Wiktionary mrwiktionary https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.46.0-wmf.24 case-sensitive मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विक्शनरी विक्शनरी चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा सूची सूची चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk striyarth 0 8240 29335 2026-04-20T07:09:25Z ~2026-24166-78 4001 नवीन पान "== स्त्रियार्थ == === शब्दरूप === स्त्रियार्थ === शब्दप्रकार === नाम (स्त्रीलिंगी संकल्पना) === अर्थ === १. स्त्रीचे कर्तृत्व, पराक्रम, शौर्य, त्याग, समर्पण, सेवा आणि ममत्व यांचा एकत्रित अर्थ. २. इ..." 29335 wikitext text/x-wiki == स्त्रियार्थ == === शब्दरूप === स्त्रियार्थ === शब्दप्रकार === नाम (स्त्रीलिंगी संकल्पना) === अर्थ === १. स्त्रीचे कर्तृत्व, पराक्रम, शौर्य, त्याग, समर्पण, सेवा आणि ममत्व यांचा एकत्रित अर्थ. २. इतिहासापासून भविष्यकाळापर्यंत स्त्रीच्या सामर्थ्य, योगदान आणि जीवनमूल्यांचे प्रतीक. === समानार्थी शब्द === नारीशक्ती, स्त्रीसामर्थ्य, स्त्रीत्व === उदाहरण वाक्ये === १. स्त्रियार्थ या शब्दात स्त्रीचे शौर्य आणि ममत्व दोन्ही सामावलेले आहे. २. समाजाच्या प्रगतीत स्त्रियार्थ महत्त्वाची भूमिका बजावतो. ३. इतिहासातील अनेक स्त्रियांनी स्त्रियार्थ जिवंत ठेवला आहे. === टीप === हा शब्द स्त्रीच्या सर्वांगीण शक्तीचे आणि मूल्यांचे प्रतिनिधित्व करतो. स्त्रियार्थ " ..... काय ...?? नवीन वाटतोय ना शब्दप्रयोग...... अहो...,वाटणारच.... अर्थात नवाकोराच आहे हा शब्द.. खूप दिवस झाले मनात एक विषय घोळत होता पुरुषार्थ..!!! पुरुषार्थ याची वेदातील सर्वश्रुत व्याख्या आपणास माहीत आहेच ... ....धर्म अर्थ काम आणि मोक्ष प्राप्त करणे म्हणजे पुरुषार्थ होय. प्रत्येक पुरुषाने आपल्या वाट्याला आलेला स्वधर्म अर्थात पुरुषार्थ करणे त्याच्या हिताचे असते . आपल्या संस्कृतीमध्ये पुरुषार्थ कसा करावा याबद्दल उत्तम व्यवस्था केलेली आहे. याबद्दल कोणाला तिळमात्र शंका येऊ नये.... परंतु प्रश्न असा उरतो की स्त्रियांनी रणांगण गाजवले तर तो पुरुषार्थ होतो का?? स्त्रियांनी राज्य चालवले तर तो पुरुषार्थ होतो का? जिजाऊ ,सावित्रीबाई फुले यांनी जे गौरवास्पद महान कार्ये केली तो पुरुषार्थ होता का? पुरुषांनी केलेल्या महान कार्याला जर पुरुषार्थ म्हणायचे तर स्त्रियांनी केलेल्या महान कार्याकरिता एखादा विशेष शब्द का असू नये? आपल्या धर्मामध्ये म्हणा वा संस्कृतीमध्ये म्हणा स्त्री परक्रमासंदर्भात विशेष शब्दाचा उल्लेख हवा होता असे मनोमन वाटते.... स्त्रीने केलेले महान कार्य संबोधण्यासठी स्त्रियार्थं शब्द शब्दकोशात ,संस्कृत व्याकरणात हवा होता....!! पण असे का नाही?? का आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रीने केलेला देखील पुरुषार्थच ...,असे काहीसे असेल का? स्त्रीचे गुण,कला कौशल्य यांच्यावर हळूच पांघरूण घालण्याचा हा प्रयत्न तर नाही? का स्त्रीच्या ममत्व आणि समर्पण, त्याग ,सेवा या गुणांपुढे तिचा कोणताच पराक्रम निसर्गालाच मान्य नाही? असे असेल तर अंबिका चंडिका आणि महिषासुरमर्दिनी ने केले ते काय होते? या लेख सदरातून केवळ प्रश्नांचा भडिमार मला करावयाचा नाही यातून स्त्रियार्थं नव्या अर्थाने रुजला जावा एवढेच....स्त्रीचा पराक्रम आणि यशोगाथा स्त्रियार्थं या शब्दाखाली नोंदवल्या जाव्या एवढेच नव्हे तर स्त्रीच्या जगण्याला ही अर्थ असावा म्हणजे "स्त्रियार्थं" स्त्रीच्या नैसर्गिक जबाबदाऱ्या आणि चौकट या पलिकडे जाऊन स्वतःसाठी जगायला सुरुवात करणे म्हणजे स्त्रियार्थं.. स्त्रीने मोकळा श्वास घेणे आणि जगण्याचा भरभरून आनंद लुटणे म्हणजे स्त्रियार्थं.... स्त्रीच्या जगण्याला जेव्हा तिचं स्वतःचं केंद्र सापडतं, तेव्हा तो क्षण म्हणजे स्त्रियार्थ.” स्त्रीस गगनभरारी घेण्यास तिचे पंख मजबूत करणे म्हणजे स्त्रियार्थं.... स्त्रीस तिचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याची मुभा मिळणे म्हणजे स्त्रियार्थं.... स्त्रीमध्ये धाडस , बळ,धैर्य मनोबल वाढल्यानंतर तिच्या जीवनाला अर्थ आणि दिशा मिळेल,त्यातून प्राप्त होणारा सन्मान म्हणजे स्त्रियार्थं.... .... आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तिच्या जीवनाला खरा अर्थ प्राप्त करून देण्यासाठी तिला 'अर्थ' ही मिळवणे म्हणजे स्त्रियार्थं.... अर्थासाठी का होईना पण अर्थ हवाच असे स्त्रीबद्दल उद्गार काढल्यास वावगे ठरू नये. समर्पण आणि प्रेमाबरोबर आर्थिक स्थैर्य,मनोबल आणि धैर्य या बाजू जर स्त्रीने बळकट केल्या तर तिच्या आयुष्याला खरा स्त्रियार्थं येईल.... आपल्याकडे मुलीचे लग्न झाले तिला मुलं बाळ झाली म्हणजे तिचे आयुष्य सार्थकी लागले असे म्हणतात.आजही मुलींसाठी नांदण आणि गोंदनं म्हणजे आयुष्याची परिपूर्णता आहे का? काळ तर पुढे पळतोच आहे परंतु स्त्री संदर्भातील व्याख्या कधी बदलणार?? पुरुषार्थ च्या विरुद्धार्थी शब्द शब्दकोशात कधी नोंदवला जाणार? स्त्रीचे पराक्रम आणि यशोगाथा स्त्रियार्थं या नावाने कधी नोंदवले जाणार? स्त्रियार्थ वैगेरे असे देखील काही असू शकते हे समाजाला कोण आणि कधी पटवून देणार? मी तर हा शब्द रूढ आणि प्रचलित केला आहे. तुम्हाला काय वाटते? (संस्कृतमध्ये “पुरुष” हा शब्द फक्त पुरुष (male) नसून “मनुष्य” (human being) या व्यापक अर्थानेही वापरला जातो. त्यामुळे “पुरुषार्थ” म्हणजे मानवाचे उद्दिष्ट असेही मानले जाते.) 📖 स्त्रियार्थ – अर्थ: स्त्रीच्या जीवनाचे उद्दिष्ट आणि अर्थ: स्त्रीने स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव ठेवून, तिची स्वप्ने, ध्येय आणि कर्तृत्व पूर्ण करणे म्हणजे स्त्रियार्थ. *विस्तृत अर्थ* समर्पण, प्रेम आणि जबाबदाऱ्या सांभाळत असतानाही, स्वतःची ओळख निर्माण करून जीवनाला खरा अर्थ देणे म्हणजे स्त्रियार्थ. लेखिका हर्षदा जोशी,पुराणिक. dq6abuiak8jb7cutsk7544glahsaen3 चर्चा:striyarth 1 8241 29336 2026-04-20T07:21:30Z ~2026-24166-78 4001 /* striyarth */ नवीन विभाग 29336 wikitext text/x-wiki == striyarth == “स्त्रियार्थ” म्हणजे स्त्रीचे कर्तृत्व, शौर्य, त्याग, सेवा आणि ममत्व यांचा एकत्रित अर्थ. या शब्दामागचा विचार अधिक खोलात समजून घेण्यासाठी आणि प्रत्येकाच्या अनुभवातून त्याला समृद्ध करण्यासाठी हा page तयार केला आहे. 👉 या page वर आपण: • स्त्रियांच्या कर्तृत्वाच्या कथा शेअर करू • विचार, अनुभव आणि प्रेरणा मांडू • स्त्रीशक्तीबद्दल सकारात्मक चर्चा करू हा फक्त page नाही… हा एक प्रयत्न आहे — स्त्रीच्या असंख्य रूपांना शब्द देण्याचा ✨ आपले विचार नक्की share करा 🙏 #Striyarth #NariShakti #Discussion #Inspiration [[विशेष:योगदान/~2026-24166-78|~2026-24166-78]] ([[सदस्य चर्चा:~2026-24166-78|talk]]) ०७:२१, २० एप्रिल २०२६ (UTC) k8b15uy2tzsrfpceq6mlvsscjhbox5o