विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.46.0-wmf.26
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
अनुक्रमणिका:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf
106
57614
229779
229765
2026-05-04T11:57:42Z
कल्पनाशक्ती
3813
229779
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड)
|Language=mr
|Volume=खंड क्र.१
|Author=[[:mr:स्वामी विवेकानन्द|स्वामी विवेकानन्द]] [[:en:|Swami Vivekananda]]
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=जी. एन. कुलकर्णी
|Address=मुंबई
|Year=1912
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist 8 ="प्रकाशकाची प्रस्तावना" 12="भगिनी निवेदिता यांचा उपोद्धात" 26="अनुक्रमणिका" 31="सर्व धर्मांच्या परिषदेपुढे दिलेली व्याख्याने" 54="आत्मा, परमेश्वर आणि धर्म" 67="हिंदुधर्म" 73="कर्मयोग" 191="धर्म म्हणजे काय?" 210="अनुभवाचा मार्ग" 225="विवेचकबुद्धि आणि धर्म" 250="आर्यज्ञानमंदिराची सोपानपंक्ति" 263="वेदांतमताचे जगावर घडलेले सुपरिणाम"/>
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=

gsr17jj62u6nvzg21ytltp8nd3ksw6v
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/256
104
63526
229772
160487
2026-05-04T11:01:44Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229772
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२३० |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>सूर्यलोकास जातो. सृष्टिमालिकेंत अनेक लोकांचा अंतर्भाव झालेला आहे. आपण ज्यावर आहों तो मृत्युलोक; त्यानंतर सूर्यलोक आहे; आणि त्यानंतर चंद्रलोक असून त्याच्यापुढे विद्युल्लोक आहे. येथे त्यास त्याच्याहून अधिक पवित्र जीव भेटून तो सर्वांत उच्च अशा ब्रह्मलोकास घेऊन जातो. येथे ज्या जीवाचा प्रवेश होतो तो जन्ममृत्यूंतून सुटून त्याचा ब्रह्मलोकांत चिरकाल वास असतो. तेथे त्यास सर्व सिद्धी प्राप्त होतात; परंतु सृष्टि निर्माण करण्याचे सामर्थ्य मात्र त्यास नसते. विश्वाचा उत्पन्नकर्ता एकटा परमेश्वरच आहे. कोणत्याहि जीवास परमेश्वर होतां येत नाही. मनुष्य परमेश्वर होऊ शकतो असें ह्मणणे पापात्मक आहे असें द्वैतवाद्यांचे मत आहे. जीवाला सर्व प्रकारचे सामर्थ्य प्राप्त झाले तरी त्यास जग उत्पन्न करण्याचे सामर्थ्य मात्र कधीहि प्राप्त होणार नाही. फार झाले तर आपल्या इच्छेप्रमाणे शरीरधारी होऊन त्यास जगांत अवतरतां येते. त्याला कोणत्याही देवांस अथवा स्वतःच्या पितरांस भेटण्याची इच्छा झाली तर त्याच्या शब्दाबरोबर ते जीव त्याच्यापुढे हजर होतात. त्याला कोणत्याहि प्रकारचे दुःख प्राप्त होत नाही व त्याची इच्छा असल्यास अनंतकाळपर्यंत त्याला ब्रह्मलोकांत राहतां येतें. परमेश्वराच्या अत्यंत कृपेतला असा तो जीव असतो. त्याला कोणतेंहि कर्म करावयाचे नसते. तो अत्यंत पवित्र आणि निःस्वार्थी असा झालेला असतो. त्याचे काम म्हटले तर फक्त परमेश्वराचें भजन करणे इतकेंच. याच्या खालच्या पायरीचे पवित्र जीव कार्यरत असतात व त्या कार्यांपासून फलप्राप्ति व्हावी अशी त्यांची इच्छा असते. कोणाला काही दान केले तर त्याबद्दल स्वर्गप्राप्ति व्हावी असे त्यांस वाटत असते. असे लोक मृत्यूनंतर चंद्रलोकास जातात व तेथे पुष्कळ काळपर्यंत सुखाने राहतात. चांगल्या कर्माची फळे संपेपर्यंत त्यांचा तेथें वास होतो. चांगली फळे भोगून झाल्यानंतर ते पुनः मृत्युलोकांत परत येतात व शिल्लक राहिलेल्या फळांप्रमाणे त्यांस बरा वाईट जन्म येतो. चंद्रलोकांत गेलेल्या जीवास आह्मी देव ही संज्ञा लावतों. ख्रिश्चन किंवा मुसलमान लोकांत देवदूतांची (Angel) जी कल्पना आहे तिच्याच तोडीची ही देवांची कल्पना आहे. हिंदूंच्या पुराणांत जी देवांची वर्णने आहेत, त्यांवरून त्यांस मिळालेली नांवें पदवीची दर्शक आहेत असे आढळून येते. जसें इंद्र या नांवाने एका विशिष्ट पदवीचा बोध होतो. ती पदवी प्राप्त होण्यास जरूर असणारी कर्मे करून कोणासहि इंद्राची पदवी प्राप्त करून घेतां येते. वेदांनी सांगितलेली विशिष्ट कर्मे केली ह्मणजे तो मनुष्य इंद्रपदास योग्य<noinclude></noinclude>
ly8hzjhwc6buk4rqd82inri9r4x0on7
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/257
104
63527
229773
160488
2026-05-04T11:07:54Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229773
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|२३१ }}
{{rule}}</noinclude>होतो; व तोपर्यंत पूर्वीच्या इंद्राची शुभ फळे संपून तो पुन्हां मनुष्य होतो. ज्याप्रमाणे आपल्या या मृत्युलोकांत राजांच्या अदलाबदल्या होतात, त्याचप्रमाणे देवलोकांतहि तशाच प्रकारच्या घडामोडी नित्य सुरू असतात. आपणांस ज्याप्रमाणे मृत्यु येतो, त्याप्रमाणे देवांसहि मृत्यु गांठतो. ज्या ठिकाणी मृत्यूचे वारें नाही, अशी जागा म्हटली तर एक ब्रह्मलोकच आहे. मृत्युलोकांत आणि देवलोकांत फारसा फरक नाहीं असें पुराणांतरी लिहिलेल्या कथांवरून आढळून येते. देवलोकांत देवांची आणि दानवांची युद्धे नेहमी चालू असतात. दानवांनी देवांचा अनेक वेळां पराभव केला असल्याचे दिसून येते; तथापि देवांनी आपले वर्चस्व नेहमी कायम ठेवल्याचे दिसते. असें आहे तरी देवांनी दानवांपेक्षांहि अधिक वाईट कृत्ये केल्याचे दाखले सांपडतात. देव स्त्रियांचे मोठे चहाते होतेसें दिसते. अशा रीतीने सर्व सत्फलांचा व्यय झाला ह्मणजे देवलोकी गेलेले जीव पर्जन्याच्या पाण्यांतून अथवा अन्य प्रकारें मृत्युलोकास येऊन पुन्हां मनुष्यजन्मास येतात. जगांत दुष्कर्मे करणारी माणसें पशूंच्या योनीत जन्म घेतात. त्यांची दुष्कर्मे अगदीच वाईट प्रतीची असली तर त्यांस अगदी क्षुद्र प्राण्यांचा अथवा वनस्पतींचा जन्म येतो.
{{gap}}देवयोनी ही मनुष्यापेक्षा अधिक उच्च दर्जाची असली तरी ती केवळ भोगयोनी आहे. मनुष्ययोनीप्रमाणे ती कर्मयोनी नाही. कर्म ह्मणजे ज्यापासून पुढील स्थितीवर काही परिणाम होतो तें कर्म. मनुष्ययोनीत केलेल्या कर्मानुसार कोणी एखादा देवयोनीत गेला, तर तेथे केलेल्या कर्मांची फळे भोगण्यापेक्षा त्यास कांहीं अधिक कर्तव्य नसते. देवयोनीत असतां नवीन फलदायक असे कोणतेंहि कर्म करतां येत नाही. चांगल्या कर्माची फळे भोगून संपली म्हणजे सामान्य कर्में फलद्रूप व्हावयास लागून त्याला पुन्हां मानवयोनीत जन्मास घालतात. तेथे त्यानें चांगली कर्मे करावी आणि ब्रह्मलोकास जावें. देवयोनीत असतां ब्रह्मलोकाची प्राप्ति होणे शक्य नाही.
{{gap}}अगदी खालच्या कोटींतून उच्चतर कोटीकडे प्रवास करीत असतां प्राण्यास मध्ये पशुयोनीचा आश्रय करावा लागतो. तेथून क्रमाक्रमानें तो प्राणी मनुष्ययोनीस प्राप्त होतो. पशूंची संख्या कमी होत आहे आणि मनुष्यांची वाढत आहे, ही गोष्ट येथे विशेष लक्ष्यात ठेवण्यासारखी आहे. याचे कारण पशूचे आत्मे हळुहळू मानवयोनीत प्रवेश करीत आहेत हेच आहे. पशूंच्या कित्येक<noinclude></noinclude>
8ys1zmsblx6qd4v894m4b44on0yvr2g
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/258
104
63528
229774
160489
2026-05-04T11:11:49Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229774
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२३२ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>जाति नामशेष झाल्या आहेत; त्या कोठे गेल्या? त्यांचा प्रवेश आतां मानवयोनीत झाला आहे.
{{gap}}वेदग्रंथांतून नरकाचा उल्लेख सांपडत नाही. परंतु पुराणांत अनेक प्रकारच्या नरकांचे वर्णन सांपडते. जणूं काय नरकवर्णनावांचून धर्मास पूर्णत्व येत नाही! कित्येक यातनांचेंहि वर्णन पुराणग्रंथांतून केले आहे. कित्येक नरकांत मनुष्यांस अर्धेअर्धे कापण्यांत येते. कित्येक ठिकाणी त्यांस भाजण्यांत येते. पण एवढ्या सपाट्यांतहि त्या प्राण्यास मरण येत नाही. पण अशा यातनांचाहि शेवट होण्याचा काळ केव्हां तरी येत असल्याचे आश्वासन पुराणांनी दिले आहे, ही त्यांची मोठी मेहेरबानीच ह्मणावयाची! अशा स्थितीत वाईट कर्माची फळे भोगून संपल्यावर ते प्राणी पुन्हां मानवयोनीत जन्मतात. अशा रीतीने मानवयोनी ही सर्व योनीत श्रेष्ठ गणली गेली आहे. ब्रह्मलोकप्राप्तीचा संभव मानवयोनीहून इतर कोणत्याहि योनीत नाही. मानवयोनी ही कर्मयोनी असून तेथें सुख अथवा दुःख यांची प्राप्ति करून घेणे आपल्याच हाती असते. अखंड मंडलाकार मायाचक्रांत सांपडलेल्या जीवांस मानवयोनी हे विश्रांतिस्थानासारखे असून येथून पुढील मार्ग ठरवावयाची त्यांस मुभा मिळालेली आहे. यामुळेच मानवयोनी ही देवयोनीपेक्षांहि श्रेष्ठ मानण्यांत आली आहे.
{{gap}}येथवर द्वैतमताचें सामान्य निरूपण केले. आतां यापुढे वेदांतांतील अधिक उच्च मताचा विचार करूं. द्वैतमतावर जे आक्षेप येतात, त्यांचे सामान्य दिग्दर्शन येथे करावयास पाहिजे. परमेश्वर हा अनंत आहे, तसेंच सृष्टि अनंत आहे आणि जीवहि अनंत आहे, हे तुमचे ह्मणणे कबूल करता येण्याजोगें नाही. तसें कबूल केले तर अनेक वस्तु अनंत आहेत असें ह्मणणे भाग पडून अनवस्था दोष होतो. असें ह्मणणे न्यायशास्त्रासहि अनुसरून नाही. याकरितां परमेश्वर विश्वबाह्य मानणे योग्य नाही. तो विश्वांतच असून त्याचे प्रत्यक्ष कारण आहे. विश्व त्याच्या बाहेर नसून तोच विश्वरूपाने दिसू लागला असें मानणे युक्तीस अधिक धरून आहे. यावर असा एक आक्षेप निघतो की, 'परमेश्वर भिंत, टेबल, डुक्कर, चोर इत्यादि झाला आहे काय? परमेश्वराच्या ठिकाणी इतक्या दुर्गुणांचा वास संभवतो काय?' त्यावर आमचे उत्तर असें आहे. मला आत्मा आहे आणि शरीरहि आहे ही गोष्ट खरी; तथापि हे शरीर मणजे खरा 'मी' नव्हे. मी बालतारुण्यादि अवस्थांतून वार्धक्यांत प्रवेश करतो. अशा रीतीने माझें शरीर बदलले तरी खरा 'मी' ह्मणजे आत्मा मात्र केव्हांहि बदलत<noinclude></noinclude>
euynjn2hcmyeb0mo4gugucf9qaqzws6
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/259
104
63529
229775
160490
2026-05-04T11:15:38Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229775
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|२३३ }}
{{rule}}</noinclude>नाही. माझ्या बाल्यावस्थेत जे माझ्या आत्म्याचे स्वरूप असते. तेंच तारुण्यांत आणि वार्धक्यांतहि असते. त्याचप्रमाणे हे सर्व दृश्य विश्व आणि कोट्यवधि जीव मिळून परमात्म्याचे एक शरीरच आहे. या सर्वांत त्याचाच वास आहे. शरीरांत बदल झाला ह्मणून परमात्मस्वरूपांत बदल झाला पाहिजे असे नाही. जीवाच्या आणि सृष्टीच्या स्वरूपांत बदल होत असला तरी परमात्म्यांत त्यामुळे यत्किंचितहि बदल होण्याचे कारण नाही. सृष्टीत बदल होतो असे आपण ह्मणतों, पण बदल होतो याचा अर्थ काय? याचा अर्थ इतकाच की सृष्टपदार्थाचे रूपांतर होतें. एकरूप बदलून त्याजागी दुसरे रूप येतें इतकेच. पण आत्म्याचें असें रूपांतर कधीच होत नाही. अज्ञानाच्या आवरणाने त्याचे स्वरूप आकुंचित दिसते; आणि ज्ञानानें तें प्रसरण पावल्यासारखे दिसते. आत्म्याच्या स्वरूपांत बदल म्हटला तर इतकाच. वाईट कर्मानी आत्म्याचे आकुंचन होते. ज्या कर्मानी आत्म्याचें पूर्णरूप आकुंचित होते, ती सर्व कमें पापकर्मे होत; तसेच ज्या कर्मोनी आत्म्याचा प्रकाश अधिक उज्वल होण्यास मदत होते ती सत्कर्मे होत. सर्व जीवात्मे प्रथम पवित्रच होते. पापकर्माच्या आश्रयाने ते आकुंचन पावले आहेत; परंतु सत्कर्मानी परमात्म्याची कृपा त्यांनी संपादन केली ह्मणजे ते पुन्हां पवित्र होतील. अशा रीतीने स्वतःस पवित्र करून घेणे प्रत्येक जीवात्म्यास शक्य आहे. अशा रीतीने जीवात्मा, पूर्ण व पवित्र झाला, तरी बाकीची सृष्टि पूर्वीप्रमाणेच अनंतकाल चालू राहील. वेदांतांतील ही पुढची पायरी आहे. पूर्वी सांगितलेल्या मतास द्वैत अशी संज्ञा असून या दुसऱ्या मतास विशिष्टाद्वैत अशी संज्ञा आहे. विशिष्टाद्वैतमताप्रमाणे परमात्मा, सृष्टि आणि जीव या त्रयीचे मिळून एक परमात्मशरीर बनले आहे. ही द्वैताच्या वरची पायरी आहे. द्वैतमताप्रमाणे सृष्टि ही एखाद्या यंत्राप्रमाणे असून परमेश्वर या यंत्राचा चालक आहे. विशिष्टाद्वैतमताप्रमाणे परमेश्वर विश्वबाह्य नसून विश्वांतच भरून राहिला आहे.
{{gap}}या दोन मतांनंतरची पायरी अद्वैतमताची आहे. परमेश्वर विश्वांतच भरून राहिला आहे, हे विशिष्टाद्वैताचें ह्मणणे अद्वैतमतासहि मान्य आहे. परंतु सृष्टि आणि जीवात्मे हे परमात्म्याच्या शरीरासारखे असून त्यांत बदल होतो व परमात्म्यांत बदल होत नाही हे विशिष्टाद्वैतमताचें ह्मणणे अद्वैतवादी कबूल करीत नाहीत. त्यावर ते अशी शंका घेतात की परमात्मा जर या विश्वाचे प्रत्यक्ष कारण असेल तर कारण व कार्य यांच्या स्वभावांत फरक कां व्हावा? कारण आणि कार्य ही नेहमी एकस्वभाव असतात. परिस्थितीने कारणाचेच कार्यात रूपांतर होते. मग<noinclude></noinclude>
5552e29wka5ogvvuhivgp38u13ow1y6
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/260
104
63530
229776
160491
2026-05-04T11:28:23Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229776
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२३४ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>परमेश्वर या सृष्टीचे कारण आहे, हे आपण कबूल केले, तर कारणच कार्यरूप होऊन ही सृष्टि निर्माण झाली हे आमचे ह्मणणे तुह्मांस कबूल केलेच पाहिजे. ह्मणजे सृष्टि ही परमात्म्याचेच दृश्यरूप आहे असें अद्वैतमत आहे. असे असेल तर तुह्मी, मी आणि इतर सर्व वस्तु परमेश्वररूपच आहेत असें म्हटले पाहिजे. सर्वच परमेश्वर हे ह्मणणे कित्येकांस कसेंसेंच वाटते. पण तसें वाटण्याचे कारण नाही. वस्तुस्थिति तशीच आहे. माझ्या हातांतले हे पुस्तक परमेश्वर, माझें शरीर परमेश्वर, माझें मन परमेश्वर आणि माझा आत्माहि परमेश्वरच आहे. तर मग हे सर्व जीव निरनिराळे कसे उत्पन्न झाले? परमेश्वराचे असंख्य तुकडे होऊन इतके जीव उत्पन्न झाले काय? एकच परमेश्वर अनंत जीवरूपाने दिसतो काय? हे झाले तरी कसे? एकाच विश्वात्मक शक्तीचे इतके तुकडे कसे झाले? अनंताचे तुकडे करणे शक्य आहे काय? केवळ पवित्ररूप परमात्मा विश्वरूपाने का अवतरला? जर आज तो विश्वरूप झाला असे मानले तर उद्या तो तिसरेंच एखादें रूप घेणार नाही याचा काय भरंवसा? जर अशा रीतीने त्याचे रूपांतर होते तर रूपांतर पावणाऱ्या प्रत्येक पदार्थास अंत आहे असें आपण पाहतों; मग परमात्म्याचाहि अंत होणार की काय? तसेच सर्व परमात्मा विश्वरूप झाला, की, त्यांतील काही भाग विश्वरूप झाला? इत्यादि अनेक प्रकारच्या शंकांस अद्वैतमत उत्तर देतें की ''''अरे जे झालेंचि नाहीं । त्याची वार्ता पुससी काईं ॥'''' हे दृश्य विश्व भ्रमरूप आहे. हे झालेच नाही. हे सर्व स्वप्न अथवा मृगजल यासारखे आहे. जीव असा पदार्थच कोठे नाही. मग अनंत जीवांचा विचारच नको. तें एकच 'अनंत' सर्वत्र आहे. देवाच्या हजारों बिंदूंवर पडलेल्या प्रतिबिंबामुळे हजारों सूर्य दिसले तरी खरा सूर्य एकच. तसेंच हजारों मनांत प्रतिबिंबित होणारा परमात्मा एकच आहे. हजारों मनें ही देवाच्या हजारों बिंदूंसारखी आहेत व त्यांत प्रतिबिंबित झालेला परमात्मा हजारों सूर्योसारखा दिसतो. यासाठी सृष्टि ही स्वप्नवत् आहे, असें अद्वैतमताचे प्रतिपादन आहे. पण स्वप्नांत तरी खऱ्या वस्तूच दिसतात. हत्ती आपण स्वप्नांत पाहिला तरी हत्ती खरा असल्यावांचून त्याचे स्वप्न तरी कसे पडेल? यासाठी परमात्मस्वरूप खरे असून स्वप्नांत तशी हजारों रूपें आपण पाहत आहो. शरीर, मन आणि जीव या रूपाने तुह्मी स्वप्नवत् आहां ही गोष्ट खरी, तरी सच्चिदानंद या रूपाने तुह्मी खरेच आहां. या साऱ्या विश्वाचा परमात्मा तूंच. तूंच हे सर्व विश्व निर्माण केलें आहेस आणि याचे अधिष्ठानहि तूंच आहेस. तुझा जन्म, तुझें मरण आणि तुझा<noinclude></noinclude>
oy2ri8h86ufa8q88xvdhvml16ig2dwr
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/261
104
63531
229777
160533
2026-05-04T11:52:08Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229777
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|२३५ }}
{{rule}}</noinclude>संसार हा सर्व मायेचा खेळ आहे. तूं अनंत आहेस. तुझ्या चैतन्यसामर्थ्याशी तुलना केली तर सूर्य, चंद्र आणि तारे हे तुझ्या प्रचंड झोतांतून उडालेल्या तुषारांसारखे आहेत. तुला जन्म नाही, आणि मृत्युहि नाही. तुला जन्म कधी झालाच नाही. मग मृत्यु तरी कोठचा? ''''न मृत्युर्न शंका न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता च जन्म । न बंधुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यश्चिदानंदरूपः शिवोहं शिवोहम् ॥'''' असेंच तुला ह्मटले पाहिजे, असें अद्वैतमताचे आपणा सर्वांस सांगणे आहे. अद्वैतमताप्रमाणे स्वर्गलोक, देवलोक आणि ब्रह्मलोक हे सर्व स्वप्नाप्रमाणे आहेत. स्वप्नांतून जागे झाल्यावर त्यांतील सुखाची अथवा दुःखाची किंमत सारखीच; तसेंच या प्रचंड स्वप्नांतून आपण एकवार जागे झालों ह्मणजे ब्रह्मलोकाची तरी मातब्बरी काय आहे? जीवात्मा मुक्त होऊन स्वतःच्या सच्चिदानंदपदी आरूढ होणे, हे अद्वैतमताचे ध्येय आहे. अशा आत्म्यास कधीं क्षुद्रसुखाची तहान लागत नाही. आपल्या या क्षुद्र देहांत प्रत्ययास येणाऱ्या चैतन्याचा रसास्वाद कसा आहे, याचा अनुभव प्रत्यही आपणांस येतो. मग याच देहांत विश्वचैतन्याचा आस्वाद अनुभवितां आला तर तो आनंद कसा असेल हे कल्पनेनेंहि जाणतां येणार नाही. हेच अद्वैत मीमांसेचें सार आहे.
{{gap}}वेदांतसोपानाला तीन पायऱ्या आहेत. अद्वैतमत ही शेवटची पायरी असून तिच्या पलीकडे जाणे शक्यच नाही. सर्व सृष्टीचें मूळ सांपडल्यावर त्यापलीकडे सृष्टीचा शोध कोठे लावणार? एकाच पदार्थातून हे सर्व पदार्थ निर्माण होतात, असे सिद्ध झाल्यावर रसायनशास्त्रास शोधावयाचे असें काय उरणार? त्याच प्रमाणे विश्वचैतन्याची एकात्मकता सिद्ध झाल्यावर तत्वज्ञान तरी शोध कशाचा करणार?
{{gap}}हा अद्वैतसिद्धांत सर्वांसच पटतो असे नाही. केवळ बुद्धीनेंहि तो पूर्णपणे समजणें प्रथम कठीण आहे. अत्यंत कुशाग्र आणि निर्भय विवेचकबुद्धि असली तर तिचा प्रवेश येथे केव्हां तरी होण्याची आशा आहे. याच कारणामुळे सामान्य जनतेचा कल अद्वैताकडे फारसा नसतो. याकरितां आपण द्वैतापासून आरंभ करावा. द्वैतसिद्धांताचा विचार कुशाग्रबुद्धीने आपण करूं लागलों ह्मणजे विशिष्टाद्वैतमार्ग आपोआप दिसू लागतो. ज्याप्रमाणे कित्येक शतकांच्या अनुभवाने शहाणे होत होत एखादें राष्ट्र संस्कृतीचे शिखर गांठते, त्याचप्रमाणे एका व्यक्तीलाहि अनुभवाने आणि कित्येक वर्षांच्या प्रयत्नाने हे शिखर गांठले पाहिजे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यांत असा अनुभव आपणांस घ्यावाच लागतो.<noinclude></noinclude>
l8p6bqft133tfc14yzcqygtxtze9zut
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/262
104
63532
229778
160534
2026-05-04T11:55:59Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229778
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२३६ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>आज जे अद्वैतमतवादी असतील त्यांनी चालू आयुष्यांतील आपला पूर्वानुभव चाळून पाहिला तर पूर्वी एकवेळी आपण पक्के द्वैती होतो, असे त्यांस आढळून येईल. हा देह ह्मणजेच आत्मा असा अध्यास आपणांस असेल, तोपर्यंत जग स्वप्नरूप आहे असें ह्मणण्यांत तात्पर्य नाही. नाणे हवे असेल तर जसें त्याच्या दोन्ही बाजू घेतल्याच पाहिजेत, तसेंच हे आहे. हे जग खरे आहे असे वाटत आहे, तोपर्यंत परमेश्वराचे साकार अस्तित्व मान्य केलेच पाहिजे. कारण जगाचें अस्तित्व जर खरें, तर त्याचा कर्ता कोणी तरी असलाच पाहिजे. त्या कर्त्यालाच परमेश्वर असें नांव आहे. अमुक गोष्ट कार्यरूप आहे असे वाटतें तोपर्यंत तिचे कारणहि असलेच पाहिजे. जगाचे अस्तित्व संपेल तेव्हां साकार परमेश्वराचे अस्तित्वहि संपेल. तुह्मीच ब्रह्मरूप झालां ह्मणजे तुमच्यावांचून निराळे असें कांहीं उरणारच नाही. जोपर्यंत देहाध्यास शिल्लक आहे, तोपर्यंत आपणांस जन्ममृत्यूपासून सुटका नाही. पण हा अध्यास संपला ह्मणजे विश्वरूप स्वप्नांतूनहि तुह्मी आपोआप जागे व्हाल. आज आपणांस जें कांहीं विश्वरूपाने भासत आहे, तेच ब्रह्मरूपाने दिसूं लागेल. विश्वाची जाणीव शिल्लक असतां जो परमेश्वर विश्वबाह्य वाटत होता तोच विश्वांत भरून आहे असा अनुभव येईल. ''''ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः।'''' हेच अद्वैतमत आणि हीच वेदांताची शेवटची पायरी.

{{rule|7em}}
{{nop}}<noinclude></noinclude>
jq9xt8bx59oexgwnc15mtmvouki5q2x