विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.46.0-wmf.26 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/263 104 63533 229780 160535 2026-05-04T12:09:19Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229780 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>
{{center|{{xx-larger|'''वेदांतमताचे जगावर घडलेले सुपरिणाम.'''}}}} {{rule|7em}} {{center|(अमेरिकेतील बोस्टनशहरी दिलेले व्याख्यान.)}}
{{gap}}आजच्या विषयास आरंभ करण्यापूर्वी प्रथम तुह्मां सर्व मंडळीचे आभार मानणे इष्ट आहे असे मला वाटते. आज तीन वर्षे मी तुमच्या सहवासांत घालविली. मी अमेरिकेच्या बहुतेक भागांत प्रवास केला आणि आतां मी आपल्या देशास परत जावयास निघणार, अशा वेळी तुह्मांबद्दल जो आदरभाव माझ्या अंतःकरणांत वसत आहे, तो व्यक्त करून दाखविणे हे योग्य आहे. मी तुमच्या देशांत येऊन थोडे दिवस झाल्यावर तुमच्या देशाचा एखादा इतिहास मी लिहूं शकेन असे मला वाटले; पण आतां तीन वर्षे येथे राहिल्यावर मला असे आढळून आले की, एखादें पान भरेल इतकाहि मजकूर मला लिहिता येणार नाही; मग एखाद्या मोठ्या ग्रंथाचें नांवच नको. कोणत्याहि देशांत आपण प्रथमच गेलों ह्मणजे तेथे सर्व जग नवें असल्यासारखे दिसू लागते. पण तुमच्या या देशांत बराच प्रवास केल्यावर एक विशेष गोष्ट माझ्या लक्ष्यांत आली, ती ही की, वरवर विचार करणारास निरनिराळ्या लोकांत कितीहि भेद दिसला तरी वस्तुतः मनुष्यस्वभाव येथूनतेथपर्यंत एकच. एखाद्या देशांत कांहीं खाण्यापिण्याचे अथवा पोषाखाचे निराळे प्रकार असले, तरी त्या पोषाखाच्या आतील मनुष्य मात्र साऱ्या जगभर एकसारखाच आढळतो. सामान्य मनुष्यस्वभावांत बाह्य गोष्टींमुळे फरक पडत नाही. असे असले तरी देशोदेशींच्या चालीरीतींतहि कांहीं विशिष्ट गोष्टी आढळून येत नाहीत असें नाही. तुमच्या या देशांत मला एक विशिष्ट गोष्ट अशी आढळून आली की, लोकांची रिकामी उठाठेव करीत बसण्याकडे तुमची प्रवृत्ति नाही. अमुक मनुष्य काय खातो अथवा काय पितो असल्या क्षुद्र बाबींच्या चौकशीत तुह्मी सहसा कधी पडत नाही. कोणीहि मनुष्य असो; तो मर्द असला की तुमचें त्याच्यावर प्रेम जडते. त्याला तुमच्या अंतःकरणांत जागा मिळते. या बाबतींत जगांतील इतर कोणत्याही देशांची तुमच्याशी तुलना होणार नाही.
{{gap}}आमच्या वेदांतधर्माची तुह्मांस माहिती करून द्यावी, यासाठी मी तुमच्या देशी आलो. वेदांतधर्म हा अत्यंत प्राचीन धर्म आहे. जगांतील अत्यंत प्राचीन ज्ञान ज्या श्रुतीत सांठविले आहे, त्याच श्रुतींपासून वेदांताची उत्पत्ति झाली आहे.<noinclude></noinclude> g800t6exd9te23r4zi5z6hc8kpkb7fz पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/264 104 63534 229781 160536 2026-05-04T12:13:32Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229781 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२३८ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>एखाद्या वृक्षाचा अत्यंत मनोहर आणि उपयुक्त भाग म्हटला तर मोहोर हाच होय. हीच उपमा वेदांतालाहि लागू पडते. कित्येक शतकें वाढत असणाऱ्या ज्ञानवृक्षाचा, वेदांत हा मोहोर होय. कवितेच्या भाषेत बोलावयाचे म्हटले तर ''''एथ चातुर्य शाहणें झालें । प्रमेय रुचीस आलें । आणि सौभाग्य पोखलें । सुखाचे एथ ॥'''' असेंच ह्मणावे लागेल. वेदांतमतासंबंधी आज काही विशिष्ट गोष्टी तुह्मांस सांगावयाच्या आहेत. त्यांत प्रथम सांगण्यासारखी गोष्ट ही की, वेदांतमत हे एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे मत नाही. परमेश्वराचा अमुक एक दूत आला आणि त्याने वेदांत सांगितला असें नाही. कित्येक धर्मात अथवा पंथांत ज्याप्रमाणे कोणी मध्यवर्ती महात्मा असतो, तसा वेदांतमताचा कोणीहि महात्मा अथवा प्रवर्तक नाही. वेदांतधर्म व्यक्तिप्रवर्तित नसला तरी तशा धर्माशी अगर पंथाशी वेदांताचा कांहीं वादहि नाही. हिंदुस्थानांतहि बुद्ध अवतरून त्याच्यामुळे नवा धर्म स्थापला गेला, व त्यानंतरहि आजपर्यंत अनेक पंथ अस्तित्वांत आले. या सर्व पंथांचे अथवा धर्माचे आद्यप्रवर्तक ह्मणून कोणी तरी विशिष्ट व्यक्ती होत्या. तसेंच ख्रिस्ती आणि महंमदी धर्महि एकाएका विशिष्ट व्यक्तीमुळेच उत्पन्न झाले. या प्रत्येक धर्मात अगर पंथांत पूजनीय अशी एक व्यक्ति आहे व त्या धर्मानुयायांतहि त्या विशिष्ट धर्ममतांपेक्षा व्यक्तीबद्दलच अधिक पूज्यभाव आढळून येतो. परंतु वेदांताचा कोणी एकच असा प्रवर्तक नाही. तसेंच वेदांतानें या धर्माचा अगर पंथांचा कधी द्वेषहि केला नाही. एवढेच नव्हे, तर वेदांतधर्म इतर धर्मास थोडाबहुत उपयुक्तच झाला आहे.
{{gap}}मनुष्य हा वास्तविक परमात्मरूप आहे, हे वेदांताचे मत जगांतील सर्व धर्मास मान्य आहे. तसेच आपणाभोंवतीं दृग्गोचर होणारे सर्व विश्व परमात्म्यामुळेच दृश्य स्वरूपास आले आहे, हेहि सर्व धर्मास मान्य आहे. मनुष्यांतील सर्व सद्गुण आणि सर्व सामर्थ्य ही विश्वचैतन्याचाच भाग असून त्या दृष्टीने मनुष्यामनुष्यांतहि काही महत्वाचा फरक नाही. सर्वांच्या चैतन्याचे स्वरूप एकच. अपार समुद्रांत ज्याप्रमाणे अनेक ठिकाणी लाटा उत्पन्न होतात, त्याचप्रमाणे मनुष्ये ही चैतन्यसमुद्रावर उठलेल्या लाटा होत. आपणांपैकी प्रत्येकजण वस्तुतः अपार समुद्ररूप असून प्रत्येकाची खटपट ही वस्तुस्थिति प्रत्यक्ष सिद्ध करण्याकरतांच सुरू आहे. आपणांपैकी प्रत्येकजण सच्चिदानंदसमुद्र असून बाह्यतः दिसणारा भेद उपाधींच्या कमीअधिकपणामुळे उत्पन्न झाला आहे. याकरतां वेदांताचें ह्मणणे असे आहे की, एखादा मनुष्य मूर्ख असला अथवा त्याच्या अंगीं<noinclude></noinclude> h9qsdtxqjgtf7gvgdgttp0lenvp3ipv पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/265 104 63535 229782 160537 2026-05-04T12:18:06Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229782 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|२३९ }} {{rule}}</noinclude>दुसऱ्या उणीवा आढळल्या, तरी त्यांवरून त्याची किंमत कमी न समजतां त्याच्यांतील चैतन्यस्वरूपाकडे लक्ष द्या. कोणाहि मनुष्याला 'तूं पापी' असें ह्मणून त्याचा उपमर्द न करता त्याचे चैतन्य पूर्णरूपाने प्रकाशेल असें करणें हें धर्मशिक्षकाचे खरें काम आहे, असें वेदांताचे प्रतिपादन आहे.
{{gap}}त्याचप्रमाणे जनसमूहांत प्रत्ययास येणारे चैतन्याचे सामर्थ्य हे सुद्धा मानवी मनांतील चैतन्याचेच दृश्य स्वरूप असून, तें मानवी मनांतूनच निर्माण झालें आहे. मानवी मन हे वस्तुतः ज्ञानस्वरूपच आहे. आपापल्या धर्मप्रवर्तकांस खुद्द परमेश्वराकडून ज्ञानसंदेश मिळाला होता, असे सर्व धर्माचे अनुयायी ह्मणतात. परंतु वेदांताचे तसे मत नाही. मानवी मनांतून उत्पन्न झालेले अदृश्य चैतन्य या महात्म्यांच्या रूपाने दृश्य झालें, असें वेदांताचे मत आहे. अनेक मनुष्ये आपापले निःसीम चैतन्य प्रत्यक्ष व्यक्त करण्याकरतां खटपट करीत असतात व त्या खटपटीचेंच महात्मे हे एक दृश्यं फल आहे, असें वेदांताचे मत आहे. मनुष्य परमेश्वरस्वरूप आहे, ही गोष्ट ज्यांस समजत नाही अथवा मान्य नाही अशा धर्माशी वाद घालण्याचीहि वेदांतांची इच्छा नाहीं; कारण प्रत्येक मनुष्याची खटपट, समजून अथवा न समजतांहि पूर्णत्वाकडे जाण्याकरितांच आहे असें वेदांतमताचे प्रतिपादन आहे. ही गोष्ट आज एखाद्यास न समजली तरी ती उद्यां त्याला समजेलच. यामुळे वादाचे काही प्रयोजनच उरत नाही.
{{gap}}मनुष्यप्राणी हा एका लहानशा डबींत भरलेल्या कमानीसारखा आहे. ही डबी लहानशी दिसली, तरी आंतील कमान मात्र अनंत आहे. ती कमान त्या डबींतून सुटण्याची खटपट करीत आहे. या खटपटीमुळेच हा सारा व्यवहार निर्माण झाला आहे. व्यवहारांत सर्वत्र दिसून येणारी अहमहमिका, दुष्टपणा आणि इतर दुर्गुण हे मात्र या खटपटीमुळे उद्भवलेले नाहीत. व्यवहारांत हरघडी प्रत्ययास येणारी दुष्कर्मे, ही या खटपटीची कार्येहि नाहीत आणि कारणेहि नाहीत. एक हिंदु आचार्य ह्मणतात:- उंच जागी असलेल्या एखाद्या तलावांतील पाणी त्याच्या खालच्या सपाटीवरील शेतास द्यावयाचे असले ह्मणजे त्या तलावांतून एक पाट शेतापर्यंत आणून सोडतात. त्या पाटाच्या मुळाशी एक दार केलेले असते. ते दार उघडल्याबरोबर पाणी जोराने त्या पाटावाटे उतरूं लागते. त्यावेळी पाटांतील सर्व धूळ आणि कचरा यांवरून ते पाणी जाऊं लागून गढूळ दिसू लागते. पण ही धूळ त्या पाण्याने निर्माण केली असें नसून पाण्यामुळे तिचे मळकट स्वरूप उघड झाले इतकेंच. त्याचप्रमाणे मनुष्यांतील ईश्वरांश<noinclude></noinclude> lc4x0e4mk3tql66ppb2j8min101eo0y