आहे. त्यांस आमचे उत्तर असें आहे की, मानवी अंतःकरणाची दुर्बलता कायम आहे तोपर्यंत सगुण आणि साकार परमेश्वराची त्याची भावना कायम राहील; पण फरक इतकाच की, तिच्यांत सध्या जो निवळ भोळेपणाचा भाग आहे तो नष्ट होऊन ती भावना अधिक सशास्त्र होईल. निःसीम आणि केवळ सच्चिदानंदरूप ब्रह्माच्या भावनेमुळे सगुण आणि साकार परमेश्वराविषयींची भावना अधिक शुद्ध अतएव अधिक दृढ होईल. केवळ सगुण आणि साकार परमेश्वराचे अस्तित्व मानले तर त्यावर अनेक आक्षेप निघून त्याचे अस्तित्व बाधित होते, हे आपण नुक्तेच पाहिले आहे. निर्गुण आणि निराकार ब्रह्माची व्याप्ति कबूल केल्यावांचून सगुण आणि साकार परमेश्वराचे अस्तित्वच सिद्ध होऊ शकत नाही. विश्वाच्या बाहेर राहून, सगुण आणि साकार परमेश्वराने हे विश्व निर्माण केलें, ही उपपत्ति सिद्ध होत नाही, हे अगोदर दाखविलेंच आहे. परंतु सकल विश्वांतर्गत, निर्गुण आणि<noinclude></noinclude> qxbgoeckitnbz9fgdbrcz9isd5i49uv पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/243 104 63513 229749 160467 2026-04-30T16:31:53Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229749 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|२१७ }} {{rule}}</noinclude>निराकार ब्रह्माची व्याप्ति कबूल केली तर त्याच्या पोटांत सगुण आणि साकार परमेश्वराची व्याप्ति राहूं शकेल. विश्व या संज्ञेनें ज्या काही वस्तूंचा आपणांस बोध होतो, ती वास्तविक एकाच निराकार वस्तूची अनेक रूपे आहेत. आमच्या पंचेंद्रियद्वारा तिचे जे काही रूप दिसते त्याला आपण जडजग अशी संज्ञा देतो. माझ्या पांच इंद्रियांनी मला शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध असा पांच प्रकारचा बोध होतो. एखाद्या वस्तूकडे मी अवलोकन केले ह्मणजे तिच्यांतील पांच गुण या पांच इंद्रियांनी मी अनुभवतों व ती वस्तु अमुक असें मी ह्मणतों. आतां या पांच इंद्रियांहून कांहीं अधिक इंद्रिये एखाद्याला असली तर तीच वस्तु त्याला निराळी दिसेल हे उघड आहे. आपणांपैकी एखाद्याला विद्युत् इंद्रियाची प्राप्ति झाली, तर त्याला हे सर्व विश्व कांही निराळ्याच प्रकारचे प्रतीत होईल. वस्तु एकच असतां ती अनेक प्रकारांनी प्रतीत होत आहे व सगुण आणि साकार परमेश्वराची प्रतीति ही त्याच वस्तूची अत्युत्कृष्ट प्रतीति आहे. वस्तुज्ञान करून घेण्याचे जें सामर्थ्य मानवीबुद्धीत वास करीत आहे, त्या सामर्थ्यांची ही अगदी अत्युच्च दशा आहे. याकरितां मन, बुद्धि इत्यादि अंतवृत्ती शिल्लक आहेत, तोंपर्यंत, जशी ही खुर्ची खरी आहे आणि जसें हे जग खरे आहे त्याचप्रमाणे सगुण आणि साकार परमेश्वराचे अस्तित्वहि सर्वथैव खरेंच आहे; पण मन हरवलें, बुद्धि लुप्तप्राय झाली आणि अहंकार मावळला तर काय होईल? तर खुर्चीचें खुर्चीपण जाईल, जगाचे जगपण नष्ट होईल आणि त्याचप्रमाणे सगुण आणि साकार परमेश्वराचे परमेश्वरत्वहि नष्ट होऊन शेवटी जे काही उरेल तें केवलरूप मात्र उरेल. ज्या इंद्रियांच्या द्वाराने जगाची प्रतीति होते त्या इंद्रियांनी आपापली कामें सोडल्यावर 'हें विश्व आहे' इतकीहि प्रतीति होणार नाही; मग सगुण आणि साकार परमेश्वराची व्याप्ति तरी राहणार कोठे? मुळापासून उपटलेल्या वृक्षाची पाने, फुलें आणि फळे आपोआप गळून पडली तर त्यांत नवल ते काय? याकरितां, सगुण आणि साकार परमेश्वराची भावना ही अत्युच्च कोटीची भावना असली तरी ती भावनाच आहे. तें निर्भेळ सत्य नव्हे. या भावनेचे खरें स्वरूप इतकेंच की, निर्गुण निराकार आणि सत्यस्वरूपावरच या भावनेचे अस्तित्व आहे ह्मणून तिच्यांत सत्यत्व आहे. तिचे सत्यत्व निरपेक्ष नसून सापेक्ष मात्र आहे. मी मनुष्यप्राणी आहे हे जितकें खरें आहे तितकेंच, सगुण आणि साकार परमेश्वराचे अस्तित्वहि खरे आहे. माझें अस्तित्व खरे आहे आणि खोटेंहि आहे. मी असें ह्मणतों याचे आपणांस आश्चर्य वाटावयास नको; त्याबद्दल<noinclude></noinclude> f9myz526d7hdzu0cdstc0pcoof5a6ya पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/244 104 63514 229750 160468 2026-04-30T16:35:36Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229750 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२१८ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>आपण आपली खात्री करून घ्या. माझ्या भोवती असलेल्या वातावरणाची या क्षणी जी स्थिति आहे, त्या स्थितींत माझें एक विशिष्टरूप तुह्मास दिसते, पण ही स्थिति बदलली तर मी तुम्हास कांहीं वेगळाच दिसू लागेन. वातावरणाच्या व उजेडाच्या निरनिराळ्या अवस्थेत एकाच मनुष्याचे निरनिराळे फोटो घेतले तर त्यांत फरक पडतो, हे आपणांस अनुभवाने समजण्याजोगे आहे. याकरितां वातावरण आणि तुमचें इंद्रियजन्य प्रतीतीचें ज्ञान यांवर माझ्या चेहऱ्याचा खरेपणा, अवलंबून आहे. या दोहोंत कांहीं फरक झाला तर माझा तोच चेहरा तुह्मांस निराळा दिसू लागेल. मग ज्याचें सत्यत्व केवळ सापेक्ष आहे, तो माझा चेहरा खरा की खोटा? पण असे असले तरी, केव्हांहि न बदलणारे असें एक तत्व माझ्यांत आहे ही गोष्टहि खरीच आहे. तें तत्व निराकार असून तेच माझें सत्यस्वरूप आहे, व तेच अनेक वेळां अनेक रूपांनी आकाराला येऊन प्रतीत होतें. ह्मणजे निराकार 'मी' सदैव सत्य व न बदलणारा असून त्यावरच तरंगरूपाने भासणारे अनेक 'मी' आकार बदलणारे आणि ह्मणून खोटे आहेत. पाळण्यांत पडून रडणारा 'मी', त्याहून थोडा मोठा 'मी', तारुण्याच्या भरांत जगाला तुच्छ समजणारा 'मी' आणि वृद्धावस्थेंत त्याच जगाच्या मदतीची अपेक्षा करणारा 'मी', हे सर्व 'मी', एकाच निराकार आणि सत्य 'मी'चे अनेक साकार, बदलणारे आणि ह्मणून असत्य असे तरंग आहेत. माझें शरीर आणि माझे विचार प्रत्येक दिवशी बदलत आहेत याचा अनुभव येत असतांहि या बदलणाऱ्या आकाराच्या मुळाशी एक न बदलणारे आणि अविनाशी तत्व आहे, याचाहि मला अनुभव येतो. याच अविनाशी आणि न बदलणाऱ्या तत्वावर मी अनेक देह धारण करतो. याचप्रमाणे अनेकधा दिसणाऱ्या या विश्वाच्या मुळाशी एक अविनाशी व न बदलणारे तत्व आहे. या विश्वरचनेकडे पाहिले तर त्यांतील प्रत्येक पदार्थाचें प्रत्येक क्षणीं रूपांतर होत आहे असें आपणांस आढळून येते. असे असतांहि विश्वाच्या सर्वसामान्य स्थितींत अनंतकालापासूनहि काही बदल झाला नाहीं हेहि आपणांस कळतें. गति हा शब्द सापेक्ष आहे. अमक्या पदार्थाला गति आहे असें आपण ह्मणतो त्यावेळी त्या कल्पनेच्या मुळाशी दुसऱ्या स्थिर पदार्थांची कल्पना आपल्या मनांत असतेच. ही खुर्ची स्थिर आहे. कां? तर मला गति आहे ह्मणून. भोवतालच्या स्थिर पदार्थाकडे पाहून मी स्वतःला गति आहे असें ह्मणतो. जर एकसमयावच्छेदेंकरून आपण या विश्वाकडे अवलोकन केले तर तें स्थिर आहे, असेंच आपणांस ह्मणावें लागेल. त्याच्याशी ताडून पहाण्यास<noinclude></noinclude> mbqy069y2q1fnhbj9fvm7ak3gl720ga पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/245 104 63515 229751 160469 2026-04-30T16:38:23Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229751 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|२१९ }} {{rule}}</noinclude>दुसरा पदार्थच नाही. अशा स्थितीत तें चल आहे असें तरी कसें ह्मणतां येईल? कोणताहि पदार्थ स्थिर अथवा चल ह्मणविला जाण्यास त्याला दुसऱ्या पदार्थांच्या तुलनेची अपेक्षा असते. ह्मणजे स्थैर्य आणि चलन ही परस्पर सापेक्ष आहेत. मग अशी तुलना करणे शक्य नसल्यामुळे विश्वाला गति नाही असेंच ह्मटले पाहिजे. यावरून जें न बदलणारे तें विश्वाचें सत्यरूप असून दृश्यरूप हे केवळ तरंगाकार व बदलणारे आहे. समष्टिरूपाने असलेले विश्व न बदलणारे असून तेंच अनेक व्यष्टींच्या रूपाने भासले म्हणजे त्यांत तृणादि क्षुद्र पदार्थापासून तो थेट सगुण परमेश्वारापर्यंत अनेक पदार्थाचा सामावेश होतो. सगुण परमेश्वर ही अत्युच्च दर्जाची व्यष्टि असून त्याला आपण विश्वाचा शास्ता, विश्व उत्पन्नकर्ता असें ह्मणतों; व त्याचीच प्रार्थना करतों, अथवा त्याजपुढें गुडघे टेंकतो. यावरून सगुण परमेश्वराचे अस्तित्व केवळ बुद्धिगत असून ते निराकार मूळरूपावरील एका तरंगासारखे आहे. या तरंगाचा दर्जा फार मोठा आहे, ही गोष्ट खरी; तथापि तो तरंगच आहे हेहि विसरतां येत नाही. आमच्या बुद्धीचें अस्तित्व आहे तोपर्यंत त्याचेंहि अस्तित्व आहे. पण बुद्धीचें बुद्धिपण गेलें ह्मणजे त्या तरंगाचेंहि अस्तित्व संपलेंच. माझ्या तुमच्यासारखे सामान्य जन हे त्याच निराकाररूपावरील क्षुद्र तरंग आहेत आणि या सापेक्ष दृष्टीने सगुण परमेश्वर अत्युच्च महत्वाचा तरंग आहे. सर्व मनुष्ये परमात्मरूप आहेत असें जें वेदांतमत आहे, त्याचा अर्थ ती सगुण परमेश्वराची रूपे आहेत असे समजू नये. उदाहरणार्थ, एका मातीच्या गोळ्यांतून कांही भागाचा एक प्रचंड हत्ती तयार केला आणि शिल्लक उरलेल्या मातीचा एक लहानसा उंदीर केला, तर त्या उंदराला हत्तीचे रूप कधी तरी प्राप्त होण्याचा संभव आहे काय? परंतु दोघांसहि पाण्यात बुडविले आणि त्यामुळे ते आपल्या मूळरूपास गेले तर दोघांचाहि एकच चिखल बनेल. केवळ वस्तुतः विचार करतां दोघेहि मातीचे बनविलेले ह्मणून एकरूपच होत; परंतु एकच माती हत्ती आणि उंदीर अशा द्विधा रूपास गेली की, त्या दोन रूपांत फरक उत्पन्न होऊन तो कायम राहणारच. त्याचप्रमाणे ब्रह्म हे त्या मातीसारखे आहे. त्यांतून सगुण परमेश्वर आणि आपण उत्पन्न झालो. सगुण परमेश्वर तुह्मां आह्मांपेक्षा अधिक महत्वाची व्यष्टि असल्यामुळे तो जगाचा शास्ता आणि आपण त्याचे दास असें झालें. ज्याप्रमाणे मातीचा हत्ती आणि उंदीर यांची फिरून माती होईपर्यंत त्यांच्या महत्वांत कायमचा फरक राहणार, त्याचप्रमाणे आह्मी देहधारी मनुष्ये आहों तोपर्यंत सगुण परमेश्वर<noinclude></noinclude> 6d6x6wmpkr3xw87ukmpvcooqdtfvezp पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/246 104 63516 229761 160470 2026-05-01T06:13:52Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229761 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२२० |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>आमचा धनी आणि आह्मी क्षुद्र मानव त्याचे दासानुदास हे नातें कायम राहणार. या एकंदर विवेचनावरून जगाचे अस्तित्व आहे, तोपर्यंत सगुण परमेश्वराचेंहि अस्तित्व राहणार हे सिद्ध झाले. वेदांतमताच्या प्रसाराने पूर्वीच्या धर्माची कोणतीहि हानी न होतां जग आणि परमेश्वर यांचे संबंध अधिक पायाशुद्ध होऊन अधिक दृढ मात्र होतील. याकरितां, आपल्या स्वतःच्या समाधानासाठीच वेदांतमत उत्तम रीतीने समजावून घेणे अवश्य आहे. अनेक वस्तूंचीं कारणे आणि कार्ये पाहून त्यांवरून एका वस्तूचा कार्यकारणभाव ठरविण्याकडे आपल्या विवेचकबुद्धीचा जात्याच कल आहे, याचे विवेचन एकवार झालेच आहे. यासाठी त्या बुद्धीच्या समाधानार्थ निर्गुण ब्रह्मापर्यंतचे सिद्धांत अवलोकन करणे आपणांस भाग आहे. आपणांस निर्गुण ब्रह्मापर्यंतचे सिद्धांत समजले ह्मणून सगुणाची उपासना टाकून द्यावयास पाहिजे असें नाहीं; तर ही उपपत्ति बरोबर समजली ह्मणजे सगुणोपासनेचा खरा मार्ग आपणांस सांपडेल. सध्याची आपली उपासनापद्धति किती पोरकट आहे याचा विचार करा. आपल्या क्षुद्र वासनांची तृप्ति होण्याकरितां परमेश्वराची आराधना आपण कित्येक वेळां करतों! अंतःकरणांत कुजून राहिलेल्या तुच्छ वासनांचा पाढा परमेश्वरापुढे वाचण्यापेक्षा आपण अधिक कांहींच करतांना आढळत नाही! 'प्रार्थना' 'उपासना' अशी शोभिवंत नांवें दिलीं ह्मणून ती प्रार्थना अथवा उपासना होत नाही. वेदांतमताचा प्रसार झाला, तर असल्या मूर्खपणाच्या प्रार्थना कोणी करणार नाही, एवढी मात्र गोष्ट खरी. वेदांतमताप्रमाणे निर्गुण ब्रह्मभावनेंत उपास्य-उपासक असा संबंधच होऊ शकत नाहीत. इतर धर्माचा विचार करतां त्यांत कित्येकांनी विभूतिपूजा सांगितल्याचे आढळते व तें योग्यहि आहे. रोमनक्याथलिक पंथाचे ख्रिस्ती लोक संतोपासना करतात, हेहि योग्य आहे. परंतु परमात्मरूपाची प्रार्थना करावयाची हे मात्र मूर्खत्व आहे. सर्वसमर्थाकडे जाऊन ह्मणावयाचें काय? तर मला 'चांगली हवा दे,' 'पाऊस चांगला पाड' किंवा 'माझ्या बागेत यंदां फळफळावळ पुष्कळ होऊ दे.' यापेक्षां संतोपासना शतपट अधिक चांगली. संत झाले तरी ते तुह्मां आम्हासारखेच देहधारी व क्षुद्र प्राणी होते. त्यांची मदत मागणे अगदीच वावगें नाहीं; पण विश्वाच्या शास्त्याकडे जाऊन 'अरे परमेश्वरा, माझं डोके दुखणे बंद कर' असें ह्मणणे पोरालाहि शोभणारे नाही. हजारों संतांचे आत्मे तुमच्या भोवतालच्या वातावरणांत आहेत त्यांची मदत मागा; परंतु सर्वेश्वराकडून अशा मदतीची अपेक्षा करणे आपणांस शोभत नाही. सर्व ताप-<noinclude></noinclude> 2ukx0ylf5i6guwukg5mcnazwxl7tmbn पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/247 104 63517 229762 160472 2026-05-01T06:17:02Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229762 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|२२१ }} {{rule}}</noinclude>हारिणी भागीरथीच्या काठी राहून विहीर खणण्यासारखाच हा शहाणपणा आहे. हीरकमण्यांच्या खाणीत राहून 'मला कांचेचा लोलक कोणी देईल काय?' असें ह्मणावयाचे हे शहाणपणाचे लक्षण आहे काय?<br>{{gap}}लौकिक वस्तूंची हांव धरून त्या दृष्टीने परमेश्वराची प्रार्थना करणे यासारखा मूर्खपणा दुसरा कोणताच नाही. सर्वेश्वरापाशी आपण ज्ञानाची याचना करावी, निर्हेतुक प्रेमाची याचना करावी अथवा दृढश्रद्धेची याचना करावी. 'अमुक वस्तूशिवाय माझें अडेल,' 'अमका माझें बरें करील' अथवा 'तमका माझ्या उपयोगी पडेल' अशा प्रकारचें दौर्बल्य आणि परावलंबित्व मानवी हृदयांत आहे तोपर्यंत क्षुद्र जिनसांसाठी परमेश्वराची प्रार्थना करण्याची त्याची इच्छा राहीलच; परंतु सशास्त्र आणि पायाशुद्ध ज्ञानाने ज्यांची खरी श्रद्धा बळावली आहे, अशा मनुष्यांना लौकिकसुखाची प्रायः चाडच उरत नाही. मग ते असल्या प्रकारची प्रार्थनाहि करणार नाहीत हे उघडच आहे. त्यांच्या ठिकाणचे 'मी' नष्ट होऊन त्या जागी 'तूं' आलेले असते. ज्यांची इतकी तयारी झाली असेल ते निराकाराच्या मार्गास लागण्यास योग्य झाले असे समजावें. निराकाराच्या उपासनेचा मार्ग ह्मणजे गुलाम आणि धनी अशा नात्याचा नाही. 'मी दुर्बल आहे, पापी आहे,' आणि 'तूं समर्थ, पुण्यात्मा आहेस' ही निराकाराची उपासना नव्हे. हा निराकाराच्या उपासनेचा मार्गच नव्हे. 'मी' नष्ट होऊन सर्व 'तूंच' राहिल्यावर पापी कोण आणि पुण्यवान् कोण!<br>{{gap}}फारशी भाषेतील एका कवितेचे इंग्रजी भाषांतर तुमच्या वाचण्यांत आले असेलच. एकेवेळी कोणी पुरुष आपल्या प्रियेस भेटण्याकरितां तिच्या घरी जाऊन त्याने दारावर थाप मारली. तेव्हां तिने 'कोण आहे?' असा प्रश्न विचारला. तो ह्मणाला, 'मी अमुक तुझा प्रियकर.' उत्तर देऊन दार उघडेल अशी त्याला अपेक्षा होती; पण ती पुरी न होतां दार बंदच राहिले. काही दिवसांनी तो पन्हां गेला व तीच प्रश्नोत्तरे पुन्हां झाली व पुन्हांही दार बंद राहिले. तिसऱ्या वेळी तो पुन्हां गेला व त्याने दारावर पुन्हां थाप मारली. पुन्हां आंतून तोच प्रश्न. 'कोण आहे?' त्यावर 'तूंच दाराबाहेर उभी राहून हांका मारीत आहेस. तूं आणि मी ही दोन नसून एकच आहों' या उत्तराने शेवटी दार उघडलें. निराकाराची उपासना केवळ सत्यमार्गानेच करता येते. भक्त स्वतः ब्रह्मरूप असल्यामुळे त्याने या भावनेचा केव्हाही त्याग न करणे हाच सत्य मार्ग- त्याचें सदोदित चिंतन 'अहं ब्रह्मास्मि' हेच असले पाहिजे. मी आणि तूं भिन्न<noinclude></noinclude> srwkxmransfee9duz48jnohyz665lr7 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/248 104 63518 229763 160473 2026-05-01T06:20:15Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229763 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२२२ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>असें त्याने ह्मणणे हेच पातक. 'हे सर्व विश्व जसें तूंच आहेस, त्याचप्रमाणे मीहि तूंच आहेस,' असें चिंतन सदोदित करणे हीच निराकार ब्रह्माची उपासना. 'माझ्या इंद्रियद्वारा दिसणारे सर्व विश्व मी, माझ्या भोवतालचे वातावरण मी, चंद्रसूर्यादि तेजोगोलांतलें तेज मी, सर्व प्रकाश मी, ज्याला इतर लोक चुकीच्या समजुतीमुळे अनेक रूपाने पाहतात, परंतु जें वास्तविक एकच आहे तें ब्रह्म मी आणि सृष्टीतील यच्चायावत् प्राण्यांच्या अंतःकरणांतील 'मी' ही भावना सुद्धा मीच. मला मृत्यु नाही आणि निद्राहि नाही. मी सदोदित जागा असतो. मी अमर असून माझें सामर्थ्य कधीहि उणे होत नाही,' असें चिंतन सदोदित करणे- याशिवाय अन्य कोणतीहि भावना शिल्लक न उरणे, हीच परब्रह्माची उपासना होय. असें चिंतन तुह्मी सदोदित करूं लागला तर तुमचा जीवनप्रवाह सगळा बदलून जाईल. आपणा सर्वांना जर आज कशाची अत्यंत जरूर असेल तर ती अत्यंत दृढ अशा श्रद्धेची जरूर आहे. श्रद्धाहीन अंतःकरणे नेहमींच दुर्बळ असतात. मानवी अंतःकरणांत जें दौर्बल्य आहे, तें श्रद्धेच्या अभावामुळे उत्पन्न झालेले आहे. ब्रह्माच्या उपासनेने आपल्या अंतःकरणांतील दौर्बल्य समूळ नष्ट होईल. ही उपासना अत्यंत बळावली ह्मणजे आकाश कोसळले तरी तुमच्या आनंदांत उणेपणा येणार नाही. सर्प आणि वाघ यांचे इतरांना भय वाटले तरी तुह्मी निर्भय व्हाल. सर्प आणि वाघहि तुह्मीच. मग आपलें आपल्यालाच भय कसें वाटेल? ब्रह्माशी एकरूप झालेला असेल तोच खरा वीर. त्याचेच अंतःकरण खरें निर्भय. त्यावांचून इतर कोणीहि निर्भय नाही. भगवान् येशु ख्रिस्ताला विश्वासघाताने ज्यांनी ठार केले, त्यांनांहि त्याने आशीर्वाद दिला. खऱ्या निर्भय अंतःकरणाशिवाय ही गोष्ट करणे शक्य आहे काय? 'मी आणि माझा पिता एकच.' हीच दृढ भावना असल्यावर तेथें भयाचा प्रवेश कोठून होणार? हीच खरी उपासना. सर्व विश्वाशी एकरूप होणे हीच आपल्या जीविताची इतिकर्तव्यता. हे समजावयाला बाहेरच्या पुराव्यांचीहि जरूरी नाही. आपले शरीर, आपले मन आणि आपले विचार हे जितके आपल्या संनिध आहेत, त्याहूनहि परमेश्वराचे सांनिध्य अधिक आहे. तो आहे ह्मणून विचार उद्भवतात आणि मनाला मनपण प्राप्त होते. कोणत्याहि वस्तूचें यथास्थित ज्ञान मला व्हावयाचें असेल तर तें ब्रह्मज्ञानाशिवाय होणार नाही. आपल्या अंतःकरणांतील अत्यंत गूढ अशा भागांत त्याचे वास्तव्य आहे. शरीरें येतात व जातात, सुखें व दुःखेंहि येतात व जातात आणि युगामागे युगहि निघून जाते; पण आपल्या अंतः-<noinclude></noinclude> hgbqu1pdl6u2q0fvkcvg9kwn8izhnxr पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/249 104 63519 229764 160474 2026-05-01T06:22:34Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229764 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|२२३ }} {{rule}}</noinclude>करणांतील तें अत्यंत गूढ तत्व मात्र अमर आहे. ''''अहं ब्रह्मास्मि'''' हे कालस्थलाबाधित सत्य आहे. तें सत्य आहे ह्मणूनच बाकीच्यास सत्यत्व आले आहे. त्याच्याच आधाराने आपण पाहतों, ऐकतों, आणि विचार करतो. हे तत्व केवळ माझ्या अथवा तुमच्याच अंतःकरणांत आहे असे नाही, तर ते अत्यंत क्षुद्र कीटकापर्यंत आणि सर्व अचल सृष्टींतहि भरून उरले आहे. सत्पुरुषांच्या अंतःकरणांत जसा त्याचा वास आहे, तसाच चोराच्या अंतःकरणांतहि त्याचाच वास आहे. ज्या दिवशी आपणांस हा अनुभव प्रत्यक्ष येईल, त्या दिवशी सर्व संशयनिरसन होईल. विश्व हे आपणांस आज मोठे कोडे वाटत आहे; पण ''''सर्व खल्विदं ब्रह्म'''' हेच त्या कोड्याचे उत्तर तुह्मांस शेवटी सांपडेल. हे एकवेळ समजलें ह्मणजे आणखी समजावयाचे असें कांहींच उरत नाही. आज सर्व भौतिकशास्त्रांनी उत्पन्न करून ठेवलेले ज्ञान हे ज्ञानमार्गाचा शेवट नव्हे. खरें ज्ञान त्यापलीकडे आहे. भौतिकशास्त्रांचे ज्ञान हे खऱ्या ज्ञानमंदिराच्या पायरीसारखे आहे. ''''सर्वं खल्विदं ब्रह्म'''' असा अनुभव होणे हेच खरें ज्ञान.<br><br><br> {{rule|7em}}<Br>{{nop}}<noinclude></noinclude> 03f6dtevwmvp4zhybz7drulbyig6ttc पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/250 104 63520 229766 160477 2026-05-01T06:29:00Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229766 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br>{{center|{{xx-larger|'''आर्यज्ञानमंदिराची सोपानपंक्ति.'''}}}} {{rule|11em}}<Br> {{gap}}कोणत्याही धर्माचा अगदी आरंभकालचा इतिहास अवलोकन केला तर त्यांत 'ईश्वरी प्रेरणा' अथवा 'ईश्वराने दिलेला ग्रंथ' अशा प्रकारच्या कल्पनांचा उद्भव झाल्याचे आढळून येते. अगदी रानटी स्थितींतील लोकांच्या धर्मकल्पनांशी आपणास कांहीं कर्तव्य नाही, हे उघडच आहे; कारण त्यांना धर्म ही संज्ञाहि देणे मुष्किलीचे आहे. परंतु धर्म या संज्ञेस पात्र असलेल्या कल्पनांचा इतिहाससुद्धां आरंभी सांगितल्याप्रमाणे आहे. परमेश्वराच्या अस्तित्वाची कल्पना ही एकंदर धर्मविषयक कल्पनांच्या मुळाशी असल्याचे आढळते. आपल्या नजरेने दिसणारें हे विश्व निर्माण करणारा कोणी तरी असावा, ही कल्पना एकंदर धर्मकल्पनांच्या पायासारखी असून, पुढील सर्व इमारत याच मूलभूत पायावर रचिली गेली. यानंतर आत्म्याच्या कल्पनेचा उद्भव झाला. शरीर जड आहे असा अनुभव असल्यामुळे त्यांत चैतन्यरूप असा आत्मा त्याहून निराळा असला पाहिजे ही कल्पना साहजिक रीतीनेच उत्पन्न झाली.<br>{{gap}}या कल्पना धर्माच्या आरंभकालाच्या द्योतक आहेत. हिंदुधर्माच्या इतिहासांतहि अशा प्रकारच्या कल्पनांचा उद्भव झाला होता; परंतु त्यांचे स्वरूप लवकरच बदलले. ते इतकें की तो काल आतां निवळ कल्पनेनेच जाणला पाहिजे. सांप्रतच्या हिंदुधर्माचा आरंभ या कल्पनांपासून झाला नसून त्यांचे विशिष्टस्वरूप अगदी वेगळ्या प्रकारचे आहे. हिंदुधर्माला धर्म ह्मणून जें विशिष्टरूप प्राप्त झालें तें आरंभकालच्या ईश्वरविषयक कल्पनांमुळे नसून त्यानंतर जो कल्पनासमूह अस्तित्वात आला त्यावरून प्राप्त झाले आहे. सृष्टीच्या उत्पत्तीबद्दलची पहिली कल्पना पाहिली, तर ती शून्यांतून परमेश्वराने निर्माण केली, अशा प्रकारची आहे. सृष्टीच्या पूर्वी केवळ शून्य होते आणि परमेश्वराने केवळ आपल्या इच्छेनें सृष्टि निर्माण केली. ही आरंभीची सृष्टीच्या उत्पत्तीची कल्पना आहे; परंतु कांहीं काल लोटल्यानंतर या कल्पनेच्या सत्यत्वाबद्दल शंका येण्यास सुरुवात झाल्याचे आढळून येतें. आरंभी कांहींच नव्हते, तर त्यांतून सृष्टीची उत्पत्ति झाली कशी? ही शंका उपस्थित झाली. तोच वेदांतमताचा<ref>वेदांत या शब्दाने सामान्यतः अद्वैतमताचा बोध होतो; तथापि द्वैत आणि विशिष्टाद्वैत या अद्वैतमताच्याच खालच्या पायऱ्या आहेत असें स्वामीजींचे मत असल्यामुळे त्यांनी 'वेदांत' या शब्दाने या तिन्ही मतांचा समुच्चयाने उल्लेख येथे केला आहे.</ref> आरंभकाल होय. विश्वाला<noinclude><hr>{{reflist}}</noinclude> ob604tx195wv3erwibszbp55lz0lufc पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/251 104 63521 229767 160480 2026-05-01T06:33:25Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229767 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|२२५ }} {{rule}}</noinclude>अस्तित्व असेल तर ते कशांतून तरी निर्माण झाले असले पाहिजे. कारण केवळ नास्तिवांतून अस्तित्व उत्पन्न होणे शक्य नाही, हा आपणांस नित्याचा अनुभव आहे. आपणांला कांहीं वस्तु निर्माण करावयाची असली तर तिचे निरनिराळे घटक आपणांस आपल्या हाताने जमवून एकत्र करावे लागतात. एखादें घर बांधलें अथवा एखादें जहाज तयार केले, तर त्या त्या वस्तूंना लागणारे कच्चे सामान पूर्वीच तयार असते व ज्या हत्यारांनी ती वस्तु आपण निर्माण केली, ती हत्यारेहि त्या वस्तूच्या पूर्वीच अस्तित्वात असतात. अशी कारणपरंपरा एकत्र करून तिच्या साहाय्याने आपण ती विशिष्ट वस्तु उत्पन्न करतो. ह्मणजे कार्यरूप वस्तूच्या आरंभी कारणरूप वस्तूचे अस्तित्व असलेच पाहिजे, हा आपणांस नित्य अनुभव आहे. याकरितां जग हे शून्यांतून निर्माण झाले, ही कल्पना विवेचकबुद्धीच्या कसोटीस उतरण्यासारखी नसल्यामुळे ती निकालांत काढली गेली, आणि जग या कार्यरूप वस्तूच्या कारणरूप वस्तू काय असाव्या याचा शोध पुढे चालू झाला. धर्माचा इतिहास पाहिला तर वस्तुतः या मूळ वस्तूच्या शोधांतच सर्व धर्म गुंतले आहेत असे आढळून येईल. हे जग परमेश्वराने निर्माण केलें असें घटकाभर गृहीत धरले तरी त्याने तें कशांतून निर्माण केलें, हा प्रश्न शिल्लक उरतोच. अनेक तत्वशास्त्रांनी आपापल्यापरी या एकाच प्रश्नाचें चर्वितचर्वण केले आहे. कोणी असें ह्मणतात की, सृष्टि, परमेश्वर आणि आत्मा (जीव) ही तिन्ही सत्यरूप असून अनाद्यनंत आहेत. यांपैकी एकासंहि अंत नाही. तसेंच सृष्टि आणि जीव ही परमेश्वरावर अवलंबून असून परमेश्वराचे अस्तित्व मात्र स्वतंत्र आहे. ज्याप्रमाणे सृष्टीतील एखाद्या जड परमाणूचे अस्तित्व परमेश्वराच्या मर्जीवर अवलंबून आहे, त्याचप्रमाणे जीवाचे अस्तित्वहि परमेश्वरावरच अवलंबून आहे. हे एका पक्षाचे ह्मणणे झाले. यांपैकी फक्त जीवविषयक कल्पनेचाच आपण सध्या विचार करूं. आर्यावर्तात जरी अनेक मते आणि दर्शनें प्रचलित आहेत, तरी त्या सर्वांना सांख्यदर्शन हे सारखेच मान्य आहे. किंबहुना सर्व मतांची उभारणी सांख्यमताच्याच पायावर झाली आहे. आपणांस कोणत्याहि वस्तूचा बोध होतो तेव्हां ती वस्तू प्रथम बाह्येन्द्रियास गोचर होऊन त्यांच्याद्वारे त्या इंद्रियांचे गोलक अथवा अंतरिंद्रियें जागी होतात. ही अंतरिंद्रियें मनास चेतवितात, मन बुद्धीवर आघात करतें आणि तो आघात बुद्धि आत्म्यास पोहोंचविते. इतकी परंपरा पूर्ण झाली ह्मणजे आत्म्याला त्या वस्तूची जाणीव उत्पन्न होते, असें सांख्यांचे मत आहे. वस्तुबोध ज्या ज्या इंद्रियांनी होतो त्या त्या इंद्रियांचे स्वतंत्र गोलक<noinclude><Br>{{gap}}स्वा. वि. १५</noinclude> 1xetxoia3rxrkrq2xxiei81ch7cdj7j पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/252 104 63522 229768 160481 2026-05-01T06:37:00Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229768 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२२६ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>(centres) मेंदूत असतात, ही गोष्ट अर्वाचीन शास्त्रांनी सिद्ध केल्याचे आपणांस अवगत आहेच. या गोलकांत दोन प्रकार असल्याचे अर्वाचीन शास्त्रांनी सिद्ध केले आहे. सांख्यमताच्या अंतरिंद्रिय आणि मन या प्रकारांशी त्या दोन प्रकारांचे अत्यंत साम्य आहे. परंतु या दोहोंचाहि चालक असा मध्यवर्ती पदार्थ अर्वाचीन शास्त्रांस अद्यापि सांपडला नाही. मेंदू तपासून पाहिला तर त्यांत बाह्येद्रियांचे गोलक सांपडतात ही गोष्ट खरी; पण त्या सर्वांच्या जागा निरनिराळ्या असून मेंदूंत कोठे तरी ते एकत्र होत असल्याचे आढळून येत नाही. तसेंच अमुक एक गोलक (centre) मध्यवर्ती असून इतर त्याच्या अनुरोधाने चालतात असेंहि आढळून येत नाही. हिंदु तत्ववेत्त्यांचे ह्मणणे खोडून काढण्यास अर्वाचीन शास्त्रांजवळ पुरेशी सामुग्री नाही असें एवढ्यापुरतें तरी कबूल करणे भाग आहे. या सर्वांचा चालक असा कोणी तरी असला पाहिजे हे निर्विवाद आहे. नाही तर सर्वांची फाटाफूट होऊन देहबंधहि उरणार नाही. असा चालक माझ्या देहांत नसला तर तुह्मांकडे पाहून 'हे अमुक' असा निश्चय कोण करतो? 'हे चित्र' 'हा मनुष्य' इत्यादि निश्चय करणारा कोणी तरी मध्यवर्ती चालक असलाच पाहिजे. मेंदूतील गोलक प्रत्येकी स्वतंत्र असते तर आपल्या अनेक क्रिया एकाच वेळी चालणे अशक्य झाले असते. पाहत असतां आपणांस ऐकू आले नसते आणि श्वासोच्छास करीत असतां पाहण्याची क्रिया बंद पडली असती. अशा रीतीने आपली प्रत्येक क्रिया दुसरीपासून अगदी स्वतंत्र रीतीने घडून आली असती. यावरून गोलक प्रत्येकी स्वतंत्र असणे शक्य नाही हे सिद्ध होते. एवढेच नव्हे तर ते सर्व जेथें एकत्र होतात व ज्याच्या अनुरोधाने ते आपापल्या क्रिया सरळ रीतीने पार पाडतात असें एक ठिकाण असले पाहिजे, हे निर्विवाद सिद्ध होते.<br>{{gap}}हा आपला देह अनेक परमाणूंचा बनला असून तो जड व निर्विकार्य आहे. ज्याप्रमाणे हा स्थूल देह जड आहे, त्याचप्रमाणे याच्या आंत एक सूक्ष्म देह आहे असे वेदांतशास्त्राचे मत आहे. हा आंतला देहहि सूक्ष्म असला तरी जडच आहे. तो अत्यंत विरल पदार्थाचा बनला असून स्थूल देह त्याहून अधिक घन पदार्थाचा बनला आहे एवढाच त्यांच्यांत फरक आहे. सूक्ष्म देह इतका विरल आहे की, अत्युच्च प्रतीच्या सूक्ष्मदर्शक यंत्रांतूनहि तो दिसणार नाही. सूक्ष्मतरंग एकत्र सांठवून ठेवणे हे त्या देहाचें कार्य आहे. ज्याप्रमाणे स्थूल देह स्थूल पदार्थाचे आश्रयस्थान आहे त्याचप्रमाणे सूक्ष्म देह हा सूक्ष्म ह्मणजे अत्यंत विरल- केवळ तरंगरूप- अशा पदार्थांचे आश्रयस्थान आहे. याच पदार्थास विचार<noinclude></noinclude> nn8i5h04xeesvj2l8098xscedo5x4kg पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/253 104 63523 229769 160483 2026-05-01T06:40:32Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229769 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|२२७ }} {{rule}}</noinclude>ही संज्ञा आपण देतो. स्थूल देह ज्या वस्तूंचा बनला आहे, त्या वस्तु जड असून त्यांच्याद्वारे प्रकट होणारी शक्ति ही सुद्धा जडरूपच आहे. शक्तीचा प्रत्यय स्थूल पदार्थाच्या आश्रयावांचून होत नाही. शक्ति ही पदार्थाश्रित आहे. जी शक्ति स्थूलरूपानें स्थूल देहांत प्रत्ययास येते, तिचंच अस्तित्व सूक्ष्मरूपाने सूक्ष्म देहांत असते. तिचे रूप सूक्ष्म असते तेव्हां त्यास आपण विचार ही संज्ञा देतों व तोच विचार स्थूल देहांत स्थूलरूपाने प्रत्यक्ष दिसला ह्मणजे त्यास क्रिया ह्मणतों. कोणास मारावे असा विचार माझ्या मनांत उद्भवला की त्या विचारशक्तीचें स्थूल देहांत स्थूलरूपाने रूपांतर होऊन ती शक्ति आघातरूपानें दृग्गोचर होते. मूळशक्ति विरलरूपाने सूक्ष्म देहांत होती, तेव्हां तिला विचार हे नांव होते; व तीच स्थूलरूपांत आल्याबरोबर क्रिया ही संज्ञा पावली. शक्तीचा स्थूल अथवा सूक्ष्म प्रत्यय येण्यास तिला स्थूल अथवा सूक्ष्म पदार्थाचा आश्रय करावा लागतो. यारीतीने शक्ति मूलतः एकरूप असतां भिन्न पदार्थाच्या आश्रयामुळे ती भिन्नरूपाने असते इतकेंच. तसेंच सूक्ष्म देह आणि स्थूल देह यांतहि वस्तुतः कांहीं फरक नाही. हे दोन्ही ज्या पदार्थाचे बनले आहेत, ते पदार्थ विधर्मी नाहीत. त्यांत फरक इतकाच की त्या पदार्थांचें एक रूप अत्यंत विरल असल्यामुळे दिसत नाही व दुसरें रूप घन असल्यामुळे दिसते. ह्मणजे त्यांतील भेद गुणधर्ममूलक नसून दृष्टिमूलक मात्र आहे. पाणी घनरूप असल्यामुळे दिसते, पण त्याचीच वाफ अत्यंत विरलरूप झाली ह्मणजे ती दिसत नसूनहि गुणधर्मदृष्टया ते जसे पाणीच असते, त्याप्रमाणे सूक्ष्म देह आणि स्थूल देह यांत एक अदृश्य असून दुसरा दिसतो इतकाच फरक आहे. आतां या देहद्वयांत जी शक्ति प्रत्ययास येते, ती कोठून येते, या प्रश्नाचा विचार केला पाहिजे. वेदांतमताप्रमाणे एकंदर सृष्टीत दोन पदार्थ आहेत. एक आकाश आणि दुसरा प्राण. यांपैकी आकाश अत्यंत विरल परंतु जडस्वभाव आहे आणि प्राण हा शक्तिस्वभाव आहे. आपण जें कांहीं पाहतों, ऐकतों अथवा ज्याला आपण स्पर्श करूं शकतों, ते सर्व पदार्थ आकाशांतून निर्माण झाले आहेत. प्राणशक्तीशी संयोग झाला ह्मणजे आकाशच विरल अथवा घनस्वरूप धारण करतें. आकाश सर्वव्यापी आहे. तें नाही असे ठिकाणच कोठे नाही. त्याचप्रमाणे प्राणहि सर्वव्यापी आहे. आकाशाला पाण्याची उपमा दिली तर पृथिव्यादि सर्व दृश्य पदार्थ बर्फासारखे आहेत असें ह्मणतां येईल. बर्फाचे लहान मोठे व निरनिराळ्या आकाराचे तुकडे ज्याप्रमाणे पाण्यांत तरंगत असतात त्याचप्रमाणे पृथिव्यादि जड पदार्थ<noinclude></noinclude> 5x29eit579s8olyvmdih6e90hddzgo3 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/254 104 63524 229770 160484 2026-05-01T09:31:10Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229770 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२२८ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>आकाशांत तरंगत असून ते प्राणाच्या संयोगाने आकाशांतूनच निर्माण झाले आहेत. स्थूल देह हे आकाशाचेंच स्थूलरूप असून त्यांत प्राणाची स्थूलशक्ति, हंसणे, बोलणे, धांवणे इत्यादि जडरूपाने प्रत्ययास येते. त्याचप्रमाणे सूक्ष्मदेहहि आकाशाचेंच सूक्ष्मरूप असून त्यांतून मननचिंतनादि सूक्ष्म प्राणव्यापार प्रत्ययास येतात. स्थूल देह हा बाहेरचा दृश्यदेह असून त्यांत स्थूलशक्तीचा दृक् प्रत्यय येतो, त्याच्या आंत सूक्ष्म देह असून त्यांत सूक्ष्मशक्तीचा प्रत्यय येतो; व त्या पलीकडे या शक्तीचा मध्यवर्ती चालक जीव हा असतो. आपली नखें आपण पुनःपुनः काढून टाकली तरी त्यांची जशी पुनःपुनः वाढ होते व ती जशी आपल्या स्थूल देहाचाच भाग असतात, त्याचप्रमाणे स्थूलदेह हा सूक्ष्मदेहाचाच भाग आहे. मला ज्याप्रमाणे आपली नखें कितीहि वेळां काढून टाकतां येतात त्याप्रमाणे स्थूल देहाचा त्यागहि मला अनेक वेळां करता येतो. स्थूल देह नाहीसा झाला तरी त्याबरोबर सूक्ष्मदेह मात्र जाणार नाही. प्रत्येक मनुष्याला स्थूल व सूक्ष्म देह आहेत असें म्हटले ह्मणून ते दोन परस्पर भिन्न देह आहेत असे समजू नये. अमुक हा स्थूल देह, हे जसें अंगुलिनिर्देशाने दाखवितां येते, त्याप्रमाणे सूक्ष्म देह दाखवितां येणार नाही. कारण त्याचे अस्तित्व निराळे नसून तो स्थूलदेहाला सर्वत्र व्यापून आहे. अशारीतीने प्रत्येक मनुष्यात स्थूलदेह, सूक्ष्मदेह आणि जीव अशी त्रयी वास करीत आहे. यांपैकी स्थूल देह हा लवकर नष्ट होणारा असून सूक्ष्म देह हा बराच काल टिकणारा आहे. आणि जीव हा अमर आहे. परमेश्वर ज्याप्रमाणे अनाद्यनंत आहे, त्याचप्रमाणे जीवहि अनाद्यनंत आहे असें वेदांताचे मत आहे. त्याचप्रमाणे सृष्टीहि अनाद्यनंत आहे, परंतु तिच्या रूपांत बदल होत असतो. त्याचप्रमाणे ज्यांची ही सृष्टि बनली आहे ते प्राण आणि आकाश ही सुद्धां अनाद्यनंत असून त्यांच्या स्वरूपांतहि एकसारखा बदल सुरू आहे. परंतु जीव हा, आकाश आणि प्राण यांपासून बनला नसून तो केवळ चैतन्यरूप व अनाद्यनंत आहे. आकाश आणि प्राण यांच्या मिश्रणाने जीवाची उत्पत्ति झाली नाही ह्मणूनच तो अमर आहे. कारण मिश्रपदार्थात कालेंकरून बदल होत जातो व शेवटीं तो आपल्या कारणास परत जातो. मिश्रपदार्थाचे रूपांतर न होणे हे अपरिहार्य आहे. यासाठी स्थूल देह हा केव्हांना केव्हां अदृश्य होणारच. त्याचप्रमाणे सूक्ष्मदेहहि कालेंकरून नष्ट होईल. पण जीव मात्र केवळ मूलरूप असल्यामुळे-मिश्र पदार्थ नसल्यामुळे नष्ट होणार नाही. याच कारणाकरितां जीव अजन्मा आहे.<noinclude></noinclude> fsj71dqb1bnjcaltqbyn39g3nn9takl पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/255 104 63525 229771 160485 2026-05-01T09:34:22Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229771 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|२२९ }} {{rule}}</noinclude>जें स्वतः केवलरूप- मूलरूप- आहे त्याला जन्म शक्य नाही व ह्मणून तो मरणारहि नाही. मिश्रपदार्थातच जन्म आणि मृत्यु हीं संभवतात. कोट्यवधि जीवांवर ईश्वराचा ताबा आहे. परमेश्वर निराकार, सर्वव्यापी, आणि सर्वातरात्मा असा आहे. सृष्टि हे त्या परमेश्वराचे उपकरण असून त्याच्याद्वारे घडामोडीचा अखंड उद्योग तो करीत आहे. हे सर्व विश्व त्याच्या इच्छेवरच अवलंबून आहे, अशाप्रकारचे द्वैतवाद्यांचे मत आहे. हे त्यांचे ह्मणणे कबूल केले तर साहजिकच असा प्रश्न उद्भवतो की, जर परमेश्वर या सर्वांचा शास्ता आहे तर जगांत इतका दुष्टपणा शिल्लक कसा राहिला आणि आपणा सर्वांस अनेक प्रकारची दुःखें कां भोगावी लागतात? यावर द्वैतवादी ह्मणतात 'हा परमेश्वराचा अपराध नाही. आपणच आपल्या दुःखाचे कारण आहों. जसें पेरावें तसें उगवतें हा न्यायच आहे. मनुष्यावर संकटें यावी ही परमेश्वराची इच्छा नाही. पूर्वीच्या जन्मी केलेल्या कृत्यांस अनुसरून त्यास चालू जन्म मिळाला आहे. जीव हा अजन्मा आहे. त्यास कोणी उत्पन्न केले नाही. तो स्वतः जी कर्मे करतो त्याचीच फळें त्यास भोगावी लागतात. अनंतकाल तो अनंत कर्मे करीत असून त्यांची फळे भोगीत आहे. त्याने चांगली कर्मे केली तर त्यास सुखाची प्राप्ति होते आणि कुकर्मानी त्यास दुःख प्राप्त होते. अशारीतीने अनंतकाल सुखदुःखांची यात्रा जीव करीत आहे.'<br>{{gap}}जीव हा स्वभावतः पवित्र आहे, ही गोष्ट सर्व वेदांत्यांस कबूल आहे. जीव स्वभावतः पवित्र असून अज्ञानानें तो आवृत झाला आहे. कुकर्में ज्याप्रमाणे अज्ञानास कारण होतात त्याचप्रमाणे शुभ कर्मेहि अज्ञानास कारण होतात. कालांतराने स्वतःचे खरे स्वरूप त्यास समजतें. जीव हा ज्याप्रमाणे वस्तुतः अजन्मा आणि अमर त्याचप्रमाणे तो स्वभावतः पवित्र आहे.<br>{{gap}}सत्कर्माच्या आचाराने दुष्कर्माचे परिणाम नष्ट होतात आणि जीव अधिक शुद्ध स्वरूप होऊन देवयानांत प्रवेश करतो. त्याची सर्व इंद्रियें मनांत लीन होऊन राहतात. शब्दहि मनांत लीन होऊन राहतो. शब्दाबरोबर विचारहि आपोआप लीन होतात. शब्दांवांचून आपणांस विचार करता येत नाही, ही गोष्ट आपल्या अनुभवाची आहे. जेथें विचार उत्पन्न होतो तेथेंच शब्दहि उत्पन्न होतो. या रीतीने शब्द आणि विचार आपणांत लीन करून घेऊन मन स्वतः प्राणांत लीन होते आणि प्राण जीवांत लीन होतात. इतकी तयारी झाली ह्मणजे त्या दशेस आपण मृत्यु असें नांव देतो. मृत्यूनंतर जीव देहांतून बाहेर पडून<noinclude></noinclude> 73j1noyno0dt1wbwcwv2a6ah7oy3tb1 पान:चांदण्यातील गप्पा.pdf/२० 104 74820 229752 196688 2026-04-30T16:46:16Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229752 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader||शिसवी पेटी|३}}</noinclude>ण्यास प्रवृत्त झाले, असे पाहून बिचारी नदी अतिशय संतापली. 'पित्याजवळ याचे गाऱ्हाणे सांगण्यांत कांहीं हांशील नाहीं. तो अगोदरच दुर्बल झाला आहे. त्याला या गोष्टीपासून अधिक ताप मात्र होईल-' असा विचार मनात आणून आपला प्रिय पति जो सागर त्याला तिनें सर्व हकीकत सांगितल्यावरून तो रागाने अत्यन्त क्षुब्ध झाला व कृतघ्न वृक्षांचा नाश करण्यास्तव सर्व वातावरणात त्यानें दंव व धुके पसरून दिले. दंव हेच सागराचें शापोदक होऊन तेणेंकरून अनेक वृक्षांचें अनेक प्रकारें नुकसान झाले. कोमल हृदयांच्या आम्रवृक्षांचा मोहर गळून पडल्यामुळे ते रडूं लागले व त्यांच्या मधुरूपि अश्रू xxxx खालची भूमि ओली चिंब झाली.<BR>{{gap}}पण या झाडीवरून गुंगत राहाणाच्या मधमाशा पाहा! कोणाचें कांहीं कां होईना, आपला मतलब साधला की झाले, अशा कांहीं व्यक्ति आपल्या पाहाण्यांत येतात कीं नाहीं? त्यांना काळ, वेळ, ठिकाण, कशाचाही विचार नसतो. फक्त त्यांच्या मतलबाशी गांठ पडली म्हणजे झाले. 'शेजारी कोणी दारिद्रयांत निमग्न असो, कोणी चोरांकडून लुटला जावो, कोणी शापदग्ध होवो, आपल्याला त्यांच्याशी काय करावयाचे आहे?' असा विचार करणाऱ्या मधमाशा आपल्या कामांत अगदीं गर्क आहेत. त्या आपल्या सकाळ संध्याकाळ या झाडावरचा थोडा, त्या झाडावरचा थोडा, गुं गुं गुं गुं शब्द काढीत, मथ गोळा करीत, इकडून तिकडे तिकडून इकडे लगबगीनें जातांयेतांना दिसत आहेत. किंवा असेही म्हटले तरी चालेल कीं, मधमाशा वस्तुस्थितीचा विचार करणाऱ्या असतात. झालेली गोष्ट जर काहीं पुनः परत येत नाहीं तर मग उगीच शोक करण्यांत अथवा तेंच तेंच घेऊन बसण्यांत तरी कोणता अर्थ आहे? झालेलें नुकसान कांहीं भरून येत नाहीं, तेव्हां त्यातल्या त्यांतच काय होण्यासारखा आपला फायदा असेल तो करून घ्यावा, असे म्हणूनच जणों आंब्यांनी टाकून दिलेला मध जमा करण्यास त्या लागल्या आहेत!<BR>{{gap}}प्लेगमुळे आम्ही या अशा परिस्थितीचा अनुभव घेत अरण्यवासाचें व सृष्टिसौंदर्याचें अशा प्रकारें सुख अनुभवीत असताही चित्तास स्वास्थ्य म्हणून वाटत नाहीं. कारण, रोज व्यवसायी मंडळी आपल्या व्यवसायासाठी प्लेगनें पछाडलेल्या ठिकाणी जाऊन येतात व संध्याकाळीं- ही लागली, ती मेली, त्याला 'सेग्रिगेट' केला,<noinclude></noinclude> hxtuiafbwt3nrry3zyut5q5ubpgd14j पान:चांदण्यातील गप्पा.pdf/२१ 104 74821 229753 196689 2026-04-30T16:52:23Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229753 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|४ |चांदण्यांतील गप्पा|}}</noinclude>अमकी गरीबाची बायको होती, तमक्याची बायको बुडाली, फलाण्याची पोरें उघडी पडलीं, अशासारख्या उद्वेगजनक बातम्या आणतात, व पुनः पुनः त्याच विषयांवर बोलत बसतात. त्यामुळे आमच्या सर्वांच्या मनाला उद्विग्नता मात्र येते. म्हणून मीं एक दिवस आमच्या एकंदर मंडळीला म्हटले की, आपण संध्याकाळी दररोज गोष्टी सांगून करमणूक करून आपल्या उद्विग्न मनांची शांति करण्याचा मार्ग काढू. ही सूचना सर्वांना पसंत पडली. व रोज गोष्टी सांगण्याचे ठरलें. मी त्यांच्या गोष्टी लिहून काढण्याचें पत्करलें. कारण मला गोष्टी सांगता येत नाहींत.<BR>{{gap}}xx प्यास लागणारा वाणीचा रसाळपणा माझ्या अंगीं नाहीं, व त्या सांगतांना गोष्टीला तिखटमीठ लावून गोष्ट खुलवून सांगण्याचे चातुर्यही माझ्यामध्ये नाही. म्हणून मी हे मजुरासारखें लिहिण्याचे काम पत्करलें. देवानें चातुर्य व माधुर्य हे गुण जेव्हां आपल्या दरबारांत वाटले, तेव्हां माझ्या कमनशीबरूपि पाहारेकऱ्याने माझा त्या दरबारांत प्रवेशच होऊं दिला नाहीं. असो.<BR>{{gap}}आम्ही ज्या जागेत राहात आहों त्याचे आणखी थोडेंसें वर्णन देऊन नंतर आमच्यापैकी एका गृहस्थानें गोष्ट सांगितली ती देते.<BR>{{gap}}आमच्या समोरच सागरगडचा डोंगर दिसतो. एका बाजूस रामधरण आहे,. व उत्तरेच्या अंगास कनकेश्वरचा डोंगर आहे, व सह्याद्रीच्या एका लहान डोंगराच्या पायथ्याशीं नदी तीरावर जुन्या आंब्यांच्या राईत आम्ही राहात आहो. या राईत आंब्याचे वृक्ष फार उंच उंच गेलेले आहेत, व त्यांच्या फांद्या एकमेकांत गुंतल्यामुळे वर नजर फेंकली असतां हिरवेगार व बुट्टीदार छत दिले आहे असे वाटतें. या ठिकाणी सकाळ संध्याकाळशिवाय सूर्याचा प्रवेश होत नाहीं. या राईत आमचीं गवताचीं झोपडी एखाद्या ऋषीच्या आश्रमासारखीं शोभतात. पूर्वेच्या बाजूला जी सह्याद्रीची ओळ आहे तिकडून सूर्य उगवला म्हणजे तो प्रातःकाळी फारच नामी दिसतो. -जणूं काय जगच्चालक सुवर्णकार त्या डोंगराच्या मागल्या बाजूला असून त्याने हा लाल तापविलेला सुवर्णगोल निवण्याकरिता पर्वतावर ठेविला आहे! केव्हां केव्हां वाटतें कीं, सृष्टिदेवीचा हा कुंकुमतिलकच आहे, व केव्हां वाटतें कीं, सृष्टि व ईश्वर हीं रंगपंचमीचा रंग खेळत असून त्यांनी हा गुलाल गोटा फेंकून दिला आहे! संध्याकाळी पश्चिमेच्या बाजूला पाहावें तो वाटतें कीं, सूर्यपत्नी आपल्या भ्रताराच्या आगमनसमयी आपले पुढले अंगण शृंगारून<noinclude></noinclude> gf1u2o13zyg3z6bm0aap945j8wemmyb पान:चांदण्यातील गप्पा.pdf/२२ 104 74822 229754 196690 2026-04-30T16:59:34Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229754 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||शिसवी पेटी|५ }}</noinclude>केशराचा सडा घालून प्रियपतीची वाट पाहात बसली आहे! आमच्या या तपोवनात उभे राहून कोणीकडच्याही बाजूला व कोणत्याही वेळीं दृष्टि फेकिली तरी देखावा मनोहरच दिसतो. आतां उन्हाळा सुरू झाल्यामुळे डोंगर अगदी रखरखीत झाले आहेत. तरी मधून मधून कोठें हिरवळ दिसते. जसे एखाद्या श्रीमंताच्या घरावर दरवडा पडून सर्व नाहींसें होतें; पण कोठें कोनाकोपऱ्यांत एखादें फडताळ राहून त्यांत कांहीं खुर्दा, कांहीं दागिने चुकून शिल्लक राहावेत, तसें तें दिसतें. डोंगराच्या पायथ्यावरील वनभूमिका फारच नामी दिसतात. तीxxxx व उंच ताडाची झाडे डोकीवर हिरवा गार तुरा धारण करून उंचीच्या कामांत डोंगराशी जणों प्रतिस्पर्धा करीत आहेत असे वाटतें. लांब लांब पानांच्या हिरव्या गार केळी, लालभडक फुलांनी गजबजलेले पांगार, जीर्णपर्ण झालेले साग, पोपटी रंगाचे करंज, हिरव्या गार भेंड्या, मोहोरलेले आंबे, लांब लांब दाढीच्या ऋषींसारखे वड, ठेंगण्या करवंदीच्या जाळ्या व जमिनीवर व कुंपणावर पसरलेले वालांचे, घेवड्यांचे व रताळ्यांचे वेल, व झेंडूच्या फुलांचे वाफे, हे फार सुरेख दिसतात. जशी कांहीं डोंगरानें आपली ही संपत्ति चोरांच्या भयाने जमिनींत ठेविली आहे, किंवा त्यांच्या घरीं कांहीं कार्यप्रयोजन आहे म्हणून हिरवे शालू नेसलेल्या या वनभूमिका कार्यसिद्धि करण्यास चालल्या आहेत, असे भासते.<BR>{{gap}}आमच्या या तपोवनांत दोनतीन कुटुंबांचीच झोंपडी किंवा पर्णकुटिका आहेत. त्यांतील आम्ही सर्व माणसे एका कुटुंबांतल्यासारखीं वागतों. संध्याकाळी आमच्या पर्णकुटीसमोरच्या अंगणांत सर्व जण जेवणखाण उरकून येऊन बसतात, व गोष्टी सांगतात आमच्यापैकी एका गृहस्थानें गोष्ट सांगण्यास आरंभ केला. ते म्हणले:-<BR>{{gap}}तुम्हां सर्वांना, किंवा काही जणांना तरी, मुंबईचे प्रसिद्ध वकील रावबहादूर गणपतराव सरदेसाई हे ऐकून ठाऊक असतीलच. मी वकिलीचा अभ्यास करीत असता त्यांच्या मुलांना शिकविण्याचेंही काम करीत असें. माझी मूळची गरिबी होती. मला स्वतःचें कोणी नव्हतें व पैशाची मदत करण्यासारखे कोणी आप्तइष्टही नव्हते. अगदी पहिल्यापासून शिकवण्या पत्करूनच मी आपला अभ्यास केला. शाळेतील हुशारी पाहून माझ्या सांसऱ्यानें मला आपली मुलगी दिली. ती मोठी होईपर्यंत त्याने तिला आपले घरींच ठेवून घेतलें, व पुढे मोठी झाल्यावर मजकडे आणून पोहोंचविली. मला शिकून दहा रुपये मिळत व शिक-<noinclude></noinclude> pgh8hj87jr51bym994abqud2agci7n6 पान:चांदण्यातील गप्पा.pdf/२३ 104 74823 229755 196691 2026-04-30T17:04:01Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229755 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|६ |चांदण्यांतील गप्पा|}}</noinclude>वणीचे १० मिळत. त्यात आमचा दोघांचा संसार होत असे. पुढे वकिलीची परीक्षा देण्याचे मी मनांत आणले. पण वकिलीची परीक्षा देण्यास कायद्याचीं पुस्तकें पाहिजेत. त्याला किंमत अतिशय पडते. ती देण्याचे माझे अंगीं सामर्थ्य कोठचें? तेव्हां एखाद्या वकिलाचा कारकून व्हावें असें मी मनांत आणिले. 'कारकून ठेवतां काय?' म्हणून मी रावबहादुरांना विचारण्यास गेलो. त्यांनी माझा अभ्यास पाहून व मी कशाकरितां कारकून राहाण्याचे पत्करीत आहे हे समजून घेऊन, मला त्यांनी आपल्या मुलांना शिकविण्यास ठेविले. त्यांना दोन मुलें होतीं. एक मुलगा व एक मुलगी. मी दोन तास शिकवी व बाकी फावल्या वेळांत त्यांच्या कायद्यांच्या पुस्तकालयांत बसून कायद्याचा अभ्यास करी. रावबहादुरांना घरी बाबासाहेब म्हणत. बाबासाहेबांच्या शरीराची काठी उंच असून हाड-पेर चांगले मजबूत होतें, रंग साधारण गोऱ्यातला होता, नाक सरळ, भिवया झुपकेदार, डोळे खोल व बारीक, व मिशा वर पिवळलेल्या असत. बाबासाहेबांकडे पाहिले म्हणजे हा गृहस्थ फार तिरसट असावा असे वाटे. त्यांना बोलणें अगदी थोडें हवें असे, व तेही अगदी मुद्द्याचें. मुद्द्याबाहेर एक अक्षरसुद्धा बोललेले त्यास आवडत नसे. या सर्वांवरून ते खास तुसडे आहेत असे एकदोन वेळ ज्याने त्यांस पाहिले आहे अशा माणसास वाटल्यावांचून राहात नसे. पण खरोखर ते असे नव्हते. त्यांची वागणूक फार सभ्यपणाची व सरळ असे.<BR>{{gap}}त्यांचा मुलगा भय्यासाहेब अगदी आपल्या वडिलांप्रमाणेच निघेल असें त्याच्या लहानपणच्या वळणावरून दिसत असे. मुलीला अक्कासाहेब म्हणत. तिचा चेहरा फार सौम्य असे. ती नाकाडोळ्यांनी सुरेख व फार मनमिळाऊ स्वभावाची होती. बाबासाहेबांना या दोन अपत्यांशिवाय त्यांच्या जिव्हाळ्याचें असें कोणी नव्हतें. एवढेच नव्हे, पण या दोन अज्ञान मुलांचे संगोपन करण्यास कोणी बायको माणूसही त्यांच्या नात्यागोत्याचे नव्हतें. बाबासाहेबांच्या दिखाऊ तिरसटपणामुळे त्यांची मुले त्यांस भीत असत. त्यांचें त्या मुलांवर अतिशय प्रेम होते तरी तीं मुले त्यांच्याजवळ फारशीं जात नसत.<BR>{{gap}}मी दोन तास शिकवून लवकर घरी जाई. कारण घरी माझी बायको एकटीच असे. आणखी मी जेथें बिऱ्हाडाला जागा घेतली होती त्या जागेच्या आसपास ब्राह्मणांचा शेजार नव्हता. मी घरीं जाऊं लागलों म्हणजे दोन्ही पोरें एवढींशीं<noinclude></noinclude> 55tlk2d23ghrywn6b8u0oiqrttdwm5j पान:चांदण्यातील गप्पा.pdf/२४ 104 74824 229756 196692 2026-04-30T17:09:36Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229756 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||शिसवी पेटी|७ }}</noinclude>तोंडे करीत. असे निराळे बिऱ्हाड करून बाबासाहेबांच्या येथे शिकवावयाला सरासरी एक दोन महिने गेलो असेन. पुढे बाबासाहेबांच्या सांगण्यावरून मी आपले बिऱ्हाड त्यांच्याच वाड्यांत आणिलें.<BR>{{gap}}बाबासाहेबांनी मुंबईची वकिली बहुतेक सोडल्यासारखीच होती. एखाद्या कुळाच्या आग्रहावरून एखादे वेळीं ते मुंबईस अथवा इतर ठिकाणीं जात. एरवीं त्यांनी वाईत जमीनजुमला केला होता तेथेंच ते राहात. वाईत त्यांचें घर मेणवलीचे वाटेवर गांवच्या बाहेर एका उंचवट्याच्या मैदानावर होतें. बाबासाहेबांच्या वाड्याला बाहेर मोठा थोरला कोट असून त्याला बुरूज होते. वांई प्रांती त्याला '''सरदेसायांची गढी''' म्हणत. या गढीच्या बाहेरच्या कोटाच्या आंत बागशाई होती. मागल्या बाजूला तर चांगला मोठा मळाच होता. आतल्या बाजूला म्हणजे मुख्य राहात्या वाड्यांत चारी बुरुजांवर चार खोल्या व त्याच्या खालींही तशाच खोल्या होत्या. अतिला वाडा चौसोपी होता, व बुरुजाच्या खोल्यांना लागूनच चार मोठमोठी दालनें होतीं. पश्चिमेच्या बाजूच्या बुरुजावर वाबासाहेब बसत असत व त्याला लागूनच जें दालन होते त्यात त्यांचा पुस्तकसंग्रह असे. सर्वात पुढच्या दालनांत बैठक घातलेली असे, त्या ठिकाणी ते आल्यागेल्याची व पक्षकारांची गांठ घेत. बाबासाहेबांच्या एकंदर पुस्तकसंग्रहाची किल्ली माझेजवळ असे व तेथें बसून कायद्याचा अभ्यास करण्यास मला परवानगी होती.<BR>{{gap}}बावासाहेब सरदेसाई म्हणजे वाईतले चालतें बोलतें घड्याळच, असें तेथील लोक समजत. त्यांचें जेवण, स्नान, फिरावयास जाणे, वाचीत बसणे व निजावयाला जाणे या सर्व वेळा अगदी बांधून टाकलेल्या असत. त्यांच्या बसावयाच्या खोलीचें, वाचनगृहाचें, अथवा भेट घेण्याच्या दिवाणखान्याचे दार वाजलें कीं, अमुक वाजून अमुक मिनिटे झाली असे समजून त्या दाराच्या करकरण्यावर आपले खिशांतले घड्याळ खुशाल लावावें! एक सेकंडाचा देखील फरक पडावयाचा नाहीं. बाबासाहेबांचा फार वेळ सहवास आम्हां कोणालाच आवडत नसे. त्यांची वर्तणूक जरी अतिशय सभ्य व चाकरनोकरांशी त्यांचे वर्तन शांत असे, तरी त्यांचा तो दिखाऊ तिरसटपणा व मित भाषण यामुळे त्यांचा सर्वांस फारच वचक वाटे.<BR>{{gap}}पुस्तकालयाच्या अगदी शेजारीं, म्हणजे त्याला लागूनच, त्यांची खोली होती. मी पुस्तकालयात दोन दोन तास बसत असें, पण मला त्यांच्या खोलीच्या आंत<noinclude></noinclude> a0ccla84u3hma27ijjy7nln7c4ic407 पान:चांदण्यातील गप्पा.pdf/२५ 104 74825 229757 196693 2026-04-30T17:14:17Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229757 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|८ |चांदण्यांतील गप्पा|}}</noinclude>काय सामान होतें व ती कशी होती हे ठाऊक नव्हते. खोली राहो; पण ज्याच्या आश्रयानें आपण राहातो त्या आपल्या अन्नदात्या यजमानाचा पूर्व वृत्तांत काय होता, त्याच्या कुटुंबांत माणसे कोण होतीं, याचीसद्धां मला माहिती नव्हती.<BR>{{gap}}एके दिवशीं तिसरे प्रहरी मी मुलांना घेऊन गढीच्या मागें बाग होती तींत फिरावयास गेलों. मुलांच्याबरोबर एक दोन गडीमाणसें होतीं. बागेत गेल्यावर मी आपले अभ्यासाचें पुस्तक बरोबर घेऊन गेलों होतों. ते घेऊन तेथे एका आंब्याच्या झाडाखालीं मी वाचीत बसलों व मुलें खेळू लागलीं; आणि गडीमाणसे गप्पा मारीत झोंपड्यांत बसली. मुले झोंपडीजवळ खेळत होतीं म्हणून मी निर्धास्त होतों, व वाचनांत अगदीं गढून गेलो होतो. तो एकदम विहिरीत कांहीं पडल्याचा मोठा आवाज झाला. तो ऐकतांच माझे काळजांत चर्र झाले व तेथून उठून मी एकदम विहिरीकडे गेलों. पाहातो तो अक्कासाहेब आंत पडलेल्या! मी लगेच अंगांतलें फेंकून दिलें, धोतराची कांस मारली, जानवें कमरे सभोंवती खोंचलें, व एकदम विहिरीत उडी टाकली. मुलीनें एक गटंगळी खाऊन ती वर आली. तोच मी तिची वेणी धरून तिला वर ओढली व पोटाशी धरली. वर गडीमाणसें होतीं. त्यांनी पाळणा वगैरे आणून तो आंत सोडला. त्यांत मी तिला बसवून वरच्या लोकांनी तो सावकाश शिंकाळून घ्यावा म्हणून त्यांस बजावून मी वर चढलों व पाळणाही त्यांनी वर ओढला. मुलगी चांगली सावध होती. एखादें मांजर विहिरीत पडलेले पोहोऱ्याबिऱ्यात काढले म्हणजे तो पोहोरा जमिनीवर टेंकताच भोंवतालच्या माणसांना भिऊन ते जसे पटकन् उडी मारून चालतें होते, त्याप्रमाणे पाळणा भुईवर टेंकतांच अक्कासाहेब चट्कन् पाळण्याबाहेर उडी मारून आल्या. हे पाहून आम्हां सर्वोस पराकाष्ठेचा आनंद झाला, व देवानें मोठी खैर केली असे वाटलें. नाहीं तर त्या मुलीला बुडावयास वेळ तो कितीसा लागता! आणखी तसे झालें असतें तर केवढा दुर्धर प्रसंग! तीं दोन मुले बाबासाहेबांचा अगदीं जीव की प्राण होतीं. त्यांच्या सुखासाठी बाबासाहेव किती खर्च सोशीत होते, किती माणसें बाळगीत होते! मुलांच्या पायाला कांटा बोंचला तर बाबासाहेबांना स्वस्थ झोप येत नसे, मग मुलीवर बुडण्याचा प्रसंग आला असता तर त्यांची काय दशा झाली असती! असो. आम्हां सर्वांवरचा त्या दिवशीं हलगर्जी म्हणून घेण्याचा प्रसंग परमेश्वरानें टाळला एवढें खरें.{{nop}}<noinclude></noinclude> ngq35i6exrexue7x587u14vk7p6z2tz पान:चांदण्यातील गप्पा.pdf/२६ 104 74826 229758 196694 2026-04-30T17:18:09Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229758 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||शिसवी पेटी|९}}</noinclude>{{gap}}गढींत जाऊन कोरडी चिरगुटें पांघरुणें आणतांना गड्यामाणसांनी बरीच धांदल केली. त्यामुळे अक्कासाहेब विहिरीत पडल्याची गुणगुण बाबासाहेबांच्या कानावर गेली. खरोखर काय प्रकार आहे तो पाहाण्याकरितां ते स्वतःच येण्यास निघाले होते; तोंच आम्ही गढीत जाऊन पोहोचलों. त्यांनी मुलीला जवळ घेतले, तिचे चुंबन घेतलें, आणि मग तिला खेळावयास पाठविले. नंतर त्यांनी मला आपल्या बसावयाच्या खोलीत बोलावून नेऊन झालेली हकीकत सांगण्यास सांगितले.<BR>{{gap}}बाबासाहेबांनी मला आपल्या खोलीत बोलावले यावरून मला मोठे आश्चर्य वाटले, व मजवर त्यांची एकदम बहाल मर्जी कशी झाली याचे मला मोठे गूढ पडले. मी त्यांच्या विश्वासाला पात्र आहे असे त्यांना आढळून आले असेल म्हणूनच त्यांनी मला खोलींत येण्याबद्दल सांगितले असावें; नाही तर त्या खोलीत जाण्याची कोणालाही परवानगी नसे. त्यांचीं जिवापलीकडे ठेविलेलीं अशी मुलेसुद्धां त्या खोलींत पाऊल टाकीत नसत. यामुळे त्यांच्या खोलींत जाण्याचा विशेष मान हा आपल्यालाच मिळाला असे मला वाटलें.<BR>{{gap}}या खोलींत भिंतीशी लहान टेबल, त्याचेजवळ खुर्ची, टेबलावर एक शिसवी पेटी, व टेबलावरच्या बाजूला भिंतीशी एका साधु पुरुषाची व एका सुंदर तरुण स्त्रीची अशा दोन तसविरी, तेलाच्या रंगांत काढलेल्या व मनुष्याच्या पूर्ण आंकाराच्या टांगलेल्या होत्या. दुसऱ्या बाजूच्या भिंतीला एक साधूची तसबीर टांगलेली होती. एवढेच काय ते तेथें सामान.<BR>{{gap}}ते त्या खोलींत वाचावयास वगैरे बसत म्हणून थोडींशीं पुस्तकेंहीं तेथें होतीं. टेबलावर जी पेटी होती ती मी अनेक वेळां पाहिली होती. बाबासाहेब कधी कामाकाजाला बाहेरगांवीं गेले तरी ती पेटी त्यांच्याबरोबर असे. ते तिला अगदीं विसंबत नसत.<BR>{{gap}}खोलींत गेल्यावर, मुलगी कशी पडली, कशी काढली, वगैरे सर्व मी त्यांना सांगितले. व मुलीच्या जिवाला अगदीं भय नाहीं, आपण अगदी काळजी करूं नका, असें मी त्यांस खात्रीपूर्वक सांगितले. माझे बोलणे संपतांच त्यांनी मला निरोप दिला. मुद्द्याचें व कामापुरतेच बोलण्याची त्यांच्या तेथें वहिवाट असे म्हणून पूर्वीच मीं सांगितले आहे. तेव्हां मला लगेच निरोप मिळाला याचे मला अर्थातच नवल वाटले नाहीं.{{nop}}<noinclude></noinclude> 5dw8b37i2bbtp4l2kb9krtui0v3iu62 पान:चांदण्यातील गप्पा.pdf/१२६ 104 74956 229759 166675 2026-04-30T17:19:41Z कल्पनाशक्ती 3813 /* मजकुराविना */ 229759 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="0" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><noinclude></noinclude> 3l7n0jgg6vvsj0tgftc8ny38hkk7xfi पान:चांदण्यातील गप्पा.pdf/१२७ 104 74957 229760 166676 2026-04-30T17:19:57Z कल्पनाशक्ती 3813 /* मजकुराविना */ 229760 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="0" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><noinclude></noinclude> 3l7n0jgg6vvsj0tgftc8ny38hkk7xfi