विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.6 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk वर्ग:स्तोत्रे 14 548 232196 204329 2026-06-12T17:43:38Z QueerEcofeminist 918 Reverted 1 edit by [[Special:Contributions/2401:4900:1F24:5E10:28CB:3CEE:E242:B371|2401:4900:1F24:5E10:28CB:3CEE:E242:B371]] ([[User talk:2401:4900:1F24:5E10:28CB:3CEE:E242:B371|talk]]): Rv([[m:User:Xiplus/TwinkleGlobal|TwinkleGlobal]]) 232196 wikitext text/x-wiki [[वर्ग:हिंदू धर्माचे साहित्य]] rz2odjvvu0f233b1md8du0brzvalytb पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१३० 104 85894 232221 182088 2026-06-13T04:59:55Z JayashreeVI 4058 232221 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|१२५}} {{rule}}</noinclude>बारमाला ताजे सनदेचा उजुर न करणे छ १५ माहे रजवु सदरहू इना- माचे खटपटे करणे येक ब्राह्मण राजेश्री साहेबी हुजुरुन दिला आहे त्याचे सनद आलाहिदा चालिलि आहे तेणे प्रमाणे त्याचे वेतन सालायाचे सालायास निवळ पाठवित जाणे प|| हुजुर {{right|माते सुद}} {{center|( ३ सप्टेंबर, सोमवार १६७७.)}} {{center|_________}} {{right|लेख नं. ५}} {{center|श्री रघुनाथ}} {{gap}}सहस्रायु चिरंजीव भैरव भटासि प्रि (ति) पूर्वक दिवाकर गोसावी आसिर्वाद * चे (ते) थेचें वर्तमान ऐकिलें तेणें करून व्याकुलता बहु ताचे जालों उपाय तो कर्तव्य आमचे हातीं ये समई कांहींच नाहीं क्लेशी मात्र जालों क्षेम जालें ऐसे वर्तमान ये * (ईल.) तेव्हां स्वस्थता वाटेल आमचे शरीर * (तो) गळीत जाले आहे परंत आल्प मात्र वेथा बारे जाली आणी आह्नासाठी येऊ म्हणाल तरी वेथा बदल होईल ऐसें न करणे पुरते बरे होउ देणे हे आसिर्वाद
{{gap}}हेच पत्री अनंत गोसावी याचा अनेक आसीर्वाद पूर्वी कैलासवासी सीवाजी राजे भोसले यासी परिधावी संवत्सरी शिंगणवाडीचे मटी श्री | हनुमंतासमोर परमार्थ झाला ते समई मंडळी होती ते स (म) ई रामचंद्र पंत अमात्य व दत्ताजी पंत वाकेनिवीस यानी सर्वास जो सांगीतला त्याचें स्मरण सर्वास देत जाणे उत्धव गोसावी यानी समर्था अज्ञेची अवज्ञा केली (ह्म) णुन कलो अलें तुझी समयी अज्ञेप्रमाणे राहटी करणे हे असिर्वाद<noinclude></noinclude> e4up58bsrl3ub70eo6ld7mskmsno758 पान:आमचा जगाचा प्रवास.pdf/१८ 104 110655 232191 2026-06-12T12:11:41Z FailedEngineer2027 6067 /* मुद्रितशोधन */ 232191 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="FailedEngineer2027" /></noinclude>'''देवाना बोटीचा सेकंड क्लास.'''
कॅबिन समुद्राच्या बाजूकडील नसून, विजेच्या पंख्याचीहि व्यवस्था होती. वरती साधारण डेकहि बरें होतें, व एक लहानशी सिटिंगरूम आणि त्याच्याशीच लागून एक पुरुषाकरितां स्मोकिंग रूम वगैरे सर्व कांहीं व्यवस्था ठीक दिसली. नंतर आह्मीं ठरविलें, कीं, आतां सेकंड क्लासमध्येंच राहून हाहि एक अनुभव घ्यावयाचा. मग परसरनें सरर्टिफिकिट लिहून दिलें, व सांगितलें, कीं, "तुमचे पैसे मुंबईस कुकच्या मार्फत मिळतील."
संध्याकाळी सात वाजतां बोटीवर जिकडेतिकडे विजेच्या दिव्यांचा चकचकाट पसरला, व हळुहळू पॅसेंजर लोक बोटीवर चढूं लागले; आणि जसजसा आठांचा सुमार होऊं लागला, तसतशी या मंडळीची फर्स्ट क्लासमध्ये व सेकंड क्लासमध्ये एकच गर्दी झाली. मुलें, नली, तान्हीं, खेळती, रांगतीं, चालती, बोलतीं अशीं एकेका जोडप्याच्या मागें आपली तीनतीन चारचार मुलांचीं लटांबरें, सर्वांच्या हातांत तऱ्हे-तऱ्हेची खेळणी, चित्रविचित्र रंगीबेरंगी टोप्या आणि अंगामध्यें नीटनेटके व सुबक असे कपडे, अशा या लहानमोठ्या मंडळींनी सेकंड क्लासचें डेक गजबजून गेले. आह्मी दोघे खुर्च्यावर बसून येणाऱ्या मंडळीची मौज पहात होतों. ही सर्व मंडळी, विशेषतः मुलेबाळें, बाया वगैरे पाहून माझ्या मनाला बरेंच समाधान झाले, व वाटलें कीं, बोटीवरील पुढील प्रवास आह्मांला आतां फारसा कंटाळवाणा वाटणार नाहीं. जरी ही मंडळी आपल्याशी फारशी मित्रत्वाने वागली नाहीं, तरी आपले डेकवर बसले ह्मणजे सहजच करमणूक होईल. या मंडळीमध्येहि एकदोन जोडपी कुरकुर करीत आली, कीं, "पहा, आह्नीं चारचार महिन्यांपूर्वी फर्स्ट क्लासच्या कॅबिनकरतां नांवें लिहिली असून, आतां अर्ध्या रस्त्यावर आह्माला सेकंड क्लासमध्ये घातलें, हा अगदीं धोका आहे!" वगैरे वगैरे त्यांची कुरकुर चालली होती. हा प्रसंग आह्मां एकट्या-वरच नाहीं, हें कळून, काय असेल तें असो, नंतर आह्मांला आमच्या विपत्ति तितक्या कष्टप्रद वाटल्या नाहींत. समदुःखी मिळाला ह्मणजे
२१<noinclude></noinclude> s2sze1rafub83sv32axxgapeeaiion3 पान:आमचा जगाचा प्रवास.pdf/१९ 104 110656 232192 2026-06-12T12:28:46Z FailedEngineer2027 6067 /* मुद्रितशोधन */ 232192 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="FailedEngineer2027" /></noinclude>'''आमचा जगाचा प्रवास.'''
मनाला थोडेंतरी समाधान वाटतें ह्मणतात, त्याचा या वेळीं आह्मांला प्रत्यय आला. नंतर प्रसिद्ध केल्याप्रमाणें देवाना बोट बरोबर रात्री १० वाजतां कोलंबो बंदरांतून निघाली.
कोलंबो बंदराची शोभा या वेळीं फारच सुंदर दिसत होती. बंदरामध्ये जिकडेतिकडे लहानमोठ्या शेंकडों बोटी दिव्यांनीं सुशोभित अशा सर्वत्र पसरल्या होत्या, व कांहीं हलक्या बोटी समुद्राच्या मंदमंद लाटांनी हेलकावे खात होत्या. जणूं काय या अलंकारमंडित लहानमोठ्या परीच नृत्य करीत आहेत, असें वाटे! बंदरकिनाऱ्यावरहि जिकडेतिकडे मोठमोठे व दूरपर्यंत प्रकाश फेंकणारे दिवे खांबाखांबावर दिसत होते. या वेळीं शुक्लपक्षाला नुक्ताच कोठें आरंभ झाला होता. अर्थातच चंद्र अगदीं बाल्यदशेत होता. तथापि त्या अनेक दिव्यांच्या प्रकाशांनीं कोलंबो बंदराची शोभा विलक्षण मनोहर दिसत होती. या वेळीं आह्मी सर्व पॅसेंजर लोक डेकवर बसून आपापल्यापरी त्या सुंदर देखाव्याची तारीफ व प्रशंसा करीत होतों. बोट बंदराच्या बाहेर निघाल्यावर वेगानें आपला पुढील मार्ग क्रमूं लागली, व बंदराचा सुंदर देखावा हळुहळू आमच्या नजरेआड झाला.
'''पिनँग.'''
आमची बोट आतां पिनँगच्या जवळजवळ आली होती, व समुद्राच्याबाजूला दूरवर लहानमोठ्या टेंकड्या दिसत होत्या. कोलंबोपासून आम्ही अरबीसमुद्र सोडून हिंदीमहासागरामध्ये शिरलों होतों. हा समुद्र पिनँगकडे कांहींसा अरुंद होत आला आहे.
तारीख ९ मार्च रोजी सकाळी आठ वाजतां बोटीनें पिनँगच्या बंदरांत नांगर टाकला. धक्क्यापासून सुमारें पावमैलाच्या अंतरावर बोट उभी होती. येथें बोट फारच थोडी म्हणजे तीनचार तासच थांबणार होती.
ब्रेक्फास्ट झाल्यावर लागलीच आह्मी बोटीवरील कांही मंडळी लाँचनें (लहान बोटीनें) पिनँग शहर पाहण्याकरितां किनाऱ्यावर गेलों, तेथें बरेचसे रिकशॉ आले, व कांहीं घोड्याच्या गाड्याहि उभ्या होत्या. दोन
२२<noinclude></noinclude> 6fl3b82tdsiz9dw9bnolmnxsxo4k6p6 अनुक्रमणिका:नीतिशास्त्र प्रबोध.pdf 106 110657 232193 2026-06-12T14:34:45Z Annni07 6055 नवीन पान "" 232193 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=[[d:Q140183500|नीतिशास्त्रप्रबोध]] |Language=mr |Volume=२१२ |Author=[[d:Q139996176|दाजी नागेश आपटे]] |Translator= |Editor= |Illustrator= |School=श्री सयाजी साहित्यमाला (बडोदा संस्थान) |Publisher=दामोदर सावळाराम अँड कंपनी |Address=क्रमांक १८०, ठाकुरद्वार रोड, मुंबई क्रमांक २, महाराष्ट्र |Year=1933 |Key=नीतिशास्त्रप्रबोध |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=C |Pages=<pagelist /> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} [[वर्ग:तत्त्वज्ञान]] [[वर्ग:नीतिशास्त्र]] j5gjez48vth8a77d9r3kh65ovpegjy2 पान:आमचा जगाचा प्रवास.pdf/२० 104 110658 232194 2026-06-12T16:18:18Z FailedEngineer2027 6067 /* मुद्रितशोधन */ 232194 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="FailedEngineer2027" /></noinclude>'''पिनँग.'''
रिकशांत बसून आह्मी शहरांत फिरण्याकरितां गेलों. रिकशॉ ओढणारे चिनी लोक होते. त्यांनां इंग्लिश, हिंदुस्तानी वगैरे कांहीं बोलतां येत नव्हते; परंतु खुणांनी सर्व कांहीं ते समजून घेत होते. गांवांतील कांहीं मोठ्या रस्त्यांनीं, बाजारपेठेतून वगैरे त्यांनी आह्मांला बरेंच झपाट्यानें फिरविलें. शहराचा थोडाबहुत भाग जो कांहीं आमच्या पाहण्यांत आला, तो बराच स्वच्छ आणि नीटनेटका दिसला. रस्ते चांगले रुंद, व दुकानें आणि घरें नीटनेटक्या तऱ्हेने बांधलेलीं अशीं दिसली. बाजारओळीमध्ये कांहीं दुकानें इंग्लिश मालाचीहि आहेत; परंतु पुष्कळशी दुकानें अनेक आकृतींच्या, विलक्षण तऱ्हेच्या रंगांच्या, सुक्या व ताज्या माशांची जिकडेतिकडे भरलेली दिसत होतीं. हें पाहून मला वाटलें कीं, या प्राण्यांकरितां हे लोक सारा समुद्र धुऊन काढतात कीं काय नकळे! ईश्वराच्या कृतीचेंहि कौतुक वाटलें कीं, ज्यानें अशा खारट समुद्रांतहि लाखों तऱ्हेचे असे प्राणी निर्माण केले आहेत, त्या परमेश्वराची धन्य आहे! येथें हेंहि एक सांगितलें पाहिजे, कीं, या दुकानांतून लहानमोठे पुष्कळ तऱ्हेचे वाळलेले बेडूकहि विक्रीकरितां ठेविलेले होते! भाजीपाल्याचीं व फळफळावळीची दुकानेंहि बरीच होतीं.
येथें पुष्कळ तऱ्हेचे लोक दिसले. मुसलमान, खोजे, गोंवेवाले, मलाई व चिनी लोकांची तर बरीच वस्ती असावी, असें दिसलें. येथें लांकडाचा चांगला व्यापार चालतो. लोखंडाच्या आणि कोळशाच्याहि मोठमोठ्या खाणी आहेत, व आसपासच्या टेंकड्यांवर मिऱ्हे, लवंगा, दालचिनी वगैरे मसाला चांगला पिकतो. पिनँग हें पृथ्वीच्या अगदी मध्यरेषेवर आहे, ह्मणून येथें दिवस व रात्री नेहमीं समसमान असतात; पाऊस बहुत- करून वर्षभर थोडथोडा पडतच असतो, त्यामुळे नेहमी जिकडेतिकडे हिरवें गार असतें; परंतु हवेमध्यें कांहींशी उष्णता असते.
आमच्या रिक्शावाल्यांची इच्छा होती, कीं, आम्हांला आणखी समुद्राच्या दुसऱ्या बाजूकडे फिरवावें; परंतु आमची बोट लवकर निघणार असल्यामुळे आम्हांला तिकडे जातां आलें नाहीं.
२३<noinclude></noinclude> jtx8h74w7v2mtm7dwfhqmf1xh5q392k अनुक्रमणिका:लंघन-चिकित्सा.pdf 106 110659 232195 2026-06-12T17:01:41Z Annni07 6055 नवीन पान "" 232195 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=लंघन-चिकित्सा |Language=mr |Volume=1st edition |Author=[[d:Q139997170|कृष्णाजी गोविंद किनरे]] |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=[[d:Q139997170|कृष्णाजी गोविंद किनरे]] |Address=('जगद्धितेच्छु' छापखाना, ५०७ शनिवार पेठ, पुणे) |Year=1920 |Key=लंघन-चिकित्सा |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=2 |Progress=C |Pages=<pagelist /> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} 9cg1ovdhe4o6hf2a6xx4iwa3yvoipc2 अनुक्रमणिका:स्त्रियांचे आरोग्य व शिशुपालन.pdf 106 110660 232197 2026-06-12T18:37:42Z Annni07 6055 नवीन पान "" 232197 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=स्त्रियांचे आरोग्य व शिशुपालन |Language=mr |Volume= |Author=[[d:Q130378335|डॉ. गणपत पांडुरंग काळोखे]] |Translator= |Editor= |Illustrator=केशवराव कुडेकर (मास्टर, आर्ट स्कूल) |School= |Publisher=डॉ. गणपत पांडुरंग काळोखे |Address=चर्नी रोड, गिरगाव, मुंबई, महाराष्ट्र |Year=1922 |Key=स्त्रियांचे आरोग्य व शिशुपालन |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=C |Pages=<pagelist /> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} 5pcyfx36ai2jycovet67fieg5jxf2do पान:साने गुरुजी व्यक्ति आणि वाड्मय.pdf/१२ 104 110661 232198 2026-06-12T19:35:25Z Shreyank Nipane 6053 /* मुद्रितशोधन */ 232198 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Shreyank Nipane" /></noinclude>{{rh||८|}} अदृश्य झाल्यामुळे निष्प्राण झालेलें साहित्य तंत्रवादाच्या आश्रयानें तजेलदार करण्याचे प्रयत्न सुरू झाले. आणि शैली ही साहित्याची कसोटी बनली. जीवनांतील सारे उच्च ध्येयवाद लोपल्यामुळे इंद्रियविलासालाच गौरविण्याचे प्रयत्न वाढू लागले. परंतु विलासाची तरी शक्यता कोठें आहे ? महाराष्ट्र आधींच दरिद्री आणि त्यांतहि साऱ्या हिंदुस्थानबरोबर साम्राज्यशाहीच्या पाशांनीं जखडून टाकलेला. यामुळे इंद्रियविलासाचीं शब्दचित्रें रंगविणें एवढेच हातीं उरलें. अशीं शब्दचित्रें काढून देणाऱ्यांना थोर कलावंत म्हणून मिरविण्याचा एक तुटका संप्रदाय तयार झाला. या संप्रदायाचें आयुष्य आतां संपलेलें दिसतें. गेल्या पंचवीस वर्षांच्या महाराष्ट्रीय चळवळीचा निष्कर्ष म्हणून आज विश्वासपूर्वक असें सांगतां येईल कीं, महाराष्ट्रांतील हें अराजक आतां संपूर्णपणें मोडलेलें आहे. महाराष्ट्रांतील अखिल जनता आतां जागृत झाली आहे. तिचें नेतृत्व करणारे खंदे वीर आतां पुढें आलेले आहेत. सांस्कृतिक विचारांचें घुसळण होऊन नव्या मूल्यांच्या स्पष्ट कल्पना निर्माण झाल्या आहेत. नवा बुद्धिवंतांचा वर्ग हळूहळू आपलें साम्राज्य स्थिर करूं लागला आहे. जीवनाची नवी निष्ठा निर्माण होऊन तिनें आपलें आसन स्थिर केलें आहे. या सर्वांचा परिपाक म्हणून साहित्यांतहि नवी निष्ठा व्यक्त होत आहे. १९३५ च्या राष्ट्रीय आठवड्यांत साने गुरुजींच्या काव्यांचा संग्रह 'पत्री' या नांवानें प्रसिद्ध झाला. त्यांतील कवितांनीं खानदेशांतील सामान्य जनतेचें हृदय हलविलें असलें, तरी महाराष्ट्रीय साहित्यिकांच्या बुद्धीला त्यांचें मुळींच आकर्षण भासलें नाहीं. त्यानंतर 'श्यामची आई', 'श्याम', 'जीवनकलह', 'विश्राम', 'सोन्या मारुति' आणि 'भारतीय संस्कृति' अशीं पुस्तकें दोन अडीच वर्षांच्या काळांत प्रसिद्ध झालीं. त्यांची 'श्यामची आई' प्रसिद्ध झाल्याबरोबर महाराष्ट्रांत जणूं एक चमत्कारच झाला. त्या पुस्तकाची महाराष्ट्रांत मोठमोठ्या साहित्यिकांनींहि मुक्तकंठानें स्तुति केली. आणि विद्यार्थि-विद्यार्थिनींना तर ह्या पुस्तकानें अक्षरशः वेड लावलें. त्या पुस्तकाच्या आतांपर्यंत आठ आवृत्त्या निघाल्या आहेत. 'भारतीय संस्कृति'च्या तीन आवृत्त्या झाल्या. आणि आतांपर्यंत त्या पुस्तकाच्या सहा हजारांवर प्रति खपल्या. 'भारतीय संस्कृति'नंतर गेल्या सात आठ वर्षांत त्यांचीं लहानमोठीं २५-३० पुस्तकें<noinclude></noinclude> fud54id9ln7kiz3danubncsslrodm62 पान:साने गुरुजी व्यक्ति आणि वाड्मय.pdf/१३ 104 110662 232199 2026-06-12T19:38:35Z Shreyank Nipane 6053 /* मुद्रितशोधन */ 232199 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Shreyank Nipane" /></noinclude>{{rh||९|}} प्रसिद्ध झालीं आहेत. आज महाराष्ट्रांत साने गुरुजींच्या साहित्याचा खप पहिल्या प्रतीचा आहे ही गोष्ट सर्वांना माहित आहे. यामुळे साने गुरुजींच्या साहित्यानें महाराष्ट्राच्या वाङ्मयीन जगांत एक नवीन युग निर्मिलें आहे, ही गोष्ट कोणासहि नाकबूल करितां येणार नाहीं. साने गुरुजींचें साहित्य त्यांच्या असामान्य व्यक्तित्वाच्या वैशिष्ट्यानें संपूर्णपणें रंगलेलें आहे. त्यांचें जीवन ज्याप्रमाणें स्वाभाविक आणि अकृत्रिम भावनेचा आविष्कार आहे, त्याचप्रमाणें त्यांच्या साहित्यांतही स्वाभाविक भावनांची अकृत्रिमता व्यक्त झालेली आहे. निसर्गाच्या आविर्भावांत जशी धडपड, झटापट आणि अबोधपूर्ण अहेतुकता आढळून येते, तशीच त्यांच्या जीवनाची आणि साहित्याची अवस्था आहे. यामुळे निसर्गाच्या जिवंतपणाबरोबरच निसर्गाचा आंधळेपणाहि त्यांत आढळतो. उद्दाम प्रेमभावना ही त्यांच्या जीवनांतील स्थायी वृत्ति असल्यामुळें जनतेच्या सुखदुःखांशीं ते विलक्षण रीतीनें एकरूप होऊन सामाजिक अन्याय आणि विषमता यांच्याशीं झुंज घेण्याला ते नेहमीं प्रवृत्त असतात. यासाठीं कोणत्याहि त्यागाला ते कमी पडणार नाहींत. तथापि सामाजिक क्रांतीसाठीं व्यवहारनिष्ठ बुद्धीनें संघटना बांधण्याचें काम त्यांचें हातून होणार नाहीं. जनतेमध्यें आपल्या शुद्ध चारित्र्यानें ते असामान्य जागृति निर्माण करूं शकतील; पण जागृत झालेल्या भावनेला दैनंदिन कार्यक्रमांत गुंतवून अखंड कार्यक्षम बनविण्याचें कार्य त्यांना साधणार नाहीं. क्रांतीसाठीं ते जनताहृदयाला विशिष्ट वेळीं आवेशानें उद्युक्त करतील; पण क्रांतीचा प्रत्यक्ष कार्यक्रम ते बांधून देऊं शकणार नाहींत. त्यासाठीं लागणारी तटस्थ वृत्ति, भावनांचा आवेग विशिष्ट वेळीं विशिष्ट मर्यादित राखण्याचा संयम, ध्येयवादाच्या सिद्धतेसाठीं अवश्य असणारा बुद्धिवाद आणि प्रत्यक्ष क्रांतिकार्यात अवश्य असणारी शिस्तीची कठोर वृत्ति या गोष्टी त्यांच्या आत्यंतिक भावशक्तीमुळें त्यांना वापरतां येत नाहींत. या गोष्टींची गरज न समजण्याइतके ते बुद्धिहीन नाहींत; पण त्यांचा स्वभावच निराळा बनलेला आहे. याची त्यांना जाणीव असल्यामुळें ते आपणाला पुढारी समजत नाहींत आणि पुढारी होण्याचा अहंकारहि त्यांच्या वृत्तींत कधीं आढळून येत नाहीं. निसर्गांतील प्रत्येक शक्तीला एक मर्यादाहि असते. तिची शक्ति हीच तिची मर्यादा<noinclude></noinclude> bei226ru80gljckmncq26001tip4syo पान:साने गुरुजी व्यक्ति आणि वाड्मय.pdf/१४ 104 110663 232200 2026-06-12T19:40:44Z Shreyank Nipane 6053 /* मुद्रितशोधन */ 232200 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Shreyank Nipane" /></noinclude>{{rh||१०|}} होते. प्रेमभावना ही एक थोर निसर्गशक्ति आहे. मानवी जीवनांत तिचें सर्वांत श्रेष्ठ स्थान आहे. प्रेमाची भावना जागृत झाल्यानंतर खऱ्या बुद्धीचे डोळे उघडतात. आणि ती प्रेमाला व्यावहारिक यशस्विता आणून देण्याच्या मार्गानें संशोधन करूं लागते. प्रेमाच्या कक्षांत चालणारी बुद्धि ही मानवाची थोर संपत्ति आहे. बुद्धिवादाच्या नांवाखालीं स्वार्थसाधनाची अखंड धडपड समाजांत सतत आढळते. पण ती या थोर संपत्तीची विकृति होय म्हणून समाजाच्या इतिहासांत या विकृत बुद्धिवादाच्या विरुद्ध प्रेमशक्तीचा गौरव करणारे अनेक जीवन-वीर निर्माण होत असलेले आढळतात. धार्मिक वाङ्मयामध्यें जिला श्रद्धा हें नांव देण्यांत आलेलें आहे ती हीच वस्तु होय. बुद्धीचा स्वभाव द्वैत निर्माण करण्याचा असल्यामुळें ती अद्वैताचा अनुभव घेण्यास नेहमींच अपुरी पडते. त्या अनुभवासाठीं बुद्धीच्या पलीकडच्या शक्तीची गरज असते. ही शक्ति माणसाला हृदयाच्याद्वारां प्रतीत होत असल्यामुळें तार्किक ज्ञानापेक्षां हृदयाची श्रद्धा श्रेष्ठ मानण्यांत आलेली आहे. सामाजिक क्रांतीसाठीं देखील या श्रद्धेचाच मुख्य उपयोग होत असतो. ही श्रद्धा जोपर्यंत जागृत झाली नाहीं, तोंपर्यंत क्रांतीचे बोबडे बुद्धिवाद व्यर्थ आहेत. अशी जिवंत श्रद्धा ज्या पुरुषाच्या जीवनांत व्यक्त होत असेल, तो पुरुष समाजांत नवयुगाचा प्रारंभ करतो. साने गुरुजींनीं महाराष्ट्राच्या सामान्य जनतेंत असें नवीन युग सुरू केल्याचें दिसत आहे. हिंदुस्थानांत महात्मा गांधींनीं अशा प्रकारच्या नव-युगाला जन्म दिला असून त्याच्या निर्मितीची सिद्धि करण्याचें कार्य काँग्रेसच्या झेंड्याखालीं अत्यंत जोमानें चाललें आहे. साने गुरुजींनीं आमच्या जीवनांत काँग्रेस हेंच परम दैवत बनविलें आहे आणि आपली सारी भावशक्ति त्या दैवताच्या पायीं वाहण्याचा संकल्प केला आहे. यामुळे त्यांच्या भाव-सामर्थ्याचा महाराष्ट्राला अपार फायदा मिळेल. महाराष्ट्रांतील थोर पुढाऱ्यांनीं साने गुरुजींच्या या प्रचंड भावशक्तीचें प्रत्यक्ष संघटनेंत परिवर्तन करून घेण्याची दक्षता बाळगिली पाहिजे. आपल्या साहित्यानें हीच गोष्ट साने गुरुजी सिद्ध करून दाखवीत आहेत. साहित्यानें जीवनाचें हृदय जागृत झालें पाहिजे. हृदयांतील आशा आणि श्रद्धा प्रफुल्लित झाल्या पाहिजेत. सत्य, साधुत्व आणि सौन्दर्य यांचें अपार आकर्षण वाटू लागलें<noinclude></noinclude> 0ua74f8bwpesyxh8vb7mxh7ikmgj92n पान:साने गुरुजी व्यक्ति आणि वाड्मय.pdf/१५ 104 110664 232201 2026-06-12T19:43:55Z Shreyank Nipane 6053 /* मुद्रितशोधन */ 232201 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Shreyank Nipane" /></noinclude>{{rh||११|}} पाहिजे. असत्याची चीड, अन्यायाचा निरोध, क्षुद्रपणाचा तिरस्कार, दैन्य आणि दारिद्र्य यांचे विरुद्ध संताप, दुष्टपणा आणि कुरूपता यांचेविषयीं क्रोध जीवनांत निर्माण व्हावयास पाहिजे. वैयक्तिक सुखलालसेपेक्षां सामाजिक विकासाच्या चळवळीचा हव्यास अधिक मोहक वाटला पाहिजे. साहित्याचें समाजजीवनांतील हेंच महनीय प्रयोजन आहे. साने गुरुजींचें साहित्य याच कळकळीनें निर्माण झालेलें आहे. त्यांत तंत्रबद्धता नसेल, जागोजाग पुनरुक्ति, पाल्हाळ, कलानिर्मितीच्या सहेतुक जाणीवेचा अभाव इत्यादि पुष्कळ दोष बुद्धिवादी टीकाकाराला सहज सांपडतील. मीं ते कधीं नाकारले नाहींत. तथापि साने गुरुजींच्या साहित्यांत हृदयाची पकड घेणारें अलौकिक सामर्थ्य आहे हें कोणालाहि नाकारतां येणार नाहीं. 'पत्री'ची प्रस्तावना लिहिण्यापूर्वी त्यांचें विपुल वाङ्मय मी हस्तलिखित रूपांत वाचलें होतें. त्यांच्या प्रत्यक्ष सहवासांत मीं बराच काळ काढला होता. त्यामुळें मला त्यांच्या जीवनाचें व साहित्याचें जें वैशिष्ट्य वाटलें, तें त्या प्रस्तावनेंत मोकळेपणानें महाराष्ट्राला निवेदन केलें होतें. आज दहा वर्षांनंतर ही प्रस्तावना लिहीत असतांना माझ्या त्यावेळच्या मतांत बदल करण्याची आवश्यकता आहे, असें मला भासत नाहीं. त्यांचें साहित्य लोकहृदयाची पकड घेईल अशी माझी पक्की खात्री होती. गेल्या दहा वर्षांच्या अनुभवानें ती गोष्ट आतां पूर्णपणें सिद्ध झाली आहे. साने गुरुजींच्या साहित्यानें महाराष्ट्राच्या विद्यार्थीवर्गांत आणि सामान्य जनतेंत जी अभिरुचीची क्रांति घडवून आणली आहे, त्याबद्दल महाराष्ट्रानें त्यांचें सदैव ऋणी राहिलें पाहिजे. साने गुरुजींच्या साहित्याचें स्वरूप साधेभोळें, भाबडें भासलें, तरी त्याच्यामध्यें हृदयाचें सौंदर्य जागोजाग ओसंडून येत असलेलें आढळतें. त्यांत कला आहे, पण ती हृदयाची स्वाभाविक कला आहे. कलेच्या जाणीवेनें बुद्धीचें चातुर्य वापरून तिला सफाई आणण्याचा कोठेंहि प्रयत्न केलेला आढळून येणार नाहीं. त्यांच्या साहित्यांत सौंदर्य आहे. पण तें हृदयाचें सहजसौंदर्य आहे. बुद्धीला दिपवून टाकणारी सौंदर्याची आतषबाजी त्यांत कोठें आढळणार नाहीं. याचें कारण तें साहित्य केवळ हृदयाच्या तळमळीनें निर्माण झालें आहे. मानवप्रेम हाच त्याचा एकमेव स्थायीभाव आहे.<noinclude></noinclude> 3d0fqktx048cxide96990uzm9p1uju9 पान:साने गुरुजी व्यक्ति आणि वाड्मय.pdf/१६ 104 110665 232202 2026-06-12T19:47:10Z Shreyank Nipane 6053 /* मुद्रितशोधन */ 232202 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Shreyank Nipane" /></noinclude>{{rh||१२|}} आजच्या यांत्रिक जगामध्यें, बुद्धिविकासाच्या या काळामध्यें, माणसांचीं हृदयें शुष्क होत चाललीं आहेत. मानवप्रेमाचा झरा आटून गेला आहे. ही अत्यंत भयानक घटना आहे. मनुष्यसमाजाला जर जगायचें असेल, तर त्याचें हृदय पुन्हां जागृत केलें पाहिजे. प्रेमाचा झरा पुन्हां उसळूं लागला पाहिजे. बुद्धीच्या कृत्रिमतेची आपली आसक्ति कमी झाल्याशिवाय हें कार्य होणार नाहीं. सानेगुरुजी बुद्धीला विसरण्यांत एक आनंद अनुभवूं शकतात, तोच आनंद त्यांचें साहित्य वाचतांनाहि वाचकाला अनुभवितां येतो. त्यांचें साहित्य वाचकांच्या बुद्धीला दिपवूं पाहत नाहीं, तर हृदयाला भुलवूं पाहतें; आणि ज्या समाजाला उद्देशून तें साहित्य निर्माण करण्यांत आलेलें आहे, तो समाजहि अजून बुद्धिवादी बनलेला नाहीं. हृदयानें हृदयांशीं बोलावें, जीवानें जिवांत मिसळून जावें, आत्म्यानें आत्म्यांत प्रवेश करावा, अशा थाटाचें तें साहित्य आहे. त्यांतील घरगुतीपणा, त्यांतील भावनांचा गोडवा, त्यांतील भाषेचें सहजत्व यांमुळें त्या साहित्याला एक अलौकिक मनोहारित्व लाभलेलें आहे. यामुळे त्या वाङ्मयाला अवीट गोडी प्राप्त झाली आहे. सहस्रावधि हृदयांचा हा अनुभव खोटा म्हणतां येईल काय ? त्या साहित्याच्या वाचनानें सहस्रावधि जीवनांत जी भावशुद्धि घडून येत आहे, तिची सामाजिक दृष्ट्या उपेक्षा करणें शक्य आहे काय ? साने गुरुजींच्या टीकाकारांनीं या गोष्टींकडे अवश्य लक्ष पुरविलें पाहिजे. साने गुरुजींचें साहित्य हा एक साहित्याचा संपूर्ण आदर्श आहे, असें मीं केव्हांहि म्हटलें नाहीं. पण त्या आदर्श साहित्याकडे त्यानें तोंड वळविलें आहे. ही गोष्ट कोणी नाकारूं शकणार नाहीं. साने गुरुजींच्या लेखन पद्धतीचें अनुकरण करून सर्वांनीं तसेंच लिहावें असेंहि माझें मत नाहीं. पण ज्या कोणाला साहित्यकार व्हावयाचें असेल, त्याच्याजवळ हृदयाचा जिवंतपणा आधीं असला पाहिजे; मानवप्रेम हृदयांत जागृत झाल्याशिवाय श्रेष्ठ साहित्य कधींहि निर्माण होणार नाहीं, असा माझा दृढ विश्वास आहे. सानेगुरुजी हे बहुजनसमाजाच्या हृदयांची पकड घेणारे आधुनिक महाराष्ट्रांतील पहिलेच साहित्यकार आहेत असें माझें मत आहे. आपल्या साहित्यांतील सर्व चळवळी सुशिक्षित लोकांपुरत्या मर्यादित राहतात. साहित्याचीं कांहीं क्षेत्रें विशेष बुद्धिवंतांपुरतीं मर्यादित राहणें अपरिहार्य असलें,<noinclude></noinclude> 2ab69ojie0uf2oq0hzsgrzcijwk9aka पान:साने गुरुजी व्यक्ति आणि वाड्मय.pdf/१८ 104 110666 232203 2026-06-12T19:50:32Z Shreyank Nipane 6053 /* मुद्रितशोधन */ 232203 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Shreyank Nipane" /></noinclude>{{rh||१४|}} नाहीं. प्रथम बैठकीला प्रि. वि. म. घुले, न्याहळोदचे कवि बा. के. पुराणिक ऊर्फ केशवतनय, डॉ. महाजन, श्री. दर्प, श्री. बाबुराव तरटे, श्री. कुसुमकांत भाटे, श्री. कांतिलाल गुजराथी, श्री. वाखारकर, श्री. नांदेडकर, श्री. पु. वि कुळकर्णी इत्यादि सभासद हजर होते व नंतर सौ. गंगूताई वैद्य, सौ. शान्तादेवी तडवी, श्री. ल. नी. छापेकर, श्री. का. प्र. पुराणिक, श्री. आर. के. कुळकर्णी, कु. घासकडबी, श्री. शिदोरे, श्री. जोग, श्री. माळी, श्री. पाठक, श्री. पटवर्धन, डॉ. भागवत व इतर असे सभासद येऊन मिळाले. यांत कांहीं लेखक त्या दिवसापर्यंत मराठी साहित्यांत प्रामुख्यानें वावरलेले होते व कांहीं तसा प्रयत्न करीत होते. हेतु हा कीं, जे प्रत्यक्ष लेखक आहेत त्यांचा परस्पर परिचय व्हावा, त्यांनीं एकत्र जमावें, आपलें लिखाण आपापसांत दाखवावें, सूचना द्याव्यात व घ्याव्यात आणि जेणें करून साहित्यनिर्मिति निर्दोष व्हावी व नवीन निर्मितीसाठीं स्फूर्ति मिळावी. ज्या हेतूनें मंदिराचे सभासद एकत्र आले, तो हेतु हळूहळू सफल होईलच. सुरवातीस डॉ. महाजनांच्या 'झुंज' या कादंबरीवर चर्चा झाली. श्री. ना. ह. आपटे यांचें 'स्वभावरेखन' या विषयावर व्याख्यान झालें. प्रो. वि. वा. आंबेकर यांचें तांबे-दिनानिमित्त व्याख्यान झालें. श्री. विनोबाजी भावे यांचें 'महात्मा गांधींचें साहित्य' या विषयावर प्रवचन झालें. हे कार्यक्रम हळूहळू होत असतांना प्रत्यक्ष वाङ्मयनिर्मिति व तीहि सहकारी तत्त्वांवर करणें हें ध्येय सदस्यांनीं दृष्टीआड केलें नाहीं. आज वाचकांच्या हातांत देण्यांत आलेलें हें पुस्तक म्हणजे त्याच तत्त्वाचें फल होय. पश्चिम खानदेशला महाराष्ट्रांत मागासलेला जिल्हा असें मानण्यांत येतें. पश्चिम खानदेश म्हटला म्हणजे भिल्लांची वस्ती अशीच जवळजवळ सर्वत्र समजूत आहे. परंतु आम्ही ह्या जिल्ह्यांतले लोक अजून बालकवि व विनायकांचीं नांवें विसरणार नाहींत. आधुनिक मराठी काव्याचा खरा पाया खानदेशांत घातला गेला, हें मराठी काव्याचा अभ्यास करणारा कोणताहि अभ्यासी मनुष्य विसरणार नाहीं. ठोंबरे-विनायकांच्या परंपरेचा आम्हांला कां बरें अभिमान वाटू नये ? येथेंच नाथ निफाडकरांचें नांव घ्यावयास पाहिजे. मराठी वाङ्मय व इतिहासविषयक संशोधनाचें फार<noinclude></noinclude> 3q8kf2piuxcrz9bgnih0mc887ud7zkk पान:साने गुरुजी व्यक्ति आणि वाड्मय.pdf/१९ 104 110667 232204 2026-06-12T19:54:22Z Shreyank Nipane 6053 /* मुद्रितशोधन */ 232204 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Shreyank Nipane" /></noinclude>{{rh||१५|}} मोठें महत्त्वाचें क्षेत्र श्रीसमर्थ वाग्देवतामंदिर व राजवाडे संशोधनमंदिर यांच्या स्वरूपांत आमच्यासमोर आहे. कार्य अफाट आहे. कार्य करणारे मात्र पुढें सरसावले पाहिजेत. आपापले नित्योद्योग सांभाळून फावल्या वेळांत हृदयाला पटणाऱ्या गोष्टी सांगून मोकळे होणें, जमल्यास दुसऱ्यास सांगणें, व शक्य झाल्यास त्यांना पुस्तकी स्वरूप देणें एवढें कार्य जरी मंदिराच्या सदस्यांनीं केलें, तरी त्यांत आम्हाला समाधान आहे. प्रस्तुत सान्यांच्या जीवन-वाङ्मयावरील पुस्तकाची कल्पना मंदिराच्या सदस्यांना अतिशय आवडली व त्यांनीं निरनिराळे विभाग पाडून त्यावर त्यांच्या मतीनें लिहावयाचा अल्पसा प्रयत्न केला आहे. सान्यांच्या जीवन-वाङ्मयावर लिहिण्याला खरोखरच अधिकारी व्यक्ति हव्यात; तसा सदर पुस्तकांतील प्रस्तावनाकार सोडून कोणालाच अधिकार नाहीं. सान्यांचें जीवन समजणें म्हणजे सोपी गोष्ट नाहीं. त्यांच्या जीवनाशीं तद्रूप झाल्याशिवाय त्यांचें खरें दर्शन कोणाला होणार ? बरें, अजून सान्यांचें कार्यक्षेत्र अधिक व्यापक होणार आहे, त्यांचा कीर्तिसूर्य अजूनहि तेजस्वी होणार आहे. असें जरी असलें, तरी वेळींच असे पुढें महान् थोर व्यक्ति होणारे, आज त्यांच्यांत ते सर्व गुण असले तरी सौजन्यानें तळपणारे साने गुरुजी व त्यांचें वाङ्मय यांबद्दल सर्वांनाच विशेष आकर्षण वाटल्यामुळें त्यांच्याच जीवन-वाङ्मयाचा अभ्यास करून या पुस्तकांतील लेख लिहिण्यांत आले आहेत. हे लेख कसे उतरले आहेत याचा न्याय मराठी वाचकवर्ग देईल. त्यांतील गुण घेऊन दोष पदरांत घेण्यांत येतील, अशी आशा आहे. मंदिराच्या सदस्यांनीं अंगीकारलेलें हें अभ्यासाचें कार्य आचार्य भागवत यांनीं उदारपणें साहाय्य केलें नसतें तर कदाचित् अपुरेंच राहिलें असतें. सर्व हस्तलिखित प्रत त्यांनीं स्वतः वाचिली व अत्यंत उपयुक्त सूचना केल्या व त्या आम्ही तंतोतंत अमलांत आणल्या. एवढेंच नव्हे, तर आम्हीं विनंति केल्यावरून आपल्या अत्यंत गडबडीच्या नित्याच्या कार्यांतील बहुमोल वेळ खर्च करून आचार्यांनी सदर पुस्तकासाठीं अत्यंत विद्वत्तापूर्ण अशी अमोलिक प्रस्तावना लिहून आमच्या या कार्यास आशीर्वाद दिला, याबद्दल कोणत्या शब्दांत त्यांचे आभार मानावेत ?<noinclude></noinclude> lwdd5anp586zpicx4qxt43ipqka8kp4 पान:साने गुरुजी व्यक्ति आणि वाड्मय.pdf/२३ 104 110668 232205 2026-06-12T19:58:26Z Shreyank Nipane 6053 /* मुद्रितशोधन */ 232205 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Shreyank Nipane" /></noinclude>{{rh||- १२ -|}} निघालेली असते, याचीं उदाहरणें कोंकणांतील गांव सोडून, देशावर येऊन आपल्या कर्तृत्वाची साक्ष देणाऱ्या कित्येक पुरुषांच्या चरित्रांवरून स्पष्ट होतात. चिपळूणकर, भांडारकर, परांजपे, टिळक, आगरकर, कर्वे, सावरकर, चापेकर प्रभृति सारे कोंकणांतीलच. साने यांचे वडील चिपळूण तालुक्यांतील वडवली या गांवचे खोत होते. गांवचा सारा वसूल करून तो सरकारांत जमा करणें व या कामाबद्दल साऱ्याच्या एक-चतुर्थांश रक्कम घेणें हें काम खोताचें असतें आणि ही खोती वंशपरंपरेनें चालत असते. बाळपणांत सान्यांच्या घरांतील संपन्नता त्यांना हवी तशी चाखावयास मिळाली नाहीं. दैवाचे फेरे फिरले आणि सान्यांना अखेर आपल्या मातापितरांबरोबर झोपडींत जाऊन राहावें लागलें. दारिद्र्याच्या झळा कशा असतात, गरिबांच्या झोपडींतील सुख कोणत्या प्रकारचें असतें, याची जाणीव त्यांना लहानपणींच झाली. त्या वेळीं भोगलेले कष्ट व यातना यांचा ठसा त्यांच्या बालमनावर जो एकदां ठसला, तो कायमचाच. लक्ष्मीनें त्यांच्याकडे पाठ फिरविली हें खरें; परंतु सरस्वतीनें मात्र त्यांची पाठ पुरविली हें तितकेंच खरें. त्यांच्या वडिलांचें नांव भाऊराव. त्यांचें शिक्षण तसें कांहीं फारसें झालेलें नव्हतें. अर्थात् त्यांची गणना विद्वानांत करतां येणार नाहीं. खोतीच्या कामावर असलेला मनुष्य विद्येची सेवा कोठें आणि किती वेळ करणार ? परंतु त्या काळीं पुराणश्रवण, संस्कृत सुभाषितें व स्तोत्रें यांचें अध्ययन सर्वसामान्य ब्राह्मण मनुष्याचें असे; थोडें लेखन, वाचन व हिशेब ठेवणें ही तर जीवनांतील आवश्यक बाब. एवढ्याच ज्ञानाचा विचार केला तर भाऊराव हे नुसते खोत नव्हते. आपल्या मुलांबाळांना आपल्याजवळ असलेलें ज्ञान शक्यतोंवर पोंहोंचतें करण्याचें हिताचें कार्य त्यांनीं चोख बजाविलें. बालमनावर होणारा पवित्र परिणाम व्हावयाचा तोच झाला. आणि संस्कृत स्तोत्रें, त्रिसुपर्ण, पुरुषसूक्त इत्यादिकांचें पठण लहान मुलांचें त्या काळीं जें होत असे, तें साने यांचेंहि झालें. बालकाचें मन बनविण्याचें कार्य पित्यापेक्षां मातेच्या हातांत जास्त असतें याची साक्ष साने यांच्या जीवनाकडे दृष्टिक्षेप टाकल्यास पटते. साने यांना वाटणारें शीलाचें महत्त्व व त्यांच्या अंगीं बाणलेली सच्छीलता, त्यांचा<noinclude></noinclude> ftulehnfwqnurseici3l5ldzhydqmcf पान:साने गुरुजी व्यक्ति आणि वाड्मय.pdf/२४ 104 110669 232206 2026-06-12T20:02:04Z Shreyank Nipane 6053 /* मुद्रितशोधन */ 232206 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Shreyank Nipane" /></noinclude>{{rh||- १३ -|}} विनम्रशील स्वभाव हे सारे गुण त्यांना त्यांच्या मातेच्या शिकवणुकींतून मिळालेले आहेत ! 'श्यामची आई' या पुस्तकांत आईचें वर्णन करून साने यांनीं आपल्या आईला कृतज्ञतापूर्वक अजरामर करून ठेवलें आहे. महाराष्ट्र साने यांना जरी भविष्यकाळांत कधीं विसरला, तरी 'श्यामची आई' हा त्यांचा ग्रंथ त्याच्या स्मरणपटलावरून कधींच पुसला जाणार नाहीं. त्यांची माता सुशिक्षित नव्हती हें खरें. संस्कृत, इंग्रजी किंवा इतर भाषांतील ग्रंथांचें वाचन करून ती पंडिता झालेली नव्हती; तर त्यांत सामावलेलें सार तिच्या स्वभावांत, आचारांत, विचारांत व उच्चारांत सूत्ररूपानें एकत्रित झालेलें असल्याकारणानें, तेंच अमृत तिनें आपल्या बालकांना पाजिलें. मुलांचें संगोपन करणें या गोष्टीस स्त्रीनें संस्कृत अगर इंग्रजी ग्रंथ वाचावयास पाहिजे असें नाहीं; तें ती ज्या वातावरणांत लहानाची मोठी झाली असेल त्यांतून तिला मिळून वाढीला लागत असतें. मुलांना चांगल्या सवयी लावणें, त्यांच्या अंगीं शौर्य, धैर्यादि सद्गुणांचें बीजारोपण करणें, त्यांना खऱ्या प्रेमाची महति शिकवणें, म्हणजेच जीवाजीवावर खरें प्रेम करावयास शिकवणें-'आत्मवत् सर्व भूतानि' या दिव्य तत्त्वाचें शिक्षण देणें कोणतीही प्रेमळ माता करीलच. साने यांच्या मातेनेंहि तेंच केलें. 'झाडामाडांवर, गाय-गो-ह्यावर प्रेम कसें करावें हें आईजवळून शिकावें' असें गुरुजी मोठ्या कळवळ्यानें नेहमीं सांगत असतात. तिची मोरी गाय ज्या दिवशीं मेली, त्या दिवशीं त्यांची आई जेवली नाहीं. फुलें विकसण्यापूर्वी त्यांच्या कळ्या तोडल्या हें पाहून आई बाल सान्यांवर रागावली होती. या व अशाच लहान सहान कृत्यांचा परिणाम सान्यांच्या शीलावर झालेला आहे. 'गाईची करुण कहाणी' या त्यांच्या करुणरसपूर्ण कवितेंत जीवाजीवावर प्रेम करण्याची त्यांची दृष्टि स्पष्टपणें दिसून येते. अंमळनेरच्या स्टेशनजवळ एका गाभण गायीवर आलेला हा दुर्धर प्राणांतिक प्रसंग होय. तो चितारतांना आगगाडीचा गदारोळ व गरीब गायीची असहाय्यता यांचें त्यांनीं ज्या तन्मयतेनें वर्णन केलें आहे त्यांत सर्व प्राण्यांबद्दल त्यांना वाटणारें असीम प्रेमच दिसून येतें. अंमळनेर छात्रालयांत आजारी पडून तेथेंच मृत्यु आलेला गोपाळ, एक साधा छात्रालयाचा गडी-ज्याला नेहमींच्या व्यवहारांत दोनचार शिव्यांचाच अहेर मिळालेला आढळावयाचा,-त्याच गोपाळ गड्यावर गुरुजींचें किती तरी प्रेम होतें !<noinclude></noinclude> s96l0bz2ek091t1c5yc7auze1swlui3 पान:साने गुरुजी व्यक्ति आणि वाड्मय.pdf/२५ 104 110670 232207 2026-06-12T20:06:58Z Shreyank Nipane 6053 /* मुद्रितशोधन */ 232207 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Shreyank Nipane" /></noinclude>{{rh||- १४ -|}} तेथील विद्यार्थ्यांना प्रेमाचे धडे गुरुजींनीं गोपाळच्या उदाहरणावरून द्यावे. छात्रालयाच्या विहिरींतून पाणी काढण्यासाठीं एक रेडा होता. अतिशय रगेल व मस्त असा तो रेडा. त्याच्यापुढें जाण्याची कोणाचीहि छाती होईना. परंतु तो रेडा गोपाळकडे कधींहि रागावून पाहत नसे; उलट त्याच्या रस्त्याकडे सारखी दृष्टि ठेवून गोपाळची वाट बघावयाचा. गुरुजींनीं त्याच्या त्या उदाहरणावरून नेहमीं म्हणावें; "अरे, मुक्या प्राण्याला देखील प्रेम करतां येतं ! मग तुम्ही-आम्हीं तर परमेश्वराचीं लाडकीं लेकरें !" सारीं मुले गोपाळकडे आपला म्हणून बघूं लागलीं. तोच गोपाळ विषमज्वरानें आजारी पडला. त्याची छात्रालयांतील जेवणाच्या वेळची अनुपस्थिति गुरुजींना जाणवूं लागली. तेंच सर्वांचें होऊं लागलें. गुरुजींनीं त्याची कल्पनातीत सेवा केली. परमेश्वराची इच्छा निराळीच होती. यश आलें नाहीं. गोपाळ गेला. अद्याप गुरुजींनीं केलेल्या गोपाळच्या सेवेची छात्रालयांतील त्या काळीं असलेल्या विद्यार्थ्यांना आठवण होते. हें सारें कशामुळें ? तर लहानपणींच त्यांच्या आईनें त्यांचें जें शील बनविलें, त्यामुळेच नव्हे काय ? साने कोंकणांत ज्या गांवीं राहत होते, तेथें इंग्रजी शिक्षणाची सोय नसल्यानें त्यांना आपल्या मामांकडे राहणें भाग पडलें. लहानपणापासूनच त्यांना शिक्षणासाठीं नाना प्रकारचे हाल सोसावे लागले. कित्येक ठिकाणाहून तरी त्रास असह्य होऊन पळून जावें लागलें. अशीं स्थित्यंतरें त्यांना कैक गांवांहून करावी लागलीं. त्यांत त्यांना कधीं माधुकरीवर, कधीं एकवेळच्याच जेवणावर तर कधीं कधीं उपासतापासावरहि राहून विद्यार्जन करावें लागलें. कधीं पालघरला तर कधीं पुण्याला, कधीं मुंबईला तर कधीं औंधला तर कांहीं वर्षे दापोलीला, जेथें जमेल तेथें, जेथें सोय लागेल तेथें, याप्रमाणें त्यांचें इंग्रजी शिक्षण पुरें झालें आहे. ते स्वतः अत्यंत भावनाशील असल्यानें त्यांना दरघडी सहन कराव्या लागणाऱ्या मानापमानाच्या प्रसंगांमुळें अधिकच दुःख होई आणि याच कारणामुळें ते अत्यंत हळव्या मनाचे झाले आहेत. दुसऱ्याला दुःखांत पाहून त्यांना दुःख होतें, ते त्याच्या दुःखांत समरस होतात व त्याचें दुःख तें स्वतःचेंच दुःख समजून कष्टी होतात. आतां, ही अतिरेकी भावनावशता आहे असें म्हटलें तरी चालेल. ती वाङ्मयांत कदाचित् दोषास्पद ठरूं शकेल, परंतु मुळांत टीकास्पद नव्हे. त्यांचा पिंडच तसा<noinclude></noinclude> jy3fwdfjc59r1cghy9e84ixtb5b27is पान:साने गुरुजी व्यक्ति आणि वाड्मय.pdf/२६ 104 110671 232208 2026-06-12T20:10:20Z Shreyank Nipane 6053 /* मुद्रितशोधन */ 232208 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Shreyank Nipane" /></noinclude>{{rh||- १५ -|}} बनला आहे. त्यांना बालपणांतच आलेल्या नानाविध अनुभवांमुळें तो तसा झाला आहे. त्यांचें मन व त्यांची बुद्धि बऱ्याचशा बऱ्यावाईट प्रसंगांनीं विकसित होत आलेली आहे. लहानपणापासूनच सान्यांच्या भोंवतीं त्यांच्या मित्रांचा मेळावा फार. आपल्या मनामध्यें उत्पन्न झालेल्या प्रक्षुब्ध व धारदार भावनांचें व्यक्तीकरण ते आपल्या मित्रांशीं करीत. वेद व पुराणांतील गोष्टी सांगत. आईची महति सांगत व उच्च गुणांचें गान करीत. त्यामुळें त्यांच्या मित्रपरिवारांत त्यांच्याबद्दल नेहमींच एक प्रकारचें आकर्षण वाटत असे. ज्ञान मिळवावयाची त्यांची पद्धतहि मोठ्या हव्यासाची. केवळ विद्येच्या हव्यासानें वाचन, मनन व लेखन करणारे विद्यार्थी विरळा. सान्यांना लहानपणापासूनच विद्येचा हव्यास फार. ते तिला धन मानीत व तिची पूजा करीत. अभ्यासाव्यतिरिक्त सुद्धां ते पुस्तकें विकत घेऊन वाचीत व तीं आत्मसात् करीत. लहानपणींच व्हाईटमनच्या Leaves of Grass या काव्यग्रंथाच्या नांवाचा 'तृणपर्णे' असा अनुवाद करून, पुढेंमागें जर आपलें एखादें कवितेचें पुस्तक प्रसिद्ध झालें, तर त्याला तेंच नांव द्यावयाचें असें त्यांनीं ठरविलें होतें. त्यांनीं मोठेपणीं ज्या ज्या महान् ग्रंथांचे अनुवाद केले, किंवा ज्या थोर व्यक्तींचीं चरित्रें चितारलीं, किंवा अनुवादलीं, त्याची सारी पूर्वतयारी त्यांनीं आपल्या विद्यार्थीदशेंतच पूर्णपणें करून ठेविली होती हें विशेष लक्षांत ठेवण्यासारखें आहे. ज्ञानाचें संकलन करून आपली ज्ञानपिपासा भागविण्याची आवड त्यांना लहानपणापासूनच लागलेली होती. स्वतः साने म्हणजे त्यांच्या लहानपणींच्या ध्येयाचें मूर्तिमंत स्वरूपच होतें. त्यांनीं आपल्या विद्यालयीन अध्ययनांतहि अवांतर वाचनाचा त्याग केला नाहीं, तर आपल्यांत असलेल्या ज्ञानाची कसोटी परीक्षांवरच न लावतां ती व्यवहारांतील निरनिराळ्या आवश्यक ज्ञानाच्या निकषांवर घासली. बी. ए. च्या परीक्षेंत त्यांनीं उच्चांक मिळविला आणि तोहि इतिहास व अर्थशास्त्रासारख्या विषयांत. घरचा कोणत्याहि प्रकारचा आधार नाहीं, आणि मित्रांच्या व हितचिंतकांच्या केवळ सदिच्छेवरहि ज्या वेळीं भागत नाहीं अशा कटुतर परिस्थितींत त्यांनीं आपला एम. ए. पर्यंतचा अभ्यासक्रम कोणकोणत्या अडचणींना तोंड देऊन पुरा केला असेल, याची कल्पनाच केलेली बरी.<noinclude></noinclude> nmnftop5941dbfxf2ei6deuk0hritdz पान:साने गुरुजी व्यक्ति आणि वाड्मय.pdf/२७ 104 110672 232209 2026-06-12T20:12:48Z Shreyank Nipane 6053 /* मुद्रितशोधन */ 232209 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Shreyank Nipane" /></noinclude>{{rh||- १६ -|}} एम्. ए. झाल्यानंतर अमळनेरच्या 'तत्त्वज्ञान मंदिरां'त ते प्रविष्ट झाले. गरीब, हुशार व अभ्यासू विद्यार्थ्यांची परिस्थितीच्या अडचणीमुळें कुचंबणा होऊं नये व त्यांच्यांत असलेल्या सुप्त शक्ति जागृत होऊन त्या नवीन नवीन संशोधन करावयास व ज्ञानाच्या प्रत्येक विभागावर प्रकाश पाडावयास समर्थ व्हाव्यात म्हणून अमळनेर येथील श्रीमंत दानशूर प्रतापशेटजी यांनीं तत्त्वज्ञान-मंदिराची स्थापना केली. ज्यांच्या विकसित ज्ञानामुळें नवा प्रकाश मिळावा असे कित्येक अभ्यासू विद्यार्थी परिस्थितीच्या गदारोळांत रगडले जाऊन जगरहाटीनुसार सामान्य जीवन जगत असतात. त्यांच्याजवळ असलेल्या मानसिक शक्तीचा राष्ट्राला नवा प्रकाश देण्यास उपयोग होत नाहीं. याकरितां अभ्यासू विद्यार्थ्याला अध्ययनाची सर्व व्यवस्था करून देणें, मानसिक भुकेबरोबरच त्याच्या पोटपूजेची काळजी घेणें, व नवीन संशोधनकार्यांत त्याला अनुरूप चालना देऊन मार्गदर्शन करणें, इत्यादि सारी सोय या तत्त्वज्ञान मंदिरांत अतिशय उदारतेनें करण्यांत आली आहे. अशा ज्ञानसत्राकडे सान्यांसारखे चिकित्सक बुद्धीचे जिज्ञासू व कष्टाळू विद्यार्थी आकर्षिले गेले नाहींत, तरच नवल. आपल्या ठिकाणीं असलेल्या निरलस अभ्यासू वृत्तीमुळें, निरभिमानी स्वभावानें व चिकाटीनें साने लवकरच तेथील साऱ्या वातावरणांत एक आकर्षण-केंद्र होऊन बसले. अशा प्रकारचा कष्टाळू विद्वान आपल्या संस्थेंत असल्यास संस्थेस तो भूषणभूतच होईल या भावनेनें अमळनेरच्या प्रताप हायस्कुलांतील संचालक साहजिकपणेंच साने यांच्याकडे पाहूं लागले. अमळनेरचें 'प्रताप हायस्कूल' म्हणजे खानदेशचें त्यावेळचें 'न्यू इंग्लिश स्कूलच.' ज्या उदात्त भावनेनें व स्वार्थत्यागानें टिळक, आगरकर व चिपळूणकर यांनीं पुण्याला 'न्यू इंग्लिश स्कूल' स्थापिलें व महाराष्ट्रांत शिक्षण क्षेत्रांतील एक नवा इतिहास निर्माण केला, त्याचप्रमाणें जांभेकर, गोखले व गुणे या त्रयींनीं खानदेशांत अमळनेर येथें 'खान्देश एज्युकेशन सोसायटी' चें हायस्कूल स्थापून तोच पायंडा पाडला. पुण्याला फर्ग्युसन कॉलेज निघालें, तसेंच अमळनेर येथेंहि 'राष्ट्रीय विद्यालय' स्थापावयाचा प्रयत्न झाला; परंतु त्यावेळच्या राजकीय परिस्थितींत त्या विद्यालयाला बळी पडावें लागलें.<noinclude></noinclude> gt8k27wc8u2htjxczs52r51vwv4wom9 पान:साने गुरुजी व्यक्ति आणि वाड्मय.pdf/२८ 104 110673 232210 2026-06-12T20:15:13Z Shreyank Nipane 6053 /* मुद्रितशोधन */ 232210 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Shreyank Nipane" /></noinclude>{{rh||- १७ -|}} ह्या संस्थेंत जमलेली सारी शिक्षकमंडळी आपापल्या ज्ञानांत निष्णात, अध्यापनाची जन्मजात गोडी असलेली, निःस्पृह व भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून देण्याची इच्छा मनांत असलेली व शिक्षणद्वारां तशी नवी पिढी निर्माण करावयाची मनीषा असलेली अशी होती. राष्ट्राभिमान त्यांच्या रोमरोमांत भिनला होता, व त्याचेंच रोपटें नव्या पिढीच्या मानसक्षेत्रांत रोवून आपल्या अभ्यासू वृत्तीचें, निःस्पृहतेचें, त्यागाचें व बुद्धीचें खतपाणी घालून, त्याला वाढीला लावून, त्याचा परिपोष करावयाचा हेंच त्यांचें जीवितध्येय ठरलें होतें. गणपतराव जांभेकर या मंडळीचे मूळ सूत्रचालक. विविध शाखांतील ज्ञानी माणसांची त्यांनीं संस्थेला जोड दिली, आणि सद्गुणी, बुद्धिमान व विद्वान मंडळी तर हां हां म्हणतां एकत्र जमविली. निरनिराळ्या विषयांवरील ग्रंथांचा संग्रह केला व तडफदार, तेजस्वी व उत्साही शिक्षकांवर विश्वास टाकला. त्यांच्यावर जबाबदारीचीं कामें सोंपवून त्यांचें सहकार्य मिळविलें. याचें मुख्य उदाहरण म्हटलें म्हणजे श्री. जांभेकर यांनीं हायस्कूलचें मुख्याध्यापकत्व श्री. गोखले, एम्. ए. बी. एस् सी. यांचेकडे सोंपविलें. श्री. ज. गो. गोखले यांची कामाची तडफ अजब व टापटीपहि विलक्षण. त्यांनीं आपलें सारें आयुष्य शाळेच्या सर्वस्वास अर्पण केलें. ज्या गोखल्यांचा विचार म्हणजे स्वातंत्र्य, आचार म्हणजे सत्यासाठीं जरूर असलेल्या सर्वस्वाचा त्याग व उच्चार म्हणजे राष्ट्रप्रेम व स्वातंत्र्याचें गायन, ज्यांच्या साऱ्या जीवनाचा दृष्टिकोन म्हणजे राष्ट्र व त्याचें पुनरुज्जीवन, मग तेथें साहित्य असो, संगीत असो, नृत्य असो, स्थापत्य असो किंवा अन्य कांहींहि असो, त्यांना ज्या गोष्टीचा निरंतर ध्यास होता, ज्या गोष्टीमुळें समाजाचें जीवन सुखावह होणार होतें त्याचा, म्हणजेच राष्ट्रीय स्वातंत्र्याचाच ते अहर्निश विचार करीत. कोणताहि कलाविलास राष्ट्रीय स्वातंत्र्य जवळ आणीत आहे कीं नाहीं याचा ते प्रथम विचार करीत. तो देशास पुढें नेत आहे का अगतिक अशा निराशारूपी गर्तेत लोटून देत असून एक प्रकारचें बेजबाबदार शैथिल्य आणीत आहे याचा ते छडा घेत. साने यांना जें प्रत्यंतर आलें व ज्या प्रत्यंतरामुळें सान्यांच्या वाङ्मयीन जीवनाला नवीन वळण लागलें, तें श्री. साने यांनींच सांगितलेल्या आठवणींवरून पाहणें अत्यंत आवश्यक ठरतें. ७ सप्टेंबर १९४५ रोजीं त्यांच्या धुळें येथील दौऱ्यांत 'शारदा मंदिरा'नें त्यांच्या केलेल्या सत्कार समारंभाच्या<noinclude></noinclude> npg18rgdxzjtli2e8ijsxjf5zdg07q4 पान:साने गुरुजी व्यक्ति आणि वाड्मय.pdf/२९ 104 110674 232211 2026-06-12T20:18:22Z Shreyank Nipane 6053 /* मुद्रितशोधन */ 232211 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Shreyank Nipane" /></noinclude>{{rh||- १८ -|}} वेळीं केलेल्या भाषणांत कै. गोखलेगुरुजी यांचा त्यांनीं जो सन्मानपूर्वक उल्लेख केला, त्यावरून गोखल्यांपासून सान्यांनीं जो वाङ्मयीन संदेश मिळविला तो त्यांनीं आचरणांत आणला आहे. -सान्यांनीं लिहिलेलें पहिलेंवहिलें 'नामदार गोखल्यांचें चरित्र'. कोणाला वाटत नाहीं आपलें कौतुक व्हावें म्हणून ? पहिल्या पुत्ररत्नाचा होणार नाहीं इतका आनंद नवशिक्या लेखकाला आपल्या पहिल्या वाङ्मयापत्याचा होत असतो. त्याचें कोडकौतुक व्हावें, सान्यांनीं त्यावर स्तुतिसुमनें उधळावींत, निदान कांहीं न केलें तरी सहानुभूति दाखवून आपल्याला पुढील वाङ्मयनिर्मितींत प्रोत्साहन द्यावें, असें प्रत्येक लेखकाला वाटतें. सान्यांनाहि तसेंच वाटलें. खरोखरच, त्यांनीं परिश्रमपूर्वक अभ्यासून व विशिष्ट धाटणी नटवून लिहिलेलें असें तें चरित्र होतें. त्याचा विषय सुद्धां अत्यंत अनुरूप असाच घेतलेला. स्वतः सान्यांचें तरी तात्पुरतें समाधान झालेलें होतें. आपलें मोठ्या माणसांनीं कौतुक करावें असें सान्यांना वाटत होतें आणि म्हणूनच त्यांनीं गोखलेगुरुजींना आपलें पहिलें पुस्तक दाखविलें. साने गोखलेगुरुजींकडे आशेनें पाहत होते. परंतु जीवनधारा देणाऱ्या जलदाकडे आशाळभूतपणें पाहणाऱ्या शेतकऱ्यावर आकाशांतून जीवनाऐवजीं वीज कोसळलेली पाहण्याचा योग यावा-चंदनाच्या वनांत सुवास लुटण्याला जाणाऱ्याला जिकडे तिकडे विषारी नागांचे फुत्कार ऐकूं यावेत, केवड्यासाठीं पुढें केलेल्या हातांत बचनाग यावा, तद्वत् सान्यांच्या आशांना जबरदस्त धक्का बसला ! गोखले यांनीं पुस्तक पुरें तर बघितलेंच नाहीं, परंतु आंतील व बाहेरील मजकुराकडेहि त्यांनीं लक्ष दिलें नाहीं. पुस्तक हातांत घेतलें न घेतलें तोंच पलीकडच्या कोपऱ्यांत तें पुस्तक फेंकीत गोखले सान्यांना म्हणाले, “ह्याच्यावर दोनदां चहा होईल. पुस्तकाचीं पानं पुष्कळ आहेत. जाळून टाका त्या पुस्तकांना. पुस्तकं लिहिण्याची आतांशा एक साथच निघाली आहे. जो उठतो तो पुस्तक लिहितो. जरा आजूबाजूला बघा. आपल्या छात्रालयांत जा. तेथील घाण आवरा. मुलांना स्वच्छतेचे धडे द्या. त्यांना आपण कोण आहोंत हें समजावून सांगा. त्यांना आपलं चरित्र बनवूं द्या. ही स्वच्छता आधीं करा-” साने सारें मुकाट्यानें ऐकत बसले. त्यांना त्या वेळीं एक नवीनच दृष्टि मिळाली. सान्यांनीं एव्हांपासूनच मुलांच्या खोल्यांतून, विद्यार्थ्यांच्या जीवनांतून क्रांति घडविण्याचा, त्यांचीं मनें व<noinclude></noinclude> owfd5n01zj6d7x7ctk29waipn6hn0yj पान:साने गुरुजी व्यक्ति आणि वाड्मय.pdf/३० 104 110675 232212 2026-06-12T20:21:24Z Shreyank Nipane 6053 /* मुद्रितशोधन */ 232212 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Shreyank Nipane" /></noinclude>{{rh||- १९ -|}} वृत्ति एका विशिष्ट साच्यांतून घडविण्याचा उपक्रम सुरू केला. कै. गोखले गुरुजींपासून अशाच एका दुसऱ्या प्रसंगीं आश्चर्याचा धक्का बसला आणि सान्यांच्या मुखांतून सहज बाहेर पडले, “केवढीं मोठीं माणसें हीं !” तो प्रसंग असा. साने या वेळीं हायस्कूलांत व विद्यार्थीजीवनांत अतिशय समरस झालेले होते. 'विद्यार्थी' पत्रक दररोज नियमितपणें प्रसिद्ध होत असे. त्यांतील एकूण एक ओळींवर व शब्दावर नजर गेली नाहीं असा विद्यार्थी विरळा. सायंकाळीं विद्यार्थी सानेगुरुजींकडे कांहीं तरी नावीन्याचा लाभ घेण्याकरितां जमत असत. अंमळनेरच्या एका छात्रालयाच्या विभागाला 'अंदमान' असें नांव आहे. त्याचें आपल्या अमृततुल्य वाणीनें आणि सालस व प्रेमळ राहणीनें साने यांनीं 'आनंदभुवन' बनविलें होतें. साने शाळेंत व विद्यार्थ्यांत इतके प्रिय झालेले पाहिल्यावर गोखल्यांना साहजिकच आनंदानें भरतें येई. शाळेच्या इतर भागांवरील करडी नजर यत्किंचितहि ढळूं न देणारे व अव्याहत चांगला व धीराचा सल्ला देणारे व मार्ग दाखविणारे हरिभाऊ मोहोनी हे होतेच. गोखल्यांना तर समाज-व्यवहारांत नेहमीं होणाऱ्या अन्याय, अनीति वगैरे गोष्टींचा मनस्वी संताप येई. विशेषतः प्राथमिक शिक्षकांच्या बाबतींत तर त्यांचें मन अतिशयच हळुवार झालेलें होतें. प्राथमिक शिक्षकांची दैना त्यांच्यानें बघवेना. त्यांच्यासाठीं, निदान एक शिक्षक या नात्यानें, कांहीं तरी करावें व हल्लीं समाजांतील शिक्षकांच्या असलेल्या दुर्दशेला वाचा फोडून त्यांना वरचें स्थान प्राप्त करून द्यावें, असें गोखल्यांना वाटत असे. साने व मोहोनी या दोन खंद्या वीरांनीं शाळेचा भार चोखपणें उचलल्यावर गोखल्यांना बाहेरील वातावरणांत वावरण्यास पूर्ण वाव मिळाला. ते नुकतेच अंमळनेरच्या म्युनिसिपल स्कूलबोर्डांत निवडून आले होते. त्यांना पूर्व-खान्देशांतील प्राथमिक शिक्षकांच्या दृष्टीनें जिल्हा लोकलबोर्डांत काम करावयाचें होतें. जिल्हाबोर्डाच्या निवडणुकीची वेळ आली. गोखले उभे राहिले होते. स्वतः त्यांचा प्रयत्न जोरांत चालू होता. त्यांना होणारे कष्ट सान्यांना बघवत ना. त्यांनीं गोखल्यांना मदत करण्याचें ठरविलें. पण मदत ती कशी करणार ? त्यांनीं विद्यार्थ्यांना एकत्र आणलें. आपण 'विद्यार्थी' पत्रकांत गोखल्यांच्या कार्याचा उल्लेख करून निवडणूकप्रचाराला चालना दिली. प्रत्येक विद्यार्थ्याला गोखलेगुरुजी निवडून यावेत असें वाटे. सान्यांनीं<noinclude></noinclude> 5cfl0mae7d7f5okz4emrsla5r8m9okr पान:साने गुरुजी व्यक्ति आणि वाड्मय.pdf/३१ 104 110676 232213 2026-06-12T20:24:22Z Shreyank Nipane 6053 /* मुद्रितशोधन */ 232213 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Shreyank Nipane" /></noinclude>{{rh||- २० -|}} विद्यार्थ्यांना युक्ति सांगितली. प्रत्येकानें आपल्या घरीं, नातेवाईकांना, ओळखीपाळखीच्या लोकांना पत्रें पाठविलीं. गोखले गुरुजींना मतें देण्याची विनंति केली. झालें. निवडणूक झाली. निकाल व्हायचा होता. त्या दिवशीं गोखले गांवाला गेले होते. गोखले निवडून आल्याची तार आली. हरिभाऊंनीं तार वाचली. सान्यांना दाखविली. सान्यांना आनंद झाला. गोखले रात्रीं दहाच्या गाडीनें येणार होते. त्यांचें स्वागत कसें करावें या विचारांत साने आणि त्यांचा शिष्यवर्ग होता. सर्वांनीं स्टेशनवर जाण्याचें ठरविलें. सुताचे हार घालण्याचें ठरलें. गाडीची वेळ झाली. सगळे स्टेशनवर गोखल्यांचें स्वागत करावयास निघाले. गाडी आली. सर्वांना आनंद झाला-पण, पण गोखले कोठें होते ? सारी गाडी तपासली. शेवटीं वेळ संपली. गाडी गेली. फलाटावर आलेले लोकच तेवढे राहिले. गोखले भेटले नाहींत. सर्वांची निराशा झाली. सारे छात्रालयाकडे परत फिरले. इतक्यांत हरिभाऊ मोहोनी व गोखले गोष्टी करीत बसल्याचें दिसलें. गोखले गाडींतून उतरले ते मागच्या बाजूनें. त्यांना हा सत्कार, हें प्रदर्शन व ही प्रसिद्धि नको होती. मनांतून साने अत्यंत लाजले. काय बोलावें समजेना. गोखल्यांनीं त्यांचे आभार मानले, कृतज्ञता दर्शविली, सारें ठीक झालें. परंतु सान्यांना साऱ्या रात्रभर चैन पडली नाहीं. तोंडांतून शब्द निघत, "केवढीं मोठीं माणसें हीं ?" त्यांना सत्कार नको, त्यांना प्रसिद्धि नको. चंदन कोठें सांगावयाला जातो, मला वास येतो म्हणून ? विषारी नागही त्याला विळखा घालून बसतो, त्याच्याशीं गाढ मैत्री करतो ना ? आपण नको का तसेंच करावयाला ? गोखल्यांनीं तसेंच नाहीं का केलें ? खरोखर प्रसिद्धि हवी कशाकरतां ? आपलें कार्य हीच प्रसिद्धि. स्वतःचें समाधान व जनसेवा हाच खरा धर्म. कोणी जाहीर करो न करो. प्रसिद्धिविमुखता हा महान् गुण त्यांनीं बहुतेक गोखल्यांच्या ह्या उदाहरणावरूनच उचलला. त्यांच्या व्याख्यानाचा सारांश प्रसिद्ध करण्यासाठीं 'शारदा मंदिरा'नें ता. ७ सप्टेंबर १९४५ रोजीं परवानगी मागितली तेव्हां त्यांनीं उत्तर केलें, "कशाला प्रसिद्धि देतां ? शक्यतोंवर प्रसिद्धि, उत्तरें व टीका हीं नकोतच. कालापव्यय होतो. त्यापेक्षां काय करावयाचें तें प्रथम करा." 'लोकशिक्षण'कार जांभेकर व लोणावळ्याच्या कैवल्यधामाचे श्री. गुणे<noinclude></noinclude> 1wokyaidibk6j5wh5i0ekf21yyjdpt7 पान:साने गुरुजी व्यक्ति आणि वाड्मय.pdf/३२ 104 110677 232214 2026-06-12T20:28:21Z Shreyank Nipane 6053 /* मुद्रितशोधन */ 232214 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Shreyank Nipane" /></noinclude>{{rh||- २१ -|}} ऊर्फ कुवलयानंद हेहि अंमळनेर हायस्कूलच्या संस्थापकांत होते व गोखले व मोहोनी यांचे सहाध्यापक होते. ही गोष्ट लक्षांत घेतां अंमळनेरला जमलेली ही मंडळी कोणत्या एका राष्ट्रीय ध्येयानें प्रेरित झालेली होती व त्यांनीं उभय खानदेशांत कोणत्या राष्ट्रीय कार्याचा पाया घातला, हें लक्षांत आल्याशिवाय राहणार नाहीं. त्यांतच साने येऊन मिळाले. ठेंगणीशी मूर्ति, साधा पोषाख, लाजाळू स्वभाव, पराकोटीचा नम्रपणा धारण करणारा शिक्षक, चोरट्या पावलांनीं भिंतीच्या बाजूनें जाऊन, हळूच येऊन खुर्चीच्या पाठीला न टेकतां, हातावर न रेलतां, वर्गांत जर येऊन बसला, तर आजकालचीं चोखंदळ पोरें त्याची कितपत मुर्वत ठेवणार ! सुरुवातीस सान्यांना असाच अनुभव आला. सहकारी मित्रांनीं व त्यांच्या विद्यार्थ्यांनीं त्यांच्या ह्या साधेपणाची चर्चा आरंभिली. त्यांतील कांहीं प्रवाद सान्यांच्या कानावर येत नसत असें नव्हे. परंतु गरुडाच्या झेपेची कल्पना त्याच्या उड्डाणांतच दिसून येते. त्याला जवळून पाहणाऱ्यास कसला आनंद ? त्याकरितां त्याची भरारीच पाहिली पाहिजे. कावळ्यांत वाढलेल्या कोकिळेचें गान-सामर्थ्य तिच्या रंगावरून अगर वेशावरून कसें समजणार ? वसंतागमानंतर त्याकरितां तिचें मधुर संगीतच ऐकलें पाहिजे. स्वतः मुख्याध्यापकांनाहि साने कितपत यशस्वी शिक्षक होतील याबद्दल मोठी शंकाच होती. परंतु त्यांचें सामर्थ्य सर्वांना थोड्याच अवधींत कळून आलें. त्यांच्या विशाल हृदयाची साक्ष त्यांना त्यांच्या वाणींतून व प्रेमळ मनोवृत्तींतूनच पटली ! त्यांचें कर्तृत्व त्यांच्या मुख्याध्यापकांना त्यांच्या कार्यातून प्रतीत झालें. हां हां म्हणतां त्यांच्या वाक्सामर्थ्याची मोहिनी त्यांच्या विद्यार्थ्यांवर पडून ते विद्यार्थ्यांचे झाले. चर्चा, वादविवाद यांची रंगत त्यांच्या खोलीवर झडूं लागली. स्वतः छात्रालयाच्या ओटीवर, तर कधीं जिन्याखालच्या टीचभर खोलींत राहून ज्या सान्यांनीं 'अंदमान'चें 'आनंदभुवन' बनविलें त्यांच्या गोड गोष्टींचे फवारे मुलांचा आनंद द्विगुणित करूं लागले. मुलांना त्यांच्यावांचून व त्यांना मुलांवांचून करमेनासें झालें. त्यांच्या खोलींत मुलांचे कधीं पांच पांच तर कधीं दहा दहा असे फड पडूं लागले. स्वतः साने हे सारखे बोलत न राहतां विद्यार्थ्यांनाहि ते बोलावयास वाव देत व त्यामुळे तेथें एक प्रकारचें खेळकर वातावरण पसरे व सर्वत्र प्रसन्नता राज्य करी.<noinclude></noinclude> hjlokhdimzya9zqadkzpca1uh0pzdhd पान:साने गुरुजी व्यक्ति आणि वाड्मय.pdf/३३ 104 110678 232215 2026-06-12T20:30:40Z Shreyank Nipane 6053 /* मुद्रितशोधन */ 232215 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Shreyank Nipane" /></noinclude>{{rh||- २२ -|}} एवढें असूनहि वर्गांत मुलांकडून अभ्यास करवून घेण्यांत कधींहि ते कसूर करीत नसत. ठराविक अभ्यासक्रम तर पुरा झालाच पाहिजे हा त्यांचा कटाक्ष; परंतु त्याव्यतिरिक्त नाना विषयांबाबत मुलांना ज्ञान देऊन त्यांचें जीवन समृद्ध कसें होईल याची त्यांना अहर्निश चिंता असे, आणि त्याकरतां ते मुलांना मधून मधून उपयुक्त पुस्तकें वाचावयास सांगत. तीं त्यांना उपलब्ध करून देत. मोठमोठ्या पुस्तकांतील ज्ञान स्वतः उपलब्ध करून घेणें सर्वच मुलांना केव्हांहि शक्य नसतें, तेव्हां नाना विषयांवरील महान् ग्रंथांत सांठवून ठेवलेल्या ज्ञानगंगेतील अमृत मुलांना हवें तेवढें पुरविण्याचें कार्य त्यांनीं स्वतःकडे घेतलें. दररोजचीं सारीं वर्तमानपत्रें येत. त्यांतील साराच उपयुक्त मजकूर मुलांना वाचणें अशक्य, तेव्हां तो ते स्वतः वाचीत व कडेला तांबड्या शाईनें खुणा करून ठेवीत. अर्थात् तेवढाच मजकूर विद्यार्थ्यांना वाचणें सोपें जाई. एवढेंहि करून साने थांबले नाहींत. निरनिराळ्या ठिकाणीं पसरलेल्या ज्ञानाचे घांस स्वतः दर्शवून ते विद्यार्थ्यांनीं टिपून घेण्यापेक्षां आपण होऊनच त्यांनीं त्यांच्यापुढें एका हस्तलिखित दैनिकाच्या सहाय्यानें ठेवण्याचें ठरविलें. त्या दैनिकांत सान्यांच्या हस्ताक्षरांत अग्रलेख, स्फुट सूचना, वर्तमानसार वगैरे सर्व कांहीं असे. हें झालें दररोजच्या जागृतीचें कार्य; त्याशिवाय राजकीय किंवा सामाजिक उत्सव आले कीं सान्यांच्या व विद्यार्थ्यांच्या कार्यशक्तीला बहर येई. त्यांचा उत्साह ओसंडे. हें सारें चैतन्य कोणी ओतलें ? सूटबूट घालून व गळ्याला 'टाय' बांधून बुटांचे कर्र कर्र आवाज करीत वर्गांत घुसणाऱ्या अद्ययावत् पद्धतीच्या शिक्षकाचें चित्र कोठें व चोरपावलांनीं, शालीनतेनें वर्गांत जाऊन मुलांमध्यें नवचैतन्य उत्पन्न करणाऱ्या भोळसर मूर्ति परंतु महान् कीर्तीच्या कर्तृत्ववान साने यांचें चित्र कोठें ? साहित्याचार्य न. चिं. केळकरांनीं म्हटल्याप्रमाणें अलीकडील विद्वानांचें ज्ञान सर्व प्रकारचें व विपुल असतें; परंतु त्याची खोली मात्र थोडी. त्याउलट जुन्या विद्वानांचें ज्ञान चौफेर नसेल; परंतु त्याची खोली मात्र फार. साने यांच्यांत या दोन्ही प्रकारचें ज्ञान एकत्र झालेलें आहे. तें जितकें चौफेर तितकें खोलहि पण आहे; ज्ञानी माणसानें नीटनेटका पोषाख करूनच आलें पाहिजे, अगर बावळ्या पोषाखांतील माणसाचें ज्ञान सामान्य होय, असें समीकरण मांडणें साने<noinclude></noinclude> dued7xhk27a9qjarba79mhzoj4wjzut पान:साने गुरुजी व्यक्ति आणि वाड्मय.pdf/३४ 104 110679 232216 2026-06-12T20:34:25Z Shreyank Nipane 6053 /* मुद्रितशोधन */ 232216 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Shreyank Nipane" /></noinclude>{{rh||- २३ -|}} यांच्याकडे पाहिल्यास चुकीचेंच ठरणार नाहीं काय ? पोषाखावरून भोळसर दिसणारे साने यांच्या हृदयस्थ विशाल शक्तीनें विद्यार्थ्यांना त्या काळीं तेजस्वी व आदरणीयच दिसूं लागले. मोठेपणा हा ज्ञान व कर्तृत्वावर अवलंबून असतो, पोषाखावर नव्हे, हेंच खरें. सान्यांना शाळेचें आवार त्यांच्या कार्यशक्तीच्या विस्तारामुळें नेहमींच अपुरें पडे. ते प्रताप हायस्कुलांत असेपर्यंत कधींच विमनस्क बसले नाहींत. त्यांनीं शाळेंत नवचैतन्य उत्पन्न केलें. निरनिराळ्या उपक्रमांत त्यांनीं मांडलेला 'विद्यार्थी' या मासिकाचा उपक्रम चालकवर्गाला अत्यंत नावीन्यपूर्ण वाटला. सान्यांचा उत्साह व त्यांची कार्यक्षमता याची चालकवर्गाला पूर्ण जाणीव असल्यामुळें त्यांना त्यांच्या उपक्रमास सक्रिय व हार्दिक सहानुभूति मिळाली. दैनिक पत्र काढण्याच्या कार्यानंतर 'विद्यार्थी' मासिक आलें. साऱ्या कार्याचा बोजा अर्थात् साने यांच्यावरच पडला. याच वेळीं बाहेर स्वातंत्र्याच्या लढ्याचे नगारे वाजूं लागले होते; त्याचे ध्वनि-प्रतिध्वनि या मासिकांत उमटणें अपरिहार्य होतें. 'विद्यार्थी' मासिकांत साने, इतर शिक्षक व विद्यार्थी यांचे लेख येत. त्याचा गांवोगांव प्रसार करण्याचा प्रयत्न करण्यांत आला. खेड्यापाड्यांतून त्याचा प्रचारात्मक उपयोग करून विद्यार्थीजगांत नवचैतन्य निर्माण करण्याची साने यांची मनीषा होती. राष्ट्राभिमान, वीरवृत्ति, त्यागपूजा, धैर्यपूजा व गुणगौरव इत्यादि कार्यें करण्याच्या 'विद्यार्थी' मासिकाच्या तडफदार कामगिरीला लवकरच सरकारी धोरणाचें जें ग्रहण लागलें, तें कायमचेंच ! तें पुन्हां सुटलें नाहीं. सरकारी रोषाच्या भक्ष्यस्थानीं पडलेल्या 'विद्यार्थी' मासिकाचा उल्लेख झाल्यास अजूनहि सान्यांना त्याबद्दल पूर्ण अभिमान वाटतो. साने यांनीं विद्यार्थ्यांसाठीं शिक्षकाला काय काय करतां येतें याचा आदर्श महाराष्ट्रीय शिक्षकांपुढें ठेविला आहे. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून जाणारा शिक्षक विरळा. इतकी त्यागवृत्ति, इतकी सालसता, इतकी सहनशीलता, इतकी शालीनता, इतका निगर्वीपणा, इतका सोज्ज्वलपणा अन्यत्र आढळणें दुर्लभ. हें सारें चारित्र्य त्यांनीं स्वतः कमावलें आहे. स्वतः भोजनालयांत खाडे सांगून, अर्धपोटीं राहून विद्यार्थ्यांच्या विद्यालयीन शिक्षणाकरितां बचत करून मदत पाठविणारा शिक्षक कोठें सांपडला तर तो अपवादच म्हटला पाहिजे. साने स्वतः अर्धपोटीं राहून हें<noinclude></noinclude> oeey86bbwog0872zc1lby0835f9mk87 पान:साने गुरुजी व्यक्ति आणि वाड्मय.pdf/३५ 104 110680 232217 2026-06-12T20:38:01Z Shreyank Nipane 6053 /* मुद्रितशोधन */ 232217 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Shreyank Nipane" /></noinclude>{{rh||- २४ -|}} सारें करतात हें कळल्यावर मुख्याध्यापक गोखले यांचें अंतःकरण भरून आलें. त्यांचा कंठ सद्गदित झाला. ते सान्यांच्या त्यागानें दिपले. परंतु साने यांनीं उपाशी राहणें त्यांना पसंत पडलें नाहीं. त्यांना घांस गोड वाटेना. जेवण जाईना. सान्यांना त्यांनीं आपल्याकडेच नेहमीं जेवावयास सांगितलें. त्यामुळें सान्यांना विद्यार्थ्यांस आणखी मदत करतां आली, तें निराळेंच. ३१ डिसेंबर १९२९ ला काँग्रेसनें संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पसार केला. झालें. साऱ्या राष्ट्रांत नवचैतन्य स्फुरूं लागलें. सुप्रसिद्ध 'दांडी मोर्चा' वर्तमानपत्रांतून गाजत होता. गोखले गुरुजींचे मित्र हरिभाऊ मोहोनी हे तर म. गांधींना कधींच जाऊन मिळाले होते. गांधींनीं साबरमतीचा आश्रम सोडला. इकडे मोहोनींनींहि प्रताप हायस्कूल सोडलें व ते महात्माजींना जाऊन मिळाले. साने का स्वस्थ बसणार ? त्यांचें मन काय जुन्या इतिहासाचे तेच तेच पाठ शिकवीत राहणार ? त्यांच्या डोळ्यांदेखत इतिहासाची जडणघडण होत होती. सारें राष्ट्र जुलूमशाहीविरुद्ध अहिंसात्मक लढा लढावयास, निःशस्त्र प्रतिकार करून सारें बळ खर्च करावयास व वाटेल त्या हालअपेष्टा सोसावयास तयार झालें असतांना त्यांना का गोखलेगुरुजींकडील सुग्रास जेवण गोड वाटणार ? भारतमातेची किंकाळी ऐकूं आल्यावर का ते पांखरी वृत्तीनें दूरदूर जाणार ? हजारों गरीब लोकांची छळणूक चालू असतांना का ऐषारामांत गादीतक्क्यावर लोळत पडून सुखासीन मवाळ पुढाऱ्यांच्या गोष्टी ते बोलणार ? तेथें त्यागाला आवाहन व आव्हान होतें. कर्तृत्वाची परीक्षा होती, सचोटीची परीक्षा होती. सहनशीलतेची परीक्षा होती. होम करावयास पुढें येणाऱ्या नव्या तरुणांची आवश्यकता होती. नव्या पुढारीपणाला बोलावणें होतें. साने एक दिवस असेच प्रताप हायस्कुलांतून निघून गेले. त्यांनीं आपलें कार्यक्षेत्र विस्तृत केलें. तें विस्तृत होण्यापूर्वी त्यांनीं तेथें आवश्यक असलेल्या गुणांची जोपासना लहानपणीं व शिक्षक असतांना शाळेंत करून ठेविली होती. त्यांची अमृतोपम गिरा त्यांच्या मदतीस या वेळीं हजर होती. त्यांची तडफ व सेवा त्यांच्या सेवेला हजर होती. कार्य करण्याच्या पद्धति शिस्तशीर तयार होत्या. हां हां म्हणतां अंमळनेरचे सानेमास्तर आपल्या त्यागी जीवनानें सानेगुरुजी म्हणून नांवास चढले - तो इतिहास रोमांचकारी नव्हे काय ?<noinclude></noinclude> 11mr44fiihss3sfe5tdmbmnqo4ktere पान:साने गुरुजी व्यक्ति आणि वाड्मय.pdf/१७ 104 110681 232218 2026-06-12T20:41:33Z Shreyank Nipane 6053 /* मुद्रितशोधन */ 232218 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Shreyank Nipane" /></noinclude>{{rh||१३|}} तरी सामान्य जनतेचें हृदय हातीं घेणारें साहित्य निर्माण करण्याची खास आवश्यकता आहे. असें साहित्य निर्माण झाल्याखेरीज आपलें सामाजिक जीवन समृद्ध होणार नाहीं. साहित्याचा व्याप सामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनापर्यंत पोंचला पाहिजे. ललित साहित्याचें स्वरूप केवळ निरुद्योगी श्रीमंतांची करमणूक करणारें अथवा मूठभर मध्यमवर्गीय बुद्धिवंतांना कलात्मक आनंद देणारें असें संकुचित असून चालणार नाहीं. कारण ललित साहित्याच्या सौंदर्यांत हृदय जागृत करण्याची शक्ति असते. या शक्तीचा साहित्यिकाला प्रत्यय आला पाहिजे. ज्या साहित्यकाराला सौंदर्याच्या या शक्तीचा प्रत्यय येतो, तो साहित्यकार आपल्या साहित्याचें प्रयोजन केवळ सौंदर्यनिर्मिति आहे हें मानूं शकत नाहीं. सौंदर्याच्या द्वारां आत्म्याची संपूर्ण जागृति करणें हें त्याचें प्रयोजन बनतें. साऱ्या समाजाची आत्मजागृति घडवून आणण्याच्या कामीं ललित साहित्याचा अपार उपयोग होण्यासारखा आहे. साने गुरुजींनीं या कार्याला प्रारंभ केला असल्यामुळें साहित्याचे वतीनें मी त्यांना धन्यवाद देतों. महाराष्ट्राचे तरुण साहित्यिक याच मार्गानें पुढें जाऊन साने गुरुजींच्या साहित्यापेक्षांहि अधिक उज्ज्वल, अधिक सुंदर, आणि अधिक तेजस्वी वाङ्मय निर्माण करून महाराष्ट्रीय जीवन समृद्ध करतील, अशी मला आशा आहे. {{right|स. ज. भागवत}} {{center|—}} '''निवेदन''' 'शारदा मंदिर', धुळें या संस्थेचें वय उणेंपुरें दोन वर्षांचें आहे. ३१-७-१९४४ रोजीं धुळें येथें डॉ. ना. के. महाजन यांच्या दवाखान्यांतील दिवाणखान्यांत धुळ्यांतील व साहित्यसंमेलनाप्रीत्यर्थ विचार करण्यासाठीं जमलेल्या जिल्ह्यांतील कांहीं लेखकांची सहज रीतीनें सभा झाली. सारेच लेखक उदयोन्मुख. आपल्या हातून कांहीं तरी साहित्यसेवा घडावी अशी प्रत्येकाची इच्छा. इच्छा असल्यावर मार्ग सुचावयास विलंब लागला<noinclude></noinclude> h2rys94g6ob6dpw11uhp8kpi6mmhb9e पान:साने गुरुजी व्यक्ति आणि वाड्मय.pdf/२० 104 110682 232219 2026-06-12T20:44:39Z Shreyank Nipane 6053 /* मुद्रितशोधन */ 232219 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Shreyank Nipane" /></noinclude>{{rh||१६|}} तुरुंगांतील सुटकेनंतर साने गुरुजींनीं खानदेशांत जो तुफानी दौरा काढला, त्याचा लाभ ७ सप्टेंबर १९४५ रोजीं धुळ्यास मिळाला. त्यांच्या येण्यानें मंदिरावर अत्यंत उपकार झाले. त्यांच्या निरहंकारी स्वभावामुळें आम्हांला संकोच वाटत होता, तरी पण आम्ही अत्यंत चिकाटीनें त्यांचा लेख (व्याख्यानाचा सारांश) व संदेश मिळविला. आमच्या विनंतीला मान देऊन ते आमच्या सदस्यांबरोबर दोन घांस जेवलेहि. आम्हांला किती कृतार्थ वाटलें असेल त्या वेळीं ? मायभूमीसाठीं पायपीट करणारा हा महाभाग आमच्या घरच्या कण्यांवर संतुष्ट झाला. आम्हीं अंतःकरणांत भक्तिपूर्वक त्यांची पूजा बांधिली म्हणूनच आम्हांला तें भाग्य लाभलें. आमच्या, त्यांचें अद्ययावत् छायाचित्र काढावयाच्या हट्टालाहि त्यांनीं होकार दिला. ते आम्हांला प्रसन्न झाले, का आमच्या भक्तीला ? ज्या ज्या सदस्यांनीं ह्या पुस्तकांत लेख लिहिले त्यांचेहि आभार मानणें हे शारदा मंदिराचा अध्यक्ष या नात्यानें माझें कर्तव्य ठरतें. डॉ. महाजनांचे मित्र व "महाराष्ट्रग्रंथभांडार, मुंबई" या प्रकाशन संस्थेचे मालक श्री. शंकरराव कुळकर्णी यांनीं मुद्रण व प्रकाशनाचें महत्त्वाचें कार्य जर स्वतःकडे मोठ्या आपुलकीनें घेतलें नसतें, तर हें पुस्तक वाचकवर्गापुढें आलेंच नसतें. त्यांनीं स्वतः एकदां धुळ्यास येऊन या पुस्तकाबाबत विशेष चालना दिली व मंदिराच्या सदस्यांकडून हें कार्य जवळ जवळ करवून घेतलें याबद्दल त्यांचें अंतःकरणपूर्वक आभार मानणें जरूर आहे. शारदामंदिराला मराठी वाचक आशीर्वाद देवोत, हीच इच्छा. {{right|आपला,
डॉ. मा. ल. सावजी
अध्यक्ष-शारदामंदिर, धुळें}} {{center|—}}<noinclude></noinclude> 48lzt36jckshpbaglvhm6bnwtkq5br4 चर्चा:हरिपाठ/श्री एकनाथ हरिपाठ 1 110683 232220 2026-06-13T00:56:20Z ~2026-34850-05 6070 /* Ojjgkdkh */ नवीन विभाग 232220 wikitext text/x-wiki == Ojjgkdkh == vn jjvvhhhhhh [[विशेष:योगदान/~2026-34850-05|~2026-34850-05]] ([[सदस्य चर्चा:~2026-34850-05|talk]]) ०६:२६, १३ जून २०२६ (IST) q3jcg6s13wtftse56xsspgxarhoh3hs