विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.7 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk सोनसाखळी/खरा भक्त 0 370 232372 192819 2026-06-18T04:39:43Z QueerEcofeminist 918 Reverted 1 edit by [[Special:Contributions/MarathiManus108|MarathiManus108]] ([[User talk:MarathiManus108|talk]]): Rv([[m:User:Xiplus/TwinkleGlobal|TwinkleGlobal]]) 232372 wikitext text/x-wiki {{शीर्ष | शीर्षक = सोनसाखळी/खरा भक्त | साहित्यिक = पांडुरंग सदाशिव साने | विभाग = | मागील = = [[सोनसाखळी/मुले म्हणजे देवाची ठेव]] | पुढील = [[सोनसाखळी/सदिच्छेचे सामर्थ्य]] | वर्ष = | टिपण = }} <poem> एका गावाबाहेर एक शंकराचे देऊळ होते. ते स्वयंभू स्थान होते. काळीभोर शंकराची पिंडी होती. त्या गावाच्या राजाची देवावर फार भक्ती. त्याने त्या देवाला सोन्याचा मुखवटा केला होता. शिवरात्रीच्या उत्सवात, श्रावण सोमवारी तो मुखवटा चढविण्यात येई. हजारो लोक पाहायला येत. राजा रोज देवाच्या पूजेला जात असे. "पाहि मां पाहि मां" म्हणत असे. राजाकडची ती पूजा. तिचा थाट किती वर्णावा! किती सांगावा? सुंदर सुगंधी फुलांच्या माळा असत. बेलाच्या त्रिदळांच्या पाट्या भरलेल्या असत. चंदनाचा सुवास सुटलेला असे. उदबत्यांचा घमघमाट असे. ओवाळायला कापूर असे. बाहेर चौघडा वाजत असे. अशा थाटाने पूजा होई. त्या देवळाजवळ एक संन्यासी राहायला आला. तो फार कोणाशी बोलत नसे. देवा शंकराला प्रदक्षिणा घालीत असे. आसन मांडून जप करीत बसे. तो झाडाचा पाला फक्त खाई. जवळ झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्याचे पाणी पिई. असा त्याचा कार्यक्रम असे. एकदा एक परगावचा मनुष्य त्या गावी आला. देवा शंकराच्या दर्शनास गेला. संन्यासी शांतपणे बसला होता. "महाराज, आपणाला एक प्रश्न विचारु का?" त्या माणसाने विचारिले. "विचारा." संन्यासी म्हणाला. "तुम्ही येथे पुष्कळ दिवस आहात. देवाच्या पूजेला, देवाच्या दर्शनाला रोज किती तरी लोक येतात. त्यांच्यातील देवाचा खरा भक्त कोण?" "खरे सांगू का?" "खरे सांगा. दुसऱ्याच्या रागाची संन्याशाला काय पर्वा?" "खरे आहे. ऐका तर. तेथे रोज दोन प्रहरी एक गुराखी येतो. तो, देवा शंकराचा खरा भक्त." "हो." "त्याला वेदमंत्र येत नसतील. जपजाप्य करीत नसेल तो. पूजा तरी कशाने करणार? कोठून आणील गंध? कोठून आणील नीरांजन? येथे राजा रोज पूजेसाठी येतो. कशी घवघवित दिसते ती पूजा. किती माळा, किती कापूर. त्या राजापेक्षाही का तो गुराखी मोठा भक्त? "हो; पुन्हा पुन्हा काय सांगू?" "महाराज, तुमच्या म्हणण्यावर विश्वास बसत नाही." "उद्या प्रचीती दाखवितो. राजा पूजा करील त्यावेळेस व गुराखी दुपारी येईल त्या वेळेस तुम्हीही येथे असा." "अवश्य येईन." तो मनुष्य निघून गेला. संन्यासी आपल्या कर्मात रमला. दुसरा दिवस उजाडला. तो मनुष्य आधीच देवळात येऊन बसला. काही वेळाने राजा आला. चौघडा वाजू लागला. सनया आलापू लागल्या. महापूजा सुरु झाली. माळा चढविण्यात आल्या. कापूर पेटवून राजा ओवाळू लागला. इतक्यात काय झाले? ते देऊळ एकदम हलू लागले. भूकंप होणार असे वाटले. राजा घाबरला. दगड डोक्यावर पडतात की काय असे त्याला वाटले. त्याच्या हातातील ती हलकारती खाली पडली. कोठले ओवाळणे, कोठली पूजा. राजा धूम पळत सुटला. राजाच्या बरोबरचे सारे पळत सुटले. ती पूजा तशीच अर्धवट तेथे पडून राहिली. दुपारची वेळ झाली. तो गुराखी आला. त्याच्या गाई रानात चरत होत्या. तो देवाच्या दर्शनाला आला. तो गाभाऱ्यात शिरला. पिंडीला त्याने कडकडून मिठी मारली. नंतर त्याने आपल्या भाकरीचा नैवेद्य देवासमोर ठेवला. क्षणभर त्याने डोळे मिटले. आणि तेथेच ती कांदाभाकर खाऊ लागला. आईच्या जवळ बसून जेवू लागला. देव म्हणजे सर्वांची आई ना? इतक्यात ते देऊळ हलू लागले. दगड डोक्यावर पडणार असे वाटले. हातातील भाकरी हलू लागली. भूकंप होणार असे वाटले. परंतु त्या गुराख्याने काय केले? तो पळाला का? त्याने धूम ठोकली का? नाही. त्याने एकदम शंकराच्या पिंडीला मिठी मारली. "देवा, सांभाळ." असे तो म्हणाला. देऊळ हलायचे थांबले. गुराख्याला आनंद झाला. त्याने भाकरी पोटभर खाल्ली. देवाला नमस्कार करुन पुन्हा रानात गेला. गाईसाठी बासरी वाजवू लागला. प्रचीती ज्याला हवी होती तो मनुष्य तेथे होता. "पटले की नाही?" संन्याशाने विचारले. "राजा पळून का गेला? गुराखी तेथेच का राहिला?" "अरे, राजा ज्या पिंडीची पूजा करीत होता, ती पिंडी त्याला खरोखर देवाची वाटत होती का? देऊळ हलू लागताच तो पळाला. देव जवळ असता तो पळाला का? संकटात देवाशिवाय कोण तारणार? परंतु ही पिंडी रक्षण करील असे त्याला वाटले नाही. त्याने स्वतःच्या पायांवर अधिक विश्वास ठेवला. ती पिंडी म्हणजे केवळ दगड. हीच त्याची शेवटी भावना झाली. परंतु तो गुराखी? देऊळ हलू लागताच पळाला नाही. त्याने पिंडीलाच मिठी मारली. संकटात लहान मूल आईला बिलगते. तो गुराखी देवाला बिलगला. त्याला ती पिंडी म्हणजे दगड वाटला नाही. त्याला तेथे खरोखर देव दिसत होता. ती पिंडी परमेश्वराची, देवा महादेवाची आहे, असे त्याला खरोखर वाटत होते. त्याचा खरा भाव होता, त्याची खरी भक्ती होती. त्याच्या पूजेत फुले नसतील, कापूर नसेल, चंदन नसेल. परंतु सर्व सुगंधांहून थोर असा खऱ्या भक्तीचा सुगंध त्याच्या पूजेत होता. आता पटले ना?" संन्याशाने शेवटी विचारले. "होय महाराज." असे म्हणून विचार करीत तो मनुष्य निघून गेला. {{प्रताधिकार मुक्त साहित्य}} [[वर्ग:तपासणी करायचे साहित्य‎]] [[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]] [[वर्ग:कथा]] [[वर्ग:सोनसाखळी]] hugn2gigmx5d42ct7dv9xx7p7ondw8y पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/२४ 104 69244 232363 232350 2026-06-17T19:37:10Z QueerEcofeminist 918 Fmt 232363 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="QueerEcofeminist" />{{left|प्रस्तावना}} {{right|(एकोणीस)}}</noinclude> टिपण्यांवरून उघडकीस येते. इंग्रजी शिक्षण बेताबेताचे होते. तरी इंग्लिश लिहू शकत होते व महत्त्वाचे उच्च दर्जाचे ग्रंथ समजून वाचू शकत होते ही गोष्टही यावरून निदर्शनास येते. अलीकडे, गेल्या शंभर वर्षांत, प्राचीन भारतीय इतिहासाचे जे मौलिक संशोधन झाले आहे त्या संशोधनाचे पूर्वीच्या संशोधकाचे बरेचसे निर्णय काही बाबतीत चुकीचे ठरले आहेत व काही बाबतीत अंशतः काल्पनिक ठरले आहेत. मत्स्यावतारापासून परशुराम अवतारापर्यंतच्या अवतारांचा जोतीरावांनी केलेला ऐतिहासिक अर्थ वामन व परशुराम वगळल्यास केवळ काल्पनिक आहे असे मानावे लागते. विशेषतः भारतीय विषम व ब्राह्मणप्रधान समाजरचनेस बाहेरून आलेले ऋग्वेदिक आर्य हे मूलतःच कारण होत या विधानाला आता विशेष पुष्टी मिळू शकत नाही. ऋग्वेदिक आर्य संख्येने अत्यल्प होते व कायम पगडा बसवितील इतके बलवानही नव्हते. विषम समाजरचनेची निर्मिती ही समाजाच्या आंतरिक सामाजिक शक्तींच्या आर्थिक व राजकीय बलामुळे निर्माण होत असते व ती परिवर्तन पावत असते हा सामाजिक विकासाचा सिद्धान्त मान्य करावा लागतो.
{{gap}}आर्यपूर्व अवैदिक भारत हा विकसित अशा द्राविडी संस्कृतीने व्यापला होता व वर्तमान हिंदू धर्म हा त्याच संस्कृतीचा परिवर्तित आविष्कार आहे ही उपपत्ती आता सर्वमान्य झाली आहे. काही विद्यमान आधुनिक संस्कृतिशास्त्रज्ञ तर जातिभेद हा आर्यपूर्व संस्कृतीत भारताच्या दक्षिण प्रदेशाला वाढीस लागला व तो वैदिक आर्यांना स्वीकारावा लागला असेही म्हणू लागले आहेत. जोतीरावांनी 'गुलामगिरी' या पुस्तकात दाखविलेल्या आर्यपूर्व जोतीबा, खंडोबा, म्हसोबा, बहिरोबा, बाणासुर इत्यादी देवता व त्यांचे पूजासंप्रदाय हे आर्यपूर्व लोकांचे होते हे जोतीरावांनी स्वतःच सांगितले आहे. येथील द्राविडी संस्कृतीला आसुरी संस्कृती असे म्हणता येते ही गोष्ट जोतीरावांनीही सुचविली आहे व त्यात बरेच तथ्य आहे. त्याच संस्कृतीतील मोठा व मूळचा पुरोहितवर्ग हाच विद्यमान भारतातील बहुसंख्य ब्राह्मणवर्ग ही गोष्टही जोतीरावांना मान्य झाली असती असे सार्वजनिक सत्य धर्म पुस्तकाच्या टिपणीवरून लक्षात येते. येथील देशस्थ ब्राह्मण शूद्र व अतिशूद्र यांच्यापैकीच आर्षीकरण झालेले ब्राह्मण होत असे जे त्यांनी विधान केले आहे त्यावरून सूचित होते. सोवळ्या ओवळ्याच्या कल्पनेवर जोतीरावांनी कडाडून हल्ला केला आहे व सोवळ्या ओवळ्याची ही कल्पना आर्यांनी वर्चस्व प्रस्थापित करण्याकरिता आर्येतरांवर लादली व ती त्यांनी भुलून पत्करली असे जे जोतीरावांनी जागोजागी विधान केले आहे ते आधुनिक मानवजातिशास्त्रज्ञांना मान्य नाही. सोवळ्या ओवळ्याची कल्पना प्राथमिक मानवसमाजामध्ये जगात सर्वत्र होती व वर्तमानकालापर्यंत कमी-जास्त प्रमाणात अद्ययावत किंवा आधुनिक पश्चिमी समाज सोडल्यास सर्वत्र कमी-जास्त प्रमाणात आहे हे शास्त्रज्ञांच्या गेल्या दीडशे वर्षांतील जागतिक संशोधनावरून सिद्ध होते. 'टाबू' (Taboo) आणि 'माना' (Mana) या मौलिक अशा मानवजातिशास्त्रज्ञांनी स्वीकारलेल्या कल्पना आहेत. त्या जादूटोणा व विविध धार्मिक रूढी यांचा अर्थ उमगण्यास उपयोगी
<noinclude></noinclude> 3kbrknoocddno20tfoavva6yr6fdvyi पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/२५ 104 69245 232364 230969 2026-06-17T19:37:50Z QueerEcofeminist 918 Fmt 232364 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="QueerEcofeminist" /></noinclude>{{left|(वीस)}} {{right|महात्मा फुले : समग्र वाङ्मय}} पडतात. प्राथमिक व मध्ययुगीन सर्व मानवसमाजांच्या धार्मिक चालीरीती, मंत्रतंत्र, जादूटोणा इत्यादी व्यवहारांचा 'टाबू' व 'माना' या कल्पनांच्या साहाय्याने मानवजातिशास्त्रज्ञांना करता येतो. 'टाबू' म्हणजे निषिद्ध पापशक्ती व 'माना' म्हणजे विधायक पुण्यशक्ती होय. उदा. गोमांस भक्षण हे महापाप मानणे, मृतांच्या नातेवाईकांना अस्पृश्य मानणे म्हणजे सुतक पाळणे, प्रेताला अपवित्र मानणे, डुकरांचे मांस निषिद्ध मानणे इत्यादी प्रकारच्या निषेधात्मक चालीरीती आर्य व आर्येतर या सर्वांच्याच मध्ये पडतात. गोमांस भक्षण हे पाप आहे ही कल्पना मूळची आर्यांची नव्हे. ती आर्येतरांची आहे व ती कालांतराने आर्यांनी स्वीकारली ही कल्पना जोतीरावांनाही मान्य झाली असती; हे वैदिक आर्य गोमांसभक्षक होते असे त्यांनी वारंवार केलेल्या विधानांवरून स्पष्ट होते. मृतांच्या नातेवाईकांची अस्पृश्यता म्हणजे सुतक पाळण्याची चाल ही आर्येतरांपासून आर्यांनी स्वीकारली ही गोष्ट स्मृतींवरून अनुमानता येते. शूद्रांनी सुतक एक महिना पाळावे असे विधान स्मृतींत आढळते. स्मृतींमध्ये भक्ष्याभक्ष्यविषयक किंवा स्पृश्यास्पृश्यविषयक सांगितलेल्या चालीरीती या परंपरागत असलेल्या त्या त्या जमातींच्या चालीरीती होत, नव्या कायद्याने निर्माण केलेल्या चालीरीती नव्हेत, ही गोष्ट स्मृतींच्या आधुनिक अभ्यासकांना नव्याने सांगण्याची गरज नाही.
{{gap}}बऱ्याचशा अनुयायांना व चाहत्यांना न मानवणारे असे अनेक मौलिक विचार जोतीरावांना मांडले आहेत. उदा. ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी व अन्य संतप्रणीत ग्रंथ शूद्र अतिशूद्रांना फसविण्याकरिता व ब्राह्मणांचे अधिपत्य दृढ करण्याकरिता निर्माण केलेले कारस्थान आहे असे जोतीराव अनेक ठिकाणी बजावतात. विष्णू व पंढरीचा विठ्ठल यांची जोतीरावांनी खूप थट्टा उडविली आहे हे महाराष्ट्रातील त्यांच्या चाहत्यांना व अनुयायांना कितपत पचले असेल याची वानवा आहे. हिंदू धर्मातील मूर्तीपूजा हे ब्राह्मणांनी पोट भरण्याकरिता काढलेले थोतांड आहे, तीर्थयात्रा, श्राद्ध इत्यादी विधी हा लबाडपणा धंदा आहे, एकेश्वरवादी ख्रिस्ती धर्म व मुसलमान धर्म हे हिंदू धर्मापेक्षा अधिक श्रेष्ठ धर्म आहेत इत्यादी जोतीरावांची विधाने चाहत्यांनी व अनुयायांनी मनन करण्यासारखी आहेत. महंमदावर एक उत्कृष्ट प्रशंसापर कविता जोतीरावांनी लिहिली आहे. ती या संदर्भात वाचावी. ख्रिस्ती व मुसलमान लोकांनी येथील हिंदूना बाटविण्याचे पूर्वी केलेले प्रयत्न जोतीरावास स्वागतार्ह वाटतात. त्याबद्दलची पोटदुखी केवळ ऐतखाऊ ब्राह्मणांनाच बाधते, असे त्यांनी वारंवार म्हटले आहे. उदा. पंडिता रमाबाई यांनी ख्रिस्ती धर्म पत्करून केलेल्या ख्रिस्ती धर्मप्रसाराची जोतीरावांनी प्रशंसा केली आहे. (सत्सार) मात्र याचा अर्थ असा नव्हे की हिंदूंनी मुसलमान वा ख्रिस्ती व्हावे असे जोतीरावांचे मत होते. पवित्र ग्रंथनिष्ठ सर्वच धर्म हे मानवामानवात फूट पाडणारे असल्यामुळे अयोग्य होत, असा त्यांचा अंतिम निर्णय होता. तुलनात्मक दृष्टीने विचार करता, प्रचलित हिंदू धर्मापेक्षा मुसलमान वा ख्रिश्चन धर्म कैक पटीने श्रेष्ठ होत एवढेच त्यांना सांगावयाचे होते. खरा धर्म सर्व मानवांचा एकच
<noinclude></noinclude> h7zkuhgrzw41d5aa70hkxv5ski6n8kz पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/२६ 104 69246 232367 230970 2026-06-18T04:24:57Z QueerEcofeminist 918 /* Proofread */ 232367 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="QueerEcofeminist" />{{left|(एकवीस)}} {{right|प्रस्तावना}}</noinclude> आहे. सर्व धर्मनिष्ठ सामाजिक भेद हे मिथ्या भेद होत, असा त्यांनी काढलेला अंतिम निष्कर्ष होता.
{{gap}}हिंदू धर्मावरील विशेषतः ब्राह्मणप्रधान हिंदू समाजरचनेवरील व ब्राह्मणप्रधान संस्कृतीवरील त्यांचा हल्ला एका तत्कालीन ऐतिहासिक विशिष्ट सामाजिक व राजकीय परिस्थितीची तीव्र प्रतिक्रिया होती व ती तीव्र प्रतिक्रिया तटस्थ रीतीने पाहणाऱ्या आधुनिक विचारवंतास मर्यादित अर्थाने समर्थनीयच वाटेल यात शंका नाही व ती समर्थनीय आहेच. अव्यवस्थित व बेजबाबदार उत्तर पेशवाईत व अव्वल इंग्रजीमध्ये ब्राह्मणांचे महाराष्ट्रात प्रस्थ वाढले व सामाजिक विषमतेची धार अधिक तीक्ष्ण झाली ही गोष्ट लोकहितवादी, न्यायमूर्ती रानडे, आगरकर इत्यादी आधुनिक विचारवंतांनादेखील खंत व उद्वेग उत्पन्न करणारी होती ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे. उत्तर पेशवाई बेजबाबदार व हीन दर्जाची होती असेच लोकमान्य टिळकांचेही मत होते. लोकहितवादींची शतपत्रेही या गोष्टीची साक्ष देतात. ही शतपत्रे म्हणजे ब्राह्मणी विद्यांवर व ब्राह्मणी संस्कृतीवर उगारलेली बुद्धिवादी शतशस्त्रेच होत. ती अजूनपर्यंत गंजलेली नाहीत. त्यांचे तेज अजूनही तळपत आहे. वर्तमान परंपरावादी विद्यापीठीय अनेक सुशिक्षतांना, विशेषतः मराठी प्राध्यापकांना, त्यांच्यापासून मिळणारा इशारा अजूनही लक्षात आलेला नाही. परंतु आता स्वातंत्र्योत्तर काळात ब्राह्मणेत्तर वाद हा जीर्ण झाला असून त्यातील अभिनिवेश जर कायम राहिला, तर तो अधोगतीचे एक लक्षण ठरेल, याची दखल आधुनिक लोकशाही शक्तींनी स्पष्टपणे घेतली पाहिजे. ज्या परांपरागत संस्कृतीवर जोतीरावांनी हल्ला केला त्या लोकसंस्कृतीचेच एक प्रत्यंतर म्हणजे लोकशाही भारतातील ब्राह्मणेतर वाद व जातिवाद होय. जोतीराव हा ब्राह्मण जमातीवर जितका कडाडून हल्ला करीत तितकेच उलट अंतरंगातून अत्यंत मऊ आहेत हेही त्यांच्या प्रत्यक्ष वर्तनावरून दिसून येते. ज्या ज्या ब्राह्मणांनी सहकार्य वा अल्पस्वरूप वा मोठी मदत सत्यशोधक समाजास केली तिची पावती अत्यंत नम्रपणे व प्रेमळ बंधुत्वाने त्यांनी दिलेली आहे ही गोष्ट या 'महात्मा फुले समग्र वाङ्मय' संग्रहात अनेक ठिकाणी दिसून येईल. त्यांचा हल्ला पद्धतीवर होता, विशिष्ट जातीतील माणसांवर नव्हता. हा विवेक त्यांच्या हृदयात सतत जागृत होता. हा विवेक त्यांच्या चाहत्यांमध्ये जर जागृत राहिला तर आगामी यादवी टाळण्याचे श्रेय पदरात पडू शकेल.
{{gap}}श्री. धनंजय कीर व डॉ. स. गं. मालशे यांनी साक्षेपाने हा संग्रह संपादित केला, याबद्दल महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ त्यांचे मनःपूर्वक आभारी आहे.
वाई,
मकर संक्रमण,
लक्ष्मणशास्त्री जोशी.
दिनांक १४ जानेवारी १९६९.
<noinclude></noinclude> jgfsjbiayl8j16a8bliw2tsiwy6p90d पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/२७ 104 69248 232368 230971 2026-06-18T04:25:31Z QueerEcofeminist 918 /* Without text */ 232368 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="0" user="QueerEcofeminist" /></noinclude><noinclude></noinclude> 6mlrg7ulygc335wsw2ucniib5cytmfy पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/२८ 104 69249 232369 230972 2026-06-18T04:27:47Z QueerEcofeminist 918 /* Proofread */ 232369 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="QueerEcofeminist" /></noinclude>{{center|'''प्रथम आवृत्तीच्या संपादकांचे निवेदन'''}} {{gap}}मराठी जनतेच्या इच्छेला मान देऊन महाराष्ट्र शासनाचे साहित्य आणि संस्कृती मंडळ महात्मा जोतीराव फुले यांचे समग्र वाङ्मय प्रसिद्ध करीत आहे, ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. जोतीरावांच्या काळी ब्रिटिशांची राजवट चालू होती. त्या राजवटीत अधिकारावर असलेल्या महाराष्ट्रीय व्यक्तींनी त्यांच्या वाङ्मयाविषयी कोणत्याही तन्हेची, रेसभरसुद्धा सहानुभूती दाखविली नाही; उलटपक्षी त्यांची उपेक्षा करता करता जेव्हा कधी उल्लेख केला, तेव्हा त्यावर कुत्सित टीकाच केली. तथापि, स्वतंत्र भारतामधील महाराष्ट्र शासनाने, धर्मातीत लोकशाहीच्या या अग्रदूताच्या विचारप्रवर्तक, बुद्धिवादी आणि क्रांतिप्रवण तत्त्वज्ञानाचे दर्शन घडवावे, म्हणून त्यांच्या वाङ्मयाचे पुनर्मुद्रण करण्याचे ठरविले, ही ऐतिहासिकदृष्ट्या मोठी उचित अशी घटना घडलेली आहे.
{{gap}}जोतीरावांचे वाङ्मय वाचताना विचारवंत वाचकांनी, त्यांचा कालखंड आणि त्यातील सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक परिस्थितीचे भान राखणे हे जसे आवश्यक आहे, तद्वतच वाङ्मयीन टीकाकारांनी त्यांच्या वाङ्मयातील अभिव्यक्तीच्या बहिरंगाकडे न पाहता, त्यातील आशयाच्या अंतरंगाकडे पाहणे आवश्यक आहे. जोतीराव हे कोणी साहित्याचार्य नव्हते, ते भाषाशास्त्रज्ञ नव्हते, इतिहासकार नव्हते की मोठे धर्मवेत्तेही नव्हते. ते होते कृतिशील तत्त्वचिंतक ! प्रत्येक शतकात न्याय, नीती आणि मानवता या शाश्वत तत्त्वांची जाणीव करून देऊन स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचा मार्ग दाखविणारे जे मूलाधार असे महापुरुष अवतरत असतात, त्यांपैकी जोतीराव एक होते. त्यांच्या शेतकरी भट्टीच्या मुशीतून ज्या तप्त स्वरूपात भाषा बाहेर पडली, त्या स्वरूपातच ती ग्रंथामधून प्रसिद्ध झालेली आहे.
{{gap}}ब्रिटिश राजसत्तेबरोबर भारतात आलेले नवे ज्ञान, बुद्धिवाद, यंत्रयुग आणि विज्ञान यांच्या प्रकाशात ब्राह्मणी धर्माची, जुन्या पोथ्यापुराणांची, जुन्या धर्मग्रंथांची आणि त्यांनी घडविलेल्या सामाजिक मूल्यांची परीक्षा करण्यासाठी एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास जे
<noinclude></noinclude> bjm86bk8og27qvb2idh14y69k0onpu3 पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/२९ 104 69250 232365 230973 2026-06-17T19:39:04Z QueerEcofeminist 918 Fmt 232365 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="QueerEcofeminist" /></noinclude>{{left|(चोवीस)}} {{right|महात्मा फुले : समग्र वाङ्मय}} विचारवंत पुढे सरसावले, त्यांत जोतीरावांना अग्रमान देणे क्रमप्राप्तच आहे. टॉमस पेन या महान बंडखोर विचारवंताच्या "मानवाचे हक्क" (Rights of Man) या ग्रंथाचा फार मोठा परिणाम जोतीरावांच्या मनावर विद्यार्थिदशेतच झाला आणि त्यातून त्यांच्या जीवितकार्याची दिशाच ठरल्यासारखी झाली. त्यांनी आपले सर्व जीवित मानवी स्वातंत्र्यासाठी समर्पित केले, त्यासाठी अविरत त्याग केला, लोकक्षोभाला जुमानले नाही, संकटांना धैर्याने तोंड दिले, अक्षरक्षः दिव्य केले!
{{gap}}समाजात, शब्दप्रामाण्य, जुने आचारविचार, जुन्या रूढी, कर्मकांड, जपजाप्य, पूर्वसंचित, पूर्वजन्म, ईश्वरी संकेत, स्वर्ग-नरक इत्यादी कल्पना प्रसृत करणाऱ्या आणि मानवी कर्तृत्व दास्यशृंखलांत बद्ध करून टाकणाऱ्या भोळ्या समजुतींवर जोतीरावांना सतत आघात करावे लागत होते. थंड गोळ्यासारखा पडलेला बहुजनसमाज जोवर हालत नव्हता, तोवर त्यांना पुन्हापुन्हा कंठरवाने तेच तेच सांगावे लागत होते. “ती ती पदे नित्य फिरून येती । त्या त्याच अर्थाप्रति दाविताती' हे हाडाच्या प्रचारकाला चुकत नाही. जोतीरावांच्या वाङ्मयातील पुनरुक्तीचे हे एक मर्म ध्यानात ठेवावयास पाहिजे.
{{gap}}हे मर्म ध्यानात ठेवून सारग्रहण करणाराला त्यांच्या वाङ्मयात मूलगामी विचारांचा ठेवाच हाती लागल्यासारखे वाटेल.
निर्मीकें निर्मीला मानव पवित्र । कमीजास्त सूत्र । बुद्धीमध्यें ॥
पिढीजादा बुद्धी नाहीं सर्वांमधीं । शोध करा आधीं । पुर्तेपणीं ॥
असा त्यांचा दृढ विश्वास होता नि तो त्यांनी वारंवार प्रकट केलेला आहे. मनुष्य जन्माने, जातीने वा धनाने श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरत नसून, तो आपल्या कर्माने श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरत असतो, तो स्वतःच आपल्या भाग्याचा नियंता आहे, अशी त्यांची धारणा होती. तद्नुसार त्यांनी जातिसंस्थेविरुद्ध बंड पुकारले आणि बुद्धिप्रामाण्य, समता नि मानवता यांवर अधिष्ठित अशा सामाजिक पुनर्रचनेचे निशाण फडकावले.
{{gap}}कोणताही धर्म ईश्वरप्रणीत नाही, कोणताही धर्मग्रंथ देवनिर्मित नाही, या पृथ्वीच्या पृष्ठभागावर जेवढी म्हणून मानवांनी निर्मिलेली धर्मपुस्तके आहेत, त्यापैकी एकाही पुस्तकात आरंभापासून शेवटपर्यंत सार्वजनिक सत्य नाही, चातुर्वर्ण्य वा जातिभेद या संस्था देवनिर्मित नाहीत, त्या मनुष्यनिर्मित आहेत, ही सत्ये त्यांनी त्या काळी मोठ्या धैर्याने पुढे मांडली.
धर्म राज्य भेद मानवा नसावे । सत्यानें वागावें । ईशासाठीं ॥
ख्रिस्त महंमद मांग ब्राह्मणासी । धरावे पोटाशीं । बंधुपरी ॥
निर्मीकाचा धर्म सत्य आहे एक । भांडणे अनेक । कशासाठीं ?||
<noinclude></noinclude> 8a2bpwwoaqudle2bhy4674ghwsaft78 पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/३० 104 69251 232370 230974 2026-06-18T04:28:48Z QueerEcofeminist 918 /* Proofread */ 232370 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="QueerEcofeminist" />
{{left|संपादकांचे निवेदन}} {{right|(पंचवीस)}}</noinclude> असा प्रश्न करून "सत्यावीण नाही अन्य धर्म”, “मानवांचा धर्म । सत्यनीती हीच", असे खऱ्या धर्माचे रहस्य त्यांनी उपदेशिले. त्यांची ही धर्मातीत विचारसरणी त्यांच्या काळात खरोखर अशक्य कोटीतली होती.
{{gap}}देवाला त्यांनी 'निर्मीक' म्हटलेले आहे, ते त्याला अन्य कोणत्याही नावाने संबोधित नाहीत. विश्व अनंत आहे, ते अथांग आहे, विश्वाच्या आणि देवाच्या शोधामागे लागून मानवाने आपले आयुष्य व्यर्थ घालवू नये, हे बरे, असे त्यांचे सांगणे आहे.
{{center|कोठें आहे स्वर्ग । पाहिलें ते कोणी । भिऊं नका मनीं ॥}} असा त्यांनी सामान्य माणसाला धीर दिला आहे. जपानुष्ठानाने पाऊस पडत नाही, मंत्राने अपत्यप्राप्ती होत नाही, देवाला कोणी पाहिलेले नाही, त्याला नारळ, कोंबडी, बकरी यांच्या नैवेद्याची आवश्यकता नाही, हे त्यांनी स्पष्ट केले आहे. अवतारकल्पना, आत्मसाक्षात्कार, दैवी चमत्कार या गोष्टी त्यांना मान्य नव्हत्या. देव म्हणजे कोणी अद्भुत, कोणी अदृश्य विभूती नव्हे, आपण राहतो, ती सृष्टी निसर्गाच्या नियमांनी बांधलेली आहे, देव ही एक निर्गुण निराकार अशी विश्वाची शक्ती आहे, असेच त्यांनी मानले आहे. भौतिकवाद्यांना आणि समाजवाद्यांनाही पटावे, असे हे जोतीरावांचे तत्त्वज्ञान आहे. मात्र जोतीरावांच्या तत्त्वज्ञानांत सामाजिक नीतिमत्तेवर मुख्य भर आहे, हे विसरून चालणार नाही.
{{gap}}किंबहुना नीती हाच मुळी त्यांच्या तत्त्वज्ञानाचा गाभा आहे. धर्माच्या नावावर चालत आलेल्या रूढींची नीतीशी झालेली फारकत हिंदू धर्माने खपवून घेतलेली होती, त्याची त्यांना मनस्वी चीड होती. अनीतिमान ब्राह्मणांवर त्यांनी जितक्या कठोरपणे कोरडे ओढले आहेत, तितक्याच कठोरतेने अनीतिमान ब्राह्मणेतरांनांही धारेवर धरले आहे. मद्यपानाच्या अनिष्ट प्रचाराला आळा घालावा, म्हणून त्यांनी आटोकाट प्रयत्न केले.
थोडे दिन तरी मद्य वर्ज करा । तोच पैसा भरा | ग्रंथासाठीं ॥
ग्रंथ वाचताना मनीं शोध करा । देऊ नका थारा । वैरभावा ॥
असे त्यांनी आवर्जून सांगितले आहे. चांगल्या कार्यासाठी वाईट उपाय योजू नयेत, हे साधनशुचितेचे त्यांनी घातलेले बंधन त्यांच्या मूलग्राही नैतिक अधिष्ठानाचे निदर्शक आहे.
{{gap}}ख्रिस्तधर्मी आपला पवित्र ग्रंथ जगात कोठेही वाचू शकतात; मुसलमान आपले कुराण कोठेही वाचू शकतात; मग ब्राह्मणांनी आपला वेद आणि मनुसंहिता का लपवावी, असा मूलभूत प्रश्न त्यांनी विचारला आहे. या बिनतोड प्रश्नाने शूद्रातिशूद्रांनी हिंदू धर्मग्रंथ वाचू नयेत, असे म्हणणे किती अन्यायाचे आहे, हे तर दिसतेच, तर त्याचबरोबर त्या लपवाछपवीतच या धर्माची गोम आहे, हेही उघड होते आणि जोतीरावांच्या टीकेची यथार्थता पटते.
एच - २२<noinclude></noinclude> ecc4l9uat9hy4uytmzl2jhqy2k35qan पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/३१ 104 69252 232371 230975 2026-06-18T04:29:29Z QueerEcofeminist 918 /* Proofread */ 232371 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="QueerEcofeminist" /></noinclude>{{left|(सव्वीस)}} {{right|महात्मा फुले : समग्र वाङ्मय}} {{gap}}'सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक' हा जोतीरावांचा ग्रंथ त्यांच्या 'मानवविषयक संकल्पनेचे' (Concept of Man) समग्र दर्शन घडवितो. हा ग्रंथ म्हणजे मानवी स्वातंत्र्याचा एक एक जाहीरनामाच आहे, जणू विश्वकुटुंबवादाची ती एक गाथाच आहे, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या प्रेरणेस नि बुद्धीस योग्य वाटेल तो धर्म स्वीकारून गुण्यागोविंदाने नांदावे, असे उपदेशिणारी विशाल धर्मसहिष्णुतेची ती जणू नवगीताच आहे! धार्मिक सहिष्णुता, मानवी प्रतिष्ठा आणि मानवी समानता ही मूल्ये या ग्रंथाची मूलाधारप्रेरणा आहे. मानव हीच सामाजिक मूल्यांची आणि समाजधारणेची मापकाठी असावी, हा विचार त्यात प्राणभूत आहे. सर्व भूखंडावरील लोकांनी एकजुटीने, एकमताने, सर्वांचे सारखे हक्क मान्य करून, देशभिमान आणि धर्माभिमान, यांच्या पलीकडे पाहावे, ही या ग्रंथांची प्रमुख शिकवण आहे. हा ग्रंथ अनेक विधायक सूचनांनी ओतप्रोत भरलेला आहे 'गुलामगिरी' हा ग्रंथ लिहून जोतीरावांनी जुन्या समाजरचनेवर, जुन्या अवतारकल्पनांवर, जुन्या मूल्यांवर घणाघाती हल्ला चढविला आणि सत्यशोधक चळवळीचा पाया घातला, तर 'सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक' लिहून त्यांनी आपल्या तत्त्वज्ञानमंदिरावर विधायक स्वरूपाचा कळस चढविला.
{{gap}}जोतीरावांनी त्या विषम काळात अस्पृश्यांचे दुःख ज्या आत्मीयतेने वेशीवर टांगले, ती आत्मीयता खरोखर असामान्य म्हटली पाहिजे. जोतीराव हे अस्पृश्य वर्गापैकी नव्हते. ते माळी समाजातले होते. त्या काळच्या मानाने त्यांचे शिक्षणही व्यवस्थित झालेले होते. चार लब्धप्रतिष्ठितांप्रमाणे लोकक्षोभाला भिऊन त्यांनी मध्यमक्रम स्वीकारला असता, तर समाजाने त्यांना डोक्यावर घेतले असते. पण शतकानुशतके माणुसकीला पारख्या झालेल्या समाजाविषयीची त्यांची करुणा जातिवंत होती. अस्पृश्यांना आणि अन्य पददलितांना ते आपल्या कुटुंबातलेच, आपल्या रक्तामांसाचे मानीत. जातिभेद आणि चातुर्वर्ण्य या संस्था त्यांना सर्वस्वी अमान्य होत्या. त्यामुळे अस्पृश्यांची अस्पृश्यता काढून टाकून, त्यांना पंचम वर्ग म्हणावे, की दुसरे काही नाव द्यावे, असा पर्याय वा पळवाट त्यांच्या समानतेच्या तत्त्वज्ञानात बसण्यासारखी नव्हती.
{{gap}}जोतीरावांनी अंगीकारलेल्या कित्येक सुधारणा आज समाजाने स्वीकारल्या आहेत. स्त्रीशिक्षणाविषयी आता मतभेद राहिलेले नाहीत. पतित स्त्रियांचा उद्धार आणि अनाथ अर्भकांचे संवर्धन यांविषयी त्यांनी घालून दिलेला आदर्श आज समाजाने पचवून टाकलेला आहे. केशवपनाचा प्रश्न आज गतार्थ झाला आहे. पण त्या काळी त्यांना नापितांकडून केशवपनाविरुद्ध बंड करवावे लागले नि त्याचे पडसाद लंडनमध्येही उमटले. विधवाविवाहाला उत्साहाने उत्तेजन देताना त्यांना लोकनिंदा सहन करावी लागली. त्या काळच्या सुशिक्षित सुधारकांना जोतीरावांचा पाठिंबा असे. पण कृतीची वेळ येताच बहुतेक प्रसंगी ते लोक कचखाऊ ठरत, म्हणून त्यांच्याविरुद्ध जोतीरावांचा विशेष कटाक्ष दिसतो.
<noinclude></noinclude> nxyrdpx7bdvscxs8f2cdaju9sd8vss3 पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१२७ 104 85891 232353 232352 2026-06-17T12:07:02Z JayashreeVI 4058 232353 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|१२२|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>पासून तगाईत सालगुदस्ता पावत आले आहे. हालीही पेशजी मोईनप्रमाणें सालमजकुरी इ|| (इस्तकबिल) अवल सालापासून देविलें असे साल दरसाल देत जाणे प्रतिवर्षी ताजे सनदेचा उजूर करीत नव जाणे. तालीक लेहोन घेऊन असल पत्र वेदमूर्ती राजश्री दिवाकर गोसावी यापासी फिराऊन देणे व देवांच्या सेवकास मुशाहिरा देणे तो निवल देत जाणे.
}| |+ |_ |रवाना छ २४ मास || मार्गशीर्ष वद्य ११ || लेखनालंकार तेरीख ४ माहे सौवाल सौवाल सन इहिदे सुरुसुदवार मर्यादेयं समानीन बारसुद छ २९ जिल्काद विजयते रुजू सुरु नीवीस. लेखन सीमा समुल्लसति {{center|_________}} {{right|लेख नं. ३}}
{{center|श्रीरघुनाथ}} {{gap}}मश हुरल हजरत राजमान्य राजश्री दत्ताजीपंत वाकेनिवीस प्रति राजश्री शिवाजी राजे दंडवत उपरि कसबे चाफल येथे रामदास गोसावी आहेत श्रीचे देवालय केले आहे यात्रा भरते व सर्वदा हि मोहछाये चालता तार तथ कटकींचे सिपाही लोक व बाजे लोक राहताती ते देवाची मर्यादा चालवीत नाहींत यात्रस लोक येताती त्यास तसवीस देताती यात्र करू लोकासी दिवाण बले कलागती करीतात म्हणोनु कलो आले तरि तुम्ही लाकास ताकीद करून तेथे यात्रेमधे हो अगर हमेशा हि कोण्हाचा उपद्रव होउ न दणे व यात्रेस लाक यताति त्यास चोराचिरटियाहि उपद्रव होऊं न दणे सालाबाद यात्रा राखतात तैसे याचे (त्रे)चे दिवसांत ता मजकूरचे कारकून व लाक जाउनु संगीनातीने यात्रा राखेती व सुखरूप--<noinclude></noinclude> 0j7fo4fntlxkakcsvoxgkmh4bmcwgjk 232354 232353 2026-06-17T12:08:23Z JayashreeVI 4058 232354 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|१२२|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>पासून तगाईत सालगुदस्ता पावत आले आहे. हालीही पेशजी मोईनप्रमाणें सालमजकुरी इ|| (इस्तकबिल) अवल सालापासून देविलें असे साल दरसाल देत जाणे प्रतिवर्षी ताजे सनदेचा उजूर करीत नव जाणे. तालीक लेहोन घेऊन असल पत्र वेदमूर्ती राजश्री दिवाकर गोसावी यापासी फिराऊन देणे व देवांच्या सेवकास मुशाहिरा देणे तो निवल देत जाणे.
}| |रवाना छ २४ मास मार्गशीर्ष वद्य ११ लेखनालंकार तेरीख ४ माहे सौवाल सौवाल सन इहिदे सुरुसुदवार मर्यादेयं समानीन बारसुद छ २९ जिल्काद विजयते रुजू सुरु नीवीस. लेखन सीमा समुल्लसति {{center|_________}} {{right|लेख नं. ३}}
{{center|श्रीरघुनाथ}} {{gap}}मश हुरल हजरत राजमान्य राजश्री दत्ताजीपंत वाकेनिवीस प्रति राजश्री शिवाजी राजे दंडवत उपरि कसबे चाफल येथे रामदास गोसावी आहेत श्रीचे देवालय केले आहे यात्रा भरते व सर्वदा हि मोहछाये चालता तार तथ कटकींचे सिपाही लोक व बाजे लोक राहताती ते देवाची मर्यादा चालवीत नाहींत यात्रस लोक येताती त्यास तसवीस देताती यात्र करू लोकासी दिवाण बले कलागती करीतात म्हणोनु कलो आले तरि तुम्ही लाकास ताकीद करून तेथे यात्रेमधे हो अगर हमेशा हि कोण्हाचा उपद्रव होउ न दणे व यात्रेस लाक यताति त्यास चोराचिरटियाहि उपद्रव होऊं न दणे सालाबाद यात्रा राखतात तैसे याचे (त्रे)चे दिवसांत ता मजकूरचे कारकून व लाक जाउनु संगीनातीने यात्रा राखेती व सुखरूप--<noinclude></noinclude> ht39uf7dbzbe5ensvm6thstbnuzsxti 232357 232354 2026-06-17T15:18:53Z JayashreeVI 4058 232357 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|१२२|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>पासून तगाईत सालगुदस्ता पावत आले आहे. हालीही पेशजी मोईनप्रमाणें सालमजकुरी इ|| (इस्तकबिल) अवल सालापासून देविलें असे साल दरसाल देत जाणे प्रतिवर्षी ताजे सनदेचा उजूर करीत नव जाणे. तालीक लेहोन घेऊन असल पत्र वेदमूर्ती राजश्री दिवाकर गोसावी यापासी फिराऊन देणे व देवांच्या सेवकास मुशाहिरा देणे तो निवल देत जाणे.
}| |रवाना छ २४ मास मार्गशीर्ष वद्य ११ लेखनालंकार तेरीख ४ माहे सौवाल सौवाल सन इहिदे सुरुसुदवार मर्यादेयं समानीन बारसुद छ २९ जिल्काद विजयते रुजू सुरु नीवीस.}| लेखन सीमा समुल्लसति {{center|_________}} {{right|लेख नं. ३}}
{{center|श्रीरघुनाथ}} {{gap}}मश हुरल हजरत राजमान्य राजश्री दत्ताजीपंत वाकेनिवीस प्रति राजश्री शिवाजी राजे दंडवत उपरि कसबे चाफल येथे रामदास गोसावी आहेत श्रीचे देवालय केले आहे यात्रा भरते व सर्वदा हि मोहछाये चालता तार तथ कटकींचे सिपाही लोक व बाजे लोक राहताती ते देवाची मर्यादा चालवीत नाहींत यात्रस लोक येताती त्यास तसवीस देताती यात्र करू लोकासी दिवाण बले कलागती करीतात म्हणोनु कलो आले तरि तुम्ही लाकास ताकीद करून तेथे यात्रेमधे हो अगर हमेशा हि कोण्हाचा उपद्रव होउ न दणे व यात्रेस लाक यताति त्यास चोराचिरटियाहि उपद्रव होऊं न दणे सालाबाद यात्रा राखतात तैसे याचे (त्रे)चे दिवसांत ता मजकूरचे कारकून व लाक जाउनु संगीनातीने यात्रा राखेती व सुखरूप--<noinclude></noinclude> nf96ldablq45urqsdtf5kq71s5l2i5q पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१२९ 104 85893 232355 232239 2026-06-17T12:14:43Z JayashreeVI 4058 232355 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|१२४|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>गांव महामूर करावा आणि या अकरा विधियांखेरीज जे गांवीं उत्पन्न होईल ते दिवाणांत द्यावें. यैशी स्वामीने आज्ञा केली ते आज्ञेप्रमाणे तुम्ही त्या महालीच्या कारकुनास लिहून चालवणे ह्मणोन आज्ञा केली होती, त्याणेप्रमाणे साले गुदस्ता आम्ही ताकीद रोखे दिल्ही कीं इनाम चालवणे पेस्तर सनद सादर होईल यैसे रोखे चालविले होते, तेणे प्रमाणें काम चालिले, परंतु सनद जाहली न्हवती, त्याकरितां श्रीस्वामीने वेदमूर्ति दिवाकर गोसावी या बराबरी सांगोन पाठविले त्यावरून हली सनद राजेश्री साहेबाचे आज्ञेप्रमाणे करून दिल्हे असे इनाम गांवगना बिधे बितपसील. {| |+ |- |मौजे डेरवण ||मौजे जाजगांव ||मौजे चरेगांव ४११ मौजे सुदन ८११ ८११ मौजे तांबवे ८११ 1 कसबे चाफल देखील त्रि ॥ ८१८ वाडी कारवजे चासई 1 ४११ मौजे साल्हे ८११
{{gap}}येकून अर्ध चावर साहा विघे इनाम साही गावासी देविला असे तो चालवणे व सदरहू गावासी वेठ बेगार आणिक कामासी तसवीस ने देणे साहा बाकी? इनामाचे बागाचे कुप काटी व देवाचे यात्रेस वेठ बेगार करावी यास सदरहू दिले असे व हली तुम्ही सुभा करिता तुम्हांस व पेस्तर जो कोणी सुभेदार होईल त्यास हाचि कागद मान्य असे जाणिजे या खेरीज कदीम त्याचा इनाम कारकीर्दी इदलशाही चालत आला असे तो चालवणें बितपसील जमीन चावर विधे ०।१३ मौजे सींगणवाडी, मौजे चरथोडी चाफल ८१ माजगाउ ८५ १५
{{gap}}येकूण पाव चावर बारा विधे यथेता आंबराई लाविल्या आहेत व काही सेते आहेति ते बिला कुसुर सालाबाद प्रमाणे चालो देणे बहु लिहिणे तरी सुज्ञ असा या कागदाचे तालीक लेहोन घेउनुं असल परतून देणे दर--<noinclude></noinclude> gi23541f5py9k415mgc9fx32i791xw9 232356 232355 2026-06-17T12:24:35Z JayashreeVI 4058 232356 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|१२४|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>गांव महामूर करावा आणि या अकरा विधियांखेरीज जे गांवीं उत्पन्न होईल ते दिवाणांत द्यावें. यैशी स्वामीने आज्ञा केली ते आज्ञेप्रमाणे तुम्ही त्या महालीच्या कारकुनास लिहून चालवणे ह्मणोन आज्ञा केली होती, त्याणेप्रमाणे साले गुदस्ता आम्ही ताकीद रोखे दिल्ही कीं इनाम चालवणे पेस्तर सनद सादर होईल यैसे रोखे चालविले होते, तेणे प्रमाणें काम चालिले, परंतु सनद जाहली न्हवती, त्याकरितां श्रीस्वामीने वेदमूर्ति दिवाकर गोसावी या बराबरी सांगोन पाठविले त्यावरून हली सनद राजेश्री साहेबाचे आज्ञेप्रमाणे करून दिल्हे असे इनाम गांवगना बिधे बितपसील. {| |+ |- |मौजे डेरवण ||मौजे जाजगांव ||मौजे चरेगांव |८११ ||८११||८११ |- |मौजे सुदन ||मौजे तांबवे ||मौजे साल्हे |८११ ||८११ ||८११ 1 कसबे चाफल देखील त्रि ॥ ८१८ वाडी कारवजे चासई 1 ४११८११ ८११
{{gap}}येकून अर्ध चावर साहा विघे इनाम साही गावासी देविला असे तो चालवणे व सदरहू गावासी वेठ बेगार आणिक कामासी तसवीस ने देणे साहा बाकी? इनामाचे बागाचे कुप काटी व देवाचे यात्रेस वेठ बेगार करावी यास सदरहू दिले असे व हली तुम्ही सुभा करिता तुम्हांस व पेस्तर जो कोणी सुभेदार होईल त्यास हाचि कागद मान्य असे जाणिजे या खेरीज कदीम त्याचा इनाम कारकीर्दी इदलशाही चालत आला असे तो चालवणें बितपसील जमीन चावर विधे ०।१३ मौजे सींगणवाडी, मौजे चरथोडी चाफल ८१ माजगाउ ८५ १५
{{gap}}येकूण पाव चावर बारा विधे यथेता आंबराई लाविल्या आहेत व काही सेते आहेति ते बिला कुसुर सालाबाद प्रमाणे चालो देणे बहु लिहिणे तरी सुज्ञ असा या कागदाचे तालीक लेहोन घेउनुं असल परतून देणे दर--<noinclude></noinclude> cnszfut1utoefh1bieb5ir13inuisfz 232359 232356 2026-06-17T15:35:57Z JayashreeVI 4058 232359 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|१२४|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>गांव महामूर करावा आणि या अकरा विधियांखेरीज जे गांवीं उत्पन्न होईल ते दिवाणांत द्यावें. यैशी स्वामीने आज्ञा केली ते आज्ञेप्रमाणे तुम्ही त्या महालीच्या कारकुनास लिहून चालवणे ह्मणोन आज्ञा केली होती, त्याणेप्रमाणे साले गुदस्ता आम्ही ताकीद रोखे दिल्ही कीं इनाम चालवणे पेस्तर सनद सादर होईल यैसे रोखे चालविले होते, तेणे प्रमाणें काम चालिले, परंतु सनद जाहली न्हवती, त्याकरितां श्रीस्वामीने वेदमूर्ति दिवाकर गोसावी या बराबरी सांगोन पाठविले त्यावरून हली सनद राजेश्री साहेबाचे आज्ञेप्रमाणे करून दिल्हे असे इनाम गांवगना बिधे बितपसील. {| |+ |- |मौजे डेरवण ||मौजे जाजगांव ||मौजे चरेगांव |८११ ||८११||८११ |- |मौजे सुदन ||मौजे तांबवे ||मौजे साल्हे |८११ ||८११ ||८११ |} 1 कसबे चाफल देखील त्रि ॥ ८१८ वाडी कारवजे चासई 1 ४११८११ ८११
{{gap}}येकून अर्ध चावर साहा विघे इनाम साही गावासी देविला असे तो चालवणे व सदरहू गावासी वेठ बेगार आणिक कामासी तसवीस ने देणे साहा बाकी? इनामाचे बागाचे कुप काटी व देवाचे यात्रेस वेठ बेगार करावी यास सदरहू दिले असे व हली तुम्ही सुभा करिता तुम्हांस व पेस्तर जो कोणी सुभेदार होईल त्यास हाचि कागद मान्य असे जाणिजे या खेरीज कदीम त्याचा इनाम कारकीर्दी इदलशाही चालत आला असे तो चालवणें बितपसील जमीन चावर विधे ०।१३ मौजे सींगणवाडी, मौजे चरथोडी चाफल ८१ माजगाउ ८५ १५
{{gap}}येकूण पाव चावर बारा विधे यथेता आंबराई लाविल्या आहेत व काही सेते आहेति ते बिला कुसुर सालाबाद प्रमाणे चालो देणे बहु लिहिणे तरी सुज्ञ असा या कागदाचे तालीक लेहोन घेउनुं असल परतून देणे दर--<noinclude></noinclude> 7qnau1ylok58rzb99f3teww73tvg2i6 232360 232359 2026-06-17T15:38:51Z JayashreeVI 4058 232360 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|१२४|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>गांव महामूर करावा आणि या अकरा विधियांखेरीज जे गांवीं उत्पन्न होईल ते दिवाणांत द्यावें. यैशी स्वामीने आज्ञा केली ते आज्ञेप्रमाणे तुम्ही त्या महालीच्या कारकुनास लिहून चालवणे ह्मणोन आज्ञा केली होती, त्याणेप्रमाणे साले गुदस्ता आम्ही ताकीद रोखे दिल्ही कीं इनाम चालवणे पेस्तर सनद सादर होईल यैसे रोखे चालविले होते, तेणे प्रमाणें काम चालिले, परंतु सनद जाहली न्हवती, त्याकरितां श्रीस्वामीने वेदमूर्ति दिवाकर गोसावी या बराबरी सांगोन पाठविले त्यावरून हली सनद राजेश्री साहेबाचे आज्ञेप्रमाणे करून दिल्हे असे इनाम गांवगना बिधे बितपसील. {| |+ |- |मौजे डेरवण ||मौजे जाजगांव ||मौजे चरेगांव |- |८११ ||८११||८११ |- |मौजे सुदन ||मौजे तांबवे ||मौजे साल्हे |- |८११ ||८११ ||८११ |} 1 कसबे चाफल देखील त्रि ॥ ८१८ वाडी कारवजे चासई 1 ४११८११ ८११
{{gap}}येकून अर्ध चावर साहा विघे इनाम साही गावासी देविला असे तो चालवणे व सदरहू गावासी वेठ बेगार आणिक कामासी तसवीस ने देणे साहा बाकी? इनामाचे बागाचे कुप काटी व देवाचे यात्रेस वेठ बेगार करावी यास सदरहू दिले असे व हली तुम्ही सुभा करिता तुम्हांस व पेस्तर जो कोणी सुभेदार होईल त्यास हाचि कागद मान्य असे जाणिजे या खेरीज कदीम त्याचा इनाम कारकीर्दी इदलशाही चालत आला असे तो चालवणें बितपसील जमीन चावर विधे ०।१३ मौजे सींगणवाडी, मौजे चरथोडी चाफल ८१ माजगाउ ८५ १५
{{gap}}येकूण पाव चावर बारा विधे यथेता आंबराई लाविल्या आहेत व काही सेते आहेति ते बिला कुसुर सालाबाद प्रमाणे चालो देणे बहु लिहिणे तरी सुज्ञ असा या कागदाचे तालीक लेहोन घेउनुं असल परतून देणे दर--<noinclude></noinclude> s9smdekpdfnxvb388hidpp3q3lb4sfx महात्मा फुले समग्र वाङमय 0 110701 232366 232329 2026-06-18T04:19:45Z QueerEcofeminist 918 Fmt 232366 wikitext text/x-wiki <pages index="महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf" from="१ " to="४१" /> 753umlv8zgi0q04uk7zowmdri42lltl पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/४ 104 110705 232358 232336 2026-06-17T15:28:54Z JayashreeVI 4058 232358 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{xx-larger|{{center|'''अनुक्रमणिका.'''}}}} {| |+ |- | १ || पुण्याहून सज्जनगडचा प्रवास. || १ |- | २ || सज्जनगडाचे सद्यःकालीन व पूर्वकालीन स्वरूप. || १४ |- | ३ || रामदासांच्या महातीबद्दलची भिन्न मतें || २२ |- | उदाहरण || उदाहरण || उदाहरण |- | उदाहरण || उदाहरण || उदाहरण |- | उदाहरण || उदाहरण || उदाहरण |- | उदाहरण || उदाहरण || उदाहरण |- | उदाहरण || उदाहरण || उदाहरण |- | उदाहरण || उदाहरण || उदाहरण |- | उदाहरण || उदाहरण || उदाहरण |- | उदाहरण || उदाहरण || उदाहरण |} १ १ # २ १४ . ३ रामदासांच्या महतीबद्दलचीं भिन्न मतें. २२ ४ दासबोधाच्या १ ते ७ दशकांचा सारांश व त्यांतील वाचनीय वचनें. २६ ५ आठवा ज्ञानदशक. ६ दशक ९ ते १५. ७ दशक १६ ते २०. < समग्र दासबोधाचें सिंहावलोकन. ९ १० रामदासांचें संक्षिप्त चरित्र.' रामदास व शिवाजी यांचा संबंध. .... ३७ .... .... ३९ ५९ a ७३ ८० ९७ ११ परिशिष्ट. ... .... .... १२०<noinclude></noinclude> 3hhdueuf4a945025pzolns8ozngygvc अनुक्रमणिका:ब्राह्मणांचे कसब.pdf 106 110707 232361 2026-06-17T16:58:25Z FailedEngineer2027 6067 नवीन पान "" 232361 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=ब्राह्मणांचे कसब |Language=mr |Volume= |Author=[[Author:जोति गोविंदराव फुले]] |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=नागरिक प्रकाशन |Address=नाशिक |Year=1962 |Key=ब्राह्मणांचे कसब |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=3 |Progress=X |Pages=<pagelist /> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} dyd7yp4zalu6ue99xg8n34tizj989wl अनुक्रमणिका:भक्तिपरमार्थपर कविता.pdf 106 110708 232362 2026-06-17T17:57:14Z FailedEngineer2027 6067 नवीन पान "" 232362 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=भक्तिपरमार्थपर कविता |Language=mr |Volume= |Author= |Translator= |Editor=नारायण चिंतामण केळकर |Illustrator= |School= |Publisher=तुकाराम जावजी |Address=मुंबई |Year=1903 |Key=भक्तिपरमार्थपर कविता |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=X |Pages=<pagelist /> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} 9dsxz7yrwl1165hpb3w8h51ffegv9r7 अनुक्रमणिका:आशावादी.pdf 106 110709 232373 2026-06-18T06:59:01Z FailedEngineer2027 6067 नवीन पान "" 232373 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=आशावादी |Language=mr |Volume= |Author=[[Author:श्रीधर व्यंकटेश केतकर]] |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=श्रीधर व्यंकटेश केतकर |Address=पुणे |Year=1927 |Key=श्रीधर व्यंकटेश केतकर |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=X |Pages=<pagelist /> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} c9hckapx984i5qhtl66x9oxh35o5zob