विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.2
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
पान:Paripurti.pdf/61
104
20883
229966
70488
2026-05-12T15:51:05Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229966
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>
{{larger|'''११'''}}

{{larger|'''मराठ्यांचा मठ्ठपणा'''}}
{{block right|केवढे भांडण चालले होते दोघांचे! सगळी

माणसे त्यांच्याभोवती गोळा झाली होती.

प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसत होते.

तुळशीराम आणि लाला ह्यांच्यातले भांडण होते

ते. तुळशीराम असेल जेमतेम पाच फूट उंच

अंगाने काटकुळा... वजन शंभर पौंडसुद्धा भरले

नसते; आणि लाला होता सहा फूट उंचीचा पठाण!

त्याचा लालबुंद उग्र चेहरा, बैलासारखी मान, जाड

मिलिटरी बूट व निमुळती टोपी ठेवून बांधलेला

फेटा ह्यांमुळे तर तो होता त्यापेक्षाही उंच

वाटायचा. तो नुसता खाकरला तरी आसपासची

पोरे घाबरून पळायची. त्याचे एकेक मनगट असेल

तुळशीरामाच्या मांडीएवढे जाड. “थांब, थांब,

तुझा जीवच घेतो," तुळशीराम लालाच्या अंगावर

धावला. भोवतालच्या माणसांनी तुळशीरामाला

धरून ठेवला. एवढ्यात इंजिनियर कामावर आले

व “काय गडबड आहे?" म्हणून विचारू लागले.

“कुछ नहीं मालिक, ये आदमी खाली झगडा

करता है. लवून सलाम करीत लाला म्हणाला.

तिकडून तुळशीराम शिरा ताणीत ओरडला,

"ऐकतोस काय, सायबा? शाप खोटं बोलतोय

तो. मला शिव्या दिल्यान अन् आता गोंडा}}<noinclude></noinclude>
ax0mvdsx89xyw6rvv2wrghb89y8xey1
पान:Paripurti.pdf/62
104
20884
229967
70495
2026-05-12T15:55:13Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229967
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader|७४ / परिपूर्ती}}</noinclude>घोळतो." साहेब दोघांना घेऊन हाफिसच्या खोलीत गेले व तुळशीरामाला शांत करीत झाली हकीकत त्यांनी विचारली. लाला रोजच्याप्रमाणे तयार होऊन बांधकामाच्यापुढे उभा होता. कामकरी येतायेता गर्दीत एकाचा धक्का लागून तुळशीराम ढकलला गेला व तोल सावरता-सावरता त्याचा पाय लालाच्या शेजारीच ठेवलेल्या वळकुटीवर पडला. "क्यों साला, बेवकूफ! तुम क्या अंधे हो?' लालाने गुरकावले. ते सहन न होऊन तुळशीराम लालाचा जीव घ्यायला धावत होता. "अरे तुळशीराम, काय हमरीतुमरीवर येता? जा पाहू कामाला. लाला! माझ्या माणसांना शिव्या दिलेल्या मला खपणार नाहीत." असे दोघांनाही सांगून साहेबांनी दोघांना दोन दिशांना पाठविले. तरी जाता-जाता लाला 'बेवकूफ मरगठे्ठे!" असे पुटपुटला. ते ऐकून तुळशीराम दारापर्यंत गेलेला तावातावाने परत आला व साहेबांच्यापुढे हात नाचवीत म्हणाला, "बघ, सायबा, कसा माजला आहे बैल! - थांब, त्याला दाखवलंच पाहिजे. त्याची वळकटीच फेकून देतो समुद्रात." "माझे आई! जा आता कामावर..." साहेबांनी परत सांगितले व तुळशीराम निघून गेला. त्या दिवसापासून लाला प्रत्येक कामकऱ्याला सांगायचा की, तुळशीराम माझा बिछाना दर्यात टाकणार आहे आणि हसायचा, आणि सगळीजण हसायची. पण तुळशीरामाने लक्ष दिले नाही. तो फक्त जळजळीत दृष्टीने लालाकडे पाहायचा. तुळशीरामाचे काम सर्वात उंच जागी असायचे. तो होता खारवी. दुसऱ्यांचे डोळे फिरतील इतक्या उंचीवर अरुंद फळ्यावरून तो खुशाल बेफिकीर इकडून तिकडे जायचा व आपले काम करायचा. उंच वाशावर चढून परांच्या बांधायच्या, टोकावर कप्पी बसवायची, कप्पीची दोरी सरकली तर वर चढून ती परत बसवायची: ही कामे म्हणजे त्याच्या हातचा मळ. स्वारी तशी सरळ, पण लालाची मरी तो कधी ऐकून घ्यायला नाही; आणि सर्वांना धास्ती वाटायची की, एखादे दिवशी लालाने थपड मारली तर ह्या काटकुळ्या प्राण्याचा जीव जायचा म्हणून. ज्या इमारता बांधकाम चाललेले होते तेथे वरच्या मजल्यावर तळशीराम निजायचा आणि खालच्या दाराशी लालाचा पहारा असायचा, आणि रोज त्यांच्या कटकटी चालायच्या. ह्या दोघांचे भांडण म्हणजे सायबालासुद्धा कुतूहलाचा विषय होता. ही उंदीर-सिंहाची चुरस मोठी मजेची होती. त्यालाही तुळशीराम लालाची वळकटी समुद्रात टाकणार ह्या कल्पनेने हसू आले. हे भांडण झाल्यापासून दोन-तीन दिवसांनी साहेब जो कामावर येतो तो त्याला एक<noinclude></noinclude>
r5bcu728k6nj9802q9cltx2npemz2yw
पान:Paripurti.pdf/63
104
20885
229968
70499
2026-05-12T16:27:24Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229968
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader|||परिपूर्ती / ७५}}</noinclude>अदभुत दृश्य दिसले. कामकरी नुकतेच कामावर आले होते आणि मोठे रिंगण करून उभे होते. मध्यभागी लाला रागाने अक्षरशः नाचत होता. त्याच्या तोंडून शिव्यांचा भडिमार चालला होता. तो तुळशीरामाची गठडी वळायच्या गोष्टी बोलत होता. त्याचा आधीच लाल असलेला चेहरा रागाने आता फुटणार असे वाटत होते. तो मान उंचावून आकाशात हात नाचवीत "खाली तर ये म्हणजे तुला दाखवतो" असे वारंवार म्हणत होता. साहेबाने वर पाहिले तर सगळ्यात उंच नि अरुंद परांचीवर तुळशीराम एखाद्या माकडासारखा बसला होता व निःशब्द हसत होता. साहेबाला पाहताच लाला जरा थबकला. पण पुढे होऊन सलाम करून त्याने आपले गाऱ्हाणे साहेबांना सांगितले की, ह्या तुळशीरामाने माझी वळकटी कुठे नाहीशी केली आहे, ती मला परत करवा. साहेब आलेला पाहताच तुळशीरामही माकडासारखा झरझर खाली आला. "काय रे, लालाची वळकटी तू चोरलीस काय? कुठे आहे ती?" "मी नाय चोरली बा—मी ती दर्यात फेकून दिली." तुळशीराम म्हणाला. लाला म्हणाला, "चोरून वर खोटं बोलतो आहे. माझी दुलई होती व तीत शिवलेले पैसे होते." तुळशीरामाने लांब हात केला व बोट दाखवून म्हटले, "ती बघ तिकडे मी फेकली- अजून सापडेल. जा जाऊन बघ." लाला व त्याच्याबरोबर दोघेतिघे धावतच किनाऱ्याशी गेले व साहेब तुळशीरामाला घेऊन आत गेले. सकाळी लाला उठून बाहेर गेला व ही संधी साधून तुळशीरामाने वळकटी पळवून फेकून दिली होती एवढी हकीकत जो साहेबाला कळते तेवढ्यात लाला आला. त्याचा राग कमी झाला होता- पैसे न वळकटी भिजलेली, पण काहीही चोरीस न जाता मिळाली होती. तो जरा हसतच म्हणाला, "मालिक, ये बिलकुल बेवकूफ है. रजाईमें सौ रुपिये थे वे सब वापस मिले। इसकु कुछ पैसे की बात मालूम नहीं हुई!" साहेबांनी तुळशीरामाकडे पाहिले. क्षणभर दोघांचे डोळे भिडले. दोघांच्याही चेहऱ्यावर हसू झळकले. साहेब आणि तुळशीराम दोघेही 'बेवकूफ मरगठ्ठे'- काय हसण्यासारखे झाले त्यांनाच माहीत. एवढे खरे की. त्या दिवसापासून लाला परत तुळशीरामाच्या वाटेस गेला नाही. पण ह्या मठ्ठ मराठ्याने मोठ्या युक्तीने वळकटी हस्तगत करून ती हातोहात न लांबवता समुद्रात कशी फेकली व आपले पैसे कसे परत मिळाले हे सांगताना बाकीचे मठ्ठ मराठे हसत का नाहीत हेही त्याला कधी कळले नाही.{{nop}}<noinclude></noinclude>
90luzypxluo4e4h8fq97d51opiesu7j